Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 149

फलटणमध्ये गणेश विसर्जन सुरळीत, नगरपालिकेच्या नियोजनाला नागरिकांचा प्रतिसाद

0
फलटणमध्ये गणेश विसर्जन सुरळीत, नगरपालिकेच्या नियोजनाला नागरिकांचा प्रतिसाद

फलटण : यंदाच्या गणेशोत्सव विसर्जनासाठी फलटण नगरपालिकेने आखलेल्या काटेकोर नियोजनामुळे विसर्जन प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडली. घरगुती गणेश विसर्जन करणाऱ्या नागरिकांपासून ते गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना कोणतीही अडचण आली नाही.

क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथील निरा उजवा कालवा पंढरपूर पुलावर मोठ्या गणेश मंडळांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यंदा प्रथमच पुलावर बॅरिकेट्स लावण्यात आल्याने वाहतूक सुरळीत राहिली. मोठ्या गणपतींचे विसर्जन क्रेनच्या साह्याने करण्यात आले.

घरगुती गणपतींसाठी यशवंतराव चव्हाण हायस्कूल आणि इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन येथे जलकुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येक विसर्जनानंतर मूर्ती जलकुंडातून वेगळ्या करण्यात आल्या. यावेळी नगरपालिका कर्मचारी दिवसभर उपस्थित राहून विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पाडत होते.

निरा उजवा कालवा परिसरातही नगरपालिकेची मोठी टीम तैनात होती. निर्माल्य कलेशची व्यवस्था करून नागरिकांना पूजाविधीतील साहित्य पाण्यात न टाकण्याचे आवाहन करण्यात आले, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. विनोद जाधव आणि फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासक श्री. निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कर्मचारी वर्गाने जबाबदारीने कर्तव्य बजावले.

शिक्षक दिनी विद्यार्थ्यांनी सांभाळला शाळेचा कारभार

0
शिक्षक दिनी विद्यार्थ्यांनी सांभाळला शाळेचा कारभार

फलटण : आयडियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन एक आगळ्यावेगळ्या उपक्रमाने साजरा करण्यात आला. या दिवशी विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भूमिका पार पाडत शाळेचा संपूर्ण कारभार सांभाळला. यामुळे विद्यार्थ्यांना जबाबदारी, व्यवस्थापन कौशल्य आणि नेतृत्वाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ. वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन झाले. विद्यार्थिनींनी डायरेक्टर, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, विभाग प्रमुख (HOD), क्रीडा शिक्षक, संगीत व नृत्य शिक्षक, लिपिक, शिपाई आणि मदतनीस अशा विविध पदांच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या.

विद्यार्थी डायरेक्टर शर्व भोईटे याने शिक्षकांची बैठक घेत कामकाजाचे मार्गदर्शन केले. या टीमने शिस्तबद्ध पद्धतीने शाळेचे काम यशस्वी पार पाडले. शाळेचे डायरेक्टर शिवराज भोईटे व सेंटर हेड सुचिता जाधव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या आत्मविश्वासाचे आणि जबाबदारीच्या जाणिवेचे कौतुक केले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिस्त, वेळेचे नियोजन, निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुण यांसारखी जीवनमूल्ये शिकायला मिळाली. शिक्षक म्हणून भूमिका निभावताना शिक्षण क्षेत्रातील व्यापकता आणि जबाबदारीची जाणीव झाली. हा अभिनव कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.

Chandra Grahan 2025 : गर्भवती महिलांनी घ्यावी विशेष काळजी, 5 कामं केल्यावर होऊ शकतं नुकसान

0
Chandra Grahan 2025 : गर्भवती महिलांनी घ्यावी विशेष काळजी, 5 कामं केल्यावर होऊ शकतं नुकसान


Lunar Eclipse 2025 : खगोलीय दृष्टिकोनातून ग्रहण जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. हिंदू धर्मात ग्रहणाबद्दल अनेक मान्यता आहेत. यामुळे, गर्भवती महिलांना ग्रहण काळात खूप काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. असे मानले जाते की ग्रहणाचा त्यांच्या गर्भाशयात वाढणाऱ्या बाळावर खोलवर परिणाम होतो. या वर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी ७ आणि ८ सप्टेंबरच्या रात्री पूर्ण चंद्रग्रहण होत आहे. विशेष म्हणजे हे ग्रहण भारतातही दिसेल, त्यामुळे ज्योतिषी आणि खगोलशास्त्र तज्ञ तसेच सामान्य लोकांमध्ये याबद्दल खूप उत्सुकता आहे. असे मानले जाते की हे पूर्ण चंद्रग्रहण आतापर्यंतचे सर्वात मोठे ग्रहण असेल. यावेळी चंद्र सुमारे ८२ मिनिटे ग्रहणात राहील. जगभरात ७०० कोटींहून अधिक लोक ही खगोलीय घटना पाहतील आणि जगातील जवळजवळ सर्व वस्ती असलेल्या खंडांमध्ये ते दिसेल. आपल्या शास्त्रांमध्ये ग्रहणाच्या वेळी अनेक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया

Add Zee News as a Preferred Source

 या गोष्टी करू नका

  • गर्भवती महिलांनी ग्रहण पाहू नये. शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की त्यांनी ग्रहणाच्या सावलीपासून देखील दूर राहावे. यावेळी बाहेर पडल्याने गर्भाशयात वाढणाऱ्या बाळावर वाईट परिणाम होऊ शकतो. गर्भवती महिलेच्या खोलीच्या खिडक्या पडद्यांनी चांगल्या प्रकारे झाकल्या पाहिजेत जेणेकरून चंद्राची सावली त्यांच्यापर्यंत पोहोचू नये.
  • ग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी कात्री, चाकू, सुई यासारख्या तीक्ष्ण आणि टोकदार वस्तू वापरू नयेत किंवा शिवणकाम किंवा विणकाम करू नये. असे केल्याने तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. गर्भवती महिलांनी त्यांच्या पोटावर गेरू लावावे जेणेकरून चंद्राची अशुद्ध किरणे गर्भाशयातील बाळापासून दूर राहतील.
  • गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी अन्न खाणे टाळावेच, तर ते शिजवणे देखील टाळावे. असे मानले जाते की या वेळी शिजवलेले अन्न ग्रहणाच्या अशुद्ध किरणांमुळे दूषित होते. याचा परिणाम गर्भाशयातील बाळाच्या विकासावर होऊ शकतो. जर घरात आधीच शिजवलेले अन्न असेल तर त्यात तुळशीची पाने घालावीत.
  • चंद्रग्रहणाच्या वेळी, तुम्ही मंत्र जप करू शकता, हनुमान चालीसा वाचू शकता आणि धार्मिक पुस्तके वाचू शकता. ग्रहण संपल्यानंतर, दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर दान करावे. असे केल्याने खूप शुभ परिणाम मिळतात. यामुळे आई आणि बाळ निरोगी राहतात.
  • चंद्रग्रहण संपल्यानंतर, गर्भवती महिलांनी स्नान करावे आणि कपडे बदलावेत. आंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून स्नान करावे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही जुने कपडे देखील दान करू शकता आणि चंद्रग्रहणाच्या वेळी विश्रांती घेणे चांगले.

(हे पण वाचा – भारतात कधी दिसणार चंद्रग्रहण? सतत विचारले जाणारे FAQ पाहा) 

FAQ 

2025 मध्ये चंद्रग्रहण कधी होणार आहे?
2025 मध्ये पूर्ण चंद्रग्रहण 7 आणि 8 सप्टेंबरच्या रात्री भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार आहे आणि सुमारे 82 मिनिटे चंद्र ग्रहणाच्या सावलीत राहील.

हे चंद्रग्रहण किती महत्त्वाचे आहे?
हे चंद्रग्रहण खगोलीय आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, हे आतापर्यंतचे सर्वात मोठे चंद्रग्रहण असेल, आणि जगभरातील 700 कोटींहून अधिक लोक हे पाहतील. धार्मिकदृष्ट्या, हिंदू शास्त्रांमध्ये ग्रहण काळात विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो, विशेषतः गर्भवती महिलांसाठी.

चंद्रग्रहण भारतात कुठे दिसेल?
हे पूर्ण चंद्रग्रहण भारतातील सर्व भागांमध्ये दिसेल, तसेच जगातील जवळजवळ सर्व खंडांमध्ये (आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया) दिसेल.





Source link

मुधोजी हायस्कूलचा जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत डंका!

0
मुधोजी हायस्कूलचा जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत डंका!

फलटण :- क्रीडा क्षेत्रातील आपली विजयी परंपरा कायम ठेवत मुधोजी हायस्कूलने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुलात नुकत्याच पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय नेहरू कप हॉकी स्पर्धेत या शाळेच्या तिन्ही संघांनी घवघवीत यश संपादन केले.

१७ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात मुधोजी हायस्कूलने साताऱ्याच्या सैनिक स्कूलवर मात करून प्रथम क्रमांक पटकावला. यासह १५ वर्षांखालील मुले आणि १७ वर्षांखालील मुलांच्या गटातही मुधोजी हायस्कूल विजयी ठरले. या यशामुळे तिन्ही संघांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

राष्ट्रीय प्रशिक्षक महेश खुटाळे, सचिन धुमाळ आणि क्रीडा शिक्षक खुरंगे यांचे मार्गदर्शन तसेच माजी खेळाडू विनय नेरकर, ऋषिकेश पवार आणि कपिल मोरे यांची साथ या यशामागे महत्त्वाची ठरली. गेल्या अनेक वर्षांपासून राज्य पातळीवर मुधोजी हायस्कूलचा दबदबा राहिला असून, यंदा राज्य विजेतेपद मिळवणे हेच मुख्य उद्दिष्ट असल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले.

