Saturday, July 11, 2026
Home Blog Page 212

फलटण तालुक्यात मुसळधार पावसाचे थैमान; प्रशासन ॲक्शन मोडवर

0
फलटण तालुक्यात मुसळधार पावसाचे थैमान; प्रशासन ॲक्शन मोडवर

फलटण :- गेल्या काही दिवसांपासून फलटण तालुक्यावर पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे संपूर्ण तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

कालचा दिवस हा फलटणवासीयांसाठी अत्यंत भीतीदायक ठरला. अक्षरशः झोडपून काढणाऱ्या पावसामुळे बाणगंगा धरण मे महिन्यातच भरले, ही बाब ऐतिहासिक ठरणारी आहे. बाणगंगा नदीला रौद्ररूप आले असून नदी पात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे शहरातील शनीनगर, दत्तमंदिर परिसर, मलटण व मंगळवार पेठेतील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. काही ठिकाणी चारचाकी वाहनेही पाण्यात अडकली होती.

या कठीण वेळी फलटणचे महसूल प्रशासन तत्काळ अॅक्शन मोडवर गेले. उपविभागीय अधिकारी आंबेकर मॅडम, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे व नायब तहसीलदार तुषार गुंजवटे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने बचाव व स्थलांतराची कामे वेगाने सुरू केली. या वेळी अनेक राजकीय नेत्यांनीही नागरिकांच्या मदतीसाठी धाव घेतली.

सध्या पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी धोका अजूनही टळलेला नाही. प्रशासन सतर्क आहे व संभाव्य धोका लक्षात घेता पुढील नियोजन सुरू आहे. डॉ. अभिजीत जाधव यांनी सांगितले की, पूर ओसरल्यानंतर स्वच्छता मोहिम राबवावी लागणार असून रोगराईला आळा घालण्यासाठी नगरपरिषदेच्या मदतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत.

विदर्भातील भूमि अभिलेख कर्मचारी बेमुदत संपावर; मोजणीची कामे ठप्प…

0
विदर्भातील भूमि अभिलेख कर्मचारी बेमुदत संपावर; मोजणीची कामे ठप्प…


यवतमाळ : विदर्भातील भूमि अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी २६ मेपासून तांत्रिक वेतन श्रेणी व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केला आहे.अमरावती व नागपूर विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने या संपात सहभागी झाल्यामुळे मोजणी व अन्य दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी पुणे विभागातील कर्मचारी १५ मेपासून याच मागण्यांसाठी संपावर गेले असून, त्या विभागातील सर्व कामकाज ठप्प झाले आहे. आता विदर्भातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्रीराम खिरेकर यांनी सांगितले की, शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे वेळेवर लक्ष न दिल्यामुळे असंतोष वाढला आहे. सुधांशू समितीने दिलेला अहवाल तात्काळ मंजूर करून तांत्रिक वेतन श्रेणी लागू करावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. २०१२ पासून शासनाने सेवा भरती नियमात बदल करून तांत्रिक पात्रता अनिवार्य केली असून, सध्या बी.ई. सिव्हिल व डिप्लोमा इंजिनिअर्सची नेमणूक केली जात आहे. तरीही तांत्रिक वेतनश्रेणीचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे.

या संपाला भूमी अभिलेख राजपत्रित अधिकारी संघटनेनेही पाठिंबा दिला आहे. यवतमाळ जिल्ह्यासह सर्व तालुक्यांतून कर्मचारी संपात सामील झाले असून, मुंबई, नाशिक व औरंगाबाद विभागातील कर्मचाऱ्यांनाही लवकरच यामध्ये सामील होण्याची शक्यता आहे. या संपात प्रवीण लाकडे, सिद्धेश्वर सारडे, अंजू बोपचे, चेतना राऊत, वंदना बुरांडे, शिल्पा तुरकर, संदीप विशंभरे, सचिन उत्तरवार, सागर फेंडर आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत. जनतेला होणारा त्रास लक्षात घेता शासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

