Sunday, July 12, 2026
Home Blog Page 240

शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीतील सराईत अटकेत

0
शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीतील सराईत अटकेत



पुणे : गुंड शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या सराइताला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह दोन काडतुसे जप्त करण्यात आली.

ओंकार सचिन माेरे (वय २३, रा. मुठा काॅलनी, कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शरद मोहोळ याचा ५ जानेवारी २०२४ सुतारदरा परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस कर्मचारी उज्ज्वल मोकाशी, शंकर कुंभार हे कोथरूड भागातील सुतारदरा भागात सोमवारी गस्त घालत होते. त्या वेळी मोहोळचा साथीदार ओंकार मोरे याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असून, तो शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मोकाशी आणि कुंभार यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे सापडली.

गुन्हे शाखेचे पोलीस निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक नितीन कांबळे, संजय जाधव, उज्ज्वल मोकाशी, शंकर कुंभार, शंकर नेवसे, विजयकुमार पवार, नागनाथ राख, ओंकार कुंभार, हनुमंत कांबळे यांनी ही कामगिरी केली.

जानेवारी महिन्यात मोहाेळच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असलेले शरद शिवाजी मालपोटे (वय २९), संदेश लहू कडू (वय २४, दोघे रा. कोथरूड) यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून दोन पिस्तुलांसह काडतुसे जप्त करण्यात आली होती.

मोहोळ खून प्रकरणात ‘मकोका’ कारवाई

वर्चस्वाच्या वादातून गणेश मारणे टोळीने शरद माेहोळ याचा खून केल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार, गणेश मारणे, साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे यांच्यासह साथीदारांना अटक करण्यात आली होती. मोहोळ खून प्रकरणात १६ जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली होती.



Source link

विश्वाबद्दलच्या कल्पना आणि प्रयोग…

0
विश्वाबद्दलच्या कल्पना आणि प्रयोग…



‘बिग बँग थिअरी’नुसार विश्वाचे वय साधारणत: १३-१४ अब्ज वर्षे इतके आहे. हा सिद्धान्त बरोबर नाही असे आम्हाला वाटते. ते सिद्ध करायला पुरावा म्हणजे अशी वस्तू शोधून काढणे जिचे वय विश्वाच्या वयापेक्षा जास्त आहे. आम्ही काही अशा ताऱ्यांच्या शोधात आहोत ज्यांचे वय विश्वाच्या वयापेक्षाही जास्त आहे. या संशोधनात आम्ही चौघे आहोत- मी, माझा आयुकातील सहकारी विजय मोहन, एक ऑस्ट्रेलियातील प्रोफेसर आणि एक ‘इसो’ म्हणजे युरोपियन सदर्न ऑब्झर्वेटरीमधील आहे. आम्ही अशा ताऱ्यांच्या शोधात आहोत, ज्यांचे वय २० अब्ज वर्षे आहे. म्हणजे १३-१४ अब्जांपेक्षा नक्कीच जास्त! ते कसे मिळतील. तर आपल्या आकाशगंगेच्या काठावरती एक लहानशी आकाशगंगा आहे, त्याला ‘लार्ज मॅजेलानिक क्लाऊड’ म्हणतात. मॅजेलान नावाचा जगप्रवासी होता, त्याला दक्षिण गोलार्धातून प्रवास करताना हे ढग दिसले, त्यावरून या ढगांना असे म्हटले जाते. त्यातला जो मोठा ढग आहे, तिथे आम्हाला असे तारकासमूह दिसले, ज्यांचे वय २० अब्ज आहे, असे प्राथमिकदृष्ट्या वाटते. परंतु, ते सिद्ध केले तरच त्याला महत्त्व आहे. कारण तुम्ही प्रस्थापित सिद्धान्ताला छेद देता तेव्हा तुमचा पुरावासुद्धा भक्कम असायला हवा. या नव्या मांडणीतील आमच्या दृष्टीने आम्ही सर्व पळवाटा बंद केल्या आहेत. परंतु, जेव्हा हा सिद्धान्त प्रकाशित करण्यासाठी पाठवला तेव्हा एका रेफरीने, अमुक एक पळवाट तुम्ही अजून रोखू शकला नाही. त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का, असे म्हटले. त्यामुळे याबाबत आम्हाला आणखी काही निरीक्षणे करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

अशी एक कल्पना आहे की, या विश्वाची निर्मिती कधी झालीच नाही. ते सतत, अनादी-अनंत म्हणतात तसे आहे. आणि त्यामध्ये एक नवीन वस्तूंची निर्मिती सतत होत असते. त्यातून ठरावीक तारे तयार होतात. काही काळानंतर त्यांचा नाश होतो. असे हे विश्व आहे. अशा विश्वात तुम्हाला कितीही वय घेतले तरी, त्या वयाचे तारे सापडायला हवेत. काही लोक अनेक विश्वांची कल्पना मांडतात. पण माझ्या मते तुम्हाला तुमच्या निरीक्षणातून आणि एकंदरातून जे विश्व गवसते, तेच एकमेव विश्व आहे. त्याच्या पलीकडचे विश्व हे ‘कम्प्लीटली इमॅजनरी’ आहे. त्याला शास्त्रीय पुरावा असा दिसत नाही.

