Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 157

फलटण नगरपरिषद प्रभाग रचना : पहिली हरकत कुणाल किशोर काकडे यांची

0
फलटण नगरपरिषद प्रभाग रचना : पहिली हरकत कुणाल किशोर काकडे यांची

फलटण (प्रतिनिधी) – फलटण नगरपरिषद निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर आज पहिली हरकत दाखल झाली आहे. ही हरकत प्रभाग क्र. २ (मंगळवार पेठ – अनुसूचित जाती राखीव) येथील मतदार कुणाल किशोर काकडे यांनी दाखल केली आहे.

काकडे यांनी आपल्या हरकतीत नमूद केले आहे की –
१.दलित वस्ती सलग ठेवण्याऐवजी तुकडे करून असंबंधित भाग जोडले गेले आहेत.
२.प्रभागाची भौगोलिक सलगता भंगली असून नागरिकांना प्रशासनिक व निवडणुकीत अडचणी येणार आहेत.
३.अशा विभागणीमुळे SC Component Fund चा योग्य वापर होऊ शकत नाही व काही वस्ती वंचित राहतात.
हे संविधानातील अनुच्छेद २४३T तसेच महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमातील नियमांचे उल्लंघन आहे.

या हरकती सोबत काकडे यांनी नकाशा पुरावा जोडला असून त्यात दलित वस्तीचे तुकडे व परकीय भागांचे जोड स्पष्ट दाखवले आहेत.

फलटण नगरपरिषदेत प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर दाखल झालेली ही पहिली हरकत असल्याने स्थानिक पातळीवर चर्चेला उधाण आले आहे.

निरा देवधर प्रकल्पाचा केंद्रीय कृषी सिंचन योजनेत समावेश, सोलापूर साताऱ्याचा दुष्काळी भाग फुलणार

0


Solapur : माढा लोकसभेचे भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर हे पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांच्या प्रयत्नानंतर आता नीरा देवघर प्रकल्पाचा केंद्रीय कृषी सिंचन योजनेत समावेश झाला आहे. त्यामुळं त्यांनी दिल्ली येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. याचा मोठा फायदा सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागांना मिळणार आहे. 

 2019 पासून सातत्याने या योजनेसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पाठपुरावा

एकूण 3 हजार 900 कोटीं खर्च असलेल्या या प्रकल्पाचा समावेश केंद्रीय कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी रणजितसिह नाईक निंबाळकर व राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. याचा फायदा सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. मागणी मान्य होताच रणजितसिंह निंबाळकर आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आभार मानले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी 2019 पासून सातत्याने  या योजनेसाठी पाठपुरावा केला होता. या दरम्यान CWC ची मान्यता, धरणाची पाणी साठवण क्षमता (हायड्रॉलॉजी) दाखला, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाची विशेष समिती, तसेच राज्य सरकारची शिफारस अशा अनेक टप्प्यांमधून हा प्रकल्प पुढे नेण्यात आला होता.

फलटण पंढरपूर रेल्वे सुरू करणेबाबत भरीव निधीची तरतुद होणार 

दिल्ली येथे झालेल्या बैठकीत जलशक्ती मंत्री सी. आर. पाटीलजी, ग्रामविकास मंत्री  जयकुमारजी गोरे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर  CWC चे चेअरमन अतुल जयंत, सदस्य पाटणकर, चीफ इंजिनिअर श्री. शेंगर यांच्या उपस्थितीत या प्रकल्पासाठी केंद्रीय निधी गुंतवणुकीला अंतिम मान्यता मिळाली आहे. त्यामुळं नीरा देवघर प्रकल्पाच्या कालव्याचे काम माळशिरसच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पूर्ण होणार आहे. पुढील टप्प्यात केंद्रीय निधी उपलब्ध होताच निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. याचबरोबर उरमोडी व जिहे कटापूर योजनांनाही मान्यता व निधी मिळाला आहे. फलटण पंढरपूर रेल्वे सुरू करणेबाबत भरीव निधीची तरतुद होणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. 

