Sunday, July 12, 2026
Home Blog Page 246

सर्वपक्षीय शिष्टमंडळावरून मविआत गोंधळ, पवारांनी टोचले राऊतांचे कान

0
सर्वपक्षीय शिष्टमंडळावरून मविआत गोंधळ, पवारांनी टोचले राऊतांचे कान


Mahavikas Aghadi : सर्वपक्षीय शिष्टमंडळावरून मविआत गोंधळ निर्माण झाला आहे. शिष्टमंडळात केंद्रानं त्यांच्या नातेवाईकांचा समावेश केल्याची टीका राऊतांनी केली आहे. दरम्यान राऊतांच्या टीकेनंतर त्यांचेच सहकारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी राऊतांचे कान टोचले आहेत. 

ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानविरोधात भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय शिष्टमंडळाची घोषणा करण्यात आली. दरम्यान यावरून मविआत गोंधळ निर्माण झाला आहे. कारण शिष्टमंडळावरून मविआत दोन भूमिका पाहायला मिळतायत. केंद्र सरकारनं शिष्टमंडळात गोतावळ्यांना संधी दिल्याचं म्हणत राऊतांनी आक्षेप घेतलाय. तर दुसरीकडे राष्ट्रीय प्रश्नांमध्ये पक्षीय भूमिका घ्यायची नसते असं म्हणत शरद पवारांनी संजय राऊतांचे कान टोचले आहेत.

तर तिकडे  काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील केंद्र सरकाच्यचा भूमिकेवरून निशाणा साधलाय. नियमानुसार भाजपनं काँग्रेस पक्षाकडे सदस्याची नावं मागितली, मात्र, ऐनवेळी दिलेली नावं गाळून दुसऱ्या नेत्याचं नाव घेतल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं. तर तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेमधून पक्षाला न विचारताच प्रियंका चतुर्वेदींची निवड केली. 

काँग्रेसनं आनंद शर्मा, गौरव गोगोई, डॉ. सय्यद नसीर हुसेन आणि राजा ब्रार यांची नावं दिली होती मात्र, शिष्टमंडळात शशी थरूर यांना घेण्यात आलं आहे. 
पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर आता भारत पाकिस्तानवर डिप्लोमॅटिक स्ट्राईक करण्याच्या तयारीत आहे. जागतिक पातळीवर पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारताकडून नवा प्लॅन आखण्यात आलाय. देशातील सर्वपक्षीय नेत्यांचं एक शिष्टमंडळ आपली भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडणार आहेत.

शिष्टमंडळात कोणकोण?

शशी थरुर काँग्रेस खासदार, रविशंकर प्रसाद, भाजप खासदार, संजय कुमार झा, जेडीयू खासदार, बैजयंत पांडा, भाजप खासदार , कनिमोळी करुणानिधी, द्रमुक खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी (SP) खासदार आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या शिष्टमंडळानंतर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यावर आक्षेप घेतला आहे. मात्र, दुसरीकडे मविआमधील काही नेत्यांनी मात्र, शिष्टमंडळाचं स्वागत  केलंय त्यामुळे मविआत शिष्टमंडळावरून चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. 





Source link

ज्योती मल्होत्राने ‘ती’ चूक करुन स्वत:साठीच खणला खड्डा, ‘या’ कारणांमुळे बळावला संशय!

0
ज्योती मल्होत्राने ‘ती’ चूक करुन स्वत:साठीच खणला खड्डा, ‘या’ कारणांमुळे बळावला संशय!


Jyoti Malhotra: मागील अनेक दिवसांपासून ज्योती मल्होत्राच्या हालचालींवर गुप्तचर यंत्रणेचं लक्ष होतं. ती काय करते? कुठे जाते? कोणासोबत तिचे जास्त संपर्क आहेत अशा अनेक गोष्टीवर लक्ष ठेवलं जात होतं. तसंच ती मागील काही दिवसात कुठे गेली होती? यासंदर्भातली देखील माहिती घेतली.. आणि त्यानंतर ज्योतीला अटक करण्यात आली. दरम्यान अशी कोणती कारणं होती ज्यामुळे भारतीय तपास यंत्रणांचा ज्योतीवरील संशय बळावला होता? जाणून घेऊया.