‘विश्वात जीवसृष्टी सर्वत्र आहे आणि सूक्ष्म जीवांचा वर्षाव पृथ्वीवर होत असतो’ अशी कल्पनाही दोघा शास्त्रज्ञांनी मांडली आहे. असा वर्षाव होण्याची पद्धत किंवा त्याचे माध्यम असते धूमकेतू! त्यांच्या शेपटीवरून प्रवास करून सूक्ष्मजीव लांबून येतात. त्या शेपटाचे आपल्या वायुमंडळाशी घर्षण झाले की त्यातले काही जीव आपल्या वायुमंडळावर येतात. मग गुरुत्वाकर्षणाने ते खाली उतरतात आणि पृथ्वीवर पोहोचतात. त्यांना आपण कसे शोधू शकतो? – म्हणून आम्ही असा विचार केला की एक मोठा ‘पे लोड’ त्यात अनेक सिलेंडर्स निर्वात, निर्जंतुक करून सील करायचे आणि वर (पृथ्वीच्या स्थिरावरणापर्यंत) पाठवायचे. मग ठरावीक उंचीवर एकेक सिलेंडर उघडायचा आणि त्यात आसपासची हवा असेल ती घ्यायची. अशा प्रकारे वेगवेगळ्या टप्प्यांवरची सँपल खाली आणली. एकूण ४१ किलोमीटर उंचीपर्यंत आम्ही जाऊ शकलो. तुम्ही म्हणाल, या ४१ आकड्यामध्ये विशेष काही आहे का? एवढेच की, इतक्या उंचीपर्यंत नेला जाणारा स्वस्त बलून आम्हाला मिळत होता. त्याच्या दुप्पट-तिप्पट पैसे खर्च केले असते तर आणखी मोठा बलून मिळाला असता, पण तो आणखी ३-४ किलोमीटर वर गेला असता. म्हणजे फारसा फायदा झाला नसता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे- तुम्ही खूप वर जाऊन सँपल गोळा करायचे म्हटलात तर तिथे हवा इतकी विरळ असते की तिथे आपल्याला काही मिळत नाही. तिथे बलून टिकून राहू शकत नाही. उलट, जमिनीपासून दहा किलोमीटरपर्यंतचे सँपल गोळा करायचे तर एक प्रश्न असतो- कन्टॅमिनेशनचा. जमिनीवरून वर गेलेले ऑरगॅनिझम त्या उंचीवर जातात. त्यामुळे अशा उंचीवर गेले पाहिजे जिथे पृथ्वीवरील जीव पोहोचणार नाहीत आणि हवाही तितकी विरळ नसेल. या दृष्टीने आम्ही ही उंची निवडली. सन २००१ आणि २००५ मध्ये असे दोन प्रयोग केले. दोन्हीमधून आम्हाला बॅक्टेरिया मिळाले आहेत. २००५ साली आम्हाला जास्त माहिती मिळू शकली. त्यात असे बॅक्टेरिया मिळाले, ज्यांची पृथ्वीवर अजून नोंद नव्हती. हे केल्यावर असा प्रश्न येतो की हे बॅक्टेरिया ४१ किलोमीटर उंचीवर कसे आले? तुम्हाला जर बाहेरून येणाऱ्या जीवसृष्टीचा सिद्धान्त आवडत नाही, सर्व काही पृथ्वीवरच निर्माण झाले पाहिजे असा जर तुमचा आग्रह असेल तर तुम्ही आम्हाला अशी पद्धत सांगा- ज्यायोगे हे बॅक्टोरिया ४१ किलोमीटरपर्यंत वर जातील. ज्वालामुखीच्या उद्रेकानेसुद्धा वस्तू २७-२८ किलोमीटरपर्यंत वर जातात. त्यांना ४१ किलोमीटरपर्यंत नेणारा मार्ग अजून आम्हाला तरी माहीत नाही. तुम्हाला तो मार्ग माहीत असेल तर तो सांगा. मात्र दुसरी गोष्ट म्हणजे आता पॉझिटिव्हली सिद्ध करायचे असेल की ते बॅक्टेरिया बाहेरचे आहेत, तर त्यांचे आणखी विश्लेेषण करायला लागते. अशी कल्पना करू या की आपल्यात असलेला कार्बन साधा कार्बन आहे. ‘कार्बन १४’ आहे तो वेगळा ‘आयसोटोप’ असतो. त्याचे प्रमाण किती असायला पाहिजे त्यावरून आपण सांगू शकतो ही वस्तू पृथ्वीवरची आहे की बाहेरची. तशा प्रकारचे विश्लेषण करता यावे, म्हणून पुढच्या बलून फ्लाईटसाठी आम्ही ‘इस्रो’कडे प्रस्ताव पाठवला आहे आणि त्यांनी तत्त्वत: समर्थन केले आहे.

पृथ्वीवर इतके पाणी आले कुठून, याबाबत सध्याच्या थिअरीज थोड्या ‘स्पेक्युलेटिव्ह’ आहेत. पाण्याचे प्रमाण पृथ्वीवर पुष्कळ आहे, जरी आपल्या दैनंदिन जीवनात ते आपण दुर्मीळ म्हणत असलो तरी! ज्या पद्धतीने ते आले त्याचे वर्णन करताना ते इतक्या प्रमाणात कसे आले, हे सांगणेही आवश्यक आहे. अजून तसे ‘एक्स्प्लनेशन’ कुणी दिले आहे असे मला वाटत नाही.

फलज्योतिषाचे यश किती?

माझा फलज्योतिषाविषयीचा अनुभव तुम्हाला सांगतो : आम्ही तीनचार लोकांनी मिळून एक प्रयोग केला होता- फलज्योतिषात भाकीत करण्याची शक्ती आहे का, हे तपासण्यासाठी! शंभर हुशार विद्यार्थी आणि शंभर मतिमंद विद्यार्थी यांच्या कुंडल्या जन्मावरून तयार करून घेतल्या. त्यांचं रॅण्डमायझेशन करून ४०/४० चे गट बनविले आणि फलज्योतिषांना आवाहन केले की, आम्ही तुम्हाला ४० चा एक सेट देऊ. त्यात काही मतिमंद आहेत, तर काही हुशार आहेत. ते कोणते हे आम्हाला माहीत आहे. त्यांची कुंडली पाहून तुम्हाला त्यातून, कोण मतिमंद व कोण हुशार हे शोधून काढायचे आहे. चाळीसपैकी किती उत्तरे बरोबर आली तर हे शास्त्र खरे समजायचे, हेही सांगितले. संख्याशास्त्राच्या निकषांनुसार ४० पैकी २८ बरोबर आले तर ते खरे मानायचे. पण ज्यांनी भाग घेतला त्यांच्यापैकी अॅव्हरेज परफॉर्मन्स हा १८ होता- निम्मासुद्धा नाही! आणि ज्यांचे अनेक अंदाज बरोबर आले त्यांचा २४ होता. म्हणजे २८ या पासिंग मार्क्सच्या सर्वचजण खाली होते. एका फलज्योतिषाच्या संस्थेनेही यात भाग घेतला होता. त्यांना २०० पत्रिका दिल्या. त्यांना सांगितले की, ११८ बरोबर यायला हव्यात. पण त्यांचेही केवळ १०२ इतकेच बरोबर आले. तेही निम्म्याच्या जवळपासच होते. १०० तर नुसत्या ‘चान्स’नेही बरोबर येऊ शकतात. हे झाल्यावर आमचा निष्कर्ष असा निघाला की, ज्योतिषाची भाकीत करण्याची क्षमता ‘कॉईन टॉसिंग’एवढीही नाही. त्यावर काही फलज्योतषांनी आक्षेप घेतला की यात भाग घेणारे खरे फलज्योतिषी नव्हते. पण सबंध संस्थेने भाग घेतला त्याचे काय? ते सर्व तुम्ही बाद करणार का? एखाददोन फलज्योतिषांनी एवढेही म्हटले की, आमचे १८ बरोबर आले असतील, तर तुम्ही आम्हाला तसे सर्टिफिकेट द्या. ते तेवढ्यावर समाधानी होते.

एकंदर सायकिअॅट्रिस्ट लोकांचा धंदा परदेशात जितका चालतो, तितका इथे चालत नाही; इथे ज्योतिषांचा चालतो. त्यामुळे असेही म्हणतात की, चांगलेे ज्योतिषी – म्हणजे सक्सेसफुल ज्योतिषी- बरेच वेळा चांगले सायकिअॅट्रिस्ट असतात. त्यांना लगेच कळतं- लोकांना काय सांगितलं की बरं वाटेल.

