Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 144

सूर्या दादाला मानलं राव! पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर जे केलं ते पाहून कौतुकच कराल; Video

0
सूर्या दादाला मानलं राव! पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर जे केलं ते पाहून कौतुकच कराल; Video


India vs Pakistan, Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजयाची नोंद केली आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानने भारतीय संघासमोर विजयासाठी १२८ धावांचे ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली आहे. शेवटी कर्णधार सूर्यकुमार यादवने षटकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान सामना झाल्यानंतर भारतीय खेळाडू हात मिळवण्यासाठी देखील बाहेर आलेले नाहीत.

या सामन्याच्या सुरुवातीला भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार नाणेफेक करण्यासाठी आले. नाणेफेकीच्या वेळी पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक झाल्यानंतर दोन्ही संघांचे कर्णधार हात मिळवणी करतात. पण या सामन्यात असं काहीच झालं नाही. कर्णधार सूर्यकुमार यादव हात न मिळवताच निघून गेला. सामन्याची सुरुवात अशी झाली आणि सूर्याने शेवटही असाच काहीसा केला.

हेही वाचा

सामना झाल्यानंतर नेमकं काय घडलं?

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १२८ धावा करायच्या होत्या. भारतीय संघाचा फलंदाजीक्रम पाहता हे आव्हान भारतीय संघासाठी फार मोठं नव्हतं. अभिषेक आणि गिलने दमदार सुरुवात करून दिल्यानंतर शेवटी कर्णधार सूर्यकुमार यादवने षटकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान विजयानंतर भारतीय फलंदाज हात मिळवण्यासाठी थांबले नाही. सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे दोघेही सामना झाल्यानंतर थेट मैदानाबाहेर निघून गेले. त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये गेल्यानंतर खेळाडूंनी दरवाजा लावून घेतला.

भारतीय संघाचा विजय

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय पूर्णपणे फसला. कारण सुरुवातीच्या षटकात पाकिस्तानला मोठे धक्के बसले. पाकिस्तानला २० षटकांअखेर ९ गडी बाद १२७ धावा केल्या. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर हार्दिक पांड्याने १ गडी बाद केला.

धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून अभिषेक शर्माने ३१ धावांची खेळी करून दमदार सुरुवात करून दिली. शुबमन गिलने १० धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादव ४७ धावांवर नाबाद राहिला. तर तिलक वर्माने ३१ आणि शिवम दुबेने नाबाद १० धावांची खेळी केली. शेवटी सूर्याने षटकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला.





Source link

ऐकावं ते नवलच! साताऱ्यात महिलेनं एकाच वेळी दिला चार बाळांना जन्म, कंदी पेढे वाटून आनंद साजरा

0


Satara : सातार्‍यात एक असा चमत्कार घडला आहे. या चमत्काराने डॉक्टरांपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनाचं थक्क करुन सोडलं आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सलाही टक्कर देईल अशीच घटना घडली आहे. साताऱ्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात एका 27 वर्षीय महिलेनं एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला आहे. या घटनेमुळं सर्वजण थक्क झाले आहेत. 

चार बाळांमध्ये तीन मुली आणि एका मुलाचा समावेश

कोरेगाव तालुक्यात माहेरी आलेल्या काजल विकास खाकुर्डिया या 27 वर्षीय महिलेने एकाचवेळी चार बाळांना जन्म दिला आहे. त्यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. याआधी तब्बल पाच वर्षांपूर्वी काजलला 2 जुळी बाळं आणि नंतर एक बाळ झालं होतं. म्हणजेच एका मातेनं तब्बल सात बाळं जन्म दिला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Newborn Babies : नवजात बालकांना जन्मताच ‘या’ दोन गोष्टींची वाटते भीती, त्या कोणत्या आहेत, तुम्हाला माहितेय का?

