Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 159

फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर

0
फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर

फलटण : आगामी सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे. नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी ही रचना प्रसिद्ध केली असून एकूण 13 प्रभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यापैकी 12 प्रभाग द्विसदस्यीय तर एक प्रभाग त्रिसदस्यीय ठेवण्यात आला असून, निवडणुकीत एकूण 27 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत.

या रचनेबाबतचा सविस्तर नकाशा व माहिती नगरपरिषद कार्यालयातील सूचना फलक तसेच अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना 31 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत लेखी स्वरूपात नगरपरिषद कार्यालयात दाखल कराव्यात. त्यानंतर संबंधितांना सुनावणीसाठी पूर्वसूचना देऊन बोलाविण्यात येणार आहे.

प्रभाग रचना (फलटण नगरपरिषद)

प्रभाग क्र. 1 (द्विसदस्यीय) : सोमवार पेठ संपूर्ण, श्रीराम साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुजारी कॉलनी, यशवंतराव चव्हाण हायस्कूल परिसर, नगर परिषद पाणी पुरवठा केंद्र, फिरंगाई मंदिर, लक्ष्मी मरिमाता मंदिर.

प्रभाग क्र. 2 (द्विसदस्यीय) : मंगळवार पेठ परिसर, एस. टी. बस स्थानक समोरील परिसर, पुणे रस्ता परिसर.

प्रभाग क्र. 3 (द्विसदस्यीय) : आखरी रस्ता पूर्व बाजू, नायरा पेट्रोल पंप परिसर, उर्दू शाळा, कुरेशी मस्जिद परिसर, बुरुड गल्ली, खाटिक गल्ली, परिट गल्ली.

प्रभाग क्र. 4 (द्विसदस्यीय) : आखरी रस्ता पश्चिम बाजू, पठाण वाडा, पाचबत्ती चौक, लाटकर तट्टी, शनी मंदिर, हरिहरेश्वर मंदिर, वेलणकर दत्त मंदिर, दगडी पूल परिसर.

प्रभाग क्र. 5 (द्विसदस्यीय) : श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय परिसर, जिंती नाका, गोसावी वस्ती, पुणे रोड परिसर, आईसाहेब मंदिर, हरीबुवा मंदिर, महादेव मंदिर, उंबरेश्वर चौक, स्वामी समर्थ मंदिर, इंदिरानगर वसाहत.

प्रभाग क्र. 6 (द्विसदस्यीय) : संतोषी माता मंदिर परिसर, सगुणमाता नगर, साईबाबा मंदिर, श्रीकृष्ण बेकरी परिसर, जिंती नाका पेट्रोल पंप, हॉटेल महाराजा परिसर, निमकर सीडस, बॅ. राजाभाऊ भोसले घर परिसर.

प्रभाग क्र. 7 (द्विसदस्यीय) : संत बापूदास नगर, हनुमान नगर, सातारा रस्ता दोन्ही बाजू, मुधोजी कॉलेज परिसर, जिनिंग मिल, जुने ग्रामीण पोलीस स्टेशन परिसर, प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल परिसर.

प्रभाग क्र. 8 (द्विसदस्यीय) : ब्राह्मण गल्ली, शंकर मार्केट परिसर, नगरपरिषद आरोग्य केंद्र, पराडकर प्रेस, नवलबाई मंगल कार्यालय, मारवाड पेठ परिसर, श्रीराम मंदिर, मुधोजी प्राथमिक शाळा, श्रीकृष्ण मंदिर.

प्रभाग क्र. 9 (द्विसदस्यीय) : गजानन चौक परिसर, पवार गल्ली, नगरपरिषद परिसर, उमाजी नाईक चौक परिसर, मेटकरी गल्ली, उघडा मारुती मंदिर परिसर, मटण मार्केट, मच्छी मार्केट परिसर, रविवार पेठ तालीम परिसर.

प्रभाग क्र. 10 (द्विसदस्यीय) : घडसोली मैदान, शिंगणापूर रस्ता, पृथ्वी चौक (अहिल्यादेवी चौक), शिवाजीनगर, खर्डेकर विद्यालय परिसर, रिंग रोड उत्तर बाजू, सुविधा हॉस्पिटल परिसर, जलमंदिर परिसर.

