Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 160

ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार कालवश – Marathi News | Veteran Actor Achyut Potdar Passes Away At Age Of 91 Zws 70

0
ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार कालवश – Marathi News | Veteran Actor Achyut Potdar Passes Away At Age Of 91 Zws 70


मुंबई : हिंदी-मराठी चित्रपटात साकारलेल्या चरित्र भूमिकांमधून लोकप्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे सोमवारी रात्री १० वाजून १० मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले. येत्या २२ ऑगस्टला त्यांचा ९१ वा वाढदिवस साजरा होणार होता, मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती पोतदार यांच्या कन्या अनुराधा पारसकर यांनी दिली.

सोमवारी रात्री अचानक बेशुद्ध पडल्याने त्यांना तातडीने ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांंच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अर्थशास्त्राचे प्राध्यापक, सैन्यदलातील चमकदार कामगिरी, तेथून निवृत्त झाल्यानंतर २५ वर्षे इंडियन ऑईल कंपनीतील काम सांभाळून अभिनयाचे वेड जपणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचा जीवनप्रवास हा बहुआयामी होता. त्यांची अभिनय क्षेत्रातील वाटचाल उशिरा सुरू झाली असली तरी त्यांनी पंडित सत्यदेव दुबे, विजया मेहता, सुलभा देशपांडे यांच्यासारख्या नाट्यक्षेत्रातील दिग्गजांबरोबर दीर्घकाळ काम केले होते.

रंगभूमी ते पुढे हिंदी-मराठी चित्रपट अशी मजल दरमजल करत छोटा पडदाही त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवला. मराठी आणि हिंदी मिळून तब्बल १२५ चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या. जाहिरातविश्वातही ते तितकेच लोकप्रिय होते. ‘तेजाब’, ‘परिंदा’, ‘अंगार’, ‘रंगीला’, ‘राजू बन गया जंटलमन’ अशा कित्येक हिंदी चित्रपटांतून त्यांनी केलेल्या चरित्र भूमिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. अगदी राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील त्यांचा ‘कहना क्या चाहते हो…’ हा संवाद खूप गाजला होता.

मालिकांमध्येही ठसा

मालिका विश्वातही ‘भारत एक खोज’, ‘वागळे की दुनिया’ अशा लोकप्रिय मालिकांचा ते भाग होते. २०२२ मध्ये ‘झी मराठी’ वाहिनीवर त्यांनी ‘माझा होशील ना’ या मालिकेत साकारलेली आप्पांची भूमिकाही प्रचंड लोकप्रिय ठरली. करोना काळातही त्यांनी चित्रीकरणात सहभाग घेत मालिकेत काम केले होते. गेल्या वर्षी २२ ऑगस्टला त्यांचा ९० वा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यात आला होता. चित्रपट-नाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवर त्यावेळी उपस्थित होते. त्यांचा जीवनप्रवास उलगडणारे ‘अच्युत पोतदार – अ लाईफ ऑफ सिम्पलिसिटी, रेझिलिएन्स अँड कन्टेन्टमेन्ट’ या त्यांच्या कन्या अनुराधा पारसकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचेही प्रकाशन त्या सोहळ्यात करण्यात आले होते.





Source link

पोटावरची चरबी लोण्यासारखी वितळेल, फक्त प्या घरी बनवलेलं ओझेम्पिक ड्रिंक

0
पोटावरची चरबी लोण्यासारखी वितळेल, फक्त प्या घरी बनवलेलं ओझेम्पिक ड्रिंक


जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी ओझेम्पिक वापरण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम माहित असले पाहिजेत. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घरी एक नैसर्गिक पेय तयार करू शकता जे तुम्हाला ओझेम्पिकसारखेच फायदे देऊ शकते. घरी बनवलेले ओझेम्पिक पेय आरोग्यासाठी चांगले आहे का आणि चरबी कमी करू शकते का?