आणखी वाचा



Source link

School bus accident : शाळेच्या वाहतूक प्रभारीसह महामार्ग कंत्राटदारावर गुन्हा – Marathi News | Nagpur School Bus And School Van Crash On Flyover In Mankapur Area On Friday Police Booked Six For Fatal Negligence Sud 02

0
School bus accident : शाळेच्या वाहतूक प्रभारीसह महामार्ग कंत्राटदारावर गुन्हा – Marathi News | Nagpur School Bus And School Van Crash On Flyover In Mankapur Area On Friday Police Booked Six For Fatal Negligence Sud 02



School bus accident : शाळेच्या वाहतूक प्रभारीसह महामार्ग कंत्राटदारावर गुन्हा – Marathi News | Nagpur School Bus And School Van Crash On Flyover In Mankapur Area On Friday Police Booked Six For Fatal Negligence Sud 02 – Latest Nagpur News at Loksatta.com





Source link

सकाळी उठल्यानंतर नियमित करा बीटच्या रसाचे सेवन, महिलांच्या आरोग्यासाठी ठरेल लाभदायक

0
सकाळी उठल्यानंतर नियमित करा बीटच्या रसाचे सेवन, महिलांच्या आरोग्यासाठी ठरेल लाभदायक












सकाळी उठल्यानंतर नियमित करा बीटच्या रसाचे सेवन, महिलांच्या आरोग्यासाठी ठरेल लाभदायक | consume beetroot juice regularly after waking up in the morning it will be beneficial for womens health | Navarashtra



























Source link

सातारमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटलांची निवड

0


सातारा : सातार्‍यामध्ये जानेवारीत होणार्‍या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या नावाची निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार विश्वास पाटील ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीच्या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांच्याही नावाची चर्चा होती. नेमाडे यांनी यापूर्वीच नकार दिला असल्याने विश्वास पाटील यांचे नाव अंतिम होणार असल्याची जोरदार चर्चा होती. आजच्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत ‘पानिपत’कारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्षांची घोषणा केली. यंदा संमेलनाचं व्यासपीठ हे राजकीय व्यासपीठ होणार नाही याची काळजी घेऊ, वेगवेगळ्या दिवशी राजकीय नेते येतील यासाठी प्रयत्न करू असंही मिलिंद जोशी यांनी म्हटलं आहे.

साताऱ्यामध्ये होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्यासाठी पुण्यातील साहित्य परिषदेत आज सकाळी अकरा वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. साहित्य महामंडळाच्या वेगवेगळ्या शाखांकडून वेगवेगळ्या साहित्यिकांची नावे अध्यक्षपदासाठी सुचवण्यात आली होती. ज्यामध्ये रंगनाथ पठारे, विश्वास पाटील , बाळ फोंडके यांची नावे आघाडीवर होती. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलींद जोशी यांनी काही दिवसांपुर्वी भालचंद्र नेमाडे यांची देखील भेट घेऊन त्यांना अध्यक्षपदासाठी गळ घातली होती. मात्र नेमाडेंकडून प्रतिसाद मिळाला नाही. आजच्या बैठकीमध्ये विश्वास पाटील यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

संमेलन ४ दिवस चालणार

* संमेलन ४ दिवस चालणार असून १,२,३ आणि ४ जानेवारी २०२६ रोजी साताऱ्यातील शाहू स्टेडियम येथे होणार आहे.  

* ग्रंथडिंडी संमेलनाच्या उद्घाटनाच्या आदल्या दिवशी निघणार असून त्या दिवशी दुपारी ग्रंथ प्रदर्शनाचे, कविकट्ट्याचे आणि बालकुमारांसाठी आनंद मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

* ग्रंथ प्रदर्शनाचा वाचनकांना ४ दिवस लाभ घेता येणार आहे.  

* वक्तृत्व स्पर्धा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानांतर्गत विविधांगी न्याय्य दिल्या जाणार आहेत.  

* निमंत्रितांची कोमलसंमेलन, संमेलनाच्या गाजलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन, मान्यवर लेखकांच्या मुलाखती, कवी संमेलन, कादंबरी कार्यशाळा असे विविध दर्जेदार कार्यक्रम होणार आहेत.  

* या संमेलनासाठी प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील सर्व पदाधिकाऱ्यांना, संमेलन सन्मानप्राप्त लेखकांना, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त निवडक लेखकांना तसेच साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षांना निमंत्रित केले जाणार आहे.  

मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध व लोकप्रिय कादंबरीकार

विश्वास पाटील हे मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध व लोकप्रिय कादंबरीकार आहेत. त्यांनी ऐतिहासिक, सामाजिक व राजकीय विषयांवर आधारित अनेक प्रभावी कादंबऱ्या लिहिल्या आहेत. ‘पानिपत’ ही त्यांची सर्वाधिक गाजलेली ऐतिहासिक कादंबरी असून तिच्यातून त्यांनी आपल्या संपादकीय शैलीची एक आगळीवेगळी छाप मराठी वाचकांवर टाकली आहे.

