Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 141

आम्हाला बदनाम करू नका; बर्गे मृत्यूप्रकरण,मंगला बनसोडेंनी सांगितला तमाशा अन् कला केंद्रातील फरक

0


सातारा : सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे एका विवाहित युवकाने नर्तिकेच्या नादात स्वत:चं आयुष्य संपवलं. या घटनेनं सोलापूरसह बीड जिल्हाही हादरला होता. कारण, बीड जिल्ह्यातील गेवराईच्या एका गावचा माजी उपसरपंच राहिलेल्या गोविंद बर्गेने पूजा गायकवाड (Pooja gaikwad) हिच्या नादात जीव दिला, आपलं कुटुंब पोरकं गेलं. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती, तसेच पूजा गायकवाडला नेटीझन्स आणि गोविंद बर्गेच्या ग्रामस्थांकडून लक्ष्य करण्यात आलं. गोविंदच्या मेहुण्याने दिलेल्या तक्रारीनंतर पूजाविरुद्ध गुन्हा दाखल करत तिला अटकही करण्यात आली आहे. मात्र, या घटनेमुळे राज्यात गावखेड्यात सुरू असलेल्या कला केंद्राचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. येथील वेश्याव्यवसाय आणि अवैध धंद्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे, कला केंद्र आणि तमाशा (Tamasha) यातील फरक सांगत तमाशा कलावंत मंगला बनसोडे (Mangala bansode) यांनी आम्हाला बदनाम करू नका, अशी खंत व्यक्त केलीय.

सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्रात चार भिंतीमध्ये कार्यक्रम असतो तर लोकनाट्य तमाशामध्ये शंभर कलावंत असतात आणि ते त्यांची कला हजारो रसिकांसमोर सादर करतात. वयाच्या 7 व्या वर्षापासून ते आजपर्यंत हजारो रसिकांसमोर मी कला सादर केली. त्यावेळी रसिकांनी देखील आम्हाला न्याय दिला, आमच्यावर प्रेम केलं. त्यामुळेच मला आणि माझ्या आईला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, असे परखड मत तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी मांडले. सध्या सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे कला केंद्रातील नर्तिकेच्या वेडापायी गोळी झाडून घेत आत्महत्या केलेल्या गोविंद बर्गे या युवकाच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र हळहळ होत आहे. त्यामध्ये, नर्तिका असलेल्या पूजा गायकवाड आणि कला केंद्रावर टीका होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर तमाशा आणि कला केंद्र यातील फरक मंगला बनसोडे यांनी सांगितला आहे.

कला केंद्र आणि तमाशा हे वेगळे आहेत, कला केंद्रामुळे आमचा तमाशा बदनामी करू नये, असे आवाहन देखील मंगला बनसोडे यांनी केले आहे. तमाशा आणि कला केंद्र यामध्ये जमीन-आसमानचा फरक आहे. तमाशामध्ये लोककला, समाज प्रबोधन हे कलाकार हजारो प्रेक्षकांसमोर दाखवत असतात. त्यामुळेच, शासनासह रसिकांनी देखील लक्षात घेतलं पाहिजे कला केंद्र ही वेगळी बाजू आहे आणि लोकनाट्य कला म्हणजेच तमाशा ही वेगळी बाजू आहे, असे म्हणत पारगावच्या कला केंद्रातील घटनेनंतर तमाशाला बदनाम केलं जात असल्याची खंत लोकनाट्य कलाकार मंगला बनसोडे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा

85 कोटींचा अपहार, मंत्री मंगलप्रभात लोढांच्या मुलास जीवे मारण्याची धमकी; क्राइम ब्रँचकडून राजेंद्र लोढास अटक

आणखी वाचा



Source link

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या रावण टोळीला बेड्या; गुंडा विरोधी पथकाची कारवाई

0
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या रावण टोळीला बेड्या; गुंडा विरोधी पथकाची कारवाई



pimpri chinchwad ravan gang arrested while preparing for robbery पिंपरी- चिंचवड: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या रावण टोळीला बेड्या; गुंडा विरोधी पथकाची कारवाई





