Saturday, July 11, 2026
Home Blog Page 211

नीलेश चव्हाणच्या विरोधात ‘लूक आउट’ नोटीस

0
नीलेश चव्हाणच्या विरोधात ‘लूक आउट’ नोटीस



पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सहआरोपी असणारा नीलेश चव्हाण याच्या मागावर पिंपरी-चिंचवड पोलिसांची पाच तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. चव्हाण हा परदेशात पळून जाऊ नये, यासाठी त्याच्या विरोधात ‘लूक आऊट’ नोटीस काढली असल्याचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले.

वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात शनिवारी कलम वाढ करून नीलेश चव्हाण यालाही सहआरोपी केले आहे. वैष्णवी यांच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दहा महिन्यांचे बाळ चव्हाण याच्याकडे असताना कस्पटे कुटुंबीय त्याच्याकडे बाळ आणण्यासाठी गेले असता त्यांना नीलेश याने पिस्तुलाचा धाक दाखवून धमकाविले होते.

त्या प्रकरणातही वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल आहे. हे गुन्हे दाखल झाल्यापासून चव्हाण पसार आहे. तो पोलिसांना गुंगारा देत आहे. पिंपरी पोलीस दलाची चार पथके त्याच्या मागावर होती. सोमवारी आणखी एका पथकाची वाढ करण्यात आली आहे. ठिकठिकाणी ही पथके रवाना करण्यात आली आहेत. मात्र, पोलिसांना अद्यापही त्याचा ठावठिकाणा लागू शकलेला नाही. चव्हाण याच्या भावासह त्याच्या संपर्कातील व्यक्तींकडेही पोलीस कसून चौकशी करीत आहेत.



Source link

शिरूरची पाणीकपात पावसामुळे स्थगित

0
शिरूरची पाणीकपात पावसामुळे स्थगित



शिरूर : शिरूर शहर आणि तालुक्यात संततधार असून, शिरूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोडनदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा भरल्याने दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय रद्द करून दररोज पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

घोडनदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात कुकडी कालवा वितरिकेतून सोडण्यात आलेले पाणी आणि परिसरात झालेला दमदार पाऊस यामुळे बंधारा भरला आहे. त्यामुळे शिरूर शहराला दिवसाआड करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा बंद करून नियमित दररोज पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

पावसामुळे शेतीच्या कामांवर परिणाम झाला आहे. मशागती, पेरण्या लांबल्या आहेत. काही शेतांत पाणी साचले असून, भाजीपालाही सडला आहे.



Source link

अकोलेला एक महिना आधीच पावसाने झोडपले

0
अकोलेला एक महिना आधीच पावसाने झोडपले


अकोले: अकोले शहर व परिसरास पावसाने आज, सोमवारी पहाटे पुन्हा एकदा झोडपून काढले. तासाभरातच ३.५ इंचापेक्षा जास्त पाऊस पडला. गत आठ-दहा दिवसांपासून तालुक्यात रोज पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी तर ढगफुटीसदृश पाऊस झाला. सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. मे महिन्यात प्रथमच एवढा पाऊस पडल्याचे जुनी माणसे सांगतात.

मागील दहा दिवसांत अकोल्यात २३६ मिमी. पावसाची नोंद झाली. जो सरासरीच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गेल्या दहा दिवसांत झालेला एकूण पाऊस मिमी.मध्ये पुढील प्रमाणे- भंडारदरा १२८, घाटघर १७७, पांजरे ९३, रतनवाडी १६४, वाकी १०१, निळवंडे २०८, आढळा धरण १०४.

तालुक्यात पर्जन्यमापकांची संख्या पुरेशी नाही. त्यामुळे झालेल्या नुकसानीची तीव्रता या आकडेवारीवरून लक्षात येत नाही. प्रवरा, आढळा खोऱ्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याच्या साथीने मर्यादित भागात तीव्रतेने अवघ्या तास-दीड तासात कोसळत असलेल्या पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. निळवंडे, भंडारदरा, आढळा धरणांच्या पाणलोटातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मे महिन्यातच ओढे वाहिले. धरणांमध्ये नवीन पाणी येऊ लागले आहे.

