Tuesday, July 14, 2026
Home Blog Page 271

पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ पत्रकाचे वाटप केल्याचा प्रकार

0
पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ पत्रकाचे वाटप केल्याचा प्रकार



पुणे : पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ एका तरुणाने पत्रकाचे वाटप केल्याची घटना कर्वेनगर भागात घडली. या घटनेनंतर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी तरुणाला चोप दिला. या घटनेनंतर दाेन्ही बाजूंचे कार्यकर्ते वारजे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.

कर्वेनगर भागात काही तरुण पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ भित्तिचित्र दाखवून एका पिझ्झा विक्री दुकानासमोर पत्रके वाटत होते. इस्रायली कंपनी, तसेच उत्पादनांवर बहिष्कार घालावा, असा मजकूर या पत्रकात होता. या घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते तेथे गेले. त्यांनी पत्रकांचे वाटप करणाऱ्या तरुणांना रोखून आक्षेप घेतला. त्यांना जाब विचारून त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या भागात जमलेल्या नागरिकांनी तरुणांना चोप दिला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणांना मारहाण करतानाची चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाली. पत्रकांचे वाटप करणाऱ्या तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.

दरम्यान, पाकिस्तान झिंदाबाद असा मजकूर समाजमाध्यमात प्रसारित करण्याची घटना कोंढवा भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका युवतीला अटक केली. तिला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. युवती एका शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत होती. तिला संस्थेतून काढून टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.



Source link

भारत-पाक तणाव, महाराष्ट्र सतर्क; सिद्धीविनायक, शिर्डी मंदिराकडून नियमावली जाहीर

0
भारत-पाक तणाव, महाराष्ट्र सतर्क; सिद्धीविनायक, शिर्डी मंदिराकडून नियमावली जाहीर



राज्यातील प्रमुख शहरांसह मंदिरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मंदिर प्रशासनानेही आता भाविकांसाठी नियमावली ठरवली आहे. राज्यात सुरक्षेसंदर्भात काय पाऊलं उचलण्यात आलीयेत याबाबत जाणून घेऊयात. 



Source link

पाकिस्तानला केलेली मदत तुर्कीला भोवणार, तुर्कीए, अझर बैझानवर भारतीयांचा बहिष्कार

0
पाकिस्तानला केलेली मदत तुर्कीला भोवणार, तुर्कीए, अझर बैझानवर भारतीयांचा बहिष्कार


मुंबई : वसुदेव कुटुंबकम् या सुत्रावर चालणारा भारत देश हा सर्वच देशांशी चांगले संबंध ठेवून आहे. मात्र तरीही जेव्हा केव्हा भारत आणि पाकिस्तानचा विषय येतो तेव्हा काही भारताविरुद्ध कुरापती करायला तयार असतात. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. मात्र या कुरापतीखोर पाकिस्तानला या काळात चीन, तुर्कीये, अझर बैझान या देशांनी पाठिंबा दिला. त्यामुळे आता भारतातल्या पर्यटकांनी या दोन्ही देशांवर बहिष्कार घातला आहे. 

कायमच सहनशील, सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारा भारत देश. वसुदेव कुटुंबकम् हे भारताचं सूत्र आहे, त्यामुळे सर्वांप्रती आपली प्रेम आणि आपुलकीची भावना असते. मात्र असं असलं तरी मुद्दा जेव्हा भारत पाकिस्तानचा येतो तेव्हा अनेक देश भूमिका घ्यायला कचरतात. विशेषत: मुस्लीम देश. तुमच्यात पडायचं नाही, असा पवित्रा घेत काही देशांनी तटस्थ भूमिका घेतली. मात्र तुर्कीये आणि अझर बैझान या दोन देशांनी उघड उघड पाकिस्तानला पाठिंबा दिलाय. यानंतर भारतीयांमध्ये संतापाची लाट पसरलीय. 

