Monday, July 13, 2026
Home Blog Page 257

bag statement fashion for ladies bags purse viva article बॅग स्टेटमेंट

0
bag statement fashion for ladies bags purse viva article बॅग स्टेटमेंट


कॉलेज, ऑफिस ते अगदी बाहेर शॉपिंग किंवा पार्टीसाठी बाहेर पडायचं असेल तर अंगावरचे कपडे जितके फॅशनेबल हवेत, तितकंच महत्त्व त्या कपड्यांना अनुसरून कोणत्या अॅक्सेसरीज आपण वापरतो आहोत याकडेही तितकंच लक्ष द्यावं लागतं आणि वरील कोणत्याही कारणाने बाहेर पडताना हातातली वा खांद्यावरची पर्स ही सगळ्यात गरजेची आणि तितक्याच आवडीची गोष्ट आहे. त्यामुळे आपण कुठल्या कारणाने बाहेर पडतो आहोत, आपले कपडे कुठल्या पद्धतीचे आहेत याचा विचार करून बॅगचीही निवड केली जाते. हल्ली बॅग किंवा पर्समध्येही अनेक पॅटर्न्स, प्रिंट्स पाहायला मिळतात. अर्थात, पर्सची निवड करताना ऋतुमानाचाही विचार करणं आवश्यक ठरतं. अनेकदा उन्हाळ्यात ज्या लाइट रंगाच्या पर्सवर भर दिला जातो, त्या पावसाची चाहूल लागली की कपाटात बंद होतात आणि त्याऐवजी डार्क शेड्सच्या वॉटर रेसिस्टंट पर्सना अधिक पसंती मिळते.

उन्हाळ्यामध्ये सामान्यत: लाइट शेड्स वापरल्या जातात. कपडे, डेकोर, अॅक्सेसरीज सगळ्यांमध्येच फिक्या रंगांची चलती असते. समरमधल्या बॅग्सवर उन्हाळ्यात सूट होतील अशा पद्धतीचे पॅटर्न्स, डिझाइन्स, प्रिंट्स असतात. याच बॅग्स जेव्हा पावसाळ्यात येतात तेव्हा त्यांची डिझाइन्स, कलर पॅलेट, प्रिंट्स बदलतात. आजकाल पुन्हा एकदा केवळ फॅशन आणि लुक्सपेक्षा अधिक महत्त्व ‘सोय’ या बाबीला यायला लागल्याने उन्हाळा आणि पावसाळ्यानुसार बॅग्सचे खण आणि पॉकेट्स बदलण्याचा ट्रेण्डसुद्धा मार्केटमध्ये पाहायला मिळतो.

या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये छोट्या,बॅग्स, लहान साइजच्या टोट बॅग्स या ट्रेण्डमध्ये आहेत. वेगवेगळ्या आकारांच्या हँडबॅग्स आणि पर्स अनेक सेलेब्रिटींनी वापरल्या आहेत. त्यामुळे साहजिकच त्या स्ट्रीट फॅशनमध्येसुद्धा दिसायला लागल्या आहेत. बोट शेप, स्क्वेअर शेप, पेंटॅगॉन शेपच्या बॅग्स सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. त्यांचा आकार लहानमोठा असतो आणि त्यानुसार त्याच्या बेल्टची लांबी ठरते. बोट शेप बॅग्स या साधारणत: सिंगल खणाच्या किंवा डबल खणाच्या असतात. पॉकेट्सची जास्त संख्या ही पेंटॅगॉन आणि स्क्वेअर शेपमध्ये पाहायला मिळते. पर्सच्या बाहेर डिझायनर आणि तरीही उपयुक्त छोटी पॉकेट्स स्क्वेअर आणि पेंटॅगॉन बॅग्सना हमखास पाहायला मिळतात. जिओमेट्रिक शेप हा सध्याचा ट्रेण्ड पर्सेसमध्ये पाहायला मिळतो आहे. मात्र त्याच वेळी छोटे क्लचेसही तितकेच वापरले जात आहेत. मिनी बॅग्स किंवा क्लच दोन्ही फॅशन-कम-युटीलिटी या कॅटेगरीमध्ये बसतात. इसेन्शियल्स सोबत ठेवण्यासाठी मिनी बॅग्स उपयोगी पडतात. मिनी बॅग्स किंवा क्लच यांना शेपचं फारसं काही वेगळेपण नसलं तरी त्यात बॅगी दिसणाऱ्या डिझाइन्स, ज्यात स्टोरेजही जास्त मिळतं, अशी डिझाइन्स जास्त पसंत केली जातात.

