Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 175

गुरु द्रोणा अकॅडमीतील मारहाण प्रकरण गाजतंय! प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

0
गुरु द्रोणा अकॅडमीतील मारहाण प्रकरण गाजतंय! प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

फलटण साहस Times :- फलटण शहरात खासगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण नसल्यामुळे गंभीर प्रकार घडू लागले आहेत. शहरातील गुरु द्रोणा अकॅडमीमध्ये एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा कामगार संघर्ष संघटनेने तीव्र निषेध करत दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

या पार्श्वभूमीवर संघटनेचे अध्यक्ष सनी घनश्याम काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून फलटणमधील खासगी अकॅडम्यांविरोधात प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर व गटशिक्षणाधिकारी अनिल सपकाळ यांनी कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचा आरोप आहे. या निष्क्रियतेमुळेच अशा प्रकारचा गंभीर अनर्थ घडल्याचे कामगार संघटनेचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक शोषणाचे आरोप लावले जात असलेल्या गुरु द्रोणा अकॅडमीने शाळांतील अभ्यासक्रम शिकवून पालकांची दिशाभूल व फसवणूक केल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेने आगामी ०४ ऑगस्ट, सोमवार रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण पुकारले असून, दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कामगार संघर्ष संघटनेच्या वतीने शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा मानसिक व आर्थिक शोषण करणाऱ्या संस्थांपासून दूर राहावे.

रामराजेंच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास – राष्ट्रवादीच्या रणनितीतील मोठा टप्पा

0
रामराजेंच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास – राष्ट्रवादीच्या रणनितीतील मोठा टप्पा

फलटण, 31 जुलै 2025 –राजकारणात सध्या अनेक समीकरणे बदलताना दिसत आहेत. काही काळ अलिप्त झाल्याची चर्चा असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी नुकतेच फलटण तालुक्यातील कोळकी येथे कार्यकर्त्यांच्या समोर दिलेले विधान चर्चेचा विषय ठरत आहे. “माझे वरिष्ठांशी बोलणे झाले आहे, त्यामुळे अजिबात काळजी करू नका,” असे सांगत रामराजेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दिशेने मैत्रीचा हात पुढे केला आहे.

त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादा आणि रामराजेंमध्ये पडद्याआड खलबते झाल्याचे संकेत मिळाले आहेत. परिणामी, श्रीमंतांची पुन्हा एकदा अजित पवारांच्या गटात दमदार पुनरागमन होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत ‘राजेगट’ हा बॅड बुकमध्ये असल्याची कुजबुज होती, पण आता तो गुड बुकमध्ये येतोय, अशी चर्चा रंगली आहे.

तीन दशकांची शाश्वत कामगिरी

गेल्या ३० वर्षांत रामराजेंनी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागात जलसिंचनाच्या माध्यमातून हिरवळ निर्माण केली आहे. त्यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्राच्या वाट्याचे तब्बल ८१ टीएमसी पाणी अडवले गेले असून, ५५ तालुक्यांमध्ये सिंचन सुविधा पोहोचविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे ते अजित पवार यांच्यासाठी आजही एक विश्वासू आणि अनुभवी चेहरा ठरू शकतात.

राजकीय समीकरणे बदलणार?

महाविकास आघाडीने लोकसभेत ३० खासदार निवडून आणल्यावर विधानसभेतही तेच चित्र राहील, अशी अपेक्षा होती. मात्र, अनेक अंतर्गत घटकांमुळे महायुतीने विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी सातारा जिल्ह्याची सूत्रे संजीवराजेंकडे दिली होती, त्याच वेळी रामराजे निंबाळकरही प्रमुख भूमिकेत होते. आता पुन्हा हेच चित्र उभे राहण्याची शक्यता आहे.

अनिकेतराजेंचा सुसंवाद

अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रामराजेंचे सुपुत्र अनिकेतराजे निंबाळकर यांनी अजितदादांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. या भेटीमुळे रामराजे कुटुंबीय पुन्हा एकदा अजितदादांच्या जवळ जात असल्याची स्पष्ट चिन्हे राजकीय वर्तुळात उमटली आहेत.