वैज्ञानिक प्रगतीने मानवी प्रश्न सुटतीलच असे नाही…

विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती चारही दिशांना होते आहे, तरी आजची तरुण पिढी आमच्यापेक्षा अधिक अंधश्रद्ध आहे. याचं कारण- कोणत्याही गोष्टीचे कारण शोधणे ही विज्ञानाची शिकवण असते, आपणच विचारायचं असं का होतं- एकंदर जीवन अधिक ‘कॉम्प्लिकेटेड’ झालंय. अनेक निर्णय अनेक वेळी तुम्हाला घ्यायचे असतात. अशा वेळी तुमची मानसिकता तेवढी सक्षम नसली तर तुम्हाला वाटतं, कोणता निर्णय घ्यावा हे कोणीतरी आम्हाला सांगावं. मग तुम्ही वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करता. साधूबाबांकडे जाता किंवा फलज्योतिषी किंवा वास्तुशास्त्र यांचा आधार घेता. अशा प्रकारचे अंधविश्वास जास्त वाढत गेले, त्याचे कारण या पिढीपुढे असलेले प्रश्न वाढत गेलेत. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बाजूने बोलणारे फारसे राजकीय नेते नसतात असे मी दाखवून देत असतो. आता खेदाने तशी स्थिती आहे असे म्हणावे लागते. त्यावर ओव्हरनाइट उपाय आहे असे वाटत नाही. लोकशिक्षण आणि मुलांमध्ये शिक्षण देऊन त्यांच्यात विज्ञान-तंत्रज्ञानाचं महत्त्व रुजवलं तर ती मोठी झाल्यावर जास्त महत्त्व देतील असं म्हणायचं.

एखादी गोष्ट आपण मुद्दाम दाबून दूर होणार नसते. ते पटवून दिले पाहिजे. काही लोकांवर याचा प्रभाव पडतो, काही ते ऐकून सोडून देतात. मला जी पत्रं येतात त्यातून जाणवतं की, थोडा तरी प्रभाव पडतो.

मार्क चांगले मिळाले, तरी …

शालेय पातळीवरल्या विज्ञान शिक्षणाच्या बाबतीत असं म्हणता येईल की तो विषय तुम्ही समजावून सांगितला पाहिजे, तो पाठ करून येत नाही. परंतु, आपली शिक्षणाची आणि परीक्षेची पद्धती अशी आहे की एखादा पोर्शन पाठ करून जसाच्या तसा लिहिला की बरोबर, नाहीतर नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय खरोखर समजत नाही, त्यातील खुबी कळत नाहीत. मार्क चांगले मिळाले, तरी त्यांना तो विषय समजला की नाही याबद्दल मला शंका वाटते. कारण पाठ करून उत्तर दिलं जातं. मला असं वाटतं की, विज्ञान आणि गणित निदान पहिल्या काही इयत्तांसाठी मातृभाषेतून शिकवायला पाहिजे. इथं मराठी, उत्तर भारतात हिंदी. मी स्वत: हिंदीमधून दहावीपर्यंत शिकलो. मला काही त्यामुळे इन्फिरिऑरिटी वाटत नाही किंवा मला कमी दर्जाचं शिक्षण मिळालं असंही नाही. चांगले शिक्षक असतील तर सर्व व्यवस्थित होतं. पण आज आपल्याकडे परिस्थिती अशी की, नवी मराठी शाळा उघडण्यासाठी फार त्रास होतो!

(डॉ. जयंत व मंगला नारळीकर यांच्याशी ‘लोकसत्ता’च्या संपादकीय विभागातील सहकाऱ्यांच्या संवादाचा ‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’ हा उपक्रम ऑगस्ट २०११ मध्ये पार पडला, त्या प्रश्नोत्तरांतून जयंत नारळीकरांनी व्यक्त केलेल्या विचारांचा हा संपादित अंश.)



Source link

Loksatta editorial on jayant narlikar passed away who contribution in the field of science and research

0
Loksatta editorial on jayant narlikar passed away who contribution in the field of science and research


मराठी सारस्वताच्या अंगणात जयंत नारळीकर यांचे आगमन झाले तेव्हा आपले साहित्य विश्व हे गद्या-पद्या, कथा-लघुकथा, समीक्षा- रूपवादी समीक्षा इत्यादींत रममाण होते. आपल्या साहित्यविश्वापासून विज्ञान तसे दूर. विज्ञान, अर्थादी विषयांस ललित क्षेत्राने गावकुसाबाहेर रोखलेले. वास्तविक केरूनाना छत्रे यांच्यापासून ‘इंडियाज एडिसन’ असे गौरवले गेलेले शंकर आबाजी थत्ते ते विमानउड्डाणाचे स्वप्न पाहणारे तळपदे इत्यादी अनेक मराठीच. परंतु मराठी जनांच्या रक्तात विज्ञानवृत्तीचा अभाव असावा. अन्यथा ‘वैदिक गणित’ या संकल्पनेस हात घालणारे, रामायण-महाभारताचा काळ शोधू पाहणारे बळवंतराव ‘गीतारहस्या’साठीच अधिक ओळखले जाते ना. या अशा विज्ञानांधारी वातावरणात जयंत नारळीकर यांचे येणे हा प्रकाशमान सूर्योदय होता. घरातून मिळालेल्या विज्ञान वारशाचा ध्वज जयंतरावांनी केवळ फडकतच ठेवला असे नाही; तर स्वकष्टाने अधिक उंचीवर नेला. पाश्चात्त्य विद्यापीठांत उच्च शिक्षणासाठी विष्णु नारळीकर आणि त्याचे सुपुत्र जयंत अशा दोघांस टाटा समूहाची शिष्यवृत्ती आपापल्या पिढीत मिळाली. या अशा परंपरेचे हे आगळे उदाहरण. विष्णु नारळीकरांपेक्षा जयंतराव एक पाऊल पुढे गेले आणि साहित्यकृतीतून जनसामान्यांस अधिक जवळचे झाले. ते लिहिते झाले तेव्हा मराठीत विज्ञानकथा हा प्रकार नवीन होता. त्यात जयंतराव सच्चे वैज्ञानिक. आपल्याकडे भाभा अणुकेंद्रांतील कारकुनाचा परिचयही वैज्ञानिक असा करून दिला जात असताना खराखुऱ्या वैज्ञानिक जयंतरावांचे असणे तसे अप्रूपच. ते आता संपले.

