Monday, July 13, 2026
Home Blog Page 250

नाट्यरंग;कळत्या न कळत्या वयात

0
नाट्यरंग;कळत्या न कळत्या वयात



कोकणच्या तांबड्या मातीतून अनेक लेखक, कवी उदयास आले आणि त्यांनी आपल्या मायमातीतलं सर्जन आपल्या साहित्यकृतींतून मांडलं. वि. स. खांडेकर, मामा वरेरकर, जयवंत दळवी, चिं. त्र्यं. खानोलकर, र. वा. दिघे, विंदा करंदीकर, श्री. ना. पेंडसे, मधु मंगेश कर्णिक… अशी कितीतरी मंडळी या लाल मातीतून उगवली आणि त्यांनी तिचे पांग फेडले. आज प्रवीण बांदेकरांसारख्या नव्या पातीत कवी अजय कांडर हेही एक लक्षणीय नाव समोर येताना दिसते. त्यांची कविता आपल्या मातीतले प्रश्न घेऊन उभी राहिलेली पाहायला मिळते. तांबड्या मातीशी असलेली त्यांची बांधीलकी दृढ आहे. त्यांच्या ‘आवानओल’ या आत्मपर कवितासंग्रहात त्यांची कोकणातील जडणघडण ते त्यांचा ‘माणूस’पणापर्यंतचा प्रवास प्रत्ययाला येतो. याच कवितासंग्रहावर आधारित ‘कळत्या- न कळत्या वयात’ हा दीर्घांक रचला गेला आहे. त्यातून हे जीवनदर्शन घडते आणि कवीला आकळलेल्या आजच्या संभ्रमित समाजाचं वास्तवही त्यातून मांडण्याचा प्रयत्न जाणवतो. हा कवितासंग्रह म्हणजे दीर्घकाव्य नाही. त्यामुळे त्यात एकच एक आशय उलगडणाऱ्या कविता असणं शक्य नाही.

कवीला आलेले, जाणवलेले, त्याने घेतलेले सुटे सुटे अनुभव त्यात आहेत. साहजिकपणेच त्यात गोळीबंद नाटकासारखा एकसंध अनुभव देण्याची क्षमता कितपत असेल, हा प्रश्नच. २००६-२००७ साली आलेला हा संग्रह. त्यावर बेतलेला ‘कळत्या- न कळत्या वयात’ हा दीर्घांक आता २०२५ सालात येतोय. परंतु त्यातील काही कवितांतून आशयाची संगती दिग्दर्शक रघुनाथ कदम यांना जाणवली असावी आणि त्यातूनच या दीर्घांकाचा जन्म झाला असावा. कवीच्या जन्मापासून त्याच्यावर झालेले भोवतालच्या निसर्गाचे, माणसांचे, परिस्थितीचे, आजूबाजूच्या वातावरणाचे परिणाम यात केन्द्रस्थानी आहेत.

साहजिकपणेच कोकणचा निसर्ग, तिथलं धार्मिक, भावनिक, सामाजिक वातावरण, कवीच्या सभोवतालची माणसं यांचे संस्कार त्याच्यावर न होते तरच नवल. त्यातून तो घडत गेला. त्याची विचारसरणी घडत गेली. आक्काआजी आणि ताईआजी यांचं परस्परविरोधी जगणं, वागणं, वृत्ती-प्रवृत्ती त्याच्यावर संस्कार करती झाली. त्यातून तो घडत गेला. या सगळ्याचे पडसाद या दीर्घांकात पडताना दिसतात. पुढे जाऊन शिक्षणादी गोष्टींनीही त्याच्या घडणीवर परिणाम केलेले जाणवतात. त्यातून जाणतेपणाने अनुभवलेले माणसामाणसांतील संबंध, निसर्ग, त्याची नाना रूपं आणि त्याच्याशी माणसाचं असलेलं साहचर्य हेही त्याच्यावर परिणाम करून जातं. ते त्याच्या कवितांतून उमटलेलं दिसतं. पुढच्या काळात त्याची कारभारीण त्याच्या आयुष्यात येते आणि आस्तिक्य-नास्तिक्याचा नवाच झगडा त्याच्या मनात उभा राहतो. जीवनातील अनुभवही त्याला खूप काही शिकवून जातात. माणसाची जातपात, धर्म यांच्याबद्दलचे प्रश्न त्याच्या मनात उभे राहतात. आणि त्याची ‘माणूस’पणाच्या दिशेकडची वाटचाल सुरू होते. हा सगळा आलेख या दीर्घांकात मांडलेला आहे. या कविता वेळोवेळी सुट्या सुट्या लिहिल्या गेल्या असणार. त्यामुळे आशय आणि परिणामाच्या दृष्टीनेही त्या वेगवेगळ्या असणार. मात्र त्यात काहीएक सूत्र निश्चितच असणार, ज्यामुळे दिग्दर्शकाला त्यात नाट्यानुभव असल्याचा साक्षात्कार झाला असणार.

पण त्याची बंदिस्त संहिता करून घेतली गेली नसावी; ज्यातून हे सलग नाट्य उभे राहील. त्यामुळेच हे नाटक तुटक तुटक वाटत राहतं. कवीची आजबद्दलची संभ्रमावस्था अचानक समोर ठाकल्यासारखी वाटते, ती त्यामुळेच. बालपणापासूनची कवीची भावआंदोलनं विस्तारानं येतात. भोवतीच्या माणसांबद्दलचं त्याचं कुतूहल, त्यातून त्याची प्रखर सामाजिक जाणीव घडत जाणं दृगोचर होत जाते. पण धर्म, जातपात याबद्दलची त्याची मतं विकसन होत आपल्यासमोर येत नाहीत. ती अचानक येतात. ही नाटकातली त्रुटी आहे. यावर काम होणं गरजेचं आहे. पण तरीही एक रंगचित्र नक्कीच आपल्यासमोर उलगडत जातं. लेेखक अजय कांडर आणि दिग्दर्शक रघुनाथ कदम यांनी यावर आणखी काम करायला हवं.

रजनीश कोंडविलकर यांनी कोकणचा परिसर दाखवताना स्तरीय नेपथ्याचा वापर केला आहे. अक्षय जाधव यांनी वातावरणातील विविध आवाजाच्या तुकड्यांची पार्श्वसंगीतात योजना केली आहे. मात्र प्रकाशयोजनाकार संजय तोडणकर यांनी केलेली विविधरंगी प्रकाशाची उधळण अचंब्यात टाकणारी आहे.

सर्वच कलाकारांनी कवितेचा आशय आत्मगत करून नाटक सजीव करण्याचा प्रयत्न केला आहे. अपर्णा शेट्ये (ताईआजी) आणि डॉ. अनुराधा कान्हेरे (आक्काआजी) यांनी भिन्न प्रकृतीच्या स्त्रिया नेमकेपणानं उभ्या केल्या आहेत. कारभारीण झालेल्या दीपा सावंत-खोत यांनीही आपली निग्रही भूमिका उत्तम वठवली आहे. निलेश भेरे यांनी कवीच्या विविध भावावस्था, त्याची भावनिक, मानसिक उलघाल उत्कटतेनं साकारली आहे.

एक वेगळा कवितानाट्यानुभव म्हणून या प्रयोगाचं स्वागत करायला हवं. कवीचा ‘माणूस’पणाकडचा प्रवास!



Source link

‘एक तिची गोष्ट’ नवी नृत्यनाटिका

0
‘एक तिची गोष्ट’ नवी नृत्यनाटिका



प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर, त्यांची मुलगी आस्मा, अभिनेता दिग्दर्शक विराजस कुलकर्णी, सूरज पारसनीस आणि ख्यातनाम नाटककार, लेखक मधुसूदन कालेलकर यांची नात गौरी कालेलकर अशी सगळी नामवंत मंडळी ‘एक तिची गोष्ट’ या नव्या नृत्यनाटिकेच्या निमित्ताने एकत्र आले आहेत.