विश्वास पाटील यांच्या संपादकीय शैलीची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे सखोल संशोधन, भाषेची ताकद, घटनांच्या चित्रणातील नाट्यमयता, आणि मानवी भावभावनांचे जिवंत दर्शन. पानिपत सारख्या ऐतिहासिक कादंबरीसाठी त्यांनी प्रचंड अभ्यास केला. विविध ऐतिहासिक ग्रंथ, दस्तऐवज, पत्रव्यवहार, तसेच तत्कालीन स्थलदर्शन यावर आधारित तपशील त्यांनी कथानकात गुंफले आहेत. यामुळे त्यांची लेखनशैली तथ्यपूर्ण, विश्वासार्ह आणि ऐतिहासिकदृष्ट्या बिनचूक वाटते.

त्यांच्या शैलीतील एक विशेष पैलू म्हणजे भाषेतील लालित्य व ताकदीचा समतोल. ऐतिहासिक काळाच्या अनुरूप भाषाशैली त्यांनी वापरली असूनही ती वाचकांना दुरावलेली वाटत नाही. त्यांची भाषा प्रवाही, समृद्ध आणि वाचकांच्या भावनांना स्पर्श करणारी आहे. युद्ध प्रसंग, राजकीय चढाओढी, आणि वैयक्तिक संघर्ष हे सारे प्रसंग ते अशा शैलीत मांडतात की वाचक त्या काळात डोकावतोय असा भास होतो.

विश्वास पाटील यांनी पानिपतमध्ये सदाशिवराव भाऊ, अहमदशहा अब्दाली, नाना फडणीस, मल्हारराव होळकर यांसारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे व्यक्तिचित्रण अत्यंत प्रभावी पद्धतीने केले आहे. त्यांच्या शैलीमध्ये पात्रांचे मानसिक द्वंद्व, देशप्रेम, धर्मनिष्ठा, तसेच मानवी कमजोरी यांचे सुंदर मिश्रण आहे.

विश्वास पाटील यांची साहित्यसंपदा देखील अत्यंत समृद्ध आहे. त्यांच्या उल्लेखनीय कादंबऱ्यांमध्ये:

पानिपत – मराठ्यांच्या पानिपतवर झालेल्या पराभवावर ऐतिहासिक कादंबरी

झाडाझडती – राजकारण आणि समाज यामधील संघर्षाचे चित्रण.

सिंहासन – राजकीय सत्तासंघर्षावर आधारित.

चंद्रमुखी – समाजाच्या तळागाळातील वास्तव दाखवणारी प्रेमकहाणी.

महाड़ – अस्पृश्यता आणि सामाजिक अन्यायावर भाष्य करणारी कादंबरी.

स्मरणगंध – आत्मकथनात्मक आणि चिंतनशील लेखन.

साताऱ्यातील ४ थे संमेलन  

साताऱ्यात होणारे हे ४ थे संमेलन आहे. १८७८ मध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथद्वारे संमेलन सुरू केलेल्या ३ रे संमेलन १९०५ साली राजवाडा पंडित पांडुरंग यांच्या अध्यक्षपदाखाली साताऱ्यात झाले. 

१९६२ साली न. वि. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली ४४ वे तर १९९१ साली विद्यानिवास सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले होते.  

१९९१ साली ६६ वे संमेलनही याच स्टेडियममध्ये झाले होते.



Source link

how to manage loss of portfolio पोर्टफोलिओचे नुकसान व्यवस्थापन कसे करावे?

0
how to manage loss of portfolio पोर्टफोलिओचे नुकसान व्यवस्थापन कसे करावे?


आपल्या प्रत्येकाला पोर्टफोलिओकडून प्रथम अपेक्षा असते ती परताव्याची. कालावधीनुसार आणि गुंतवणूक पर्यायाच्या जोखमीनुसार वेगवेगळे पर्याय गोळा करून आपण पोर्टफोलिओ बांधतो. जागतिक आणि देशांतर्गत परिस्थिती, कंपन्यांची कामगिरी, येत्या काळातील अंदाजित महागाई, पुरवठा साखळीचे नियोजन, फंड मॅनेजरची पोर्टफोलिओ हाताळायची पद्धत या सर्व गोष्टींचा पोर्टफोलिओवर सतत परिणाम होत असतो. परतावे हे जसे आनंद देणारे असतात तसेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त दुःख नुकसान झालं की होते. कधी हे नुकसान फक्त तात्पुरते किंवा प्रासंगिक असतं, तर कधी-कधी ते प्रत्यक्षसुद्धा होऊ शकतं. नुकसानीत असणारा पोर्टफोलिओ किंवा त्यातील एखादी विशिष्ट गुंतवणूक योग्य आहे की नाही हे वेळीच ठरवणं गरजेचं असतं. कारण गुंतवणूक कालावधीमध्ये नुकसान किती प्रमाणात असावं, यालासुद्धा मर्यादा असतात. त्या मर्यादांच्या पलीकडे जेव्हा पोर्टफोलिओ जातो तेव्हा मुळात अतिशय व्यावहारिक पद्धतीने विचार करून निर्णय घ्यावा लागतो. त्यासाठी आजचा हा लेख.

