Monday, July 13, 2026
Home Blog Page 249

नागपूरची महिला काश्मीरमधून बेपत्ता, मुलाला एकटं सोडून LOC पार केली? पाकमधील धर्मगुरू…

0
नागपूरची महिला काश्मीरमधून बेपत्ता, मुलाला एकटं सोडून LOC पार केली? पाकमधील धर्मगुरू…


Nagpur Women Missing: पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन देशातील तणाव वाढला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. भारतीय युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिने भारताची हेरगिरी केल्याचा आरोप आहे. रियाणा पोलिसांव्यतिरिक्त, मिलिटरी इंटेलिजेंस (एमआय) आणि इंटेलिजेंस ब्युरो (आयबी) चे पथक हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राची देखील चौकशी करण्यात येत आहे. अशातच आणखी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. नागपुरातील महिलाही पाकिस्तानात गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 43 वर्षीय महिला काश्मीरमधून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. मुलाला इथेच सोडून ही महिला पाकमध्ये पळाल्याची शक्यता असून पाक धर्मगुरुच्या ऑनलाईन ओळखीतून महिलेने LOC पार केले असून शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

नागपूरच्या सुनीता जामगडे या महिलेच्या अचानक बेपत्ता होण्याच्या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. कारगिलच्या सीमेवरील शेवटच्या ‘हुंदरमान’ गावातून तिने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सुनीता जामगडे ही नागपूरमधील संत कबीर नगर भागात राहणारी महिला असून, ती पूर्वी एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती. 

ती 14 मे रोजी आपल्या 12 वर्षीय मुलासह काश्मीरच्या दिशेने निघाली होती. मुलाला थोड्याच वेळात परत येते असे सांगून सोडून दिले आणि त्यानंतर तिचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. स्थानिक नागरिकांनी हा मुलगा एकटाच फिरताना पाहून त्याला तातडीने लडाख पोलिसांच्या हवाली केले. सुनिता ही काही काळापासून पाकिस्तानमधील एका धर्मगुरूच्या संपर्कात होती. त्याच्यासोबतच्या ऑनलाइन संभाषणांमुळे ती मानसिकदृष्ट्या प्रभावित झाली होती, असा संशय आहे. मात्र महिला मानसिक रुग्ण असल्याचा दावा तिच्या आईने केला आहे. 

ज्योतीच्या हेरगिरी कनेक्शनची तपासणी

युट्यूबर  ज्योती मल्होत्रा यांना पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांना पुरवल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने ही कारवाई केली असून, या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. ज्योती मल्होत्रा यांच्याकडून काही महत्त्वाची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी गोपनीयतेच्या कारणास्तव अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. 





Source link

Blue Revolution चे जनक डॉ. सुबन्ना अयप्पन यांचा मृत्यू, नदीत आढळला मृतदेह

0
Blue Revolution चे जनक डॉ. सुबन्ना अयप्पन यांचा मृत्यू, नदीत आढळला मृतदेह


Dr Subbanna Ayyappan Found Dead: लोकप्रिय कृषी शास्त्रज्ञ आणि पद्मश्री डॉ. सुबन्ना अयप्पन (70) यांचा मृतदेह कावेरी नदीत आढळला आहे. कर्नाटकातील श्रीरंगपत्तन येथील श्री आश्रमच्या जवळून वाहणाऱ्या कावेरी नदीत त्यांचा मृतदेह सापडला होता. 10 मे रोजी ही घटना घडली होती. सुबन्ना अयप्पन यांच्या पाश्चात्त कुटुंबात त्यांची पत्नी आणि दोन मुली आहेत. डॉ. अयप्पन यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 7 मेपासून ते राहत्या घरातून बेपत्ता होते. 10 मे रोजी त्यांचा मृतदेह कावेरी नदीत आढळला. भारतातील Blue Revolution निळी क्रांतीचे जनक असलेल्या डॉ. सुबन्ना अयप्पन यांच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. 

श्रीरंगपत्तन पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करुन तपास सुरू केला आहे. पोलिसांना शनिवारी कावेरी नदीत एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली. सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह नदीतून बाहेर काढला. मृतदेहाची ओळख तपासताच ते दिग्गज कृषी तज्ज्ञ आणि पद्मश्री डॉ. सुबन्ना अय्यपन असल्याचे समोर आले. नदीच्या किनारी त्यांची स्कुटरदेखील सापडली आहे. डॉ. अय्यप्पन हे त्यांच्या कुटुंबासह मैसूर येथील विश्वेश्वरा नगर इंडस्ट्रियल एरियात राहत होते.

देशात ब्लू रेव्होल्यूशनला वाढवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. सरकारने 2022 रोजी त्यांचे योगदान आणि कामासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. डॉ. अय्यप्पन यांनी मत्स विज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्यांनी बंगळुरूतील अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटीतून पीएचडी केली होती. देशात  ब्लू रेव्होल्यूशन (निळी क्रांती- मत्स पालन) ला चालना देण्यासाठी त्यांनी भरपूर कार्य केले. मत्स्यव्यवसायात क्रांती घडवण्यासाठी आणि मत्स्यपालकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ब्लू रेव्होल्यूशन ही योजना महत्त्वाची आहे. 





Source link

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला ट्रकची धडक, सर्वजण बचावले

0
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला ट्रकची धडक, सर्वजण बचावले



Farmer leader Ravikant Tupkar vehicle hit by truck, everyone escaped unhurt शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला ट्रकची धडक, सर्वजण बचावले





Source link

इस्रोचे 101 वे मिशन अयशस्वी! तिसऱ्या टप्प्यात पोहोचताच…, भारतासाठी महत्त्वाचा होता EOS-04 उपग्रह

0
इस्रोचे 101 वे मिशन अयशस्वी! तिसऱ्या टप्प्यात पोहोचताच…, भारतासाठी महत्त्वाचा होता EOS-04 उपग्रह


ISRO EOS-09 Satellite: आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथून इस्रोने आज सकाळी 5.59 वाजता सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातील पहिल्या लाँच पॅडमधून पीएसएलव्ही-सी61 (PSLV-C61) रॉकेट लाँच केले होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळं इस्रोचे हे मिशन फेल झाले आहे. PSLV रॉकेट तिसरा टप्प्यापर्यंत पोहचू शकला नाही. याची माहिती इस्रोचे प्रमुख व्ही नारायणन यांनी दिली आहे.