ख्यातनाम नाटककार, गीतकार, लेखक, पटकथाकार, नाट्य / चित्रपट निर्माता अशा बहुविध भूमिकेतून रसिकांना अखंड रिझवणारे ज्येष्ठ लेखक कै. मधुसूदन कालेलकर यांचा वारसा समर्थपणे पुढे नेत त्यांच्या नातीने गौरी कालेलकर-चौधरी आणि तिचे पती सिद्धेश चौधरी यांनी ‘मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स’ या निर्मिती संस्थेची स्थापना केली आहे. कलासंस्कृतीचे व्रत जोपासणाऱ्या या निर्मिती संस्थेने, संस्थेचे सदस्य परी तेलंग आणि शंतनू तेंडुलकर यांच्या सहकार्याने आणि ‘थिएटर ऑन एंटरटेनमेंट’, ‘पीएसडीजी स्टुडिओज प्रॉडक्शन’ यांच्या साथीने ‘एक तिची गोष्ट’ रंगमंचावर आणली आहे.

‘एक तिची गोष्ट’ या नव्या नृत्यनाटिकेचा शुभारंभ ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’मध्ये झाला होता. नृत्य, संवाद आणि अभिनय यांचा उत्तम मिलाफ असलेली ‘एक तिची गोष्ट’चे पुढील प्रयोग शनिवारी, २४ मे रोजी रात्री ८.३० वाजता श्री शिवाजी मंदिर दादर येथे होणार आहे. या सृजनशील कलाकृतीचं खास आकर्षण म्हणजे फुलवा खामकर आणि त्यांची मुलगी आस्मा खामकर यांच्या नृत्याची अदाकारी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. अभिनेता विराजस कुलकर्णी, सूरज पारसनीस यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे. आर्या आंबेकर, वैशाली सामंत, ऋषिकेश रानडे यांनी यातील गाणी स्वरबद्ध केली आहेत. संगीत निषाद गोलांब्रे यांचे आहे. चाळिशीतली अनया आणि तिच्या आयुष्यात आलेली एक किशोरवयीन मुलगी या दोघींच्या भावविश्वातून या नृत्यनाटिकेची कथा उलगडते. येत्या काळात मराठी कला, साहित्य आणि संस्कृती सर्वदूर पोहोचवणं हे ‘मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स’चं उद्दिष्ट असल्याचं गौरी कालेलकर-चौधरी यांनी स्प्ष्ट केलं.



Source link

मैत्रीतून सुरू झालेल्या प्रवासाची गोष्ट

0
मैत्रीतून सुरू झालेल्या प्रवासाची गोष्ट


मैत्री, आत्मशोध आणि निसर्गाच्या कुशीत घडणाऱ्या प्रवासाची कहाणी सांगणारा ‘बंजारा’ हा मराठी चित्रपट या आठवड्यात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. यानिमित्ताने अभिनेते शरद पोंक्षे, सुनील बर्वे, भरत जाधव आणि दिग्दर्शक स्नेह पोंक्षे यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट देत संवाद साधला.

शरद पोंक्षे, भरत जाधव आणि सुनील बर्वे हे तिन्ही अनुभवी कलाकार ‘बंजारा’ या चित्रपटात आधुनिक काळाला साजेशा रूपात प्रेक्षकांसमोर आले आहेत. त्यांची वेशभूषा आणि त्यांच्या भूमिका हे आजवरच्या भूमिकेपेक्षा वेगळे आहे. त्यासंदर्भात बोलताना, अभिनेते भरत जाधव यांनी आम्ही जुन्या काळातील पद्धतीनुसार चित्रपटात काम करून धमाल केली आहे, परंतु एका विशिष्ट वयात आल्यानंतर सद्या:स्थितीचा विचार करून बदलावे लागते. काळानुसार झालेला बदल विचारात घेऊन काम करावे लागते. मात्र, चांगल्या भूमिका असल्या तर काम करण्यात मजा आहे, नाहीतर थांबलेले बरे असते. मला हा बदल स्वीकारण्याचा आणि काही वर्षे थांबण्याचा छान फायदा झाला, असे मत व्यक्त केले. शिवराज वायचळ याने ‘आता थांबायचं नाय’, स्नेह पोंक्षे याने ‘बंजारा’ चित्रपटाचे कथानक ऐकवले. या तरुण मंडळींनी माझा विचार केला आणि संबंधित भूमिका वेगळ्या वाटल्यामुळे चित्रपटात काम करण्यास होकार दिला. चांगल्या भूमिकांचे स्वागत केलेच पाहिजे. सध्याची तरुण पिढी वेगळा विचार करते आहे, यामध्येच आम्हाला प्रचंड आनंद आहे. विशेष बाब म्हणजे या नवीन मुलांच्या वेगळ्या विचारामुळे आम्ही स्वत:ही एक पाऊल पुढे जातो, असेही त्यांनी सांगितले.

‘बंजारा’ या चित्रपटाद्वारे अभिनेते शरद पोंक्षे यांचा मुलगा स्नेहने दिग्दर्शन आणि अभिनय क्षेत्रातही पदार्पण केले आहे. त्याबद्दल बोलताना स्नेहला सुरुवातीपासूनच चित्रपटक्षेत्रात काम करायचे होते आणि या दृष्टीने तो सातत्याने चित्रपटनिर्मितीचा अभ्यास करीत होता, असे शरद पोंक्षे यांनी सांगितले. ‘जागतिक चित्रपटाचा अभ्यास करण्यासाठी बहुसंख्य जागतिक स्तरावरील चित्रपट आणि ऑस्कर विजेत्या चित्रपटांची निर्मिती प्रक्रिया तो पाहतो. त्यानंतर यावर माझ्याशी गप्पाही मारतो. स्नेहने आत्मविश्वासाने ‘बंजारा’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद लिहिण्यासह दिग्दर्शन केले आहे. ही गुंतवून ठेवणारी गोष्ट असून मैत्रीचे बंध गुंफलेले आहेत. या प्रवासाच्या कथेत छान फुलत जाणारी मैत्री आहे आणि एक उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वांची चाललेली धडपड दाखविण्यात आली आहे. निखळ मैत्रीतून सुरू झालेल्या प्रवासाची गोष्ट मांडण्यात आली आहे. हा चित्रपट पाहून प्रत्येकाला जुनी मैत्री आठवेल आणि जुन्या मित्रांना फोन करून ‘रियुनियनचा प्लॅन’ करतील. तसेच हा चित्रपट पांढऱ्याशुभ्र बर्फाने पांघरलेल्या ‘सिक्कीम’च्या निसर्गरम्य वातावरणात आणि पहाडांमध्ये चित्रित झाला आहे. त्यामुळे हा निसर्ग मोठ्या पडद्यावर पाहण्यात मजा आहे आणि त्यासाठी ‘बंजारा’ चित्रपट चित्रपटगृहात जाऊन नक्की पाहा’, असे आवाहनही पोंक्षे यांनी केले.

विशिष्ट दृष्टिकोनातून चित्रपटनिर्मिती आवश्यक

‘आपण दृष्टिकोनात कुठेतरी कमी पडतो, असे मला वाटते. कारण २० कोटींच्या निर्मितीखर्चात ‘कांतारा’, ‘मंजुमल बॉइज’ आदी सुपरहिट चित्रपटांची निर्मिती होते, त्यामुळे आपणही कमी निर्मितीमूल्यामध्ये दर्जेदार चित्रपट बनवू शकतो. मराठी चित्रपटसृष्टीत उत्तम आशयघन चित्रपटांची निर्मिती होते, मात्र काही प्रमाणात त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आपण वेगळ्या दृष्टिकोनातील १० चित्रपट एकामागोमाग प्रदर्शित करून वेगळी सुरुवात केली पाहिजे’, असे स्नेह याने सांगितले.

