Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 156

अजितदादांनी छगन भुजबळांचे कान टोचले; राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय?

0
अजितदादांनी छगन भुजबळांचे कान टोचले; राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय?


Ajit Pawar: पालकमंत्रिपदाच्या वादावरून अजितदादांनी छगन भुजबळांना सुनावलंय. कुणाचे किती आमदार किती आहे हे विचारण्याचे कारण नसल्याचं सांगत अजितदादांनी भुजबळांना खडसावलंय.तसेच पालकमंत्रिपदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा असल्याचंही अजितदादांनी म्हटलंय. दरम्यान नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे 7 आमदार आहे त्यामुळे पालकमंत्रिपदासाठी आग्रह धरावा असं भुजबळांनी म्हटलं होतं. त्यावर बोलतांना अजित पवारांनी भुजबळांचे कान टोचलेत.

नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी छगन भुजबळांनी गेल्या काही दिवसांपासून फिल्डिंग लावलीय. खरं तर नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद निर्माण झाला तेव्हा भुजबळ मंत्रिमंडळात नव्हते. शिवाय पालकमंत्रिपदाच्या रेसमध्येही नव्हते. नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दा शिवसेना आणि भाजपनं प्रतिष्ठेचा केला होता. शिवसेनेचे दादा भुसे आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्यात आणि त्यांच्या पक्षात रस्सीखेच होती. नाही म्हणायला क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेही स्पर्धेत होते पण त्यांच्या नावाचा फारसा विचार होत नव्हता. 

भुजबळांना जसं मंत्रिपद मिळालं तसं त्यांनी पालकमंत्रिपदासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली. पहिल्यांदा तर त्यांनी ध्वजारोहणासाठी लांबचं ठिकाण आहे म्हणून गोंदियाला जायला नकार दिला. त्यानंतर आता थेट सात आमदार राष्ट्रवादीचे त्यामुळं पालकमंत्रिपद राष्ट्रवादीला पाहिजे असं सांगून दावाच ठोकला.

भुजबळांच्या दाव्याला विरोध करण्यासाठी शिवसेना आमदार सुहास कांदे समोर आले. त्यांनी छगन भुजबळांच्या नावाला विरोध केलाच, शिवाय राष्ट्रवादीच्या आमदारांचाही भुजबळांच्या नावाला विरोध असल्याचा दावा त्यांनी केला.

पालकमंत्रिपदावर दावा ठोकणा-या छगन भुजबळांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कानपिचक्या दिल्यात. पालकमंत्रिपदी कुणाला नेमायचं याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. त्यामुळं छगन भुजबळांनी नाशिकमधील आमदारसंख्या मोजू नये असा सल्ला अजित पवारांनी दिलाय.

नाशिकचं पालकमंत्रिपद हा महायुतीत कळीचा मुद्दा झालाय. नाशिकच्या महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर महायुतीतल्या प्रत्येक पक्षाला नाशिकचं पालकमंत्रिपद हवंय. आता या पालकमंत्रिपदाच्या लढाईत भुजबळांनी उडी घेतल्यानं हा तिढा आणखीनच वाढण्याची चिन्हं दिसू लागली. त्यामुळंच अजितदादांनी पुढाकार घेत भुजबळांचे कान टोचलेत. 

FAQ

प्रश्न: नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी छगन भुजबळ यांनी का दावा ठोकला आहे?

उत्तर: छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे सात आमदार असल्याचा आधार घेत पालकमंत्रिपदावर दावा ठोकला आहे. मंत्रिमंडळात प्रवेश मिळाल्यावर त्यांनी या पदासाठी आग्रह धरला, तसेच स्वातंत्र्यदिनी गोंदियाला ध्वजारोहणासाठी जाण्यास नकार देत “सर्व काही नाशिकमध्येच करायचे” अशी भूमिका घेतली. त्यांचा दावा आहे की, सर्वाधिक आमदारांमुळे राष्ट्रवादीला हे पद मिळायला हवे.

प्रश्न: अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना काय सल्ला दिला आहे?

उत्तर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी आमदारसंख्या मोजू नये, असा सल्ला दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, पालकमंत्रिपदाचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकार आहे. भुजबळांचा दावा आणि आग्रह पाहता, अजित पवारांनी त्यांना कानपिचक्या देत हा वाद शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रश्न: नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद का चिघळला आहे आणि कोण कोण यात सामील आहे?