इस्रो प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅटेलाइट लाँच केल्यानंतर पहिला आणि दुसरा टप्पा यशस्वीपणे पार करण्यात आला. मात्र तिसरा टप्पा पार करण्याआधीच काही तांत्रिक बाबींचा अडथळा आल्याने मिशन पूर्ण होऊ शकले नाही. ‘तिसऱ्या टप्प्याचे संचालन सुरू असतानाच आम्हाला तांत्रिक अडचण आढळली. त्यामुळं मिशन तिथेच थांबवण्यात आले. आता आम्ही या डेटाचे विश्लेषण करू त्यानंतर पुन्हा एकदा मिशन यशस्वीरित्या पूर्ण करू’, असं त्यांनी म्हटलं आहे. 

या मिशनअंतर्गंत EOS-09 (Earth Observation Satellite-09) रॉकेट सूर्याच्या समकालिक कक्षेत  (Sun Synchronous Polar Orbit – SSPO)  जाणे अपेक्षित होते. EOS-09 मध्ये असलेल्या ‘सी-बँड सिंथेटिक अपर्चर रडारमुळं कोणत्याही हवामान परिस्थितीत कधीही पृथ्वीच्या पृष्ठभागाचे उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा घेण्यास सक्षम असेल. हा उपग्रह EOS-04 सारखाच असून त्याचे काम पृथ्वीचे फोटो आणि माहिती पाठवणे होते. जेणेकरून महत्त्वाच्या कामांसाठी डेटा मिळवता येईल. तसंच, त्याच्या मदतीने सीमेवर होणाऱ्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाता आले असते. 

या उपग्रहाचा भारताला काय फायदा होणार?

EOS-09 उपग्रहाची रचना देशाच्या रडार सेन्सिंग क्षमतांना अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. दहशतवादीविरोधी कारवाया, घुसखोरी किंवा सीमेवरील संशयास्पद हालचाली शोधण्यासाठी डिझाइन केले होते. तसंच, या उपग्रहाच्या माध्यमातून सीमेवरील शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जाईल. या उपग्रहाचे वजन अंदाजे 1,710 किलोग्रॅम होते आणि त्यामुळे देशाला आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरणीय देखरेख यासारख्या क्षेत्रात अचूक माहिती मिळण्यास मदत होईल.

दरम्यान, हे मिशन का यशस्वी होऊ शकले नाही याची तपासणी इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून करण्यात येईल. तसंच, भविष्यात ही चूक पुन्हा होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

हा उपग्रह खूप खास आहे कारण तो अशा अनेक उपग्रहांचा भाग आहे जे पृथ्वीवर लक्ष ठेवतात आणि कोणते बदल होत आहेत हे शोधतात. हा उपग्रह शेती, वन, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा यासारख्या कामांमध्ये मदत करेल. देशाच्या सीमांवर लक्ष ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे, उपग्रह लाँच होण्याआधी इस्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी याबाबत माहिती दिली होती. 





Source link

तीन दिवसानंतर शनी-सूर्य करणार नुसती चांदी; त्रिएकादश योग ‘या’ तीन राशींचे आयुष्य बदलणार

0
तीन दिवसानंतर शनी-सूर्य करणार नुसती चांदी; त्रिएकादश योग ‘या’ तीन राशींचे आयुष्य बदलणार



Shani-Surya create triekadashi yog 2025 three zodic get happy life l तीन दिवसानंतर शनी-सूर्य करणार नुसती चांदी; त्रिएकादश योग ‘या’ तीन राशींचे आयुष्य बदलणार





Source link

माझा पोर्टफोलिओ: बांधकाम क्षेत्रातील उभरता तारा – एचसीसी

0
माझा पोर्टफोलिओ: बांधकाम क्षेत्रातील उभरता तारा – एचसीसी



वर्ष १९२६ मध्ये स्थापन झालेली, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (एचसीसी) ही वालचंद समूहाची प्रमुख कंपनी आहे. एचसीसी देशभरातील धरणे, बोगदे, पूल, जलविद्युत, अणुऊर्जा प्रकल्प, द्रुतगती महामार्ग आणि रस्ते, सागरी कामे, पाणीपुरवठा, सिंचन व्यवस्था आणि औद्योगिक इमारती यांसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अभियांत्रिकी आणि बांधकामात अग्रेसर आहे. कंपनीने भारताच्या २६ टक्के जलविद्युत क्षमतेत, त्याच्या अणुऊर्जा निर्मिती क्षमतेच्या ६० टक्क्यांपेक्षा अधिक ४,०३६ किमीचे रस्ते आणि द्रुतगती महामार्ग, ३९५ पूल आणि ३६० किमी प्रगत बोगद्यांत योगदान दिले आहे. कंपनीचे महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तराखंड, आसाम, भूतान इत्यादी ठिकाणी ३० प्रकल्प सुरू आहेत. मुंबईतील वांद्रे वरळी सागरी सेतू आणि कोस्टल रोड हे एचसीसीने यशस्वीपणे पूर्ण केले आहेत.

कार्यादेश:

अ) क्षेत्रनिहाय:

वाहतूक: ५३ टक्के

जल: २९ टक्के

पाणी: १४ टक्के

अणुऊर्जा: ४ टक्के

ब) राज्यनिहाय:

महाराष्ट्र: ३२ टक्के

उत्तराखंड: २२ टक्के

मणिपूर: ११ टक्के

मध्य प्रदेश : १० टक्के

गुजरात: १० टक्के

तमिळनाडू: ८ टक्के

राजस्थान: २ टक्के

इतर: ५ टक्के

डिसेंबर २०२४ मध्ये, कंपनीने भारतातील मुख्य कामकाजावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘स्टाइनर एजी’मधील तिचा हिस्सा ‘युनिरेसोल्व एसए’, ‘इममोबिलियर होल्डिंग एसए’च्या (एम३) संलग्न कंपनीला विकला. कंपनीने मार्च २०२५ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षाचे तसेच तिमाहीचे निकाल जाहीर केले असून गेल्या तिमाहीत कंपनीने १,३९२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १७३ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच काळात कंपनीला २४१ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. विद्यमान आर्थिक वर्षांत कंपनीने ५,६०३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ११३ कोटी रुपयांचा नफा कमवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत (४७८ कोटी) हा कमी असला तरीही एचसीसी आघाडीवर राहील. कारण आगामी काळात कंपनीकडून भरीव कामगिरिची अपेक्षा आहे.