…तर एक वेगळा प्रभाव पडतो

‘काळानुरूप प्रेम, मैत्री, प्रवास, गूढता आदी विविध प्रकारांतील चित्रपटांची निर्मिती आपल्याकडे झालेली आहे आणि यामध्ये काही प्रमाणात साम्यही आढळते. कलाकार म्हणून चित्रपटांकडे पाहताना आम्ही आमच्या वयानुसार व विचारानुसार पाहात असतो. परंतु सध्याची नवीन पिढी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते, तेव्हा चित्रपट कसा वेगळ्या पद्धतीने आणि रंजकतेने होऊ शकतो, याची जाणीव होते’, असे मत सुनील बर्वे यांनी व्यक्त केले. ‘आपण नेहमी हिंदी चित्रपटांमध्ये ग्लॅमर पाहतो. त्यानुसार मराठी चित्रपटातील नायक, नायिका, मित्र किंवा इतर पात्रांची रूपेरी पडद्यावर वेगळ्या पद्धतीने व मोठ्या स्तरावर मांडणी केली, तर एक वेगळा प्रभाव पडतो आणि नेहमीच्या चित्रपटाच्या पलीकडे जाऊन प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीतील चित्रपट पाहायला आवडतात. तसेच आम्हा कलाकारांनाही वेगळ्या पद्धतीच्या भूमिका करायला आवडतात. ही नवे दिग्दर्शक आम्हाला वेगळ्या पद्धतीने बघण्याची दृष्टी देत आहेत, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे’, असेही त्यांनी सांगितले.

‘सिक्कीम’मध्ये चित्रीकरण

‘मी ‘सिक्कीम’ला पाच वर्षांपूर्वी फिरण्यासाठी गेलो होतो, त्यामुळे मला तिथल्या जागा माहिती होत्या. जेव्हा ‘बंजारा’ चित्रपट लिहिला, तेव्हा ‘सिक्कीम’ आणि ‘उत्तराखंड’ ही दोन ठिकाणे चित्रीकरणासाठी डोक्यात होती. त्यामुळे मी या दोन्ही ठिकाणी जाऊन आलो. मात्र संहितेच्या अनुषंगाने चित्रीकरणासाठी सर्वात अनुरूप ‘सिक्कीम’ होते, त्यामुळे त्या ठिकाणीच चित्रीकरण करण्याचे निश्चित केले’, असे स्नेहने सांगितले. त्यानंतर सिक्कीममधील सर्व ओळखीच्या माणसांशी चर्चा केली आणि विविध परवानगीच्या अनुषंगाने तिथे चित्रीकरण होऊ शकते का, यासंदर्भात विचारणा केली. माझ्या मते सिक्कीमच्या आसपास असणाऱ्या दार्जिलिंगजवळ ‘बर्फी’ चित्रपटाचे काही चित्रीकरण झाले होते. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांत सिक्कीममध्ये संपूर्ण एका चित्रपटाचे चित्रीकरण झाले नव्हते. त्यामुळे तिथे चित्रीकरण झाले पाहिजे, अशी इच्छाच त्या ठिकाणच्या मंडळींनी बोलून दाखविली.

‘ट्रोलर्सला शून्य महत्त्व’

कादंबरीची दोन पाने वाचून दोनशे पन्नास पानांच्या पुस्तकात नेमके काय लिहिले आहे, हे कसे कळणार? त्यामुळे ‘ट्रेलर’ पाहून चित्रपटाचा अंदाज बांधता येत नाही. ‘ट्रोलर्स’ नावाची एक जमात आहे आणि ही जमातच फक्त टीका करते. कोणताही चांगला माणूस काहीही माहिती नसताना कधीही कोणाला शिव्या देत नाही आणि या माणसांकडे स्वत:ची विविध कामे सोडून टीका करायला वेळही नसतो. काही माणसे कोणताही संबंध नसताना सतत थुंकत असतात, एका जागी बसून थुंकतात आणि उठूनही जात नाहीत, एका जागी बसूनच पिचकारी मारण्याचे काम करतात. त्याप्रमाणे ‘ट्रोलर’ ही जमातसुद्धा काहीही माहिती नसताना सतत थुंकत राहते, असे स्पष्ट मत शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. ‘मराठीतील सर्वात ब्लॉकबस्टर चित्रपट असणाऱ्या ‘माहेरची साडी’ या चित्रपटाबाबत सर्वात वाईट लिहिले गेले, मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ट्रोलिंगचा काही परिणाम नाही, ट्रोलर्स काहीही बडबडू देत… त्यांना कोण विचारते आहे? मी त्यांच्याकडे लक्षही देत नाही. ट्रोलर्सला शून्यापेक्षाही कमी महत्त्व देतो आणि त्यामुळे काहीही फरक पडत नाही. आम्ही आमचे चांगले काम करत राहणार’, असेही शरद पोंक्षे यांनी सांगितले.





Source link

भारतीयांच्या पर्यटनाचा बदलता चेहरा

0
भारतीयांच्या पर्यटनाचा बदलता चेहरा



उदारीकरणानंतर भारतीय मध्यमवर्ग बऱ्यापैकी देशाटनाच्या मागे लागला. पुढे दहाएक वर्षांनी अमेरिका, युरोपमधील पारंपरिक पर्यटनस्थळांना पाहून कंटाळल्यानंतर लोकप्रिय आशियाई देशांतील भटकंतीचा नाद सुरू झाला. पुढल्या दोन दशकांमध्ये त्याचा पर्यटनाकडे बघण्याचा दृष्टिकोन विस्तारला. पूर्वापारच्या हौशींप्रमाणेच समाजमाध्यमांत छायाचित्र झळकविण्याच्या ओढीने गर्दी करणाऱ्या तसेच इतर देशांतील संस्कृती-इतिहास-नैसर्गिक सौंदर्य यांची खरोखरची अनुभूती मिळविण्याची इच्छा बाळगणाऱ्या गंभीर वृत्तीची भर जागतिक पर्यटकांच्या ताफ्यात होत आहे. कझाकस्तान आणि उझबेकिस्तान हे आपल्या जवळचे देश द्रुतगतीने पर्यटनाच्या पटलावर ओळखले जात आहेत, त्यांच्या तपशिलासह यातील एका देशाच्या स्वतंत्र भटकंतीचा अनुभव. त्याचबरोबर जग पाहायला निघालेल्या आपल्या पर्यटकांच्या बदलत्या चेहऱ्याचे विश्लेषण…

भारतीय लोकांचे देशाटन गेल्या वीसेक वर्षांत विस्तारले. नव्वदीच्या अखेरीस नव-मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गासह श्रीमंतांना आकर्षण होते ते युरोप आणि अमेरिकेच्या पर्यटनाचे. त्यानंतर मलेशिया, थायलंड आणि सिंगापूर या देशांच्या एकत्रित ‘पॅकेज टूर्स’ हळूहळू लोकप्रिय बनत गेल्या. गेल्या दशकापर्यंत म्हणजे अगदी करोनापर्यंत हे चित्र कायम होते. मात्र जवळजवळ दोन-तीन वर्षांच्या घरकोंडीने एकदम चित्र पालटले. बाहेर जाण्यासाठीची उत्सुकता वाढली. दोन हजारच्या दशकात फक्त अमेरिकेला जाणाऱ्या पर्यटकांसाठी मदतदूत म्हणून निघालेल्या सशुल्क ऑनलाइन यंत्रणा पुढल्या दहाच वर्षांत सिंगापूर, थायलंड, मलेशिया आणि दुबई यांच्या वाऱ्या करण्यासाठी सरसावल्या. आज ‘मेक माय ट्रिप’च्या धर्तीवर डझनाहून अधिक ऑनलाइन सेवा भारतीय पर्यटक वापरतात. त्याशिवाय स्थानिक पातळीवर टूर कंपन्यांचे जाळे प्रचंड वाढले. (स्वतंत्ररित्या संशोधन करून आणखी कमी खर्चात प्रवास करणारे धाडसी देखील आहेतच) गेल्या तीनेक वर्षांत कझाकस्तान, उझबेकिस्तान, अझरबैजान याआधी आपल्यासाठी फार माहिती नसलेल्या मध्य आशियातील राष्ट्रांनी पर्यटन व्यवसायात प्रगती केली. पैकी कझाकस्तान आणि उझबेकिस्तान भारतीयांसह जगातील अनेक नव्या पर्यटकांना आकर्षित करीत आहे. तेलसमृद्ध असलेल्या या देशांचा नव्याने झालेला पर्यटन विकास कुणाच्याही डोळ्यात भरणारा असाच.

