Saturday, August 22, 2026
Homeसाताराक्रीडा दिनानिमित्त नेहरू कप हॉकी स्पर्धेचे भव्य आयोजन

क्रीडा दिनानिमित्त नेहरू कप हॉकी स्पर्धेचे भव्य आयोजन

फलटण : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मुधोजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज, फलटण येथे शालेय जिल्हास्तरीय नेहरू कप हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्य खोखो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “फलटणला संस्थान काळापासून खेळाला प्रोत्साहन देण्याची परंपरा आहे. आजच्या खेळाडूंनी जिद्द, मेहनत आणि शिस्त यांच्या बळावर आपले स्थान निर्माण करावे आणि मेजर ध्यानचंद यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा.”

तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे यांनी सांगितले की, “या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील हॉकीपटूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल आणि हॉकी खेळाला निश्चितच बळ मिळेल.”

उद्घाटन सोहळ्यास माजी क्रीडा अधिकारी महेश कुटाळे, ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक जगन्नाथ धुमाळ, बी. बी. खुरुंगे, क्रीडा समिती सदस्य शिवाजीराव घोरपडे, वसंत शेडगे, महेंद्र जाधव, समर अहिवळे, गणेश भोईटे, कपिल मोरे आणि क्रीडा शिक्षक सचिन धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments