
मन्या : बाबा! तुम्हाला सरकारी नोकरी कशी मिळाली?
बाबा : अरे! खूप मेहनत करायला लागते.
रात्रभर जागून अभ्यास करायला लागतो.
मन्या : तेच तर विचारतोय,
तुम्हाला कशी मिळाली? सांगा!

मन्या : बाबा! तुम्हाला सरकारी नोकरी कशी मिळाली?
बाबा : अरे! खूप मेहनत करायला लागते.
रात्रभर जागून अभ्यास करायला लागतो.
मन्या : तेच तर विचारतोय,
तुम्हाला कशी मिळाली? सांगा!

फलटण : भगवान बुद्धांचे विचार आणि शिकवण कोणत्याही एका धर्मापुरते मर्यादित नाही. त्यांची शिकवण मानवी जीवनासाठी अतिशय उपयुक्त आहे, म्हणूनच जगभरातील लोक त्यांचा आदर करतात.बुद्धांनी दिलेली शिकवण अहिंसा, करुणा, दया, आणि शांती यांसारख्या मूल्यांवर आधारित आहे. ही मूल्ये कोणत्याही भौगोलिक सीमेपलीकडे जाऊन प्रत्येक माणसासाठी महत्त्वाची आहेत. म्हणूनच भगवान बुद्ध यांना ‘जगद्गुरू’ आणि ‘जगत वंदनीय’ म्हणतात! असे प्रतिपादन भारतीय बौध्द महासभा माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा संघटक श्रीमंतराव घोरपडे यांनी केले. ते भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका शाखेच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेतील अकरावे पुष्प गुंपताना केले.ते निरगुडी येथे वर्षावास प्रवचन मालिकेत मार्गदर्शन करताना बोलत होते.
भगवान बुध्दाने दिलेला अष्टांगिक मार्ग (सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मान्त, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी) हा दुःखातून मुक्ती मिळवण्याचा एक व्यावहारिक मार्ग आहे, जो कोणताही व्यक्ती आपल्या जीवनात वापरू शकतो. बुद्धांनी लोकांना कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवण्यास सांगितले नाही. त्यांनी लोकांना स्वतः अनुभव घेऊन सत्य जाणून घेण्यास सांगितले. त्यांची शिकवण तर्क आणि अनुभवावर आधारित आहे, ज्यामुळे ती आधुनिक जगातील विचारवंतांनाही आकर्षित करते. म्हणूनच, त्यांचे विचार केवळ धार्मिक नसून वैज्ञानिक आणि तार्किक मानले जातात.
बुद्धांनी समाजातील जात, धर्म, लिंग किंवा वर्ण यांवर आधारित भेदभाव नाकारला. त्यांनी सर्वांना समान मानले. त्यांनी केवळ मानवांसाठीच नाही, तर सर्व सजीवांप्रती प्रेम आणि करुणेचा संदेश दिला. यामुळे, त्यांच्या शिकवणीने समाजात समानता आणण्यास मदत केली.
बुद्धांच्या शिकवणीचा मुख्य उद्देश व्यक्तीला स्वतःच्या आत पाहण्यासाठी प्रोत्साहित करणे हा होता. त्यांनी बाह्य कर्मकांडांऐवजी मनाच्या शुद्धीकरणावर आणि आत्म-ज्ञानावर भर दिला. यामुळे लोक स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकले आणि स्वतःच्या जीवनात बदल घडवू शकले. या सर्व कारणांमुळे, गौतम बुद्ध केवळ एका धर्माचे संस्थापक म्हणून ओळखले जात नाहीत, तर ते असे एक महान शिक्षक आहेत ज्यांनी जगाला एक नवीन दृष्टी दिली. त्यांचे विचार आजही जगभरातील कोट्यवधी लोकांना मार्गदर्शन करतात, म्हणूनच त्यांना ‘जगद्गुरू’ आणि ‘जगत वंदनीय’ मानले जाते.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका शाखेचे महासचिव बाबासाहेब जगताप यांनी जनगणनेमध्ये होणाऱ्या नोंदी संदर्भात जात व धर्म याबाबतीत जागरूकता बाळगण्याचा संदेश दिला.त्यांनी दर रविवारी बुद्ध विहारात उपस्थित राहून ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे पठन करण्यासंदर्भात सूचना दिली .