काय होणार परिणाम

भूमी अभिलेख विभागाशी शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या अत्यंत जवळचा संबंध येतो. शेती, प्लॉट या खरेदी, विक्री व्यवहारासाठी भूमी अभिलेख विभागातील अभिलेखांची, प्रमाणपत्रांची गरज सर्वत्र पडते. या विभागात मुख्यत्वे जमिनीचे रेकॉर्ड (अभिलेख) व्यवस्थापित करण्याचे काम करते. यात जमिनीचे मोजमाप, फेरफार (जसे की जमीन हस्तांतरण), सातबारा (७/१२) आणि इतर भूमी संबंधित नोंदी ठेवणे ही कामे समाविष्ट आहे. या विभागाचे काम जमिनीच्या मालकीची नोंद ठेवणे, वाद मिटवणे आणि शासनाच्या भूमी संबंधित योजनांसाठी आवश्यक माहिती पुरवणे आहे. मात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारल्याने राज्यातील जमिनीसंदर्भातील कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.



Source link

Big Boss 19: स्पर्धकांच्या यादीवर निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय! एल्विश आणि मनीषासारखे खेळाडू असतील का?

0
Big Boss 19: स्पर्धकांच्या यादीवर निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय! एल्विश आणि मनीषासारखे खेळाडू असतील का?



Big Boss 19: सलमान खान होस्टेड शोने यावेळी चाहत्यांना खूप वाट पाहायला लावली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की या सीझनमध्ये प्रॉडक्शन हाऊस बदलल्यामुळे प्रेक्षकांना नियमांमध्ये ही मोठे बदल पाहायला मिळू शकतात.



Source link

सौरव गांगुलीचा भाऊ आणि वहिनी प्रवास करत असलेली बस भर समुद्रात उलटली, अन् त्यानंतर….; कुटुंबीयही हादरले

0
सौरव गांगुलीचा भाऊ आणि वहिनी प्रवास करत असलेली बस भर समुद्रात उलटली, अन् त्यानंतर….; कुटुंबीयही हादरले


भारतीय क्रिकेटर संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा भाऊ स्नेहशिश गांगुली आणि त्याची पत्नी अर्पिता थोडक्यात बचावले आहेत. दोघेही स्पीडबोटने प्रवास करत असताना ती समुद्रात पलटली. ओडिशामध्ये ही घटना घडली आहे. दोघेही ओडिशामध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पोहोचले होते. बीचवर स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी करत असतानाच त्यांची स्पीडबोट समुद्रात उलटली. 

व्हायरल झालेल्या व्हिडीओत स्पीडबोट समुद्रात पलटलेली दिसत असून, लाइफगार्ड त्यांना वाचवताना दिसत आहेत. अर्पिता गांगुलीने कमी प्रवासी असल्याने बोटीचं वजन कमी होतं, ज्यामुळे ती पलटली असा दावा केला आहे. 

“समुद्राला उधाण आलं होतं. बोटीमध्ये 10 लोकांची प्रवास करण्याची क्षमता आहे. मात्र पैशांसाठी त्यांनी फक्त तीन लोकांनाच बोटीत बसू दिलं. समुद्रात जाणारी त्या दिवसातील ती शेवटची बोट होती. आम्ही समुद्रात जाण्याआधी चिंता व्यक्त केली होती. पण ऑपरेटर्सनी आम्हाला सर्व काही ठीक आहे असं सांगितलं,” अशा खुलासा अर्पिता गांगुलीने केला आहे.

आम्ही समुद्रात जाताच एक मोठी लाट आमच्या बोटीला आदळली असंही तिने सांगितलं. ती म्हणाली की, “जर लाइफगार्ड आले तर, कदाचित आम्ही वाचणो शक्य नव्हतं. मी अद्यापही ट्रॉमात आहे. मी आयुष्यात कधीही अशा कोणत्या गोष्टीचा सामना केलेला नाही. जर बोटीत आणखी लोक असते तर ती पलटली नसती,” असं ती म्हणाली आहे.