एक सर्वसामान्य गुंतवणूकदार जेव्हा पैसे गुंतवतो, तेव्हा तो फक्त फायद्याची अपेक्षा करतो. अर्थात यात काही चुकीचं नाहीये. परंतु किती फायदा होईल या प्रश्नाबरोबर किती नुकसान होऊ शकेल हा विचार करणारी फार कमी मंडळी असतात. साधारणपणे मागील परतावे बघून आपण गुंतवणूक करतो आणि जेव्हा आपली गुंतवणूक तोट्यात जाते, तेव्हा विचार करतो की आपलं काय चुकलं? आणि बरेच वेळा आपण याचं खापर दुसऱ्यावर (वितरक, सल्लागार, मित्र , इत्यादी!) किंवा अगदी कोणी मिळालं नाही तर शेअर बाजारावर फोडून मोकळे होतो. मागील लेखामध्ये मी एक गोष्ट वाचकांच्या लक्षात आणून दिली होती – नुकसान मर्यादित ठेवा. आजच्या लेखातून आपण नुकसान व्यवस्थापन कसं करायचं हे समजून घेऊया!

नुकसान व्यवस्थापन तीन पद्धतीने करता येतं – नुकसान व्हायच्या आधी म्हणजे प्रतिबंधात्मक (Preventive Loss Management), नुकसान होत असताना म्हणजेच प्रासंगिक (Incidental Loss Management), आणि नुकसान झाल्यानंतर म्हणेजच घटनोत्तर (Post Facto Loss Management).

हेही वाचा

१. प्रतिबंधात्मक – नुकसान होऊ नये म्हणून केलेली कृती. गुंतवणुकीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर गुंतवणुकीतून नुकसान होऊ नये म्हणून तिच्याबाबतीत केलेली चौकशी, आपल्या जोखीमक्षमतेनुसार तिचा पोर्टफोलिओमधील ठरवलेला वाटा, वेळोवेळी तिचा मागोवा घेणं आणि सगळं अपेक्षेनुसार सुरू आहे याची खात्री करणं – हे सगळं येतं. एखाद्या शेअरमधल्या गुंतवणुकीचा उदाहरण इथे आपण घेऊ शकतो. शेअर घ्यायच्या आधी त्याचं विशलेषण (Fundamental /Technical) करून मग बाजाराची परिस्थिती, आपलं ऍसेट ऍलोकेशन (Asset Allocation) हे सगळं बघून आपण त्यात गुंतवणूक करतो. मग तो शेअर पुढे कशी कामगिरी करतो किंवा ती कंपनी कशी वाढते हे आपण वेळोवेळी तपासात राहतो. कंपनीचे वार्षिक आणि त्रैमासिक अहवाल वाचतो. त्याही पुढे जाऊन काही जण तर जागतिक पातळीचे विचारसुद्धा करतात. अशा पद्धतीने केलेल्या गुंतवणुकीतून नुकसान होणारच नाही, असं मी इथे अजिबात सांगत नाहीये. परंतु नुकसान व्हायची शक्यता कमी मात्र नक्की होते. या गोष्टीचा सर्वात मोठा फायदा नुकसान झालं तर काय करायचं या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सापडतं. एक सजग गुंतवणूकदार नुकसानाला घाबरत नाही, परंतु आपल्या हातात शक्य असलेल्या गोष्टी करून तो नुकसान होणार नाही किंवा झालं तरी कमी होईल ही खबरदारी वेळो-वेळी घेत असतो. विमा कवचसुद्धा याच पद्धतीने काम करतं.

