Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 148

स्वप्नांच्या उंबरठ्यावर नियतीने खेचला घात; महाराष्ट्रात मुलींमधून पीएसआय परीक्षेत प्रथम आलेली अश्विनी केदारींचा दुर्दैवी मृत्यू

0
स्वप्नांच्या उंबरठ्यावर नियतीने खेचला घात; महाराष्ट्रात मुलींमधून पीएसआय परीक्षेत प्रथम आलेली अश्विनी केदारींचा दुर्दैवी मृत्यू

पुणे – २०२३मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून मुलींमधून प्रथम आलेल्या अश्विनी केदारी यांचा अकस्मात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. बाथरुममध्ये हिटरचा धक्का बसून उकळतं पाणी अंगावर सांडल्यामुळे केदारी जवळपास ८० टक्के भाजल्या होत्या. मात्र दहा दिवसांची त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्या पुण्यातील खेड तालुक्यातील पाळू येथील शेतकरी कुटुंबातील होत्या. अश्विनी केदारींच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

तीस वर्षीय अश्विनी केदारी 28 ऑगस्ट रोजी पहाटे अभ्यासासाठी उठल्या होत्या. त्यांनी आंघोळीला गरम पाणी करण्यासाठी बालदीमध्ये हिटर लावला होता. अचानक त्यांचा डोळा लागला आणि थोडा वेळाने त्यांना जाग आली. त्यावेळी पाणी चांगलंच गरम झालं होतं. हिटर बंद करुन बालदी उचलत असताना त्यातील उकळतं पाणी सांडलं आणि अश्विनीही पाय घसरुन पडल्या. या अपघातात त्यांचं शरीर जवळपास 80 टक्के भाजलं होतं. अश्विनी यांना तात्काळ पिंपरी चिंचवड येथील डी वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारांसाठी मोठा खर्च होत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी आर्थिक मदतीचं आवाहन केलं होतं.

अनेकांच्या पुढाकाराने त्यांना मदतही मिळाली, परंतु जवळपास दहा दिवसांपासून सुरु असलेली मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2023 च्या बॅचमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत अश्विनी केदारी यांनी राज्यातून मुलींमधून पहिलं येण्याचा बहुमान पटकावला होता. त्यांनी जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्नही पाहिले होते, त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरु होती. मात्र नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते. ऐन गणेशोत्सवात 28 ऑगस्ट रोजी त्यांना झालेल्या भीषण अपघातात त्यांची स्वप्नही विरुन गेली. अश्विनीच्या अचानक जाण्याने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचे मित्र परिवार, सहकारी, खेड तालुक्यासह स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे.

आदर्श शिक्षक सन्मान पुरस्काराने श्री. काशिनाथ सोनवलकर यांचा गौरव

0
आदर्श शिक्षक सन्मान पुरस्काराने श्री. काशिनाथ सोनवलकर यांचा गौरव


फलटण: शिक्षण, समाजसेवा, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल श्री. काशिनाथ सोनवलकर यांना महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी विडणी या संस्थेमार्फत ‘आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार २०२५’ हा पुरस्कार फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दीपकराव चव्हाण, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.संस्थेचे अध्यक्ष हणमंतराव अभंग, उपाध्यक्षा डॉ.सौ.सुचिता शेंडे, सचिव राजू पवार व सर्व विश्वस्त मंडळ, संस्थेचे सल्लागार माजी प्राचार्य रामदास अभंग यांनी या बहुमानाबद्दल त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्री.काशिनाथ सोनवलकर यांनी आपल्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे कार्य केले आहे. त्यांनी प्रगत शिक्षण संस्थेच्या कमला निंबकर बालभवन, फलटण येथे क्रीडाशिक्षक आणि इतिहास विषयाचे शिक्षक म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली. यासोबतच, त्यांनी परमपूज्य आत्मगिरी महाराज आश्रमशाळा बुध ता. खटाव जि. सातारा येथे अध्यापनाचे कार्य केले.जिल्हा परिषद केंद्रशाळा झिरपवाडी येथे अंशकालीन निर्देशक म्हणूनही काम केले आहे. श्रीमंत शिवाजीराजे कॉलेज ऑफ़ हॉर्टिकल्चर, फलटण येथे शारीरिक निर्देशक म्हणून काम केले. त्यांचे विद्यार्थी नेहमीच क्रीडा आणि अभ्यासाच्या क्षेत्रात चमकले आहेत. केवळ शैक्षणिकच नव्हे, तर सामाजिक आणि धार्मिक कार्यांमध्येही त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजातील अनेक घटकांना मदत मिळाली असून, त्यांच्या योगदानाला ही एक योग्य पोचपावती मिळाली आहे.