आजकाल सोशल मीडियावर ओझेम्पिकची खूप चर्चा होत आहे. खरं तर, हे एक औषध आहे जे मधुमेह नियंत्रित करण्यासाठी बनवले गेले होते, परंतु आता लोक वजन कमी करण्यासाठी देखील या औषधाचा वापर करत आहेत. केवळ सामान्य लोकच नाही तर मोठे सेलिब्रिटी देखील वजन कमी करण्यासाठी ओझेम्पिकचे सेवन करत आहेत. यात किती सत्य आहे हे अद्याप समोर आलेले नाही. असे मानले जाते की, ओझेम्पिक औषध देखील वजन कमी करण्यास मदत करते. ज्यांना कमी वेळात वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हे आहे. कोणतेही औषध घेण्यापूर्वी, नेहमीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कधीकधी औषधाचे काही दुष्परिणाम देखील होतात. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी ओझेम्पिक घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही घाई करणे टाळावे कारण त्याचे अनेक दुष्परिणाम देखील आहेत. तज्ञांच्या मते, त्याचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे सारकोपेनिया. या आजारात हात आणि पायांमध्ये अशक्तपणा आणि वेदना जाणवतात.

याशिवाय, ओझेम्पिक यकृताला देखील नुकसान पोहोचवू शकते आणि डोळे देखील कमकुवत करू शकते. आहारतज्ज्ञ मनप्रीतने तिच्या इंस्टाग्रामवर घरगुती फॅट बर्नर ड्रिंक रेसिपी शेअर केली आहे, जी ओझेम्पिकइतकीच प्रभावी आणि आरोग्यदायी आहे. जर तुम्हाला तुमचे वजन कोणत्याही दुष्परिणामांशिवाय नियंत्रित करायचे असेल आणि तुमच्या रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करायची असेल, तर तुम्ही घरी एक पेय तयार करू शकता जे ओझेम्पिकसारखे फायदे देते. (फोटो क्रेडिट): Insta/dietitian_manpree

​ ओझेम्पिक म्हणजे काय?

ओझेम्पिक हे एक औषध आहे जे मधुमेह नियंत्रित करण्यासाठी बनवले गेले होते, परंतु एका संशोधनात असे आढळून आले आहे की हे औषध घेणाऱ्या लोकांनी एका वर्षात त्यांचे वजन १५% पर्यंत कमी केले आहे. हे औषध २०१७ मध्ये बनवले गेले होते, परंतु २०२१ मध्ये हे औषध लठ्ठपणा कमी करणारे औषध म्हणून देखील घेतले जाऊ लागले. हे एक इंजेक्शन करण्यायोग्य औषध आहे, म्हणजेच ते इंजेक्शनद्वारे घेतले जाते. ओझेम्पिक आठवड्यातून फक्त एकदाच घ्यावे लागते. ३० किंवा त्याहून अधिक BMI असलेल्या लोकांना हे औषध घेण्याचा सल्ला दिला जातो.

हे औषध कसे कार्य करते?

ओझेम्पिक शरीरात GLP 1 नावाच्या हार्मोनचा प्रभाव वाढवते. हे हार्मोन रक्तातील साखर नियंत्रित करण्यास आणि भूक कमी करण्यास मदत करते. म्हणजेच, ओझेम्पिक भूक कमी करते आणि जलद वजन कमी करण्यास मदत करते. ओझेम्पिक सामान्यतः टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांसाठी बनवले जात असे. परंतु ते वापरणाऱ्या लोकांमध्ये वजनात लक्षणीय घट देखील दिसून आली आहे.