हेही वाचा

भंडारदरा धरणात सध्या ३ हजार ६६ दलघफूट (२७.७७ टक्के) पाणी शिल्लक आहे. आज धरणात ५९ दलघफूट पाण्याची भर पडली. निळवंडे धरणाचा आजचा पाणीसाठा २ हजार १५८ दलघफूट(२५.९१ टक्के) होता. धरणात आज ७९ दलघफूट नवीन पाणी आले. धरणाच्या डाव्या कालव्यातून ३०० क्युसेक तर उजव्या कालव्यातून २०० क्युसेक असा ५०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. भंडारदऱ्यातून ७८० क्युसेक विसर्ग वीजनिर्मितीसाठी सुरू आहे तर कोदनी जलविद्युत प्रकल्पासाठी प्रवरा नदीपात्रातून २ हजार ६२१ क्युसेक पाणी वापरले जाते. वीजनिर्मितीनंतर हे पाणी निळवंडे धरणात जमा होते. आढळा धरणातही १० दलघफूट नवीन पाणी आले. धरणात सध्या ५०४ दलघफूट (४६.६० टक्के) पाणी शिल्लक आहे.

पावसाने हवेत चांगलाच गारठा निर्माण झाला. वातावरणातील बदल लक्षात घेता या वर्षी तालुक्यात मोसमी पावसाचे आगमन नेहमीपेक्षा खूपच लवकर होण्याची चिन्हे दिसत आहेत. आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासात पडलेला पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे- भंडारदरा ५५, घाटघर ३६, पांजरे ३०, रतनवाडी ४९, वाकी २८, निळवंडे ४६, आढळा ४२ व अकोले ८४.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा

पावसाने काजवे नाहीत

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून भंडारदरा परिसरात काजवे दिसायला लागतात. ते पाहायला पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. काल, रविवार असल्यामुळे भंडारदरा येथे गर्दी केलेल्या पर्यटकांना मुसळधार पावसामुळे काजवे न पाहताच परतावे लागले.





Source link

solapur covid suspected case | सोलापुरात करोनाबाधित संशयित रुग्ण आढळला

0
solapur covid suspected case | सोलापुरात करोनाबाधित संशयित रुग्ण आढळला


सोलापूर : राज्यात विशेषतः मुंबईत करोनाबाधित रुग्ण पुन्हा वाढत असतानाच सोलापुरातही एक संशयित करोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णावर एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या माहितीला डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दुजोरा दिला आहे.

मुंबईत करोना साथीचा उपसर्ग पुन्हा सुरू झाल्यामुळे तेथील आरोग्य यंत्रणा सजग झाली आहे. त्याचबरोबर इकडे सोलापुरातही संशयित करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे स्थानिक आरोग्य आणि वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. संबंधित संशयित रुग्णावर एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ही माहिती देताना डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी यंत्रणेची विशेष बैठक घेतली. वैद्यकीय महाविद्यालय संलग्न असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात अलगीकरण कक्ष उभारण्यात येत आहे. औषधांचा तुटवडा पडू नये म्हणून दक्षता घेतली जात असून, तशा सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. रुग्णसेवेत कोणतीही उणीव राहू नये म्हणून आपत्कालीन परिस्थितीविषयी खास तालीमही घेण्यात आली आहे, असे डॉ. ठाकूर यांनी सांगितले. यापूर्वी करोना महामारीच्यावेळी रुग्णालयातील नियमित वैद्यकीय सेवेवर परिणाम झाला होता. त्याची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी नियोजन आखले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.





Source link

बदलापुरला पुराचा ‘इशारा’, मे महिन्यातच उल्हास नदीने ओलांडली इशारा पातळी

0
बदलापुरला पुराचा ‘इशारा’, मे महिन्यातच उल्हास नदीने ओलांडली इशारा पातळी



Badlapur receives flood warning, Ulhas river crosses warning level in May itself बदलापुरला पुराचा ‘इशारा’, मे महिन्यातच उल्हास नदीने ओलांडली इशारा पातळी





Source link

पहिली बाज : सर्वसामान्यांच्या घरांची स्वप्नपूर्ती!