प्रभाग क्र. 11 (द्विसदस्यीय) : रायगड हॉटेल परिसर, महात्मा फुले शॉपिंग सेंटर परिसर, माळजाई मंदिर परिसर, सिटी प्राईड परिसर, नारळी बाग परिसर, मुधोजी हायस्कूल परिसर, जोशी हॉस्पिटल परिसर, प्रशासकीय इमारत परिसर.

प्रभाग क्र. 12 (द्विसदस्यीय) : स्वामी विवेकानंद नगर, दत्तनगर, आबासाहेब मंदिर मागील बाजू, हणमंतराव पवार हायस्कूल परिसर, कामगार कॉलनी, खजिना हौद मागील परिसर.

प्रभाग क्र. 13 (त्रिसदस्यीय) : पद्मावतीनगर, भडकमकर नगर, पोलीस स्टेशन कॉलनी, संजीवराजेनगर परिसर, इरिगेशन कॉलनी परिसर, हाडको कॉलनी, आनंद नगर, गोळीबार मैदान परिसर, विद्यानगर, लक्ष्मीनगर.

,

Cervical Cancer: महिलांनो, शरीरातील ही 10 लक्षणे म्हणजे गर्भाशयाच्या कॅन्सरची सुरुवात; आत्ताच डॉक्टरकडे जा!

0
Cervical Cancer: महिलांनो, शरीरातील ही 10 लक्षणे म्हणजे गर्भाशयाच्या कॅन्सरची सुरुवात; आत्ताच डॉक्टरकडे जा!


Cervical Cancer Symptoms:  महिलांसाठी एक गंभीर पण अनेकदा दुर्लक्षित आरोग्य धोका म्हणजे गर्भाशयाच्या कर्करोग. हा एक कर्करोग आहे जो सहसा हळूहळू विकसित होतो आणि त्याची लक्षणे दिसू लागताच तो शरीरात खूप पसरलेला असतो. म्हणूनच वेळेवर तपासणी आणि सावधगिरी त्याच्या प्रतिबंधात महत्त्वाची भूमिका बजावते.

गर्भाशयाच्या कर्करोग म्हणजे काय?

हा कर्करोग गर्भाशयाच्या मुखात म्हणजेच गर्भाशय आणि योनीला जोडणाऱ्या भागात होतो. अमेरिकेत दरवर्षी सुमारे १३,००० महिलांमध्ये हे आढळून येते, तर स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण यापेक्षा अनेक पटीने जास्त (३ लाखांहून अधिक) आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे – सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे स्पष्टपणे दिसत नाहीत.

कोणती लक्षणे लक्षणे असू शकतात?

मासिक पाळी दरम्यान, सेक्स नंतर, रजोनिवृत्ती नंतर असामान्य रक्तस्त्राव होणे. खूप जास्त किंवा दीर्घकाळ मासिक पाळी येणे. योनीतून स्त्राव जास्त दुर्गंधीयुक्त किंवा पाण्यासारखा असेल किंवा त्यात रक्त असेल तर – या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.संभोग दरम्यान ही वेदना सतत होत असेल तर ती संसर्गाचे किंवा वाढत्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. पाठ, ओटीपोट किंवा पायांमध्ये वेदना आणि सूज असेल तर दुर्लक्ष करु नका. जर कर्करोग लिम्फ नोड्समध्ये पसरला तर त्यामुळे सूज किंवा वेदना होऊ शकतात. पाय जड किंवा सुजलेले वाटणे देखील चिंताजनक असू शकते.जर कोणत्याही आहार किंवा व्यायामाशिवाय वजन वेगाने कमी होत असेल तर डॉक्टरांकडून स्वतःची तपासणी करणे महत्वाचे आहे.जर पुरेशी झोप घेतल्यानंतरही अशक्तपणा कायम राहिला आणि लक्ष केंद्रित करणे कठीण झाले तर – ते शरीरातील एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.

गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाची कारणे काय आहेत?

एचपीव्ही संसर्ग (एचपीव्ही – ह्युमन पॅपिलोमाव्हायरस) हा विषाणू गर्भाशयाच्या कर्करोगाच्या जवळजवळ प्रत्येक प्रकरणासाठी जबाबदार आहे. तो लैंगिक संपर्काद्वारे पसरतो. यासाठी प्रतिबंध म्हणून 11-12 वर्षांच्या वयात एचपीव्ही लस देणे सर्वात प्रभावी आहे आणि 26 वर्षांपर्यंतचे तरुण देखील ते घेऊ शकतात.