Source link

Opposition criticizes Election Commissioner over issues related to irregularities in voter lists

0
Opposition criticizes Election Commissioner over issues related to irregularities in voter lists



Opposition criticizes Election Commissioner over issues related to irregularities in voter lists | भाजप प्रवक्त्यासारखे वर्तन; विरोधकांची निवडणूक आयुक्तांवर टीका





Source link

महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेलं, साताऱ्यात दारुच्या नशेत टल्ली रिक्षाचालकाचं कृत्य

0


सातारा : साताऱ्यात रिक्षा चालकाने महिला पोलीस कॉन्स्टेबलला फरफटत नेल्याची घटना घडली. साताऱ्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खंडोबा माळपासून मार्केट यार्डपर्यंतचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेत महिला पोलीस कॉन्स्टेबल रक्तबंबाळ झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. दारुच्या नशेत टल्ली झालेल्या रिक्षावाल्याला अटकाव करताच चालकाने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

महिला पोलिसाला फरफटत नेणाऱ्या रिक्षा चालकाला पकडून नागरिकांनी चोप दिला. नंतर या ठिकाणी पोलीस आल्यानंतर त्यांनी त्या रिक्षाचालकाला अटक केली. या घटनेमुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाल्याचं दिसून आलं.

दारु पिऊन रिक्षा चालवली

दारुच्या नशेत माळाचा ओढा परिसरात बेभान झालेल्या रिक्षाचालकाने अनेक वाहनांना धडक दिल्याची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाली. भाग्यश्री जाधव या महिला पोलीस कॉन्स्टेबल यांनी रिक्षाचा पाठलाग करत या रिक्षा चालकाला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र रिक्षा चालकाने कॉलर पकडत हिसका देऊन त्यांना खाली पाडले.

या झटापटीत महिला कॉन्स्टेबलचा रेनकोट रिक्षाचा मागील अँगलमध्ये अडकला. त्यानंतर रिक्षासोबत महिला पोलीस कॉन्स्टेबल 200 मीटर हून अधिक फरफटत गेल्याची धक्कादायक घटना घडली. हा संपूर्ण थरार साताऱ्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजेच खंडोबाचा माळ येथून मनाली कॉर्नरपर्यंत घडला. या रस्त्यांवर असलेल्या दुकानांमधील सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे.

जमावाकडून रिक्षा चालकाला चोप

या घटनेत ती महिला कॉन्स्टेबल चांगलीच जखमी झाली असून ती रक्तबंबाळ झाल्याचं दिसून आलं. दरम्यान त्या रिक्षाचालकाने तीन ते चार गाड्यांनाही धडक दिली. महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेत असताना त्या रिक्षाचालकाला अडवण्यासाठी काही नागरिकांनी प्रयत्न केला. नागरिकांनी त्या रिक्षाचालकाला पकडलं आणि चांगलाच चोपही दिला.

महिला कॉन्स्टेबलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल

या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्याच्याविरोधात गुन्हा नोंद केला. तसेच जखमी महिला कॉन्स्टेबलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृत्ती सध्या स्थिर आहे. 

 

आणखी वाचा



Source link

फलटणमध्ये निवडणूक तयारीला सुरुवात; प्रभाग रचनेवर हरकतींचे आवाहन

0
फलटणमध्ये निवडणूक तयारीला सुरुवात; प्रभाग रचनेवर हरकतींचे आवाहन

फलटण — नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या तयारीला सुरुवात झाली असून प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या नगर विकास विभागाच्या आदेशानुसार हा कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. आज, दि. १८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली असून, नागरिकांना आपल्या हरकती व सूचना सादर करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे यांनी दिली आहे.

नागरिकांसाठी ही प्रभाग रचना नगरपरिषदेच्या सूचना फलकावर आणि अधिकृत वेबसाईटवर कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक नागरिकांनी आपल्या हरकती किंवा सूचना ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नगरपरिषद कार्यालयातील कर विभागात लेखी स्वरूपात सादर कराव्यात. मुदतीनंतर आलेल्या हरकतींचा विचार होणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हरकती व सूचना दाखल केलेल्या नागरिकांसाठी स्वतंत्र सुनावणी आयोजित करण्यात येईल व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, असेही निखिल मोरे यांनी सांगितले.

​सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत : वैभववाडी सडुरे येथे दरड कोसळली… – Marathi News | Sindhudurg Heavy Rain Landslide Disrupts Life Ocd 94

0
​सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत : वैभववाडी सडुरे येथे दरड कोसळली… – Marathi News | Sindhudurg Heavy Rain Landslide Disrupts Life Ocd 94



​सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत : वैभववाडी सडुरे येथे दरड कोसळली… – Marathi News | Sindhudurg Heavy Rain Landslide Disrupts Life Ocd 94 – Latest Maharashtra News at Loksatta.com





Source link

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, विशेष अधिवेशन बोलवा; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी

0


सातारा : राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून मुंबईसह (mumbai) विविध जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मुंबईतील रस्त्यांना वाहत्या नद्यांचे रुप आल्याचं दिसून येत आहे. मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसामुळे (Rain) शेती पिकांचे आणि बळीराजाचे मोठं नुकसान झालं आहे. नदीच्या प्रवाहात जनावरे वाहून गेली असून शेतातही पाणीच पाणी झाल्याने बळीराजाला अतिवृष्टीचा फटका बसल्याचं चित्र दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant shinde) यांनी केली आहे. तसेच, सरकारने विशेष अधिवेशन बोलवून शेतकऱ्यांना मदत द्यावी, असेही त्यांनी म्हटलं आहे.  

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी तात्काळ विशेष अधिवेशन घेण्याची मागणी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. मात्र, अद्याप पंचनामे देखील झालेले नाहीत. ज्या ठिकाणचे पंचनामे झाले आहेत त्यांना अद्याप मदत झालेली नाही. त्यामुळे, राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करुन एकरी 50 हजारांची मदत करावी, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे. 

शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन उभारू 

महायुती सरकारची घोषणाच कर्जमाफीची होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत वेळ आली तर कर्जमाफी करू, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरसकट कर्जमाफी करता येत नाही, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे, जर सरकारने लवकरच सरसकट कर्जमाफीची घोषणा केली नाही तर आम्ही शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठं आंदोलन उभारू, असा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागात मुख्यमंत्री 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पावसाचा आढावा घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागात येऊन पाहणी केली. राज्यातील विविध भागात जी अतिवृष्टी होत आहे त्यात कंट्रोल रुममधून संवाद साधला. यावेळी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी उपलब्ध होते. राज्यात दोन दिवसांपासून अतिवृष्टी होते आहे, 18 ते 21 ऑगस्टमध्ये पाऊस अधिक असणार आहे. त्यामुळे, काही जिल्ह्यात रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट आहे. अंबा जगबुडी नदी इशारा पातळीपर्यंत पोहचली आहे, वशिष्टी नदीवर देखील लक्ष ठेऊन आहे. तापी आणि हतनूरला अधिक पाणी आल्याने रावेरमध्ये पाणी शिरलंय. तसेच, जळगाव सर्वाधिक अफेक्टेड आहे, पुणे जिल्ह्यात सर्वच धरणात चांगले पाणी आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्‍यांनी दिली. 

आदिती तटकरेंचंही आवाहन

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार मुंबई महानगर व परिसरात पुढील 3-4 तास अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. 
या पार्श्वभूमीवर सर्व मुंबईकरांना कळकळीची विनंती, आपण सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षातील 1916 या मदत सेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. 