पर्यटन आणि पर्यटकांचा भारतासह जगाच्या दृष्टीने ढोबळमानाने करोनापूर्व तसेच करोनापश्चात असा फरक करावा लागेल. आता देशाबाहेर जाण्याची इच्छा आणि क्रयशक्ती असलेले पर्यटक कमीत कमी खर्चात आपल्याला परमोच्च आनंद देऊ शकणाऱ्या ठिकाणांचा शोध घेताना सजग झालेला पाहायला मिळतो. पूर्वीसारखा पर्यटन नियतकालिकांमधील ग्लॉसी छायाचित्रांना पाहून किंवा पर्यटनकेंद्री मालिका-चित्रपट पाहून तो एखाद्या लोकप्रिय स्थळाला सुट्टीकाळात भेट देण्याचे नियोजन करीत नाही. केवळ महागडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशात फिरायला जाण्याबाबत असलेली सामाजिक प्रतिष्ठा आता पूर्वीइतकी राहिलेली नाही. त्या देशात जातानादेखील सुविधांसह थोडे स्वस्त ‘पॅकेज’ कोण देऊ करतेय, याचे पर्याय शोधण्याची वृत्ती आता तयार झाली आहे. ब्लॉगर्स -व्लॉगर्सच्या भेटींचे तपशील पाहून, यूट्यूबवरून राहण्या-भटकण्याच्या स्थळांची पडताळणी करून, एखाद्या ठिकाणी पूर्वी गेलेल्या आप्तांकडून माहिती मिळवून, विविध टूर पॅकेजेसमधील फरक तपासून, त्यांना इतरांनी दिलेल्या रेटिंग्जचे तपशील पाहूनच मग आपली सुट्टी कुठे उत्तम घालवता येईल हे ठरवतो. खूप गर्दीच्या, गजबजलेल्या आणि पर्यटकांनी गच्च झालेल्या ठिकाणांऐवजी शांतता असलेल्या ठिकाणांची निवड करताना दिसतो.

करोनाआधीपासून कझाकस्तान, उझबेकिस्तान या देशांनी पर्यटनामधून उभारता येणाऱ्या परदेशी चलनाचा गांभीर्याने विचार केलेला दिसतो. या दोन्ही देशांनी आपल्या देशातील मूलभूत यंत्रणांना, निसर्गस्थळांना आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्रांच्या तोडीचे करण्यावर भर दिला. परदेशी गुंतवणुकीला वाव दिला. वाहतुकीच्या यंत्रणांमध्ये सुसूत्रता आणली, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणाऱ्या हॉटेल्स, मॉल्सची निर्मिती केली. आपल्या देशातील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी जगातील पर्यटक आकर्षित होतील या दृष्टीने आकर्षक अर्थस्नेही धोरणे आखली. कझाकस्तानमध्ये पावसाळा आपल्यासारखा ऋतू म्हणून नसतो. मात्र नोव्हेंबर ते मार्च तिथे बर्फवृष्टी होते. त्या दृष्टीने पर्यटकांसाठी रिसॉर्ट, बर्फातील खेळ (आईस स्केटिंग) आणि विविध महोत्सव (विंटर फेस्टिव्हल्स) येथे भरविण्यात येतात. रेशीम मार्ग म्हणजेच ‘सिल्क रूट’वर असलेल्या उझबेकिस्तानने २०१७ नंतर व्हिसाबाबत मोकळी धोरणे आखली. आपल्या इतिहाससमृद्ध शहरांचा कायापालट केला. समरकंद, खिवा, ताश्कंद या साऱ्याच परिसरांत ‘सिल्क रोड रेस्तराँ’, ‘सिल्क रोड शॉप्स’, ‘सिल्क रोड टूर्स अॅण्ड एजन्सीज’ अशी नामावली पाहायला मिळते. ‘डिस्नेलॅण्ड’च्या धर्तीवर थीम पार्क्स कझाकस्तान आणि उझबेकिस्तान या दोन्ही देशांत दिसतात. कॅफे आणि नाइटलाइफ संस्कृतीदेखील नव्याने विकसित होत असल्यामुळे भारतीयांसाठी थायलंड-मलेशियापेक्षा वेगळ्या अनुभवाचे हे नवे पर्याय बनत चालले आहेत.

पर्यटनवाढीसाठी प्रयत्न…

दहा वर्षांपूर्वी कझाकस्तानने पर्यटन क्षेत्रात वृद्धीसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली. जुलै २०२२ नंतर या देशाने भारतीय पर्यटकांना व्हिसामुक्त केले. सध्या या देशाने ५४ राष्ट्रांसाठी व्हिसामुक्त धोरण ठेवले आहे. देशात असलेल्या नैसर्गिक सौंदर्यस्थळांना, भेटीयोग्य स्थळांना अधिकाधिक आकर्षक करण्यावर भर दिला जातोय.

एप्रिल ते मे हा आपल्याकडचा उन्हाळसुट्टीचा कालावधी तिथला वसंत ऋुतू. हा त्यांचा पारंपरिक पर्यटन हंगाम नसल्याने तुलनेने इतर राष्ट्रांतील पर्यटक या काळात कमी असतात. त्यामुळे भारतीयांना इथे बऱ्यापैकी स्वस्तात सहल आखता येते. निसर्ग सौंदर्यासह आरामदायी राहणीमानाचा आस्वाद घेता येतो. जून ते ऑगस्ट हा कझाकस्तानमधील उन्हाळा. मात्र, २० ते २८ अंश इतके कमाल तापमान असल्याने बराचसा सुसह्य. त्यामुळे पर्यटकांची गजबज या काळात असते. भारतासह चीन आणि तुर्कीये या देशांतील नागरिकांची गेल्या दोन वर्षांत पसंती या देशाला मिळाली. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये शरद ऋुतू असल्याने या काळात बऱ्यापैकी थंडी होते आणि पर्यटकांची गर्दी कमी व्हायला लागते. त्यामुळे बऱ्याच सवलती आणि पॅकेजेस इथल्या पर्यटन उद्योगाकडून दिल्या जातात. नोव्हेंबर ते मार्च या काळात कडक हिवाळा सुरू होतो आणि बर्फाची चादर भूभागावर पसरते. बर्फावरील खेळ आणि हीमवृष्टी अनुभवण्यासाठी पुन्हा नव्या पर्यटकांचा जथ्था इथे येतो. गेल्या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये कझाकस्तानमध्ये दीड कोटीहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. कझाकस्तान पर्यटन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये भारतातून एक लाख ४६ हजार पर्यटकांनी या देशाला भेट दिली. (२०२३ मध्ये हा आकडा २८,३०० इतका होता. एका वर्षातली भारतीयांची वाढलेली संख्या यातून लक्षात येते.) सर्वाधिक चीन (सहा लाख ५५ हजार) आणि आपल्यानंतर तुर्कीयेमधील पर्यटकांनी (एक लाख ३० हजार) या देशात हजेरी लावली. त्यानंतर जर्मनी, दक्षिण कोरिया आणि जगभरातील अनेक देशांतील लोकांचा राबता होता. गेल्या वर्षी पर्यटन उद्याोगाने राष्ट्रीय उत्पन्नात ९६.५ कोटी डॉलर (५०० अब्ज टेंगे) इतकी विक्रमी भर आणि तब्बल पाच लाख नागरिकांना रोजगार मिळवून दिला. त्यामुळे पर्यटन उद्योगाची कक्षा हरतऱ्हेने रुंदाविण्यासाठी कझाकस्तान सक्रिय दिसते. अस्ताना आणि अल्माटी ही दोन्ही शहरे पर्यटनकेंद्री असली तरी अल्माटीभोवती कझाकस्तानचा पर्यटन व्यवसाय केंद्रित झालाय. अगदी या महिन्यापर्यंत कझाकस्तानमध्ये विमान प्रवासासाठी केवळ दिल्लीवर अवलंबून राहावे लागे. या महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईमधूनदेखील आठवड्याला तीन विमानसेवा (मुंबई ते अल्माटी) सुरू झाल्यात. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटकांना मुंबई-दिल्ली वारी करावी लागणार नाही. पर्यटन विस्तारासाठी परदेशी गुंतवणूक कझाकस्तान मोठ्या प्रमाणावर आकर्षित करीत असून, याच महिन्यात त्यांनी विदेशी गुंतवणूकदारांसाठी दहा वर्षांचे व्यवसाय व्हिसा धोरण आखले.