गेल्या तिमाहीत कंपनीने ५३४ कोटी रुपयांचे कर्ज फेडले असून त्याव्यतिरिक्त १३४ कोटी रुपयांचे कर्ज मुदतीआधीच फेडले आहेत. यामुळे कर्जाचा बोजा कमी होऊन व्याज खर्च कमी होईल. तसेच यंदाच्या पाहिल्याच तिमाहीत कंपनीला २५० कोटी रुपये मिळणार आहेत. कंपनीचे पाच प्रकल्प नुकतेच पूर्ण झाले असून आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीत, कंपनीकडे ११,८५२ कोटी रुपयांचे कार्यादेश आहेत, तसेच सुमारे ३,५१३ कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांच्या बोलीसाठी एचसीसी पहिल्या क्रमांकावर आहे. कंपनी सध्या सुमारे ३०,९५० कोटी रुपयांच्या आगामी योजनांच्या बोली प्राप्त करण्यासाठी चर्चा करत आहे.

भारतात आघडीवर असलेली एचसीसी आता नेपाळ, इस्रायल, यूएई आणि सौदी अरेबियामध्ये संधी शोधत आहे. राष्ट्रीय दृष्टिकोन योजनेअंतर्गत नद्यांच्या क्षेत्रातील उदयोन्मुख आंतरजोडणीमध्ये सक्रियपणे संधींचा पाठपुरावा करत आहे. एचसीसी अणुऊर्जा क्षेत्रातील संधींचा फायदा घेण्यासाठी उपकरणे उत्पादकांसोबत भागीदारी करेल.

सध्या ३० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर महाग वाटत असला तरीही एचसीसी एक उत्तम दीर्घकालीन गुंतवणूक ठरू शकेल.

शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

  हिंदुस्तान कन्स्ट्रकशन कंपनी लिमिटेड (बीएसई कोड ५००१८५)

संकेतस्थळ: www.hccindia.com

प्रवर्तक: वालचंद हिराचंद समूह

बाजारभाव: रु. ३०/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: बांधकाम/ इन्फ्रा प्रोजेक्ट

भरणा झालेले भाग भांडवल: रु. १८१.९४ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक १६.७२

परदेशी गुंतवणूकदार १०.५७

बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ६.८५

इतर/ जनता ६५.८६

पुस्तकी मूल्य: रु. ४.९८

दर्शनी मूल्य: रु. १/-

लाभांश: —%

प्रति समभाग उत्पन्न: रु. ०.६४

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ७४९

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २०.८१

डेट इक्विटी गुणोत्तर: १.८५

इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: ०.९९

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लाॅईड (आरओसीई): २५.६%

बीटा: १.९

बाजार भांडवल: रु. ५,५४० कोटी (स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ५८/२१

गुंतवणूक कालावधी : २४ महिने

Stocksandwealth@gmail.com

हा लेख गुंतवणूक सल्ला नव्हे तर अभ्यासपूर्ण विवेचन आहे.

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.



Source link

माझ्या हिश्श्याचे किस्से: सतीश कौशिक यांनी ‘बिग-बीं’कडून करून घेतला पूर्ण सीन

0
माझ्या हिश्श्याचे किस्से:  सतीश कौशिक यांनी ‘बिग-बीं’कडून करून घेतला पूर्ण सीन


रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक11 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

सतीश कौशिक हे माझे खूप जवळचे मित्र, उत्तम कलाकार आणि त्यापेक्षाही सर्वात चांगला माणूस होते. आज सतीश कौशिक यांच्याविषयी बोलताना मला पंकज पाराशर यांचीही आठवण येत आहे. दूरदर्शनवरील ‘करमचंद’ ही प्रसिद्ध मालिका त्यांनीच बनवली होती. ‘जलवा’ आणि ‘चालबाज’सारखे सिनेमे तयार केले. पंकज पाराशर यांनीच सतीश कौशिक यांना पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर संधी दिली होती.

पंकजजींनी सांगितले की, ‘एफटीआयआय’मध्ये आम्ही शिकत होतो तेव्हाची ही गोष्ट. तिथला अॅक्टिंगचा कोर्स १९७५ ला बंद झाला होता. १९७७ मध्ये आम्हाला एक सिनेमा बनवण्याचा प्रोजेक्ट देण्यात आला. पण, तेव्हा ‘एफटीआयआय’मध्ये कुणी अॅक्टर नव्हते. त्यामुळे आम्ही दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’तून (एनएसडी) अॅक्टर बोलावले. १० – १५ अॅक्टर आले. मला एक गाणे तयार करायचे होते, ज्यामध्ये एक तरुण – तरुणी आणि एका बागकाम करणाऱ्या माळीदादाची भूमिका होती. माळीदादाच्या भूमिकेसाठी मी अनुपम खेर यांची निवड केली. सकाळी शूटिंग होते. आम्ही रात्री झोपायला गेलो. रात्री अचानक माझ्या खोलीचा दरवाजा खटखटू लागला.

कुणीतरी दार उघडले, तेव्हा धोतर-छाटणी घातलेले, डोक्यावर गमछा बांधलेले आणि हातात झाडे कापायची कात्री घेतलेले सतीश कौशिक बाहेर उभे होते. म्हणाले, ‘बघा साहेब, मी परफेक्ट माळीदादा वाटतोय. तो काश्मिरी आहे.. देखणा, गोरा-गोमटा.. तुम्ही मला माळीदादा म्हणून घ्या..’ मग आम्ही सतीश यांना ती भूमिका दिली.