पुरस्काराला उत्तर देताना ते म्हणाले, “या पुरस्काराचे श्रेय माझ्या गुरुवर्य डॉ.मॅक्सिन बर्नसन, डॉ.मंजिरी निंबकर यांना देतो. आपल्याला अगदी पूर्व प्राथमिकपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अध्यापन कसे करावे याचे बाळकडूच या दोघींकडून मिळाल्याचे ते सांगतात. जेवढं आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये राहता येईल तेवढा विद्यार्थी आपल्याला घडवता येईल हे त्यांनीच मला शिकवले. मला माझ्या गुरुवर्यांचा अभिमान वाटतो. त्या आज नव्वदी पार केलेली असताना सुद्धा अजून शिक्षण क्षेत्रात अतुलनीय काम करतच आहेत. या माझ्या गुरुवर्यांचा मला सार्थ अभिमान वाटतो. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ ते संपूर्ण देशभर मला क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून काम करण्याची संधी. जवळपास तीनशे विद्यार्थी माझे स्काऊटच्या माध्यमातून राज्य पुरस्कार प्राप्त झाले. राज्य मेळावा नाशिक या ठिकाणी मी आठ विद्यार्थी घेऊन गेलो होतो. या ठिकाणी संपूर्ण देशातून माझा विद्यार्थी दिग्विजय शांताराम कदम हा बेस्ट कॅडेट म्हणून निवडला गेला. या ठिकाणी महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळाला. आमची निवड केरळ येथे नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प पालोद,केरळ याठिकाणी महाराष्ट्र चे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाली.मी मुलांकडूनही भरपूर काही शिकलो. गटचर्चा केली.गट अध्यापन केले. या सगळ्या प्रवासात मला माझ्या शिक्षक सहकाऱ्यांचं व कुटुंबीयांचं मोलाचे सहकार्य प्राप्त झाले. त्यांचाही मी मनापासून ऋणी आहे. हा जो पुरस्कार मला मिळाला आहे तो माझ्या कर्मभूमीतला पुरस्कार आहे तो मी आनंदाने स्वीकारला आहे. यापूर्वीही मला अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे. अगदी याच वर्षी मला राजर्षी छत्रपती शाहू महाराज आदर्श शिक्षक पुरस्काराने ही गौरवण्यात आले आहे. परंतु कर्मभूमीतला हा पुरस्कार माझ्यासाठी खास आहे.” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सध्या ते उत्तरेश्वर हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज विडणी या ठिकाणी आहेत.
​या पुरस्काराने त्यांच्या अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमाची दखल घेतली गेली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत!

Lung Cancer च्या रुग्णांसाठी महत्त्वाची बातमी! जीवघेण्या आजारानातून आता अशी होणार सुटका

0
Lung Cancer च्या रुग्णांसाठी महत्त्वाची बातमी! जीवघेण्या आजारानातून आता अशी होणार सुटका



Lung Cancer Treatment:  फुफ्फुसांचा कर्करोग धोका दिवसेंदिवस वाढत आहे. असं असताना मोठी बातमी समोर आली आहे. शक्य तितक्या लवकर त्यावर चांगले उपचार शोधणे महत्वाचे आहे. शास्त्रज्ञांना अलीकडेच एक महत्त्वाचे यश मिळाले आहे.