‘कृष्णविवर’ ही पहिली कथा जयंतरावांनी १९७४ मध्ये मराठी विज्ञान परिषदेच्या ‘विज्ञान कथा स्पर्धे’साठी पाठवली, त्याअर्थी तोवर मराठीत विज्ञानकथा लिहू पाहणारे अनेक जण होते. पण या विज्ञानकथांचा बाज परग्रहावरून पृथ्वीवर आक्रमण किंवा तत्सम प्रकारचा असे. ‘कृष्णविवर’ ही कथा जयंतरावांनी आपल्या नावाचा दबाव कुणावर येऊ नये म्हणून टोपण नावाने- आणि आपले अक्षरही कळू नये म्हणून सहचरी मंगला नारळीकर यांच्या हस्ताक्षरात- पाठवली, तरीही तीच अव्वल ठरणे साहजिक होते. पण एखाद्या बक्षिसापेक्षा अव्वल काम त्या कथेने केले. वैज्ञानिक सिद्धान्तांशी निष्ठा राखणाऱ्या आणि अशा सिद्धान्तांचा प्रचार करण्यासाठी कल्पनेचा आधार घेणाऱ्या नव्या मराठी विज्ञानकथेची सुरुवात ‘कृष्णविवर’मुळे झाली. वास्तविक कृष्णविवरांचा बोलबाला विज्ञानातही नव्हता तेव्हा १९६४ साली मांडला गेलेल्या ‘हॉएल- नारळीकर सिद्धान्ता’ने ‘आकुंचन पावलेल्या ताऱ्यात वा तारकापुंजात दीर्घकाळात गुरुत्वीय बल कमीजास्त होऊ शकते’ असेही निरीक्षण नोंदवले होते. पण गुरुत्वाकर्षण अत्यधिक असलेल्या कृष्णविवरातला ‘काळ’ कसा असेल, त्याच्याशी पृथ्वीवरचा काळ आणि कालगणना यांचे प्रमाण कसे असेल, याचे संशोधन डॉ. नारळीकर आणि त्यांचे मार्गदर्शक फ्रेड हॉएल यांच्या त्या वेळच्या विषयाबाहेरचे होते. कृष्णविवरात काळ गोठतो- म्हणजे त्याची गती कमी होते- म्हणजेच त्यात माणूस शिरल्यास त्याचे वयही गोठते- ही कल्पना जयंतरावांची, त्यातून ‘कृष्णविवर’ लिहिली गेली. पण जयंतरावांच्या एकंदर विज्ञानकथा लेखनातली ‘कल्पना’ म्हणजे काय?

मराठीतल्या भावगीतांनी रुळवलेल्या कल्पनांसारखी ही विज्ञानकथांतली कल्पना स्वैर नव्हती. सोप्या मराठीत विज्ञानाबद्दल काही सांगण्याचा प्रयत्न जयंतराव एरवीही करतच असत, मग ‘कल्पना’ आणि कथा कशासाठी? याचे उत्तर जयंतरावांच्या सोप्या मराठीतूनच मिळते. ‘अभ्युपगम’ अर्थात इंग्रजीतल्या ‘हायपोथिसिस’ या शब्दाऐवजी ‘विज्ञानात अशी एक कल्पना आहे’ असे ते म्हणत. इथे कल्पना म्हणजे, प्रयोग आणि निरीक्षणांतून सिद्ध न झालेला वैज्ञानिक विचार. उपलब्ध आणि प्रयोगसिद्ध वैज्ञानिक सिद्धान्तांच्याही पुढे जाऊ पाहणारे कुतूहल. उदाहरणार्थ ‘मोबियस स्ट्रिप’ ही उलट्याचे सुलटे किंवा सुलट्याचे उलटे करणारी पट्टी निश्चितपणे एक गणिती सिद्धान्त मांडते. पण ही पट्टी किंवा तिच्यामागचा सिद्धान्त जर गणितातून प्रत्यक्षात आला आणि माणसे किंवा वस्तू त्यात जाऊन उलट/सुलट होऊ लागल्या तर उजव्या हाताने लिहिणारा माणूस डावखुरा होईल का? डाव्या सोंडेचा गणपती उजव्या सोंडेचा होईल का? या प्रश्नांमागे जो ‘तर काय होईल’ हा विचार आहे, ती कल्पना. या कल्पनेतून ‘उजव्या सोंडेचा गणपती’सारखी कथा लिहिली गेली. त्यानिमित्ताने मराठीत मोबियस पट्टीची चर्चा झाली. अशा कैक वैज्ञानिक सिद्धान्तांना कल्पनेची जोड देऊन नारळीकरांच्या विज्ञानकथांनी मराठीच नव्हे तर हिंदी, इंग्रजी वाचकांचेही कुतूहल शमवले आणि जागवले.

आपल्याकडे ललित साहित्य हे निर्हेतुक असावे, अशा आग्रहाचा सुकाळ. त्यामुळे विज्ञानप्रसाराच्या हेतूसाठी कथा, कादंबरिका लिहिणाऱ्या जयंतरावांना अनेकांनी अव्वल मानले नाही. वास्तविक सहेतुक साहित्य ही प्रत्येक समाजाची गरज असतेच आणि त्यासाठी हेतू उदात्त असावा लागतो. प्रचार हाच हेतू असून चालत नाही. हे तारतम्य सुटण्याइतपत कलावादाचा पगडा आपल्याकडे होता त्यामुळे सुरुवातीला जयंतरावांच्या प्रयत्नांतली उदात्तता कुणाला उमजलीच नाही. तशी उमज वाढण्यासाठी दुर्गाबाई भागवतांनी कराड साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून नारळीकरांच्या कथांचे केलेले कौतुकही फारसे कामी आल्याचे दिसले नाही. पुन्हा मराठीत काही चांगले लिहिले जाते आहे त्याअर्थी ते परभृतच- पक्षी इंग्रजीतून चोरलेलेच- असणार, असा आपल्याकडच्या समीक्षकांचा खाक्या. त्या खाक्यातले दंडुके नारळीकरांवरही फिरले. केवळ ‘एक ऑक्टोबर’ ही तारीख इंग्रजी कथेतली, म्हणून अख्खी कथाच ‘बेतलेली’ आहे असा शेरा एका समीक्षकाने ठोकून दिला. सर आर्थर कॉनन डॉयल यांची गाजलेली पात्रे- शेरलॉक होम्स आणि वॉटसन- स्वत:च्या कथेत आणताना नारळीकरांनी विनयशीलपणे म्हणा किंवा गंमत म्हणून, अख्ख्या कथेत मराठीचा बाज भाषांतरासारखा ठेवला- तोही, त्या काळात भा. रा. भागवत यांनी केलेली शेरलॉक होम्स-मालेची भाषांतरे आठवतील, असा! या लेखकीय क्लृप्तीला दाद देण्याऐवजी ‘ही कथा मूळच्या इंग्रजी अमुकतमुक कथेचे भाषांतर आहे’ असे विधान करून कुणा समीक्षकाने स्वत:च्याच अकलेचे दिवाळे दाखवले.