आणखी वाचा



Source link

साताऱ्यातील घाटमाथ्यांवर पावसाचा रेड अलर्ट, प्रमुख धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू

0


Maharashtra Weather Update : सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये असलेल्या घाट माथ्यावर गेले दोन दिवसापासून मुसळधार पाऊस (Weather Update) सुरू झाला असून या भागातील धरण परिसरामध्ये मोठा पाऊस झाला आहे. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातून 12 हजार 100 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे, धोम-बालकवडी धरणातून 2,330 क्यूसेक, धोम धरणातून 2, 268 क्यूसेक पाणी सोडले जात आहे. कनेर धरणातून 740 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. परिणामी नदीनाल्यांच्या काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, नदी पात्रात जाण्याचे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. असा इशारा देखील यावेळी नागरिकांना देण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी, 32 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली

अशातच, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळेच पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 29 फूट पाच इंच इतकी आहे. तर आणखी एक फूट पाणी पातळी वाढल्यास पंचगंगा पुन्हा एकदा पत्राच्या बाहेर पडू शकते. दरम्यान, घाटमाथ्यावर पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. त्यामुळेच राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडले. त्यामुळे भोगावती नदीपात्रामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. परिणामी, जिल्हा प्रशासनाने भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असल्याने सुमारे 32 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत सर्वाधिक पावसाची नोंद

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. कालपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली होती. मात्र आता कणकवलीमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गडनदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीचे पाणी कणकवली-मालवण राज्य मार्गांवर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही वाहन चालक त्याच पाण्यातून वाट काढत जातं आहेत. जिल्ह्यात आज देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहवं, असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. गेल्या 24 तासांत 86 मी.मी. सरासरी जिल्ह्यात पाऊस कोसळला असून सर्वाधिक पाऊस 172 मी.मी पाऊस कणकवलीत कोसळला आहे.

कुंभी आणि वारणा धरणातून विसर्ग वाढणार

दुसरीकडे, वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये  होत असलेल्या पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत होणारी वाढ  होत आहे. जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी आजपासून सकाळी 10 वाजता वक्र द्वाराद्वारे 5000 क्युसेक विसर्ग  सुरू करण्यात येत आहे व विद्युतगृहातून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून तो 1630 क्युसेक असून एकूण  6630 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. परिस्थितीनुसार विसर्ग सुरू करण्यात येईल.

दरम्यान, कुंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. कुंभी धरणातूनही आज वक्रद्वाराद्वारे 1000  क्युसेक व विद्युतगृहातून चालू असणारा 300 क्युसेक असा एकूण 1300 क्युसेक विसर्ग कुंभी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे, त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

आणखी वाचा



Source link

in thane eknath shinde launches ladki sun surakshit sun campaign for women safety

0
in thane eknath shinde launches ladki sun surakshit sun campaign for women safety



in thane eknath shinde launches ladki sun surakshit sun campaign for women safety | लाडकी बहीण योजनेनंतर ‘लाडकी सून, सुरक्षित सून’ अभियानाची घोषणा.., शुभारंभानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…





Source link

बौद्ध धम्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत – विठ्ठल निकाळजे

0
बौद्ध धम्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत – विठ्ठल निकाळजे