उन्हाळ्यातून पावसाळ्यात जाताना बॅग्सचे रंग मात्र हलक्या, लाइट शेड्सपासून डार्क शेड्सकडे जाताना दिसतील. व्हाइट, पेस्टल, क्रीम, बेज असे रंग असलेल्या बॅग्स आणि पर्स पावसाळ्यात मात्र ब्राऊन, ब्लॅक, ग्रे, डीप ब्लू अशा ‘शेड्स ऑफ डार्क’मध्ये पाहायला मिळतील. रिअल लेदरपेक्षा अॅनिमल-फ्रेंडली पर्यायांची सध्या चलती असल्याने वेगन लेदर वगैरे प्रकारातली मटेरिअल्स पर्स आणि बॅग्समध्ये दिसून येतील. मेंटेनन्सला सोपी अशी मटेरिअल्स खासकरून पावसाळ्यात वापरली जातात. त्यामुळे आर्टिफिशियल मटेरियल वापरून बॅग्सना सिंपल आणि एलिगंट ठेवण्याचा प्रयत्न पावसाळ्यात पाहायला मिळतो. वॉटर-प्रूफ असणाऱ्या बॅग्स किंवा निदान वॉटर रेसिस्टंट असणारी मटेरिअल्स हीसुद्धा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात ट्रेण्डमध्ये दिसून येतात.

स्टायलिंगच्या दृष्टीने पाहिलं तर बॅग्स आणि पर्सना बाहेरून बेल्ट, बकल्स, बटन्स, बीड्स, थ्री-डी प्रिटिंग अशा पद्धतींनी स्टाइल केलेल्या दिसून येतात. डेनिम व्हाइब्स देण्यासाठी बॅग्समध्ये काही वेळा वेगवेगळ्या ठिकाणी थोडा – थोडा डेनिमचा वापर केला जातो. हँडल्स किंवा पॉकेट अथवा चेनची हेम अशा ठिकाणी डेनिम वापरून बॅगला डेनिम टच दिला जातो. बॅग मटेरियलऐवजी क्राफ्टेड किंवा स्कल्प्टेड हँडल्स हाही ट्रेण्ड सध्या पाहायला मिळतो आहे.

बॅग्स किंवा पर्स ही केवळ युटीलिटी नसून फॅशन स्टेटमेंट किंवा स्टेटमेंट पीस म्हणून आजकाल मिरवली जाते. उन्हाळा असो वा पावसाळा, त्याच्या पॅटर्न्स आणि कलर्समध्ये बदल होतो, मात्र त्यांचं स्टायलिंगमधलं महत्त्व कमी होत नाही.

वेदवती चिपळूणकर परांजपे

viva@expressindia.com





Source link

sankashti chaturthi special horoscope 16 may 2025 mesh to meen rashi bhavishya in marathi

0
sankashti chaturthi special horoscope 16 may 2025 mesh to meen rashi bhavishya in marathi



sankashti chaturthi special horoscope 16 may 2025 mesh to meen rashi bhavishya in marathi | आज बाप्पा मेष ते मीनपैकी कोणत्या राशीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार? तुम्हाला गोड बातमी मिळणार का?





Source link

india Pakistan conflict Donald trump and global politics during operation sindoor and drone attacks in india पाकिस्तानपलीकडील जगात!

0
india Pakistan conflict Donald trump and global politics during operation sindoor and drone attacks in india पाकिस्तानपलीकडील जगात!


भारतीय उच्चभ्रू वर्गाने अलीकडेच भारताच्या पाकिस्तानशी झालेल्या संघर्षाच्या पलीकडे नजर टाकली, तर त्याला जागतिक राजकारणात असाधारण उलथापालथ घडताना दिसेल. पाकिस्तान-पुरस्कृत दहशतवादाविरोधात दिल्लीने आपल्या गुप्तचर आणि लष्करी क्षमता सतत बळकट करत राहिले पाहिजे, हे खरेच आहे. पण आपण हेदेखील लक्षात घेतले पाहिजे की पाकिस्तानपलीकडेही एक विशाल जग आहे, आणि त्याला भारताकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. आपण पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा आणि त्यावर भारताच्या प्रतिसादाचा विचार करत असताना पाकिस्तानपलीकडील जगात जे बदल घडत आहेत, त्यांचा भारताच्या दीर्घकालीन शांतता आणि समृद्धीच्या शक्यतांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

