Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 138

आरक्षणपेच सोडवण्यासाठी ‘मोडी लिपी एआय’ हा आशेचा किरण?

0
आरक्षणपेच सोडवण्यासाठी ‘मोडी लिपी एआय’ हा आशेचा किरण?


अनिकेत शेवडे
महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेला आज एका अनपेक्षित संकटाने वेठीस धरले आहे, ते म्हणजे मोडी लिपी वाचणाऱ्या तज्ज्ञांची तीव्र टंचाई. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक असलेल्या ऐतिहासिक नोंदी शोधण्याचे काम राज्यभर सुरू असताना, प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन मोडीतज्ज्ञ नेमण्याचा नियम कागदावरच राहिला आहे. परिणामी, हजारो अर्जदारांचे भवितव्य लाल फितीत अडकले आहे आणि शासनाची प्रक्रिया ठप्प झाली आहे. ही केवळ आरक्षणापुरती मर्यादित समस्या नाही, तर जमिनीचे वाद, वारसा हक्काचे दावे आणि न्यायालयीन प्रकरणांमध्येही ऐतिहासिक दस्तऐवजांची गरज भासते. या समस्येमुळे आपल्या ऐतिहासिक वारशाशी असलेली नाळही तुटण्याचा धोका आहे. एकट्या पुणे अभिलेखागारातील ३९ हजार ‘रुमालांमध्ये’ बंदिस्त तब्बल चार कोटी दस्तऐवजांपैकी ८० टक्के कागदपत्रे आजपर्यंत कोणी वाचलेलीच नाहीत. याचे कारणही मोडी लिपीतज्ज्ञांची कमतरता हेच आहे. आता पारंपरिक उपायांपलीकडे जाऊन तंत्रज्ञानाची मदत घेणे अटळ आहे.

एआय इतिहास वाचायला कसा शिकतो?

मोडी लिपीचे देवनागरीत लिप्यंतर करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले आहेत पण आयआयटी रुरकी येथील प्रा. स्पर्श मित्तल आणि त्यांच्या टीमने विकसित केलेले MoScNet हे केवळ एक साधे सॉफ्टवेअर नसून यात अद्यायावत एआय प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. व्हिजन-लँग्वेज मॉडेल (VLM): व्हीएलएम न्युरल नेटवर्कवर आधारित आहे. पारंपरिक ऑप्टिकल कॅरॅक्टर रेकग्निशन (OCR) किंवा हँडरायटिंग टेक्स्ट रेकग्निशन (HTR) तंत्रज्ञान अनेकदा अक्षरे किंवा जोडशब्द तोडून वाचण्याचा प्रयत्न करतात. मोडी लिपीच्या सलग आणि वळणदार ( cursive) स्वरूपामुळे ही पद्धत अयशस्वी ठरते. याउलट, व्हीएलएम दोन वेगवेगळ्या माहिती स्राोतांना जोडते: एक म्हणजे दस्तऐवजाचे दृश्य स्वरूप (image) आणि दुसरे म्हणजे त्यातील भाषिक मजकूर (text). हे मॉडेल मोडी लिपीतील शब्दांकडे केवळ तुटक अक्षरांचा समूह म्हणून पाहत नाही, तर एक सलग चित्र म्हणून पाहून त्यातील भाषिक नमुने ओळखते, ज्यामुळे ते मोडीच्या मूळ स्वरूपाला चांगल्या प्रकारे हाताळू शकते. MoScNet च्या कार्यक्षमतेमागे नॉलेज डिस्टिलेशन हे प्रगत तंत्रज्ञान आहे. यामध्ये एका मोठ्या, शक्तिशाली शिक्षक मॉडेलकडून एका लहान, सुटसुटीत विद्यार्थी मॉडेलला शिकवले जाते. विद्यार्थी मॉडेल मूळ शिक्षक मॉडेलपेक्षा १६३ पट लहान असूनही अधिक चांगली कामगिरी करत आहे. या तंत्रज्ञानाचा थेट परिणाम धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे हे मॉडेल वापरण्यासाठी उच्च क्षमतेच्या महागड्या संगणकांची गरज नाही. अशा प्रकारचे मॉडेल जिल्हास्तरीय पुराभिलेखागार किंवा तहसील कार्यालयांसारख्या कमी-संसाधने असलेल्या ठिकाणीही वापरता येऊ शकते.

