Monday, July 13, 2026
Home Blog Page 248

मंगळसूत्राची चमक कमी झालीये? मग घरच्या घरी फक्त काही सेकंदात करा साफ

0
मंगळसूत्राची चमक कमी झालीये? मग घरच्या घरी फक्त काही सेकंदात करा साफ


How to clean your Mangalsutra: हिंदू धर्मामध्ये प्रत्येक विवाहित महिला मंगळसूत्राला सौभाग्य अलंकार म्हणून परिधान करते. हा केवळ विवाहित महिलांचा अलंकार नाही तर भावनिक आणि सांस्कृतिक प्रतीकदेखील आहे. मंगळसूत्र पतीच्या दीर्घायुष्याचे आणि वैवाहिक आयुष्याचे प्रतीक मानले जाते. तथापि, सतत मंगळसूत्र घातल्यानंतर ते कालांतराने काळे पडते. ज्यामुळे त्याची चमक कमी होते. अशावेळी ते घरच्या घरी साफ कसे करायचे हे आपण जाणून घेऊ

घरी मंगळसूत्र स्वच्छ करण्यासाठी टिप्स

बेकिंग सोडा आणि पाणी

मंगळसूत्र स्वच्छ करण्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा आणि थोडेसे पाणी मिसळून पेस्ट बनवा आणि मऊ ब्रश किंवा कापसाच्या मदतीने साफ करा. त्यानंतर ते साध्या पाण्याने धुवा आणि सुती कापडाने पुसून टाका; अशाप्रकारे मंगळसूत्र नव्यासारखे चमकू लागेल.

बेसन आणि हळद

तुम्ही बेसन आणि हळदीने मंगळसूत्र सहज स्वच्छ करू शकता. यासाठी बेसन पिठात थोडी हळद आणि पाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट मंगळसूत्रावर हलक्या हाताने लावून पुसा आणि पाण्याने धुवून घ्या.

टुथपेस्टचा करा वापर

मंगळसूत्र साफ करण्यासाठी सफेद रंगाची टुथपेस्ट ब्रशवर लावा आणि हलक्या हाताने चोळून पाण्याने धुवून घ्या, यामुळे त्यावरील घाण निघण्यास मदत होईल.

लिंबू आणि मीठ

लिंबू आणि मिठाच्या मदतीनेदेखील तुम्ही मंगळसूत्र साफ करू शकता. यासाठी लिंबाच्या रसात तुम्ही एक चिमूट मीठ घाला आणि कापसाच्या मदतीने मंगळसूत्रावर लावून स्वच्छ करा.

हेही वाचा

डिशवॉशिंग लिक्विड

गरम पाण्यात डिशवॉशिंग लिक्विडचे काही थेंब घालून यामध्ये मंगळसूत्र भिजत घाला, त्यानंतर ते ब्रशने साफ करा.





Source link

पाकिस्तान, तुर्कीएनंतर भारताचा बांगलादेशला दणका; भारत बांगलादेशची करणार आर्थिक नाकाबंदी

0
पाकिस्तान, तुर्कीएनंतर भारताचा बांगलादेशला दणका; भारत बांगलादेशची करणार आर्थिक नाकाबंदी


भारतानं बांगलादेशवर ट्रेड स्ट्राईक केलाय. बांगलादेशातून तयार कपडे, अन्नपदार्थांची आयात भारतीय बंदरातून करण्यावर निर्बंध लादले आहेत. भारताविरोधात केलेली आगळीक बांगलादेशला महागात पडलीय. 

भारतानं पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीए आणि अझारबैजानला चांगलाच धडा शिकवलाय. दरम्यान या दोन्ही देशानंतर आता भारतानं आपला मोर्चा बांगलादेशकडे वळवलाय. बांगलादेशच्या मुहम्मद युनूस यांनी भारताविरोधात केलेलं वक्तव्य त्यांना चांगलंच महागात पडलंय. कारण भारताकडून केलेल्या बंदीनतर बांगलादेशचा कापड उद्योग अडचणीत आलाय.

काय म्हणाले होते मुहम्मद युनूस?