उझबेकिस्तानची डॉलर धडपड…

ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध वास्तू असलेल्या या देशाने २०१७ पर्यंत आपले व्हिसा धोरण मुक्त केले नव्हते. तोवर वर्षभरात केवळ २० ते २४ लाख पर्यटक या देशाला भेट देत असत. २०१८ ते २०२४ या काळात पर्यटन विकासासाठी जी गुंतवणूक आणि सुधारणा करण्यात आली, त्याचा परिणाम म्हणजे गेल्या वर्षात (२०२४) एक कोटी २० लाख पर्यटकांची विक्रमी नोंद येथे झाली. यात भारतीयांचा वाटा ८२ हजार इतका तुरळक असला, तरी तो एका वर्षात दुपटीने वाढला असल्याचे पर्यटन विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून कळते. सध्या या देशाचा भारतीय नागरिकांनादेखील व्हिसामुक्त प्रवेश देण्याचा विचार सुरू आहे. भारतीय पर्यटकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी २०३० पर्यंतचा पर्यटन कार्यक्रमदेखील या देशाने आखला आहे. भारतीय पर्यटकांना येथे जाण्यासाठी तीन दिवसांसाठी वीस डॉलर (दीड हजारच्या आसपास) व्हिसा फी असली, तरी उझबेकिस्तानने जपान, मलेशिया, दक्षिण कोरिया, सिंगापूर, तुर्किये या राष्ट्रांसाठी व्हिसामुक्त प्रवेश आहे. गेल्या वर्षात कझाकस्तानमध्ये चिनी पर्यटकांची विक्रमी संख्या होती. ते पाहूनच कदाचित येत्या एक जूनपासून उझबेकिस्तानमध्येदेखील चिनी पर्यटकांना व्हिसामुक्त प्रवेश मिळेल. याशिवाय किरगिस्तान या शेजारी राष्ट्राशी पर्यटन सहकार्याचे विविध करार केले असल्याने पुढील काळात या देशाबरोबरच किरगिस्तानभेट देखील भारतीय पर्यटकांना सुकर होण्याची शक्यता आहे. गेल्या आठ वर्षांत उझबेकिस्तानमध्ये ६.५ अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक फक्त पर्यटनवृद्धीसाठी करण्यात आली. आधी असलेल्या हॉटेलयंत्रणेमध्ये एक लाख तीस हजार निवासाच्या (हॉटेल रूम्स) सुविधा फक्त पर्यटकांसाठी तयार करण्यात आल्यात. गेल्या चार वर्षांत ३७५ राष्ट्रीय स्मारकस्थळांजवळ पुनर्विकासावर भर देण्यात आला. कझाकस्तानप्रमाणेच येथेही विंटर रिसॉर्ट्स आणि त्याभोवतीचे पर्यटन लवकरच पाहायला मिळणार आहे. विमानसेवा आणि तिकीट-व्हिसा अधिकाधिक ऑनलाइन करण्यावर पुढील काळात भर असणार आहे.

अत्यंत आक्रमक पर्यटन धोरणांमुळे आणि अर्थातच येणाऱ्या लोकांना पर्यटनाचा परमोच्च आनंद पुरविल्यामुळे कझाकस्तान आणि उझबेकिस्तान या देशांकडे भारतासह अधिकाधिक देशांतील लोक वेगाने आकर्षित होतायत. पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक आशियाई राष्ट्रांची पसंती बदलत चालल्याचे चित्र त्यामुळे लख्ख झाले आहे.



Source link

काश्मीर: सरकारने संधी गमावली…

0
काश्मीर: सरकारने संधी गमावली…



पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाला, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. हल्ला एवढा भयंकर होता की पंतप्रधानांनी जातीने उपस्थित राहून जबाबदारी घेणे गरजेचे होते, त्यामुळे ते दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले.

त्यानंतर झपाट्याने घडलेल्या घटना आणि भारताने दिलेले प्रत्युत्तर याचा विचार करता मोदींची कामगिरी उत्तम होती, असे निश्चितच म्हणता येईल. त्यांनी अतिशय काळजीपूर्वक आणि सर्व गणिते बरोबर जुळवून पत्ते टाकले आणि म्हणूनच त्यांचे पारडे जड झाले. या बळावर मोदी आणि त्यांचा पक्ष पुढील काही निवडणुकांत यश मिळवू शकतील. भाजपसाठी निवडणुका जिंकण्यापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. पहलगाम हल्ल्यानंतर त्यांची त्यांच्या मतदारांवरील पकड मजबूत झाली आहे. माझ्या ओळखीच्या बहुतेकांनी या कठीण काळातील मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले.

अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यामुळे जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादाची समस्या दूर होईल, हे गृहीतक चुकल्याचे पहलगाम हल्ल्यामुळे सिद्ध झाले. अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्याचे जाहीर झाले तेव्हा मी दक्षिण मुंबईतील ‘इंडियन मर्चंट्स चेंबर’मध्ये एका व्याख्यानाला उपस्थित होतो. तेथील काही पत्रकार माझ्याकडे आले आणि माझी त्यावरील प्रतिक्रिया विचारू लागले. मी म्हटले, ‘‘मी या वेळी जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस अधिकारी असतो, तर माझे काम काही काळासाठी सोपे झाले असते. परंतु केंद्र सरकार जोपर्यंत तेथील लोकांची मने जिंकत नाही, तोपर्यंत दहशतवादाला आळा घालणे आणि तेथील स्थानिकांची नाराजी दूर करणे शक्य नाही.’’ पोलीस खात्यात ३६ वर्षे काम केल्यानंतर मी या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहे की, जनतेच्या सक्रिय सहकार्याशिवाय पोलिसांची ताकद प्रभावी ठरू शकत नाही. स्थानिकांच्या सहकार्याला पर्याय नाही, हे पोलिसांना स्वीकारावेच लागेल.