या विजयामुळे मुधोजी हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, फलटण शहरासाठीही हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.

व्यावसायिक स्पर्धेतील रागातून ‘खोटा गुन्हा कट’; पोलिसांची धडक कारवाई

0
व्यावसायिक स्पर्धेतील रागातून ‘खोटा गुन्हा कट’; पोलिसांची धडक कारवाई

फलटण :-  फलटण ग्रामीण पोलिसांनी व्यावसायिक मत्सरातून अकॅडमी चालकाला गांजा आणि पिस्तूलाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट उधळून लावला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधार मात्र फरार आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २७ ऑगस्ट रोजी मौजे दालवडी येथे स्विफ्ट डिझायर कारमध्ये १८ किलो गांजा (किंमत ४.३० लाख), गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकून गाडीची नपासणी केली असता हा मुद्देमाल आढळला. गाडीचे मालक रवींद्र कोलवडकर यांनी पोलिसांना सांगितले की, व्यवसायातील स्पर्धेतून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचला गेला आहे.

चौकशीत उघड झाले की, कोलवडकर यांचा माजी व्यावसायिक भागीदार कुमार उर्फ ज्ञानेश्वर परदेशी यानेच हा कट रचला होता. परदेशीने धमकी देत, टोळीच्या मदतीने गाडी बनावट चावीने उघडून त्यात गांजा व पिस्तूल ठेवले. पोलिसांनी जयेश जाधव, अनिल गजरे, ओंकार खराडे, रोहन एडके आणि मुसा शिंदे यांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांनी चौकशीत कबुली दिली असून, मुख्य सूत्रधार परदेशी फरार आहे.

या प्रकरणी कट रचणे, चोरी करणे आदी गंभीर कलमे दाखल करण्यात आली असून, अटक आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक आरोपी अनिल गजरे हा यापूर्वीच्या ‘हनी ट्रॅप’ प्रकरणातही फरारी असल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडीक करत आहेत.

गर्भवती महिलेनं दोन चिमुकल्या मुलींसह स्वतःला विहिरीत झोकून दिलं; साताऱ्यातील कारी गाव हादरलं!

0


Satara Crime News : सातारा शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात गरोदर मातेने दोन मुलीसह विहिरीत उडी मारली आहे. या घटने मातेसह एका मुलीचा मृत्यू झाला आहे. तर एकीला वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. साताऱ्यातील परळी खोऱ्यातल्या कारी येथील हि घटना असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याच्या परळी खोऱ्यातील कारी येथील एका गरोदर मातेने तिच्या दोन मुलींसह घराशेजारीत विहिरीत उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तिच्या मोठ्या मुलीला वाचवण्यात यश आले. मात्र तिच्या पोटातील अर्भकासहित गरोदर माता आणि तिची छोटी मुलगी यामध्ये मृत्युमुखी पडली. ऋतुजा विशाल मोरे (वय 27 वर्ष), स्पृहा विशाल मोरे वय 3 वर्ष, मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. त्रिशा विशाल मोरे वय 6 वर्ष हिला वाचवण्यात यश आले आहे. हे सर्व राहणार कारीचे आहेत. मात्र उद्योगधंद्यानिमित्त ते मुंबई येथे असतात. ते गणपती सणानिमित्त आपल्या मूळ गावी कारी येथे आले होते. मात्र मूळ गावीच हि घटना घडली आहे.

झाडाच्या फांदीला धरून एक मुलगी लटकली, अन्…..

गणपती उत्सव संपल्यानंतर पुन्हा ते मुंबईला जाणार होते. मात्र कौटुंबिक झालेल्या वादातून ऋतुजा यांनी राहत्या घरापासून काही अंतरावर असणाऱ्या विहिरीकमध्ये मुलगी स्पृहा, त्रिषा यांना घेऊन गेल्या आणि त्यांनी विहिरीमध्ये उडी मारली. यावेळी विहिरी लगतच काही अंतरावर गावातील युवक हराळी ( द्रुवा) काढत होते. यावेळी त्यांना विहिरीलगत लहान मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. हा आवाज ऐकून ते तात्काळ आवाजाच्या दिशेने विहिरीकडे पळाले. त्यांच्या निदर्शनास आले की मुलगी विहिरीत पडली आहे. विहिरीमध्ये एका झाडाच्या फांदीला धरून एक मुलगी लटकलेली होती ती मोठ मोठ्याने ओरडत होती. त्यांनी तिला तात्काळ वाचवले. मात्र त्याच वेळी विहिरीमध्ये ऋतुजा यांची कन्या स्पृहा याही आढळल्या. त्यांनी तात्काळ गावातील युवकांच्या मदतीने त्यांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