अर्पिता गांगुलीने बोटी चालवणाऱ्या ऑपरेटर्सची चौकशी केली पाहिजे अशी मागणी केली आहे. “अधिकाऱ्यांनी येथे या खेळांवर बंदी घालावी. पुरी समुद्रकिनाऱ्यावर खूप खवळलेला समुद्र आहे. मी कोलकात्याला परत गेल्यावर पोलिस अधीक्षक आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीन आणि त्यांना येथे वॉटरस्पोर्टस बंद करण्यास सांगेन,” असं ती म्हणाली.

पश्चिम-मध्य आणि लगतच्या उत्तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याने किनारपट्टी ओडिशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. राष्ट्रीय हवामान अंदाज वर्तवणाऱ्याने या आठवड्यात राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मंगळवारी गंजम, गजपती, रायगडा, कालाहांडी, कंधमाल आणि कोरापूट जिल्ह्यात आणि बुधवारी पुरी, खुर्दह, गंजम, गजपती, रायगडा, कोरापूट आणि मलकानगिरी जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.





Source link

अद्भूत! भारतातील एक असं गाव, जिथून दुर्बिणीशिवाय दिसते दुसरी आकाशगंगा; इथे असते सर्वात काळीकुट्ट रात्र, अन लख्ख चांदणं…

0
अद्भूत! भारतातील एक असं गाव, जिथून दुर्बिणीशिवाय दिसते दुसरी आकाशगंगा; इथे असते सर्वात काळीकुट्ट रात्र, अन लख्ख चांदणं…


Leh Ladakh Hanle Darkest Sky Reserve : हल्ली आकाशात रात्रीच्या वेळी पाहिलं, तर लुकलुकणारे तारे, चांदण्या दिसण्याचं प्रमाण तुलनेनं बरंच कमी झालं आहे. यामागे कैक कारणं असून त्यातची बरीच कारणं सर्वज्ञाच आहेत. मात्र जिथं प्रदूषणाची पातळी वाढत आहे तिथंच भारतात निसर्गाचा एक कमाल आविष्कार येणाऱ्या प्रत्येकालाच हैराण करून सोडत आहे. हा आविष्कार कुठंय माहितीये?

हा आविष्कार म्हणजे भारतातील अतिशय दुर्गम भागात असणारं एक लहानसं गाव. एक असं गाव, जिथं बाहेरचं कोणी गेलं, तर त्यांची दमछाक होते, थंडीनं दाकखिळी बसते, एक असं गाव जिथं दूरदूरपर्यंत कोणीच नसल्यामुळं रात्रीच्या वेळी इथं नुसतं बाहेर वावरणंही धडकी भरवतं. जगातील आणि भारतातील काळोख्या रात्रींसाठी ओळखल्या जाणाऱ्या आणि अवकाश अगदी सहजपणे दिसणाऱ्या या ठिकाणाचं, या गावाचं नाव आहे हान्ले/ हानले.

हानले (Hanle) हे लडाखमधील एक अतिशय लहानसं आणि दूरवर वसलेलं एक गाव. लडाखच्या पूर्व भागात, चांगथांग पठारावर हे गाव स्थित असून, लेहपासून ते साधारण 250 किमी अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे हे गाव साधारण 4,500 मीटर (14,760 फूट) उंचीवर वसलेलं असून, ते आपल्या निसर्गरम्य सौंदर्यासह खगोलशास्त्रीय महत्त्वासाठीही प्रसिद्ध आहे. मागील काही वर्षांमध्ये हानलेच्या दिशेनं येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला असून, या बदलाला खगोलशास्त्रीय पर्यटन असंही नाव देण्यात येत आहे.

जगातील सर्वात उंचावरील वेधशाळा

हानले येथील वेधशाळा ही जगातील सर्वात उंचावरील वेधशाळांपैकी एक आहे. ही वेधशाळा आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संस्थांकडून विविध निरीक्षणपर कामांसाठी वापरली जाते. हानलेमध्ये फारच कमी वस्ती  आणि कोणतेही शहरीकरण नसल्यामुळं इथं कृत्रिम प्रकाशाचा प्रचंड अभाव आहे, ज्यामुळे येथील रात्र सर्वाधिक काळ्याकुट्ट आणि काशी धडकी भरवणाऱ्या असतात. 2022 मध्ये हानले हे ठिकाण भारताचा पहिला “Dark Sky Reserve” म्हणून घोषित करण्यात आला आणि साऱ्या जगाचं लक्ष या ठिकाणानं वेधलं. खगोल अभ्यासक आणि ग्रहताऱ्यांमध्ये रमणाऱ्यांसाठी हानले म्हणजे एक परवणी.