भारताची ईशान्य भारतातील राज्य लँडलॉक्ड आहेत

त्यांना समुद्रापर्यंत जाण्यासाठी बांगलादेशच्या माध्यमातून जावं लागेल. 

चीन हा हिंद महासागरचा पालक आहे

युनूस यांनी चीनला शिपमेंट करण्याचं आमंत्रण देखील दिलं होतं. 

मुहम्मद युनूस यांनी केलेल्या या वक्तव्यानंतरच भारतानं बांगलादेश विरोधात पाऊल उचललंय. त्यामुळे बांगलादेशी वस्तुंची आयात आता काही बंदरावरूनच केली जाणार आहे. 

भारताचा बांगलादेशला दणका 

भारताकडून बांगलादेशवर ट्रेड स्ट्राईक

बांगलादेशमधून येणाऱ्या उत्पादनांना प्रत्येक बंदरांवर उतरवण्यास भारतानं बंदी घातली आहे

बांगलादेशातून तयार केलेले कपडे, अन्नपदार्थांची आयात भारतीय बंदरावरून करण्यास निर्बंध

प्लॅस्टिक, लाकडी फर्निचर आणि डाय यासारखी उत्पादनं आता मोजक्याच बंदरावर उतरवण्यात येणार

रेडीमेड गारमेंट्स आता केवळ मुंबईच्या न्हावा शेवा आणि  कोलकाता सी पोर्टच्या माध्यमातून भारतात येतील

परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून यासंदर्भातली अधिसूचना जारी

पाकिस्तानसारखा बांगलादेश देखील मागील काही वर्षांपासून भारताविरोधात कुरघोडी करताना दिसतोय. दरम्यान भारतानं दहशतवाद्यांवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर बांगलादेशनं पाकची बाजू घेतली होती. तसंच मुहम्मद युनूस यांनी चीनमध्ये जाऊन भारताविरोधात आगळीक केली. त्यामुळे पाकिस्तान आणि तुर्कीएसह बांगलादेशला देखील धडा शिकवणं गरजेचंच होतं.





Source link

Maharashtra Tourism : महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी आहे एकमेव समुद्र किनारा जो रात्रीच्या अंधारात चमकतो! पर्यटक करतात गर्दी

0
Maharashtra Tourism : महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी आहे एकमेव समुद्र किनारा जो रात्रीच्या अंधारात चमकतो! पर्यटक करतात गर्दी


Maharashtra Tourism : उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा अथंग समुद्र किनारी जायला कोणाला नाही आवडतं. महाराष्ट्राला अनेक समुद्रकिनारे लाभले आहेत. भारतातही अनेक असे समुद्रकिनारे आहेत, जे पर्यटकांना आकर्षित करतात. दूरवर पसरलेला समुद्रकिनारा आणि त्याची शांतता कायम आपल्याला आकर्षित करतात. समुद्रात फेसाळणाऱ्या लाटा, सरकणारी वाळू आणि थंडगार वारा जेव्हा अंगाला स्पर्श करतो तेव्हा एक सुखद अनुभव हा प्रत्येकाला हवा हवासा वाटतो. खरं तर अनुभव शब्दात मांडताना येणार नाही. पण तुम्ही कधी असा समुद्र किनारा पाहिला आहे का, जो रात्रीच्या अंधारात चमकतो. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, भारतात अशी 5 समुद्रकिनारे आहेत. त्यातील एक महाराष्ट्राला लाभला आहे. 

अद्भुत आणि आश्चर्यकारक असा समुद्र किनाऱ्यांमध्ये रात्रीच्या अंधारात चांदण्यांसारखे चमकणारे हे समुद्र किनारे भारतातील महाराष्ट्र, गोवा, पश्चिम बंगाल, केरळ, अंदमान- निकोबार या ठिकाणी आहेत. 