रामराजेंच्या वयाकडे पाहून नाही, कर्तृत्वाकडे पाहा

राजकारणात वयाच्या आधारावर अनेक वेळा टीका होते. पण रामराजेंनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की, अनुभव आणि प्रशासनातील दांडगा प्रभाव आजही त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका अशा महत्त्वाच्या निवडणुकांत अजितदादांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा श्रीमंतांच्या खांद्यावरच आपली धुरा सोपवणार, असे संकेत मिळत आहेत.

सुविधेच्या शाळेसाठी’ शिक्षकांचा बनवेगिरीचा खेळ; पुण्यनगरीच्या बातमीने फोडला !

0
सुविधेच्या शाळेसाठी’ शिक्षकांचा बनवेगिरीचा खेळ; पुण्यनगरीच्या बातमीने फोडला !

सातारा :-  सातारा जिल्ह्यातील शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये मोठा घोटाळा उघड झाला आहे. संवर्ग एकमधून जवळची शाळा मिळावी, यासाठी काही प्राथमिक शिक्षकांनी बोगस दिव्यांग किंवा दुर्धर आजाराचे दाखले सादर करत प्रशासकीय यंत्रणेला गंडवण्याचा प्रयत्न केला.

या प्रकाराची गंभीर दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने सिव्हिल हॉस्पिटल येथे फेरतपासणी मोहीम सुरू केली असून आतापर्यंत २७० शिक्षक व नातेवाईकांची तपासणी झाली असून त्यात तब्बल ४४ शिक्षक अपात्र ठरले आहेत.

त्यात विशेष म्हणजे २१ शिक्षकांनी फेरतपासणीपासून धूम ठोकली आहे. अशा गैरहजर राहणाऱ्यांविरुद्ध शिक्षण विभागाने कारवाई सुरू केली असून, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांच्या आदेशानुसार निलंबनपूर्व नोटिसा पाठवल्या गेल्या आहेत.


🟠 ‘दुर्गम नको, तर हवी सोयीची शाळा!’

महाबळेश्वर व जावलीसारख्या दुर्गम तालुक्यांतील शाळांमध्ये न जावं लागावं, यासाठी काही शिक्षकांनी आरोग्य यंत्रणेचा वापर करत खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचं स्पष्ट झालं आहे. यावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व सीईओ यशनी नागराजन यांनी तातडीने हालचाली करत फेरतपासणीचे आदेश दिले.


🔴 संवर्ग दोनमधील ‘दाखला घोटाळा’ही समोर

दैनिक पुण्यनगरीच्या दुसऱ्या वृत्तानुसार, संवर्ग दोनमधील काही शिक्षकांनी खोटे अंतराचे दाखले देऊन बदली घेतल्याचे उघड झाले आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम विभागातील दोषींवर लवकरच चौकशी होणार आहे.


🟢 ४० शिक्षक पात्र; मात्र ८ अपात्र, तर काहींनी पाठ फिरवली!

फेरतपासणीच्या चौथ्या टप्प्यात ५५ शिक्षक व नातेवाईकांना वेळापत्रक दिलं गेलं होतं. त्यात ४९ जणांची तपासणी झाली असून ४० शिक्षक पात्र ठरले. ८ शिक्षक अपात्र, तर ६ शिक्षकांनी तपासणीकडे पाठ फिरवली.


📢 “बँड लावून वाजतगाजत आणायचं का त्यांना? शिक्षण विभाग काही खासगी मालमत्ता नाही!”

फेरतपासणीपासून पळणाऱ्या शिक्षकांविरोधात संताप व्यक्त होत असून, त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: तुलसीदासजींचे मानवतेसाठी‎मोठे योगदान, मनावर राज्य‎

0
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:  तुलसीदासजींचे मानवतेसाठी‎मोठे योगदान, मनावर राज्य‎


  • Marathi News
  • Opinion
  • Column By Pt. Vijayshankar Mehta, Tulsidasji’s Great Contribution To Humanity, Ruling The Mind

23 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

या काळात मानवी मन दु:खी-कष्टी आहे. सतत अशा घटना‎कानावर येत आहेत की त्या ऐकून आणि वाचून मनात भीतीही निर्माण‎होते आणि चिंतादेखील वाढते. टीव्ही आणि मोबाइल आले आणि‎त्यांनी आपले प्रभाव दाखवून दिले. त्यांच्यामुळेही मानवी मन त्रस्त‎झाले. पण त्या वेळी आपल्याकडे समज नव्हती की आपण‎सावधगिरी बाळगावी. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या या युगात‎आपण थोडे जागरूक व्हायला हवे.