ज्या बागेत शूटिंग होते, ती ‘एफटीआयआय’पासून जवळपास तासाभराच्या अंतरावर होती. आम्ही परत आलो, तेव्हा समजले की, शूटिंगच्या ठिकाणी सकाळी नऊला बस जाणार असल्याचे अनुपम खेरना सांगून सतीश स्वत: मात्र माळीदादाची भूमिका करण्यासाठी सहा वाजताच बसमध्ये बसून निघून गेले होते. यावरुन मला वसीम बरेलवी यांचा एक शेर आठवतोय…

जहां रहेगा वहीं

रौशनी लुटाएगा

किसी चराग का

अपना मकां नहीं होता।

काळ पुढे सरकला. ८-१० वर्षांनंतर पंकज पाराशर यांनी ‘जलवा’ सिनेमाचे काम सुरू केले. पंकजजींनी त्याविषयी सांगितले की, या सिनेमातील सब-इन्स्पेक्टर रामू घडियालीच्या भूमिकेसाठी मी सतीश यांना घेतले. शूटिंग गोव्यामध्ये होते. त्यामुळे आम्ही बसने येत-जात असू. जॉनी लीवरचाही हा सुरूवातीचा काळ होता. बसमध्ये जॉनीने अशोककुमार यांची एकदम कमालीची अॅक्टिंग करुन दाखवली. ती पाहिल्यावर मी म्हणालो, ‘अरे, हे सिनेमात घ्या..’ जॉनीने आणखी काही तरी करुन दाखवले. मी असिस्टंटला सांगितले की, हेसुद्धा सिनेमात घ्या. रात्री सतीशनी माझ्या खोलीचा दरवाजा वाजवला. ‘काय झाले?’ असे विचारल्यावर म्हणाले, ‘यार, तू त्याचा रोल वाढवतोय, माझा मात्र नाही वाढवत.’ मी म्हणालो..भाई, तुझा रोल एकदम परफेक्ट आहे. त्यावर त्यांनी सांगितले की, मी एक प्रसंग तयार केला आहे. खूप चांगला आहे, तो सिनेमात घ्या. बघा, खूप हिट होईल.. बस, एखाद्या मोठ्या अभिनेत्याला गेस्ट आर्टिस्ट म्हणून आणा.. मी म्हणालो, आता अनुपम खेर खूप मोठे स्टार बनलेत, त्यांनाच घेऊ.. त्यावर सतीश म्हणाले, ‘नको, अमिताभ बच्चन यांना घ्या.. त्यांच्यासोबत मी हा सीन करेन. माझी गॅरंटी आहे, तो नक्की हिट होईल.’ मी याविषयी निर्माते गुल आनंद यांना सांगितले. ते म्हणाले की, मी अमिताभ बच्चन यांना आणू शकत नाही. पण, त्यांच्यासोबत तुमची भेट घालून देऊ शकतो. मग मीटिंग फिक्स झाली. अमिताभजी फिल्म सिटीमध्ये ‘शहंशाह’चे शूटिंग करत होते. आम्ही तिथे पोहोचलो. त्यांची भेट झाल्यावर मी त्यांना म्हणालो की, सर, तुमच्याकडून आम्हाला एक छोटासा गेस्ट अॅपिअरन्स हवा आहे. त्यांनी ‘सीन काय आहे?’ विचारल्यावर सांगितले की, अमिताभ बच्चन आपले दोस्त आहेत, अशा थापा सतीश कौशिक मारत असतो. अशात एकेदिवशी तुम्ही खरेच येता आणि फक्त ‘नो’ एवढेच म्हणून निघून जाता. अमिताभजी राजी झाले; पण त्यांनी सांगितले की, माझ्याकडे तारखाच नाहीत. १८ दिवस तर इथेच ‘शहंशाह’चे शूटिंग करतोय.. मी म्हणालो, ‘सर, एक काम करू. आम्ही इथेच कॅमेरा घेऊन येतो. तुम्ही फक्त दोन मिनिटांसाठी मागून यायचे आणि ‘नो’ म्हणून निघून जायचे.’

दुसऱ्या दिवशी आम्ही रिहर्सल केली. सतीशने आपला डायलॉग म्हटला आणि त्यात पुन्हा सुधारणा केल्याने तो पूर्ण एक पानाचा सीन तयार झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी ११ वाजता निरोप मिळाला की, अमितजी येत आहेत, शॉट तयार ठेवा.. आम्ही त्याप्रमाणे तयारी केली. अमितजी आले. मला म्हणाले, ‘चला, करुन घेऊ. ‘नो’ एवढेच तर म्हणायचे आहे..’ मी सांगितले, ‘सर, एक पूर्ण सीन आहे..’ एका पूर्ण पानाचा सीन पाहून अमितजींनी नकार दिला. पण, तो सीन शूट झाला, याचे सगळे श्रेय जाते सतीश कौशिकना. कारण बच्चन साहेबांनी ‘नो’ म्हणताच सतीश पुढे येऊन म्हणाले, ‘तुम्ही वाचू नका, मी तुम्हाला अॅक्टिंग करुन दाखवतो..’ त्यानंतर सतीश अॅक्टिंग करू लागले. अमितजींच्या स्टाइलमध्ये त्यांचा डायलॉगही म्हटला. अमितजींनीही ते लक्षपूर्वक पाहिले. मग त्यांनी कागद घेतला, पाहिला आणि विचारले, ‘काय देणार मला?’ मी म्हटले, गुलाबाचे फूल.. त्यावर ते म्हणाले, ‘चला, टेक घ्या..’ मग अमितजींनी एका टेकमध्ये शॉट ओके केला. अशाप्रकारे ‘जलवा’तील त्या जबरदस्त सीनचे श्रेय सतीश कौशिक यांना जाते. आज त्यांच्या याच ‘जलवा’ सिनेमातील हे गाणे ऐका…

देखो देखो ये है जलवा…

स्वत:ची काळजी घ्या. आनंदी राहा.



Source link

‘एआय’च्या विश्वात…: आता ‘एआय’च ठरवेल…‘जेवायला काय बनवायचं?’

0
‘एआय’च्या विश्वात…:  आता ‘एआय’च ठरवेल…‘जेवायला काय बनवायचं?’