हेही वाचा

ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर : ही रचना मॉडेलला शब्दांमधील अक्षरांचे एकमेकांशी असलेले संबंध समजून घेण्यास मदत करते. मोडी लिपीत एका अक्षराचे वळण त्याच्या आधीच्या आणि नंतरच्या अक्षरावर अवलंबून असते. हे तंत्रज्ञान नेमके हेच संदर्भ समजून घेते आणि त्यामुळेच ते मोडी लिपीतील जोडशब्द आणि सलग लेखनाच्या आव्हानांवर यशस्वीपणे मात करते. MoDeTrans डेटासेट: कोणत्याही एआय मॉडेलच्या यशाचा पाया त्याचा प्रशिक्षण डेटासेट असतो. MoScNet ला MoDeTrans नावाच्या डेटासेटवर प्रशिक्षित केले गेले आहे, ज्यामध्ये शिवकालीन, पेशवेकालीन आणि ब्रिटिशकालीन अशा तीन वेगवेगळ्या ऐतिहासिक कालखंडांतील २०४३ अस्सल मोडी दस्तऐवजांच्या प्रतिमा आणि तज्ज्ञांनी प्रमाणित केलेले त्यांचे देवनागरी लिप्यंतर यांचा समावेश आहे. या वैविध्यपूर्ण डेटासेटमुळे एआय वेगवेगळ्या हस्ताक्षर शैली, शाईचा फिकेपणा आणि कागदाचा जीर्णपणा यांसारख्या वास्तविक समस्या ओळखायला शिकला आहे. जुने ओसीआर (Optical Character Recognition) तंत्रज्ञान ‘अक्षर-तोडणी’मध्ये अडकते; मोडीसारख्या सलग, जीर्ण आणि विविध हस्ताक्षरांच्या कागदांसमोर ते हात टेकते. एआय नमुना-आणि-संदर्भ शिकते, ज्यामुळे शाईचा फिकेपणा, कागदाची घडण, जोडाक्षरांची वळणं सांभाळत मोठ्या प्रमाणावर अधिक अचूक लिप्यंतर देते; वर मानव-तपासणीचा थर दिला की वेग, खर्च आणि प्रमाण तर तिन्ही आघाड्यांवर ती विद्यामान तंत्रांवर भारी ठरते. MoScNet ने सिद्ध केलेले तांत्रिक मॉडेल भारतातील आणि जगभरातील इतर अनेक लुप्तप्राय किंवा गुंतागुंतीच्या लिपींच्या संवर्धनासाठी एक आदर्श नमुना उपलब्ध करून देते.

संशोधन आणि प्रशासन यांच्यातील दरी

MoScNetच्या विकासाशी संबंधित सर्व संशोधननिबंध आणि बातम्यांमध्ये प्रा. स्पर्श मित्तल आणि आयआयटी रुरकीच्या टीमचे श्रेय नमूद आहे. यामध्ये पुणे येथील सीओईपी आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांचेही योगदान आहे, परंतु पेपरात त्यांची संस्थात्मक संलग्नता म्हणून दिलेली नाही. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत कुठेही महाराष्ट्र शासन, राज्य पुराभिलेखागार किंवा शासनाच्या कोणत्याही विभागाकडून निधी, सहकार्य किंवा मागणी असल्याचा उल्लेख नाही. यावरून हे स्पष्ट होते की, MoScNet हा उपक्रम हे मुख्यत: स्वतंत्र शैक्षणिक संशोधनावर आधारित आहेत. ही बाब शासनासाठी एक संधी आहे.

सध्याच्या प्रयत्नांचे मूल्यांकन

राज्यात आणि राज्याबाहेर मोडी लिपीवर काही प्रमाणात काम सुरू आहे. तमिळनाडूतील तंजावर येथील तमिळ विद्यापीठात मोडी दस्तऐवजांच्या डिजिटायझेशनसाठी महाराष्ट्र शासनाने काही प्रमाणात निधी दिला आहे. तसेच, विविध शैक्षणिक संस्थांनी काही डेटासेट तयार केले आहेत, परंतु ते बहुतेकदा लहान आणि केवळ सुट्या अक्षरांच्या ओळखीवर केंद्रित आहेत, संपूर्ण दस्तऐवजाच्या लिप्यंतरावर नाहीत. पुणे पुराभिलेखागारातही २०१३ पासून डिजिटायझेशनचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांत एकसूत्रतेचा अभाव आहे. त्याऐवजी एका केंद्रीय, धोरणात्मक आणि एकात्मिक दृष्टिकोनाची गरज आहे.