आज माणसांनी वाचणे आणि‎लिहिणे जवळपास थांबवले आहे. आज तुलसीदासजींची जयंती‎आहे. यानिमित्ताने आपली मुले दोन ग्रंथ रामचरितमानस आणि‎भगवद्गीता वाचतील एवढा तरी प्रयत्न आपण करावा.‎तुलसीदासजींनी रामचरितमानस लिहून मानवी मनासाठी एक अत्यंत‎सुंदर कार्य केले आहे. त्यांनी अनेक प्रसंगांमध्ये आदर्शाला वास्तवावर‎विजय मिळवून दिला. रामचरितमानसची सर्वात मोठी भाषा-शक्ती ही‎आहे की त्यात लोकोक्ती आणि म्हणी अत्यंत सोप्या पद्धतीने सादर‎केल्या आहेत. काही दोहे आणि चौपाया तर भारतीय मनात इतक्या‎खोलवर बसल्या आहेत .



Source link

आंबेडकरी नेतृत्वाचं बळ अन् विजयाबाईंचा विजय !

0
आंबेडकरी नेतृत्वाचं बळ अन् विजयाबाईंचा विजय !

परभणी:   10 डिसेंबर 2024. मंगळवार. सकाळची वेळ होती. लोक आपापल्या कामाला निघाले होते. शहरात सगळं नेहमीसारखं वाटत होतं. पण अचानक संविधान चौकात एक गंभीर घटना घडली. एका व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाऊन संविधानाच्या प्रतिमेची विटंबना केली. संविधानाच्या काचेची तोडफोड झाली. काही जागरूक नागरिकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्या व्यक्तीने थांबण्याऐवजी जास्तच आक्रमकपणा दाखवला.

संविधान म्हणजे समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य. संविधान म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे संविधानाची विटंबना म्हणजे थेट भारतीय लोकशाहीवर आणि बाबासाहेबांच्या विचारांवर आघात होता. याचा निषेध म्हणून परभणी शहरात आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू झाली. टायर जाळण्यात आले, रस्ते रोखले गेले. लोकांचा संताप उफाळून आला होता.

परंतु पोलिस प्रशासनाने या आंदोलनांना दबावाने थांबवण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांवर लाठीचार्ज केला गेला. काही जणांना ताब्यात घेतलं गेलं. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका तरुणाला अटक झाली. पोलिस कोठडीत असताना सोमनाथ याचा मृत्यू झाला. पोलिस म्हणाले की, त्याच्या छातीत दुखत होतं, श्वास घ्यायला त्रास झाला. पण जेव्हा शवविच्छेदनाचा अहवाल आला, तेव्हा कळलं की त्याच्यावर पोलिसांनी जबरदस्त मारहाण केली होती. अहवालात स्पष्ट शब्दात लिहिलं होतं, ‘शॉक फॉलोइंग मल्टिपल इंज्युरीज’

हा प्रकार अत्यंत गंभीर होता. पोलिसांच्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला होता. पण राज्य सरकारने आणि पोलिस खात्याने ही बाब दडपण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री म्हणाले, श्वसनाचा त्रास होता. पोलिस म्हणाले हृदयविकाराचा झटका होता. पण वास्तव पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये वेगळंच सांगत होतं. ही लपवाछपवी आंबेडकरी समाजाला, संविधान मानणाऱ्या नागरिकांना मान्य नव्हती.

या सगळ्या प्रकारात राजकीय पक्ष गप्प राहिले. कुणीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. पण एक माणूस सुरुवातीपासून या लढ्याच्या केंद्रस्थानी होता. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर. त्यांनीच पहिल्यांदा या घटनेची दखल घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट फोनवर बोलून पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन थांबवायला लावलं. आणि परिणामी पोलिसांनी जे मारहाण सुरू केली होती, त्यात महिला, वृद्ध, तरुण, गर्भवती सुद्धा वाचल्या.