राज्य सरकारकडून केंद्राकडे प्रकल्प शिफारस आणि निधी उपलब्ध होईपर्यंत राज्य निधीची तरतूद केली गेली. यामुळे हा महत्वाकांक्षी प्रकल्प आता गतीमान होत असून लवकरच पूर्णत्वाकडे जाईल असा विश्वास निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Agriculture News : महाराष्ट्रात 28 लघु सिंचन प्रकल्प पूर्ण, 1.28 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण; राज्यमंत्री बिश्वेश्वर तुडू यांची माहिती

आणखी वाचा



Source link

This Is What Happens When You Have Garlic On An Empty Stomach Smoothens Digestion Detoxifies Body

0
This Is What Happens When You Have Garlic On An Empty Stomach Smoothens Digestion Detoxifies Body



This Is What Happens When You Have Garlic On An Empty Stomach Smoothens Digestion Detoxifies Body | वजन कमी होईल, पोटातली सगळी घाण साफ होईल; फक्त सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चा लसूण खा, चमत्कारिक परिणाम वाचून लगेच सुरु कराल





Source link

काळूबाई नगरमध्ये रस्ता काँक्रीटीकरण पूर्ण

0
काळूबाई नगरमध्ये रस्ता काँक्रीटीकरण पूर्ण

फलटण : काळूबाई नगर येथील उदय वरुडकर यांच्या घरापासून विकी जाधव यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरणाचा काम पूर्ण झाले आहे.

या कामासाठी मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे काम यशस्वीरीत्या पार पडले.

स्थानिक नागरिकांनी या विकासकामासाठी सर्व मान्यवरांचे आभार मानले असून काळूबाई नगर परिसर आता अधिक सुसज्ज व सुकर होणार असल्याचे मत व्यक्त केले.

chandrashekhar bawankule directs bmc to stop notices on unauthorized buildings during ganeshotsav

0
chandrashekhar bawankule directs bmc to stop notices on unauthorized buildings during ganeshotsav



chandrashekhar bawankule directs bmc to stop notices on unauthorized buildings during ganeshotsav | उत्तर मुंबईतील अनधिकृत बांधकामांच्या विरोधातील कारवाई गणेशोत्सव काळात थांबवा; महसूलमंत्री बावनकुळे यांचा महापालिकेला आदेश





Source link

Flood like situation in Kolhapur as Panchganga river crosses warning level Heavy rains disrupt life

0
Flood like situation in Kolhapur as Panchganga river crosses warning level Heavy rains disrupt life


कोल्हापूर : संततधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीने पहाटे ३९ फूट ही इशारा पातळी बुधवारी दुपारी ओलांडली. आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला होता, पण सायंकाळी पुन्हा मुसळधार पाऊस पडला. जिल्ह्यातील ८५ बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान या पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागातील ४० हून अधिक मार्ग बंद आहेत. अनेक मार्गांवरील वाहतूक, दळणवळण ठप्प झाले आहे. शाळा बंद आहेत.

त्यामुळे पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणीपातळी पहाटे पाच वाजता ३९ फूट या इशारा पातळीवर पोहोचली. सायंकाळी ती ४० फूट या इशारा पातळीवर राहिली. राधानगरी धरणाच्या स्वयंचलित ७ दरवाजांपैकी ४ दरवाजे बंद झाले असून ७५८४ क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. अलमट्टी धरणाचा विसर्ग आज सकाळी २ लाख क्युसेकवरून २ लाख ५० हजार क्युसेक करण्यात आला आहे. पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ८५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

पुराचा फटका

जिल्ह्यात आठ राज्य मार्ग, २२ प्रमुख जिल्हा मार्ग, दहा ग्रामीण मार्ग, एक इतर जिल्हा मार्ग बंद असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. धामणी खोऱ्यातील म्हासुर्ली, गवशी, अंबर्डे, पनोरे गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात ६८ घरांची पडझड होऊन ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे आतापर्यंत दोन कोटी ४८ लाख रुपयांचा फटका बसला.