गोवा -पालोलेम बीच

गोवा नेहमीच पर्यटकांची पहिली पसंती राहिली असून इथल्या पालोलेम बीच अत्यंत वेगळा आणि अद्भुत आहे. रात्रीच्या वेळी लखलख चमकणारा हा समुद्रकिनारा एका अत्यंत सुंदर दृश्यासह मनाला वेगळाच आनंद देतो. त्यामुळे गोव्याला गेलात तर रात्रीच्या वेळी पालोलेम बीचचे निखळ सौंदर्य पहायला नक्की जा. 

पश्चिम बंगाल -मंदारमणी बीच

पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील मंदारमणी बीचसुद्धा रात्रीच्यावेळी ताऱ्याप्रमाणे चमकतो जे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. 

केरळ – वर्कला समुद्रकिनारा

केरळमधील वर्कला बीच ज्याला ‘पापनाशम बीच’ असेही म्हटलं जातं. हा भारतातील केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील वर्कला नगरपालिकेच्या वर्कला टाउनमध्ये आहे. हा समुद्रकिनारा देखील रात्रीच्या अंधारात चमचम करतो. 

अंदमान आणि निकोबार – राधानगरी बीच

अंदमान आणि निकोबार येथील हॅवलॉक बेटावर असणारा राधानगरी बीचसुद्धा रात्रीच्यावेळी चमकतो. मुख्य म्हणजे हा बीच रात्रीच्या काळोखात निळ्या आणि हिरव्या रंगाच्या रोषणाईने उजळल्यासारखा भासतो. 

महाराष्ट्र – मालवण समुद्र किनारा

महाराष्ट्रातील कोकणातील मालवण हे अत्यंत सुंदर आणि नयनरम्य असे ठिकाण आहे. जिथला समुद्रकिनारा पाहणे अत्यंत सुखद अनुभव देतो. खास करून मालवण समुद्र किनारा रात्रीच्या वेळी पाहणारा आयुष्यात ते दृश्य विसरू शकत नाही. कारण हा बीच रात्रीच्या अंधारात अगदी आकाशातील ताऱ्यांसारखा चमकतो. जे पाहणे फारच आल्हाददायी अनुभव मानला जातो. 

समुद्र किनाऱ्यांच्या चमकण्यामागील कारण तुम्हाला माहितीये का?

रात्रीच्या वेळी समुद्र किनारे चमकण्यामागे  एक वैज्ञानिक कारण आहे. ते म्हणजे ‘बायोल्युमिनेसेंट फायटोप्लँक्टन’. या समुद्रकिनारी तुम्ही बायोल्युमिनेसेन्सच्या विस्मयकारक घटनेचे साक्षीदार होऊ शकता. कारण या ठिकाणी बायोल्युमिनेसेंट फायटोप्लँक्टनची उपस्थिती असते. वर्षाच्या ठराविक काळात, बायोल्युमिनेसेंट फायटोप्लँक्टन लाटांच्या हालचालीवर प्रतिक्रिया देतात. ज्यामुळे हे समुद्रकिनारे रात्रीच्या वेळी चमकतात.





Source link

देशभक्तीचा जल्लोष… बल्लारपुरात भव्य तिरंगा रॅली

0
देशभक्तीचा जल्लोष… बल्लारपुरात भव्य तिरंगा रॅली



चंद्रपूर : भारताच्या सार्वभौमत्वासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलाने केलेली कामगिरी देशवासीयांसाठी अभिमानास्पद ठरली. या अद्वितीय शौर्याला आणि बलिदानाला अभिवादन करण्यासाठीच आजची तिरंगा रॅली आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. रविवारी आमदार मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ असा जयघोष करीत बल्लारपुर येथील काटा गेट येथून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई, बौद्ध बांधवांसोबतच हजारो नागरिक तिरंगा ध्वज घेवून सहभागी झाले होते.