ऑपरेशन सिंदूर आणि त्याचे परिणाम दिसू लागले, त्याच काळात चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग मॉस्कोमध्ये पुतिन यांना भेटत होते. भारत आणि पाकिस्तानची सशस्त्र दले अनुक्रमे रशियन आणि चिनी शस्त्रसामग्रींसह एकमेकांशी लढत होती तेव्हा पुतिन आणि क्षी एकमेकांचे ‘पोलादी मित्र’ असल्याचे सांगत होते आणि राजकीय, आर्थिक तसेच तंत्रज्ञान क्षेत्रांतील भागीदारी आणखी बळकट करत होते. दुसऱ्या महायुद्धातील मित्रराष्ट्रांच्या विजयाच्या ८०व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात या नेत्यांनी ‘उत्तर-अमेरिकन’ (पोस्ट-अमेरिका) जागतिक व्यवस्थेची उभारणी करण्याचा आपला मनसुबा जाहीर केला.

एकीकडे अमेरिकेच्या ‘चीन आणि ट्युनिशियावरील दुहेरी नियंत्रणा’चा निषेध करत, दुसरीकडे क्षी आणि पुतिन यांनी अमेरिकेशी करार करण्याची तयारी दर्शवली. त्रिकोणी महासत्तेचा हा पैलू जगाची फक्त मित्र आणि शत्रू अशी विभागणी करणाऱ्या किंवा चांगल्याचा वाईटावर विजय होतो असा संदेश देणारे बॉलीवूड सिनेमे पाहणाऱ्या सामान्य माणसांच्या आकलनापलीकडचा आहे.

आठवड्याच्या शेवटी दिल्ली आणि रावळपिंडी संघर्षविरामाच्या दिशेने जाऊ लागले, तेव्हा अमेरिका आणि चीनचे शिष्टमंडळ जिनिव्हामध्ये त्यांच्या व्यापारयुद्धातील ‘संघर्षविरामा’वर वाटाघाटी करत होते. भारतीय आणि पाकिस्तानी लष्करी यंत्रणांनी तोफांचा भडिमार थांबवण्याचे ठरवले, तेव्हा अमेरिका आणि चीनच्या नेत्यांनी वर्षाच्या सुरुवातीस लावलेले अवाढव्य आयात कर (टॅरिफ) कमी करण्यासाठी एक व्यापक करार जाहीर केला. जगातील या दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था, आता दरवर्षी ६०० अब्ज डॉलर्सच्या व्यापाराच्या आधारे सर्वसमावेशक ‘व्यावसायिक शांतता’ प्रस्थापित करण्यासाठी वाटाघाटी करणार आहेत.

हेही वाचा

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये पुनरागमन केल्यानंतर, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्टिव्ह विटकॉफ यांच्याबरोबर बराच वेळ घालवला. स्टिव्ह विटकॉफ हे ट्रम्प यांचे गोल्फ या खेळातले मित्र आणि विशेष दूत आहेत. काही मुत्सद्दी निरीक्षक म्हणतात की विटकॉफ यांना जगातील कोणत्याही इतर नेत्यांपेक्षा, अगदी चीनच्या क्षी यांच्यापेक्षाही पुतिन यांच्याबरोबर अधिक वेळ चर्चा करण्याची संधी मिळाली आहे. मॉस्को आणि कीव यांच्यात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी वॉशिंग्टनने दिलेल्या रेट्याच्या पार्श्वभूमीवर, रशिया-युक्रेन शांतता चर्चा या आठवड्यात इस्तंबूलमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत.

भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान पाकिस्तानने जे ड्रोन वापरले होते, त्यांचा पुरवठा त्याला तुर्कीयेने केला होता. तुर्कीने, रशियाविरुद्धच्या युद्धातही युक्रेनला हेच ड्रोन वापरायला दिले होते. २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा तुर्कीचे नेते रेसेप तैयप एर्दोगान यांनी निषेध केला होता. पण त्यांचे पुतिन यांच्याशी चांगले व्यावसायिक संबंध आहेत आणि ते मॉस्को – कीव शांततेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी राहिले आहेत.

गुरुवारी इस्तंबूलमध्ये होणाऱ्या चर्चेत पुतिन आणि झेलेन्स्की सहभागी होतील का, याबाबत अंदाज व्यक्त केले जात असतानाच, डोनाल्ड ट्रम्प यांनी नेहमीच्या शैलीत या चर्चेत आपण सहभागी होणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे. मंगळवारी सौदी अरेबियामध्ये दाखल झालेले ट्रम्प, कतार आणि संयुक्त अरब अमिरातीला भेट देऊन मग इस्तंबूलमधील चर्चेत सहभागी होऊ इच्छितात हे विशेष.