हेही वाचा

कोल्हापुरात पाणी

पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. कोल्हापूर शहरातील पंचगंगा घाटाकडे जाणाऱ्या मार्गावरील संजयसिंह गायकवाड पुतळ्यासमोर पाणी आले आहे. यामुळे मंगळवारी सायंकाळी गंगावेश ते शिवाजी पुलापर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे.

१३९ शाळा बंद

अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे भुदरगड तालुक्यातील ७, गगनबावडा ४०, करवीर ५, पन्हाळा ३४, राधानगरी ३० व शाहूवाडी तालुक्यातील १५ अशा एकूण १३९ शाळा आज बंद असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी दिली आहे.

कोल्हापुरात कुटुंब स्थलांतरित

कोल्हापूर शहरातील सुतारवाडा परिसरात पंचगंगा नदीचे पाणी नागरी वस्तीजवळ पोहोचल्याने सुरक्षेच्या दृष्टीने एका कुटुंबाला चित्रदुर्ग मठ येथील महापालिकेच्या निवारा केंद्रामध्ये स्थलांतरीत केले आहे. पुरग्रस्त भागातील नागरिकासाठी शहरात ३० निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत.

रुग्णालयांना स्थलांतरित नोटीस

आरोग्य विभागाने शहरातील पूरबाधीत क्षेत्रातील डायमंड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, वेस्टर्न इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सेस (विन्स) हॉस्पिटल, अंतरंग हॉस्पिटल, स्वस्तिक हॉस्पिटल, ॲपल सरस्वती हॉस्पिटल या पाच रुग्णालयांना स्थलांतरित करण्यासंदर्भात नोटीस लागू केल्या आहेत.





Source link

फलटणचा राष्ट्रीय पातळीवर डंका – शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुलींना यश

0
फलटणचा राष्ट्रीय पातळीवर डंका – शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुलींना यश

फलटण (पुणे) – पुणे येथील ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल, कोंढवा येथे दिनांक ३१ जुलै ते ३ ऑगस्ट २०२५ दरम्यान झालेल्या सीबीएसई (धनुर्विद्या) साउथ झोन ॥ स्पर्धेत श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूलच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

या स्पर्धेत ५ राज्यांतील तब्बल ११४७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. इंडियन राऊंड, रिकर्व राऊंड आणि कंपाऊंड राऊंड अशा तीन प्रकारांत स्पर्धा पार पडल्या.

🔹 १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले.

  1. आयेशा शेख
  2. जान्हवी जाधव
  3. अनुश्री शिंदे

🔹 १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने कांस्यपदक (Bronze Medal) मिळवले.

  1. दिव्या ढेंबरे
  2. जान्हवी फाळके
  3. शिवश्री थोरात

विशेष म्हणजे, या खेळाडूंची सप्टेंबर महिन्यात पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व यशामध्ये प्रशिक्षक सुरज ढेंबरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्राचार्या मीनल दिक्षित तसेच शिक्षक वृंद यांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तुम्ही तर खात नाही ना ‘कबुतर डाळ’; खाल्ल्यास शरीरात नेमके काय बदल होतात पाहा

0
तुम्ही तर खात नाही ना ‘कबुतर डाळ’; खाल्ल्यास शरीरात नेमके काय बदल होतात पाहा


दादरमधील कबुतरखान्याचा (Dadar Kabutarkhana)विषय गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हे सगळं सुरु असतानाच सोशल मीडियावर ‘कबुतर डाळ’ (PigeonPea)आणि ‘कबुतर मटर’ (pigeon matar) चर्चेत आहे. यामागचं कारण काय? असा खाद्यप्रेमींना प्रश्न पडला आहे. 