पहलगाम हल्ला स्थानिक रहिवाशांमधील काही असंतुष्ट घटकांच्या मदतीशिवाय शक्यच नव्हता. घटनेनंतर लगोलग जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांच्या आदेशाने संशयितांची डझनभर घरे उद्ध्वस्त केली गेली. नायब राज्यपालांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पावलावर पाऊल टाकले. काश्मिरात असे पाऊल करण्याची काहीच गरज नव्हती. ज्यांच्यावर काश्मिरी जनतेचे पोटापाण्याचे व्यवसाय अवलंबून आहेत, अशा पर्यटकांनाच लक्ष्य करण्यात आल्याने स्थानिकांत आधीच दहशतवाद्यांविषयी असंतोष निर्माण झाला होता. या नाराजीचा लाभ घेत केंद्र सरकार त्यांना आपल्या बाजूने वळवू शकले असते, पण सरकारने ती संधी गमावली. केवळ दहशतवाद्यांशी लागेबंधे असल्याच्या संशयावरून घरांमध्ये स्फोट घडवून आणण्यास सुरुवात करण्यात आली. हल्ल्यांवरील प्रतिसादासंदर्भात प्रशासनाने जी बैठक घेतली, त्यात एकही सुज्ञ आवाज उमटला नाही, हे आश्चर्यकारकच!

मात्र पुढे तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांनी पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि एनएसएशी सल्लामसलत करून उत्तरादाखल पाकव्याप्त काश्मीर, पंजाब आणि पख्तूनवा येथील दहशतवाद्यांच्या छावण्यांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले आणि गमावलेला विश्वास पुन्हा प्राप्त केला. मुरीदके आणि भावलपूर येथील मसूद अझहरच्या ठिकाणांवर केलेले हल्ले विशेष उल्लेखनीय ठरले.

डिसेंबर १९९९ मध्ये काठमांडूहून दिल्लीला येणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करून त्यातील प्रवाशांना सोडण्याच्या मोबदल्यात सरकारने ज्या तीन दहशतवाद्यांना मुक्त केले होते, त्यापैकी मसूद अझहर हा एक होता. त्याच्या सुटकेनंतर तो आयएसआयचा सर्वांत मोठा हस्तक बनला आणि जेवढ्या प्रवाशांच्या मोबदल्यात त्याला सोडण्यात आले होते, त्यापेक्षा कितीतरी अधिक सामान्य नागरिकांच्या हत्येस कारणीभूत ठरला.

त्याच्या लपण्याच्या ठिकाणांवर भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यांमध्ये त्याच्या जवळच्या नातेवाईकांपैकी अनेकांचा मृत्यू झाला, त्यापैकी काही जण त्याच्या द्वेषपूर्ण आणि विध्वंसक कारवायांत सक्रिय सहभागी होते. आपल्या सरकारने आधीच स्पष्ट केले होते की, केवळ दहशतवाद्यांच्या तळांवरच हल्ले केले जातील आणि तेही रात्रीच्या वेळी- जेव्हा सामान्य नागरिकांचा त्या परिसरात वावर नसेल तेव्हाच केले जातील. तरीही, जनरल मुनीर यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी सैन्याने आपल्या लष्कराच्या आणि हवाई दलाच्या आस्थापनांना लक्ष्य करत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. या दोन दिवस चाललेल्या धुमश्चक्रीत दोन्ही देशांना त्यांनी अन्य विविध देशांकडून मिळविलेल्या त्यांच्या शस्त्रास्त्रांची, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांची अचूकता व कार्यक्षमता तपासण्याची संधी मिळाली. उदाहरणच द्यायचे तर एर्दोगान यांनी पाकिस्तानला भेट म्हणून दिलेली तुर्की बनावटीची क्षेपणास्त्रे तुलनेने निरुपयोगी असल्याचे स्पष्ट झाले. आपण रशियाकडून मिळवलेले ब्राह्मोस खरोखरच विनाशकारक असल्याचे सिद्ध झाले. त्याच्या सहाय्याने पाकिस्तानचे तीन हवाई तळ उद्ध्वस्त केले गेले.

दोन्ही देशांच्या वृत्तवाहिन्यांनी या हवाई युद्धाचे विभिन्न पद्धतीने वृत्तांकन केले. अशा वैमनस्याच्या काळात ते स्वाभाविकच होते, पण या वृत्तांकनाचा अन्वयार्थ काढण्याचा प्रयत्न केल्यास आपल्यालाही विमानांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे निष्पन्न होते. अर्थात आपण वैमानिक गमावला नाही, ही त्यातील जमेची बाजू. प्रत्यक्षात काय घडले, हे पुढे येईलच, पण ते एवढ्यात स्पष्ट होणार नाही. त्याला बराच वेळ लागेल. आपले जवान शहीद झाले असतील, तर त्यांच्या नातेवाईकांना कळवल्यावर ते आपल्यालाही कळेलच. नियंत्रण रेषेच्या आपल्या बाजूला विमानाचे अवशेष आढळल्यास ते तुलनेने लवकर कळेल.

युद्धविरामसाठी अमेरिकेने त्यांच्या राष्ट्राध्यक्षांच्या नेतृत्वाखाली मध्यस्थी केली की नाही वगैरे वाद अप्रस्तुत ठरतात. १० मेच्या संध्याकाळपासून गोळीबाराची एकही घटना घडलेली नाही हे महत्त्वाचे. पाकिस्तान असो वा आर्थिकदृष्ट्या तुलनेने प्रगत असलेला भारत असो, दोन्ही देशांना युद्ध परवडणारे नाही. मोदींनी आपली अर्थव्यवस्था २०३० पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचे जे धाडसी उद्दिष्ट ठेवले आहे, ते साध्य करणे अशा घटनांमुळे काही प्रमाणात अवघड होईल. कदाचित स्थिती पूर्वपदावर येण्यास दोन- तीन किंवा त्याहूनही अधिक वर्षे लागतील.

पंतप्रधानांनी सोमवारी संध्याकाळी राष्ट्राला उद्देशून उत्स्फूर्त भाषण केले आणि दहशतवाद्यांना धडा शिकविल्याशिवाय शांत बसणार नसल्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार केला. पहलगाम हल्ल्यातील प्रत्येक दहशतवाद्याचा माग काढून त्यांना निष्प्रभ करण्याचे पूर्ण अधिकार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना देण्यात यावेत. बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सहभागी इस्रायली खेळाडूंची हत्या झाल्यानंतर मोसादने अशी अतिशय नियोजनबद्ध कारवाई केली होती. दहशतवादाचा वणवा पेटता ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आयएसआयला तसाच धडा शिकवणे गरजेचे आहे.

यापलीकडे जाऊन, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, जम्मू-काश्मीरमधील समस्या सोडवण्यासाठी मोदींना त्यांच्या आक्रमक दृष्टिकोनाचा पुनर्विचार करावा लागेल आणि त्यात सुधारणा करावी लागेल. तेथील दहशतवादाचा अंत करण्यासाठी स्थानिकांची मने जिंकावी लागतील. तेथील रहिवाशांना आदर आणि सन्मानाने वागवावे लागेल. ही जबाबदारी नेहमीच भारताचे समर्थन करत आलेल्या अब्दुल्ला कुटुंबाकडे सोपवता येईल. काश्मीर समस्या सोडविण्यासाठीच्या प्रयत्नांतील अब्दुल्ला कुटुंबाचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हे समजून घेण्यासाठी वाचकांनी चंद्रशेखर दासगुप्ता यांचे ‘वॉर अँड डिप्लोमसी इन काश्मीर १९४७-४८’ आणि रॉचे माजी अध्यक्ष अमरजीत सिंग दुलत यांचे अलीकडचे ‘द चीफ मिनिस्टर अँड द स्पाय’ ही पुस्तके वाचली पाहिजेत.

(लेखक मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त आहेत.)