यावेळी भंते काश्यप जी यांनी उपासक उपासिका यांना त्रिशरण पंचशील दिले. भारतीय बौध्द महासभा तालुका अध्यक्ष महावीर भालेराव सर, तालुका महासचिव बाबासाहेब जगताप सर, तालुका कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर, फलटण तालुका कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते सर, धम्म प्रसारक सोमीनाथ घोरपडे, निरगुडी गावचे बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी फलटण तालुक्याचे भूषण ॲडिशनल कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स, मुंबई आयु-तुषार मोहिते साहेब यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील प्रत्येक गावासाठी ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ निरगुडी गावच्या बौद्ध उपासक उपासिकाना भेट देण्यात आहे. त्यासोबत उपस्थितांना संविधान प्रस्ताविकेचे वाटप करण्यात आले.


फलटण : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मुधोजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज, फलटण येथे शालेय जिल्हास्तरीय नेहरू कप हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्य खोखो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “फलटणला संस्थान काळापासून खेळाला प्रोत्साहन देण्याची परंपरा आहे. आजच्या खेळाडूंनी जिद्द, मेहनत आणि शिस्त यांच्या बळावर आपले स्थान निर्माण करावे आणि मेजर ध्यानचंद यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा.”
तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे यांनी सांगितले की, “या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील हॉकीपटूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल आणि हॉकी खेळाला निश्चितच बळ मिळेल.”
उद्घाटन सोहळ्यास माजी क्रीडा अधिकारी महेश कुटाळे, ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक जगन्नाथ धुमाळ, बी. बी. खुरुंगे, क्रीडा समिती सदस्य शिवाजीराव घोरपडे, वसंत शेडगे, महेंद्र जाधव, समर अहिवळे, गणेश भोईटे, कपिल मोरे आणि क्रीडा शिक्षक सचिन धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबई: मराठा आरक्षणासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांचे गेल्या 3 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. जरांगे पाटील यांच्यासह हजारो मराठा बांधव मुंबईच्या रस्त्यावर आंदोलन करताना, आझाद मैदानात घोषणाबाजी करताना दिसत आहेत. तर, या आंदोलनावर काहीही राजकीय किनारही पाहायला मिळत आहे. त्यातच, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी, हे सगळे प्रश्न तुम्ही एकनाथ शिंदेंना विचारा, असे राज ठाकरेंनी म्हटले. आता, राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) या बोचऱ्या टीकेवर एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) उत्तर दिलं आहे. तर, शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्यावरही टीका केलीय.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारा असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं, त्यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिल आहे. त्यांनी पूर्ण माहिती घेतली पाहिजे होती, आम्ही आधी दिलेलं आरक्षण कोणामुळे गेलं याबाबतची माहिती त्यांनी घ्यायला हवी होती. हायकोर्टामध्ये आम्ही टिकवलेलं आरक्षण ते सुप्रीम कोर्टात का टिकवू शकले नाहीत असं त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांना त्यांनी विचारायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली. तसेच, मी जे काही बोलतोय ते काही लोकांना माहित पडावं यासाठीच बोलतोय. आम्ही जे 10 टक्के आरक्षण दिलं ते टिकलं आहे. तर, शिंदे कमिटी गठीत करुन अनेक पुरावे शोधून कुणबी नोंदीही शोधल्या आहेत. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर मिळाली आणि याचा लाभ मराठा समाज घेतोय, असा पलटवार एकनाथ शिंदेंनी केला.
शरद पवारांनी मराठा आरक्षणावर भाष्य करत तामिळनाडूत 72% पर्यंत आरक्षण मर्यादा वाढवल्याचे म्हटले. तसंच आपल्या राज्यात सुद्धा ते शक्य आहे असेही सांगितलं. त्यावर, प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार हे खूप सीनियर लीडर आहेत, ते परिपक्व नेते आहेत, त्यांनी मुख्यमंत्रिपद भोगलं आहे. केंद्रामध्ये सुद्धा केंद्रीयमंत्री म्हणून काम केलेलं आहे. मग असं असताना इतक्या वर्षात त्यांनी हा विचार का केला नाही, असा प्रश्न शिंदेंनी शरद पवारांना केला आहे. तसेच त्यांनी हा विचार करुन तो निर्णय यापूर्वीच घ्यायला पाहिजे होता. यापूर्वी देखील काँग्रेसचे सरकार होते हे आपल्याला माहित आहे. राज्यात आणि केंद्रात सुद्धा ते होते. मग तेव्हाच हा निर्णय का घेतला नाही. आम्ही जे आरक्षण दिलेलं आहे, त्याच्यावर आरोप करणे आणि टीका करणे किंवा कोणाच्या तरी कोर्टात चेंडू टाकने हे योग्य नाही. त्यांच्याकडे सुद्धा इतक्या वर्षांचा राजकीय अनुभव आहे. मराठा समाज आणि इतर कोणत्याही समाजाच्या बाबतीत विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांनी मिळून निर्णय घ्यायला हवा. मात्र, इकडे वेगळी भूमिका आणि तिकडे वेगळी भूमिका असं कोणीही करता कामा नये असा पलटवार एकनाथ शिंदेंनी केला.
Video: मराठा आंदोलक आक्रमक, घोषणाबाजी करत सुप्रिया सुळेंना विचारला जाब, महिला नेत्याला घेराव
आणखी वाचा

फलटण : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,फलटण (DIET) द्वारे दर महिन्याला शिक्षण परिषदा आयोजित केल्या जातात. शिक्षण परिषदांचे उद्देश शिक्षकांची व्यावसायिक वाढ करणे. शिक्षकांना नवीन शैक्षणिक धोरणे, अध्यापन पद्धती आणि तंत्रज्ञान याबाबत अद्ययावत माहिती देणे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे आणि त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपाययोजना करणे. शासनाच्या नवीन अभ्यासक्रमाची आणि शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे.
या परिषदांमध्ये केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि शिक्षक सहभागी होतात. येथे शैक्षणिक समस्यांवर चर्चा केली जाते, नवीन कल्पनांची देवाणघेवाण होते आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कृती आराखडा तयार केला जातो.यावेळी फलटण नगर परिषद कार्यक्षेत्रातील नगर परिषद व सर्व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांची मुधोजी हायस्कूल व जूनियर कॉलेज फलटण येथे दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या शिक्षण परिषदेत शाळा स्तरावर राबवण्यात येणारे विशेष उल्लेखनीय उपक्रम यावर कमला निंबकर बालभवन च्या डॉ. इरावती कर्वे ग्रंथालयाचे ग्रंथपाल श्री. प्रदीप ढेकळे यांनी मार्गदर्शन केले.त्यांनी ‘मेंढक बोला टर टर’ या गाण्याने शिक्षकांचा सहभाग घेऊन मार्गदर्शनाची सुरवात केली.
’वाचन’ उपक्रमात शब्द लपवणे हा उपक्रम घेतला. यासाठी ‘डुंगी डान्स’ हे पुस्तक निवडले. सुरवातीला प्रकट वाचन घेऊन गोष्ट वाचून दाखवली. त्यानंतर त्या गोष्टीतील गाणे एक पाय वर एक पाय खाली, गोल गोल, ढिंच्याक ढिंच्याक, ढम ढम हे गाणे शिक्षकांना म्हणायला लावले. डोळे बंद करून वाचलेली गोष्ट आठवायला सांगितली. त्यानंतर या गोष्टीत लपवलेले शब्द ओळखायला सांगितले. त्यानी यात चांगला सहभाग घेतला.त्यांनी यावेळी ग्रंथालयाचा आणखी एक उपक्रम घेतला. तो म्हणजे ‘कवितेला क्रम लावणे ‘ यासाठी विंदा करंदीकरांची ‘चढवा चढवी’ ही कविता निवडली. कवितेला काय काय असते यावरून चर्चेला सुरवात केली.उदा.कवितेला नाव असते.यमक जुळवलेला असतो,कवितेला अर्थ असतो. अशी वेगवेगळी उत्तरे शिक्षकांनी दिली. त्यांनी कवितेला क्रम लावण्याचा छान प्रयत्न केला. त्यांनी क्रम लावलेल्या कवितेचे सादरीकरण घेतले.