कमी कमाई आणि लॅविश लाईफस्टाईल

भारताशी गद्दारी करत ज्योती मल्होत्रानं देशाची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली. त्यामुळे तिला अटक करण्यात आली असून तिची कसून चौकशी सुरूय..ज्योतीनं 2 वर्षात तिनदा केलेला पाकिस्तानचा दौरा आणि कमी इनकम असतांना तिती लॅवीश लाईफ अशा अनेक कारणांमुळे ती गुप्तचर यंत्रणांच्या टार्गेटवर आली होती..

कोणत्या कारणांमुळे ज्योतीवर संशय?

ज्योती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाकिस्तानचं गुणगाण गात असायची. ज्योती मल्होत्रा काही दिवसांपूर्वी बाली येथे गेली होती. ज्योती मल्होत्रा बालीला असताना तिच्यासोबत एक पाक अधिकारी होता. पाकिस्तानमध्ये असताना तिनं पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफशी संपर्क साधला होता. ज्योतीची दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाशी मैत्री होती. पाकिस्तानी लष्कर आणि उच्च अधिकाऱ्यांशी तिचे संपर्क होते. तसंच पाकिस्तान आणि चीनचा व्हिसा लगेच मिळत नाही. व्हिसा घेण्यासाठी मोठी प्रोसेस असते. पण ज्योती मल्होत्राला व्हिसाही लगेच मिळाला. याशिवाय ती लग्जरी जीवन जगत होती. या सर्व गोष्टींमुळे तपास यंत्रणांना ज्योतीवर संशय आला आणि ती रडारवर आली.

पाकिस्तानी अधिका-यांच्या संपर्कात 

पाकिस्तानचा दौ-यात तिची ज्या पाकिस्तानी अधिका-यासोबत ओळख होती. तो अधिकारी भारताच्या पाकिस्तानी उच्चालयात देखील होता. तसंच त्याच्यासोबतचे ज्योतीचे पाकिस्तानमधील फोटो देखील समोर आले आहेत. तसंच त्या पाकिस्तानी अधिका-याचा पहलगाम हल्ल्यानंतर एक केक घेऊन जातांनाचव्हिडिओ समोर आला होता. त्यामुळे पाकिस्तान ते दिल्लीपर्यंत पाकिस्तानी अधिका-यांच्या संपर्कात ज्योती मल्होत्रा होती.

पर्यटकांनाच दोषी ठरवलं 

यूट्यूबर गुप्तहेर ज्योती मल्होत्राचा नवा व्हिडिओ समोर आलाय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. या हल्ल्यानंतर ज्योती मल्होत्रानं या घटनेसाठी पर्यटकांनाच दोषी ठरवलं होतं. तसंच पहलगाम हल्ल्याच्या आधी ज्योतीनं पहलगाममध्ये गेल्याची देखील माहिती आहे.

विविध देशांचे दौरे

ज्योती मल्होत्रा ही हरियाणाच्या हिसारमध्ये राहत होती. कोरोना काळात तिनं तिचं यूट्यूब चॅनेल सुरू केलं. सुरुवाती ती स्थानिक व्हिडिओ अपलोड करत होती. मात्र, नंतर तिनं चीन, थायलंड, पाकिस्तान, भूतानचे दौरे केले.

कारागृहाच्या 4 भिंतीआड काढावं लागणार आयुष्य

ज्योती मल्होत्राला अटक केल्यानंतर तिचे एक-एक कारनामे आता समोर येऊ लागले आहेत. तिनं कशापद्धतीनं भारताविरोधात कट रचण्यात पाकिस्तानला मदत केली. पाकड्यांनी दिलेल्या पैशांवर ज्योती आतापर्यंत लॅवीश लाईफ जगली मात्र, आता कारागृहाच्या चार भिंतीआड गद्दार ज्योतीला आपलं आयुष्य काढावं लागणार यात शंका नाही.