Source link

Heart Attack चं मूळ कारण आहेत ‘या’ 5 सवयी, 90% लोकं मुद्दाम करतात चुका

0
Heart Attack चं मूळ कारण आहेत ‘या’ 5 सवयी, 90% लोकं मुद्दाम करतात चुका


जगभरात सर्वाधिक मृत्यू हे हॉर्ट अटॅकने होत आहे. असं असताना असा समज आहे की, मांसाहार किंवा तिखट पदार्थांमुळे हा आजार दिवसेंदिवस वाढत आहे. पण संशोधनात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये चुकीचा आहार नाही तर चुकीची जीवनशैली, सवयी या जीवघेण्या आजाराचे मूळ कारण बनत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

तज्ञांचे म्हणणे आहे की, आपण दररोज खाल्लेल्या काही पदार्थांमुळे शरीरात नायट्रिक ऑक्साईड नावाच्या एका आवश्यक रेणूची हळूहळू कमतरता निर्माण होत आहे. रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी आणि हृदयाचे रक्षण करण्यासाठी हे रेणू अत्यंत महत्त्वाचे आहे. वेलनेस तज्ज्ञ आणि लेखक डॉ. एरिक बर्ग यांच्या मते, जर शरीरात नायट्रिक ऑक्साईडची पातळी कमी होऊ लागली तर हृदयविकाराचा धोका वाढतो.

नायट्रिक ऑक्साईड हा एक पदार्थ आहे जो रक्तवाहिन्यांना आराम देतो, रक्त परिसंचरण सुधारतो आणि धमन्यांमध्ये प्लेक जमा होण्यास प्रतिबंध करतो. अर्थात, जेव्हा शरीरात त्याची पातळी कमी होते तेव्हा रक्तदाब, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. कोणते पदार्थ हे रेणू कमी करू शकतात ते समजून घेऊया.

साखर

नायट्रिक ऑक्साईडचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे रिफाइंड शुगर. तो सॉफ्ट ड्रिंक्स, मिठाई, सॉस, तृणधान्ये आणि पॅकेज्ड फूडमध्ये आढळतो. रिफाइंड शुगर रक्तातील साखर वेगाने वाढवते आणि रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ निर्माण करते. ते ऑक्सिडेटिव्ह ताण वाढवते आणि नायट्रिक ऑक्साईड कमी करते. दीर्घकाळात, ते इन्सुलिन प्रतिरोध वाढवते आणि रक्तवाहिन्यांच्या अस्तरांना नुकसान पोहोचवते.

मैदा

ब्रेड, बिस्किटे आणि पेस्ट्री यांसारख्या पांढऱ्या पिठापासून बनवलेले पदार्थ शरीरात साखरेत रूपांतरित होतात आणि रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवतात. ते जळजळ आणि चयापचय ताण वाढवतात. याचा रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो आणि नायट्रिक ऑक्साईडची पातळी कमी होते.

हृदयविकाराचा धोका का वाढत आहे?

तेल
सोयाबीन तेल, कॉर्न ऑइल आणि सूर्यफूल तेल यांसारखी तेले पॅकेज्ड फूड आणि फास्ट फूडमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जातात. त्यात ओमेगा-६ फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते, जे शरीरात जळजळ वाढवते. ही तेले गरम केल्यावर लवकर खराब होतात आणि विषारी पदार्थ तयार करतात. सतत वापरल्याने रक्तवाहिन्या कमकुवत होतात आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.

धूम्रपान
धूम्रपान हे नायट्रिक ऑक्साईडचे एक प्रमुख शत्रू देखील आहे. सिगारेट आणि व्हेपिंग दोन्ही शरीरातील नायट्रिक ऑक्साईड जलद कमी करतात. धूम्रपान रक्तवाहिन्यांच्या अस्तरांना नुकसान पोहोचवते आणि त्यात असलेले मुक्त रॅडिकल्स नायट्रिक ऑक्साईड नष्ट करतात. धूम्रपान करणाऱ्यांच्या शरीरात नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी असते आणि त्यांना हृदयरोगाचा धोका जास्त असतो.

अँटीबॅक्टेरियल माउथवॉश
अनेक माउथवॉशमध्ये नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन रोखणारी रसायने असतात. तोंडात काही चांगले बॅक्टेरिया असतात जे अन्नातून नायट्रिक ऑक्साईड तयार करण्यास मदत करतात, परंतु माउथवॉश त्यांना मारतात. यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि दीर्घकाळ दैनंदिन वापरामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.

नायट्रिक ऑक्साईड वाढवण्यासाठी काय करावे

नायट्रिक ऑक्साईड वाढवण्यासाठी आहार आणि जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. पालक, अरुगुला आणि केल सारख्या हिरव्या पालेभाज्या, बीट आणि त्यांचा रस, लसूण, कांदे, संत्री आणि लिंबू सारखी लिंबूवर्गीय फळे, डाळिंब, आर्जिनिनयुक्त काजू आणि बिया आणि कोकोसह डार्क चॉकलेट यांचा आहारात समावेश करणे खूप फायदेशीर आहे. एरोबिक व्यायाम, पुरेशी आणि दर्जेदार झोप घेणे, उन्हात वेळ घालवणे आणि श्वास घेण्याचे व्यायाम, निसर्गात फिरणे किंवा ध्यान करणे यासारख्या तणाव कमी करणाऱ्या सवयींचा अवलंब केल्याने देखील नायट्रिक ऑक्साईडची पातळी वाढू शकते.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

प्रजनन क्षमता, गर्भधारणा… ‘या’ चाचणीसह Gen Z तरुणींच्या मनात आहे तरी काय? रुजतेय अनपेक्षित संकल्पना

0
प्रजनन क्षमता, गर्भधारणा… ‘या’ चाचणीसह Gen Z तरुणींच्या मनात आहे तरी काय? रुजतेय अनपेक्षित संकल्पना


Gen Z on Fertility and Pregnancy : पिढीदरपिढी आरोग्यविषयक अनेक संकल्पनांची माहिती विविध रुपांमध्ये विविध माध्यमांतून पोहोचत गेली. जेन-झींपुढं ही माहिती अधिक व्यापक आणि प्रत्ययकारी प्रकारे पोहोचत असल्या कारणानं ही पिढी प्रजनन क्षमका, गर्भधारणा अशा आरोग्यविषयक स्थितींकडे अगदी वस्तुनिष्ठपणे पाहत असल्याचं दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून यासंदर्भातील माहिती समोर आली, जिथं 23 ते 30 वयोगटातील 200 हून अधिक करुणींचा सहभाह होता. ज्यापैकी भारतातील 35 टक्क्यांहून अधिक महिलांच्या मते 35 वर्षांनंतर महिलांच्या प्रजनन क्षमतेवरव परिणाम होऊन ती कमी होते.  

Add Zee News as a Preferred Source

मदरहुड हॉस्पिटल्स आणि नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या या सर्वेक्षणानुसार महिलांच्या मनात असणाऱ्या या निष्कर्षांमुळं नव्या पिढीतील अर्थात जेन झी तरुणी/ महिलांना आरोग्य, मुलं होण्याची वेळ आणि प्रजनन क्षमता यासंदर्भात पूर्वकल्पना असून, 41 टक्के महिलांच्या माहितीसा स्त्रोत समाज माध्यमं असल्याचं स्पष्ट होत आहे. 

सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार 28-32 वयोगटातील जवळपास 40% महिला गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असून, सर्वेक्षणातील सहभागील 25 टक्के महिलांच्या मते मुल पस्तिशीच्या आत होणं योग्य. आश्चर्यकारकरित्या 35 टक्के महिलांना एएमएच (MH) अर्थात महिलांच्या प्रजनन क्षमतेसंदर्भात माहिती देणाऱ्या चाचणीची कल्पना असल्याचं तर, 10 टक्के महिलांनी ही चाचणी केल्याचंही स्पष्ट झालं. एग फ्रिजिंगची माहितीसुद्धा 56 टक्के महिलांना असून, त्याबबातच्या सखोल माहितीचा अद्यापही अभाव आहे ही मात्र वस्तूस्थिती. 
 
तज्ज्ञ आणि वैद्यकिय क्षेत्रात, प्रामुख्यानं महिलांच्या आरोग्यविषयक विभागांमध्ये काम करणाऱ्या जाणकारांच्या मते वय आणि त्याचा प्रजनन क्षमतेशी असणारा संबंध याबाबत महिला जागरुक असून सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार भारतीय महिलांच्या अंडाशयांचे वय कॉकेशियन महिलांच्या तुलनेत सहा वर्षे वेगाने वाढत आहे. वाढत्या वयानुरूप प्रजननक्षमतेत घट हळूहळू होते, मात्र सर्वात लक्षणीय घट ही पस्तिशीनंतर होते. 

 

DINKS जोडप्यांची वाढती संख्या 

रिलेशनशिप अर्थात नातेसंबंधांचं स्वरुप बदलत असलानाच ‘DINKs कपल’चा ट्रेंड सध्या जोड्यांमध्ये तग धरू लागला आहे. ‘DINKs Couple’ म्हणजे Dual Income No Kids. नोकरी, व्यवसाय करणारी जोडपी लग्नानंतर फॅमिली प्लॅनिंगचा विचार न करता आयुष्याचा मनसोक्त आनंद घेतात ज्यासाठी या DINK या शब्दाचा वापर केला जातो. अशा महिलांमध्ये मोडणाऱ्यांची आकडेवारी 18 टक्के इतकी आहे. 

FAQ

हे सर्वेक्षण कोणत्या संस्थांनी केले आणि त्यात कोण सहभागी होते?
मदरहुड हॉस्पिटल्स आणि नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी यांनी ‘फर्टिलिटी अवेअरनेस: जेन झी इनसाइट्स’ हे सर्वेक्षण ऑगस्ट-सप्टेंबर 2025 मध्ये केले. यात भारतातील मेट्रो आणि टियर-1 शहरांतील 23 ते 30 वयोगटातील 200 हून अधिक जेन झी महिलांचा सहभाग होता. 

जेन झी महिलांना प्रजनन क्षमतेबाबत काय पूर्वकल्पना आहेत?
सर्वेक्षणानुसार, 35% हून अधिक महिलांना 35 वर्षांनंतर प्रजनन क्षमता कमी होत असल्याची कल्पना आहे. याशिवाय, 41% महिलांच्या माहितीचा मुख्य स्रोत सोशल मीडिया आहे. तज्ज्ञांच्या मते, भारतीय महिलांचे अंडाशयांचे वय कॉकेशियन महिलांच्या तुलनेत 6 वर्षे लवकर वाढते, ज्यामुळे 35 नंतर प्रजनन क्षमतेत लक्षणीय घट होते.

गर्भधारणेची वेळ कधी योग्य वाटते?
25% महिलांच्या मते, मुलाची गर्भधारणा 30 वर्षांपूर्वी होणे योग्य आहे. मात्र, 28-32 वयोगटातील 40% महिला गर्भधारणेसाठी प्रयत्न करत आहेत किंवा योजना आखत आहेत.