यावेळी NAS गुणांकन वाढवण्यासाठी शाळा स्तर उपक्रम यावर श्री.रुपेश शिंदे, मुधोजी प्राथमिक विद्या मंदिर फलटण यांनी मार्गदर्शन केले. नवोपक्रम व कृती संशोधन यावर मुधोजी हायस्कूलचे शिक्षक श्री.चंदन कर्वे यांनी मार्गदर्शन केले. इन्स्पायर अवार्ड नॉमिनेशन यावर स्व.हणमंतराव पवार हायस्कूलच्या सौ.अमृता सागर निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले. अध्ययन निष्पत्ती वर आधारित मासिक नियोजन(गणित,वाचन व लेखन)आनंदवन प्राथमिक विद्यामंदिर चे अभिजित चांगण यांनी मार्गदर्शन केले.पालक सभा त्रैमासिक अहवाल यावर श्रीराम विद्याभवनच्या सौ.हेमलता गुंजवटे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी श्रीम. दमयंती कुंभार यांनी उपस्थित सर्व शिक्षकांनी आपल्या शाळेमध्ये शिक्षण परिषदेतील विषयाला अनुरूप गुणवत्ता वाढीसाठी काम करण्याचे आवाहन केले. त्यांनी कमला निंबकर बालभवन च्या डॉक्टर इरावती कर्वे ग्रंथालयाचे ग्रंथपाल प्रदीप ढेकळे यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे महत्त्व पटवून देत त्यांच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती फलटण तथा प्रशासन अधिकारी फलटण नगर परिषद श्री. अनिल सकपाळ सो, विषय साधन व्यक्ती श्रीम. दमयंती कुंभार, मॅडम समूह साधन केंद्र पंचायत समिती,फलटण, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री.लक्ष्मण शेडगे सर, केंद्र समन्वयक श्री.दीपक पवार सर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थिती होते.,

कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलातील अत्याधुनिक क्रीडा विज्ञान केंद्रामुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी आवश्यक पाठबळ मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या या केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात खासदार धनंजय महाडिक, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, क्रीडा मार्गदर्शक तसेच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री आबिटकर यांनी केंद्रातील सर्व सुविधांची पाहणी करून खेळाडूंशी संवाद साधला. ते म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील क्रीडापटूंचे नवे युग सुरू होत आहे. हे अत्याधुनिक स्पोर्ट्स सायन्स सेंटर खेळाडूंना त्यांच्या कामगिरीला नवी उंची देण्यासाठी सज्ज आहे. येथील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे खेळाडूंच्या मानसिक स्वास्थ्यासह दुखापत व्यवस्थापन, पुनर्वसन आणि खेळातील तांत्रिक विश्लेषण शक्य होईल. मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत खेळाडूकेंद्रित उपाययोजनांमुळे राज्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक पदके जिंकतील.या केंद्राचे उद्घाटन आणि १६.३५ एकर जागेत असलेल्या विभागीय क्रीडा संकुलातील संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले. या संकुलात विविध क्रीडा सुविधांचा विकास करण्यात आला आहे, ज्यामुळे खेळाडूंना सर्वांगीण प्रशिक्षणाची संधी मिळेल.
स्पोर्ट्स सायन्स सेंटर पश्चिम महाराष्ट्रातील क्रीडापटूंना नवी दिशा देणार आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज असलेले हे केंद्र खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांचे वैज्ञानिक पद्धतीने मूल्यांकन करेल, ज्यामुळे त्यांच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा होईल. येथील बायोमेकॅनिकल टूल्स, फिटनेस विश्लेषण उपकरणे आणि रिकव्हरी सिस्टम्स खेळाडूंना त्यांच्या तंत्रात प्रगती करता येतील, दुखापतींची जोखीम कमी होईल आणि जलद पुनर्वसन शक्य होईल. केंद्रात आहारतज्ज्ञ आणि क्रीडा मानसशास्त्रज्ञ वैयक्तिक मार्गदर्शन देतील, ज्यामुळे खेळाडूंचा शारीरिक, मानसिक आणि तांत्रिक विकास साधला जाईल. विशेषतः ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना या सुविधांचा मोठा लाभ होईल, कारण त्यांना जागतिक स्तरावरील स्पर्धांसाठी आवश्यक प्रशिक्षण आणि पाठबळ मिळेल. या केंद्रामुळे खेळाडूंची कार्यक्षमता वाढेल, दुखापतींवर मात करणे सोपे होईल आणि आंतरराष्ट्रीय यशाची संधी मिळेल.
हे केंद्र खेळाडूंना तांत्रिक प्रगतीसह सर्वांगीण विकासासाठी एक आदर्श व्यासपीठ देईल, जे त्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम बनवेल. येथे ट्रेडमिल, सायकल, कार्डिओ टेस्ट्स, बॉडी कॉम्पोझिशन अॅनालायझर, इसो-कायनेटिक स्ट्रेंथ टेस्टिंग, बायोमेकॅनिक्स अॅनालिसिस, स्पायरोमेट्री टेस्ट, सायकोलॉजिकल काउन्सेलिंग, न्यूट्रिशन गाइडन्स, फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशन यासह अत्याधुनिक सॉफ्टवेअरद्वारे तांत्रिक विश्लेषण उपलब्ध आहे. याशिवाय, आहारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, मानसशास्त्रज्ञ आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच यांच्याद्वारे प्रत्येक खेळाडूच्या वैयक्तिक गरजांनुसार टेस्ट आणि अहवाल तयार केले जातील.