डॉ. अमेय पांगारकर4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

खाद्यपदार्थ हा आपल्या सगळ्याचा आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. नवनवे पदार्थ बनवणं आणि ते चाखणं प्रत्येकालच आवडतं. आता तुम्ही म्हणालं की, ‘एआय’चा विषय सुरू असताना त्यात मध्येच हे खाद्यपदार्थ / पाककला कुठून आलं? तर त्याचं कारण म्हणजे, आता हे ‘एआय’ तुमच्या किचनमध्येही प्रवेश करू लागलं आहे. स्मार्ट किचन उपकरणे; जसे की ‘एआय’ ओव्हन, स्मार्ट रेफ्रिजरेटर, व्हाइस कमांडवर चालणारे मिक्सर, रोबोट शेफ यांमुळे स्वयंपाकाची अनुभूती आणि पारंपरिक स्वयंपाकघराचा लूकही बदलतो आहे. उदाहरणार्थ, ‘एआय’आधारित ओव्हन स्वयंचलितपणे तापमान आणि वेळ सेट करतो. स्मार्ट रेफ्रिजरेटर आपल्या वस्तूंची यादी ठेवतो आणि गरज पडल्यास मोबाइल अ‍ॅपद्वारे खरेदीची आठवण करून देतो.

‘आज जेवायला काहीतरी वेगळं कर, नेहमीचं नको..’ हे घरातल्यांचं वाक्य ऐकू आलं की बहुतांश गृहिणींना, ‘आज काय बनवायचं?’ हा प्रश्न पडतो आणि काय बनवायचं हे ठरवण्यात त्यांचा बराच वेळही जातो. घरामध्ये कुणी तरी डाएट कॉन्शस असतं, तर कुणाची पथ्यपाणी सुरू असतात. हे सांभाळत प्रत्येकाला आवडेल आणि मानवेल असं जेवण बनवणं ही त्या गृहिणीसाठी कसरतच असते. पण, ‘एआय’ आधारित किचन रोबोट आता स्वयंपाकही करू शकतात. काही रोबोट हजारो रेसिपी ‘शिकून’ त्या अचूक रीतीने तयार करतात. केवळ एका क्लिकवर तुम्हाला नेमक्या चवीचे, गरमागरम जेवण मिळते. त्यामुळे श्रमाची आणि वेळेची मोठी बचत होते. याशिवाय, ‘एआय’ अॅप्लिकेशन्स रेसिपीही सुचवतात, आहारातील पोषणमूल्यांचे विश्लेषण करतात आणि डाएट प्लॅनही तयार करतात. म्हणजे ‘एआय’ तुमच्या फिटनेसप्रमाणे किंवा मधुमेह असेल, तर त्यानुसार योग्य आहार योजनेसह रेसिपी सुचवते. यासाठी वापरली जाणारी काही टूल्स पाहू…

Chef GPT : या टूलमध्ये तुमच्याकडे उपलब्ध असलेले पदार्थ / जिन्नस लिहायचे. तुम्हाला स्नॅक्स, ब्रेकफास्ट, लंच, डीनर यापैकी काय बनवायचे आहे, हे निवडायचे. मग तुमच्याकडे स्वयंपाकाची कुठली साधने आहेत? तुम्हाला किती वेळ आहे? तुम्ही पाककलेत किती निपुण आहात? या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हे टूल तुम्हाला रेसिपी सुचवते. फक्त रेसिपीच नव्हे, तर त्यातून तुम्हाला कुठले आणि किती न्युट्रिएंट, किती कॅलरी मिळतील, हेही सांगते. या टूलच्या Paid Version मध्ये तुम्हाला आपल्या डाएटच्या गरजेनुसार आहाराचा प्लॅन बनवून मिळू शकतो. एवढंच काय, त्या रेसिपीला लागणारा एखादा जिन्नस घरात नसेल, तर हे टूल शॉपिंग लिस्टमध्ये त्याची नोंद करून ते ऑर्डरही करते.

Let’s Foodie : हे टूलही Chef GPT सारखेच घरात असलेल्या सामग्रीपासून रेसिपी बनवून देते. पण, याची खासियत अशी की, हे रेसिपीसोबतच पाककलेतील विविध प्रकार, म्हणजे गॅसवर अन्न शिजवणे, बेकिंग, फ्रोझन म्हणजे अन्न थंड करणे यासोबत कोणते अन्न कुठल्या तापमानापर्यंत साठवून ठेवावे, अशा सर्व गोष्टीदेखील सांगते. Meal Practice : हे टूल फक्त रेसिपी न देता तुमच्या डाएटच्या गरजेनुसार / आहारतज्ज्ञांनी सुचवलेल्या तक्त्यानुसार विविध रेसिपी सुचवते. डाएट करणाऱ्या आणि आरोग्याविषयी सजग असलेल्यांसाठी हे टूल उपयुक्त आहे. म्हणजे, टेस्टी भी, हेल्दी भी और व्हरायटी भी.. असं म्हणायला हरकत नाही.

Smart / AI Cooking Assistant : आपण आतापर्यंत जे टूल्स पाहिले ते फक्त रेसिपी देतात. पण, एखादं असं टूल मिळालं, जे संपूर्ण पदार्थ बनवूनच देत असेल, तर हॉटेलसारखं जेवण अगदी रोज घरी बनवता येईल. अगदी आपल्या साध्या मिक्सरसारखं दिसणाऱ्या या मशीनमध्ये एक छोटा वजनकाटा आणि एक छोटी स्क्रीन असते. एक हजाराहून जास्त रेसिपी यामध्ये इन-बिल्ट असतात. स्क्रीनवरून आपल्याला हवी ती रेसिपी सिलेक्ट करायची, ती किती लोकांसाठी बनवायची आहे, हेही सांगायचे आणि आता त्या रेसिपीसाठी लागणारे सगळे जिन्नस त्यांच्या दिलेल्या प्रमाणासह त्यात टाकायचे. हे मशीन कापणे, मळणे, परतणे, ढवळणे, शिजवणे अशा सर्व गोष्टी करून पदार्थ तयार करून देते.