Source link

चंद्रपूर : पुनर्वसनापूर्वीच तीन लाख टन कोळशाची विक्री! ऑरो इन्फ्रा कंपनीवर खासदार धनोरकर यांचा आरोप – Marathi News | Auro Infra Company Coal Sale Mp Pratibha Dhanorkar Allegation Chandrapur Ssb 93

0
चंद्रपूर : पुनर्वसनापूर्वीच तीन लाख टन कोळशाची विक्री! ऑरो इन्फ्रा कंपनीवर खासदार धनोरकर यांचा आरोप – Marathi News | Auro Infra Company Coal Sale Mp Pratibha Dhanorkar Allegation Chandrapur Ssb 93



चंद्रपूर : पुनर्वसनापूर्वीच तीन लाख टन कोळशाची विक्री! ऑरो इन्फ्रा कंपनीवर खासदार धनोरकर यांचा आरोप – Marathi News | Auro Infra Company Coal Sale Mp Pratibha Dhanorkar Allegation Chandrapur Ssb 93 – Latest Nagpur News at Loksatta.com





Source link

लोणंदमध्ये बेकायदेशीर कुंटणखान्यावर पोलिसांची धडक; दोन महिलांची सुटका, दोघांना अटक

0
लोणंदमध्ये बेकायदेशीर कुंटणखान्यावर पोलिसांची धडक; दोन महिलांची सुटका, दोघांना अटक

लोणंद (ता. खंडाळा, जि. सातारा) परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कुंटणखान्यावर पोलिसांनी धडक कारवाई करून जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलल्या जात असलेल्या दोन महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई १५ सप्टेंबर रोजी करंजेपूल बसस्टॉप परिसरात करण्यात आली. यामध्ये दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडील स्विफ्ट गाडी (क्र. एम एच ११ एमडी ८०५५) जप्त करण्यात आली आहे.

वडगाव निंबाळकर पोलिस पथक पेट्रोलिंग करत असताना लाल रंगाची काळ्या काचा असलेली संशयित गाडी दिसली. पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करून गाडीची पाहणी केली असता दोन महिला आणि दोन पुरुष आढळले. महिला पोलिसांच्या उपस्थितीत चौकशी केली असता, महिलांनी आपल्याला पुण्यातील हडपसर येथून पैशाचे आमिष दाखवून आणल्याचे सांगितले. आरोपींनी त्यांना जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केला होता.

या प्रकरणी सुयोग हिंदुराव खताळ (रा. कापडगाव, लोणंद ता. फलटण, जि. सातारा) व प्रीतम आप्पासाहेब घुले (रा. कापडगाव, लोणंद ता. फलटण, जि. सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार या प्रकरणातून आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलिस निरीक्षक विलास नाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, उपनिरीक्षक राहुल साबळे, डी. एस. वारुळे, हवालदार अमोल भोसले यांच्यासह एस. पी. देशमाने, रमेश नागटिळक, कुंडलिक कडवळे, पोपट नाळे, निलेश जाधव व नागनाथ परगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

पहिले पाऊल: तांत्रिक आणि सामाजिक कौशल्ये

0
पहिले पाऊल: तांत्रिक आणि सामाजिक कौशल्ये


भूषण केळकर / मधुरा केळकर
तंत्रज्ञान, जागतिक अर्थव्यवस्था, वातावरणीय बदल आणि सामाजिक स्थितीत होणाऱ्या वेगवेगळ्या ट्रेंड्समुळे पुढील काही वर्षांत नोकरीची गरज, स्वरूप, आणि आवश्यक कौशल्ये या सगळ्याच गोष्टी बदलणार आहेत. याच विषयावर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ‘फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट २०२५’ मध्ये २०३० साठी काही महत्त्वाचे निष्कर्ष दिले आहेत. सॉफ्ट स्किल्स आणि टेक्निकल कौशल्ये दोन्ही महत्त्वाच्या ठरणार आहेत. नव्याने नोकरी करणाऱ्या व्यक्तीने कोणती कौशल्ये आत्मसात करावीत, ते पाहू.

अहवालाचे काही प्रमुख आकडे असं सांगतात की २०३० पर्यंत सुमारे १७ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होतील आणि ९.२ कोटी नोकऱ्या कमी होऊन, सुमारे ७.८ कोटी दशलक्ष नोकऱ्यांची वाढीची अपेक्षा आहे. त्याचबरोबर सध्याच्या नोकऱ्यांतील अंदाजे ३९ कौशल्ये बदलतील — ती जुनी होऊन नवीन गरजेनुसार अपडेट होणे आवश्यक आहेत. त्याचबरोबर लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे जागतिक कंपन्यांमध्ये ६३ मानव संसाधन अधिकारी म्हणतात की, ‘‘स्किल गॅप’’ ही व्यवसाय परिवर्तनातली सर्वात मोठी अडचण आहे.