Source link

काँग्रेसच्या तिरंगा फेरीत शहिदांना श्रद्धांजली

0
काँग्रेसच्या तिरंगा फेरीत शहिदांना श्रद्धांजली


नाशिक : भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ भाजप नेत्यांच्या पुढाकारातून निघालेल्या तिरंगा फेरीनंतर सोमवारी काँग्रेसने शहरात तिरंगा फेरी काढली. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नागरिक आणि दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत भारताचे जे जवान शहीद झाले, त्यांना नमन करून तसेच भारतीय लष्कराचे मनोबल उंचावण्यासाठी शहर काँग्रेसच्यावतीने तिरंगा फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी काँग्रेस भवन येथून शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश काँग्रेसचे सचिव राहुल दिवे, माजी नगरसेविका वत्सलाताई खैरे, उल्हास सातभाई, माजी सभागृह नेते राजेंद्र बागूल, शहर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर आदींच्या उपस्थितीत तिरंगा फेरीला सुरुवात करण्यात आली.

यावेळी पदाधिकाऱ्यांच्या हाती ए मेरे वतन के लोगो, जरा याद करो कुर्बानी, भारत माता की जय, भारतीय लष्कराचा विजय असो, अशा घोषणा लिहिलेले फलक होते. भारतीय लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी, कॅप्टन ह्युमिका सिंग यांच्या प्रतिमांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हुतात्मा स्मारक येथे स्मारकाला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. शहीद जवान आणि मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सेवा दलाच्यावतीने मानवंदना संचलन करण्यात आले.





Source link

विमानाच्या घिरट्या अन् अफवांचा बाजार! अखेर प्रशासनाने…

0
विमानाच्या घिरट्या अन् अफवांचा बाजार! अखेर प्रशासनाने…



rumors erupted in some villages in Morshi taluka today after an aircraft was seen hovering close to the ground विमानाच्या घिरट्या अन् अफवांचा बाजार! अखेर प्रशासनाने…





Source link

ऐश्वर्या व अविनाश नारकर पोहोचले विदेशात! ‘या’ प्रसिद्ध जागी दिली भेट; नेटकरी म्हणाले, “इथे ट्रेन…”

0
ऐश्वर्या व अविनाश नारकर पोहोचले विदेशात! ‘या’ प्रसिद्ध जागी दिली भेट; नेटकरी म्हणाले, “इथे ट्रेन…”



aishwarya and avinash narkar trip to hanoi train street shares video Video : ऐश्वर्या व अविनाश नारकर पोहोचले विदेशात! ‘या’ प्रसिद्ध जागी दिली भेट; नेटकरी म्हणाले, “इथे ट्रेन…”





Source link

IPL 2025: “भारतीय लष्कर क्षेपणास्रं डागत असताना माझे आई-वडील POK मध्ये होते”, KKR च्या खेळाडूचं कुटुंब थोडक्यात बचावलं

0
IPL 2025: “भारतीय लष्कर क्षेपणास्रं डागत असताना माझे आई-वडील POK मध्ये होते”, KKR च्या खेळाडूचं कुटुंब थोडक्यात बचावलं



भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आयपीएल २०२५ ला एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले होते. या स्थगितीनंतर आयपीएल २०२५ ला १७ मे पासून सुरूवात झाली आहे. पण आयपीएलमध्ये सहभागी झालेले सर्वच खेळाडू पुन्हा खेळण्यासाठी भारतात परतले नाहीत. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघातील एक खेळाडूही मैदानात परतला नाही. पण त्याने आयपीएलच्या स्थगितीदरम्यानचा प्रसंग सांगितला आहे की, जेव्हा दोन्ही देशांकडून मिसाईल्स डागली जात होती; तेव्हा त्याचे आई-वडिल पाकव्याप्त काश्मीरमध्ये होते.

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा अष्टपैलू मोईन अली हा अशा काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंपैकी एक आहे जो आयपीएल २०२५ पुन्हा सुरू झाल्यावर खेळण्यासाठी भारतात परतला नाही. मोईनने सांगितले की, आयपीएल २०२५ थांबण्यापूर्वीच तो भारताबाहेर गेला होता. जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण स्थिती होती, तेव्हा त्याचे आई-वडिल पाकव्याप्त काश्मीरमध्ये होते, तर त्याची पत्नी तो आणि मुलं भारतात होते.