अशा प्रकारची विविध ‘एआय’ टूल वापरून आपण आवडीचे पदार्थ घरच्या घरी लगेच बनवू शकतो, यात शंका नाही. किचन रोबोट तर यापेक्षाही पुढची पावलं टाकत आहेत. ते अगदी आपण जसे हाताने पराठे लाटतो, तशी कृती करून दाखवतात! त्यामुळे वेळ आणि श्रमाची बचत होते, जिन्नसांच्या नेमक्या प्रमाणामुळे अन्नाची चव सुधारते. एकूणच, आज ‘एआय’ आपले किचन स्मार्ट करत आहे. त्यातून उद्या आपला आहार अधिक वैयक्तिकृत आणि आरोग्यदायी होऊ शकेल. कदाचित काही वर्षांनी आपल्या किचनमधून ‘एss आईss’ अशा प्रेमळ हाकेऐवजी ‘एss आयss’ असा सूर ऐकायला येईल. पण, या सगळ्या गोष्टींबरोबर काही प्रश्न नक्कीच उपस्थित होत आहेत.त्यापैकी, ‘माणसांचे स्वयंपाककलेशी असलेले भावनिक नाते आणि हाताने केलेल्या स्वयंपाकाची लज्जत ‘एआय’ आणू शकेल का?’ या कळीच्या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी ‘नाही’ असे आहे.

(संपर्कः ameyp7@gmail.com)



Source link

बुकमार्क: एक प्रवास… जगण्याच्या श्रेयस – प्रेयसाच्या शोधात!

0
बुकमार्क:  एक प्रवास… जगण्याच्या श्रेयस – प्रेयसाच्या शोधात!


स्वप्नील जोशी7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

कॉर्पोरेट क्षेत्रातील नावाजलेल्या कंपनीत काम करणारा एक तरुण आपल्या आतली हाक ऐकतो आणि नोकरीचा त्याग करत आयुष्याचे वास्तव आणि रहस्य जाणून घेण्याच्या ध्यासाने जगाच्या प्रवासाला निघतो.. ही गोष्ट आहे मानस दिवाण यांची. पत्नी अनुराधा यांच्यासोबत केलेल्या १८ देशांच्या प्रवासातील अनोखा अनुभव त्यांनी ‘डिअर जर्नी’ या पुस्तकाच्या स्वरुपात वाचकांपुढे ठेवला आहे. या इंग्रजीतील प्रवासवर्णनाचे त्यांनी दोन भाग केले आहेत. त्यापैकी ‘फ्री व्हीलिंग’मधून प्रवासाचे तपशील समोर येतात, तर ‘विदिन’मध्ये लेखकाने आभासातून वास्तवाकडे जाताना आपल्या अंत:दृष्टीला जाणवलेल्या गोष्टींचा सुरेख पट मांडला आहे. प्रवास माणसाच्या जीवनधारणेशी निगडीत असतो. तो लिहून ठेवण्याची परंपराही फार प्राचीन आहे. भारतीय साहित्यात अनेक दिग्गजांनी सांस्कृतिक प्रवासाचे महत्त्व विविध अंगांनी विषद केले आहे. मानस दिवाण यांचे हे पुस्तक वाचताना, आयुष्यातील श्रेयस आणि प्रेयसाचे भान आल्यावर आपण नक्की काय करायला हवे, या प्रश्नाचे उत्तर मिळते.

मानस आणि अनुराधा दुचाकीवरून ४ महिने युरोप आणि आशियातील १८ देशांचा प्रवास करतात. मानस आपल्या जडणघडणीच्या काळात, अगदी लहानपणापासून ते आजवर कशाचा तरी शोध घेत होते. ते नेमके हेच असावे, असा भास वाचकाला व्हावा, इतकं खरंखुरं लेखन त्यांनी केलं आहे. एका प्रशंसनीय, साहसी आणि अवखळ वाटेने चालणाऱ्या या दोघांना या प्रवासातून नक्की काय साध्य करायचे होते? रोजचे सुरळीत चाललेले आयुष्य एकरेषीय वाटून त्यांनी ही अनवट वाट का निवडली? मोठ्या कष्टाने मिळवलेली नोकरी सोडून, पैशाच्या बचतीतून प्रवासासाठी महागडी गाडी घेऊन नक्की कशी सुरूवात झाली या प्रवासाची? लेखक हा प्रसंग सांगताना स्वत:ला एका प्रश्नाच्या शोधाकडे नेतो. तो प्रश्न म्हणजे, ‘तुम्ही तुमच्या स्वप्नाचा पाठलाग केला नसेल, तर तुम्ही खरोखर जगला आहात का?’ आपल्या स्वप्नांचा मागोवा घेत या ध्येयवेड्या जोडप्याने अशा प्रवासाला सुरूवात केली खरी, पण त्यांच्यासमोर रोज एक नवीन आव्हान असणार होतं. प्रत्येक देशांत काही कठीण प्रसंगांचा सामना त्यांना करावा लागणार होता. अशा वेळी आपले मनोधैर्य आणि एकमेकांवरील विश्वास हीच या जोडप्याची खरी शक्ती होती.

मानस-अनुराधा यांच्या या प्रवासाला स्पेनमधील व्हॅलेन्सियापासून सुरूवात होते. लेखकाने निवडलेल्या प्रत्येक स्थळाला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. कधी त्यांचे मन हिरवाईने आच्छादलेल्या डोंगरांमध्ये रममाण होई, तर कधी समुद्र आणि डोंगरांच्या मनोहरी स्वप्नात दंग होत असे. आपल्या या प्रवासाचे वर्णन एकाच वेळी ललित आणि वैचारिक या दोन्ही शैलीत करण्याची किमया मानस यांनी साधली आहे. त्यांची बहुमुखी प्रतिभा इथे दिसून येते. या सगळ्यात स्वप्न पाहणारे, जोखीम घेणारे, वृत्तीने साहसी, पण मनाने रोमँटिक असलेले हे जोडपे एकमेकांसाठी कसे जगत होते, याचा प्रत्यय हे वर्णन वाचताना येतो. प्रत्येक देश, तिथली माणसे, भवताल लेखकाच्या मनावर एक ठसा उमटवत असतो. आग्नेय युरोपातील अल्बेनिया इथला असाच एक प्रसंग खूप लक्षवेधी आहे. तेथील स्थनिक लोक मानस आणि अनुराधा यांचे अगदी अगत्याने स्वागत करतात. भारतातील संस्कृतीबद्दल त्यांना पुरेशी माहिती असते. विशेषत: आपले सण, समारंभ, उत्सव आदींबाबत ते भरभरून बोलत असतात. ‘तुम्हा सगळ्यांना भारताविषयी इतकी माहिती कशी काय?’ असे लेखक त्यांना विचारतो. त्यावर ते लोक सांगतात की, “बालिका वधू’, ‘क्योंकी सांस भी कभी बहु थी..” अशा मालिका इथल्या स्थानिक भाषेत खूप लोकप्रिय आहेत.