0
पहिली बाज : सर्वसामान्यांच्या घरांची स्वप्नपूर्ती!



एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री, तथा गृहनिर्माण मंत्री, महाराष्ट्र राज्य)

घरांच्या किमती गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर गेल्या असताना राज्य शासनाने सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे शिवधनुष्य नव्या गृ़हनिर्माण धोरणाद्वारे उचलले आहे. यातून शहरांचाही वेगवान आणि नियोजनबद्ध विकास पारदर्शकरीत्या होणार आहे…

आमदार म्हणून २१ वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा निवडून आलो, परंतु १९८२ पासून मी समाजकारणात आहे. आजूबाजूच्या लोकांचे किती प्रश्न आहेत, त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, हे मी जवळून पाहिले आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात ‘हक्काचे पक्के घर’ ही सर्वाधिक मानसिक समाधान आणि स्थैर्य देणारी बाब आहे, आणि नेमकी तीच अनेकांच्या आवाक्याबाहेर आहे. नगरविकास, गृहनिर्माण, आणि सार्वजनिक बांधकाम खात्यांचा मंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना या प्रश्नाची तीव्रता माझ्या लक्षात आली. सध्या माझ्याकडे गृहनिर्माण खाते असल्याने, सर्वसामान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला हक्काच्या घरांचा हा प्रश्न मी धसास लावण्याचा दृढ संकल्प केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेले नवे गृहनिर्माण धोरण त्याच संकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री आवास योजने’मुळे (पीएमएवाय) लाखो कुटुंबांची स्वप्ने साकार झाली आहेत. मोदीजींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर, कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत ‘पीएमएवाय’अंतर्गत आणखी तीन कोटी घरे बांधण्याचा निर्णय घेतला. यावरून सर्वसामान्यांची घरे त्यांच्यासाठी किती जिव्हाळ्याची आहेत, हे स्पष्ट होते. राज्यातील महायुती सरकारही याच दिशेने मार्गक्रमण करत आहे. त्यामुळेच नव्या गृहनिर्माण धोरणाचे ब्रीदवाक्य ‘माझे घर – माझा हक्क’ असे बोलके आणि स्वयंस्पष्ट आहे.

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक नागरीकरण असलेले राज्य आहे. आपला शहरीकरणाचा वेग इतर कोणत्याही राज्यापेक्षा जास्त आहे. या वेगाला अनुसरून शहरांचे नियोजित, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचे नियोजन करणे हे मोठे आव्हान आहे. नव्या गृहनिर्माण धोरणात याचे प्रतिबिंब आपल्याला दिसेल. या धोरणामुळे बांधकाम व्यवसायाला चालना मिळेल. लाखो हातांना काम मिळेल. केवळ सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न साकार होणार नाही, तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची होण्यास मोठे बळही मिळणार आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी परवडणारी, शाश्वत आणि समावेशक घरे मिळवून देण्यासाठी हे धोरण निर्णायक आहे. राज्य शासनाने २०३० पर्यंत ३५ लाख घरे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ७० हजार कोटींची गुंतवणूक त्यात केली जाणार आहे. विशेष म्हणजे, सर्वसामान्यांच्या गरजा लक्षात घेऊन यात विशेष उपाययोजना केल्या आहेत. गृहनिर्माण धोरणात ज्येष्ठ नागरिकांचा विचार करणारे महाराष्ट्र हे देशातले एकमेव राज्य आहे. केवळ १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या महानगरपालिकाच नव्हे, तर सर्व महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांना सर्वसमावेशक गृहनिर्माणाचे आदेश देण्यात आले आहेत. कामाच्या ठिकाणाजवळ घरे असावीत, यासाठी ‘एमआयडीसी’ क्षेत्रातील सुविधा भूखंडांसाठी आरक्षित २० टक्के जागेपैकी १० ते ३० टक्के जागा केवळ निवासी वापरासाठी राखीव ठेवली जाईल.