२०३० च्या अहवालानुसार, ज्यांना वाढती मागणी असणार आहे, अशी सगळ्यात महत्त्वाची तीन तांत्रिक कौशल्ये ठरली आहेत :

● AI आणि बिग डेटा – डेटा विश्लेषण, मशीन लर्निंग, जनरेटिव्ह AI यांसारख्या तंत्रज्ञानांबद्दल चांगली माहिती असावी. या बाबत आपण पुढेल काही लेखांमध्ये तपशीलवार पाहू.

● नेटवर्क्स आणि सायबरसुरक्षा – माहितीची सुरक्षा, नेटवर्क्सची देखभाल इत्यादी बाबी महत्वाच्या ठरतील.

● तंत्रज्ञान साक्षरता – नवीन साधने, सॉफ्टवेअर, प्लॅटफॉर्म यांचा वापर, डिजिटल कौशल्ये असणे आवश्यक आहे. फक्त तांत्रिक कौशल्येच नव्हे, तर व्यक्तिमत्त्वाच्या, संवादाच्या आणि मनोबलाच्या बाबतीत खालील सात सॉफ्ट स्किल्स खूप महत्त्वाची ठरणार आहेत:

● विश्लेषणात्मक विचार – समस्या समजून घेणे, डेटा वाचणे, माहितीचे परीक्षण करणे. अहवालानुसार सुमारे ७० कंपन्यांना हे कौशल्य अत्यावश्यक आहे.

● लवचिकता – बदलांना तोंड देणे, अस्थिर परिस्थितीत टिकून राहणे.

● नेतृत्व आणि सामाजिक प्रभाव – टीमला चालना देणे, लोकांशी प्रभावी संवाद करणे, प्रेरणा देणे.

● नवोन्मेषी विचार – नवीन उपाय शोधणे, कल्पनाशील असणे, कल्पना वास्तवात रूपांतरित करणे.

● स्व-प्रेरणा व आत्म-जागरूकता – स्वत:मधून काम करण्याची क्षमता, आपली शक्ती- कमकुवत बाजू ओळखणे.

● कुतूहल आणि जीवनभर शिकण्याची वृत्ती – सतत नव्या गोष्टी शिकायची इच्छा, अद्यायावत राहणे ही गरज आहे.

● संवेदनशीलता आणि सक्रिय ऐकणे – सहकारी, ग्राहक यांच्याशी चांगला संबंध ठेवणे, इतरांची भावना समजून घेणे.

पूर्वीच्या काळात एक मोठी अडचण असायची की बऱ्याच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची संधी कमी असायची किंवा अनेक लोकांना Upskilling / Reskilling परवडायचे नाही. आता सुदैवाने अनेक संसाधन उपलब्ध आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल साधने वापरणे, नवीन ट्रेंड्सशी सुसंगत राहणे याने ते करता येईल आणि ते आपण आधीच्या लेखांमध्ये बघितले पण आहेत. आजची मुख्य समस्या ही संसाधन कमी असण्यापेक्षा नवीन शिकण्याबद्दल अनुत्सुक असणे हे आहे! जर एखाद्या कर्मचाऱ्याने आपल्या कामाची नवी भूमिका स्वीकारायची असेल तर त्याला नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची तयारी हवी. म्हणजेच, शाळा किंवा कॉलेज फक्त नाही, तर सतत शिकण्याची वृत्ती टिकवून ठेवावी लागेल.