हेही वाचा

धोरणात्मक आराखडा

यासाठी एका ठोस आणि कृतीकेंद्रित योजनेची गरज आहे. महाराष्ट्र शासनाने तातडीने एका उच्चस्तरीय, आंतरविभागीय ‘महाराष्ट्र ऐतिहासिक दस्तऐवज मिशन’ची स्थापना करावी. या मिशनला धोरणात्मक निर्णय घेण्याचे आणि अंमलबजावणीचे पूर्ण अधिकार असावेत. या मिशनचे नेतृत्व मुख्यमंत्री कार्यालयाकडे असावेत, जेणेकरून मिशनला कार्यकारी अधिकार मिळतील आणि आंतरविभागीय समन्वयात अडथळे येणार नाहीत.

सरकारी भागधारक: राज्य पुराभिलेखागार, महसूल विभाग, विधी व न्याय विभाग आणि सामाजिक न्याय विभाग. हे सर्व विभाग या डेटाचे अंतिम वापरकर्ते असल्याने त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

तांत्रिक भागीदार: आयआयटी रुरकी आणि राज्यातील तांत्रिक शिक्षण संस्था. विषयतज्ज्ञ: महाराष्ट्रातील विद्यापीठांमधील इतिहासकार, भाषातज्ज्ञ आणि भारत इतिहास संशोधक मंडळासारख्या (BISM) संस्थांमधील संशोधकांचा एक गट. या मिशनचे प्राथमिक आणि मुख्य उद्दिष्ट हे असेल की, सध्या सुरू असलेल्या डिजिटायझेशन योजनेत वर नमूद केलेला ‘चौथा टप्पा’ (एआय कॉर्पस निर्मिती) समाविष्ट करून एक विशाल, राज्यव्यापी आणि प्रमाणित मोडी लिपी कॉर्पस तयार करण्याच्या प्रक्रियेवर देखरेख करणे. पथदर्शी प्रयोगापासून राज्यव्यापी विस्तारापर्यंत टप्प्याटप्प्याने, अनुभवावर आधारलेली अंमलबजावणी हा अधिक सुरक्षित आणि परिणामकारक मार्ग आहे.

सुरुवात पुण्यातूनच व्हावी. आधीच डिजिटाइज झालेले काही दस्तऐवज निवडून त्यावर प्रयोग करावा. येथे MoScNet बरोबरच शैक्षणिक, ओपन-सोर्स किंवा उद्याोगातील विविध एआय साधने वापरून चाचणी घ्यावी. त्यांची अचूकता, वेग आणि प्रति पान लागणारा खर्च मोजून पाहावा. कोणते मॉडेल स्थानिक दस्तऐवजांना अधिक चपखल बसते हे प्रत्यक्ष कामातून समजेल. मानवी तज्ज्ञांची एक टीम एआयने केलेल्या लिप्यंतराची पडताळणी करेल आणि चुका सुधारून मॉडेलला पुन्हा प्रशिक्षित (fine- tune) करेल.

पायलटमधील अनुभवाच्या आधारे पुढची पायरी म्हणजे राज्यातील सर्व जिल्हा अभिलेखागारांमध्ये ही पद्धत नेणे. इथेही एआय-मानव संयुक्त मॉडेल वापरावे. एआय प्राथमिक लिप्यंतर करेल, पण अंतिम खात्री प्रशिक्षित पडताळणी करणारे कर्मचारी करतील.

सामान्यांसाठी एक डिजिटल पोर्टल खुले असावे. आज ज्या पोर्टलवर फक्त दस्तऐवजांच्या प्रतिमा पाहायला मिळतात, त्याऐवजी प्रतिमांबरोबरच प्रमाणित देवनागरी मजकूर उपलब्ध करून दिल्यास ते संशोधकांपासून प्रशासकांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त ठरेल. त्यात दस्तऐवजांची खरी ओळख जपण्यासाठी डिजिटल सही, हॅशिंग आणि लॉगिंग यांसारखे तांत्रिक उपाय अनिवार्य करावेत.