इथं रात्री फक्त ‘ताऱ्यांचा’ खेळ चाले….

दिवस मावळतीला गेल्यानंतर आणि आकाश जेव्हाजेव्हा निरभ्र असेल तेव्हातेव्हा हानलेमध्ये रात्रीच्या अंधारात काही अद्वितीय दृश्य आणि ग्रहतारे पाहता येतात. मिल्की वे अर्थात दुसऱ्या आकाशगंगा इथून अगदी सहजपणे आणि त्यासुद्धा कोणत्याही दुर्बिणीशिवाय पाहया येतात. उल्कावर्षा, तुटणारे तारे, ताऱ्यांचा वर्षाव, चंद्र, ग्रह आणि उत्तरेकडील प्रकाशरेषा असा अद्भूत नजराणा हानले इथं येणाऱ्या प्रत्येकापुढं सादर करतं.

राहिला मुद्दा इथवर पोहोचण्याचा तर, लेहपासून इथं येण्यापर्यंतचा प्रवास तुलनेनं अधिक खडतर आहे. शिवाय चीन सीमेनजीक हा भाग येत असल्यानं अनेकदा इथं काही संवेदनशील भाग ओलांडून पोहोचावं लागतं. प्रवास कितीही मोठा असला तरीही हानलेमध्ये येऊन जेव्हा आपल्याला नगण्य भासवणारी भव्य आकाशगंगा आभाळात दिसते तेव्हा इथं येण्याचं खरं चीज झाल्याचीच एकमेव भावना मनात घर करते. मग….. जाणार ना हानलेला?  





Source link

हिंद महासागराखाली सापडलं हडप्पाहून प्राचीन समाधीस्त शहर; जादुई ठिकाण पाहून संशोधकही झाले होते अवाक्

0
हिंद महासागराखाली सापडलं हडप्पाहून प्राचीन समाधीस्त शहर; जादुई ठिकाण पाहून संशोधकही झाले होते अवाक्


Lost Civilization Discovery: संपूर्ण पृथ्वीच्या भूगोलात आणि इतिहासात डोकावलं असता काही अनपेक्षित गुपितं कायमच मानवाला भारावून सोडतात. मग ती प्राणीप्रजातींची उत्पत्ती आणि ऱ्हास असो किंवा मग आतापर्यंतच्या अनेक संस्कृतींच्या उदयाची गोष्ट असो. भूतकाळात घडून गेलेल्या अनेक गोष्टी अशा चमत्कारिकरित्या समोर येतात की, आधुनिकीकरणाच्या या काळातही त्यांचे पुरावे विचार करायला भाग पाडतात. असाच एक पुरावा खंबातच्या आखातात सापडला आणि संशोधकही हैराण झाले.

मानवी जीवनात लागलेला हा एक कमाल शोध ठरला जिथं, चक्क एक हरवलेलं शहरच संशोधकांसमोर आलं. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार 9500 वर्षांपूर्वी या शहराला जलसमाधी मिळाली होती. मात्र ते पाण्याखाली कसं नामशेष झालं याचं मूळ कारण मात्र अद्याप समोर आलं नसल्यानं या शहराबाबत बरेच सिद्धांत मांडण्यात येतात.

भारताच्या पश्चिमी किनारपट्टीपासून दूर…

नियमित प्रदूषण सर्वेक्षणादरम्यान, भारताच्या पश्चिमी किनारपट्टीपासून दूर खंभातच्या आखातात संशोधकांना हे ठिकाण सापडलं होतं. ज्यानंतर सोनार तंत्राच्या मदतीनं शहराच्या अनेक रचना आणि बांधकामांचे अवशेष समोर आले ज्या माध्यमातून पाण्याखाली गेलेल्या या शहराची कहाणी साऱ्या जगासमोर उलगडण्यात आली.