सर्वांनी पर्यटनासाठी तुर्कीये आणि अझर बैझानमध्ये जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. आमच्याकडून पैसे कमवायचे आणि आमच्याविरोधात वापरायचे, असा करंटेपणा करणारे हे देश आता बॅन असतील, असा एकमुखी निर्णय ट्रॅव्हल  कंपन्यांनीही घेतलाय. पर्यटकांनीही आपली तिकिटं रद्द केली. भारतातल्या अनेक मोठ्या ट्रॅव्हल एजन्सींनी तुर्की आणि अजरबैजानचे सगळे टूर पॅकेजेस आणि बुकिंग या रद्द केल्या आहेत. दहशतवादाला समर्थन देणा-या देशांमध्ये जाण्यासाठी पर्यटकांना प्रोत्साहन देणार नाही, अशी भूमिका भारतीय ट्रॅव्हल इंडस्ट्रीनं घेतली.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पाक दहशतवाद्यांना पोसतोय, याचे पुरावेही जगाला दिले. अशा काळात जगातले इतर देश पाठिशी उपस्थित राहावेत इतकी माफक अपेक्षा असताना तुर्कीये आणि अझर बैझान या देशांनी पाकला साथ दिली.  खरं तर, तुर्कीयेची ही जुनी खोड आहे. या देशाला भारतानं कायम मदत केली आहे. 

संकटकाळी भारताची तुर्कीयेला मदत : 

– 2023 च्या विनाशकारी भूकंपावेळी पंतप्रधान मोदींनी NDRF ची दोन पथकं आणि कुशल डॉक्टर्स पाठवले

– पण काश्मीरच्या मुद्द्यावरून तुर्कीये पाकच्या मागे उभा राहिला 

– इतकंच काय, 1965 आणि 71 मध्येही तुर्कीयेकडून पाकिस्तानला लष्करी मदत 

– इस्लाम राष्ट्र म्हणून तुर्कीयेचा पाठिंबा तसंच तुर्की आणि पाकिस्तानमध्ये संरक्षण संबंध 

–  चीन आणि तुर्कीयेकडून पाकिस्तानला शस्त्र पुरवठा

पाकिस्तान आणि अझर बैझानचे पारंपरिक संबंध आहेत. त्यामुळे तो कायम पाकिस्तानच्या पाठिशी राहिला आहे. तुर्कियेला दरवर्षी सुमारे साडे तीन लाख ते ४ लाख भारतीय पर्यटक भेट देतात. 2024 पासून भारतीय पर्यटकांचा ओघ तिकडे वाढला होता मात्र आता दोन्ही देशांच्या भूमिकांमुळे भारतीयांनी त्यावर बंदी घातली आहे.  





Source link

३२ हजारांहून अधिक प्रवाशांची मेट्रो सफर; आतापर्यंतची दैनंदिन विक्रमी प्रवासी संख्या

0
३२ हजारांहून अधिक प्रवाशांची मेट्रो सफर; आतापर्यंतची दैनंदिन विक्रमी प्रवासी संख्या



मुंबई: कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक टप्पा २ अ चे लोकार्पण शुक्रवारी झाले. लोकार्पणानंतर शनिवारी सकाळी साडेसहा वाजता मेट्रो ३ आरे ते आचार्य अत्रे चौक अशी धावू लागली. आरे ते बीकेसी अशा आतापर्यंत धावणाऱ्या भुयारी मेट्रो मार्गिकेत आणखी पाच मेट्रो स्थानकांची भर पडली आहे.

त्यामुळे आरे ते आचार्य अत्रे चौक अशी मेट्रो मार्गिका सुरु झाल्यानंतर शनिवारी, पहिल्या दिवशी या मार्गिकेला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. सुट्टीचा दिवस असतानाही पहिल्या दिवशी ३२ हजार ७९१ प्रवाशांनी मेट्रो प्रवास केला. आतापर्यंतची मेट्रो ३ मार्गिकेवरील ही सर्वाधिक दैनंदिन प्रवासी संख्या आहे. पहिल्या दिवशी प्रवास करणाऱ्यांमध्ये हौशी प्रवाशांची, नव्या मार्गिकेचा अनुभव घेण्यासाठी आलेल्या प्रवाशांची संख्या अधिक होती. भुयारी मेट्रो कशी आहे हे पाहण्यासाठी आणि सिद्धीविनायक मंदिरात जाण्यासाठी अनेकांनी मेट्रोचा प्रवास केला.

मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनच्या (एमएमआरसी) ३३.५ मार्गिकेतील आरे ते बीकेसी मार्गिका आॅक्टोबर २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाली. आता शनिवारी या मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक अशी मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाली. एमएमआरसीच्या निर्णयानुसार शनिवारी सकाळी साडे सहावाजता आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकावरुन आरेला जाणारी पहिली मेट्रो गाडी सुटली. तर सकाळी साडे सहा वाजता आरे मेट्रो स्थानकातून आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाला जाणारी पहिली मेट्रो सुटली. सकाळ ते दुपारपर्यंत मेट्रो स्थानकांवर तितकीशी गर्दी दिसून आली नाही. मात्र दुपारनंतर हळूहळू गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. सायंकाळी या गर्दीत मोठी वाढ झाली.

एमएमआरसीने दिलेल्या माहिती प्रमाणे पहिल्या दिवशी, म्हणजे शनिवारी रात्री आठ वाजेपर्यंत आरे ते आचार्य अत्रे चौक मार्गिकेदरम्यान २६ हजार ७५८ प्रवाशांनी प्रवास केला. तर रात्री ९ वाजता दैनंदिन प्रवाशांची संख्या २९ हजार ७५० वर पोहचली. त्यात बीकेसी ते आचार्य अत्रे चौक दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या १४ हजार ४०० अशी होती. शनिवारी दिवसभरात अर्थात सकाळी साडे सहा ते रात्री साडे दहा दरम्यान मेट्रो ३ वर प्रवास करणार्या मेट्रो प्रवाशांची एकूण प्रवाशी संख्या ३२ हजार ७९१ अशी होती. त्यात बीकेसी ते आचार्य अत्रे असा प्रवास करणार्यांची संख्या १६ हजार ३७७ अशी होती.

मेट्रो ३ मार्गिकेवरील ही आतापर्यंतची सर्वाधिक दैनंदिन प्रवासी संख्या होती.कारण आतापर्यंत या मार्गिकेवरील दैनंदिन संख्या २० हजारांच्या आसपास राहिली असून शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवशी यात आणखी घट होते. त्यानुसार मागील शनिवारची अर्थात ३ मे ची एकूण प्रवासी संख्या १५ हजार ९११ अशी होती. तर शनिवार, २६ एप्रिलची एकूण प्रवासी संख्या १२ हजार ७६६ अशी होती. पुढील टप्पा आणि संपूर्ण मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर मेट्रो ३ चा प्रतिसाद वाढेल असे एमएमआरसीकडून सांगितले होते. त्यानुसार टप्पा २ अ सुरु झाल्यानंतर पहिल्या दिवशी प्रवासी संख्या वाढल्याचे दिसते आहे.



Source link

Operation Sindoor मधे युसूफ अजहर, अब्दुल मलिक आणि मुदसिर अहमद ठार; 100 दहशतवाद्यांचा खात्मा; DGMO ने दिले पुरावे

0
Operation Sindoor मधे युसूफ अजहर, अब्दुल मलिक आणि मुदसिर अहमद ठार; 100 दहशतवाद्यांचा खात्मा; DGMO ने दिले पुरावे


Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली आहे. भारताच्या हल्ल्यात युसूफ अजहर, अब्दुल मलिक आणि मुदसिर अहमद ठार झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तिन्ही सशस्त्र दलांची आज पत्रकार परिषद पार पडली असून, यावेळी सॅटेलाईट फोटो दाखवत पुरावे सादर करण्यात आले. या फोटोंमधून भारताने केलेली कारवाई आणि पाकिस्तानचं झालेलं नुकसान याचे पुरावे मिळाले आहेत.

डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितलं की, “सीमेपलीकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या छावण्या आणि प्रशिक्षण स्थळांची ओळख पटवण्यात आली होती. तिथे अशी अनेक ठिकाणं असल्याचं आमच्या लक्षात आलं. यामधील अनके ठिकाणं आता रिकाम झाली होती. हल्ल्याच्या भीतीने ती आधीच रिकामी करण्यात आली होती. आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या ठिकाणावर हल्ला करण्याचं नियोजन केलं होतं, ज्यामधून नागरी वस्ती वगळण्यात आल्या होत्या. गुप्तचर यंत्रणांनी 9 दहशतवादी स्थळांची ओळख पटवली होती. त्यापैकी काही पीओजेकेमध्ये होते, तर काही पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात होते. लष्कर-ए-तैयबाचे केंद्र असलेल्या मुरीदकेसारख्या ठिकाणांनी गेल्या काही वर्षांत अजमल कसाब आणि डेव्हिड हेडलीसारखे दहशतवादी जन्माला घातले आहेत.”

पुढे त्यांनी सांगितलं की, “9 दहशतवादी केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले, ज्यात आयसी 814 च्या अपहरणात आणि पुलवामा बॉम्बस्फोटात सहभागी असलेले युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदासिर अहमद सारखे दहशतवादीही मारले गेले. त्यानंतर लगेचच पाकिस्तानने नियंत्रण रेषेचे उल्लंघन केलं आणि नागरी वस्ती असलेल्या गावांवर आणि गुरुद्वारांसारख्या धार्मिक स्थळांवर हल्ला केला. ज्यामुळे दुर्दैवाने जीवितहानी झाली. भारतीय हवाई दलाने यापैकी काही छावण्यांवर हल्ला करून या हल्ल्यांमध्ये मोठी भूमिका बजावली. भारतीय नौदलाने शस्त्रसाठ्यासंदर्भात अचूक माहिती दिली”.





Source link

ढाब्यावर जेवायला थांबलेल्या सैनिकांना मिळालं सप्राइज; VIDEO पाहून भारावले भारतीय

0
ढाब्यावर जेवायला थांबलेल्या सैनिकांना मिळालं सप्राइज; VIDEO पाहून भारावले भारतीय


Indian Soldiers Viral Video : गेल्या बऱ्याच दिवसांपासून भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती पाहता सगळ्यांचं लक्ष हे सैनिकांवर आहे. सगळेच भारतीय हे देशाच्या सैन्याला प्रोत्साहन देताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या हापुडच्या लोकांनी त्यांच्या ढाब्यावर पोहोचलेल्या भारतीय सैनेचं कसं स्वागत केलं. जे पाहुन तुम्हाला देखील आनंद होईल.  

खरंतर, सैनिकांची एक तुकडी हापुडमध्ये स्थित शिवा ढाब्यावर जेवण्यासाठी थांबली होती. या दरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी लगेच त्यांचे स्वागत आणि कौतूक करण्यासाठी असं काही केलं की सगळीकडे त्याचीच चर्चा केली आहे. त्यांनी एकत्र येऊन भारतीय सेनेसाठी टाळ्या वाजवल्या आणि त्यासोबत त्यांच्यावर फूलांचा वर्षाव केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु आहे. 

ढाब्यावर जेवणं करायला आलेल्या सैनिकांच्या स्वागत केलं. या व्हिडीओमध्ये ढाब्यावर जेवूण करून झाल्यानंतर तिथून ते पुढच्या प्रवासाला सुरुवात करत असताना तिथे असलेल्या लोकांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’ अशा घोषणा दिल्या. त्यासोबतच तिथे असलेल्या लोकांनी त्यांना पाण्याची बॉटल दिली. या व्हिडीओला पाहून सगळ्यांनी तिथल्या लोकांचे कौतूक केले आहे. 