प्रशासन, मानके आणि क्षमता बांधणी कायद्याची चौकट स्पष्ट हवी – मजकुराला शासन व न्यायालयीन प्रक्रियेत मान्यता द्यायची असेल, तर आधीच स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे हवीत. अन्यथा दस्तावेज एआयने वाचला तरी तो पुरावा म्हणून ग्राह्य धरायचा की नाही यावरच वाद निर्माण होतील.

मानकांची एकसंधता – राज्यात तयार होणाऱ्या कॉर्पसला एकसमान दर्जा देणं अत्यावश्यक आहे. कोणतंही अभिलेखागार, कोणतीही संस्था काम करत असली, तरी डेटा प्रमाणीकरण आणि नोंदी करण्याची पद्धत एकच असावी.

क्षमता उभारणी- आज राज्यात मोजकेच मोडीतज्ज्ञ आहेत. त्यांच्यावर सगळे ओझे टाकून चालणार नाही. त्याऐवजी, एआयने तयार केलेल्या मसुद्यांची पडताळणी करणारी एक मोठी प्रशिक्षित फळी तयार करता येईल. यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आखावेत.

संकटाच्या पलीकडे- मोडी लिपीचा प्रश्न हा केवळ आरक्षणाशी निगडित प्रशासकीय अडथळा नाही, तर महाराष्ट्र शासनाच्या तांत्रिक क्षमतेची खरी कसोटी आहे. डिजिटायझेशनवर कोट्यवधी खर्च करूनही जर ते दस्तऐवज मशीन-रीडेबल झाले नाहीत, तर ती गुंतवणूक उपयोगाची ठरणार नाही. त्यामुळे एआय आधारित उपायांकडे गांभीर्याने पाहणे ही काळाची गरज आहे. अशा गुंतवणुकीतून शासनाला तातडीचे प्रशासकीय संकट टाळता येईल, सुरू असलेल्या डिजिटायझेशन योजनेतील पोकळी भरून निघेल, आणि बंदिस्त ऐतिहासिक नोंदी समाजासाठी नव्या दारांनी खुल्या होतील. या नोंदी अर्थकारणापासून संस्कृती आणि शिक्षणापर्यंत विविध क्षेत्रांना नवीन रूप देतील. (लेखक ‘एआय’ प्रशिक्षक आहेत)

aniket.shevade48@gmail.com





Source link

मासळी महागणार ! – Marathi News | Fish Prices Ice Prices Impact Consumer Fish Purchases Mumbai Print News Ssb 93

0
मासळी महागणार ! – Marathi News | Fish Prices Ice Prices Impact Consumer Fish Purchases Mumbai Print News Ssb 93


मुंबई : बर्फाच्या दरात वाढ करण्यात येणार असून त्याचा परिणाम मासळीच्या दरावर होणार आहे. मासळी साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बर्फाचा वापर करण्यात येत असून मासळी विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातील सुमारे ५ टक्के हिस्सा बर्फाच्या खरेदीसाठी खर्च करावा लागतो. त्यामुळे बर्फाच्या दरात वाढ झाल्याने मासळीचे दरही वाढतील, असे मत मत्स्यव्यवसायिकांनी व्यक्त केले आहे. यामुळे ग्राहकांना मासळी खरेदी करण्यासाठी अधिक किंमत मोजावी लागणार आहे.

दोन दिवसांपूर्वी मच्छीमार संघटना आणि बर्फ विक्रेत्यांच्या बैठकीत बर्फाच्या किंमतीत प्रतिटन ६५ रुपये दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मच्छीमार संघटना आणि बर्फ विक्रेत्यांमध्ये याबाबत एकमत होत नव्हते. दरम्यान, बैठकीत झालेल्या ठरावानुसार ही दरवाढ १ ऑक्टोबरपासून लागू होईल. ससून डॉक, भाऊचा धक्का याचबरोबर करंजा बंदर येथे मोठ्या प्रमाणात मासळीची खरेदी विक्री होते.