ट्रम्प यांचा हा दौरा त्यांच्या हटके आणि अनपेक्षित मुत्सद्देगिरीचा एक महत्त्वाचा नमुना ठरण्याची शक्यता आहे. या चर्चेत आपल्यालाही स्थान मिळावे यासाठी युरोपियन देश धडपडत आहेत. नाटो मित्रदेशांशी गद्दारी करत पुतिनसोबत थेट करार करण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांनी हादरलेले हे देश आता संघटित होण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिका आणि रशिया यांनी त्यांच्यावर जबरदस्तीने शांतता लादू नये, असा त्यांचा प्रयत्न असेल.

अमेरिकेचे अध्यक्ष या नात्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात पहिला दौरा आखाती देशांत केला होता, तसेच या वेळीही झाले आहे. ट्रम्प यांना सुमारे दोन ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणुकीची अपेक्षा आहे. त्यात सौदी अरेबियाने सुमारे एक ट्रिलियन डॉलर्सचे शस्त्रास्त्र सौदे आणि व्यावसायिक करार, तर संयुक्त अरब अमिरातीने पुढील दशकात १४ ट्रिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीची हमी दिली आहे, तर कतारने शेकडो कोटींची गुंतवणूक करण्याचे वचन दिले आहे. व्हाइट हाऊस या गुंतवणुकीकडे ‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणाचा मोठा विजय म्हणून पाहात आहे, आणि त्यामुळे रोजगारनिर्मिती तसेच औद्याोगिक वाढ होण्याचा दावा केला जात आहे.

हेही वाचा

ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्रीय हितापेक्षा वैयक्तिक हितांना अधिक प्राधान्य देत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. टीकाकारांनी ट्रम्प कुटुंबाच्या आखाती देशांतील व्यवसायांकडे लक्ष वेधले आहे. त्यात एरिक ट्रम्प यांचा कतारमधील ५.५ अब्ज डॉलर्सचा गोल्फ प्रकल्प आणि सौदी अरेबियामधील निवासी प्रकल्प यांचा समावेश आहे. पहिल्या कार्यकाळात, ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांनी अमेरिकेचे मध्य पूर्व देशांबाबतचे धोरण आखण्याचे काम पाहिले होते. तेव्हा त्यांच्यावर आखाती देशांबरोबर गुप्त करार केल्याचा आरोपही झाला होता.

ट्रम्प यांच्यावर देशांतर्गत पातळीवरही टीका होऊ लागली आहे. त्यामागचे कारण आहे, कतारकडून भेटीदाखल मिळणारे अत्यंत आलिशान बोइंग जम्बो जेट (७४७-८) स्वीकारण्याची त्यांनी दाखवलेली तयारी. या विमानाची किंमत ४०० दशलक्ष डॉलर्स आहे. हे विमान ‘एअर फोर्स वन’ म्हणून राष्ट्राध्यक्षांसाठी वापरले जाईल. जानेवारी २०२९ मध्ये ट्रम्प निवृत्त होतील, तेव्हा ते ट्रम्प लायब्ररीकडे सुपूर्द केले जाऊ शकते. भारतातील बरेच लोक ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणावर ‘‘व्यावहारिक’’ (ट्रान्झॅक्शनल) अशी टिप्पणी करतात, पण ट्रम्प हे गृहस्थ आपला वैयक्तिक व्यवसाय व राजकारण यातील सीमा किती सहजपणे धूसर ठेवतात, ते हे लोक नीट समजून घेत नाहीत.

आखाती देशांनी हे नीट ओळखले आहे. त्यामुळे ते ट्रम्प यांच्या घोषणांकडे फारसे लक्ष देत नाहीत. उचभ्रू धोरणात्मक चर्चांपेक्षा ते स्वहिताच्या ‘व्यावहारिक मुत्सद्देगिरी’वर भर देतात. आखातातील अरबांनी आता ट्रम्प यांना ‘वश’ करून घेतले आहे, असे जर कुणाला वाटत असेल, पण ट्रम्प आखाती देशांच्या तिजोरीला हात लावत असतानाच, तेहरानशीही करार करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या. ट्रम्प सौदी अरेबियामध्ये दाखल होत असतानाच, त्यांच्या प्रतिनिधींनी इराणबरोबरची चर्चेची चौथी फेरी संपवली. त्यात तेहरानच्या अण्वस्त्र कार्यक्रमासह अनेक मुद्द्यांचा समावेश होता. खरे तर, इराणसोबतचा हा संवादच ट्रम्प यांना अरबांवर अधिक राजकीय दबाव टाकण्यासाठी अधिक उपयोगाचा होता. कारण इराणला पायबंद घालावा आणि त्याचा प्रादेशिक प्रभाव रोखावा अशीच आखाती देशांची अमेरिकेकडून अपेक्षा आहे.