फलटण : बौद्ध धम्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून बौध्द धम्मात धम्म, अधम्म आणि सदधम्म याचे विश्लेषण सांगितले असून सदधम्मावर आधारित जीवन जगण्याचा मार्ग तथागतांनी सांगितला आहे. बौध्द धम्मात कुठलेही कर्मकांड, अंधश्रद्धा नाही. तिथे वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला जातो असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे यांनी केले. ते भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुक्याच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेतील आठवी पुष्प गुंपताना बोलत होते.
बौद्ध धम्म व विज्ञान यांच्यात अनेक समानता आहेत. दोन्ही सत्य शोधण्यासाठी, पूर्वग्रहांना बाजूला ठेवण्यासाठी आणि प्रत्यक्ष अनुभवावर विश्वास ठेवण्यासाठी प्रयत्न करतात.
बौद्ध धर्म आणि विज्ञानातील समानता
अनुभवावर आधारित आहे.विज्ञान प्रयोगांवर आणि निरीक्षणांवर आधारित असते, तर बौद्ध धर्म साधकाच्या प्रत्यक्ष अनुभवावर आणि आत्म-निरीक्षणावर भर देतो. दोन्हीमध्ये, एखादी गोष्ट खरी आहे असे केवळ सांगितले म्हणून स्वीकारली जात नाही, तर ती स्वतः अनुभवून पाहिली जाते.
कार्य-कारण संबंध हे जसे विज्ञानामध्ये प्रत्येक घटनेमागे काही कारण असते असे मानले जाते. त्याचप्रमाणे बौद्ध धर्मात प्रतीत्यसमुत्पाद हे तत्वज्ञान आहे, जे सांगते की, कोणतीही घटना घडण्यामागे कोणते ना कोणते तरी कारण असतेच. कोणतीही घटना कारणाशिवाय घडत नाही.
पूर्वग्रहांना नकार हे एक महत्वाचे तत्व असून वैज्ञानिक पद्धतीमध्ये, संशोधक आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून निष्पक्षपणे निरीक्षण करतात. त्याचप्रमाणे, बौद्ध धर्मात गौतम बुद्धानी त्यांच्या अनुयायांना सांगितले की, कोणत्याही गोष्टीवर केवळ श्रद्धेमुळे किंवा परंपरेमुळे विश्वास ठेवू नका, तर ती स्वतः तपासल्यानंतरच स्वीकारा.
सतत बदल हे विज्ञानाचे शाश्वत सत्य आहे. विज्ञान विश्वातील प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते असे मानते. बौद्ध धर्मात, अनित्यता हे एक मूलभूत तत्व आहे, जे सांगते की, सर्व काही क्षणभंगुर आहे आणि सतत बदलत असते.
बौद्ध धर्म आणि विज्ञानातील फरक
अंतिम उद्दिष्ट हेच आहे की, विज्ञानाचे मुख्य उद्दिष्ट बाह्य जगाची माहिती मिळवणे आणि नैसर्गिक नियमांचा शोध घेणे आहे. बौद्ध धर्माचे मुख्य उद्दिष्ट आंतरिक शांती, दुःख-मुक्ती आणि निर्वाण प्राप्त करणे आहे.
विज्ञान भौतिक जगताचा अभ्यास करते.बौद्ध धर्म प्रामुख्याने मानवी मन, चेतना आणि भावनांचा अभ्यास करतो.विज्ञान हे मूल्यांपासून तटस्थ असते. त्याचा उपयोग चांगल्या किंवा वाईट दोन्ही कामांसाठी होऊ शकतो. बौद्ध धर्म हा नीतिमत्तेवर (शील) आणि करुणा यावर आधारित आहे, जो मानवी कल्याणासाठी मार्गदर्शन करतो.
अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी एकदा म्हटले होते की, “जर कोणताही धर्म आधुनिक वैज्ञानिक गरजा पूर्ण करू शकला, तर तो बौद्ध धर्म असेल.” हा धर्म आणि विज्ञान यांच्यातील समानतेवर प्रकाश टाकतो. बौद्ध धर्म विज्ञानाला पूरक असू शकतो, कारण विज्ञान बाह्य जगाचे ज्ञान देते, तर बौद्ध धर्म आंतरिक जगाला समजून घेण्यासाठी एक पद्धत प्रदान करतो. त्यामुळे, बौद्ध धर्म आणि विज्ञान हे सत्य आणि ज्ञान मिळवण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत असे प्रतिपादन विठ्ठल निकाळजे यांनी केले.
यावेळी धम्मगुरु भंते कश्यप(परभणी)यांनी उपासक उपासिका यांना त्रिशरण पंचशील दिले.त्यांनी धम्मदेसना दिली.या कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष महावीर भालेराव, महासचिव बाबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, प्रचार आणि पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, तालुका संघटक विजयकुमार जगताप, संपत जयसिंग भोसले तालुका शाखा संरक्षण उपाध्यक्ष व वाटर निंबाळकर गावचे सर्व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने संविधानाची प्रत उपासक उपासिकांना देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फलटण तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष महावीर भालेराव यांनी केले व त्यांनी मार्गदर्शन ही केले.