सामाजिक कौशल्य हे ‘मानवी’ भाग आहेत; असे सिद्ध झाले आहे की जरी AI आणि ऑटोमेशन यांचे प्रमाण आणि व्याप्ती वाढली तरी या कौशल्यांची गरज कमी होणार नाही. भावनांक-आधारित कामे, मानवी संवाद, सहकार्य या गोष्टी कायमच महत्त्वाच्या असतील.

अशा प्रकारे, ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा २०३०’ साठीचा अहवाल हे स्पष्ट करतो की भविष्यातील कामगाराला तांत्रिक कौशल्ये तसेच सॉफ्ट स्किल्स दोन्हीचे विशेष महत्त्व आहे. जे कर्मचारी दोन्ही प्रकारच्या कौशल्यांवर लक्ष देतील, त्यांना बदलत्या नोकरीच्या बाजारात अधिक संधी मिळतील. त्यामुळे नवीन नोकरी लागणाऱ्यांनी हे गुण आत्मसात करणे आवश्यक आहे.

bhooshankelkar@ hotmail.com / mkelkar_2008 @yahoo.com



Source link

२० वर्षांनी पुन्हा ‘जत्रा’चा सिक्वेल येणार का? ‘जत्रा २’बद्दल केदार शिंदेंनी दिली अपडेट; म्हणाले, “भरतने अडवलं अन्…” – Marathi News | Kedar Shinde Talk About Jatra Movie Shares Updates About Jatra 2 Reveal Delays Due To Story Similarities Ssm 00

0
२० वर्षांनी पुन्हा ‘जत्रा’चा सिक्वेल येणार का? ‘जत्रा २’बद्दल केदार शिंदेंनी दिली अपडेट; म्हणाले, “भरतने अडवलं अन्…” – Marathi News | Kedar Shinde Talk About Jatra Movie Shares Updates About Jatra 2 Reveal Delays Due To Story Similarities Ssm 00



२० वर्षांनी पुन्हा ‘जत्रा’चा सिक्वेल येणार का? ‘जत्रा २’बद्दल केदार शिंदेंनी दिली अपडेट; म्हणाले, “भरतने अडवलं अन्…” – Marathi News | Kedar Shinde Talk About Jatra Movie Shares Updates About Jatra 2 Reveal Delays Due To Story Similarities Ssm 00 – Latest Marathi Cinema News at Loksatta.com





Source link

धक्कादायक! धाड..धाड.. साताऱ्यात भर रस्त्यात एकावर गोळीबार, दुचाकीवरुन आलेले हल्लेखोर फरार

0


Satara Crime News : सातारा (Satara) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. साताऱ्यातील शिरवळमध्ये एकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांकडून भर रस्त्यावर गोळीबार करण्यात आला आहे. भर दिवसा घडलेल्या घटनेने शिरवळ परिसरात भीतीचे वातावरण आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आली आहे.

सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारामध्ये रियाज उर्फ मन्या इकबाल शेख जखमी झाला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. जुन्या वादातून रियाजवर गोळीबार झाल्याची प्रार्थमिक माहिती मिळाली आहे. याप्रकरणी शिरवळ पोलीस हल्लेखोरांच्या शोध घेत आहेत. दरम्यान, सध्या खुनाचा बदला खुनाने हा एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. पुण्यातील घटना ताजी असतानाच साताऱ्यातील शिरवळ मध्ये एकावर गोळीबार करण्यात आला आहे. 

गोळीबार करणाऱ्या दोघांचा शिरवळ पोलीसांकडून शोध सुरु  

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 2016 मध्ये प्रतीक चव्हाण याचा खून करण्यात आला होता. याचाच बदला घेण्यासाठी रियाजवर गोळीबार करण्यात आला असल्याची चर्चा आता शिरवळमध्ये सुरू झाली आहे. जुन्या वादातून रियाज वर गोळीबार झाल्याची चर्चा सुरू आहे या गोळीबारामध्ये रियाज शेख हा किरकोळ जखमी झाला आहे. गोळीबार करणाऱ्या दोघांचा शोध शिरवळ पोलीस घेत आहेत. 2016 मध्ये प्रतीक चव्हाण याचा खून करण्यात आला होता. यातील संशयित आरोपी म्हणून रियाज शेखला अटक करण्यात आली होती. 2018 मध्ये त्याची जामीनावर सुटका करण्यात आली. वाई कोर्टामध्ये केस सुरू आहे. आता  त्याच्यावर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