हेही वाचा

अमेरिकी वर्चस्वाविरुद्ध तेहरान सतत द्वेषपूर्ण भाषा करत असला तरी मास्को आणि बीजिंगप्रमाणेच ट्रम्प यांच्याबरोबर द्विपक्षीय करार करण्यासाठी तो तितकाच उत्सुक आहे. ट्रम्प आणि इराण यांच्या वाढत्या संपर्काकडे चिंतेने पाहणारे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू या वर्षी दोन वेळा व्हाइट हाऊसला भेट देऊन आले आहेत. वॉशिंग्टनला इराणविरोधी भूमिका घ्यायला भाग पाडण्याचा इस्रायलचा दीर्घ इतिहास असला तरी, ट्रम्प यांना ती जुनी इराणविरोधी भूमिका विकणे आता इस्रायलला कठीण जात आहे. आपल्या या आठवड्यातील मध्य पूर्व दौऱ्यात ट्रम्प यांनी इस्रायलला वगळले असल्याने, काही जणांच्या मते हे ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्या नात्यांतील (किमान तात्पुरत्या) थंडाव्याचे लक्षण आहे.

आपण पाकिस्तानच्या पलीकडे असलेल्या जगाकडे पाहतो, तेव्हा सतत बदलणाऱ्या स्थितीत असलेला जगाचा चेहरा दिसतो. पारंपरिक विचारसरणीचे राजकीय भाष्यकार या बदलत्या प्रवाहाबद्दल नीट समजावून सांगू शकत नाहीत. अशा अस्थिर जगात सोपी कथ्ये (नॅरेटिव्ह) भारतासाठी फारशी उपयोगाची नाहीत. सध्याच्या जागतिक गुंतागुंतीतून मार्ग काढण्यासाठी सखोल ज्ञान आणि तडजोड करण्याचे कौशल्य अत्यावश्यक आहे. अशा वेळी आपली व्यावसायिक मुत्सद्देगिरी यंत्रणा कमजोर असणे दिल्लीला परवडणारे नाही.

सी. राजा मोहन (कौन्सिल ऑन स्ट्रॅटेजिक अॅण्ड डिफेन्स रिसर्च, दिल्ली येथे प्रख्यात फेलो आणि ‘द इंडियन एक्स्प्रेस’चे आंतरराष्ट्रीय घडामोडींवरील सहयोगी संपादक)





Source link

अन्वयार्थ : भाजपचे नवे वाचाळवीर!

0
अन्वयार्थ : भाजपचे नवे वाचाळवीर!



भाजपच्या ‘हिंदुत्वाची प्रयोगशाळा’ मानल्या गेलेल्या मध्य प्रदेशमधून आदिवासी कल्याण कार्यमंत्र्याच्या रुपात आता एक नवा वाचाळवीर ‘अवतरला’आहे. केंद्रात दहा वर्षांहून अधिक सत्ता राबवल्यानंतर तरी भाजपच्या नेत्यांमध्ये परिपक्वता यावी, शहाणपण यावे अशी थोडी जरी कोणी अपेक्षा बाळगली तर त्यांचा भ्रमनिरास झालाच म्हणून समजा. मध्य प्रदेशमधील हे वाचाळमंत्री आहेत विजय शहा. खरेतर शहांचे काही चुकले नाही, त्यांनी फक्त भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे अनुकरण केले. मुस्लीम आणि महिला यांच्याबद्दल तोंडाला येईल ते आणि मनात येईल तेव्हा बरळण्याची सवय भाजपमधील काही वरिष्ठ नेत्यांना असल्याची अनेक उदाहरणे आहेत. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची ‘दीदी ओ दीदी’ अशी हेल काढून टवाळी कोणी केली होती हे सांगण्याची गरज नाही. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ‘आम्ही ८० टक्के, ते २० टक्के’ असे कोणी म्हटले होते हेही सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ‘बटेंगे तो कटेंगे’ असे कोण म्हणाले होते, आजही विसरले गेलेले नाही. मुस्लिमांबद्दल काहीही बोलले तरी चालते हे भाजपच्या बड्या आणि वाचाळवीरांमध्ये अग्रणी असलेल्या नेत्यांकडून विजय शहा शिकले असतील तर दोष त्यांना कसा देणार? कुठल्याही समाजात ‘राजापेक्षा राजनिष्ठ’ अशी एक जमात असते, ती राजनिष्ठा सातत्याने दाखवून देते. त्यात आपण कमी तर पडत नाही ना, याची धुगधुगी सतत त्यांच्या मनात असते. मग, जिथे संधी मिळेल तिथे ते वाचाळपणा करून आपली निष्ठा राजाच्या चरणी वाहतात. विजय शहांनी यापेक्षा काही वेगळे केलेले नाही.