२. प्रासंगिक – सगळ्यांनाच सगळ्याच वेळी नुकसान होणार नाही, असं फारच क्वचित घडतं. साधारणपणे पोर्टफोलिओ म्हटलं की, काही टक्के गुंतवणूक फायद्यात आणि त्याच वेळी काही तोट्यात टक्के गुंतवणूक असू शकते. परंतु तोटा हा कायमस्वरूपी आहे की, तात्पुरता हे तोटा होत असताना लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे. शिवाय कधीकधी तर मुद्दाम तात्पुरता तोटा घेतला जातो की, तो तोटा येत्या काळात नफ्यामध्ये होईल. म्ह्णून तोटा होत असताना त्याचा पुरेपूर पडताळा करून, तो कमी करता येईल का हे पाहावं. इथे आपण स्टॉपलॉसचं उदाहरण घेऊया. शिस्तबद्ध डे ट्रेडिंग करणारे नेहमीच या पद्धतीने आपलं नुकसान कमी करतात. यासाठी प्रत्येक गुंतवणूकदाराने स्वतःची नुकसान पातळी ठरवून आणि भावनाशून्य होऊन तिचा नियमितपणे वापर केल्याने नक्की तोटा कमी होण्यामध्ये मदत होते. आरोग्य विमा आहे म्हणून कुणी मुद्धाम आजारी पडतं का? किंवा उगीचच उपचाराचा खर्च वाढवतं का? नाही ना, मग गुंतवणुकीच्या बाबतीत नुसतं तिचा तोटा वाढत राहतोय हे बघत बसण्यात मला काही तथ्य वाटत नाही. काही काळ नुकसान सहन करून जर पुढे चांगला फायदा होत असेल तर ते ठीक आहे. परंतु चुकीच्या किमतीला घेतलेला शेअर परत त्याच किमतीवर येईस्तोवर न विकणं, हे जास्त नुकसानदायक असतं. त्यापेक्षा थोडा तोटा सहन करून मिळालेले पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवले तर पोर्टफोलिओचा परतावा हा नक्कीच जास्त होईल.

हेही वाचा

३. घटनोत्तर – इथे आपण अशा नुकसानाकडे बघतो, ज्याचा आपण अंदाज बांधू शकलो नव्हतो. उदाहरण घ्यायचं तर एका कंपनीच्या रोख्याचं घेऊया. चांगली दर्जेदार कंपनी जेव्हा बाजारात रोखे आणून कर्ज घेते, तेव्हा तिच्या मागील कामगिरी, पुढील धोरणे आणि प्रवर्तकांची हमी इत्यादी गोष्टींचा विचार करून गुंतवणूकदार आपले पैसे तिच्या रोख्यांमध्ये गुंतवतात. परंतु काही कारणास्तव कंपनीला खुप मोठं नुकसान झालं आणि कंपनी बुडीत गेली तर अशा वेळी गुंतवणूकदाराला नंतरच कळतं. काही वेळी कायद्यानुसार कधी कधी पैसे परत मिळतात, परंतु ते कसे, कधी आणि किती मिळणार हे मात्र माहीत नसतं. अशा प्रकारच्या घटनांमुळे आपल्या पोर्टफोलिओला मोठा धक्का बसू नये म्हणून आपण प्रत्येक गुंतवणुकीचं प्रमाण ठरवून त्यानुसार पोर्टफोलिओ बांधतो. तरीही नुकसान झालंच तर त्यातून जे काही मार्ग काढून पैसे परत मिळवता येतील हे बघतो. परंतु या सगळ्यांमध्ये वेळ आणि पैसे दोनीही खर्च होतात.

तोटा झाल्यानंतरसुद्धा तो फायदा करून देतो. इथे मी प्राप्तिकर नियमाची गोष्ट करत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या भांडवली तोटा आपला कर कमी करण्यात मदत करतो. तेव्हा गुंतवणूकदाराने कर सल्लागाराच्या मदतीने झालेल्या नुकसानाचा वापर करून, त्याबाबतीत योग्य पद्धतीने आणि मुदतीच्या आत प्राप्तिकर विवरण भरून आपलं कर व्यवस्थापनसुद्धा स्मार्ट करावं.

वरील प्रकारे नुकसान व्यवस्थापन करताना प्रत्येक गुंतवणूदाराने सजग राहणं अपेक्षित आहे. पैसे खिशातून किंवा बँकेतून जायच्या आधी हे सगळं जाणून घेऊन योग्य पद्धतीने ते करणं हीच यशस्वी पोर्टफोलिओ व्यवस्थापनाची गुरुकिल्ली आहे.
तृप्ती राणे (सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)
trupti_vrane@yahoo.com
प्रकटीकरण: हा लेख फक्त मार्गदर्शनपर आहे. इथे लेखिका कोणतीही जाहिरात करत नाही.





