Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 176

सोलापूरच्या क्रीडा विकासात ऐतिहासिक पाऊल!पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते 400 मीटर सिंथेटिक ट्रॅकचे भूमिपूजन

0
सोलापूरच्या क्रीडा विकासात ऐतिहासिक पाऊल!पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते 400 मीटर सिंथेटिक ट्रॅकचे भूमिपूजन

सोलापूर साहस Times : सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी आज एक नवीन पर्व सुरु झाले आहे. जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका येथे उभारण्यात येणाऱ्या 400 मीटर सिंथेटिक ट्रॅकचे भूमिपूजन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पार पडले.

जिल्हा क्रीडा संकुल समिती सोलापूर आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी क्रीडा उपसंचालक युवराज नाईक (पुणे) यांनी पालकमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

कार्यक्रमाला अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, प्रभारी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार तसेच क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या ट्रॅकच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा संकुलातील प्रशिक्षण व स्पर्धा अधिक दर्जेदार व सर्वसमावेशक होणार आहेत. शासन क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे आणि सोलापूरच्या क्रीडा वारशाला राज्य, देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचे उद्दिष्ट यामागे आहे.

मनाचं मांगल्य, बुद्धीची कसोटी आणि विज्ञान हेच बुद्ध धम्माचे मूलतत्त्व – सोमीनाथ घोरपडे

0
मनाचं मांगल्य, बुद्धीची कसोटी आणि विज्ञान हेच बुद्ध धम्माचे मूलतत्त्व – सोमीनाथ घोरपडे

फलटण (साहस Times ): भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने वर्षवास प्रवचन मालिकेचे चौथे पुष्प ढवळ या गावी गुंफण्यात आले. यावेळी अनित्यवाद, अनात्मवाद आणि दुःख या विषयावर मार्गदर्शन करताना भारतीय बौद्ध महासभेचे प्रवचनकार म्हणाले की,मनाचं मांगल्या, बुद्धीची कसोटी आणि विज्ञान हेच बुद्ध धम्माचे मूलतत्त्व असून सर्वप्रथम चार आर्य सत्य सांगितली ज्यामध्ये पहिलंच आर्य सत्य दुःख आहे. पण भगवान बुद्धांनी दुःख निवारण्याचा मार्ग म्हणजेच आर्य अष्टांग मार्गही सांगितला. भगवान बुद्धांनी अनात्मवादाचा सिद्धांत सांगितला. भगवान बुद्धांनी आपल्या उद्देशांमध्ये आत्मा नावाची कोणतीही वस्तू नसल्याचे स्पष्ट सांगितले असून त्यांनी मनाला सहावे इंद्रिय मानले आहे. कारण कोणत्याही कुशल कुशल कर्माचे उगम स्थान मन आहे. म्हणून त्या मनामध्ये मांगल्य, प्रेम,मंगल मैत्रीची भावना निर्माण करणं हेच भगवान बुद्धाच्या धम्माचा सार आहे. जगात कोणतीही गोष्ट हे अंतिम नसून ती परिवर्तनीय आहे.अनित्य आहे. क्षणा – क्षणाला त्यामध्ये बदल होत असतो.तेव्हा या वर्षावासाच्या कालावधीमध्ये व पुढील आयुष्यात आपण मनाचे मांगल्य, बुद्धीची कसोटी, आणि विज्ञान या तीन तत्त्वाचा अंगीकार करून आपले जीवन बुद्ध,धम्म आणि संघ बलाने सुखकर बनवावे असे प्रतिपादन सोमीनाथ घोरपडे यांनी मौजे ढवळ येथे वर्षावास मालिकेतील चौथे पुष्प गुंपताना केले.
या कार्यक्रमाला केंद्रीय असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु दादासाहेब भोसले, तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयु महावीर भालेराव, महासचिव आयु बाबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष आयु विठ्ठल निकाळजे, प्रचार आणि पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु रामचंद्र मोरे, कार्यालयीन सचिव आयु चंद्रकांत मोहिते आणि ढवळ गावचे सुपुत्र आणि भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार सचिव आयु बजरंग गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच पंचशील मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते,बौद्ध उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे औचित्य साधून 13 एप्रिल 2025 रोजी घेण्यात आलेली ‘झटपट धम्म ज्ञान परिक्षा’ या परिक्षेसाठी ढवळ गावातुन 22 विद्यार्थी बसले होतो.त्यांना भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रत देखील देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु बजरंग गायकवाड यांनी केले.शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