या व्हिडीओला पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिथल्या लोकांची स्तुती केली आहे. सैनिकांचे असे स्वागत केलेलं पाहून सगळ्यांना खूप चांगलं वाटतंय. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ज्यांनी हा विचार केला त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. कारण जे आपली सुरक्षा करत आहेत त्यांची सुरक्षा करणं महत्त्वाचं आहे. दुसऱ्या नेटकऱ्यानं म्हटलं की जय जवान जय किसान जय हिंद हिंदुस्तान. तर अनेक नेटकऱ्यांनी व्हिडीओ पाहिल्यानंतर भारतीय सैनेला सलाम केला आहे.

हेही वाचा : Mother’s Day 2025 : करिश्मा, मलायका ते नीना गुप्ता ‘या’ आहेत बॉलिवूडच्या Single Mom

पहलगाम हल्ला आणि त्याचं उत्तर…

पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ला केला. तर या हल्ल्यात दहशतावाद्यांनी 26 पर्यटकांचा धर्म विचारत त्यांची हत्या केली. त्यानंतर भारतानं यावर अ‍ॅक्शन घेत 6 ते 7 च्या मध्यरात्री पाकिस्तान आणि त्यासोबत काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर पाकिस्ताननं भारतावर हल्ला करण्याचे प्रयत्न केले. दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली असतानाच अचानक 10 मे रोजी शस्रसंधी म्हणजेच दोन्ही बाजूने गोळीबार आणि लष्करी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. 





Source link

Shashi Tharoor Slams Pakistan: “It’s in Their Nature to Backtrack” on Border Violations

0
Shashi Tharoor Slams Pakistan: “It’s in Their Nature to Backtrack” on Border Violations



Shashi Tharoor Slams Pakistan: “It’s in Their Nature to Backtrack” on Border Violations | “उसकी फितरत है मुकर जाने की…”, शस्त्रविरामाचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला शशी थरूर यांनी फटकारले



Source link

साताऱ्याच्या जवानाला बॉर्डरवरुन बोलावणं आलं, लग्नाच्या पूजेच्या दुसऱ्याच दिवशी सगळं मागे सोडून कर्तव्यावर निघाला

0


Indian Army Satara News: साताऱ्याच्या जवानाला बॉर्डरवरुन बोलावणं आलं, लग्नाच्या पूजेच्या दुसऱ्याच दिवशी सगळं मागे सोडून कर्तव्यावर निघाला

साताऱ्याच्या जवानाला बॉर्डरवरुन बोलावणं आलं, लग्नाच्या पूजेच्या दुसऱ्याच दिवशी सगळं मागे सोडून कर्तव्यावर निघाला



Source link

Success Story : IAS Tushar Singla who passed out UPSC CSE in his second attempt

0
Success Story : IAS Tushar Singla who passed out UPSC CSE in his second attempt



Success Story : IAS Tushar Singla who passed out UPSC CSE in his second attempt | UPSC प्रीलिम्स पास होण्यासाठी अशी केली खास तयारी; वाचा ‘या’ अधिकाऱ्याचा आयएएस बनण्याची कहाणी



Source link

‘मोदींनी देशासोबत विश्वासघात केला, इंदिरा गांधी असत्या तर…’, राऊत संतापून म्हणाले, ‘ज्यांनी 26…’

0
‘मोदींनी देशासोबत विश्वासघात केला, इंदिरा गांधी असत्या तर…’, राऊत संतापून म्हणाले, ‘ज्यांनी 26…’


India Pakistan War PM Modi: भारत आणि पाकिस्तानदरम्यान अमेरिकेच्या मध्यस्थितीने शस्रसंधी झाल्याच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर चांगलेच खवळले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत असं म्हणणाऱ्या राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना थेट केंद्र सरकारच्या भूमिकेवरुन निशाणा साधला. भारत सरकार ट्रम्पला मध्यस्थीत घालून पाकिस्तान की लाडक्या उद्योगपतींना वाचवत आहे? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. तसेच भारताला नेमका कोणत्या देशांनी पाठिंबा दिला आहे हे जाहीर करावं अशी मागणीही राऊत यांनी केली. तसेच पहलगाममध्ये 26 महिलांचं कुंकू पुसणारे दहशतवादी कुठे आहेत? असा सवालही राऊतांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वरुन विचारला आहे.