Source link

एन. रघुरामन यांचा कॉलम: ‘जेन झी’चे सपर क्लब आमच्या नवरात्रांपेक्षा वेगळे नाहीत!

0
एन. रघुरामन यांचा कॉलम:  ‘जेन झी’चे सपर क्लब आमच्या नवरात्रांपेक्षा वेगळे नाहीत!


  • Marathi News
  • Opinion
  • N. Raghuram’s Column, ‘Gen Z’s’ Supper Clubs Are No Different From Our Navratri!

21 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

गोवा आणि आसाममधील प्रत्येकी दोन, ऑस्ट्रेलियातील पर्थ आणि दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमधील प्रत्येकी तीन, सॅन फ्रान्सिस्कोमधील दोन अमेरिकन, उत्तर लंडनमधील दोन ब्रिटन, दुबईचा रहिवासी आणि मी एकमेव मुंबईकर. त्या आठवड्याच्या शेवटी एका खास बनवलेल्या हॉटेल रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. त्या सकाळपर्यंत आम्ही मित्र नव्हतो. पण नंतर आम्ही सर्वांनी आमचे पेय घेतले आणि बोट रेसनंतर टेबलावर बसलो.

आमचे हात जळत होते आणि शरीराचा बराचसा भाग भिजला होता. पण आमचा उत्साह उंचावला होता. त्या टेबलावर आम्हाला एकत्र का आणले? दोन तासांहून अधिक काळ एकाच बोटीत बसणे. हो, चीनमध्ये याला ड्रॅगन बोट रेस म्हणतात आणि भारतात, विशेषतः केरळमध्ये याला स्नेक बोट रेस म्हणतात. अशा स्पर्धांमध्ये तुम्ही काय करता, तुमचे स्थान काय आहे आणि तुम्ही किती वेळा प्रवास करता याची कोणालाही पर्वा नसते. ते फक्त पाण्यातून वेगाने कसे जायचे यावर लक्ष केंद्रित करतात.

नैसर्गिक सौंदर्य असूनही केरळमध्ये मित्र बनवणे सोपे नाही. हा एक असा प्रांत आहे, जो स्थानिक भाषा येत नसल्यास तुम्हाला वेगळे पाडू शकतो. पण त्या दिवशी आम्ही सर्वजण दोन तासांपेक्षा कमी वेळात मित्र झालो. कारण आम्हाला माहीत होते की आमच्यापैकी एकाचे निधन हे आमच्या सर्वांचे वैयक्तिक नुकसान होईल म्हणून आम्ही एकमेकांना मनापासून मदत केली.

त्या दिवशी आम्ही सर्वात वयस्कर क्रूमध्ये होतो. आमच्या क्रूमध्ये दुबईचा रहिवासी 24 वर्षांचा, सर्वात तरुण सहभागी आणि 69 वर्षांचा एक इंग्रज होता. बोटीच्या डेकवर, आयोजक इतर सहभागींना मदत करत असताना त्या वयस्कर इंग्रजाने जबाबदारी घेतली. तो केवळ मजबूत हात असलेला रग्बी खेळाडू नव्हता, तर तो नौकानयनातील सर्वोत्तम तज्ज्ञांपैकी एक होता. नौकानयन सुरू होताच त्याने आम्हाला काय करायचे ते लगेच शिकवले. म्हणूनच आम्ही त्या दिवशी जिंकलो. विजयानंतर आम्ही विजयी मेजवानीसाठी गेलो. मित्र बनवले. एक व्हाॅट्सॲप ग्रुप तयार केला आणि रात्रीच्या जेवणानंतर आम्ही आमच्या कथा शेअर केल्या. आम्ही एकमेकांना आम्ही जगण्यासाठी काय करतो ते सांगितले. त्यापैकी काही खूप श्रीमंत होते आणि काहींनी नुकतेच त्यांचे जीवन घडवण्यास सुरुवात केली होती. पण तो व्हाॅट्सॲप ग्रुप अजूनही माझ्या मोबाइल फोनवर सर्वात सक्रिय आहे.