भाजपचे मंत्री विजय शहा वाचाळपणा करून निसटले असते पण, उच्च न्यायालयाने स्वत:च त्यांच्या बेमुर्वतखोरीची दखल घेतली आणि पोलिसांना बजावले की, असतील हे मंत्री पण, त्यांच्या कृत्याबद्दल गुन्हा दाखल करा! भाजप नेत्यांच्या वाचाळपणाची देशाला सवय झाली असल्याने न्यायालयाचे विजय शहांकडे दुर्लक्षही झाले असते. पण, विजय शहांनी वाचाळपणाचा कडेलोट केला. असा प्रकार त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांनीही केला नव्हता. संरक्षण दलातील अधिकाऱ्याविषयी तेही महिलेबद्दल विजय शहांनी वापरलेली अभद्र भाषा न्यायालयालाच काय भाजपच्या नेत्यांनाही रुचणारी नव्हती. या मंत्र्याने लष्करी अधिकारी सोफिया कुरेशी यांना ‘दहशतवाद्यांच्या बहिणी’ची उपमा दिली. सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तानविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’ची पत्रकार परिषदेत माहिती दिली होती. केंद्र सरकारने मुस्लीम महिला अधिकाऱ्याला म्हणजे मुस्लीम दहशतवाद्यांच्या बहिणीला, भारताने केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईची माहिती देण्यासाठी पाठवून ‘जशास तसे’ प्रत्युत्तर दिल्याचा दावा या मंत्र्यांनी केला. ही आक्षेपार्ह भाषा महिलेचा अपमान करते, मुस्लीम धर्माबद्दल रक्तात भिनलेला द्वेष दाखवते. इतकेच नव्हे तर, संरक्षण दलाची मानहानी करते.

भाजपमंत्री विजय शहा वाचाळ असतील पण, ते मूर्ख नव्हेत. त्यांना संरक्षण दलातील मुस्लीम महिला अधिकाऱ्यावर निकृष्ट टिप्पणी करण्याची मुभा कोणी दिली? त्यांना पक्षातील कोणाचा आशीर्वाद होता का? शहांची भाषा ही भाजपचे अधिकृत राजकीय धोरण आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. पश्चातबुद्धी म्हणून शहांची मंत्रीपदावरून हकालपट्टी केलीही जाईल पण, त्यातून काहीही साध्य होणार नाही. उच्च न्यायालयाने बजावूनदेखील पोलिसांनी शहांविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये जाणूनबुजून पळवाटा ठेवल्या. हे लक्षात घेता न्यायालयात कोणी आव्हान दिले तर हा गुन्हा टिकणारच नाही, अशी पोलिसांची कानउघाडणी उच्च न्यायालयाने केली आहे. म्हणजे मध्य प्रदेशमधील सरकारी यंत्रणा मंत्र्याला वाचवण्यासाठी धडपड करताना दिसली. या मंत्र्याने आता कुरेशी यांची माफी मागितली आहे. माझे चुकले, मी दहा वेळा माफी मागायला तयार आहे, असा कांगावा करत त्यांनी स्वत:चा बचाव करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण, देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला आणि त्यात पळवाटा नसतील तर विजय शहांचे मंत्रीपद जाईलच, शिवाय दोषी ठरले तर तुरुंगवास भोगावा लागेल. केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून भाजपच्या कोणी कारावास भोगला आहे असे फारसे पाहायला मिळालेले नाही. विजय शहा हे मोठा अपवाद ठरू शकतील! तुरुंगवासाची भीती असल्याने शहांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, नवनियुक्त सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासमोर शहांच्या याचिकेची सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयानेही, ‘काय ही तुमची भाषा…’, असा मार्मिक शेरा मारून शहांच्या भाषेवर नाराजी व्यक्त केली. याआधीही पुरुषी मनोवृत्तीतून अनेक राजकीय नेत्यांनी महिलांची टिंगलटवाळी केली आहे. त्यातून ते सहीसलामत निसटलेही आहेत. पण, इथे फक्त पुरुषी अहंकारच नव्हे तर, धर्मांध राजकारणाचा बाजही आहे. बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना चांगल्या वर्तवणुकीची पावती देत त्यांची तुरुंगातून सुटका करण्याची मनोवृत्ती आणि विजय शहांची सोफिया कुरेशींवर केलेल्या टिप्पणीतील मनोवृत्ती एकसारखीच आहे, असे म्हणणे योग्य ठरेल.