“आषाढी यात्रेत दोन कोटी भाविकांचा सहभाग – सेवेत झटणाऱ्यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते गौरव”

0
“आषाढी यात्रेत दोन कोटी भाविकांचा सहभाग – सेवेत झटणाऱ्यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते गौरव”

पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता मेळाव्यात सत्कार; स्वच्छतादूतांचा भावनिक गौरव

पंढरपूर : आषाढी वारीच्या काळात पंढरपूर नगरी व पालखी मार्गावर तब्बल दोन कोटींहून अधिक वारकरी भाविकांनी सहभाग नोंदवला. या वारीची यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासन यंत्रणेत झटणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व स्वच्छतादूतांचा सन्मान राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

शहरातील श्रीयश पॅलेस येथे पार पडलेल्या “आषाढी यात्रा २०२५ कृतज्ञता मेळावा” या कार्यक्रमात पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा, नगरपालिका आणि विविध विभागांतील कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा सिईओ कुलदीप जंगम, पुण्याचे सीईओ गजानन पाटील, साताऱ्याचे सीईओ याशनी नागराजन, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, अतिरिक्त सीईओ संदीप कोहिणकर आदींचा सन्मान करण्यात आला.

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, “२५ लाख भाविक पंढरपूर नगरीत आले, तर दीड कोटी भाविकांनी पालखी मार्गावर दर्शन घेतले. प्रशासन यंत्रणेच्या नियोजनामुळे वारी यशस्वी झाली. निर्मल वारी, महास्वच्छता अभियान, जर्मन हॅंगर सुविधा यामुळे भाविक समाधानी होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच माझे खरे समाधान आहे.”

या कार्यक्रमात स्वच्छतादूतांचे विशेष सन्मान करून उपस्थितांना भावनिक क्षण अनुभवायला मिळाले. वाखरीचे स्वच्छता कर्मचारी जितेंद्र पोरे, भारूडकार चंदाताई तिवाडी, गाडगेबाबांच्या वेशातील नागटिळक, कलाकार दत्तात्रय येडवे व संजय बिदरकर यांना गौरवण्यात आले. कला पथकाच्या सादरीकरणाने वातावरण मंत्रमुग्ध झाले.

माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी प्रशासन यंत्रणेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत सांगितले की, “यंत्रणा मनावर घेतल्यास काम उत्कृष्ट होते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी आभार मानले.

१ ऑगस्टपर्यंत वाढीव सन्मानरक्कम न दिल्यास १५ ऑगस्ट रोजी मंत्रालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा

0
१ ऑगस्टपर्यंत वाढीव सन्मानरक्कम न दिल्यास १५ ऑगस्ट रोजी मंत्रालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा

मुंबई : राज्य शासनाच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेत शासनाने मंजूर केलेली वाढीव सन्माननिधीची रक्कम अद्याप लाभार्थी पत्रकारांना अदा झालेली नाही. त्यामुळे ही वाढीव रक्कम (दरमहा रुपये ९ हजार) व एप्रिल २०२४ ते जुलै २०२५ पर्यंतचा फरक (रु. १ लाख ४४ हजार) १ ऑगस्ट २०२५ पर्यंत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा १५ ऑगस्ट २०२५ रोजी मंत्रालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाच्यावतीने देण्यात आला आहे.

सदर निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले असून, यामध्ये संघाचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ (वय ८२) व त्यांच्या सहकाऱ्यांकडून उपोषणाची तयारी दर्शवण्यात आली आहे. ही माहिती पत्रकार कल्याण निधीचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके व संपादक संघाचे प्रशासकीय संचालक अमर शेंडे यांनी दिली.