काटा गेट येथून तिरंगा रॅलीला सुरुवात होण्यापूर्वी आमदार मुनगंटीवार यांनी मार्गदर्शन केले. भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान आहे. वीर जवानांना सॅलूट करण्यासाठी तथा सैनिकांच्या सन्मानासाठीच ही तिरंगा रॅली आहे. भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना बल्लारपुर येथील सैनिक शाळेतील शेकडो विद्यार्थी सैन्यात भरती होण्यास तयार होते, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

काटा गेट येथून सुरू झालेली ही तिरंगा रॅली नवीन बस स्थानक मार्गाने शहरात सर्वत्र फिरली. बल्लारपूर येथे यात्रेचा समारोप झाला. रॅलीत चंदनसिंग चंदेल, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, रामपाल सिंग, राजेंद्र गांधी, संध्या गुरनुले यांच्यासह विद्यार्थी, युवक, युवती, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक संस्था, विविध सामाजिक संघटना आणि सर्व राजकीय पक्ष, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.विविध धर्मगुरूंच्या उपस्थितीमुळे रॅलीत विविधतेत एकतेचे दर्शन घडले. देशासाठी लढणाऱ्या वीर जवानांना नमन करण्यासाठीच ही तिरंगा रॅली आहे, असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले. या रॅलीमुळे बल्लारपुरात देशभक्तीचे वातावरण तयार झाले होते. बल्लारपुरातील सर्वच संघटना या रॅलीत सहभागी झाल्याने रॅलीला भव्य स्वरूप प्राप्त झाले होते.

माजी सैनिक, धर्मगुरुंचा सत्कार

पांडुरंग हेमके, वीर पत्नी संगीताताई इंगळे, सहदेव रामटेके, माजी सैनिक विजय शेंडे, मनोज ठेंगणे, हवालदार वीर बहादुर सिंग, जगदीश सिंग, मनोज यादव, विश्वेश्वर सरोज, जन बहादुर सिंग सरोज, आदी माजी सैनिकांसह भंतेजी भागीरथ, अल्ताफ भाई, मनीष महाराज, सादिक जवेरी, सुनील पास्टर, दलजीत सिंह कलसी, आदी धर्मगुरुंचा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



Source link

पुढच्या 7 जन्मातही बायकोची ‘अशी’ मस्करी नाही करणार, VIDEO पाहून नवरदेवांना बसेल शॉक!

0
पुढच्या 7 जन्मातही बायकोची ‘अशी’ मस्करी नाही करणार, VIDEO पाहून नवरदेवांना बसेल शॉक!


Wedding Funny Viral Video: लग्न हा नवरदेव आणि नवरी या दोघांच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण असतो. हा क्षण साजरा करण्यासाठी आप्तेष्ट, नातेवाईक सर्व गोळा होतात. विधीप्रमाणे हा सोहळा पार पडतो. या सोहळ्यादरम्यान अनेक मजेशीर प्रसंग घडतात. लग्नाच्या विधींदरम्यान एक मजेदार आणि आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. होणाऱ्या बायकोला नवरदेव वरमाला घालताना मस्करीच्या मूडमध्ये होता. पण वधूला राग अनावर झाला आणि भलतंच काहीतरी घडलं. नवरदेवाला अशी अद्दल घडली की पुढच्या 7 जन्मात हीच पत्नी मिळाली तरी तो असं कृत्य पुन्हा करण्याचं धाडस करणार नाही.  

लग्न समारंभातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात खूप व्हायरल होतोय. ज्यात नवरी नवऱ्याच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करतेय. पण नवरदेव दरवेळी मागे हटतोय. मग रागाच्या भरात वधूने वराला लग्नसमारंभातच आपली ताकद दाखवून दिली. 

व्हायरल व्हिडिओची सगळीकडे चर्चा 

ही संपूर्ण घटना तिथे उपस्थित असलेल्या वऱ्हाड्यांसमोर घडली. लग्नात आलेल्या कोणीतरी हा प्रसंग आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. @me_sunitaa नावाच्या एका एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. व्हिडिओमध्ये नवरीचा राग आणि वराची फजिती स्पष्टपणे दिसतेय. वधूने वराला मारताच तिथे उपस्थित असलेले लोकदेखील पाहतच राहीले.