Source link

विधेयकांसाठी कालमर्यादेवर राष्ट्रपतींचा सवाल, सर्वोच्च न्यायालयाला १४ प्रश्न; तीन मुद्द्यांवर मत मागवले

0
विधेयकांसाठी कालमर्यादेवर राष्ट्रपतींचा सवाल, सर्वोच्च न्यायालयाला १४ प्रश्न; तीन मुद्द्यांवर मत मागवले



deadlines for bill 14 questions President draupadi Murmu asked supreme court विधेयकांसाठी कालमर्यादेवर राष्ट्रपतींचा सवाल, सर्वोच्च न्यायालयाला १४ प्रश्न; तीन मुद्द्यांवर मत मागवले





Source link

42 crore scam in Shraddha Saburi Credit Society, case filed against 28 people including the directors

0
42 crore scam in Shraddha Saburi Credit Society, case filed against 28 people including the directors



42 crore scam in Shraddha Saburi Credit Society, case filed against 28 people including the directors | संगमनेरच्या दगडखानीतील ३८ वेठबिगार व ३१ बालकामगारांची मुक्तता





Source link

जातनिहाय जनगणनेवरील चर्चेसाठी कार्यक्रमाच्या हालचाली, राहुल गांधी उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न

0
जातनिहाय जनगणनेवरील चर्चेसाठी कार्यक्रमाच्या हालचाली, राहुल गांधी उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न



Rahul Gandhi rally on caste census discussions in jalna जातनिहाय जनगणनेवरील चर्चेसाठी कार्यक्रमाच्या हालचाली, राहुल गांधी उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न





Source link

श्रीरामपूरमध्ये १४ कोटींचे अमली पदार्थ जप्त; एकास अटक

0
श्रीरामपूरमध्ये १४ कोटींचे अमली पदार्थ जप्त; एकास अटक


अहिल्यानगर : श्रीरामपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत १३ कोटी ७५ लाख ४१ हजार रुपये किमतीचा ४०८ किलो अल्प्राझोलम हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या संदर्भात एका टेम्पोचालकाला अटक करण्यात आली असून, पुणे जिल्ह्यातील एका रसायन अभियंत्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिनीनाथ विष्णू राशिनकर (वय ३८, धनगरवाडी, राहाता, अहिल्यानगर) या वाहनचालकाला अटक करण्यात आली आहे, तर विश्वनाथ कारभारी शिपणकर (रा. दौंड, पुणे) याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी श्रीरामपूरमध्ये दिली. या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे आदी उपस्थित होते. अहिल्यानगर जिल्ह्यात सुमारे १४ कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्याची ही पहिलीच कारवाई आहे. अटक केलेल्या राशिनकर याला न्यायालयाने दि. २० पर्यंत कोठडी सुनावली.

श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात छोट्या मालमोटारीतून अमली पदार्थांची वाहतूक होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. शिवपुजे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह पथकाला शोध घेण्यास सांगितले. काल, बुधवारी सायंकाळी श्रीरामपूर दिघी-खंडाळा रस्त्यावर ही छोटी मालमोटार (एमएच २० बीटी ९५१) दिघीच्या दिशेने येताना दिसली. त्याची तपासणी केली असता १४ गोण्यांत पावडर व उर्वरित ७ गोण्यांत स्फटिक आढळले. वाहनचालक राशिनकर याने हे स्फटिक अल्प्राझोलम औषध असून, गोण्यांमधील पांढरी पावडर ही अल्प्राझोलम बनवण्याकरता लागणारा कच्चा माल असल्याचे सांगितले.