केवळ नकाशा किंवा चित्रे पाहून खरे जग जाणून घेता येत नाही, तर त्यासाठी तिथे जाऊन प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो. तशी अनुभूती देणारे ‘डिअर जर्नी’ हे पुस्तक वाचकांच्या मनात भटकंतीची आणि नवोन्मेषाची भावना जागृत करते. ‘द कॉमन हाऊस स्पॅरो’ या कथेतील चिमणीचे मनोगत असो किंवा ‘एन्काउंटर अॅट द बोस्निया बॉर्डर’मधल्या एका प्रसंगात भेटणारा, लेखकाला धमकावणारा पासपोर्ट अधिकारी असो किंवा सेल्फीसाठी मनोभावे घेरणारा समूह असो; या सगळ्याच गोष्टी खूप विस्मयकारक आहेत. विविध संस्कारांनी नटलेले प्रदेश, तेथील भिन्न संस्कृती आणि माणसांना या दोघांनी जिंकून घेतल्याचे आपल्याला जाणवते. आयुष्याच्या पुस्तकातले एक मोरपीस अलगद बाहेर काढावं, त्याची मऊ-मुलायम अनुभूती घ्यावी आणि ते पुन्हा तसंच ठेऊन द्यावं.. अशी ही या दोघांसाठीची सुखद यात्रा आहे. एका रसिक मनाने घेतलेला जगाचा हा आत्मिक अनुभव वाचकांनाही आपल्या ‘आतल्या’ आनंदासाठी ‘बाहेर’च्या प्रवासाचे दार उघडायला नक्की उद्युक्त करेल.

पुस्तकाचे नाव : डिअर जर्नी लेखक : मानस दिवाण प्रकाशक : द राइट प्लेस / क्रॉसवर्ड पाने : डिअर जर्नी फ्री व्हीलिंग- १२२, विदिन- ९७ किंमत : रु. २९९

(संपर्कः swapnilkashi566@gmail.com)



Source link

देश – परदेश: सर्वात आनंदी देशाची रहस्ये

0
देश – परदेश:  सर्वात आनंदी देशाची रहस्ये


  • Marathi News
  • Opinion
  • Secrets Of The Happiest Country Divya Marathi Rasik Article By Dnyaneshwar Mule

ज्ञानेश्वर मुळे9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

फिनलंडमधील नागरिकांना आयुष्याची कोणतीही २१ वर्षे शिक्षण आणि जीवनभर आरोग्यसेवा मोफत मिळते. ज्या देशात शिक्षण आणि आरोग्यसेवा नि:शुल्क आहेत, तो देश जगात सर्वात आनंदी असणे अपरिहार्य आहे.

“फिनलंडमध्ये विश्वास (ट्रस्ट) हा परवलीचा शब्द आहे. तिथे नागरिक प्रशासनावर आणि प्रशासन नागरिकांवर विश्वास ठेवते. नागरिकही परस्परांवर विश्वास ठेवतात.’ दिल्लीतील फिनलंडच्या दूतावासातील अधिकारी आम्हाला सांगत होता.. ‘आमच्या आनंदी असण्याचे ते एक महत्त्वाचे कारण आहे.’ ते ऐकताना मी भारतीय जनतेच्या विचार करण्याच्या पद्धतीत ‘विश्वास’आला तर काय होईल, याचा विचार करत होतो. मनातून उत्तर आले की, विश्वासार्हता ही आपल्या समाजाची फार मोठी उणीव आहे. दुर्दैवाने शासन – जनता, दुकानदार- ग्राहक, मालक – नोकर, शेजारी – पाजारी यांच्यातील विश्वासाचा अनुशेष हा विकासाच्या अनुशेषापेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे, हे आपल्याला अजून कळलेले नाही. एकदा विश्वास उडाला की, समाजाची प्रगती खुंटते, हे आपल्याला समजत नाही.

या पार्श्वभूमीवर फिनलंडच्या एका आठवड्याच्या वास्तव्यात काय अनुभवले, ते सांगतो. फिनलंडकडे क्षेत्र भरपूर असले, तरी लोकसंख्या फक्त ५६ लाख आहे. या देशाकडे फारशी खनिज संपत्ती नसली, तरी वनसंपत्ती दृष्ट लागावी इतकी आहे.देशाचा ७४% भाग वृक्षांनी बहरलेला आहे. या देशात प्रवास करताना, तिथल्या शहरात झाडे नाहीत, तर ही गावे आणि शहरेच वनात वसली आहेत, असे भासते. मोबाइल फोन आले, तेव्हा सर्वांना परिचित झालेली नोकिया कंपनी इथलीच. नोकियामुळेच अनेक भारतीय, विशेषत: मराठी मंडळी इथे आली आणि स्थायिक झाली आहेत.

या आनंदी देशात ५०% पेक्षा अधिक आयकर आहे, हे ऐकून चक्रावलो. आणि इथले सर्व लोक आनंदाने हा कर भरतात, हे ऐकून मोठा धक्का बसला. मात्र, फिनलंडमधील कराचा प्रत्येक युरो हा त्या देशाच्या प्रगतीसाठी कारणी लागतो. ती प्रगती आपल्या डोळ्यांना दिसते, अनुभवता येते. गाव असो वा शहर, छोटी वस्ती असो वा मोठी; सर्वत्र अशी स्वच्छता की जिची आपल्याला कल्पनाही करता येत नाही. रस्ते, मग ते महामार्ग असो किंवा गल्लीबोळातील छोटे रस्ते असोत; सगळे इतके छान की प्रवासाचा शीण वाटणे शक्य नाही. पाणी सर्वत्र इतके उत्तम की, कुठेही गेलात तरी नि:शंकपणे नळाचे पाणी पिता येते.