Source link

‘मेरा तन डोले मेरा मन डोले’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIEDO पाहून कराल कौतुक

0
‘मेरा तन डोले मेरा मन डोले’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIEDO पाहून कराल कौतुक



Viral Video Small Girl dance on Mera Man Dole Mera Tan Dole song video goes viral on social media l ‘मेरा तन डोले मेरा मन डोले’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIEDO पाहून कराल कौतुक





Source link

धक्कादायक! साताऱ्यात डॉक्टरांच्या बनावट सही शिक्क्याचा वापर करुन विमा कंपनीची फसवणूक, चौघांवर

0


Satara Crime News : साताऱ्यातील (satara) फलटण तालुक्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डॉक्टरांच्या बनावट सही शिक्क्याचा वापर करून विमा कंपनीची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील एकाला फलटण तालुका पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर तिघांचा पोलीस शोध घेत आहेत. 

डॉक्टरांच्या तक्रारीवरून फलटण पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला 

खामगाव येथील डॉ. ब्रह्मानंद टाले या पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरांच्या तक्रारीवरून फलटण पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अतिशय धक्कादायक बाब म्हणजे फलटण येथे डॉ. ब्रह्मानंद टाले यांची बनावट सही आणि नोंदणी क्रमांक वापरून हे भामटे रक्त चाचणीचे रिपोर्टही देत होते. 5 ऑगस्ट 2025 रोजी “बुलेट हेल्थकेअर सर्व्हिसेस फॉर रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स” कंपनीचे प्रतिनिधी यांनी खामगाव येथे येऊन डॉ. ब्रह्मानंद टाले यांना काही रक्त चाचणीचे अहवाल दाखवले व हे तुम्ही प्रमाणित केले आहे का? असं विचारल असता डॉ. ब्रह्मानंद टाले यांना शंका आली आणि हे रिपोर्ट मी प्रमाणित केले नसल्याचे सांगत यावर माझी बनावट स्वाक्षरी व बनावट नोंदणी क्रमांक असल्याचे विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितलं. या अहवालावर डॉ. ब्रह्मानंद टाले हे चालवत असलेल्या धन्वंतरी पॅथॉलॉजी लेबलोटरी च नाव व बनावट स्वाक्षरी आणि बनावट नोंदणी क्रमांक असल्याच आढळलं. 

बनावट सही व बनावट नोंदणी क्रमांक वापरून रक्ताचे खोटे अहवाल केले तयार

यावरुन फलटण येथील डॉ. बी. जे.राऊत, फलटण येथीलच धन्वंतरी लॅबोरेटरी साखरवाडी चे चालक विशाल एम नाळे, श्रीराम हेल्थ केअर सर्विसेस लाब्रोटरी इंदापूरचे चालक शंकर खडसे व प्रतिभा सोळुंके यांच्याविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली यावरून पोलिसांनी डॉ. ब्रह्मानंद टाले यांचे नाव,बनावट सही व बनावट नोंदणी क्रमांक वापरून रक्ताचे खोटे अहवाल तयार केल्याप्रकरणी वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.हा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी या चौघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 34, 420, 465, 438,471 नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, यामधील एका आरोपीला फलटण तालुका पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर तिघांचा पोलीस शोध घेत आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

फिल्मी स्टाईलने 2 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न अन् 500 कोटींच्या बोगस औषधांचा पर्दाफाश; झोपेची गोळी, जी घेतल्यानंतर झोपच येत नाही! महाराष्ट्रातही विक्री

आणखी वाचा



Source link

अदानींच्या खाणीसाठी सरकारी यंत्रणा नतमस्तक… ग्रामपंचायतने आरोप करत थेटच सांगितले… – Marathi News | Local Citizens Disrupted Environment Hearing Regarding Underground Coal Mine Given To Adani Group In Nagpur District Zws 70

0
अदानींच्या खाणीसाठी सरकारी यंत्रणा नतमस्तक… ग्रामपंचायतने आरोप करत थेटच सांगितले… – Marathi News | Local Citizens Disrupted Environment Hearing Regarding Underground Coal Mine Given To Adani Group In Nagpur District Zws 70



अदानींच्या खाणीसाठी सरकारी यंत्रणा नतमस्तक… ग्रामपंचायतने आरोप करत थेटच सांगितले… – Marathi News | Local Citizens Disrupted Environment Hearing Regarding Underground Coal Mine Given To Adani Group In Nagpur District Zws 70 – Latest Nagpur News at Loksatta.com





Source link