आणखी वाचा 

आणखी वाचा



Source link

श्री .गणेशोत्सवानिमित्त भांडवलकर वस्ती येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

0
श्री .गणेशोत्सवानिमित्त भांडवलकर वस्ती येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन


जिंती, चौधरवाडी, भांडवलकर वस्ती, शिंदेवाडी गावांना लाभ
फलटण – श्री गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वावर, ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या अभियानांतर्गत भांडवलकर वस्ती (शिवनगर) येथे एक भव्य मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर निकोप हॉस्पिटल फलटण यांच्या मार्फत आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ जिंती, चौधरवाडी (गारपीरवाडी), भांडवलकर वस्ती (शिवनगर), आणि शिंदेवाडी (पाटणेवाडी) या परिसरातील अनेक नागरिकांनी घेतला.
यावेळी निकोप हॉस्पिटल, फलटण येथील प्रसिद्ध डॉ. जे. टी. पोळ यांनी विशेषत्वाने उपस्थित राहून नागरिकांना विविध आरोग्यविषयक शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा ज्योतिबा फुले व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याविषयी माहिती दिली. शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी तसेच आवश्यक वैद्यकीय सल्ला व उपचार ही करण्यात आले.न्यू हनुमान तरुण मंडळाच्या पुढाकाराने व अथक प्रयत्नांमुळे हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले. न्यू हनुमान तरुण मंडळाने समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. यावेळी सर्व गावचे ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.Free health camp organized at Bhadwalkar Vasti on the occasion of Shri Ganesh Festival

बेघर मुलं नि सुरक्षित कुटुंबे

0
बेघर मुलं नि सुरक्षित कुटुंबे


गायत्री पाठकपटवर्धन
‘फॉस्टर केअर’ अर्थात ‘तात्पुरतं पालकत्व’ हे बेघर, अनाथ, परित्यक्त, सुरक्षेची गरज असलेल्या बालकांसाठी चांगला पर्याय असू शकतो मात्र, कायद्याचा आधार असूनही अद्याप भारतामध्ये ‘फॉस्टर केअर’ची संकल्पना फारशी रुजलेली नाही. त्याबद्दल गैरसमज जास्त आहेत आणि एकूण प्रक्रियेविषयी उदासीनता आहे. प्रशासन आणि समाजानेही या प्रक्रियेला अधिक जाणून घेतल्यास अनेक बालकांना सुरक्षित कुटुंबाचा पर्याय मिळू शकेल.

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ३७ टक्के लोकसंख्या ही केवळ बालकांची आहे. त्यातील जवळपास १८ टक्के बालकांनाच खऱ्या अर्थाने प्रगल्भ आणि सुरक्षित वातावरण लाभलेले पालक आणि कुटुंब मिळते. भारतात बालमजुरी, बालविवाह, बाल लैंगिक शोषण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांसोबतच बालकांचे एकूणच हक्क पणाला लागलेली कितीतरी मुलं रोजच्या जगण्यात अवहेलना झेलत आहेत. त्यातून काही बालके तर आपले जैविक पालक गमावलेली, परित्यक्त, बेघर किंवा धोकादायक परिस्थितीत वाढत आहेत. त्यांना सुरक्षित निवारा, कुटुंब मिळवून देण्याचे, त्यांचे हक्क अबाधित ठेवण्याचे काम केवळ सरकारचे नाही, तर तितकेच समाजाचेही आहे.

अशा बेघर आणि सुरेक्षेची गरज असलेल्या बालकांना कुटुंब मिळवून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तो त्यांचा हक्क आहे. मात्र अशा बालकांना मिळणारा शासकीय निवारा म्हणजे त्यांच्यासाठीची बालगृहे, निवारागृहे, आधारगृहे. मात्र ती शेवटचा पर्याय असायला हवीत.

एकीकडे सुरक्षित आणि आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम असलेल्या, मध्यम आणि उच्च मध्यम, श्रीमंत वर्गातल्या आधुनिक कुटुंबांमध्ये अलीकडे मुलं होण्याचं प्रमाण कमी झाले आहे. किंवा मूलच न होण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतामध्ये ‘दत्तक विधान’ असून त्यातही बालक पूर्णत: दत्तक विधानासाठी तयार असणे, होणे यातही प्रचंड वेळ जातोय. चाळिशीकडे झुकलेली अनेक जोडपी तर हतबल झालेली आहेत. अशासांठी ‘फॉस्टर केअर’ ही प्रक्रिया अजमावणे हे सहज, सोपे आणि सुटसुटीत ठरू शकते, मात्र त्याकडे समाजाची, प्रशासनाची प्राथमिकता दिसत नसल्याचे आढळते.