पुण्यात 5 सप्टेंबरला एकाची हत्या

5 सप्टेंबर रोजी पुण्यात रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बंडू आंदेकर याचा जावई आणि वनराज आंदेकर यांच्या खुनातील प्रमुख आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा गोविंद ऊर्फ आयुष कोमकर (18) याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. रात्री पावणे आठच्या सुमारास दोघांनी गोविंद ऊर्फ आयुष कोमकर याच्यावरती तीन गोळ्या झाडून निर्घृण खून केला. गोविंद त्याच्या नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्समधील पार्किंगमध्ये उभा असताना हा हल्ला झाला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशी घडलेल्या या खळबळजनक घटनेमुळे नाना पेठ परिसरात तणाव आणि भीतीचे वातावरण पसरले होते. आता त्यामनंर साताऱ्यातील शिरवळमध्ये देखील भरदिवसा गोळीबार करण्यात आल्याची घटनमा घडल्यानं खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Ayush Komkar : क्लासवरून येऊन पार्किंगमध्ये थांबला अन् घात झाला, वनराज आंदेकरचा भाचा आयुषचा गोळ्या झाडून खून, अजित पवारांनी पोलिसांना दिले आदेश

आणखी वाचा



Source link

बारामतीत क्रिप्टो गुंतवणुकीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पोलिस कारवाईचा गुंतवणूकदार प्रतीक्षेत

0
बारामतीत क्रिप्टो गुंतवणुकीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पोलिस कारवाईचा गुंतवणूकदार प्रतीक्षेत

बारामती : “तीनपट परतावा मिळेल” या गोड आश्वासनाने अनेकांना क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीकडे आकर्षित करण्यात आले आणि अखेर त्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत समोर आला आहे. या प्रकरणातील एक गुंतवणूकदार आजवर पोलिस ठाण्याचे असंख्य हेलपाटे मारत असूनही, कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही ही बाब चिंताजनक आहे.

‘ब्लॅक औरा’ नावाच्या कंपनीच्या माध्यमातून या फसवणुकीचा डाव रचला गेला. गुंतवणूकदारांना नामांकित हॉटेलमधील सेमिनारमध्ये “दीड वर्षात तीनपट नफा मिळेल” अशी बतावणी करण्यात आली. कंपनीच्या स्थानिक प्रतिनिधींनी सतत पाठपुरावा करून गुंतवणुकीस भाग पाडलं. विशेष म्हणजे, पैसे कंपनीच्या खात्यात न जाता ‘भूपेंद्र मनी ट्रान्सफर’ नावाच्या एका वेगळ्याच खात्यावर पाठवायला लावले.

गुंतवणूक झाल्यानंतर संबंधितांना एका वेबसाईटवर अकाऊंट सुरू करून देण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांची रक्कम वाढत असल्याचं दाखवण्यात आलं. मात्र काही काळाने ही वेबसाईट अचानक बंद पडली. दोन दिवसांत सुरू होईल असं सांगण्यात आलं तरी नंतर ती कायमचीच बंद झाली. त्यानंतर गुंतवणूकदारांनी प्रतिनिधींकडे पैशांसाठी तगादा लावल्यावर सुरुवातीला थोडा वेळ मागण्यात आला आणि नंतर मात्र फोन उचलणंही बंद करण्यात आलं.

आजही हे स्थानिक प्रतिनिधी परिसरात बिनधास्त फिरताना दिसतात. मात्र लाखो रुपयांचा चटका बसलेल्या गुंतवणूकदारांच्या हातात फक्त निराशाच उरली आहे. पोलिसांकडे वारंवार तक्रारी देऊनही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.