फलटण येथे चायना मांजा विरोधात रॅलीचे आयोजन

0
फलटण येथे चायना मांजा विरोधात रॅलीचे आयोजन

फलटण साहस Times : नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर शहरात आकाश पतंगांनी भरून जात असताना, दुसरीकडे चायना मांजाच्या वापरामुळे अपघातांची शक्यता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर फलटण नगरपालिकेने चायना मांजाविरोधात धडक मोहिम सुरू केली असून, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या जनजागृती रॅलीत नागरिकांना चायना मांजामुळे होणाऱ्या जीवघेण्या जखमा, पक्षांचे होणारे मृत्यू, तसेच पर्यावरणावर होणारा परिणाम याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. पर्यावरणपूरक, नैसर्गिक व सुरक्षित मांजा वापरण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

फलटण पोलिस प्रशासन आधीपासूनच चायना मांजावर कारवाई करत असताना, आता नगरपालिका देखील स्वतःहून चायना मांजा वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नगरपालिकेने दिलेल्या इशाऱ्यानुसार, चायना मांजाचा वापर आढळल्यास संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

पुरुषांमधील स्पर्म काऊंट 100 पटीने वाढवतील 1 रुपयांचे ‘हे’ 2 पदार्थ, राजीव दीक्षित यांनी दिला रामबाण घरगुती उपाय

0
पुरुषांमधील स्पर्म काऊंट 100 पटीने वाढवतील 1 रुपयांचे ‘हे’ 2 पदार्थ, राजीव दीक्षित यांनी दिला रामबाण घरगुती उपाय


Infertility Home Remedies in Just 10 Rupees : पुरुषांमध्ये अनेक प्रकारचे आजार सामान्य झाले आहेत, त्यापैकी बहुतेक जीवनशैलीशी संबंधित आजार आहेत. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारांचा समावेश आहे. तथापि, गेल्या अनेक वर्षांपासून, एक गोष्ट नेहमीच अनेक पुरुषांना त्रास देत आहे, ज्यामध्ये त्यांच्या शुक्राणूंची संख्या सतत कमी होऊ लागते. पुरुष या समस्येवर मात करण्यासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न करतात, परंतु त्यापैकी बहुतेक प्रभावी नाहीत. अशा परिस्थितीत, तुम्ही राजीव दीक्षित यांनी सांगितलेल्या एका सोप्या उपायाचा वापर करु शकता. ज्यामुळे तुमचे शुक्राणू जलद वाढतील आणि तुम्हाला फायदे मिळतील.

पुरुषांसाठी सोपा उपाय

गेल्या काही वर्षांत पुरुषांमध्ये नपुंसकता किंवा शुक्राणूंची संख्या कमी होणे खूप वाढले आहे, यामुळेच लोक चिंतेत आहेत की त्यांना मूल होऊ शकत नाही, यासाठी ते अनेक डॉक्टरांकडे देखील जातात. अशावेळी तुम्ही राजीव दीक्षित यांनी सांगितलेला घरगुती उपाय वापरून पाहू शकता. हे खूप सोपे आहे आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. हा आयुर्वेदिक रस मायग्रेनचा त्रास त्वरित कमी करू शकतो, पोषणतज्ञांनी सांगितले की औषध घेण्याची गरज भासणार नाही

दोन अतिशय स्वस्त पदार्थ

राजीव दीक्षित यांनी त्यांच्या एका मार्गदर्शनात सांगितले होते की, ज्या पुरुषांना शुक्राणूंची कमतरता असते त्यांना मूल होण्यास खूप त्रास होऊ शकतो. त्यांच्यासाठी उसाचा रस आणि थोडासा चुना हे एक खात्रीशीर औषध आहे. हे जगातील सर्वात आश्चर्यकारक औषध आहे. जर तुमचे गुडघे आणि खांदे दुखत असतील तर हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. ते शारीरिक कमकुवतपणा आणि नपुंसकतेवर देखील काम करते.