वधूची प्रतिक्रिया

सर्व लोकांच्यासमोर लग्नाच्या स्टेजवर नवरीने नवऱ्याला खाली पाडलं. वराला पाडल्यानंतर वधूची प्रतिक्रिया पाहून सर्व पाहुणे स्तब्ध झाले. ती रागाने काहीतरी बोलली आणि मग स्टेजवरून खाली आली. पाहुण्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होते. काही लोक तोंड धरुन हसत होते. तर काही लोक असं करायची काय गरज होती म्हणत वराला त्याच्या कृत्याबद्दल शिव्या देत होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वराला धडा मिळाला, असे लोकं म्हणतायत. 

लग्नाचा व्हिडिओ व्हायरल 

हा व्हायरल व्हिडिओ आता सर्वत्र चर्चेचा विषय बनलाय. लग्नासारख्या खास प्रसंगी वर असा खोडसाळपणा कसा करू शकतो याचे लोकांना आश्चर्य वाटतंय. लग्न समारंभात घडलेल्या या घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडालीय. या व्हिडिओवर यूजर्स मजेदार कमेंट्स करतायत. आणि वधूच्या धाडसाचे कौतुक करतायत.





Source link

वाहतुक पोलिसाला मारहाण

0
वाहतुक पोलिसाला मारहाण



ठाणे : भिवंडी येथील काल्हेर भागात वाहतुकीचे नियमन करणारे पोलीस हवालदार काशिनाथ राठोड यांच्यासह वाहतुक साहाय्यकांना (वाॅर्डन) मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.काल्हेर भागात शनिवारी सायंकाळी पोलीस हवालदार काशिनाथ राठोड हे वाहतुक साहाय्यक मोहन पाटील आणि विकास पाटील यांच्यासोबत वाहतुकीचे नियमन करत होते. त्याचवेळी मोटारीमधून आलेले तिघेजण मोहन आणि विकास यांच्यासोबत वाहतुकीच्या नियमानावरुन वाद घालू लागले. याबाबतची माहिती त्यांनी राठोड यांना दिली. त्यावेळी राठोड हे तिथे गेले.

राठोड हे त्यांना समजावत असताना त्यांनी पोलिसांचे मोबाईल चित्रीकरण सुरु केले. राठोड यांनीही मोबाईलमधून त्यांचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. ते तिघेही राठोड यांच्यासोबत वाद घालू लागले. त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यापैकी एकाने राठोड यांच्या पोलीस गणवेशाची काॅलर पकडून त्यांच्या डोळ्याखाली हाताने मारले. त्यानंतर त्याचे शर्टवर असलेले नामफलक आणि गणवेश फाडण्यास सुरुवात केली.

वाहतुक साहाय्यकांना देखील त्यांनी शिवीगाळ आणि मारहाण केली. या घटनेची माहिती वाहतुक पोलिसांच्या गस्ती पथकाला मिळाल्यानंतर ते त्या ठिकाणी आले. त्यांनी तिघांनाही ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले. त्यांच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

मोताळ्यात दुकानांना आग, लाखोंचे नुकसान

0
मोताळ्यात दुकानांना आग, लाखोंचे नुकसान


बुलढाणा: बुलढाणा मलकापूर राज्य मार्गावरील मोताळा नगरीतील तीन दुकानांना अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. शनिवारी, १७ मे रोजी मध्यरात्री लागलेल्या या आगीत तिन्ही दुकानांतील साहित्य जळून खाक झाले.

मोताळा येथील आठवडी बाजारात जय भवानी किराणा दुकान, जय इलेक्ट्रिकल या नावाची दुकानें आहेत. दोन्ही दुकानाना शनिवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या लागलेल्या आगीमूळे बाजूला असलेले हेअर सलूनला देखील आग लागली. या दुकानांमध्ये असलेल्या किराणा माल व विद्युत उपकरणे, साहित्याची अक्षरश राख रांगोळी झाली. किराणा दुकानाच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रिक दुकानाच्या मालकानेउन्हाळ्या निमित्त कुलर, पंखे आदिचा मोठा साठा ठेवला होता.या आगी मध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले.