खरं तर ममतेसाठी आसुसलेल्या जोडप्यांना आणि कुटुंब हवं म्हणून आतुरलेल्या बालकांची नाव एकच आहे. पण त्या नावेत बसवणारा नावाडी मात्र तितकासा महत्त्वाकांक्षी नसल्याने ‘फॉस्टर केअर’ प्रक्रिया दुर्लक्षित राहताना दिसून येत आहे. ‘फॉस्टर केअर’ म्हणजेच ‘तात्पुरते पालकत्व.’ एकूणच असुरक्षित वातावरणात वाढणाऱ्या बालकांना तात्पुरत्या स्वरूपात का होईना एखाद्या सुरक्षित कुटुंबामध्ये वाढण्याची योजना अतिशय सहज, सोपी सुटसुटीत व्हावी यासाठी काम करण्याची नितांत आवश्यकता आहे. या योजनेचा उद्देश मुलांना संस्थात्मक देखभालीपासून (बालगृह, अनाथाश्रम) दूर करून कुटुंबवत्सल वातावरण मिळवून देणे हा आहे. मात्र प्रशासनाला, सामाजिक कार्यकर्त्यांना या योजनेची अंमलबजावणी करताना खूप आव्हानांना सामोरे जावे लागते आहे.

या योजनेची कायदेशीर चौकट समजून घेताना ‘फॉस्टर केअरिंग’ला कायदेशीर आधार मुख्यत्वे बालक न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०२५ ( JJ Act 2015) व ‘मिशन वात्सल्य’ मार्गदर्शक तत्त्वे २०२२मध्ये पाहायला हवं. ‘बाल न्याय अधिकारण २०१५’ ( JJ Act )मध्ये कलम ४४ नुसार, फॉस्टर केअर हे ‘कुटुंब-आधारित पर्यायी देखभाल’ या स्वरूपात परिभाषित केले आहे. ‘राज्य बालसुरक्षा समिती’ ( State Child Protection Society) आणि ‘जिल्हा बालसुरक्षा समिती’ ( District Child Protection Unit) यांच्या माध्यमातून ‘फॉस्टर केअर’ उपक्रम अमलात येतो.

त्यामध्ये मुलांच्या देखरेखीकरिता योग्य पार्श्वभूमी असलेले, स्थिर उत्पन्न असलेले आणि समुपदेशन, गृहभेटी आदी गोष्टी केल्यानंतर तपासून निवडलेले कुटुंबच ‘फॉस्टर केअर’ म्हणजेच ‘तात्पुरते पालकत्व’ या प्रक्रियेत सहभागी होऊ शकते.

मात्र या योजनेच्या अंमलबजावणीसाठी बऱ्याच मर्यादा येतात. भारतात अजूनही ‘फॉस्टर केअर’ मोठ्या प्रमाणावर स्वीकारले गेलेले नाही. अनाथ किंवा परित्यक्त मुलांच्या देखरेखीसाठी बहुसंख्य वेळा संस्थात्मक पद्धत (बालगृह, अनाथाश्रम) वापरली जातात. काही राज्यांमध्ये (महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, गुजरात) ‘फॉस्टर केअर’ योजना राबविल्या जातात. पण त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. महाराष्ट्रात ‘पालकत्व योजना’ या नावाने याची सुरुवात झाली. त्यातही ‘हमी’ देण्यासारखी परिस्थिती नाही. पायलट प्रकल्प म्हणूनच याकडे पाहिले जाते.

० ते १८ या वयोगटातील बालक ‘फॉस्टर केअर’ला जाऊ शकते. त्यामुळे फॉस्टर केअरची योजना कालमर्यादा अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशी दोन प्रकारांत आखली जाते. अल्पकालीन फॉस्टर केअरमध्ये बालकांचे तात्पुरते काळजी संरक्षण कालावधी: साधारण ६ महिने ते १ वर्ष इतका असतो. कारण बालकांना मूलभूत सुरक्षितता, काळजी व आधार मिळावा, आणि भविष्यातील निर्णय (परिवारात परत जाणे / दत्तक) घेता येईल. तर दीर्घकालीन प्रक्रियेत जे बालक तात्पुरते नाही, तर अधिक काळ फॉस्टर कुटुंबात राहू शकतात. त्याचा कालावधी: साधारण १ ते ३ वर्षे, काही प्रकरणांमध्ये १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत (बालकाच्या गरजेनुसार) राहू शकतो. काही बालकांना पालक किंवा मूळ कुटुंबात परत जाण्यासाठी योग्य नाही, त्यामुळे दीर्घकालीन काळजी आवश्यक असते.

समाजामध्ये ‘फॉस्टर केअर’ म्हणजे दत्तक ( adoption) असा गैरसमज मोठ्या प्रमाणावर आहे. दोन्ही वेगळे असून, ‘फॉस्टर केअर’ हे तात्पुरते व दत्तक हे कायमस्वरूपी असते हे समजावणे आवश्यक आहे. समाजात प्रस्थापित असलेली कुटुंब व्यवस्था ही वेगळी आहे आणि त्यामुळे या तात्पुरत्या काळजी घेण्याच्या प्रक्रियेबाबत बरेच समज-गैरसमज पालकांमध्ये दिसून येतात. समाजात या बाबतीत त्यामुळे जागरूकतेचा अभाव दिसून येतो. तसेच जिल्हा पातळीवर तपासणी, निवड प्रक्रिया, आर्थिक सहाय्य, नियमित देखरेख यात प्रशासनाकडूनही उशीर होतो. केंद्र व राज्य सरकारकडून काही प्रमाणात या योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते. पालकांना त्यांच्या पालकत्वासाठी एक छोटं सहकार्य म्हणून या आर्थिक मदतीकडे पाहण्याची आवश्यकता आहे. कारण मुळात ‘फॉस्टर’ पालक म्हणून

ज्या कुटुंबाची निवड केली जाते त्यामध्ये ते कुटुंब बालकाची संपूर्ण काळजी, देखभाल करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही हे पाहिलेच जाते. तरीही वाढत्या महागाईचा विचार करता शासनाने बालकाचा आणि पालकांचा विचार केला आहे.

भारतात साधारणपणे किती मुले ‘फॉस्टर केअर’च्या प्रक्रियेचा भाग होऊ शकतात याचा अधिकृत, अद्यायावत आकडा उपलब्ध होत नाही. बालक जेव्हा संस्थेत दाखल होते तेव्हा सुरुवातीपासूनच बालकाला त्याच्या जैविक पालकांकडेच पाठविण्यासाठी संस्थात्मक पातळीवर प्रयत्न करावे असा नियम आहे. त्यामध्ये जर संस्थांना अपयश आले तरंच हे बालक ‘फॉस्टर केअर बेबी’ म्हणून मान्यता पावते. पण देशातील बऱ्याच संस्था संस्थेतील बालकांनी आपापल्या जैविक पालकांच्या घरी पाठविण्यासाठी फारच कमी प्रयत्न करतात. त्यामुळे नेमकी किती बालके फॉस्टर केअर योजनेसाठी सहभागी होऊ शकतात, याचा नेमका आकडा उपलब्ध होत नाही. म्हणूनच ‘फॉस्टर केअर फ्री बेबी’ ही संकल्पना भारतातील बालगृहांमध्ये आभावाने दिसते. त्यामुळेही अशा बालकांची नोंद दिसून येत नाही.

आपल्याकडे ‘कुटुंब व्यवस्थेतील पालकत्व’ या संकल्पनेबाबत काही पारंपरिक ठोकताळे आहेत. त्यांना भेदणे अत्यावश्यक आहे. तात्पुरत्या पालकत्वासाठी का होईना परक्या मुलांना घरात आणण्याबाबत अजूनही कुटुंबे संकोच करताना दिसून येतात. मुलांच्या शारीरिक व मानसिक सुरक्षिततेबाबत प्रशासकीय यंत्रणेकडून जी निगराणीची पुरेशी व्यवस्था असायला हवी, तीही उपलब्ध नाही. एका मर्यादेपलीकडे प्रशासनही काही करू शकत नाही, या मर्यादा लक्षात घेऊन समाज कार्यकर्ते, समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ यांच्या मदतीची गरज असते पण त्यांचीही संसाधने मर्यादित आहेत. तसेच ग्रामीण भागात ‘फॉस्टर केअर’विषयी अत्यल्प माहिती आहे. ‘मिशन वात्सल्य २०२२’अंतर्गत ‘फॉस्टर केअर’ला प्रोत्साहन देण्यावर भर दिला गेला आहे. काही प्रमाणात का होईना आताशा स्वयंसेवी संस्था (एनजीओ) समाजजागृती आणि कुटुंबांना प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेत आहेत. काही कुटुंबांनी अशा मुलांना आपुलकीने सांभाळून त्यांच्या शिक्षण व विकासात मोलाचे योगदान देत आहेत.