मूळचा पाकिस्तानचा असलेला मोईन अली हा इंग्लंडकडून क्रिकेट खेळतो. मोईन अली बियर्ड बिफोर विकेट पॉडकास्टमध्ये भारत-पाक स्थितीबद्दल बोलताना म्हणाला, “माझे आई-वडिल त्यावेळी काश्मीरमध्ये पाकिस्तानमध्ये (POK) होते. कदाचित जिथे हल्ले झाले तिथून फक्त एक तासाच्या अंतरावर होते. त्यामुळे परिस्थिती थोडी चिंताजनक होती. त्या दिवशी त्यांना कशीतरी एकमेव फ्लाईट मिळाली. ते तिथून बाहेर पडले याचा मला आनंद आहे, पण ती परिस्थिती भयंकर होती.”

मोईन अली पुढे म्हणाला, “लोकांना काय चाललंय आणि नेमकी परिस्थिती कशी आहे हे पूर्णपणे कळत नव्हतं. मी बऱ्याच लोकांशी बोललो. काही लोक म्हणत होते की ‘युद्ध होणार नाही, सर्व काही ठीक होईल. अशा गोष्टी यापूर्वीही घडल्या आहेत’. काही लोक म्हणत होते की, ‘मला वाटतं की युद्ध होईल, मला वाटतं की बदला घेतला जाईल किंवा तुम्ही त्याला जे काही म्हणू इच्छिता ते होईल’. सगळीकडे खोट्या बातम्या पसरत होत्या, विशेषतः वृत्तसंस्थांवर आणि पत्रकारांवर विश्वास ठेवणं कठीण होतं.

पुढे मोईन अली म्हणाला, तुम्हाला नेमकं काय चाललंय हे माहित नाही. त्यामुळे हे प्रचंड भयानक होतं, कारण तुम्ही नेमकं कुठे आहात, काय चाललंय, सगळं कधी सुरळीत होईल याबद्दल काहीच कल्पना नव्हती. आम्हाला ज्या गोष्टीची चिंता होती ती म्हणजे विमाने रद्द होतील आणि आम्ही बाहेर पडू शकणार नाही. पण स्थानिक खेळाडू किंवा तिथे अडकलेल्या पाकिस्तानी किंवा भारतीय खेळाडूंना काय होणार आहे हे माहित नव्हतं जी अधिक कठीण परिस्थिती होती.”

आयपीएल एक आठवडा पुढे ढकलण्यापूर्वीच पाकिस्तानी वंशाच्या मोईन अलीने भारत सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. तो म्हणाला, “पंजाब-दिल्ली सामना रद्द होण्याच्या आदल्या रात्री मी भारत सोडण्याचा निर्णय या कारणामुळेच केला. मी अशा लोकांपैकी एक आहे ज्यांना आपण आयपीएल खेळत आहोत की पीएसएल खेळत आहोत याची पर्वा नाही. सर्वात महत्त्वाचं काय आहे तर सुरक्षित राहणं किंवा मग जितकं शक्य आहे तितकं सुरक्षित राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

मोईन पुढे म्हणाला, “माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जगात कुठेही सुरक्षित नाही आहात. पण तुमच्या कुटुंबाला आणि मुलांना शक्य तितकं सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न आपण करत असतो. खरं सांगायचे तर, स्पर्धा पुढे ढकलण्यापूर्वी मी स्पर्धेतून बाहेर पडलो होतो. प्रामाणिकपणे सांगू तर मला बरं वाटतं नव्हतं. त्यावेळी मी खूप आजारी होतो. मला वायरल किंवा काहीतरी त्रास होत होता.”



Source link

‘भारत काही धर्मशाळा नाही, की जगभरातील सर्वांना…’; सर्वोच्च न्यायालयाने का केली एवढी मोठी टिप्पणी?

0
‘भारत काही धर्मशाळा नाही, की जगभरातील सर्वांना…’; सर्वोच्च न्यायालयाने का केली एवढी मोठी टिप्पणी?


Supreme Court on Sri Lankan Refugee : पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. भारतात राहणाऱ्या पाकिस्तान, बांगलादेशी या लोकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. भारतात गेल्या अनेक वर्षांपासून बांगलादेश आणि श्रीलंकामधून अवैधरित्या लोक भारतात येतात. त्यानंतर ते भारताचे नागरिकत्व मागतात. अशात एका श्रीलंकामधील नागरिकाच्या याचिकेवर सुनावणे करताना निर्वासितांनाच्या मुद्दावर सर्वोच्च न्यायालयाने मोठी टीप्पणी केली आहे. 