राज्याचे जुने गृहनिर्माण धोरण स्व. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना, १७ वर्षांपूर्वी तयार झाले होते. त्यानंतरच्या काळात मुंबई आणि महानगरांचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाच्या नागरी गृहनिर्माण खात्याच्या अहवालानुसार, मुंबईसाठी १२ लाख आणि महानगरांसाठी २० लाख घरांची गरज आहे. २०३० पर्यंत आणखी १५ लाख घरांची आवश्यकता भासेल. हे लक्षात घेऊन मी गेल्या वर्षी गृहनिर्माण विभागाला सर्वसमावेशक धोरण तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यातून हे धोरण आकाराला आले.

पुनर्विकास प्रकल्पांना गती

आज मुंबईची ४० टक्के लोकसंख्या धारावी, कुर्ला, गोवंडी यांसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये राहते. काँग्रेसच्या काळातील उदासीनतेमुळे धारावी, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी, तसेच बीडीडी नायगाव, मोतीलाल नगर, म्हाडा वसाहती, हजारो ‘एसआरए’ प्रकल्प आणि १६ हजारांहून अधिक उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास रखडला होता. महायुती सरकारच्या ठोस नियोजनामुळे आता या पुनर्विकासाला गती मिळत आहे.

नव्या धोरणात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांसाठी केंद्र सरकारच्या जमिनीचा वापर कसा करता येईल, याचे नियोजन करत आहोत. झोपडपट्ट्यांच्या क्लस्टर पुनर्विकासाला प्रोत्साहन दिले आहे. १० वर्षांच्या संघर्षानंतर सर्वसमावेशक क्लस्टर धोरण मंजूर करून घेण्यात मला यश मिळाले. ठाण्यात आशियातील सर्वात मोठ्या क्लस्टर गृहनिर्माण योजनेला शुभारंभ केला आहे.

प्रगती न झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये नवीन सक्षम विकासकांची निवड निविदा प्रक्रियेद्वारे केली जाईल, यातून विलंब आणि गैरप्रकार पूर्णपणे थांबतील. पुनर्विकास प्रकल्प व्यवस्थित पूर्ण होण्यासाठी सर्व पुनर्विकास प्रकल्पांमध्ये सोसायटी, विकासक आणि प्राधिकरण यांच्यात त्रिपक्षीय करार बंधनकारक करण्यात आला आहे. रहिवाशांच्या संरक्षणासाठी आगाऊ भाडे आणि बँक गॅरंटीसाठी एस्क्रो खाते अनिवार्य केले आहे. किफायतशीर आणि सामाजिक गृहनिर्माण प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी CSR मार्फत निधी गोळा केला जाईल.

स्वयंपुनर्विकास कक्ष नियोजन, निधी, विकासक निवड आणि प्रकल्प अंमलबजावणीद्वारे सोसायट्यांना मार्गदर्शन करण्यासाठी समर्पित स्वयंपुनर्विकास कक्ष प्रस्तावित आहे. यासाठी सुरुवातीला दोन हजार कोटी रुपयांचा निधी ठेवला जाणार आहे. परवडणाऱ्या गृहनिर्माण निधीच्या माध्यमातून अंदाजे २०,००० कोटी रुपयांच्या व्यवहार्यता तफावत निधीचा महत्त्वपूर्ण भाग उपलब्ध करणे आवश्यक आहे.

मुंबई ही खऱ्या अर्थाने कष्टकऱ्यांची आहे. भूमिपुत्र आणि गरिबांना स्वस्त तसेच हक्काची घरे, हा त्यांचा अधिकारच आहे. मुंबईतून बाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणण्यासाठी गृहनिर्माणाच्या नवनवीन योजना आणल्या जात आहेत. सिडको, एमएमआरडीए, महाप्रित, म्हाडा, एसआरए व महापालिका या सर्व संस्थांना एकत्र करून रखडलेले प्रकल्प मार्गी लावले जात आहेत.

धारावीचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी पुनर्विकासाला सुरुवात झाली आहे. माझ्या कारकीर्दीत धारावीकरांचे स्वप्न साकार होत असल्याचे मला वेगळे समाधान आहे. महायुती सरकारच्या काळात पात्र तसेच अपात्र झोपडपट्टीवासीयांचेही पुनर्वसन केले जाणार आहे. नगरविकास विभागाचा कार्यभार माझ्याकडे असताना, २०२० मध्ये ‘युनिफाइड डेव्हलपमेंट कंट्रोल अॅण्ड प्रमोशन रेग्युलेशन्स (यूडीसीपीआर) ही क्रांतिकारी नियमावली लागू केली. यातून, अतिरिक्त चटईक्षेत्रामुळे जुन्या शहरांत रखडलेल्या पुनर्विकासाला चालना मिळाली. बांधकाम परवानग्या आणि मंजुरी प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने प्रकल्पांमधील विलंब टळत आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही राज्य गृहनिर्माण माहिती पोर्टल हा केंद्रीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणार आहोत. याद्वारे घरांची मागणी आणि पुरवठा यांचा डेटा, सदनिकांचे जिओ-टॅगिंग, निधी वितरण, जिल्हानिहाय भूखंडांचा डेटा आणि महारेरा, महाभूलेख, पीएम गतीशक्ती यासारख्या प्रणालींशी समन्वय साधला जाईल आणि रिअल-टाइम अचूक माहिती उपलब्ध होईल.

समन्वयाने जमीन बँक

आपल्याकडे जमीन बँक नसल्याने कोणत्या जमिनी उपलब्ध आहेत आणि घरबांधणी योजनांसाठी योग्य आहेत, हे एका दृष्टिक्षेपात समजत नाही. या धोरणाद्वारे निवासी वापरासाठी योग्य असलेल्या शासकीय जमिनींची बँक निर्माण करणार आहोत. महसूल आणि वन विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळ, एमआयडीसी, जलसंपदा विभाग यांच्या समन्वयाने २०२६ पर्यंत ही राज्यव्यापी जमीन बँक विकसित होईल.

सध्या शहर नियोजनाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. लोकांना घरे, पाणीपुरवठा, सांडपाणी/ कचरा विल्हेवाट, चांगले रस्ते, आरोग्य सेवा, मनोरंजनाची साधने यांसारख्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे शहरे अनियंत्रितपणे वाढणार नाहीत, वाहतूक कोंडी, पर्यावरणीय हानी आणि पायाभूत सुविधांवर ताण येणार नाही, याची काळजी विकास आराखडे तयार करताना घेतली आहे. हे धोरण ग्रीन बिल्डिंग पद्धतींना प्रोत्साहन देते, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांचे एकत्रीकरण करते व शहरांचे जास्तीत जास्त हरितीकरण करण्यावर भर देते. मी स्वत: सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलो आहे. मुंबई-ठाण्यासारख्या ठिकाणी पोटापाण्यासाठी येणाऱ्या कुटुंबांना स्वत:च्या घराचे स्वप्न पाहण्याची हिंमतही अनेकांना होत नाही. हे नवीन गृहनिर्माण धोरण अशा लोकांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठीच आहे. नवीन घराच्या किल्ल्या घेऊन गृहप्रवेश करणाऱ्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरील हास्य हीच माझ्या कामाची पावती आहे, असे मी मानतो.



Source link

तेजप्रताप यादव प्रकरणात आता ऐश्वर्या रायची एंट्री, म्हणाली ’12 वर्षांपासून…’; बिहारच्या राजकारणात खळबळ

0
तेजप्रताप यादव प्रकरणात आता ऐश्वर्या रायची एंट्री, म्हणाली ’12 वर्षांपासून…’; बिहारच्या राजकारणात खळबळ



तेजप्रताप यादवांच्या प्रेम की रासलिलामुळं यादव घराण्यात यादवी माजली आहे. 
 



