


आजकाल, जर सोशल मीडियावर कोणत्याही आरोग्य पेयाची सर्वाधिक चर्चा होत असेल तर ती डिटॉक्स चहा आहे. सेलिब्रिटीपासून ते फिटनेस इन्फ्लुएंसरपर्यंत, सर्वजण त्याचे वर्णन त्यांच्या आरोग्याचे आणि सौंदर्याचे रहस्य म्हणून करतात. सकाळी रिकाम्या पोटी एक कप डिटॉक्स चहा पिणे आता अनेक लोकांची रोजची सवय बनली आहे. असा दावा केला जातो की या चहामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, वजन कमी होते, त्वचा चमकदार होते आणि उर्जेची पातळी देखील वाढते.
खरं तर डिटॉक्स टी हे हर्बल टीचे मिश्रण आहे, ज्यामध्ये ग्रीन टी, लिंबू, आले, हळद, एका जातीची बडीशेप, दालचिनी आणि इतर अनेक औषधी वनस्पती मिसळल्या जातात. यातील काही घटक आरोग्यासाठी निश्चितच फायदेशीर आहेत. पण जेव्हा त्यांना पॅकेजिंग आणि आकर्षक जाहिरातींसह ‘डिटॉक्स’चा टॅग दिला जातो तेव्हा ते अचानक लोकांचे प्राधान्य बनते.
मध्यम प्रमाणात डिटॉक्स टी पिल्याने निश्चितच काही फायदे होऊ शकतात. त्यात असलेले ग्रीन टी आणि औषधी वनस्पती शरीरात असलेल्या फ्री रॅडिकल्सशी लढणारे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, पचन सुधारते आणि शरीर हलके वाटते. काही लोकांना ते पिल्यानंतर कमी पोटफुगी आणि जास्त ऊर्जा जाणवते.
प्रत्येकासाठी जास्त काळ डिटॉक्स टी पिणे सुरक्षित नाही. कधीकधी त्यात जुलाब मिसळले जातात, ज्यामुळे वारंवार आतड्यांसंबंधी हालचाल होण्याची समस्या उद्भवते. जर हे सतत होत राहिले तर डिहायड्रेशन आणि शरीरात खनिजांची कमतरता असू शकते. जास्त काळ सेवन केल्याने मूत्रपिंड आणि यकृतावर अतिरिक्त दबाव येऊ शकतो. याशिवाय, काही लोकांना त्यात असलेल्या औषधी वनस्पतींपासून ऍलर्जी किंवा आम्लता देखील असू शकते.
अधूनमधून डिटॉक्स टी घेणे हानिकारक नाही, परंतु दररोज दीर्घकाळ पिणे धोकादायक असू शकते. विशेषतः गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या महिला, रक्तदाब किंवा हृदयरोगी आणि औषधे घेणाऱ्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय ते पिऊ नये.

फलटण :- फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांची बदली पुणे येथे झाली असून, त्यांच्या जागी सांगली येथील निखिल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या काही महिन्यांआधी झालेला हा बदल विशेष लक्षवेधी ठरला आहे.
निखिल मोरे यांनी आपल्या कार्यकाळात शहरात विविध विकासकामे राबवून तसेच प्रशासकीय सुधारणा घडवून आणल्या होत्या. आता त्यांच्या जागी नवनियुक्त मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्यावर आगामी निवडणुकीचे कामकाज आणि शहरातील विकासाचा वेग कायम राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
या बदलामुळे नगरपरिषदेच्या कामकाजावर काय परिणाम होणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.


कंपनीचा हा सेल 15 ते 21 सप्टेंबरपर्यंत चालेल जेणेकरून ग्राहकांना 2026 च्या सुरुवातीला त्यांच्या प्रवासाचे नियोजन करता येईल.
Source link

फलटण (ता.प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयंती दिनांक १७ सप्टेंबरपासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनांक २ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण राज्यभर “सेवा पंधरवडा” आयोजित करण्यात येणार आहे. त्यानुसार फलटण तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली.
मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे (महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या नेतृत्वाखाली व फलटण (अ.जा.) विधानसभा सदस्य मा. श्री. सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागासह विविध शासकीय कार्यालयांच्या सहकार्याने या अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
📌 उपक्रमांचे टप्पे
याशिवाय अॅग्रीस्टॅक नोंदणी, ई-पिक पाहणी जनजागृती, भटक्या व विमुक्त समाज तसेच कातकरी समाजासाठी शासकीय दाखल्यांचे वाटप, वारसनोंदी अद्ययावत करणे, लक्ष्मीमुक्ती योजना व छत्रपती शिवाजी महाराज स्व अभियान यांसाठी विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत.
📍 सेवा पंधरवडा उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग, कृषी विभाग, भूमिअभिलेख विभाग, पोलीस विभाग तसेच इतर शासकीय कार्यालयांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