हे दिवाळे कुणा एकाचे असू शकत नाही. ते सार्वत्रिक आणि अनेकरूपी असते आणि आहे. जे उत्तम ते सारे परकीयच असणार, इतिहासात आपणच तर प्रगत होतो, परकीय राज्यकर्ते आले आणि आपला शक्तिपात झाला… या धारणांमधला परस्परविरोधही अनेकांच्या लक्षात येणार नाही, इतके हे दिवाळे लांबरुंद. याउलट, विज्ञानाच्या प्रांतात प्रत्येक धारणेला, प्रत्येक पायरीवर तपासून पाहिले जाणारच- आपल्या देशाची धरती ‘सोना उगले’ म्हणून धारणांना मोकळे रान द्यायचे, हे विज्ञानात चालत नाही. पण आपल्या अनेक धारणा या आपल्या अस्मितेलाही खतपाणी घालत असताना त्यांवर प्रहार करून काही परिणाम होत नाही. हेही जयंतरावांना नेमके माहीत होते. त्यामुळे त्यांच्या कथा केवळ वैज्ञानिक सिद्धान्तांचा प्रसार करून थांबल्या नाहीत. अस्मिता, संस्कृती यांच्या अवैज्ञानिक अंगाचे दर्शनही त्यांनी ‘पुत्रवती भव’, ‘धूमकेतू’ यांसारख्या अनेक कथांतून घडवले. पण हेही पुरेसे नाही, याची जाणीव जयंतरावांना असावी. त्यामुळेच, ‘धूमकेतू’चा मार्ग महत्प्रयासाने बदलणाऱ्या जागतिक वैज्ञानिकांच्या यशस्वी पथकातल्या भारतीय संशोधकाची पत्नी ‘मी घरात यज्ञयाग केल्यामुळेच हे झाले’ असे म्हणून पतीचे तोंड रसगुल्ला देऊन बंद करते!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विज्ञानाची जागा छद्माविज्ञान प्राधान्याने घेत असताना जयंतरावांचे जाणे अधिक क्लेशकारक. विज्ञानवृत्ती, तर्कवाद आदी बौद्धिकतेस सामूहिक तिलांजली दिली जात असताना आणि या विज्ञान-श्राद्धविधीस राजमान्यता मिळत असताना जयंत नारळीकर यांचे जाणे खिन्नता निर्माण करते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून जयंतरावांनी दिलेल्या भाषणाचे वर्णन ‘लोकसत्ता’ संपादकीयाने (६ डिसेंबर २०२१) ‘वामन परत यावा’ असे केले होते. आज हा विज्ञान ‘वामन परतोनि गेला’ असे म्हणावे लागेल. या विज्ञानव्रतीस ‘लोकसत्ता’ परिवाराची विनम्र आदरांजली.





Source link

खरीपात मकाच सुरक्षित

0
खरीपात मकाच सुरक्षित



मागील लेखात आपण अमेरिकेने छेडलेल्या व्यापारयुद्धामुळे भारताला पुढील काळात महागाई नियंत्रणामध्ये सरकारला कसा फायदा होईल, याबाबत चर्चा केली होती. मागील १०-१५ दिवसातील अन्न धान्य, फळे, भाज्या इ. कमॉडिटीच्या किंमतीत आलेली नरमाई पाहता आपले अंदाज चांगलेच खरे ठरले आहेत, असे म्हणता येईल.  तर मागील आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या एप्रिल महिन्यातील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर सहा वर्षाच्या नीचांकी पातळीवर घसरली आणि घाऊक निर्देशांक देखील तेरा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आल्यामुळे ते आपल्या अंदाजानुसारच होते.

या पार्श्वभूमीवर येत्या काळात देखील आपले अंदाज खरे ठरण्याची शक्यता अधिक दृढ झाली आहे आणि त्यामुळे रिझर्व्ह बँकेला अधिक आत्मविश्वासाने व्याजदर कपात करणे शक्य होईल, अर्थव्यवस्थेत उत्साहजनक वातावरण निर्माण होईल आणि मोसमी पाऊस सामान्य ते अधिक झाला तर एका सकारात्मक आर्थिक चक्रामुळे देशाच्या विकासदराला अधिक चालना मिळेल,अशा प्रकारची परिस्थिति निर्माण झाली आहे. याचे अग्रीम परिवर्तन आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टी या आपल्या भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांमध्ये आलेल्या जोरदार तेजीमध्ये दिसून येत आहे.

खरीप पीक निवड महत्त्वाची

आता दोन आठवड्यात राज्यात मोसमी पावसाची हजेरी लागेल आणि खरीप हंगामातील पेरण्यांची लगबग सुरू होईल. मागील संपूर्ण हंगाम राज्यातील प्रमुख पिकांसाठी मोठ्या मंदीचा गेल्यामुळे यावर्षी पीकनिवड करताना संभ्रम निर्माण होणे शक्य आहे. सोयाबीन आणि कापूस ही राज्यातील दोन प्रमुख खरीप पिके असून तूर आणि मका यांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. परंतु मागील हंगामातील किंमती पाहून लागवडीचा निर्णय घेतला जात असल्यामुळे सलग दोन हंगामात सोयाबीनमध्ये तोटा झाल्यामुळे शेतकरी सोयाबीनचे क्षेत्र कमी करण्याच्या बेतात असणे साहजिक आहे. तर कापसात कमी-जास्त प्रमाणात तीच परिस्थिति राहिल्याने कपाशीच्या लागवडीत देखील घट होऊ शकेल, असे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या खरीपात पीकनिवड महत्त्वाची ठरणार आहे.

सुरक्षित पीक – मका

सोयाबीन, कापूस यांच्या किंमती साधारणपणे जागतिक घटकांवर अधिक अवलंबून असल्याने देशांतर्गत परिस्थितीत सुरक्षित पीक म्हणून सलग  तिसऱ्या वर्षी मक्याला झुकते माप देणे किफायतशीर ठरेल. अलीकडील काळात मका हे पशूखाद्य न राहता ते ऊर्जा आणि अन्न पीक म्हणून सतत मागणीत वाढ होताना दिसत आहे. खरीप आणि रब्बी तसेच उन्हाळी अशा तिन्ही हंगामात मक्याची लागवड वाढत असली तरी मागणीतील वाढ क्षेत्रवाढीपेक्षा अधिक राहिल्याने मक्याची किंमत ऐन काढणीच्या वेळी देखील प्रतिक्विंटल २,००० रुपयांच्या खाली आलेली नाही. तर हंगामाअखेरीस तो कुठे कुठे ३१-३२ रुपये झाल्याचे दिसून आले आहे.

पुढील काळात इथेनॉलसाठी केंद्राने अधिक तांदूळ उपलब्ध करून दिला असला, तरी ऊसाची उपलब्धता अजून आठ-दहा महिने जेमतेम राहील. त्यामुळे मक्याची मागणी कमी होण्याची शक्यता नाही. तसेच पोल्ट्री-स्टार्च-प्रक्रिया केलेले अन्न यासाठी मक्याची मागणी चांगलीच राहील. त्यामुळे मका तुलनेने सर्वात सुरक्षित पीक राहील.