दरम्यान मध्यरात्री नंतर आग आटोक्यात आणण्यासाठी बुलढाणा नगरपरिषद येथील अग्निशामक दल व मलकापूर नगरपरिषद चे अग्निशामक दल घटनास्थळी पाचरण करण्यात आले. बुलढाणा व मलकापूर येथील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल दोन तास अथक परिश्रम करून पाण्याचा मारा केला. दोन तासाच्या शर्थीच्या प्रयत्ना नंतर अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली. मोताळा नगरपंचायत असताना सुद्धा मोताळा नगरपंचायत ला अग्निशामक यंत्रणा नाही त्यामुळे बुलढाण्यावरुन तसेच मलकापूर वरुन अग्निशामक येण्यापर्यंत मोठ्या प्रमाणात दुकानातील मालाची अक्षरशः राख रांगोळी झाली होती आग लागल्यानंतर चाळीस मिनिटात या ठिकाणी अग्निशामक यंत्रणा दाखल झाली. मात्र तोपर्यंत आगीमुळे मोठे नुकसान झाले होते.

हेही वाचा
हेही वाचा

फायर ब्रिगेडच नाही!

मोताळा येथे अनेक वर्षांपासून नगरपंचायत कार्यरत आहे. मात्र असे असताना सुद्धा या ठिकाणी अग्निशामक दलच उपलब्ध नाही. याची सतत मागणी असताना असताना सुद्धा नगर पंचायत प्रशासन, अध्यक्ष वा सदस्य याची दखल घ्यायला वा त्यासाठी हालचाल करायला तयार नसल्याचे दुर्देवी व तितकेच चीड आणणारे चित्र आहे. जिल्हा व नगर विकास प्रशासन सुद्धा याकडे दुर्लक्ष करीत आहे.मात्र अद्याप या ठिकाणी अग्निशामक यंत्रणा मिळाली नाही.जर भविष्या जर भीषण आग लागली तर यापेक्षाही मोठे नुकसान होऊ शकते यात शंका नाही त्यामुळे मोताळा नगरपंचायतला अग्निशामक यंत्रना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता नागरिक करत आहे





Source link

भारताशी गद्दारी करणारी ज्योती पाकिस्तानींच्या संपर्कात कशी राहायची? 2 अ‍ॅप्स तर तुमच्याही मोबाईलमध्ये!

0
भारताशी गद्दारी करणारी ज्योती पाकिस्तानींच्या संपर्कात कशी राहायची? 2 अ‍ॅप्स तर तुमच्याही मोबाईलमध्ये!


Jyoti Malhotra Use Mobile Apps: हेरगिरीच्या आरोपाखाली हरियाणा पोलिसांनी युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक केली. भारताच्या लष्करी ऑपरेशन ऑपरेशन सिंदूरसह लष्कराशी संबंधित अनेक गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप तिच्यावर आहे. ज्योती मल्होत्रा ​​2023 चा व्हिसा मिळविण्यासाठी एका एजंटची मदत घेऊन पाकिस्तानला गेली. या भेटीदरम्यान तिची भेट नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिशशी झाली. 13 मे 2025 रोजी दानिशला पर्सना नॉन ग्राटा घोषित करण्यात आले आणि भारतातून हद्दपार करण्यात आले. रहीमच्या मदतीने ज्योती दोनदा पाकिस्तानला गेली आणि रहीमचा सहकारी अली एहवानशी तिची ओळख झाली. ज्योतीचा पाकिस्तानमधील राहण्याचा आणि प्रवासाचा खर्च त्यांनीच केला.

पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा निर्माण केल्याचा आरोप

दानिशने ज्योतीची ओळख अनेक पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी  म्हणजेच पाकिस्तान इंटेल ऑपरेटिव्ह-पीआयओ यांच्याशी करुन दिली होती. भारतीय ठिकाणांबद्दलची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आणि सोशल मीडियावर पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा निर्माण केल्याचा ज्योतीवर आरोप आहे. ज्योतीचे एका पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याशी जवळचे संबंध होते आणि ती त्याच्यासोबत इंडोनेशियातील बाली येथेही गेली होती, असेही तपासात पुढे आले आहे. पहलगाममधील भयानक हत्याकांडानंतर जेव्हा भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले तेव्हा ज्योती तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर ‘युद्धाला नकार द्या’ असे संदेश पोस्ट करत होती. एवढेच नव्हे तर आपल्या हालचालींवर संशय येऊ नये म्हणून तिने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि दानिशशी बोलण्यासाठी स्नॅपचॅट आणि टेलिग्रामचा वापर केला.