उत्तर: नाशिकच्या पालकमंत्रिपदावर महायुतीतील शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात रस्सीखेच आहे. शिवसेनेचे दादा भुसे, भाजपचे गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे छगन भुजबळ हे प्रमुख दावेदार आहेत. शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांच्या नावाला विरोध केला, तर काही राष्ट्रवादी आमदारही भुजबळांना पाठिंबा देत नसल्याचा दावा आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिक तीव्र झाला आहे.





Source link

होय, मतदान यादीत आमचं नाव दोनदा, पण..; इंद्रजीत चव्हाणांचा मुख्यमंत्र्‍यांसह भाजपवर पलटवार

0


सातारा : मतचोरीच्या मुद्द्यावरुन साताऱ्यात भाजपा आणि काँग्रेसमध्ये (Congress) जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, भाजप आमदार अतुल भोसले यांच्या कराडमधील पदाधिकाऱ्यांनी थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरच मतचोरीचा गंभीर आरोप केला असून चव्हाण कुटुंबातील 9 जणांची दुबार, तिबार मतदार नोंदणी झाल्याचे पुरावेच त्यांनी दिले. तसेच, पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj chavan) यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण यांचे तीन ठिकाणी मतदान यादीत नाव असल्याचेही भाजपचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष धनंजय पाटील यांनी सांगितलं होतं. आता, इंद्रजीत चव्हाण यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं असून आपलं नाव मतदार यादीत दोन ठिकाणी असल्याचे त्यांनी मान्य केलंय. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव घेतल्यावर बातमी होत म्हणत दोनदा मतदान केल्याचा आरोप त्यांनी फेटाळला आहे.    

पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्यांनीच दोनवेळा मतदान केल्याचा आरोप चव्हाण कुटुंबीयांनी फेटाळला आहे. आमच्या कुटुंबियांनी एकाच ठिकाणी मतदान केले आहे. आमची नावे दोन ठिकाणी आहेत, मात्र आम्ही प्रत्येकवेळेस नाव कमी करण्यासाठी अर्ज केला होता, त्याचे पुरावेही आमच्याकडे आहेत, असे इंद्रजीत चव्हाण यांनी म्हटले. पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव मोठं असल्याने त्यांच्या कुटुंबीयांचे नाव घेतले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घेतलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घेऊन भाजपला आपलं काही काळबेरे दडवायच आहे का? असा संवालही पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण यांनी उपस्थित केला. तर, दोनदा मतदान केल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आठ दिवसात सिद्ध करावे, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक गजानन आवळकर यांनी दिला आहे.

भाजपचा आरोप, चव्हाण कुटुंबातील 9 जणांची दुबार नावे (Prithviraj chavan)

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात दुबार, तिबार मतदान नोंदणी झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी दुबार मतदार नोंदणी करून 2014, 2019 ची निवडणूक जिंकल्याचा आरोप भाजपचे पदाधिकारी विद्यमन आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या पदाधिकाऱ्यांनी केला. ‘व्होटचोरी’ कराड दक्षिणेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच केल्याचेही अतुल भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. कराडमधील पाटण कॉलनीतील घरात 15 नावं आहेत, त्यातील अनेकजण घरात राहत नाहीत. तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरातील 9 लोकांची दुबार नावे आहेत. दुबार, तिबार नावात पृथ्वीराज चव्हाण यांचे भाऊ, पुतणे, वहिनी याच्यासह कुटुंबियांची नावे आहेत. कराड दक्षिण विधानसभा आणि पाटण विधानसभा मतदार संघात पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरातील नावे असल्याचेही भाजपचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष धनंजय पाटील यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा

कुठे काळा पोळा, कुठे कर्जमाफीचा मुद्दा; बैलपोळ्याला सर्जा-राजावर झळकला ‘चलो मुंबई’चा नारा

 

आणखी वाचा



Source link

Shocking Wife suddenly throws acid on husband while riding bike with him incident in Tripura

0
Shocking Wife suddenly throws acid on husband while riding bike with him incident in Tripura



Shocking Wife suddenly throws acid on husband while riding bike with him incident in Tripura | धक्कादायक! पतीबरोबर दुचाकीवरून जात असताना पत्नीने अचानक पतीच्या अंगावर टाकलं अ‍ॅसिड





Source link

फलटणमध्ये अॅव्होकॅडो शेतीवर एकदिवसीय चर्चासत्र

0
फलटणमध्ये अॅव्होकॅडो शेतीवर एकदिवसीय चर्चासत्र

फलटण / प्रतिनिधी. फलटण परिसरातील शेतकऱ्यांना शेतीत नवे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी फलटण एज्युकेशन सोसायटी चलित श्रीमंत शिवाजीराजे ज्ञानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय अॅव्होकॅडो पिक चर्चासत्र आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर होते. त्यांनी सांगितले की, “फलटण तालुक्याचे हवामान अॅव्होकॅडो लागवडीसाठी पोषक आहे. शेतकऱ्यांनी या फळाला उत्पन्नाचा उत्तम पर्याय म्हणून स्वीकारावे.”