भारताला पाठिंबा देणारा देश कोणता?

“ज्यांचा सिंदूर पुसला त्याचा आणि हुतात्माचा अपमान यांनी केलेला आहे.  माघार घ्यायची गरज नव्हती. आपण टोकाला जाऊन पोचले असताना अशा प्रकारचा घात करणे हे कोणाच्यातरी दबावखाली आणि कोणाला तरी  फायदा पोहोचावा यासाठी युद्धबंदी जाहीर केली. भारत सरकारने काहीच केलं नाही. भारत सरकार ट्रम्पला मध्यस्थीत घालून पाकिस्तान की लाडक्या उद्योगपतींना वाचवत आहे? नुकसान पाकिस्तानचं झालं नाही आमचं झाले आहे ट्रम्पने इस्राइल व गाझापट्टी युद्ध का नाही थांबवलं? ट्रम्प ठामपणे इस्रायलच्या मागे उभे आहेत. मात्र मोदींचे मित्र ट्रम्प भारताच्या मागे उभे राहिले नाहीत. दोन्ही देशांसोबत चांगले संबंध आहेत असे त्यांनी सांगितले. मोदी पाचशे देश फिरून आले मात्र भारताचा मित्र कोण त्यांनी सांगावं. या युद्धाला ठामपणे पाठिंब देणारा एकही देश दाखवा,” असा घणाघात राऊतांनी केला आहे. 

“चीन, तुर्कीए यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला. मात्र मोदी जगात फिरत असतात तरी कोणत्या देशाने पाठिंबा दिला आहे भारताला? हे सरकारने जाहीर करावं. यासाठी सर्व पक्ष बैठक घ्यायला हवी,” अशी मागणीही राऊतांनी केली.

ते आतंकवादी कुठे आहेत?

“ज्यांनी 26 महिलांचं सिंदूर पुसलं ते आतंकवादी कुठे आहेत? 26 महिलांचं कपाळावर सौभाग्य पुसलं त्यांचा खात्मा होत नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर पूर्ण होत नाही. ते आतंकवादी कुठे आहेत? कोणी गुडघे टेकले? आमचे दुर्दैव आहे की असे राज्यकर्ते आम्हाला लाभले,” अशा शब्दांमध्ये राऊतांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला. 

मोदींचा राजीनामा मागितला पाहिला

“लोकांना इंदिरा गांधींची आठवण येते. 71 साली अमेरिकेच्या प्रेसिडेंटला त्यांनी सांगितलं होतं, तुम्ही कोणताही निर्णय घ्या आणि पाकिस्तान बरोबर युद्ध करणार. युद्ध करुन त्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. नरेंद्र मोदींचा राजीनामा मागितला पाहिजे. मोदी यांनी देशासोबत विश्वासघात केला आहे,” असं राऊत म्हणाले. 

मोहन भागवतांनी प्रवचन देऊ नये

“अमित शहा गृहमंत्री असताना अजूनही अतिरेकी सापडले नाही त्यांचंही राजीनामा घेतला पाहिजे. मोहन भागवत यांनी प्रवचन देऊ नये. ते राष्ट्रभक्त असतील तर सगळ्यात अगोदर त्यांनी राजीनामा मागावा,” असा खोचक सल्ला राऊतांनी दिला आहे.

इंदिरा गांधी असत्या तर…

“आज इंदिरा गांधी असत्या तर पाकिस्तान राहिलं नसतं. पाकिस्तानचे सैन्य गुडघे टेकलेले आम्ही पाहिलेले आहेत. नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी यांच्यावरती हे फक्त घाणेरडे भाषण करतात. त्यांच्या पायाचे तीर्थ पिण्याची तुमची लायकी नाही,” अशी टीका राऊत यांनी केली आहे.





Source link