पाण्यात साधारण 120 फूट खोलवर हे शहर स्थिरावलं असून, त्याचं क्षेत्रफळ 5 मैल लांब आणि दोन मैल रुंद असल्याचं सांगण्यात आलं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे या शहराच्या अवशेषांमधून भांडी, मोती, मूर्ती आणि काही मानवी अवशेषसुद्धा सापडल्याचं म्हटलं गेलं.

माध्यमांमध्ये उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार एनआईओटीच्या संशोधकंच्या चमूचं नेतृत्वं करणाऱ्या डॉ. बद्रीनारायण यांच्या माहितीनुसार हिमयुगाच्या अखेरच्या टप्प्यात समुद्राच्या वाढत्या पाणीपातळीमुळे मानवी सभ्यतेचं अस्तित्वं कसं धोक्याच आलं याचेच पुरावे या शहरामुळं समोर आले. हे शहर प्राथमिक स्वरुपात हडप्पाच्याही आधीपासून अस्तित्वात असल्याचे संदर्भ सांगण्यात आले.

कुठे आहे हे क्षेत्र?

खंभातच्या आखातातून समुद्राखाली दडलेल्या मानवी सभ्यतेच्या अवशेषांना प्रकाशझोतात आणलं जाण्याची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वीसुद्धा अशी काही वृत्त प्रसिद्ध करण्यात आली होती. हा भाग अरबी समुद्रात गुजरातनजीक असून, मुंबई आणि दीव बेटाच्या अगदी उत्तरेकडे हे क्षेत्र असल्याचं सांगण्यात येतं. कैक वर्षांपासून हे क्षेत्र अनेक इतिहासकारांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असल्याचं पाहायला मिळालं आहे.





Source link

वादळ-पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांचे आदेश

0
वादळ-पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांचे आदेश

फलटण प्रतिनिधी उमेश काकडे :- फलटण तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे व अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे, शेतजमिनीचे, घरांचे आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत तात्काळ पंचनामे करून मदतीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत.

तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार, संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या अधिनस्त गावांमध्ये तात्काळ जाऊन नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून संयुक्त पंचनामे करावेत.

या कामात जर कोणत्याही कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा अथवा कुचराई केली, तर त्यांच्यावर “नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005” मधील कलम 51 ते 56 अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

पंचनाम्यांची माहिती सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी स्वरूपात तात्काळ तहसील कार्यालयात जमा करण्याच्या सूचनाही या आदेशात देण्यात आल्या आहेत.

“मुंबईकरांनो गरज असेल तरच बाहेर पडा”, मुसळधार पावसामुळे पोलिसांचं नागरिकांना आवाहन

0
“मुंबईकरांनो गरज असेल तरच बाहेर पडा”, मुसळधार पावसामुळे पोलिसांचं नागरिकांना आवाहन



step out only if necessary Mumbai police urge citizens due to heavy rainfall |”मुंबईकरांनो गरज असेल तरच बाहेर पडा”, मुसळधार पावसामुळे पोलिसांचं नागरिकांना आवाहन





Source link

rehearsal and demonstration of terrorist attack by District Police Administration in the Mahakali Temple area ​​Chandrapur

0
rehearsal and demonstration of terrorist attack by District Police Administration in the Mahakali Temple area ​​Chandrapur



rehearsal and demonstration of terrorist attack by District Police Administration in the Mahakali Temple area ​​Chandrapur |  दहशतवादी हल्ला झाला तर तोंड कसे द्यायचे ? चंद्रपुरात पोलिसांची रंगीत तालीम





Source link

मुसळधार पावसाने बदलापूरला झोडपले, अवघ्या चार तासांत १६० मिलिमीटर पावसाची नोंद

0
मुसळधार पावसाने बदलापूरला झोडपले, अवघ्या चार तासांत १६० मिलिमीटर पावसाची नोंद



badlapur rain news latest updates 160 milliliter rain in just four hours water accumulated railway stations Badlapur Rain Latest Updates : मुसळधार पावसाने बदलापूरला झोडपले, अवघ्या चार तासांत १६० मिलिमीटर पावसाची नोंद





Source link