अशा व्यवस्थेत कर देण्याविषयी कुणाचीच तक्रार नसते. कर चुकवावा असे इथल्या लोकांच्या मनात येत नाही. इतकेच नव्हे, तर इथे कोणत्या व्यक्तीने किती कर भरला, हे सहज समजू शकते. शासन करदात्यांची नावे आणि त्यांनी किती कर भरला, याची माहिती एका डिरेक्टरीतून प्रसिद्ध करते. त्यात ज्यांनी जास्तीत जास्त कर दिला, त्यांच्या नावाने सुरूवात असते आणि हळूहळू कमी कर देणाऱ्यांची नावे येतात. प्रत्येक व्यक्तीला आपले नाव अधिकाधिक वरती यावे, अशी इच्छा असते, जेणेकरून आपण देशावर किती प्रेम करतो, हे दाखवण्याची संधी मिळते. भारतात कर देणाऱ्या नागरिकांची संख्या लाजेने मान खाली जावी, अशी आहे.

पण, हे लोक सर्वात आनंदी का आहेत, याची आणखीही कारणे आहेत. इथल्या नागरिकांना आरोग्यसेवा, मग ती कितीही महागडी असो, संपूर्ण जीवनभर मोफत मिळते. शिक्षणाची सुविधा तर अशी की, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्याची २१ वर्षे पूर्ण शिक्षण मोफत घेऊ शकते. हो, २१ व्या वर्षापर्यंत नव्हे, तर आयुष्यात केव्हाही २१ वर्षे शिक्षण घेण्याचं या लोकांना स्वातंत्र्य आहे. याचा अर्थ एखादी व्यक्ती कधीही, कोणताही शिक्षणक्रम घेऊ शकते. इथे व्यवसाय किंवा नोकरी सहजासहजी बदलता येते. नोकरी करणाऱ्याला कंटाळा येऊन तो एखाद्या सुपर मार्केटमध्ये सेल्समन बनून जातो. ज्या देशात आरोग्य आणि शिक्षण संपूर्णपणे नि:शुल्क आहे, तो देश जगात सर्वात आनंदी असणे अपरिहार्य आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशातही अशी व्यवस्था नाही.

अशा समाजव्यवस्थेचा एक अत्यंत सुंदर परिणाम म्हणजे, इथले लोक आपल्याप्रमाणे महत्त्वाकांक्षी नाहीत. करिअर बनवण्याचे आणि जीवनात अधिकाधिक वरची पदे किंवा खूप पैसे मिळावेत, यासाठी इथले लोक एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत नाहीत. याहून गंमत म्हणजे, वरच्या पदाचा कंटाळा आला की, अनेक लोक त्या कामातला ताण न आवडल्याने खालची पदे आनंदाने स्वीकारतात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे, इथले पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष सध्या एका बँकेत अधिकारी आहेत. मी मुद्दाम विचारले की, ते बँकेत काम करतात की, केवळ बँकेचा ब्रँड वाढावा, यासाठी नाममात्र काम करतात? त्यावर मला उत्तर मिळाले, ‘ते सर्वसाधारण अधिकाऱ्याप्रमाणे दिलेले काम नियमितपणे करतात, नियमितपणे कार्यालयात येतात.’ आपल्यासारख्याला हे सगळे प्रकरण धक्का देणारे होते.

मी उत्तरेच्या रोवेनेमिनी शहरापासून दक्षिणेकडील हेलसिंकी या राजधानीच्या शहरांपर्यंत प्रवास केला. मला हेच जाणवलं की, इथे फार मोठ्या आवाजात कोणी बोलत नाही.भांडण सोडाच; पण आवाजात एक मार्दव आहे, नम्रता आहे. हे लोक फारसे बडबडे नाहीत आणि अनेक अर्थाने संकोची स्वभावाचे आहेत. निसर्गाने यांना भरभरून दिले आहे. साधारण दोन लाख तलाव या देशाला अप्रतिम सौंदर्य प्रदान करतात. नद्या असोत किंवा तलाव; तिथे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण आढळत नाही. जशी स्वच्छ माणसं, तसाच इथला स्वच्छ, शुद्ध आणि कोमल असा निसर्ग.

हेलसिंकीमध्ये मला काश्मीरचा एक युवक भेटला. तो वेटरचं काम करतो. तो म्हणाला, ‘हे रामराज्य आहे. मी सांगलीच्या वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमधून ग्रॅज्युएट झालो आणि इथं येऊन मुद्दाम वेटरची नोकरी घेतली. वेटर आणि इंजिनिअरच्या पगारात फारसा फरक नाही. आणि इथे फक्त चार तास काम असते. वर्षातून तीन महिने सुटी आणि १३ महिन्यांचा पगार मिळतो. वेटरच्या कामात बऱ्यापैकी धावपळ करावी लागते आणि मी फिट राहतो. आता मला पीएच. डी. करायची आहे. त्यासाठी इथले गव्हर्नमेंट मला पूर्ण फेलोशिप देईल.’ गंमत म्हणजे, हा काश्मिरी युवक बाळासाहेब ठाकरेंना खूप मानतो, कारण त्यांच्या प्रयत्नाने विस्थापित काश्मिरींना महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेजांमध्ये एक जागा आरक्षित करण्यात आली. ‘उस आदमीने मेरा जीवन बनाया, और मराठी लोगोंका प्यार मुझे मिला..’ हे तो भावूक होऊन सांगत होता.

हेलसिंकीमध्ये शीतल महाजन आणि वैभव राणे हे मराठी जोडपे त्यांच्या दोन मुलांसह वास्तव्य करते. उंच आकाशातून उडी मारण्याचे सगळे जागतिक विक्रम शीतलने मोडले आहेत. तिच्या नावावर अनेक उच्चांक आहेत. बँकेत काम करणारा पती वैभव आणि किशोरावस्थेतले वृषभ आणि वैष्णव या सर्वांनी मला उत्तम आदरातिथ्याबरोबरच मराठी भोजनाचा आस्वाद देऊन खुश केले. त्यानंतर जड अंत:करणाने मी या आनंदी देशाचा निरोप घेतला.

(संपर्कः dmulay58@gmail.com)



Source link