महिलांसाठी देखील फायदेशीर

कॅल्शियमची कमतरता असलेल्या महिलांसाठी खाण्यायोग्य चुना देखील खूप फायदेशीर आहे. ते घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही ते पाण्यात विरघळवून घेऊ शकता. लक्षात ठेवा की तुम्हाला फक्त एक चिमूटभर चुना घ्यावा लागेल. उसाचा रस आणि चुना देखील महिलांमध्ये वंध्यत्वाच्या समस्येशी लढण्यास मदत करू शकतात. उसाच्या रसात एक चिमूटभर चुना मिसळा आणि काही महिने सतत प्या, त्यानंतर तुम्हाला नक्कीच फायदा दिसेल. जर तुम्हाला खूप त्रास होत असेल तर तुम्ही यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

फलटण नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी सुवर्णसंधी – मालमत्ता करावरील दंड व व्याजात ५० टक्क्यांपर्यंत सूट

0
फलटण नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी सुवर्णसंधी – मालमत्ता करावरील दंड व व्याजात ५० टक्क्यांपर्यंत सूट

फलटण (साहस Times ) : आर्थिक अडचणींमुळे मालमत्ता कर भरणे थकीत राहिलेल्या नागरिकांसाठी शासनाने दिलासा देणारी अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून थकीत मालमत्ता करावरील दंड व व्याजाच्या रकमेवर ५० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. त्यामुळे करदात्यांनी संधीचे सोने करत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले आहे.

मोरे म्हणाले की, कर वेळेवर न भरल्यास दरमहा दोन टक्के दंड आकारला जातो. त्यामुळे मूळ कर रकमेपेक्षा दंड आणि व्याजाची रक्कम अधिक होऊन नागरिकांच्या एकूण थकबाकीत भर पडते. याचा परिणाम नगरपालिकेच्या कर वसुलीवर आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा-सेवांवर होतो.

अभय योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये:

  • मालमत्ता करावरील दंड व व्याजावर ५०% माफी
  • माफीचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज आवश्यक
  • दंड व व्याज वगळता शिल्लक कराची संपूर्ण रक्कम भरणे बंधनकारक
  • काही प्रकरणांमध्ये ५०% पेक्षा अधिक सूट मिळू शकते
  • लाभ केवळ एकदाच घेता येणार
  • मर्यादित कालावधीसाठी योजना लागू

मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तातडीने फलटण नगरपालिकेच्या कर विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही मुख्याधिकारी मोरे यांनी केले.

धक्कादायक! हायवा ट्रकच्या अपघातानंतर २४ तासांत आचार्य कुटुंबातील चौघांचा मृत्यू; बारामती हादरली

0
धक्कादायक! हायवा ट्रकच्या अपघातानंतर २४ तासांत आचार्य कुटुंबातील चौघांचा मृत्यू; बारामती हादरली

बारामती :- बारामती शहरातील खंडोबानगर येथील महात्मा फुले चौकात रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने एकाचवेळी वडील आणि दोन चिमुकल्यांचा जीव गेला. भरधाव हायवा ट्रकने दिलेल्या धडकेत ओंकार राजेंद्र आचार्य, त्यांची १० वर्षांची मुलगी सई ओंकार आचार्य आणि ४ वर्षांची मधुरा ओंकार आचार्य यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण बारामती हादरली होती.

मात्र, या आघाताचे दुःख सहन न झाल्यामुळे आज (सोमवार) पहाटे ओंकार यांचे वडील आणि निवृत्त शिक्षक राजेंद्र श्रीनिवास आचार्य (वय ७०) यांचंही दुःखद निधन झालं. ते गेले काही दिवस आजारी होते आणि दोनच दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्यात आले होते.

एकाच कुटुंबातील चार जणांचा अवघ्या २४ तासांत मृत्यू झाल्याने बारामती शहरासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. राजेंद्र आचार्य हे इंदापूर तालुक्यातील सणसर परिसरात शिक्षक म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते. त्यामुळे ते स्थानिकांमध्ये चांगले परिचित होते. त्यांच्या अकस्मात निधनाने सणसर आणि बारामतीत हळहळ व्यक्त होत आहे.