प्रतिबंध हा सर्वोत्तम उपचार 

कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे, एचआयव्ही ग्रस्त महिलांमध्ये या कर्करोगाचा धोका वाढतो.प्रतिबंध हा सर्वोत्तम उपचार आहे. दरवर्षी स्त्रीरोगतज्ज्ञांकडून नियमित तपासणी करा.वेळोवेळी पॅप स्मीअर चाचणी करणे महत्वाचे आहे. यामुळे गर्भाशयाच्या मुखातील बदल वेळेवर ओळखता येतात.एचपीव्ही चाचणी देखील केली जाऊ शकते, ज्यामुळे धोका लवकर ओळखण्यास मदत होते.





Source link

बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अकरा दरवाज्यांमधून १८२ घनमीटर प्रति सेंकद विसर्ग – Marathi News | Water Discharge From Barvi Dam Increased Ssb 93

0
बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अकरा दरवाज्यांमधून १८२ घनमीटर प्रति सेंकद विसर्ग – Marathi News | Water Discharge From Barvi Dam Increased Ssb 93



बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अकरा दरवाज्यांमधून १८२ घनमीटर प्रति सेंकद विसर्ग – Marathi News | Water Discharge From Barvi Dam Increased Ssb 93 – Latest Thane News at Loksatta.com





Source link

…तर टोल का भरायचा? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल! CJI ही नाराज; 4 आठवड्यांसाठी टोल बंद

0
…तर टोल का भरायचा? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल! CJI ही नाराज; 4 आठवड्यांसाठी टोल बंद


Supreme Court Questions Over Poor Roads: टोल कशाला द्यायचा असा सवाल आता थेट सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे. एका प्रकरणामधील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने संपातून हा सवाल भारतामधील रस्त्यांची बांधणी आणि देखभाल करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) केला आहे.

… तर टोल का द्यायचा?

केरळच्या त्रिशूरमध्ये 65 किलोमीटर लांबीचा महामार्ग पार करण्यास 12 तास लागत असतील तर प्रवाशांना 150 रुपयांचा टोल भरण्यास का सांगितला जात आहे, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एनएचएआय केला आहे.

कोणासमोर झाली सुनावणी?

सरन्यायाधीश भूषण गवई, न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या पीठाने ही टिप्पणी करतानाच एनएचएआय व टोल वसुली करणाऱ्या गुरूवायूर इन्फ्रास्ट्रक्चरकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील निर्णय राखून ठेवला आहे.

सरन्यायाधीश काय म्हणाले?

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी, “जो महामार्ग पार करण्यास एक तास लागण्याची अपेक्षा आहे, त्यासाठी अतिरिक्त 11 तास लागत आहेत. असं असतानाही त्यांना टोलही द्यावा लागत आहे,” असं म्हणत नाराजी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी हायकोर्टाचा आदेश कायम ठेवण्यास सांगितलं आहे.

तोपर्यंत टोलवसुली नाही

उच्च न्यायालयाने 6 ऑगस्ट रोजी टोलवसुली चार आठवड्यांसाठी टोल वसुली स्थगित करण्याचा आदेश दिला होता. महामार्गाची देखभाल योग्यरीत्या होत नाही आणि वाहतुकीचा खोळंबा फारच होत आहे, तर मग वाहनचालकांकडून टोलवसुली केली जाऊ शकत नाही,” असं न्यायालयाने म्हटले होते. 

लोकांच्या विश्वासाला तडा गेला

जनता व एनएचएआय यांच्यातील संबंध लोकविश्वासाचे आहेत व सुरळीत वाहतूक प्रवाह ठेवण्यात अयशस्वी ठरल्याने जनतेच्या विश्वासाला तडा गेला आहे, असं निरिक्षणही न्यायालयाने नोंदवलं.

FAQ

सर्वोच्च न्यायालयाने टोल वसुलीबाबत कोणता सवाल उपस्थित केला आहे?
सर्वोच्च न्यायालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) विचारले की, जर केरळमधील त्रिशूर येथील ६५ किलोमीटरच्या महामार्गावर प्रवास करण्यास १२ तास लागत असतील, तर प्रवाशांना 150 रुपये टोल का भरावा लागतो?