निर्वासितांच्या मुद्दावर सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात सुनावणी करताना म्हटलं की, जगभरातील निर्वासितांना भारतात आश्रय का द्यायचा ? भारत काही धर्मशाळा नाही”. “आपण 140 कोटी लोकांसोबत लढत आहोत, त्यामुळं कुठूनही येणाऱ्या निर्वासितांना आश्रय देऊ शकत नाही.” त्यासोबत श्रीलंकेतून आलेल्या तमिळ निर्वासितांच्या ताब्यात घेण्याच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास कोर्टाने नकार दिला आहे. या निर्वासित व्यक्तीच्या जीवाला श्रीलंकेत धोका असल्याने त्याला भारतात राहण्याची परवानगी द्यावी अशी विनंती याचीकर्त्यांच्या वकिलाने सुप्रीम कोर्टाला केली होती. 

या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, “तुम्हाला इथं स्थायिक होण्याचा काय अधिकार आहे ? स्वतःच्या देशात तुमचा जीव धोक्यात असेल तर दुसऱ्या देशात जा”, सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलाला खडसावलं. 

काय आहे नेमकं प्रकरण?

सर्वोच्च न्यायालायत एका निर्वासित व्यक्तीने याचिका केली होती. याचिकाकर्त्यांच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयाला अशी विनंती केली होती की, निर्वासित व्यक्तीच्या जीवाला श्रीलंकेत धोका आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला भारतात राहण्यास परवानगी द्यावी. ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या खंडपीठापुढे झाली. याचिकाकार्ता हा श्रीलंकन तमिळ असून तो व्हिसा घेऊन भारतात आला होता. 

हा श्रीलंकेच्या तमिळ नागरिकाला 2015 मध्ये लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) शी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली होती. एलटीटीई ही पूर्वी श्रीलंकेत सक्रिय असलेली एक दहशतवादी संघटना होती. 2018 मध्ये, कनिष्ठ न्यायालयाने त्याला बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 2022 मध्ये, मद्रास उच्च न्यायालयाने ही शिक्षा सात वर्षांपर्यंत वाढवत म्हटलं की शिक्षा पूर्ण झाल्यानंतर, त्याला देश सोडून जावे लागेल आणि हद्दपारीपूर्वी निर्वासित छावणीत राहावे लागणार आहे. त्याची आता शिक्षा पूर्ण झाल्यामुळे तो श्रीलंकेत परत जाऊ शकत नाही म्हणून त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. 





Source link

Robert Kiyosaki : “अध:पतन सुरु झालंय, सोनं, चांदी आणि….”; ‘रिच डॅड पूअर डॅड’च्या लेखकाचा इशारा काय?

0
Robert Kiyosaki : “अध:पतन सुरु झालंय, सोनं, चांदी आणि….”; ‘रिच डॅड पूअर डॅड’च्या लेखकाचा इशारा काय?



Robert Kiyosaki Warns Big Financial Crisis Ahead Say Bail Yourself out Advices People to ditch Fake Fiat Money |”अध:पतन सुरु झालंय, सोनं, चांदी आणि….”; ‘रिच डॅड पूअर डॅड’च्या लेखकाचा इशारा काय?





Source link

अधिकाऱ्यांना न्यायसंस्थेचा राग आहे का? सरन्यायाधीश गवई यांनी प्रोटकॉलचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर काँग्रेसचा सवाल

0
अधिकाऱ्यांना न्यायसंस्थेचा राग आहे का? सरन्यायाधीश गवई यांनी प्रोटकॉलचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर काँग्रेसचा सवाल



Are the officers angry with the judiciary? Congress questions after Chief Justice Gavai raises the issue of protocol अधिकाऱ्यांना न्यायसंस्थेचा राग आहे का? सरन्यायाधीश गवई यांनी प्रोटकॉलचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर काँग्रेसचा सवाल





Source link

11 दिवसांनी समोर आलं इंजिनीअर निखिलच्या मृत्यूचं कारण; ऐकून ऑफिस कर्मचाऱ्यांना बसेल धक्का!

0
11 दिवसांनी समोर आलं इंजिनीअर निखिलच्या मृत्यूचं कारण; ऐकून ऑफिस कर्मचाऱ्यांना बसेल धक्का!