Source link

सातासमुद्रापार ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, स्कॉटलंडमधील ‘अबर्डीन’ गणेशोत्सवात रंगले

0
सातासमुद्रापार ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, स्कॉटलंडमधील ‘अबर्डीन’ गणेशोत्सवात रंगले



akola non resident Indians celebrate ganeshotsav 2025 in Scotland सातासमुद्रापार ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, स्कॉटलंडमधील ‘अबर्डीन’ गणेशोत्सवात रंगले





Source link

पराभव सुत्ता’ तून यशस्वी जीवनाचे मार्गदर्शन मिळते सोमीनाथ घोरपडे

0
पराभव सुत्ता’ तून यशस्वी जीवनाचे मार्गदर्शन मिळते सोमीनाथ घोरपडे


फलटण: यशस्वी आणि शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी कोणते दुर्गुण टाळावे आणि कोणत्या चांगल्या गोष्टींचा स्वीकार करावा, यावर मार्गदर्शन करणारे ‘पराभव सुत्त’ प्रवचन फलटण तालुक्यातील कुरवली खुर्द येथे झाले. भारतीय बौद्ध महासभा फलटण शाखेच्यामार्फत आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेतील बारावे पुष्प गुंपताना ज्येष्ठ प्रवचनकार सोमीनाथ घोरपडे यांनी हे प्रतिपादन केले.
या प्रवचनात सोमीनाथ घोरपडे यांनी ‘पराभव सुत्त’ यामध्ये तथागत भगवान श्रावस्ती येथे जेतवनांत अनाथपिण्डिकाच्या संघारामात राहत होतें तेव्हा रात्र संपत आली असता एक सज्जन व्यक्ती सर्व जेतवन प्रकाशित करुन भगवंताजवळ आली व भगवताला नमस्कार करुन एका बाजूला उभी राहिली. बाजूला उभी राहून ती व्यक्ती भगवंताला पद्यात म्हणाली- आम्ही भगवान गौतमाला विचारण्यासाठी आलो आहोत की पराभव पावणारा पुरुष कोणता? भगवान बुद्धांनी शिष्यांना मानवी जीवनात अधोगतीला नेणाऱ्या १२ प्रमुख कारणांबद्दल मार्गदर्शन केले. या १२ कारणांमध्ये धम्माचा द्वेष करणे, दुर्जनांची संगत करणे, आळशीपणा आणि क्रोध, वृद्ध आई-वडिलांची सेवा न करणे, गरजूंची फसवणूक करणे, स्वतःच सर्व सुख उपभोगणे, अहंकार आणि जातीचा गर्व, व्यसनाधीनता, परस्त्रीगमन, वयोवृद्ध असूनही तरुण स्त्रीशी विवाह करणे, दुर्व्यसनी व्यक्तींना महत्त्वाचे अधिकार देणे आणि अवाजवी हाव बाळगणे यांचा समावेश होतो, असे घोरपडे यांनी सांगितले.
या वेळी बोलताना घोरपडे म्हणाले, “बुद्धांनी सांगितलेली ही १२ कारणे आजही तेवढीच लागू आहेत. जो माणूस या दुर्गुणांपासून दूर राहून सत्कर्म करतो, तो जीवनात कधीही पराभूत होत नाही.” त्यांनी ‘पराभव सुत्त’मधील प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजावून सांगताना, आजच्या काळात या शिकवणीचा उपयोग कसा करता येईल, यावरही मार्गदर्शन केले.


यावेळी फलटण तालुक्याचे भूषण ॲडिशनल कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स, मुंबई आयु-तुषार मोहिते यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील प्रत्येक गावासाठी ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ कुरवली खुर्द गावच्या बौद्ध उपासक उपासिकाना भेट देण्यात आला. त्यासोबत उपस्थितांना तालुका शाखेच्या वतीने संविधान प्रस्ताविकेचे व संस्कार विभागामार्फत सूत्रपठन पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
यावेळी तालुका शाखेचे महासचिव बाबासाहेब जगताप यांनी भाद्रपद पौर्णिमे धम्मामध्ये असणारे महत्व सांगून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रचार व पर्यटन विभागाचे तालुका शाखेचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे व बजीरंग गायकवाड यांनी केले.

​या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष महावीर भालेराव, महासचिव बाबासाहेब जगताप,कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, संस्कार विभागाचे तालुक्याचे उपाध्यक्ष बजीरंग गायकवाड, तालुका संघटक विजय जगताप, जेष्ठ मार्गदर्शक, गायक लक्ष्मण निकाळजे, धम्मप्रसारक संघराज निकाळजे पदाधिकारी आणि गावातील अनेक उपासक-उपासिका उपस्थित होते. या प्रवचनामुळे उपस्थितांना जीवनातील योग्य मार्ग निवडण्यास मदत मिळाली, असे अनेकांनी सांगितले. अशा प्रकारच्या प्रवचनांमुळे समाजात बुद्धांच्या शिकवणीचा प्रसार होण्यास मदत होते, असे आयोजकांनी सांगितले.यावेळी संघराज निकाळजे यांच्या कुटुंबीयांनी खीर दान केली.

Navratri Holidays: नवरात्रीत संपूर्ण 9 दिवस शाळा, कॉलेजला सुट्टी; विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी!

0
Navratri Holidays: नवरात्रीत संपूर्ण 9 दिवस शाळा, कॉलेजला सुट्टी; विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी!


Navratri Holidays 2025:  2 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणारा दसरा आणि नवरात्र सण भारतभर उत्साहाने साजरा केला जाईल. या सणांच्या काळात देशभरात सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सवांचे आयोजन होत असून, शाळा आणि महाविद्यालयांना दीर्घकालीन सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल. नुकतेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यी गणपतीच्या सुट्ट्यांचा आनंद घेऊन शाळेत परतले आहेत. दरम्यान नवरात्रीच्या काळात नऊ दिवसांची सुट्टी कोणाला मिळेल? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

सुट्टीचा कालावधी

देशातील अनेक राज्यांमध्ये नवरात्रीपासून दसऱ्यापर्यंत (अष्टमी ते विजयादशमी) साधारण 9 ते 10 दिवसांच्या सुट्ट्या असतील. काही राज्यांमध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून, तर काही ठिकाणी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून शाळा बंद राहतील. याबाबत प्रत्येक राज्याच्या शिक्षण मंडळाने स्वतंत्र अधिसूचना जारी केल्या आहेत.

कोणत्या राज्यांमधे सुट्ट्या?

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड यांसारख्या राज्यांमध्ये दसऱ्याच्या निमित्ताने शाळा आणि महाविद्यालयांना 9 दिवसांच्या सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. पश्चिम बंगालमध्येही नवरात्रीपासून दसऱ्यापर्यंत शैक्षणिक संस्था बंद राहतील. सुट्ट्यांचा निर्णय हा शाळा आणि स्थानिक प्रशासन मिळून घेत असते. त्यामुळे सुट्ट्या घेण्याआधी शाळेशी संपर्क साधा. 

विद्यार्थ्यांसाठी संधी

या दीर्घ सुट्ट्या विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक सहभागासह अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त ठरतील. विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि मनोरंजन यांचा समतोल राखून कमकुवत विषयांवर लक्ष केंद्रित करावे, असे शिक्षक आणि पालकांना सुचवण्यात आले आहे. या सुट्ट्या विद्यार्थ्यांना ताजेतवाने होण्याची आणि स्व-अभ्यासाद्वारे प्रगती करण्याची संधी देतात. पालकांनी मुलांना दिनचर्या राखण्यास आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यावे, जेणेकरून शाळा सुरू झाल्यावर त्यांना कोणतीही अडचण येऊ नये.

नवरात्र आणि दुर्गापूजेच्या सुट्ट्या

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, 22 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल. 29 सप्टेंबरला महासप्तमी आणि 30 सप्टेंबरला महाअष्टमी साजरी होईल. पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आसाम, बिहार, झारखंड, ओरिसा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात या दिवशी सुट्ट्या असण्याची शक्यता आहे. दसऱ्याची सुट्टी मात्र ऑक्टोबरमध्ये येईल.

रविवार आणि लांबलचक वीकेंड

सप्टेंबर 2025 मध्ये 7, 14, 21 आणि 28 तारखेला रविवारच्या सुट्ट्या असतील. याशिवाय, ईद आणि दुर्गापूजेच्या सुट्ट्या रविवारसोबत जोडल्या गेल्यास लांब वीकेंडचा आनंद विद्यार्थ्यांना मिळू शकतो. या सुट्ट्यांमुळे विद्यार्थ्यांना उत्सव साजरे करण्यासोबतच विश्रांतीचा आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा उत्तम अवसर मिळणार आहे.

FAQ

प्रश्न: दसरा आणि नवरात्रीच्या सुट्ट्या २०२५ मध्ये किती दिवसांच्या असतील आणि त्या कधी सुरू होतात?

उत्तर: दसरा आणि नवरात्रीच्या सुट्ट्या २ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होत असून, देशातील अनेक राज्यांमध्ये ९ ते १० दिवसांच्या असतील. काही राज्यांमध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून, तर काही ठिकाणी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील.