गणेश बाबर (श्लोकाज अॅग्रो प्रा. लि., उडतारे) यांनी हवामान, मातीची निवड, लागवड तंत्रज्ञान, वाणांची निवड, खत व सिंचन व्यवस्थापन, छाटणी पद्धती तसेच काढणीनंतरचे व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या वेळी सौ. श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, रणजित निंबाळकर, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, विश्वासदादा गावडे, धनंजय पवार, शिरीषशेठ दोशी यांसह मान्यवरांची उपस्थिती होती.

संचालन सृष्टी झाडोकर व प्राजक्ता जाधव यांनी केले तर आभार डॉ. जी. बी. अडसूळ यांनी मानले.

“माढा लोकसभा मतदारसंघातील प्रकल्पांना गती – पंतप्रधान मोदींची सकारात्मक हमी”

0
“माढा लोकसभा मतदारसंघातील प्रकल्पांना गती – पंतप्रधान मोदींची सकारात्मक हमी”

नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत माढा लोकसभा मतदारसंघ आणि राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या मंजुरी व गतीकरणाबाबत सविस्तर चर्चा झाली.

महत्त्वाचे विकास प्रकल्प :

  • नाईकबोमवाडी व म्हसवड MIDC ला ग्रीन इंडस्ट्रियल कॉरिडॉर दर्जा
  • मुंबई–बंगलोर महामार्गालगत खटाव तालुक्याजवळ एअरस्ट्रीप उभारणी
  • फलटण–पंढरपूर रेल्वे मार्गासाठी भरीव निधी व तातडीने पूर्णत्व

या सर्व प्रकल्पांसाठी मंजुरी व निधी मिळावा यासाठी खासदारांनी पंतप्रधानांकडे निवेदन सादर केले.

पंतप्रधान मोदीजींनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित विकासकामांना तातडीने गती देण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी ग्रामविकास मंत्री मा. जयकुमार गोरे उपस्थित होते. माढा मतदारसंघातील जनतेच्या वतीने पंतप्रधानांचे आभार मानण्यात आले. 💐🙏

माता माहामाया यांचे स्वप्न शिल्प.

0
माता माहामाया यांचे स्वप्न शिल्प.