कापूस, सोयाबीन आश्वासक

कापूस आणि सोयाबीन ही दोन्ही पिके येत्या वर्षात तेजीत राहतील की मंदीत हे सांगणे सध्याच्या परिस्थितीत कठीण असले तरी दोन्ही पिकांसाठी यापूर्वीच किंमतीचा तळ नोंदवला गेला आहे, एवढे सांगता येईल. तसेच अलीकडील जागतिक व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातील परिस्थितिचा आढावा घेतल्यास कापसाच्या मागणीत वाढ होण्यासाठी अनुकूल परिस्थिति आहे. विशेषत: वस्त्र-प्रावरणे निर्यातीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे कापसात मर्यादित तेजीची अपेक्षा केल्यास चूक ठरणार नाही. मर्यादित यासाठी की, कापूस महामंडळाकडील हमीभाव खरेदीतील मोठे साठे प्रत्येक तेजीत बाजारात येण्याची शक्यता विचारात घेता कापसाला पुढील हंगामात ८,६००-८,८०० रुपये प्रतिक्विंटल या पातळीवर मोठा अडसर राहील. तर सोयाबीन देखील मर्यादित तेजीकडे वाटचाल करण्याची शक्यता आहे. अमेरिकी खंडात पुढील हंगामात सोयाबीनचे क्षेत्र मक्यात वळण्याचे अंदाज, जागतिक पातळीवर पोल्ट्री, पशुपालन उद्योगातील अनुमानित वाढ आणि देशांतर्गत लागवडीतील अनुमानित घट या घटकांमुळे सोयाबीन प्रतिक्विंटल ५,०००-५,२०० रुपये जाण्यास मदत होईल. अर्थात यासाठी २०२६ उजाडण्याची वाट पाहायला लागू शकेल.

तुरीला धोरण-शाप तर उडीद किफायतशीर

राज्यात तूर हे महत्त्वाचे खरीप पीक असून २०२३-२४ या पणन हंगामात तुरीला विक्रमी भाव मिळाला. त्यामुळे मागील वर्षात तुरीचे क्षेत्र आणि उत्पादन वाढेल अशी अपेक्षा होती. परंतु क्षेत्रवाढ मर्यादित राहिली आणि प्रतिकूल हवामान यामुळे अपेक्षित उत्पादनवाढ झालीच नाही. त्यामुळे तुरीचे भाव निदान हमीभावापेक्षा अधिक राहणे गरजेचे होते. परंतु तूर आणि पिवळ्या वाटाण्याची विक्रमी आयात, केंद्राची कडक धोरणे यामुळे तूर मंदीतच राहिली आहे. येत्या काळात देखील वाटाण्याचे मोठे साठे, केंद्राचे बफर स्टॉक, आणि आयातीवर भर तसेच चांगला पाऊस होण्याचे अनुमान अशा अनेक घटकांची सावली कडधान्य क्षेत्रावर राहील, असे संकेत मिळत असल्यामुळे तुरीत पुढील वर्षात मोठी तेजी अपेक्षित नाही. त्या तुलनेत सातत्यपूर्ण मागणी आणि पुरवठा वाढीचे कमीत कमी पर्याय यामुळे उडीद पीक अधिक किफायतशीर राहील.

वरील अंदाज हे सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिति लक्षात घेऊन व्यक्त केले आहेत. लवकरच भारताचे अनेक द्विपक्षीय व्यापार करार होणार आहेत. यामध्ये अमेरिकेशी होऊ घातलेला करार अत्यंत म्हहत्त्वाचा ठरणार आहे. अमेरिकेच्या मनात भारताला इथेनॉल निर्यात करण्याचे मनसुबे आहेत. ते यशस्वी झाल्यास मक्यातील तेजीला लगाम बसू शकेल. तीच गोष्ट इतर शेतमालाच्या बाबतीत देखील होऊ शकते. परंतु या कराराद्वारे दुसरे दरवाजे देखील उघडू शकतात. त्यामुळे सध्या या गोष्टींवर लक्ष ठेवणे एवढेच आपण करू शकतो.  

सोन्यात तेजीपेक्षा मंदीची शक्यता अधिक

मागील महिन्यात सोन्याने भारतात १,००,००० रुपये प्रति १० ग्रॅम हा (सर्व करांसहित) किंमतीचा उच्चांक गाठला होता. आणि या संपूर्ण वर्षात सोने १,२५,००० रुपयांचा नवीन विक्रम करेल असे सर्वत्र बोलले जात होते. या स्तंभातून याविषयी चर्चा करताना सोन्याच्या किंमतीत अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवली असली तरी त्यात तेजीपेक्षा मंदीची शक्यता कैक पटीने अधिक असल्याचे सूचित केले होते. तसेच नजीकच्या काळातील सोन्याचा कल हा १००-२०० डॉलरच्या चढ उतारांनी भरलेला असेल असेही म्हटले होते. मागील महिन्याभरातील सोन्याच्या भावातील चढ-उतार अगदी अशाच प्रकारचे राहिले असून सोने ३,५०० डॉलर (प्रति ट्रॉय औंस) वरुन आता ३,२०० डॉलरच्या खाली आले आहे. ही मंदी अजून लांबण्याची शक्यता असून आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती २,९००-२,८०० डॉलर या कक्षेपर्यंत येण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. रशिया-यूक्रेन आणि भारत-पाकिस्तान यांमधील निवळलेली परिस्थिति, अमेरिकी  राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा व्यापार-कर युद्धाबाबत घेतलेला मवाळ पवित्रा या गोष्टी अशाच राहिल्या किंवा याहून अधिक सुधारल्या तर सोन्यातील मंदी वर्षभर चालू राहणे सहज शक्य आहे.



Source link

वारशात ‘अस्वस्थता’ देणारे आजोबा !

0
वारशात ‘अस्वस्थता’ देणारे आजोबा !



रात्र नकोच वाटते! माजघरात दोन चेहरे समोरासमोर बसलेले असतात. एकमेकांच्या डोळ्यांत डोळे घालून. लग्न न झालेली बनात्या आणि दुसरी लग्न होऊनही संसारसुखाला पारखी झालेली मावशी. स्वयंपाकघरात आजी धुसफूसत बदाम-पिस्त्याच्या गोळ्या करत असते. माजघराच्या माडीवरून खिदळणं ऐकू येतं. कारण दार बंद करून, संपूर्ण नग्नावस्थेत मांडीवरचं चांदणं गोंदण बघत उभी

असते – रुक्मिणी. कोठीच्या खोलीत विडीचा धूर. आजीच असेल बहुतेक! ओसरीवर यावं तर दारात विठ्ठलपंत धोतराच्या निऱ्या घालत माजघराच्या जिन्याकडे वाकून वाकून बघत असतात. खांबांना टेकून बाप्पा झुलपातली काडी काढून दात कोरत उभे! समोरच्या बैठ्या मेजावर पाय सोडून आबा विचारात मग्न. त्या वरच्या माडीवर नानासाहेब, बाळासाहेब खुर्चीवर मढ्यासारखे बसून आहेत. शून्यात बघत. पायऱ्या उतरून जावे तर समोर एका (एकनाथ) काकाचं रक्ताच्या थारोळ्यात प्रेत पडलं आहे. माडीवरून उडी टाकून जीव दिल्यामुळे त्याचा डोळा फुटून कवटीतून बाहेर आला आहे. खळ्यात आलो तर आऊटहाऊसमध्ये हालचाल. क्षणात पेटत्या काडीसमोर उत्तेजित झालेली राधाक्का दिसते. तर ज्योत विझताच त्या ठिकाणी केशवपन केलेला तिचा भयाण चेहरा दिसतो.