या प्रकरणाची सुनावणी कोणासमोर झाली?
या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश भूषण आर. गवई, न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या पीठासमोर झाली. त्यांनी NHAI आणि टोल वसुली करणाऱ्या गुरुवायूर इन्फ्रास्ट्रक्चरच्या याचिकांवर निर्णय राखून ठेवला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने कोणती नाराजी व्यक्त केली?
सरन्यायाधीश गवई यांनी नाराजी व्यक्त करताना म्हटले की, “ज्या महामार्गावर एक तासात प्रवास पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, तिथे 11 तास जास्त लागतात आणि तरीही प्रवाशांना टोल भरावा लागतो.” त्यांनी टोल वसुलीच्या औचित्यावर प्रश्न उपस्थित केला.

केरळ उच्च न्यायालयाने कोणता आदेश दिला होता?
केरळ उच्च न्यायालयाने 6 ऑगस्ट 2025 रोजी त्रिशूरमधील पालियेकkara टोल प्लाझावर टोल वसुली 4 आठवड्यांसाठी स्थगित केली. कारण, एडप्पल्ली-मननुथी (NH-544) हा रस्ता खराब अवस्थेत आहे आणि वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होत आहे, ज्यामुळे टोल वसुली योग्य नाही.

उच्च न्यायालयाने टोल वसुली स्थगित करण्याचे कारण काय सांगितले?
उच्च न्यायालयाने म्हटले की, रस्त्यांची देखभाल योग्य नसल्याने आणि वाहतूक खोळंब्यामुळे प्रवाशांना महामार्गाचा वापर करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत टोल वसुली करणे अन्यायकारक आहे, कारण NHAI आणि जनता यांच्यातील संबंध ‘लोकविश्वासा’वर आधारित आहेत.

रस्त्याच्या खराब अवस्थेचे कारण काय आहे?
NHAI चे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, पावसाळ्यामुळे अंडरपासच्या बांधकामात अडथळे आले आहेत. तथापि, रस्त्यावरील खड्डे आणि खराब देखभाल यामुळे वाहतूक खोळंबा आणि 12 तासांचा विलंब झाला, ज्यामुळे एक लॉरी खड्ड्यात पलटी झाल्याने हा खोळंबा वाढला.





Source link

रामराजेंच्या शिष्टाईला यश; कामगारांच्या खात्यात जमा होणार ७३ टक्के पीएफ

0
रामराजेंच्या शिष्टाईला यश; कामगारांच्या खात्यात जमा होणार ७३ टक्के पीएफ

साखरवाडी :साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कामगारांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) प्रश्न अखेर सुटला असून, सेवानिवृत्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे सर्वोच्च न्यायालय व पीएफ कमिशनर यांच्या निर्देशानुसार उर्वरित ७३ टक्के रक्कम लवकरच थेट कामगारांच्या खात्यावर जमा होणार आहे.

२०१७-१८ मध्ये आर्थिक अडचणींमुळे न्यू फलटण शुगर वर्क्स कारखाना बंद पडल्यानंतर २०१९ मध्ये श्री दत्त इंडिया कंपनीने तो विकत घेतला होता. तेव्हापासून कामगारांचा पीएफ प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेत होता. मागील वर्षी २७ टक्के रक्कम कामगारांना मिळाली होती, मात्र उर्वरित ७३ टक्के रक्कम थकित होती.

हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयात फलटण तालुका साखर कामगार युनियन, सेवानिवृत्त कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यासोबत संयुक्त बैठक घेतली. या चर्चेनंतर थकबाकीची रक्कम थेट कामगारांच्या खात्यात जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला संचालक जितेंद्र धारू, चेतन धारू, प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप, चीफ अकाउंटंट अमोल शिंदे, युनियनचे सेक्रेटरी राजेंद्र भोसले, राजेंद्र गायकवाड, पोपट भोसले, पै. संतोष भोसले, संजय जाधव, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले, उद्योजक संजय भोसले तसेच सेवानिवृत्त कामगार व राजे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा होताच उपस्थित सेवानिवृत्त कामगारांनी आमदार नाईक निंबाळकर यांचा सत्कार करून आनंद व्यक्त केला.