शिक्रापुर (पुणे): मलठण फाटा परिसरात सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज सायंकाळी सव्वा सहा वाजता केलेल्या कारवाईत रेकॉर्डवरील गुन्हेगार लखन उर्फ महेश पोपट भोसले (रा. वडगाव, जयराम स्वामी, ता. खटाव, जि. सातारा) जखमी अवस्थेत पकडला गेला.
भोसलेने पोलिसांना पाहताच तीक्ष्ण हत्याराने हल्ला चढविला. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी गोळीबार करत त्याला जखमी केले. त्यानंतर उपचारासाठी त्याला तातडीने सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले परतू भोसले मयत झाला चकमकी पोलिसही जखमी झाल्याची माहिती आहे.
भोसले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी अशा 22 हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. दहीवडी, म्हसवड, वडगाव निंबाळकर, बारामती, इंदापूर, वडूज या ठिकाणच्या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.
त्याच्यावर यापूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. 2022 मध्ये पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला अटक केली होती. सध्या तो जामीनावर बाहेर होता. सातारा येथे दाखल असलेल्या एका गुन्ह्यात तो पोलिसांना हवा असल्याची माहिती मिळताच आज ही कारवाई करण्यात आली.
Satara Crime News : सातारा (Satara) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सातारा शहर पोलिसांवर (Satara Police) पुणे येथील शिक्रापूरमध्ये हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हल्ला करणाऱ्या आरोपीचा शिक्रापूर येथे सातारा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. लखन भोसले असे एन्काऊंटर झालेल्या आरोपीचे नाव आहे. जबरी चोरी प्रकरणात लखन भोसलेला अटक करण्यासाठी गेलेल्या चार पोलिसांवर त्याने हल्ला केला होता. हल्ल्यात सातारा पोलीस दलातील चार पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी एन्काऊंटर केलेला आरोपी लखन भोसले हा खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील रहिवासी आहे. लखन भोसलेवर सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात जबरी चोरीसह दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन दिवसापूर्वी महिलेच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करुन फरार झालेल्या लखन भोसले या आरोपीला शोधण्यासाठी सातारा पोलिसांचे पथक शिक्रापूर येथे गेले असताना ही घटना घडली आहे.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा

फलटण – आगामी गणेश विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. मिरवणुकीतील वाद टाळण्यासाठी पारंपरिक विसर्जन मार्गात बदल करण्याची मागणी काही नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, डीजेचा वापर आढळल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा सक्त इशारा पोलिसांनी दिला आहे.
ही माहिती फलटण शहर पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आली.
बैठकीदरम्यान माजी उपनगराध्यक्ष सुनील मठपती यांनी मिरवणुकीचा पारंपरिक मार्ग बदलण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले,
“सर्व मंडळे गजानन चौक ते राम मंदिर येथे एकत्र येत असल्याने चढाओढ निर्माण होते आणि वाद होण्याची शक्यता वाढते. हे टाळण्यासाठी नवीन मार्ग निश्चित करणे आवश्यक आहे.”
रविवार पेठ तालीम गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष नितीन चोरमले यांनी मंडळांना ठराविक वेळा निश्चित करून देण्याची व शक्यतो जवळच्या मार्गाने विसर्जनास परवानगी देण्याची सूचना केली, जेणेकरून प्रेक्षकांची धक्काबुक्की आणि वाद टाळता येतील.
पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की,
“मंडळांचा भर देखाव्यांपेक्षा डीजेवर जास्त आहे. मात्र, डीजेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात आणि कायद्याचे उल्लंघन होते. यंदा मिरवणुकीत डीजे आढळल्यास आवाजाची पातळी तपासली जाणार नाही, थेट गुन्हा दाखल होईल आणि डीजे प्रणाली जप्त केली जाईल. वरिष्ठ कार्यालयाकडूनही याबाबत कठोर आदेश प्राप्त झाले आहेत.”
श्री. शहा यांनी पुढे सांगितले की,
“दारू पिऊन धिंगाणा घालणारे तसेच आरटीओच्या नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक यांच्यावरही गुन्हे दाखल केले जातील. गेल्या वर्षी ५ गुन्हे दाखल झाले होते; परंतु यंदा नियमभंग करणाऱ्यांवर १०० टक्के कारवाई होणार आहे.”
या बैठकीस पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे तसेच शहरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
,