साली ही नसती खुळं माझ्याच घरात का आहेत? उष्ण सुस्कारे टाकीत कुठल्या निरर्थकतेने नांदतायत? तहान मेलेला चेहरा घेऊन का वावरतायत? आसक्तीची आस नाही, विरक्तीचा ध्यास नाही. कुठलं हे थिजलेपण?

जयवंत दळवी हे नाव ज्यांना माहिती आहे, त्यांना कळलं असेलच, की ही पात्रं सारे प्रवासी घडीचे, धर्मानंद, अंधाराच्या पारंब्या, रुक्मिणी या त्यांच्या लिखाणातली आहेत. अनुक्रमे शाळकरी वय ते वृद्धापकाळाच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या पुरुषाभोवती फिरणारी ही कथानकं – माझ्या पायाला सतत ठेचकाळत असतात. वासनांचे फुत्कार टाकीत सळसळत असतात. कारण मी ज्या घरात राहतो त्याच घरात दळवींनी या पात्रांना जन्माला घातले.

नात्याने ते माझे आजोबा. पण माझ्या जन्माच्या आधीच ते गेले. जाताना वारशादाखल हे खुळे सोबतीला सोडून गेले. आज मी पंचविशीत आहे. एका वेगळ्या मानसिकतेने जगाला सामोरा जातो आहे. आत्ता कुठे मानवी संबंध, त्यातली गुंतागुंत अंधुकशी दिसू लागली आहे. त्यात जगण्याचं हे दारुण विश्वदर्शन माझ्याच घरात घडतंय. अशा परिस्थितीत जगायचं कसं?

अपूर्णत्व घेऊन हिंडणारी ही माणसंच खरी ‘दळवी’ कुळाची सदस्य आहेत. आम्ही फक्त दळवी ‘आमच्या’ घरचे असा पोकळ डंका वाजवणारे कार्यकर्ते. पण दळवी आहेत ते याच पात्रांच्या मनात! तेच एकमेकांना अंतर्बाह्य जाणतात. त्यांच्याप्रति त्यांच्या या कुलपुरुषाला प्रचंड करुणा, आस्था, आकर्षण आणि प्रेम आहे. त्यामुळे त्यांच्यासारखी नजर मला मिळावी म्हणून आटापिटा चालला आहे. झालोच तर दळवींसारखा नाही, पण दळवी कुळातला लेखक नक्कीच व्हायचं आहे. कारण भोवतालचं राहणीमान बदललं असलं तरी गुंते तेच आहेत.

‘विषण्ण’ हा त्यांच्या आवडीचा शब्द असावा. बऱ्याच ठिकाणी येतो. मन विषण्ण झाल्याशिवाय ही भुतं उमगायची नाहीत. एसी गाडी करून प्रवासाला निघणाऱ्याचे हे काम नव्हे. उन्हात अनवाणी चाललो तर मग कदाचित कळेल, की ह्यांचं हे राहणं निरर्थक नाही. ही अमर माणसं माझीच आहेत! फक्त मी (किंवा कुणीच) त्यांना पूर्णत्व देऊ शकत नाही. फार फार तर अपूर्णत्वाच्या पुढच्या टप्प्यावर

त्यांना नेऊन सोडू शकतो.

पण असो रेंगाळणारी ही अस्वस्थ रात्रच मुळी माझी पुंजी आहे. तिच्याकडे समंजसतेने पाहायला हवं ! या सगळ्यांना कडकडून मिठी मारायला हवी. या रात्रीपलीकडचे जग चाचपून बघायला हवे. ते ही न घाबरता. कारण-

पहाटेच्या क्षितिजावर उभारोनि बाहे।
माझा आजा मज पालवीत आहे।

वेद दळवी
veddalvi@yahoo.co.in



Source link

Nashik Assistant Fisheries Commissioner suspended for taking expensive foreign trip in the name of medical leave

0
Nashik Assistant Fisheries Commissioner suspended for taking expensive foreign trip in the name of medical leave



Nashik Assistant Fisheries Commissioner suspended for taking expensive foreign trip in the name of medical leave | वैद्यकीय रजेच्या नावे परदेशी सहल महागात; नाशिकचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त निलंबित





Source link

corona cases increasing in Maharashtra 106 corona patients found in this year pune print news zws 70

0
corona cases increasing in Maharashtra 106 corona patients found in this year pune print news zws 70


पुणे : हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. करोनाचा नवीन उपप्रकार ओमिक्रॉन जेएन.१ मुळे ही वाढ सुरू आहे. त्यातच आता महाराष्ट्रातही करोना रुग्णसंख्येत वाढ सुरू झाली आहे. राज्यात या वर्षभरात करोनाचे १०६ रुग्ण आढळून आले असून, त्यांपैकी १०१ मुंबईतील आहेत.

राज्यात जानेवारी ते २० मेपर्यंत करोनाच्या ६ हजार ६६ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात १०६ रुग्णांना करोनाचे निदान झाले. त्यात मुंबई महापालिका हद्दीत सर्वाधिक १०१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील ३६ रुग्ण बरे झाले आहेत. याचबरोबर ५६ रुग्णांना सौम्य आजार असल्याने त्यांच्यावर घरी उपचार सुरू आहेत, तर १६ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यात मंगळवारी करोनाचे १९ रुग्ण आढळले. त्यात सर्वाधिक १५ रुग्ण मुंबईतील असून, कोल्हापूरमधील ३ आणि पुण्यातील १ रुग्ण आहे, अशी माहिती आरोग्य सहसंचालिका डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली.