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृतदेहाला परभणीत अंत्यविधीसाठी नेलं जात असताना पोलिसांनी अँब्युलन्स अडवून जबरदस्ती लातूरला वळवली. हा प्रकार पूर्णपणे अमानवी होता. बाळासाहेब आंबेडकरांनी तात्काळ पोलिस महानिरीक्षकांना फोन केला आणि अँब्युलन्सची दिशा परत परभणीकडे वळवली. ते स्वतः अंतिम संस्काराच्या वेळी उपस्थित राहिले. कुटुंबाला धीर दिला. त्यांनी सरकारकडे 1 कोटी रुपये नुकसानभरपाईची मागणी केली. स्वतःच्या पक्षामार्फत 5 लाखांची मदत दिली.

इतकंच नव्हे, तर न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाला कायदेशीर लढाईचं रूप दिलं. औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. पण पोलिसांनी हा आदेश आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 25 जुलै 2025 रोजी सुनावणी होती. पोलिसांनी वेळ मागितली, आणि पुढील सुनावणी 30 जुलैला ठेवण्यात आली.

30 जुलै 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक निकाल लागला. ‘महाराष्ट्र राज्य विरुद्ध विजयाबाई सूर्यवंशी’ या प्रकरणात न्यायालयाने थेट वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने निर्णय दिला. उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. म्हणजेच दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा मार्ग आता मोकळा झाला. हा निर्णय केवळ एक व्यक्तीच्या न्यायासाठी नव्हता, तर संपूर्ण व्यवस्थेतील उत्तरदायित्वासाठी होता.

प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीची ही लढाई म्हणजे केवळ राजकारण नव्हे, तर आंबेडकरी विचारांच्या आधारावर लढलेली एक संविधानवादी चळवळ होती.

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू केवळ एका तरुणाचा मृत्यू नव्हता. तो होता एका संविधानप्रेमी आवाजाचा खून होता. त्याच्या आईने सरकारच्या पैशाचं आमिष नाकारलं. न्याय हाच त्यांचा हेतू होता. आणि बाळासाहेब आंबेडकरांसारख्या नेतृत्वामुळे त्यांना तो मिळालाही.

या संपूर्ण संघर्षातून एक गोष्ट पुन्हा सिद्ध झाली संविधानावर प्रेम करणाऱ्या लोकांचा आवाज दडपता येत नाही. अन्याय कितीही मोठा असो, तो न्यायाने हरवता येतो पण त्यासाठी मैदानात उतरणं लागतं, आवाज उठवावा लागतो, तडजोड न करता लढावं लागतं.

सोमनाथ सूर्यवंशींसारख्या तरुणांच्या बलिदानामुळेच समाजाला नवीन दिशा मिळते. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या आधारावरच या देशात आजही न्याय मिळू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
_

आकाश मनीषा संतराम

त्सुनामीच्या लाटा हवाईत पोहोचल्या, बंदरे बंद, जहाजे समुद्रकिनाऱ्यावरच राहणार

0
त्सुनामीच्या लाटा हवाईत पोहोचल्या, बंदरे बंद, जहाजे समुद्रकिनाऱ्यावरच राहणार



रशियाच्या कामचटका द्वीपकल्पात ८.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर पॅसिफिक महासागरात त्सुनामीच्या तीव्र लाटा उसळल्या.



Source link

संवर्ग दोनमध्येही शिक्षकांची ‘जादा अंतर’ हेराफेरी!

0
संवर्ग दोनमध्येही शिक्षकांची ‘जादा अंतर’ हेराफेरी!

सातारा :- “संवर्ग एक”मधील बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या कारनाम्यानंतर आता “संवर्ग दोन”मधील शिक्षक दांपत्यांची अंतराच्या दाखल्यात हेराफेरी करत बदली मिळवण्याची साखळी उघड झाली आहे. माण तालुक्यातील सात शिक्षक दांपत्यांनी ३० किमीपेक्षा जास्त अंतर असल्याचे भासवणारे जादा दाखले जोडून चुकीच्या पद्धतीने बदलीचा लाभ घेतल्याची गंभीर माहिती उजेडात आली आहे.

सदर प्रकरणांमध्ये बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम, तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून जादा अंतराचे दाखले मिळवण्यात आले आहेत. या कारवायेमुळे जिल्हा परिषद प्रशासन सतर्क झाले असून मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. काही शिक्षकांनी तर अगदी मायक्रो प्लॅनिंग करत ३० किमीपेक्षा अधिक अंतराचा दाखला तयार करून शाळा मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे.