“विकासावर बोला, वैयक्तिक टीका करू नका!” – रणजितसिंह नाईक-निंबाळकर

0
“विकासावर बोला, वैयक्तिक टीका करू नका!” – रणजितसिंह नाईक-निंबाळकर

फलटण (साहस Times) | “मला शिव्या घाला की सूर्याला धरा, मी तुम्हाला एकही अर्वाच्य शब्द वापरणार नाही,” अशा शब्दांत माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर परखड टीका केली.

कोळकी (ता. फलटण) येथे नुकत्याच पार पडलेल्या सभेत आमदार रामराजे यांनी माजी खासदार रणजितसिंह यांच्या वाय प्लस सुरक्षेवर सवाल उपस्थित केला होता. यावर प्रत्युत्तर देताना रणजितसिंह यांनी स्पष्ट शब्दांत विरोधकांवर हल्लाबोल केला.

“मी फलटण तालुक्याला जिल्हा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तरुणांच्या हाताला काम मिळावं म्हणून कोट्यवधी रुपयांचा निधी केंद्र व राज्य सरकारकडून आणला. नवीन कालवे, राष्ट्रीय व राज्य महामार्ग, तसेच इतर सुविधा घेऊन फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे त्यांनी नमूद केले.

“पण विरोधक विकासावर न बोलता माझ्यावर वैयक्तिक टीका करत आहेत. त्यांच्या काळात विकासाचा अजिबात विचार झाला नाही. आज मी तालुक्याला पुढे नेत असताना, हे लोक प्रत्येक कामात अडथळा आणत आहेत. त्यांना विकास खुपतोय,” असा आरोप करत त्यांनी विरोधकांना उद्देशून तीव्र शब्दांत टोले लगावले.

जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘सेमी इंग्लिश’ शिक्षणाची नवी दिशा – मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

0
जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘सेमी इंग्लिश’ शिक्षणाची नवी दिशा – मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

सातारा | साहस Times प्रतिनिधी :- सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्याचा शासनाचा कटाक्ष राहणार आहे, अशी ठाम ग्वाही ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांनी दिली आहे.

खटाव तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा शिरसवडी (७ वर्ग) व पळशी (९ वर्ग) येथील नवीन वर्ग खोल्यांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी मा. आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, युवानेते अंकुश गोरे, प्रा. बंडा गोडसे, अनिल माळी, धनंजय चव्हाण, चिन्मय कुलकर्णी, सोमनाथ भोसले, विशाल बागल, डॉ. विवेक देशमुख, भरतशेठ जाधव, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्यासह शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

शाळांना दर्जेदार आणि स्पर्धात्मक बनवण्याचा निर्धार
मंत्री गोरे म्हणाले, “जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शासन सर्व सुविधा देणार आहे. पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे. खाजगी शाळांशी स्पर्धा करण्यासाठी जिल्हा परिषद शाळाही आदर्श बनल्या पाहिजेत. यासाठी सेमी इंग्लिश शिक्षण हा महत्त्वाचा टप्पा आहे.”

गावकऱ्यांचे सहकार्य शाळांच्या यशाचे गमक
“ज्या शाळांमध्ये गावकऱ्यांनी सहकार्य केले, त्या शाळा आदर्श शाळा बनल्या. शिरसवडी व पळशी हे त्याचे उदाहरण आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी स्थानिकांनी शाळांना आर्थिक आणि सामाजिक पाठबळ द्यावे,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

विकासकामांना निधीचा अडथळा नाही
रस्ते, वीज, पाणी आणि शिक्षण यावर शासनाचा प्राधान्यक्रम असून माण-खटावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ZP शाळांच्या विद्यार्थ्यांनी साधले उच्चपदस्थ यश
“आज जिल्हा परिषद शाळांमधून शिकलेले विद्यार्थी विविध संस्थांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळांमध्ये दाखल करावे,” असे आवाहनही मंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थितांना केले.