राज्यात करोनासह श्वसनविकाराच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे. अशा सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांची करोना चाचणी केली जात आहे. राज्यात करोनाचे रुग्ण सध्या तुरळक आढळून येत आहेत. त्यांच्यात सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे डॉ. कमलापूरकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

राज्यात दोन मृत्यू

राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत करोनामुळे २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एका रुग्णास नेफ्रोटिक सिंड्रोम हा मूत्रपिंड विकारासह हायपोकॅल्सिमिक सीझर हा चेताविकार होता, तर दुसऱ्या रुग्णास कर्करोग होता. हे दोन्ही रुग्ण सहव्याधीग्रस्त होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोना रुग्णांच्या संख्येतील वाढ ही केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर इतर राज्यांतही दिसून येत आहे. काही देशांमध्येही रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. करोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत करण्यात येत आहे. – डॉ. बबिता कमलापूरकर, सहसंचालिका, आरोग्य विभाग





Source link

जिल्ह्यातील ३७८ ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेची सुनावणी ;जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने नोटीसा

0
जिल्ह्यातील ३७८ ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेची सुनावणी ;जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने नोटीसा


अहिल्यानगरः राखीव जागेवर निवडून आलेल्या परंतु सक्षम प्राधिकरणाचे जात वैधता प्रमाणपत्र तीन वर्षात सादर न करणाऱ्या, जिल्ह्यातील सात तालुक्यातील ३७८ ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सुनावणी सुरू करण्यात आली आहे. उर्वरित सात तालुक्यांतील प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांचीही लवकरच सुनावणी होणार आहे.

दि. १ जानेवारी २०२१ नंतर ते ऑगस्ट २०२२ पूर्वी राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या परंतु जुलै २०२४ पर्यंत सक्षम प्राधिकरणाचे जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना तहसीलदारांमार्फत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १०-१ (अ) प्रमाणे सुनावणीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यानुसार राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने उमेदवारी अर्जासमवेत सक्षम प्राधिकरणाने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ग्रामविकास विभागाने यासाठी आणखी १२ महिन्यांची मुदतवाढ दिली होती.

परंतु त्यानंतरही जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास राखीव जागांवर निवडून आलेल्या अनेक सदस्यांनी दुर्लक्ष केले आहे. राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी जर मुदतीत प्रमाणपत्र सादर केलेले नाही तर त्याला सुनावणीत म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. त्यानुसार आज, मंगळवारी जामखेड तालुक्यातील (८२), राहाता (१०) व अहिल्यानगर (५५ ) या तीन तालुक्यातील राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या एकूण १४७ सदस्यांची सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.

हेही वाचा

जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी दिलेल्या सूचनेनुसार उपजिल्हाधिकारी (महसूल) अरुण उंडे, सामान्य प्रशासन शाखेचे तहसीलदार शरद घोरपडे यांच्या देखरेखीखाली सहायक महसूल अधिकारी वैशाली कळमकर, सहायक महसूल अधिकारी सोनाली कुलकर्णी व अर्चना देशमुख यांनी हे कामकाज पार पाडले. यासंदर्भात उद्या, बुधवारी श्रीरामपूरमधील २५, राहुरीतील ३१ जणांच्या सुनावणीसाठी नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील १०१ व अकोल्यातील ३४ जणांना सुनावणीच्या नोटिसा लवकरच बजावल्या जातील. या दोन्ही तालुक्यातील सुनावणीच्या तारखा अद्याप निश्चित करण्यात आलेल्या नाहीत.

नंतरच्या टप्प्यात उर्वरित श्रीगोंदे, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड व कोपरगाव या तालुक्यातील जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या सदस्यांची सुनावणी होणार आहे.

म्हणने सादर न केल्यास निवड रद्द

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुनावणीस निश्चित केलेल्या तारखेला संबंधित सदस्याने आपले म्हणणे सादर करणे बंधनकारक आहे. सुनावणीस गैरहजर राहिल्यास व म्हणणे न मांडल्यास, काहीएक म्हणणे नाही असे समजून पूर्वलक्षी प्रभावाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार निवड रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे संबंधित सदस्याला बजावलेल्या नोटिसीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा





Source link

Vaibhav Suryavanshi Touches MS Dhoni Feet While Shaking Hand After RR vs CSK Match Video Viral IPL 2025

0
Vaibhav Suryavanshi Touches MS Dhoni Feet While Shaking Hand After RR vs CSK Match Video Viral IPL 2025


IPL 2025 Vaibhav Suryavanshi Touches MS Dhoni Feet Video: राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२५ च्या अखेरच्या सामन्यात शानदार विजय मिळवत मोहिमेचा शेवट केला आहे. राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सचा ६ विकेट्स १७ चेंडू बाकी ठेवत शानदार विजय मिळवला. राजस्थानच्या या विजयात संपूर्ण संघाचं योगदान होतं. पण वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीने सर्वांचं पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं. पण याशिवाय वैभवच्या कृतीमुळे सर्वच जण त्याचं कौतुक करत आहेत.

राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी पहिल्या डावात चेन्नईच्या फलंदाजांवर वचक बसवला आणि त्यांना २०० धावांपर्यंत पोहोचू दिले नाही.चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना १८७ धावा केल्या. चेन्नईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने संथ सुूरूवात केली. यशस्वीने एकाबाजूने फटकेबाजी केली, पण षटकारांची आतिषबाजी करणारा वैभव सूर्यवंशी शांत होता आणि त्याने या सामन्यात संथ सुरूवात करत नंतर आपलं रौद्ररूप दाखवलं.

यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर वैभव सूर्यवंशीने संजू सॅमसनच्या जोडीने संघाचा डाव सावरला. वैभव सूर्यवंशीने या सामन्यात ३३ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५७ धावा करत अर्धशतक झळकावलं. राजस्थानला विजयाच्या उंबरठ्यावर आणण्यात संजूबरोबर वैभवनेही मोठं योगदान दिलं. अखेरीस ध्रुव जुरेलने षटकारांची आतिषबाजी करत संघाला विजय मिळवून दिला आणि विजयासह मोहिमेची सांगता केली.

हेही वाचा

सामना संपल्यानंतर, जेव्हा दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन करत होते, तेव्हा धोनी आणि वैभवही समोरासमोर आले. धोनी जवळ येताच, वैभवने एका हाताे हस्तांदोलन करत धोनीच्या पायांना खाली वाकून स्पर्श केला आणि त्याचे आशीर्वाद घेतले. यानंतर, धोनीने वैभवकडे प्रेमाने पाहत त्याचं कौतुक केलं आणि वैभवनेही निरागस स्मितहास्य दिलं, वैभवच्या या कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि या क्षणाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा

समालोचन करत असलेले हरभजन सिंग, नवज्योत सिंग सिद्धूदेखील वैभवची ही कृती पाहून त्याचं मनापासून कौतुक करताना दिसले. वैभववर केलेले संस्कार आणि भारतीय संस्कार यांच्याबाबतही वक्तव्य करत त्यांनी वैभवचं कौतुक केलं.





Source link

Traffic jam in Balkum every Friday to Monday zws 70

0
Traffic jam in Balkum every Friday to Monday zws 70



Traffic jam in Balkum every Friday to Monday zws 70 | बाळकुम येथे दर शुक्रवार ते सोमवारपर्यंत वाहतुक कोंडीचा कहर; कोंडी सोडविण्यासाठी आठवड्यातील तीन दिवस सिग्नल यंत्रणा बंद





Source link