Krutrim Techie Nikhil Somwanshi: कर्नाटकातील बेंगळुरू येथील आगरा तलावात 2 आठवड्यांपूर्वी एका एआय फर्ममधील 25 वर्षीय मशीन लर्निंग इंजिनिअरचा मृतदेह आढळला होता. खराब वर्क कल्चर आणि मॅनेजमेंटकडून होणारे टॉर्चर यामुळे इंजिनीअरने आत्महत्या केल्याचा आरोप फर्मच्या एका कर्मचाऱ्याने केलाय. 8 मे रोजी इंजिनीअर निखिल सोमवंशीचा मृतदेह तलावात आढळला आणि या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. 

निखिल सोमवंशीने बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) येथून पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. यानंतर गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये तो राइड-हेलिंग अॅप ओलाच्या एआय कंपनी क्रुट्रिममध्ये मशीन लर्निंग इंजिनिअर म्हणून रुजू झाला. सोमवंशी खूप हुशार विद्यार्थी होता. त्यामुळे त्याचे प्लेसमेंट देखील 9.30 GPA सह झाले. असे असतानाही कंपनीत अधिक जबाबदाऱ्यांचा भार त्याच्यावर होता, असा आरोप कंपनीवर करण्यात आलाय. 

ऑफिसमध्ये टॉक्सिक कल्चर 

कंपनीचे अमेरिकास्थित व्यवस्थापक राजकिरण पानुगंती यांच्यावर एका व्यक्तीने आरोप केलाय. पानुगंती दररोज नवीन कर्मचाऱ्यांसोबत आक्षेपार्ह भाषा वापरतात. त्यांनी ऑफिसमध्ये टॉक्सिक कल्चर निर्माण केलंय, ज्यामुळे अनेक टीम मेंबर्सनी राजीनामा दिलाय. क्रुट्रिम कंपनीच्या प्रवक्त्यानेही यावर आपले स्पष्टीकरण दिलंय. कंपनीच्या या नुकसानीमुळे आम्हालाही दुःख झाले आहे. आम्ही एक कष्टाळू कर्मचारी गमावला आहे. मृत्यू झाला त्यादिवशी निखिल सोमवंशी रजेवर असल्याचेही  त्यांनी यावेळी सांगितले.

मॅनेजरवर गंभीर आरोप

कंपनीने ईमेलद्वारे सांगितले की,  ‘निखिलने 8 एप्रिल रोजी त्याच्या मॅनेजरशी संपर्क साधला आणि त्याला विश्रांतीची आवश्यकता असल्याचे सांगितले. यानंतर निखलला ताबडतोब रजा मंजूर करण्यात आली. नंतर 17 एप्रिल रोजी तो ऑफिसमध्ये आला. पण त्याची तब्येत अजूनही ठीक नव्हती. त्यामुळे त्याची रजाही वाढविण्यात आली.’ पण निखिलच्या मृत्यूची माहिती दिल्यानंतरही मॅनेजर कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करत राहिल्याचा आरोप एका कर्मचाऱ्याने केलाय.

कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक

कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर बरीच महत्वाची माहिती दिली. कंपनीच्या मॅनेजरची प्रतिमा बऱ्याच काळापासून अशीच आहे. तो अनेकदा ज्युनिअर कर्मचाऱ्यांना तुच्छ लेखायचा आणि त्यांना निरुपयोगी ठरवायचा. समोर आलेल्या अहवालानुसार क्रुट्रिमच्या एका माजी कर्मचाऱ्याने मॅनेजरवरील आरोपांना दुजोरा दिला. ‘कामाच्या दबावामुळे मीदेखील दुसरी नोकरी मिळण्यापूर्वीच राजीनामा दिला होता. माझ्या मनातही आत्महत्या करण्याचा विचार आला होता, असेही त्याने सांगितले. ‘तो कर्मचाऱ्यांवर ओरडतो. त्याच्याकडे व्यवस्थापन कौशल्य अजिबात नाही. तो बैठकांमध्येही कर्मचाऱ्यांशी वाईट वागायचा’, असे मॅनेजर राजकिरण पानुगंटी यांच्यासोबत काम केलेल्या आणखी एका कर्मचाऱ्या सांगितले.





Source link