रहीमला अनेक वेळा भेटल्याची कबुली

ज्योती पाकिस्तानात पोहोचली आणि अली एहवानने तिची ओळख पाकिस्तानी संरक्षण आणि गुप्तचर अधिकाऱ्यांशी करून दिली. तिथे शकीर आणि राणा शाहबाज यांना भेटल्याचे ज्योतीन कबूल केले आहे. संशय येऊ नये म्हणून तिने शाकीरचा मोबाईल नंबर जाट रंधावा या नावाने सेव्ह केला. यानंतर मी भारतात आले आणि सोशल मीडियाद्वारे वरील सर्वांशी संपर्कात होते, असे ज्योतीने सांगितले. त्या सर्वांनी माझ्याकडे देशद्रोह करणारी माहिती मागितली, जी मी दिल्याचे ज्योतीने सांगितले. तसेच आपण रहीमला अनेक वेळा भेटल्याचेही ती म्हणाली. या भेटीदरम्यान एहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिशने ज्योतीचा मोबाईल नंबर घेतला आणि नंतर ते फोनवर बोलू लागले. मी दोनदा पाकिस्तानला गेली होती आणि एहसान-उर-रहीमच्या ओळखीच्या अली नावाच्या व्यक्तीने माझ्या पाकिस्तानातील प्रवासाची आणि राहण्याची व्यवस्था केल्याचे ज्योतीने पोलिसांना सांगितले. 

मोबाईल Apps च्या माध्यमातून संपर्कात

अलीने पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत माझी भेट घालून दिली. यानंतर तो शाकीर आणि राणा शाहबाज यांनाही भेटला. जेव्हा मी भारतात परतली तेव्हा व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट आणि टेलिग्रामद्वारे त्यांच्याशी संपर्कात राहिल्याचे ज्योतीने कबूल केले. या काळात ती पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिश यांनाही अनेक वेळा भेटल्याचे तपासात समोर आले.

 भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हा दाखल

हिसार पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये पोलिसांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. चौकशीदरम्यान ज्योती मल्होत्राने सांगितले की, ती 2023 मध्ये पाकिस्तानला भेट देण्यासाठी लागणारा व्हिसा मिळविण्यासाठी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेली होती. तिथे तिची भेट एहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिश नावाच्या व्यक्तीशी झाली.आता ज्योतीजींविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 152 आणि अधिकृत गुपिते कायदा 1923 च्या कलम 3,4,5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





Source link

राष्ट्रीय एकता व जवानांच्या सन्मानार्थ ठाण्यात आज “तिरंगा पदयात्रा”

0
राष्ट्रीय एकता व जवानांच्या सन्मानार्थ ठाण्यात आज “तिरंगा पदयात्रा”



“Tiranga Padyatra” in Thane today to celebrate national unity and honor the soldiers राष्ट्रीय एकता व जवानांच्या सन्मानार्थ ठाण्यात आज “तिरंगा पदयात्रा “





Source link

‘स्त्री २’चा जलवा, मिळाले तब्बल ‘इतके’ पुरस्कार! यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला…; वाचा विजेत्यांची यादी

0
‘स्त्री २’चा जलवा, मिळाले तब्बल ‘इतके’ पुरस्कार! यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला…; वाचा विजेत्यांची यादी



zee cine awards 2025 winners full list shraddha kapoor stree 2 wins maximum awards kartik aaryan wins best actor Zee Cine Awards 2025 : ‘स्त्री २’चा जलवा, मिळाले तब्बल ‘इतके’ पुरस्कार! यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला…; वाचा विजेत्यांची यादी





Source link