फलटणच्या कुमारी अंकिता भोसलेचे राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत यश

0
फलटणच्या कुमारी अंकिता भोसलेचे राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत यश

फलटण :- फलटण येथील आयडियल किड्स इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी कुमारी अंकिता कल्याण भोसले हिने महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता ५ वी) राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत बारावा क्रमांक मिळवून एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांनी दिलेल्या या स्पर्धात्मक परीक्षेत अंकिताने बुद्धिमत्ता, सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश मिळवले. तिच्या या कामगिरीने पालक, शाळा तसेच फलटण शहराचा मान उंचावला आहे.

या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या डॉ. वैशाली शिंदे यांनी तिचे अभिनंदन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांना योग्य वातावरण आणि आत्मविश्वास दिल्यास ते कोणत्याही स्पर्धेत चमक दाखवू शकतात. अंकिताचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”

अंकिता भोसलेच्या या कामगिरीमुळे आयडियल किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, शाळेत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.

उपासक-उपासिकांनी पारमिता पाळून धम्म आचरणाने सदाचारी जीवन जगावे – भदंत कश्यप

0
उपासक-उपासिकांनी पारमिता पाळून धम्म आचरणाने सदाचारी जीवन जगावे – भदंत कश्यप


फलटण : तथागत भगवान बुद्धांनी स्वतःला कधीही बौद्ध धम्माचा संस्थापक, निर्माता किंवा अध्यक्ष असे संबोधले नाही.ते धम्माचे शास्ता म्हणूनच म्हणजे शिक्षक”, “मार्गदर्शक”, या “धम्मोपदेशक”म्हणून राहिले आहेत. उपासक- उपासकांनी पारमिता पाळून धम्म आचरणाने या वर्षावास काळामध्ये सदाचारी जीवन जगावे असे प्रतिपादन भदंत कश्यप यांनी वर्षावास कार्यक्रमानिमित्त भारतीय बौद्ध महासभा तालुका फलटण शाखेच्या वतीने वाठार निंबाळकर येथे आयोजित धम्म प्रवचन मालिकेमध्ये धम्मदेसना देताना व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, आपल्याला धम्मातील,’स्कंध’ म्हणजे ‘समूह’ किंवा ‘गट’ ही संकल्पना सांगितली आहे. पाच स्कंध आहेत त्यालाच पंचस्कंध म्हटले जाते. जे भौतिक आणि मानसिक घटकांचे समूह आहेत, आणि ज्यांच्यामुळे आपल्याला ‘मी’ किंवा ‘माझे’ असल्याची भावना येते.त्यामध्ये
पाच स्कंध (पंचस्कंध) रूपस्कंध हे पहिले स्कंध आहे.यात आपले शरीर आणि बाह्य जगाचा अनुभव घेणारे इंद्रिय घटक येतात.दुसरे स्कंध आहे वेदनास्कंध.यात सुख, दुःख आणि तटस्थ अशा भावनांचा अनुभव येतो. तिसरे स्कंध आहे संज्ञास्कंध. यात वस्तू आणि घटनांची जाणीव आणि ओळख यांचा समावेश होतो.चौथे स्कंध संस्कारस्कंध. यात आपल्या सवयी, विचार आणि इच्छा यांचा समावेश होतो. पाचवे स्कंध विज्ञानस्कंध. यात इंद्रियांनी मिळवलेल्या ज्ञानावर प्रक्रिया करून त्याला अर्थ देण्याचे कार्य होते.
बौद्ध धम्मात दहा पारमिता आहेत. या दहा पारमितांना ‘दशपारमिता’ असेही म्हणतात. या दहा पारमिता म्हणजे दान, शील, नैष्क्रम्य, प्रज्ञा, वीर्य, क्षान्ति, सत्य, अधिष्ठान, मैत्री आणि उपेक्षा. या दहा गुणांचा विकास करून बोधिसत्व होऊन कोणीही निर्वाण (मुक्ती) प्राप्त करू शकतो, त्यामुळे उपासकांनी दस पारमिता चे पालन केले पाहिजे. दान पारमिता यामध्ये कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता दान करणे. शील पारमिता यामध्ये नैतिक आचरण, चांगले बोलणे आणि वागणे.नैष्क्रम्य पारमिता यात सांसारिक इच्छांचा त्याग करणे.प्रज्ञा पारमिता यामध्ये ज्ञान आणि समजूतदारपणा येतो. वीर्य पारमिता यामध्ये उत्साह आणि चिकाटी येते. शांती पारमिता यामध्ये सहनशीलता आणि क्षमाशीलता येते. सत्य पारमिता यात सत्य बोलणे आणि प्रामाणिक असणे हे येते. अधिष्ठान पारमिता यामध्ये दृढनिश्चय आणि निर्धार हा भाग येते. मैत्री पारमिता यामध्ये सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करणे याचा अंतर्भाव होतो. उपेक्षा पारमिता यामध्ये समतोल आणि सहजीवन याचा अंतर्भाव होतो. जगभरातील कोणत्याही धर्माच्या अनुयायांनी या दस पारमिता पाळून धम्माच्या निती-नियमांवर आधारित जीवन जगून बुद्ध मार्गावरचा प्रवास कोणीही व्यक्ती साधू शकते. एवढेच स्वातंत्र्य तथागत भगवान गौतम बुद्ध आणि आपल्याला दिले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला हा विज्ञानवादी धम्म आपल्या आचरणातून आपण भारत बुद्धमय करण्यासाठी कटिबद्ध असलं पाहिजे.
त्रिसरण पंचशील, आर्यअष्टांगिक मार्ग, दस पारमिता आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला दिलेल्या 22 धम्म प्रतिज्ञा हीच बौद्धांची खरी आचारसंहिता आहे. ती सर्वांनी पाळल्याशिवाय भारत बुद्धमय करण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प पूर्णत्वास जाणार नाही.