वडील आणि दोन चिमुकल्यांचा अपघातात मृत्यू; बारामतीत अवजड वाहनांना प्रवेशबंदीसह कडक उपाययोजना

0
वडील आणि दोन चिमुकल्यांचा अपघातात मृत्यू; बारामतीत अवजड वाहनांना प्रवेशबंदीसह कडक उपाययोजना

बारामती (साहस Times ) :-  बारामती शहरातील खंडोबानगर भागात काही दिवसांपूर्वी घडलेल्या हृदयद्रावक अपघाताने संपूर्ण शहर हादरले. वडील ओंकार आचार्य आणि त्यांच्या दोन मुली सई व मधुरा यांचा भरधाव हायवा ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे बारामतीकरांमध्ये संतापाची लाट उसळली असून, रस्ते सुरक्षेबाबत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर बारामती प्रशासन सतर्क झाले असून तातडीने वाहतूक सुधारणा उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. प्रांताधिकारी वैभव नावडकर, मुख्याधिकारी पंकज भुसे, वाहतूक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, परिवहन आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली.

प्रांताधिकारी नावडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार –

  • बारामतीत सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.
  • शहरात ठिकठिकाणी आवश्यकतेनुसार गतिरोधक बसवले जाणार आहेत.
  • दिशादर्शक फलक लावले जाणार आहेत.
  • शाळांमध्ये शिक्षक, पालक आणि वाहतूक पोलिसांचा समावेश असलेली वाहतूक व्यवस्थापन समिती स्थापन केली जाणार आहे.
  • अंतर्गत रस्त्यांचे सर्वेक्षण करून वाहनांचा वेग मर्यादित करण्यावर भर दिला जाणार आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्या कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागांची बैठक घेण्यात आली. पुण्यातील काही सामाजिक संस्थांनीही शहरातील वाहतूक व्यवस्थेवर सर्वेक्षण सुरु केले आहे.

प्रशासन सर्व घटकांना सोबत घेऊन शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. लवकरच या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.


📰 साहस Times
आपल्या भागातील वास्तव, जबाबदारीने.

दर 1 तासाने होतंय लघवीला? पावसाळा किंवा जास्त पाणी प्यायल्याने नव्हे तर ‘या’ 5 आजारांची लक्षणं!

0
दर 1 तासाने होतंय लघवीला? पावसाळा किंवा जास्त पाणी प्यायल्याने नव्हे तर ‘या’ 5 आजारांची लक्षणं!


Peeing Every Hour Health Sign: पावसाळ्यात लोकांना वारंवार लघवीला जावे लागते, कधी-कधी तर दर तासाला जावे लागते. पावसाळ्यात आपल्याला हे नॉर्मल वाटतं. अनेकदा जास्त पाणी प्यायल्यामुळेच सारखं सारखं लघवीला होतं, असा आपला समज असतो. पण अनेकदा हे असंच असेल असं नाही. वारंवार लघवीला होणं हे आजाराचं लक्षणदेखील असू शकतं. आरोग्य तज्ञांनी याबद्दल माहिती दिलीय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  

आरोग्य समस्यांचे लक्षण कोणती?

उन्हाळ्याच्या तुलनेत पावसाळ्यात लघवीचे प्रमाण वाढते, कारण थंड हवामानात घाम कमी येतो आणि शरीरातील अतिरिक्त पाणी लघवीद्वारे बाहेर टाकले जाते. थंडीमुळे मूत्राशयावर परिणाम होतो. पावसाळ्यात हवेत ओलावा जास्त असतो, आणि श्वासाद्वारे शरीरात ओलावा प्रवेशतो, ज्यामुळे फुफ्फुसांना कमी पाण्याची गरज भासते. परिणामी, लघवीचे प्रमाण वाढते. तथापि, दर तासाला लघवीचा दबाव येणे हे काही आरोग्य समस्यांचे लक्षण असू शकते, असे तज्ज्ञ सांगतात.

कितीवेळा लघवी होणे सामान्य?

नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील मूत्ररोग तज्ञ डॉ. अमरेंद्र पाठक यांनी याबद्दल माहिती दिलीय. 24 तासांत 7 ते 8 वेळा लघवी होणे सामान्य आहे. परंतु जर एखाद्याला प्रत्येक तासाला लघवीला जावे लागत असेल, तर ही समस्या गंभीर असू शकते. 