साहस Times :- सांची स्तूपाच्या तोरण द्वारावरील हे शिल्प सम्यक संबुध्द यांच्या जन्माच्या वेळसचे आहे त्यांच्या आईला पडलेल्या स्वप्नांच्या पैकीचे एक आहे , आपण त्याला महामाया यांचे स्वप्न शिल्प म्हणून ओळखतो पण सम्यक संबुध्द यांच्या आईचे नाव महामाया नव्हेत वास्तवात त्यांच्या आईचे नाव रूमीन देई होते ,सम्यक संबुध्द यांच्या जीवनातील घटना क्रमांना महत्व प्राप्त झाले होते म्हणून प्रत्येक घटनेला “महान” म्हणून महा अशी सज्ञ जोडण्यात आली आहे, जसे सम्यक संबुध्द यांनी दिवसा उजेडात गृहत्याग केले त्या घटनेना “माहाभिनिषक्रमण” म्हणून संबोधित केले जाते तसेच मृत्यूला त्यांच्या निर्वाणाला “महापरिनिर्वाण” असे संबोधित केले जाते, इ स च्या पहिल्या शतकात मानवीय स्वरूपात सम्यक संबुध्द यांचे शिल्प निर्माण होण्या आधीचे हे शिल्प, म्हणून सम्यक संबुध्द यांच्या उपस्थितीचे/ प्रेझेन्सचे प्रतीक म्हणून हे शिल्प स्तूपांच्या अलंकरणात आवर्जून समावेश केले जाते असे , अस्तित्वात नसलेल्या आणि आता वस्तुसंग्रहालयात अवशेषांच्या स्वरूपात संग्रहित असलेल्या भरहुत स्तूपावर देखील अशी स्वप्न शिल्प होती.
स्तूपावर जसे हे स्वप्न शिल्प निर्माण करण्यात आले तसेच ते पश्चिम भारतातील सह्याद्रीमधील लेण्यांवर पण दिसून येतात स्तूपांच्या अलंकरणात जसा या प्रसंगाचा समावेश केला होता तसे ते लेण्यातून ही होते हे सम्यक संबुध्द यांच्या उपस्थितीचे प्रतीक आहे.
सांची तोरण द्वारावरील या शिल्प पटात सम्यक संबुध्द यांच्या जन्म प्रसंगाला जणू काही गोठून ठेवण्यात आले आहे प्रस्तरात त्याला साठवून ठेवण्यात आले आहे, पुढच्या पिढीला त्या प्रसंगाचे साक्षीदार होण्यासाठी, संपूर्ण शिल्प स्थानिक हस्तिदंतावर काम करणाऱ्या कुशल हाताच्या शिल्पकारांनी तयार केले आहे आपली संपूर्ण विद्वत्ता पारंगतता या प्रसंगाला उतरवण्यात खर्ची केली आहे हे स्पष्टपणे दिसून येते.
सुक्ष्म निरिक्षण केले तर दोन हजार सहाशे वर्षापूर्वीचा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर तरळून जातो, राज महालात माता महामाया शय्येवर उजव्या कुशीवर उजवा हात डोक्या खाली घेऊन डावा हात डाव्या पायावर कमरेवर अलगद स्थिरावलेल्या अवस्थेत असून डावा पाय किंचितसे गुडघ्या जवळ दुमडून निजलेल्या आहेत त्यांच्या डोक्या जवळ त्यांच्या सेविका दिसून येत आहेत, महालात निजलेल्या आहेत हे कळुन यावे म्हणून आपल्या डाव्या बाजूस कोपर्‍यात बुरूज व त्याला लागून कठडा दाखवण्यात आला आहे, महामाया जिथे निजलेल्या आहेत तिथे वर मोठे गवाक्ष दिसत आहेत जे तत्कालीन राज महालांना मोठमोठ्या कोठ्यांना असे , तर त्याचे छत अर्धवर्तुळाकार उतरणारे आहे जे आपल्याला संघारामातून लेण्यातून दिसून येते , हा मंगल प्रसंग कोणत्याही क्षणी घडेल म्हणून कुतूहलतेने दुसर्‍या महालात वाट पाहणारे राज घराण्यातील स्त्री पुरुष बाजूच्या कोपर्‍यात दिसून येत आहेत.
सुमेध बोद्धीसत्व आपले शेवटचे जन्म या भूतलावर घेणार आहेत म्हणूनच माता महामाया यांच्या गर्भात प्रवेश करणारे पांढरेशुभ्र हत्तीचे स्वरूप इथे त्यांच्या पाया जवळ वरच्या कोपर्‍यात स्थापित करण्यात आले आहे हा सर्व प्रसंग अलौकिक स्वरूपात आहे, ही घटना जरी ऐतिहासिक असली तरी तिला नंतरच्या काळात मात्र अलौकिक स्वरू प्राप्त झाले होते.
विशेष म्हणजे इथे दोन मोर दाखवण्यात आले आहेत एक छतावर तर दुसरे हत्तीच्या मागे कदाचित ते मौर्य राज घराण्याची उपस्थित दर्शवण्यासाठी असू शकेल कारण हा स्तूप मौर्य राज घराण्यातील तिसरे शासक चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी निर्माण केला होता व या स्तूपाचे विस्तारीकरण अलंकारण शुंगांनी व आपले महाराष्ट्रीयन पहिले राज घराणे सातवाहन यांनी एकत्रित मिळून केले होते.
सांची स्तूपावर कधी गेलात तर सम्यक संबुध्द यांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित शिल्पपट निरिक्षण करून पहा.

हे खूप छोटेसेच पण महत्त्वपूर्ण शिल्पांकन मला फोटोच्या स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे ते माझे मित्र अर्जुन काटे यांनी.