Source link

अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर पाथ’, १५० पेक्षा जास्त करिअर व अभ्यासक्रमांबाबत माहिती उपलब्ध

0
अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर पाथ’, १५० पेक्षा जास्त करिअर व अभ्यासक्रमांबाबत माहिती उपलब्ध



‘Career Path’ for students on the 11th admission website. Information on over 150 careers and courses available अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर पाथ’, १५० पेक्षा जास्त करिअर व अभ्यासक्रमांबाबत माहिती उपलब्ध





Source link

घाटकोपरमध्ये क्षुल्लक वादातून वाहनचालकाची हत्या करणारा दुचाकीस्वार अटकेत

0
घाटकोपरमध्ये क्षुल्लक वादातून वाहनचालकाची हत्या करणारा दुचाकीस्वार अटकेत



two wheeler rider arrested for murder of driver over petty dispute in Ghatkopar घाटकोपरमध्ये क्षुल्लक वादातून वाहनचालकाची हत्या करणारा दुचाकीस्वार अटकेत





Source link

अकरावी प्रवेश प्रक्रियेबरोबरच कल चाचणीही प्रारंभ

0
अकरावी प्रवेश प्रक्रियेबरोबरच कल चाचणीही प्रारंभ



नाशिक – शैक्षणिक विश्वात दहावी आणि बारावी परीक्षेनंतर पुढे काय, हा प्रश्न सातत्याने पालक आणि विद्यार्थ्यांना पडत असतो. करिअरची यशस्वी वाट सापडावी, यासाठी मार्गदर्शन जरूरी असते. ही वाट शिक्षण विभागाच्या डायटकडून विद्यार्थ्यांना दाखवली जाते. यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू असताना कल चाचणीस आरंभ झाला. जिल्ह्यातील पाच केंद्रांवर ही परीक्षा २६ ते ३० या कालावधीत होत आहे.

बऱ्याचदा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांकडून विद्यार्थी, पालकांना वेगवेगळे सल्ले दिले जात असतांना या जुजबी ज्ञानामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या डायट विभागाच्या वतीने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कल चाचणी घेण्यात येते. ही परीक्षा मुंबई, पुणे येथे होत होती. यंदा शिक्षण विभागाच्या सहकार्याने ती नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या केंद्रावर घेण्याचे ठरले. यासाठी जिल्ह्यातून ७०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले. काही कारणास्तव नियोजन कोलमडल्याने परीक्षा अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर होत आहे. सोमवारपासून ३१ मे पर्यंत ही परीक्षा वेगवेगळ्या केंद्रांवर होणार आहे. नाशिक, मालेगाव, येवला, दिंडोरी आणि देवळा या पाच केंद्रावर ही कल चाचणी होणार आहे. या पाच केंद्रावर जवळच्या तीन तालुक्यातील विद्यार्थी येतील. एकावेळी २० ते २५ विद्यार्थी ही चाचणी देणार असून तीन ते चार तास लागणार आहेत. यासाठी केंद्रावर दोन ते तीन जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्रावर विद्यार्थ्यांचा कुठल्या शाखेकडे कल आहे, हे पाहण्यासाठी चाचणी होणार आहे. यानंतर त्यांच्या प्रश्नपत्रिका तपासण्यात येतील. त्याचा अहवाल तयार करण्यात येईल, त्यानुसार विद्यार्थ्यांना समूपदेशन करण्यात येणार आहे. चाचणी झाल्यानंतर पुढील दोन दिवसात विद्यार्थ्यांना समूपदेशनासाठी बोलविण्यात येईल. या चाचणीमुळे विद्यार्थ्यांना आपला कल हा नियमित की व्यावसायिक शिक्षणाकडे, हे समजण्यास मदत होणार आहे.

विद्यार्थी आणि पालकांच्यादृष्टीनेही महत्वपूर्ण टप्पा म्हणजे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय, हा असतो. या टप्प्यावर विद्यार्थी आणि पालकांना व्यवस्थित मार्गदर्शन न मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या पुढील भवितव्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच शिक्षण विभागाकडून घेण्यात येणाऱ्या कल चाचणीला महत्व आहे.



Source link