प्रश्न: कोणत्या राज्यांमध्ये दसऱ्याच्या निमित्ताने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत?

उत्तर: उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांमध्ये दसरा आणि नवरात्रीनिमित्त ९ दिवसांच्या सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. प्रत्येक राज्याच्या शिक्षण मंडळाने याबाबत स्वतंत्र अधिसूचना जारी केल्या आहेत.

प्रश्न: दसऱ्याच्या सुट्ट्यांचा विद्यार्थ्यांनी कसा उपयोग करावा?

उत्तर: विद्यार्थ्यांनी या सुट्ट्यांचा उपयोग सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग, अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी करावा. अभ्यास आणि मनोरंजन यांचा समतोल राखून कमकुवत विषयांवर लक्ष केंद्रित करावे. पालकांनी मुलांना दिनचर्या राखण्यास आणि सणांचा आनंद घेण्यास प्रोत्साहन द्यावे, जेणेकरून शाळा सुरू झाल्यावर अडचणी येऊ नयेत.





Source link

कराडला १० कोटी मंजूरीबद्दल तब्बल ४२ हजार मोदकांचे वाटप, माजी नगरसेवक सुहास जगताप यांचा उपक्रम – Marathi News | Fund Sanctioned Karad 42 Thousand Modaks Distributed Ssb 93

0
कराडला १० कोटी मंजूरीबद्दल तब्बल ४२ हजार मोदकांचे वाटप, माजी नगरसेवक सुहास जगताप यांचा उपक्रम – Marathi News | Fund Sanctioned Karad 42 Thousand Modaks Distributed Ssb 93



कराडला १० कोटी मंजूरीबद्दल तब्बल ४२ हजार मोदकांचे वाटप, माजी नगरसेवक सुहास जगताप यांचा उपक्रम – Marathi News | Fund Sanctioned Karad 42 Thousand Modaks Distributed Ssb 93 – Latest Maharashtra News at Loksatta.com





Source link

जिल्ह्यात तीन घटनांमध्ये विजेच्या धक्क्याने तीन जणांचा मृत्यू – Marathi News | Three People Died Of Electric Shock In Separate Nashik Incidents Police Cases Registered Sud 02

0
जिल्ह्यात तीन घटनांमध्ये विजेच्या धक्क्याने तीन जणांचा मृत्यू – Marathi News | Three People Died Of Electric Shock In Separate Nashik Incidents Police Cases Registered Sud 02



जिल्ह्यात तीन घटनांमध्ये विजेच्या धक्क्याने तीन जणांचा मृत्यू – Marathi News | Three People Died Of Electric Shock In Separate Nashik Incidents Police Cases Registered Sud 02 – Latest Nashik News at Loksatta.com





Source link

‘चंद्रग्रहणात बाळाला जन्म देणार नाही’? गर्भवती आईचा म्हणण्यावर डॉक्टरांनी दिलेलं उत्तर विचार करायला भाग पाडेल

0
‘चंद्रग्रहणात बाळाला जन्म देणार नाही’? गर्भवती आईचा म्हणण्यावर डॉक्टरांनी दिलेलं उत्तर विचार करायला भाग पाडेल


गर्भधारणा हा खूप नाजूक काळ मानला जातो. या काळात महिला गर्भाशयात वाढणारे बाळ सुरक्षित राहावे म्हणून लहान-मोठी प्रत्येक खबरदारी घेतात. खास करुन चंद्रग्रहण येते तेव्हा अधिक काळजी वाढते. ग्रहणकाळातील सुतक गर्भवती महिलांसाठी चांगले नसते असा सामान्य समज आहे. अशा परिस्थितीत महिला या काळात विशेष खबरदारी घेतात. दरम्यान, ७ सप्टेंबर रोजी वर्षातील दुसरे चंद्रग्रहण होणार आहे, ज्याला ब्लड मून असेही म्हटले जात आहे.

Add Zee News as a Preferred Source

या प्रसंगी डॉ. शैफाली यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आणि गर्भवती महिलांना महत्त्वाचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, अलिकडेच एक महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात आली होती, परंतु चंद्रग्रहणामुळे तिने प्रसूती करण्यास नकार दिला. डॉक्टर शैफाली यांनी स्पष्टपणे सांगितले की हे बरोबर नाही, कारण बाळंतपण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि आपत्कालीन परिस्थितीत ग्रहणाची वाट पाहू शकत नाही.