सूरज रतन जगताप (लेणी अभ्यासक )

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: सकाळी 60 मिनिटे व्यवस्थापन कराल तर तुमचा दिवस आनंदी

0
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:  सकाळी 60 मिनिटे व्यवस्थापन कराल तर तुमचा दिवस आनंदी


  • Marathi News
  • Opinion
  • Pt. Vijayshankar Mehta’s Column, If You Manage For 60 Minutes In The Morning, Your Day Will Be Happy

16 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

सुनियोजित सकाळसाठी, फक्त ६० मिनिटे काळजी घ्या. सकाळची ६० मिनिटे पुढील २३ तासांसाठी टॉनिक बनू शकतात. सूर्योदयासोबत उठून या पाच गोष्टींवर काम करा. बहुतेक लोक सकाळी पाणी किंवा चहा-कॉफी पितात. पंचामृत पिण्याचा प्रयत्न करा. ६० मिनिटांत, शरीर, मन, आत्मा, बुद्धी आणि हृदय – या पाच गोष्टींवर चांगले काम करा. शरीराचा व्यायाम करा.सर्वात मोठा आव्हानात्मक व्यायाम म्हणजे अंथरुण सोडणे हा आहे. दुसरे मौनातून मनावर नियंत्रण मिळवा. उठल्यानंतर एक तास तुम्ही जितके कमी बोलाल तितके चांगले. आत्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि बुद्धीमध्ये सकारात्मक विचारांचा प्रवाह वाढवण्यासाठी ध्यान करणे खूप महत्त्वाचे आहे. सकाळी भीती किंवा शंका निर्माण करणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका. त्या एका तासात कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी गोड बोलण्याचा निर्णय घ्या, तुम्ही प्रेमळ व्हाल. हे हृदयावर काम करणे झाले. सकाळची ही ६० मिनिटे तुम्हाला वरील प्रकारे साध्य करता आली तर तुमचा दिवस मजेत जाईल.



Source link

फडणवीस यांचे शरद पवार, उद्धव ठाकरेंना दूरध्वनी; उपराष्ट्रपती निवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती – Marathi News | Devendra Fadnavis Calls Uddhav Sharad Pawar Seeking Support For Nda Vice President Candidate Zws 70

0
फडणवीस यांचे शरद पवार, उद्धव ठाकरेंना दूरध्वनी; उपराष्ट्रपती निवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती – Marathi News | Devendra Fadnavis Calls Uddhav Sharad Pawar Seeking Support For Nda Vice President Candidate Zws 70



फडणवीस यांचे शरद पवार, उद्धव ठाकरेंना दूरध्वनी; उपराष्ट्रपती निवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती – Marathi News | Devendra Fadnavis Calls Uddhav Sharad Pawar Seeking Support For Nda Vice President Candidate Zws 70 – Latest Mumbai News at Loksatta.com





Source link

‘लोकसत्ता’च्या ‘राजर्षी’ विशेषांकाला विशेष संदर्भमूल्य; प्रकाशनप्रसंगी डॉ. जयसिंगराव पवार आणि डॉ. सदानंद मोरे यांचे गौरवोद्गार – Marathi News | The Special Issue Of Loksatta Rajarshi Which Reveals Personality Of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Zws 70

0
‘लोकसत्ता’च्या ‘राजर्षी’ विशेषांकाला विशेष संदर्भमूल्य; प्रकाशनप्रसंगी डॉ. जयसिंगराव पवार आणि डॉ. सदानंद मोरे यांचे गौरवोद्गार – Marathi News | The Special Issue Of Loksatta Rajarshi Which Reveals Personality Of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Zws 70



‘लोकसत्ता’च्या ‘राजर्षी’ विशेषांकाला विशेष संदर्भमूल्य; प्रकाशनप्रसंगी डॉ. जयसिंगराव पवार आणि डॉ. सदानंद मोरे यांचे गौरवोद्गार – Marathi News | The Special Issue Of Loksatta Rajarshi Which Reveals Personality Of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Zws 70 – Latest Kolhapur News at Loksatta.com





Source link

ज्ञानाच्या २५ वर्षांचा उत्सव; पुण्यात एमकेसीएलचा रौप्य महोत्सव उत्साहात

0
ज्ञानाच्या २५ वर्षांचा उत्सव; पुण्यात एमकेसीएलचा रौप्य महोत्सव उत्साहात

फलटण :- काल दिनांक २० ऑगस्ट रोजी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम पुणे येथे उत्साहात पार पडला.
या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिषजी शेलार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

एमकेसीएलच्या या २५ वर्षांच्या यशस्वी प्रवासात अगदी सुरुवातीपासून सोबत असलेल्या अधिकृत लर्निंग सेंटर्सनाही आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये शहरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या डॉ. बी. आर. आंबेडकर आय. आय. टी. ला देखील उपस्थित राहण्याचा मान मिळाला.

एमकेसीएलच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.