Source link

Viral News : गर्लफ्रेंडच्या अशा मागणीसाठी, कपडे न घालताच पोहोचला बॉयफ्रेंड, पोलिसांनी पकडल्यावर…

0
Viral News : गर्लफ्रेंडच्या अशा मागणीसाठी, कपडे न घालताच पोहोचला बॉयफ्रेंड, पोलिसांनी पकडल्यावर…


Naked Thief Bangalore : तुम्ही चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील, पण एक विचित्र चोरीची घटना समोर आली आहे. झालं असं की, ती एक शांत रात्र होती, रस्ते शांत होते, रस्त्यांवर कोणतीही हालचाल नव्हती. पण एका मोबाईल दुकानाच्या भिंतीमागे काहीतरी घडत होते, ज्यामुळे पोलिसांनाही आश्चर्य वाटले. हे चित्रपटातील दृश्य नव्हते तर एक वास्तव होते जिथे एक चोर चोरी करण्यासाठी नग्न अवस्थेत दुकानात घुसला होता. नेमकं काय प्रकरण आहे पाहूयात. 

बेंगळुरूच्या होंगासंद्रा येथील हनुमान टेलिकॉम परिसरातून चोरीचा एक विचित्र प्रकार समोर आला आहे. जिथे एक चोर विवस्त्र अवस्थेत तोंडावर मास्क घालून चोरी करायला आला होता. पोलिसांनी आरोपीची ओळख 27 वर्षीय इम्रान उल्लाह अशी केली आहे. जो आसामचा रहिवासी आहे. आरोपीने सांगितले की त्याने त्याचे कपडे काढले आणि चोरी केली कारण त्याचे कपडे नवीन होते आणि त्याला ते खराब करायचे नव्हते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ज्यामध्ये आरोपी नग्न, हातात टॉर्च आणि तोंडावर मास्क घालून चोरी करण्यासाठी दुकानात घुसल्याचे दिसून आले.

राजस्थानमध्ये कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे चोरीच्या वेळी दुकान मालक दिनेश उपस्थित नव्हता. पण तो दररोजप्रमाणे त्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे ऑनलाइन निरीक्षण करत होता. जेव्हा त्याने दुपारी 4 वाजता फुटेज तपासले तेव्हा त्याला धक्काच बसला. त्यानंतर त्याने ताबडतोब स्थानिक पोलिसांना कळवले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान उल्लाहने चौकशीदरम्यान सांगितले की, तो त्याचे नवीन कपडे वाचवण्यासाठी कपड्यांशिवाय दुकानात शिरला होता, त्याला दुकानाच्या भिंतीत केलेल्या छिद्रातून जावे लागले. पोलीस चौकशीदरम्यान इम्रान उल्लाहने सांगितले की, तो त्याच्या मैत्रिणीसाठी महागड्या भेटवस्तू खरेदी करण्याच्या उद्देशाने ही चोरी करत होता. तो चोरीला गेलेला फोन काळ्या बाजारात विकणार होता.

त्याने ही चोरीची योजना खूप विचारपूर्वक केली होती. इम्रान उल्लाह एकटा नव्हता. त्याचा एक सहकारी दुकानाबाहेर पहारा देत होता आणि तो स्वतः आत गेला. महागडे फोन निवडून आपल्या बॅगेत भरले. या चोरीच्या मोबाईलची एकूण किंमत सुमारे 25 लाख रुपये होती. त्याने स्वस्त आणि जुने मॉडेल घेतले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आधीच दुकानाची रेकी केली होती आणि त्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची स्थिती आणि दुकानाच्या लेआउटची पूर्ण माहिती होती. पोलिसांनी सांगितले की, इम्रान उल्लाह याआधीही अनेक चोरींमध्ये सहभागी आहे आणि त्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत आणि इम्रान उल्लाहच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.





Source link

इंजिनीयर तरुणी बकऱ्या चरणाऱ्या आजोबासमोर भर रस्त्यात नग्न झाली आणि… पोरीचे कृत्य समजल्यावर आई बाप हादरले

0
इंजिनीयर तरुणी बकऱ्या चरणाऱ्या आजोबासमोर भर रस्त्यात नग्न झाली आणि… पोरीचे कृत्य समजल्यावर आई बाप हादरले


Rajasthan Cime News Viral Video:  राजस्थानमधील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत एक तरुणी आजोबांसमोर नग्न अवस्थेत धक्कादायक कृत्य करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओचे आधारे पोलिसांनी नग्न तरुणी आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली. तरुणी सॉफ्टवेअर इंजियनर आहे. मात्र, या तरुणीने असे का केले याचा खुलासा झाल्यावर पोलिसलही हादरले. तर, या तरुणीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. 

या तरुणीचा आजोबांसोबतचा व्हायरल झालेल्या व्हिडिओ खूपच धक्कादायक आहे. व्हिडिओत दिसणारे आजोबा 74 वर्षांचे आहेत. आजोबा शांतपणे आपल्या बकऱ्या चरत असतात. एक कार आजोबांजवळ येऊन थांबते. नग्न अवस्थेत असलेली ही इंजिनीयर तरुणी कार मधून उतरते आणि थेट आजोबांशी जवळीक साधून त्यांच्याशी अश्लिल चाळे करते. ऐवढ्यावरच न थांबता ही तरुणी आजोबांना देखील अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यास प्रवृत्त करते. भरत रस्त्यात तरुणीचा हा नंगा नाच सुरु असतो. या पेक्षा धक्कादायक बाब म्हणजे कारमध्ये बसलेला या तरुणीचा प्रियकर या सर्व प्रकारचे शूटींग करतो. 

असा एक एकच नाही तर आणखी व्हिडिओ पोलिसांना सापडले आहेतय. दुसऱ्या एका व्हिडिओत तरुणी रस्त्याने चाललेल्या एका तरुणाला बोलावून त्याला अश्लील कृत्ये करण्यास सांगते. दरम्यान, ड्रायव्हिंग सीटवर बसलेला तिचा प्रियकर याचा  व्हिडिओ बनवतो. हा व्हिडिओ जयपूर-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बस्सी पोलिस स्टेशन परिसरातील बांसखोह गेटजवळ बनवण्यात आला आहे.

जैसलमेर एसपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस कोठडीत असलेल्या या जोडप्याचे असे अनेक व्हिडिओ आहेत ज्यामध्ये ते लोकांसोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. जैसलमेरमध्ये व्हिडिओ बनवण्यापूर्वी, महिलेने सिंगापूर, थायलंड इत्यादी ठिकाणीही भेट दिली होती. येथेही महिलेने अशाच गोष्टी केल्या आणि व्हिडिओ बनवले.

पोलिसांच्या अटकेत असलेली ही तरुणी आणि तिचा प्रियकर अशा प्रकारचे व्हिडिओ बनवून पॉर्न साईट्सवर अपलोड करन पैसा कमवत होते. आरोपी महिला दिल्लीत तिच्या मैत्रिणीसोबत राहत होती आणि दोघेही पैशासाठी एकत्र असे कृत्य करत होते. 
तरुणीचे कृत्य पाहून तिचे कुटुंब हादरले आहे. या तरुणीच्या वडिलांनी कर्ज घेऊन तिला इंजिनीयरिंग शिकणीसाठी दिल्लीत पाठवले. शिक्षण पूर्ण झाले. मुलीला नोकरी मिळाली मात्र, वडिल अजूनही तिच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडत आहेत. मुलीच्या या कृत्यामुळे त्यांची मान शरममेने खाली गेली आहे. 





Source link

EPFO च्या 7 कोटी सदस्यांना फायदा! आता इंटरनेटशिवाय घेता येणार ‘या’ सुविधांचा लाभ

0
EPFO च्या 7 कोटी सदस्यांना फायदा! आता इंटरनेटशिवाय घेता येणार ‘या’ सुविधांचा लाभ


EPFO Latest Reforms: जर तुम्हालाही EPF पासबुक पोर्टलवर लॉग इन करण्यात समस्या येत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता कोट्यवधी सदस्यांना भविष्य निर्वाह निधीमध्ये उद्भवणाऱ्या समस्यांबद्दल काळजी करण्याची गरज नाही. आता तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) एसएमएस आणि मिस्ड कॉल सेवेद्वारे देखील पीएफ शिल्लक तपासू शकता.