या सोबतच काही रोग धम्मामध्ये सांगितले आहेत.मन, चित्त, कुशल कर्म – भूक, झोप, आळस, व्यर्थ बडबड करणे याचेही भान सर्व उपासक उपासिकांनी ठेवलं पाहिजे.
कामवासना, द्वेष, आळस, चंचलता आणि संशय या पाच रोगांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. जर आपल्याला सुख पारमिता आपण आत्मसात करून सदाचारी जीवन जगण्यासाठी धम्माचा आचरण करून धम्म प्रचार आणि प्रसारासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या प्रचारकांना, बौध्द धम्म गुरूंना मदत करुन धम्म पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

यावेळी धम्मगुरु भंते कश्यप(परभणी)यांनी उपासक उपासिका यांना त्रिशरण पंचशील दिले.या कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष महावीर भालेराव, महासचिव बाबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, प्रचार आणि पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, तालुका संघटक विजयकुमार जगताप, संपत जयसिंग भोसले तालुका शाखा संरक्षण उपाध्यक्ष, धम्माचे प्रचारक व प्रसारक सोमीनाथ घोरपडे व वाठार निंबाळकर गावचे सर्व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांचा जीव गेला तर जबाबदार कोण?” अशोकराव जाधवांचा प्रशासनाला सवाल

0
नागरिकांचा जीव गेला तर जबाबदार कोण?” अशोकराव जाधवांचा प्रशासनाला सवाल

फलटण – शहरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा व बेवारस जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचे टोळके व बेवारस जनावरांचे कळप नागरिकांना व वाहनचालकांना अडथळा ठरत असून लहान मुलांवरही हल्ल्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांचा जीव गेल्यावरच का नगर पालिका जागी होणार, असा सवाल माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी उपस्थित केला आहे.

जाधव यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, नगरपालिकेने आठ दिवसांच्या आत या प्रश्नावर ठोस उपाययोजना करावी, अन्यथा भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीतर्फे नगरपरिषदेसमोर आंदोलन करण्यात येईल.

फलटणमध्ये बंटी-बबली जोडीची कोट्यवधींची फसवणूक : १ कोटी ४४ लाखांचा गंडा, गुन्हा दाखल

0
फलटणमध्ये बंटी-बबली जोडीची कोट्यवधींची फसवणूक : १ कोटी ४४ लाखांचा गंडा, गुन्हा दाखल

फलटण : फलटण तालुक्यातील मौजे निरगुडी येथील विकास बबन सस्ते व त्यांची पत्नी मनिषा विकास सस्ते या बंटी-बबली जोडीविरुद्ध तब्बल १ कोटी ४४ लाख २१ हजार ६५० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम अधिक तपास करीत आहेत.