हेही वाचा

अल्प्राझोलम हा अमली पदार्थ असल्याने त्याची खात्री करण्याकरता फॉरेन्सिक तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण केले. या पथकाने केलेल्या तपासणी प्रथमदर्शनी पावडर व स्फटिक हे अल्प्राझोलम हा अमली पदार्थ व त्यासाठी लागणारा कच्चा माल असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार ६ कोटी ९७ लाख ६७ हजार रुपये किमतीचे ६९ किलो ७६७ ग्रॅम वजनाच्या अल्प्राझोलम स्फटिकच्या ७ गोण्या तर ६ कोटी ७६ लाख ७४ हजार रुपये किमतीच्या ३३८ किलो ३७ ग्रॅम वजनाचे अल्प्राझोलम बनवण्याची पावडर १४ गोण्यांमध्ये आढळली. त्याच्यासह १ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण १४ कोटी ७५ लाख ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती डॉ. शिवपुजे यांनी दिली. पोलिसांनी वाहनचालक मिनीनाथ राशिनकरकडे चौकशी केली असता विश्वनाथ शिपणकर याने तो दिल्याचे सांगितले.

बंदी घातलेला पदार्थ

उपविभागीय अधिकारी डॉ. शिवपुजे यांनी दिलेल्या माहितीनुसार अल्प्राझोलम हा अमली पदार्थ म्हणून गणला जातो. तो हाताळण्यास व वापरास बंदी आहे. त्याचा वापर झोपेच्या गोळ्या तयार करण्यासाठी केला जातो. हा माल कुठे उत्पादित करण्यात आला याचा तपास केला जात आहे.

हेही वाचा

यापूर्वी औषध कंपनीत काम

मिळालेल्या माहितीनुसार, रसायन अभियंता विश्वनाथ शिपणकर हा यापूर्वी एका औषध कंपनीत काम करत होता, असे समजले. अटक केलेला वाहनचालक त्याचा नातेवाईकच असल्याची माहिती मिळाली. शिपणकर दौंडमध्ये राहतो. दौंड एमआयडीसीमध्येही पोलिसांनी यापूर्वी कारवाई करत अमली पदार्थ जप्त केले होते. आता श्रीरामपूर एमआयडीसीत जप्त करण्यात आले.





Source link

Cases of overdue payments amounting to 1.5 crore rupees resolved pune

0
Cases of overdue payments amounting to 1.5 crore rupees resolved pune


पुणे: ‘महावितरण’च्या पुणे विभागातील १ कोटी ४५ लाख रुपयांच्या थकीत वीजदेयकांसंबंधी न्यायप्रविष्ट असलेली ३४१ प्रकरणे ‘राष्ट्रीय लोकअदालती’मध्ये निकाली निघाली. त्यात वीजचोरीच्या दोन प्रकरणांतील वीजबिल व तडजोड शुल्काच्या ५९ लाख २७ हजार रुपयांचा समावेश असल्याची माहिती ‘महावितरण’कडून देण्यात आली.

जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय लोकअदालती’मध्ये पुणे विभागातील थकीत वीजदेयकांबाबत न्यायप्रविष्ट असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक रास्ता पेठ विभागातील ६५ लाख २५ हजार ९५६ रुपयांची २६६ प्रकरणांचा निवाडा करण्यात आला.

पुणे ग्रामीण विभागातील ४३ लाख ६५ हजार रुपयांची ४२ प्रकरणे, गणेशखिंड विभागातील ३६ लाख ६७ हजार रुपयांची ३३ प्रकरणेही या लोकअदालतीत निकाली निघाली.

हेही वाचा

‘महावितरण’च्या पुणे विभागातील सुमारे १ कोटी ४५ लाख ५८ हजार रुपयांची ३४१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच दोन वीजचोरी प्रकरणांमध्ये वीजबिल व तडजोड शुल्कापोटी एकूण ५९ लाख २७ हजार रुपयांचा भरणा करण्यात आला, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.लोकअदालतीमध्ये महावितरणकडून प्रभारी विधी सल्लागार दिनकर तिडके, विधी अधिकारी नीतल हासे, गणेश सातपुते, अंजली चौगुले यांनी सहभाग नोंदवला.





Source link

Youth murder case cracked by examining CCTV footage, accused arrested in Latur

0
Youth murder case cracked by examining CCTV footage, accused arrested in Latur



Youth murder case cracked by examining CCTV footage, accused arrested in Latur | ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण तपासून तरुणाच्या खुनाचा छडा, लातूरमध्ये आरोपीला बेड्या





Source link