बौद्धांनी बौद्ध धम्माचे आचरण केले तर प्रगतीची कवाडे लवकर उघडतील – भीमराव लोंढे
फलटण : बौद्धांनी जर खऱ्या अर्थाने धम्माचे आचरण केले तर प्रगतीची कवाडे लवकर उघडतील.आपण त्याच मार्गाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करु त्यासाठी बौद्धांनी आचरणाने आपले जीवन सुखी केले पाहिजे. कारण बुद्धाचा धम्म कर्मकांडावर नाही तर आचरणावर आधारित आहे.’आचरणो परमो धम्मो।। धम्म हा आचरणात असावा असे सुंदर पद्धतीने मार्गदर्शन आयु भिमराव लोंढे सर यांनी केले ते भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे पुष्प 13 वे पुष्प मौजे दुधेबावी या ठिकाणी गुंफताना ‘बौद्धांची आचार संहिता’ या विषयावर बोलत होते.
प्रवचनकार म्हणून लाभलेले आयु भिमराव लोंढे सर तालुका संघटक यांनी उपस्थितांना छान पद्धतीने मार्गदर्शन केले. वर्षावास प्रवचन मालिकेतील या कार्यक्रमाचे आयोजन पंचशील मित्र मंडळ दुधेबावी च्या सहकार्याने दुधेबावी येथील बुद्ध विहारात संपन्न झाले. याप्रसंगी उपस्थित असणारे भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हाचे प्रभारी व राज्याचे संघटक तसेच फलटण तालुक्याचे मार्गदर्शक गुरुवर्य आयु दादासाहेब भोसले उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात फलटण तालुक्याचे कोषाध्यक्ष आयु विठ्ठल निकाळजे सर यांनी धम्म आचरण करुन नीतिमान जीवन जगण्याचे आव्हान केले.आयु.दादासाहेब भोसले यांनी समता सैनिक दलाच्या माध्यमातून सैनिक शिबिराचा आयोजन करण्याची सूचना दिली.तसेच ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन या विहारात करण्यास सुरवात करावी असे सांगितले.अशा पद्धतीने वर्षावास प्रवचन मालिका फलटण तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अतिशय सुंदर पद्धतीने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत सुरु राहणार आहे.
यावेळी फलटण तालुक्याचे भूषण ॲडिशनल कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स, मुंबई आयु-तुषार मोहिते यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील प्रत्येक गावासाठी ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ दुधेबावी गावच्या बौद्ध उपासक उपासिकाना भेट देण्यात आला. त्यासोबत उपस्थितांना तालुका शाखेच्या वतीने संविधान प्रस्ताविकेचे व संस्कार विभागामार्फत सूत्रपठन पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

फलटण :- तालुक्यात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस कोसळून जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले. आज (दि. १५) सकाळी ८:३० वाजेपर्यंत तालुक्यात तब्बल ६३.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे मासिक तसेच वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी ओलांडली गेली आहे.
शासकीय आकडेवारीनुसार, काल दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत सप्टेंबर महिन्यात केवळ ३५.० मि.मी. पाऊस झाला होता, जे मासिक सरासरीच्या फक्त ४८.८ टक्के इतके होते. मात्र, गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे सप्टेंबर महिन्याचे एकूण पर्जन्यमान ९८.९ मि.मी. इतके झाले आहे. हे प्रमाण मासिक सरासरी (७६.८ मि.मी.) पेक्षा तब्बल १२८.८ टक्के आहे.
दरम्यान, एकूण वार्षिक पर्जन्यमानातही मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत तालुक्यात एकूण ३२२.५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून हे प्रमाण वार्षिक सरासरी (२९७.० मि.मी.) च्या १०८.६ टक्के इतके आहे. या पावसामुळे पिकांना व भूजल पातळीला आधार मिळणार असला तरी, अचानक वाढलेल्या पावसामुळे वाहतूक व जनजीवन विस्कळीत झाले.