ईपीएफ पासबुक पोर्टल हे सामान्यतः पीएफ शिल्लक आणि व्यवहार तपशील पाहण्यासाठी यूजर फ्रेण्डली प्लॅटफॉर्म आहे. पण कधीकधी वेबसाइटवर जास्त ट्रॅफिक, पोर्टल मेंटेनन्स, लॉगिन समस्या किंवा अपूर्ण केवायसीमुळे समस्या उद्भवतात. अशावेळी तुम्ही एसएमएस किंवा मिस्ड कॉल सुविधेचा वापर करून तुमचे पीएफ तपशील सहजपणे जाणून घेऊ शकता.

इंटरनेटशिवायही तपासा पीएफ बॅलन्स

एसएमएस सेवेद्वारे-
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुमचा UAN सक्रिय आहे का ते पाहा. यूएएन तुमच्या आधार, पॅन आणि बँक तपशीलांशी जोडलाय याची खात्री करावी लागेल. यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून ७७३८२९९८९९ वर EPFOHO UAN ENG मेसेज पाठवा. इतर भाषांमधील माहितीसाठी तुम्ही ENG चा भाषा कोड टाकू शकता. हिंदीसाठी HIN आणि तमिळसाठी TAM प्रमाणे. ही सेवा इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि बंगालीसह 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे.

मिस्ड कॉल सेवा
जर तुमचा UAN सक्रिय असेल आणि KYC पूर्णपणे अपडेट केलेले असेल, तर तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून ०११-२२९०१४०६ वर मिस्ड कॉल देऊन देखील माहिती मिळवू शकता. जेव्हा तुम्ही या नंबरवर कॉल कराल, तेव्हा दोन रिंग वाजल्यानंतर कॉल आपोआप डिस्कनेक्ट होईल आणि तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुमचा पीएफ बॅलन्स दर्शविणारा एसएमएस लगेच येईल.

अनेक अपडेट 
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) देशातील ७ कोटींहून अधिक संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लक्षात घेऊन अनेक मोठ्या सुधारणांची घोषणा केली आहे. डिजिटल सेवा सुलभ करणे, पारदर्शकता वाढवणे आणि प्रक्रिया वेगवान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. आज आम्ही तुम्हाला सोप्या भाषेत ५ मोठ्या बदलांबद्दल सांगणार आहोत.

तुमचे प्रोफाइल अपडेट करणे झाले सोपे
जर तुमचा UAN आधारशी लिंक असेल तर तुम्ही आता कोणतेही कागदपत्र अपलोड न करता तुमचे नाव, जन्मतारीख आणि राष्ट्रीयत्व यासारखे तपशील ऑनलाइन अपडेट करू शकता. असे असले तरी ऑक्टोबर २०१७ पूर्वी तयार केलेल्या UAN धारकांना काही प्रकरणांमध्ये नियोक्त्याच्या मंजुरीची आवश्यकता असू शकते.

आता पीएफ ट्रान्सफरसाठी नियोक्त्याच्या परवानगीची आवश्यकता नाही

१५ जानेवारी २०२५ पासून, नोकरी बदलल्यावर पीएफ हस्तांतरणाची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. आता बहुतेक प्रकरणांमध्ये, नियोक्त्याच्या मंजुरीची आवश्यकता राहणार नाही. ज्यामुळे हस्तांतरण जलद आणि त्रासमुक्त होईल. तसेच संयुक्त घोषणापत्राची प्रक्रिया देखील डिजिटल करण्यात आलीय.

केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टम (CPPS) ची सुरुवात

ही नवीन प्रणाली १ जानेवारी २०२५ पासून लागू झाली आहे. ज्यामध्ये पेन्शन NPCI प्लॅटफॉर्मद्वारे थेट बँक खात्यात पाठवले जाईल. यापूर्वी पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) वेगवेगळ्या प्रादेशिक कार्यालयांना पाठवले जात होते, ज्यामुळे विलंब होत असे.

जास्त पगार असलेल्यांसाठी पर्याय

जर तुमचा पगार निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुम्ही अतिरिक्त योगदान देऊन जास्त पेन्शनसाठी अर्ज करू शकता. ईपीएफओने आता ही प्रक्रिया स्पष्ट आणि एकसमान केली आहे. ज्यामुळे प्रत्येकाला त्यांच्या पेन्शन अधिकारांबद्दल योग्य माहिती मिळू शकणार आहे.

खासगी ट्रस्टदेखील आता ईपीएफओ सारख्या नियमांच्या कक्षेत

खासगी ट्रस्ट ईपीएफओच्या कक्षेत नाहीत त्यांनी देखील ईपीएफओमध्ये लागू असलेल्या पेन्शनशी संबंधित प्रक्रियांचे पालन करावे, असे निर्देश ईपीएफओने दिले आहेत. यामुळे देशभरात पेन्शन व्यवस्थापन प्रक्रिया एकसमान होऊन गोंधळात टाकणाऱ्या नियमांपासून मुक्तता मिळणार आहे.





Source link

जानकी बोडीवालाला दिग्दर्शकाने सीनसाठी खरंच लघवी करायला सांगितलं होतं

0
जानकी बोडीवालाला दिग्दर्शकाने सीनसाठी खरंच लघवी करायला सांगितलं होतं



Janki Bodiwala was asked to pee for real in vash scene : Shaitaan film pee scene : वश व शैतानमधील लघवीचा सीन : जानकी बोडीवालाला दिग्दर्शकाने सीनसाठी खरंच लघवी करायला सांगितलं होतं





Source link

“964 कोटींचा जलप्रवाह : हिंदूरावजींच्या स्वप्नांची रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात पूर्ती”

0
“964 कोटींचा जलप्रवाह : हिंदूरावजींच्या स्वप्नांची रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात पूर्ती”

फलटण | प्रतिनिधी. दुष्काळी भागाला पाणी मिळावे, हे स्व. लोकनेते मा.खा. हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांचे स्वप्न होते. त्यांच्या या दूरदृष्टीचा आणि संघर्षाचा परिपाक आज त्यांच्या सुपुत्र माजी खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे प्रत्यक्षात उतरत आहे.

नीरा-देवधर लाभक्षेत्रातील पाण्याचा संघर्ष गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. या संघर्षाला काल मोठे यश मिळाले असून, मौजे काळज ते आंदरुड या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी प्रचंड 964 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे काम विशेषतः गेल्या २५-३० वर्षांपासून आंदोरी येथे जाणीवपूर्वक थांबवण्यात आले होते.

पहिल्या टप्प्यातील आंदोरी, खंडाळा ते काळज पर्यंतचे काम पूर्णत्वास येत असून, आता दुसऱ्या टप्प्यात मौजे काळज ते आंदरुड पर्यंत लाभक्षेत्रात पाणी पोहोचवण्यासाठीचे काम प्रत्यक्षात सुरू होत आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे फलटणसह संपूर्ण दुष्काळी पट्टा सिंचनाच्या दृष्टिकोनातून उजळून निघणार आहे.

ही स्वप्नपूर्ती केवळ माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याच नव्हे, तर संपूर्ण दुष्काळी जनतेच्या न्यायासाठीचा विजय आहे. लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांनी पाहिलेल्या स्वप्नांना न्याय देणारे खरे नेतृत्व म्हणजेच श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर, असे शेतकरी वर्गातून गौरवोद्गार व्यक्त होत आहेत.

या कामासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा मोठा आशीर्वाद लाभला आहे. यासोबतच फलटण तालुक्याचे आमदार श्री सचिन कांबळे-पाटील यांनीही या योजनेच्या मंजुरीसाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला.

या ऐतिहासिक टप्प्यावर फलटण तालुका भारतीय जनता पार्टी तसेच नीरा-देवधर संघर्ष समिती फलटण, माळशिरस, खंडाळा वतीने सर्व नेत्यांचे व सरकारचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.