कौटुंबिक नात्याचा गैरफायदा

तक्रारदार कृष्णात वसंत जाधव (वय ३७, रा. आसु, ता. फलटण) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विकास सस्ते व त्यांची पत्नी मनिषा सस्ते यांच्याशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांनी विश्वास संपादन करून शेअर मार्केट व डाळिंब खरेदी विक्री (राजलक्ष्मी इंटरप्रायजेस) या व्यवसायात गुंतवणुकीस प्रवृत्त केले. गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीकडून सुरुवातीला तब्बल ३० लाख रुपये घेतले. त्याबदल्यात प्लॉट तारण ठेवण्यात आला होता.

परंतु नंतर विविध बहाण्यांनी तो प्लॉट पत्नीच्या नावे परत फिरवून घेत गुंतवणुकीवरील परतावा टोलवाटोलवी करून टाळला. उलट आणखी गुंतवणुकीस प्रवृत्त करत एकूण ३६ लाख रुपये फिर्यादीकडून उकळले गेले.

इतर गुंतवणूकदारांचीही फसवणूक

विकास सस्ते आणि मनिषा सस्ते यांनी अशाच प्रकारे आणखी काही व्यक्तींना जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून मोठ्या रकमा घेतल्या आहेत. त्यात –

  • गणेश वसंतराव जगदाळे (रा. मलठण) → 20 लाख रु. (फक्त 2.20 लाख परत)
  • दिपक नामदेव जगदाळे (रा. रामबाग, फलटण) → 15 लाख रु. (परतावा नाही)
  • संदीप भानुदास टोणगे (रा. रामबाग, फलटण) → 20.40 लाख रु. (2.90 लाख परत)
  • दयानंद श्रीरंग वाघमोडे (रा. निंभोरे) → 3.63 लाख रु. (परतावा नाही)
  • सचिन शामराव तारे (रा. निरगुडी) → 46.28 लाख रु. (9.92 लाख परत)
  • धीरज चंद्रकांत जाधव (रा. साखरवाडी) → 8.99 लाख रु. (99 हजार परत)

या सर्वांची एकत्रित १ कोटी ४४ लाख २१ हजार ६५० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

पोलिसांची सूचना

या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, विकास बबन सस्ते व मनिषा विकास सस्ते यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. ज्यांची फसवणूक झालेली असेल त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांनी केले आहे.

    एन. रघुरामन यांचा कॉलम: आपली मुले आता ‘पिकलबॉल’ पालकत्वाने मोठी होत आहेत का?

    0
    एन. रघुरामन यांचा कॉलम:  आपली मुले आता ‘पिकलबॉल’ पालकत्वाने मोठी होत आहेत का?


    • Marathi News
    • Opinion
    • N. Raghuram’s Column, Are Our Children Now Growing Up With ‘pickleball’ Parenting?

    8 तासांपूर्वी

    • कॉपी लिंक

    माझ्या मागे बसलेल्या एका तरुण आईने तिचे बाळ तिच्या सासूकडे दिले आणि म्हणाली, ‘मी वॉशरूमला जाते.’ बाळ दुसऱ्या हातात देताच ते रडू लागले. काही मिनिटांनी आई लगेच परत आली आणि म्हणाली, ‘तो अजूनही का रडत आहे?’ आजीने शांतपणे उत्तर दिले, ‘नवजात मुले रडत असतील तर त्यात काही गैर नाही.’ या उत्तराने चिडून ती तरुण आई म्हणाली, ‘काहीही बोलतेस.’ तिने लगेच बाळाला शांत करण्यासाठी त्याच्या तोंडात एक पेसिफायर (चोखणे) घातले. ‘इतर लोक काय विचार करतील?’ ती म्हणाली, ‘जसे की त्यांना बाळांचे संगोपन कसे करायचे हे माहीत नाही आणि तुम्ही फक्त आठ आठवड्यात पालकत्वात प्रभुत्व मिळवले आहे.’ यानंतर त्यांच्यातील प्रत्येक संभाषण सामान्य झाले. जसे की, ‘बाळाचा आहार कसा चालला आहे? ठीक आहे. तुला झोप येत नाही का? क्वचितच.’