पुरुषांमध्ये समस्या?

पावसाळ्यात लोक जास्त प्रमाणात चहा आणि कॉफी पितात, ज्यामध्ये मूत्रवर्धक गुणधर्म असतात, ज्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते. शिवाय 40 ते 45 वयानंतर पुरुषांमध्ये प्रोस्टेट वाढीची समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे वारंवार लघवीला जावे लागते. इतर काही आरोग्य समस्यांमुळेही ही समस्या उद्भवू शकते, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नये.

वारंवार लघवी होतेय?

मूत्राशयात साधारण 300 ते 400 मिली लघवी साठवण्याची क्षमता असते. परंतु मूत्राशय संवेदनशील झाल्यास, 100 मिली लघवी जमा झाल्यावरही लघवीचा दबाव जाणवतो. याला ‘ओव्हरएक्टिव्ह ब्लॅडर’ म्हणतात. प्रोस्टेटच्या समस्या, मूत्रमार्गाचा संसर्ग, किंवा रक्तातील साखरेची उच्च पातळी यामुळेही वारंवार लघवी होऊ शकते. काही हृदयरोग्यांना रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी दिली जाणारी औषधेही लघवीचे प्रमाण वाढवू शकतात, अशी माहिती डॉ. पाठक यांनी दिली.

काय घ्याल काळजी?

मधुमेहींना वारंवार लघवीला जावे लागते, कारण साखर लघवीद्वारे बाहेर टाकली जाते, ज्यामुळे मूत्रमार्ग संसर्गाचा धोकाही वाढतो.मूत्ररोग तज्ञांच्या मते, हिवाळ्यात लघवीचे प्रमाण वाढणे सामान्य आहे, परंतु यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चहा आणि कॉफीचे सेवन मर्यादित करावे आणि मधुमेह नियंत्रणात ठेवावा. मूत्रमार्ग संसर्गाची शंका असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि तपासणी करावी. वारंवार लघवीची समस्या असल्यास प्रथम मूत्ररोग तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

चाचण्यांचा निकाल?

शारीरिक तपासणीनंतर डॉक्टर औषधे सुचवू शकतात. यानंतर, लघवीचा प्रवाह तपासणी, अल्ट्रासाऊंड, लघवी चाचणी आणि रक्तातील साखरेची चाचणी केली जाऊ शकते. या चाचण्यांच्या निकालांवरून समस्येचे मूळ कारण समजेल, आणि त्यानुसार औषधोपचाराने वारंवार लघवीची समस्या कमी होऊ शकते.





Source link

चायना मांजाचा जीवघेणा विळखा! फलटणमध्ये दुचाकीस्वार जखमी; १८ टाके

0
चायना मांजाचा जीवघेणा विळखा! फलटणमध्ये दुचाकीस्वार जखमी; १८ टाके


फलटण (साहस Times ) :- फलटण मलटण येथील पांडुरंग कुंभार हे दुचाकीवरून जात असताना, नायरा पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या मानेला चायना मांजाचा गंभीर फटका बसला. या दुर्घटनेत त्यांचा गळा खोलवर कापल्याने त्यांना तात्काळ फलटण येथील स्वामी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

स्वामी हॉस्पिटलचे सर्जन डॉ. रविंद्र बिचकुले यांनी अतिशय तत्परतेने उपचार केले. त्यांच्या मानेला तब्बल १८ टाके टाकावे लागले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

चायना मांजाविरोधात अनेक वेळा जनजागृती मोहीम राबवली जाते. तसेच, त्याचा वापर व विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. तरीदेखील, अशा घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत.

पोलिसांच्या भरारी पथकाद्वारे काही कारवाई होते खरी, पण संपूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही, ही खेदजनक बाब आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

चायना मांजाचा वापर फक्त माणसांच्या नव्हे, तर पक्ष्यांच्याही जीवाला धोका निर्माण करत आहे. पतंग उडवणं आनंददायी असलं, तरी प्राणघातक मांजा वापरणं समाजासाठी संकट बनत आहे.

सामान्य नागरिकांकडून एकच मागणी —
“पतंग उडवा, पण चायना मांजाचा वापर करू नका!”