भारतामध्ये ‘फॉस्टर केअर’ची संकल्पना अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. संस्थात्मक देखभालीवर अवलंबून असलेल्या लाखो मुलांना कुटुंबासारखे वातावरण देण्यासाठी याचा व्यापक प्रसार होणे गरजेचे आहे. यासाठी शासन, स्वयंसेवी संस्था आणि समाज यांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

परदेशात मात्र अशा बालकांना कुटुंब मिळवून देण्यासाठी ‘फॉस्टर केअर’ योजनेला प्राधान्यक्रम दिला जातो. २०२२च्या दरम्यान अमेरिकेत ‘चिल्ड्रन वेल्फेअर सिस्टिम’ अंतर्गत सुमारे ३.९ लाख मुले ‘फॉस्टर केअर’मध्ये आहेत. अमेरिका, इंग्लंड, स्विडन, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे या देशांमध्ये जवळपास ७० ते ८० टक्के ‘फॉस्टर केअर’ आहेत. २०२३ मध्ये यूकेमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त मुलांना संस्थांमध्ये ठेवण्याऐवजी फॉस्टर केअरमध्ये ठेवल्याची नोंद दिसून येते. जर्मनीत सुमारे ८० ते ९० हजार मुले ‘फॉस्टर’ कुटुंबांमध्ये ठेवलेली आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये ४६,२१२ मुले ‘आउट ऑफ होम केअर’ योजनेत सहभागी होती. यापैकी बहुसंख्य ‘फॉस्टर केअर’मध्ये आहेत. इथे नातेवाईक ‘फॉस्टर केअर’जास्त आहेत. म्हणजे जवळपास ५० टक्के मुले नातेवाईकांकडे ठेवली जातात.

भारतात मात्र ‘फॉस्टर केअर’मध्ये असलेल्या मुलांची संख्या खूपच कमी (अंदाजे काही हजारच) आहे. त्यामुळे कुटुंबापासून वंचित राहणाऱ्या बालकांना घरची माया आणि कुटुंबाचं प्रेम मिळावं यासाठी भारताने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

(लेखिका अनाथ, निराधार बालहक्क कार्यकर्र्त्या असून, पुण्यातील ‘सनाथ वेलफेअर फाउंडेशन’च्या अध्यक्ष आहेत.)

sanathgroup@gmail.com



Source link

५ किलो बटाटे की ५ किलो समोसे…कोणती पिशवी जड? तरुणीचे भन्नाट उत्तर ऐकून तुम्हीही म्हणाल, व्वा हुशार!

0
५ किलो बटाटे की ५ किलो समोसे…कोणती पिशवी जड? तरुणीचे भन्नाट उत्तर ऐकून तुम्हीही म्हणाल, व्वा हुशार!


Viral Video Girl Witty Answer: सोशल मीडियाच्या दुनियेत कोणता व्हिडीओ, कोणता किस्सा आणि कोणता प्रसंग एका क्षणात व्हायरल होईल याचा नेमका अंदाज बांधणं खरंच कठीण आहे. कधी साधा नाच करणारा व्हिडीओ ट्रेंड होतो, तर कधी अगदी गमतीशीर प्रश्नोत्तरं लोकांच्या हशा-पिकांतून चर्चेचा विषय बनतात. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चर्चेत आला आहे.

व्हिडीओमध्ये नेहमीसारखं एका मुलाखतीचं दृश्य आहे. एका तरुणानं पार्कमध्ये फिरणाऱ्या दोन मुलींना थांबवलं आणि विचारलं, “समजा तुम्ही एका दुकानातून पाच किलो बटाटे घेतले आणि दुसऱ्या दुकानातून पाच किलो समोसे घेतले… तर मला सांगा, कोणती पिशवी जड असेल?” प्रश्न ऐकताच अनेकांना वाटलं की मुलगी नक्की गोंधळेल आणि चुकीचं उत्तर देईल. कारण हे प्रश्न ऐकायला सोपे वाटतात, पण उत्तर द्यायला थोडे क्लिष्ट.

पण खरी कमाल झाली मुलीच्या उत्तरानं. क्षणाचाही विलंब न लावता ती म्हणाली – “समोशाची पिशवी जड असेल!” हे ऐकताच मुलाला आश्चर्याचा धक्का बसला. त्यानं लगेच प्रतिप्रश्न केला, “दोघांचेही वजन पाच किलो आहे, मग दोन्ही पिशव्या समानच जड असणार ना?”

पण इथेच मुलीनं असा ट्विस्ट दिला की संपूर्ण व्हिडीओ धमाकेदार झाला. ती म्हणाली – “तुला माहीत नाही का? समोशासोबत चटणीही मिळते, त्यामुळे तीच पिशवी जड असणार!”

आता एवढ्या भन्नाट उत्तरानं आजूबाजूचे लोकच नाही तर हा व्हिडीओ पाहणारे हजारो नेटकरीही अक्षरशः हसून लोळले. काहींनी तर अगदी मजेशीर मीम्स तयार करून हा व्हिडीओ ट्रेंडिंग बनवला. KBC च्या सात कोटी जिंकण्याच्या सीनवर हा किस्सा जोडून “वाह दीदी वाह!” असं लिहिलेलं मीम व्हायरल झालं.