‘कबुतर डाळ’ आणि ‘कबुतर मटर’ हे दोन्ही पदार्थ सुपरफूड म्हणून ओळखले जातात. शरीराला पौष्टिक पदार्थांची आवश्यकता असते यामध्ये हे दोन्ही पदार्थ येतात. महत्त्वाचं म्हणजे हे दोन्ही पदार्थ आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात असतात. ही डाळ म्हणजे तूरडाळ. 

सोशल मीडियावर ‘कबुतर डाळ’ चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे? भाषांतराच्या चुकीमुळे हा गोंधळ झाला आहे. Pigeon Pea हा शब्द गुगल ट्रान्सलेटरवर टाकला तर त्याचा अर्थ ‘कबुतर डाळ’ किंवा ‘कबुतर मटर’ असा येतो. यामुळे लोकांना वाटू लागली की, ही कोणती नवी डाळ आहे. तर ही आपल्या प्रत्येकाच्या घरात असणारी तूरडाळ आहे. 

तूरडाळ का ठरते सुपरफूड?

तूर हे पीक भारताच्या आहारातील अविभाज्य घटक आहे. हजारो वर्षांपासून ही डाळ प्रत्येक भारतीय घरात वरण, आमटी, सांबारच्या स्वरुपात बनवली जाते. 

तूर डाळीचे फायदे 

तूर डाळीमध्ये प्रथिनांचे आणि फायबरचे प्रमाण जास्त आहे. तसेच या डाळीमध्ये मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे, खनिजे, लोह, जस्त आणि फोलेट देखील असतात. यात विरघळणारे आणि न विरघळणारे दोन्ही फायबर आहेत.
याव्यतिरिक्त, डाळीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे वजन कमी करणे आणि डायबिटिस कंट्रोलमध्ये आणण्यासाठी याचा फायदा होतो. या डाळीमध्ये जटिल कर्बोदकांमधे असतात.

तूरडाळ अनेक समस्यांवर उपाय

तूर डाळीमध्ये अनेक पौष्टिक पदार्थ असतात. मधुमेहाच्या रुग्णांना ही डाळ अतिशय फायद्याची आहे. तूर डाळीचे पाणी सेवन केल्यास शरीरालाही फायदा होतो. अनेक समस्यां उपाय म्हणून तूरडाळीकडे पाहतात. यामध्ये वजन कमी गोते. तसेच कोलेस्ट्रॉल आणि चरबीही कमी होण्यास मदत होते. 
तसेच फायबरचे प्रमाण अधिक असते. याच्या सेवनाने आपले पोट बर्‍याच काळासाठी भरलेले वाटते. यामुळे आपले वजन नियंत्रणात राहते. 

शरीराला ताकद देणारी ही डाळ अशक्तपणा कमी करते. फोलेटच्या अभावामुळे शरीरातील रक्ताची कमतरता निर्माण होते. या डाळीमध्ये व्हिटामिन जास्त असते. तूरडाळीमुळे पचनक्रिया चांगली राहते यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात. 

तूरडाळीमुळे व्हिटॅमिन सी अधिक असून रोग प्रतिकारशक्ती वाढते. तूरडाळीमुळे शरीरात अँटीऑक्सिडेंट्ससारखे कार्य करतात. हे आपले रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते. यामुळे हृदय देखील निरोगी राहते. 

FAQ 

 ‘कबुतर डाळ’ आणि ‘कबुतर मटर’ म्हणजे नेमके काय आहे?

‘कबुतर डाळ’ आणि ‘कबुतर मटर’ ही नावे सोशल मीडियावर चर्चेत आली आहेत, पण खरे तर ही तूर डाळ आहे. इंग्रजीतील “Pigeon Pea” या शब्दाचा मराठीत गुगल ट्रान्सलेटवर चुकीचा अनुवाद ‘कबुतर डाळ’ किंवा ‘कबुतर मटर’ असा झाला आहे, ज्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला. प्रत्यक्षात, Pigeon Pea म्हणजे आपल्या घरात नेहमी वापरली जाणारी तूर डाळ.