चंद्रग्रहणाच्या दिवशी घराबाहेर जाऊ नये

डॉक्टर शैफाली यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, त्यांनी एका महिलेला सांगितले की, ‘वाणी, तुमची प्रसूती तारीख ७ सप्टेंबर आहे. ती पुढे ढकलता येणार नाही. आम्ही तुम्हाला दाखल करू आणि वेदना सुरू करू.’ यावर महिलेने लगेच उत्तर दिले – ‘नाही मॅडम, ७ सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण आहे. त्या दिवशी घराबाहेर पडण्यासही मनाई आहे.’ डॉक्टर शैफाली महिलेला समजावून सांगतात की ते चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण, परंतु आपत्कालीन परिस्थितीत, जसे की रुग्णालयात दाखल होणे, ते करावेच लागते. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणतात की मला माहित आहे की वर्षातील दुसरे चंद्रग्रहण ७ सप्टेंबर रोजी होत आहे.

सुतक काळ कधी 

तज्ञ म्हणतात की चंद्रग्रहणाचा सुतक काळ १२:५८ वाजता सुरू होईल. यानंतर, तुम्ही लोक गर्भवती महिलेला जेवू देणार नाही किंवा झोपू देणार नाही. तसेच कोणत्याही तीक्ष्ण किंवा धोकादायक गोष्टींचा वापर करू देणार नाही. डॉक्टर म्हणतात की लोकांमध्ये असा गैरसमज आहे की जर गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी वरीलपैकी कोणतेही काम केले तर बाळाची जीभ कापली जाईल किंवा बाळ कापले जाईल.

डॉक्टरांचा व्हिडीओ पाहा 

ग्रहणकाळात खाऊ शकतात का?

तज्ञ पुढे म्हणतात की ती सर्व गर्भवती महिलांना सांगू इच्छिते की या काळात, त्या त्यांना जे हवे ते खाऊ शकतात आणि त्यांना हवे तेव्हा झोपू शकतात, कारण या संदर्भात कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही की हे सर्व केल्याने बाळाला कोणतेही नुकसान होते. गर्भवती महिलांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे आराम. तसेच, जर तुमचे बाळ उलटे झाले नाही किंवा त्याची तारीख एकाच दिवशी असेल, तर तुम्ही ताबडतोब रुग्णालयात जावे, जेणेकरून तुमचे बाळ आणि तुम्ही दोघेही निरोगी राहाल.





Source link

फलटण शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गोंधळ – पोलिसांचे आवाहन धाब्यावर बसवून कार्यकर्त्यांची दगडफेक

0
फलटण शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गोंधळ – पोलिसांचे आवाहन धाब्यावर बसवून कार्यकर्त्यांची दगडफेक

फलटण – शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत जिंती नाका परिसरात दोन गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी आधीच “भांडण न करता, तक्रार असल्यास थेट पोलीस स्टेशनला द्या” असे स्पष्ट आवाहन केले होते. मात्र कार्यकर्त्यांनी पोलिसांचा सल्ला धाब्यावर बसवत थेट दगडफेक सुरू केली.

या प्रकारामुळे सार्वजनिक शांततेचा भंग झाला. परिणामी शिवशक्ती गणेशोत्सव मंडळ व जय भवानी तरुण गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी तातडीने कारवाई करून 14 जणांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. भारतीय न्याय संहिता कलम 194 (2) नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

अटकेत असलेले आरोपी (14 जण):

  1. विशाल पांडुरंग माळी (30)
  2. देविदास बापु माळी (25)
  3. संपत भरत माळी (24)
  4. अजय पांडुरंग माळी (29)
  5. रंगराव भरत माळी (27)
  6. अमर राजु माळी (30)
  7. नेताजी प्रकाश माळी (28)
  8. प्रकाश काळुराम माळी (50)
  9. अमोल आकाराम मोरे (22)
  10. रमेश संजय माळी (25)
  11. अजय रघुनाथ माळी (32)
  12. रोहित युवराज मोरे (16)
  13. सुशांत सुनिल जुवेकर (18)
  14. शंकर रामराव जुवेकर (30)

फरार आरोपी (1 जण):
15. अजय संजय जाधव (25)