आज सोशल मीडियावर या मुलीच्या स्मार्ट उत्तराचं कौतुक होतंय. लोक म्हणतायत – “ही खरी दहापैकी दहा मार्कांची बुद्धिमत्ता!” काहींनी तर थेट तिचं कौतुक करत “समोशासोबत चटणीची आठवण फक्त हुशार लोकांनाच होते”, असं लिहिलंय.

या एका साध्या प्रश्नोत्तरानं पुन्हा एकदा दाखवून दिलं की, सोशल मीडियाचं जग किती वेगळं आहे. कधी कोणत्या क्षणी कोणता व्हिडीओ प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणेल, याचा नेमका अंदाज कुणालाच नसतो. पण, एवढं नक्की – या व्हिडीओनं नेटकऱ्यांना हसवून विचार करायलाही लावलंय.

येथे पाहा व्हिडीओ

सामान्य गणितासारखा हा प्रश्न, पण मुलीने दिलेलं उत्तर इतकं अनपेक्षित होतं की ते ऐकून हशा, टाळ्या आणि मीम्सचा पाऊस पडला. नेटकरी आजही या उत्तरावरून भन्नाट चर्चा करतायत…



Source link

सकाळी आवर्जून करा ‘ही’ 5 कामे, थुलथुलीत पोट Gym मध्ये न जाता होईल कमी

0
सकाळी आवर्जून करा ‘ही’ 5 कामे, थुलथुलीत पोट Gym मध्ये न जाता होईल कमी


आजच्या धावपळीच्या जीवनात लोक वाईट खाण्याच्या सवयी आणि अस्वस्थ जीवनशैली पाळत आहेत. ते अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नाला महत्त्व देत आहेत. ते सहज तयार केले जाते आणि चवीने भरलेले देखील असते. परंतु त्यामुळे आपल्या शरीराचे खूप नुकसान होते. यामुळे केवळ लठ्ठपणा वाढत नाही तर मधुमेह आणि हृदयरोगाचा धोकाही वाढत आहे.

Add Zee News as a Preferred Source

लठ्ठपणाबद्दल बोलायचे झाले तर, वजन जितक्या वेगाने वाढते तितके ते कमी करणे कठीण होते. तथापि, वजन कमी करण्यासाठी लोक जिममध्ये जातात आणि तासनतास घाम गाळतात. यासोबतच, अनेक प्रकारचे आहार देखील पाळले जातात. यासाठी, तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतात. परंतु जर सकाळच्या सवयींमध्ये थोडासा बदल केला तर वजन कमी करणे सोपे होते. आजचा आपला लेख देखील याच विषयावर आहे. आम्ही तुम्हाला काही शुभ सकाळच्या सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे पालन केल्याने केवळ चयापचय वाढेलच, शिवाय वजनही लवकर कमी होईल. चला सविस्तरपणे जाणून घेऊया –

सकाळी लवकर उठा

जर तुम्हाला वजन लवकर कमी करायचे असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठावे लागेल. यामुळे तुम्हाला व्यायाम करण्यासाठी आणि निरोगी नाश्ता करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. जर तुम्ही रात्री लवकर झोपलात आणि सकाळी लवकर उठलात तर तुमच्या शरीरातील चयापचय देखील जलद होते.

कोमट पाणी प्या

सकाळी उठल्यानंतर, सर्वप्रथम एक ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे चयापचय वाढतो. चरबी जाळण्याची प्रक्रिया देखील जलद होते. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही लिंबू पाणी, जिरे पाणी किंवा आले-मध पाणी देखील पिऊ शकता. यामुळे पचन सुधारते. चयापचय जलद होते आणि पोटाची सूज देखील कमी होते.

योगा किंवा व्यायाम करा

वजन कमी करण्यासाठी व्यायाम खूप महत्वाचा आहे. जर तुम्ही सकाळी योगा किंवा कार्डिओ व्यायाम केला तर कॅलरीज जलद बर्न होतात. यासोबतच, स्नायू देखील मजबूत होतात. तुम्हाला हे नियमितपणे करावे लागेल.

निरोगी नाश्ता करा

तुम्ही नेहमीच पौष्टिक नाश्ता केला पाहिजे. जर तुम्ही नाश्ता वगळला तर चयापचय मंदावतो. त्यामुळे वजन कमी करणे कठीण होते. प्रथिने, फायबर आणि निरोगी चरबीयुक्त नाश्ता चयापचय वाढवतो. यासोबतच, ते जास्त खाण्यापासून देखील प्रतिबंधित करते.

चांगली झोप घ्या

जर तुम्ही चांगली झोप घेतली आणि ताणतणाव घेतला नाही तर वजन कमी करणे सोपे होते. झोपेचा अभाव आणि ताणतणाव यामुळे आपल्या शरीरात कॉर्टिसोल हार्मोन वाढते. यामुळे चरबी जमा होते. दररोज आठ तासांची चांगली झोप घेणे महत्वाचे आहे.





Source link