    मुंबईत मुसळधार पावसामुळे अचानक फ्लाइटला उशीर झाला आणि मला सासू आणि सुनेमधील पुढील संभाषण ऐकू आले नाही. घोषणा मंदावत असताना मी त्या आईला असे म्हणताना ऐकले, “हे मुलासाठी चांगले नाही.’ मला वाटले की त्यांचा संयम संपला आहे. त्यांचे आवाज थरथर कापू लागले. कदाचित घोषणादरम्यान त्यांचे संभाषण इतके तणावपूर्ण झाले होते की त्यांनी संयमाची मर्यादा ओलांडली. त्यानंतर कोणताही संवाद झाला नाही. जेव्हा मी माझ्या डोक्यावरील केबिनमधून पुस्तक घेण्यासाठी उठलो तेव्हा मी त्यापैकी एकीच्या डोळ्यांनी अश्रू ढाळलेले पाहिले, तर दुसरी खिडकीतून आकाशाकडे पाहत होती. मला जाणवले की जेव्हा मिलेनियल्स (१९८१ ते १९९६ दरम्यान जन्मलेले) त्यांच्या बेबी बूमर (१९४६ ते १९६४ दरम्यान जन्मलेले) पालकांशी मुलाचे संगोपन कसे करावे याबद्दल वाद घालतात तेव्हा हे भारतीय कुटुंबांमध्ये सर्वात तणावपूर्ण क्षण असतात. यामुळे मला १९५० ते २०२५ पर्यंत पालकत्व कसे बदलले आहे याबद्दल विचार करायला लावले. येथे काही मार्ग आहेत.

    सौम्य पालकत्व : ही एक पालकत्व शैली आहे, जी वाढत्या मुलांमध्ये सहानुभूती, समजूतदारपणा आणि आदर यावर भर देते. यामध्ये मुलाच्या गरजांना प्रतिसाद देणे, त्यांचे व्यक्तिमत्त्व ओळखणे, संवाद, मान्यता आणि सीमा निश्चित करून त्यांच्या भावनिक विकासाला प्रोत्साहन देणे समाविष्ट आहे. सौम्य पालकत्व म्हणजे मुलांना जास्त स्वातंत्र्य देणारे पालकत्व नाही. त्यात अजूनही अपेक्षा आणि मार्गदर्शन समाविष्ट आहे, परंतु ते शिक्षेऐवजी भावनिक बंधन आणि शिकवण्यावर भर देते.

    मुक्त पालकत्व : या शैलीला पुन्हा एकदा गती मिळाली, जी मुलांना वयानुसार योग्य मर्यादेत अनुभवांचा शोध घेण्यासाठी आणि शिकण्यासाठी अधिक स्वातंत्र्य आणि देखरेखीशिवाय वेळ देण्यावर भर देते. हे स्वावलंबन, समस्या सोडवण्याची कौशल्ये आणि अनुकूल दृष्टिकोनाबद्दल आहे. ते हळूहळू थेट देखरेख कमी करते आणि मुलांना स्वतःहून आव्हानांना तोंड देण्यास अनुमती देते.

    वाघांचे पालकत्व : ही एक कठोर मागणी करणारी आणि अत्यंत प्रतिबंधात्मक पालकत्व शैली आहे, जी शैक्षणिक आणि अभ्यासक्रमेतर क्रियाकलापांमध्ये उच्च दर्जा प्राप्त करण्यावर लक्ष केंद्रित करते. ती मुलांना त्यांच्या वैयक्तिक निवडी आणि भावनिक आरोग्याच्या किमतीवर शैक्षणिक, संगीत किंवा खेळ यासारख्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यास प्रवृत्त करते. हा दृष्टिकोन शिस्त, उच्च अपेक्षांसह कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि शैक्षणिक कामगिरीवर भर देतो.

    हेलिकॉप्टर पालकत्व : हे अलीकडे लोकप्रिय झाले आहे. यात अत्याधिक संरक्षण आणि अत्याधिक सहभाग समाविष्ट आहे. यामध्ये पालक मुलाच्या जीवनाचे निरीक्षण आणि नियंत्रण करतात. पालक मुलाच्या डोक्यावर हेलिकॉप्टरसारखे फिरतात. ते मुलाच्या सुरक्षिततेबद्दल आणि यशाबद्दल जास्त काळजी करतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की यामुळे कधी कधी मुलाच्या स्वातंत्र्यावर आणि अनुभवांमधून शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.



    Source link