तूर डाळ का आहे सुपरफूड?

तूर डाळ ही पौष्टिकतेने परिपूर्ण आहे आणि यामुळे ती सुपरफूड मानली जाते. यामध्ये प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, लोह, जस्त, फोलेट आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. तसेच यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने ती मधुमेह नियंत्रण आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

तूर डाळीचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत?

तूर डाळीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत:
प्रथिने आणि फायबर: यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट बराच काळ भरलेले राहते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
मधुमेह नियंत्रण: कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते.
हृदयाचे आरोग्य: यातील फायबर आणि अँटीऑक्सिडेंट्स कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि हृदय निरोगी ठेवतात.

 





Source link

फलटणमध्ये 15 वर्षानंतर अनुसूचित जाती-जमाती दक्षता समितीची बैठक; दलित अन्यायाविरोधात ठरला नवा टप्पा

0
फलटणमध्ये 15 वर्षानंतर अनुसूचित जाती-जमाती दक्षता समितीची बैठक; दलित अन्यायाविरोधात ठरला नवा टप्पा

फलटण, दि. 20 ऑगस्ट –फलटण शहरात तब्बल 15 वर्षांनंतर अनुसूचितजाती-जमाती दक्षता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत 1 ते 47 मुद्यांवर सविस्तर वाचन करून चर्चा करण्यात आली. दलित बहुजन समाजावरील अन्यायाविरोधात ठोसपणे आवाज उठविण्यासाठी या बैठकीने कायदेशीर व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

गेल्या 15 वर्षांत राजे गटातील तथाकथित “महान नेत्यांनी” दलित बहुजनांवर होणाऱ्या अन्यायासमोर मौन बाळगले होते. मात्र, सत्ता बदलानंतर आमदार सचिनजी कांबळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवीन सदस्यांना संधी मिळाली असून दलित समाजाच्या प्रश्नांसाठी लढण्याची दिशा मिळाली आहे.

या समिती बैठकीचे सर्वात मोठे योगदान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांचे असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. तब्बल दोन तास चाललेल्या या चर्चेत विशेष सरकारी वकील ॲड. बापूसाहेब शिलवंत, वैभव गीते, माजी नगरसेवक वैशालीताई अहिवळे, माजी नगरसेवक सचिन अहिवळे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, बीडीओ व पोलीस प्रशासनाचे शासकीय अधिकारीही हजर होते.

बैठकीच्या शेवटी माजी नगरसेवक सचिन अहिवळे सर यांनी प्रशासनाचे आभार मानून समारोप केला.

गणेशोत्सवात मूर्ती विक्रीसाठी फलटण नगरपरिषदेने निश्चित केली अधिकृत जागा

0
गणेशोत्सवात मूर्ती विक्रीसाठी फलटण नगरपरिषदेने निश्चित केली अधिकृत जागा

फलटण, – येत्या २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांना सोयीस्कर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी फलटण नगरपरिषद प्रशासनाने गणेश मूर्ती विक्रीसाठी अधिकृत जागा निश्चित केली आहे. नियम मोडणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे यांनी या संदर्भात आवाहन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, सर्व गणेश मूर्तिकार आणि विक्रेत्यांनी आपले स्टॉल्स फक्त महात्मा फुले चौक येथील मुधोजी क्लबच्या बाजूपासून ते माळजाई मंदिर गेटपर्यंतच्या परिसरातच उभारावेत, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

नेमून दिलेल्या जागेबाहेर मूर्ती विक्रीसाठी स्टॉल उभारल्यास नगर परिषदेच्या नियमांनुसार कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने जाहीर केले आहे.

उत्सवाच्या काळात वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि नागरिकांना मूर्ती खरेदीसाठी एकाच ठिकाणी सुविधा मिळावी, या दुहेरी उद्देशाने हे नियोजन केले असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

👉 सर्व मूर्तिकार व व्यापाऱ्यांनी या नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन फलटण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.