मासळी पकडण्यासाठी जाणाऱ्या बोटी आठ दिवस समुद्रात असतात. आठ दिवस पुरेल इतका बर्फसाठा त्यांना बोटीत करावा लागतो. त्यामुळे बर्फाचे वाढीव दर मच्छिमारांना परवडणारे नाहीत, असे मत मासळी विक्रेत्यांनी व्यक्त केले होते. मात्र, वीज दरवाढीमुळे बर्फ उत्पादकांना तोटा सहन कारावा लागत असल्याने मच्छीमार आणि बर्फ विक्रेत्यांमध्ये एकमत झाले. यामुळे १ ऑक्टोबरपासून मासळी खरेदी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

हेही वाचा

सध्या मासळीचे दर किती

सध्या बाजारात प्रती सुरमईचा दर ६०० ते १००० रुपये आहे. सध्या अर्धा किलो बोंबील ३०० रुपये, अर्धा किलो बांगडा ३५० ते ४०० रुपये, आकारमानानुसार पापलेटची जोडी ७०० ते १५०० रुपये आणि अर्धा किलो कोळंबी २५० ते ५०० रुपये दराला उपलब्ध आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून यामध्ये १०० ते २०० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा
हेही वाचा

बर्फाच्या किंमतीत झालेली वाढ, याचबरोबर मासळीला मिळणारा बाजारभाव यावर मासळीची किंमत अवलंबून आहे. – देवेंद्र तांडेल, मच्छिमार संघटना प्रमुख





Source link

गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट – ३० वर्षांचा यशस्वी प्रवास!

0
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट – ३० वर्षांचा यशस्वी प्रवास!

फलटण –३० वर्षांचा टप्पा पार करत आघाडीचा ब्रँड ठरलेला गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यास सज्ज असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

आनंत मंगल कार्यालय, कोळकी, फलटण येथे आयोजित ‘उत्सव ३० वर्षांचा’ या भव्य कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी गोविंदचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संचालिका श्रीमंत शिवांजलीराजे, श्रीमंत सत्यजितराजे, सीईओ धर्मेंद्र भल्ला, अभिनेते समीर चौघुले यांच्यासह फलटण तालुक्यातील मान्यवर व हजारो दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

श्रीमंत रामराजे यांनी सांगितले की, “संजीवराजे, शिवांजलीराजे व सत्यजितराजे यांच्या अथक परिश्रमामुळे छोट्या रोपट्याचे आज भव्य वृक्षात रूपांतर झाले असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देत ग्राहकांना दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ पोहोचवण्याचे कार्य गोविंदने प्रामाणिकपणे केले आहे.”

संजीवराजे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, २००-२५० लिटरपासून सुरू झालेला प्रवास आज देशातील आघाडीच्या दुग्ध व्यवसायापर्यंत पोहोचला आहे. शेतकऱ्यांना योग्य दर देणे, उत्तम खाद्य पुरवणे, उच्च दर्जाची दुधाची भुकटी व विविध दुग्धजन्य पदार्थ तयार करून ती ग्राहकांपर्यंत पोहोचवणे – या तत्त्वामुळेच गोविंद आज प्रत्येक घराघरात पोहोचला आहे.

या कार्यक्रमात डॉ. गणेश सपकाळ यांनी प्रास्ताविक केले तर सीईओ धर्मेंद्र भल्ला यांनी आभार मानले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दूध उत्पादक व शेतकऱ्यांच्या मोठ्या उपस्थितीने कार्यक्रमाला उत्साहवर्धक वातावरण लाभले.

साताऱ्याच्या कुसुंबीची नाचणी सातासमुद्रापार, 700 हेक्टरवर लागवड, 400 महिला कमवतात लाखो रुपये 

0


Satara Nachani News : सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील कुसुंबी हे गाव ‘नाचणीचे गाव’ म्हणून राज्यासह देशभरात ओळखले जाऊ लागले असून या गावच्या नाचणीचे खमंग पदार्थ सातासमुद्रापार गेले आहेत. या गावात यंदा नाचणीची विक्रमी लागवड झाली असून 700 हेक्टरवर या पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यात आता नाचणीच्या विक्रमी लागवडीमुळे कुसुंबीला नाचणीचे गाव म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे. 

नाचणीच्या शेतीतून महिला कमवतात लाखो रुपये 

साताऱ्याच्या कुसुंबीच्या नाचणीचा खमंग स्वाद सातासमुद्रापार आहे. तब्बल 400 महिला नाचणीची शेती करत आहेत. या गावाने नाचणीचे गाव म्हणून देशभरात नवी ओळख निर्माण केली आहे. 700 हेक्टरवर लागवड केली असून, या सर्व महिला नाचणीच्या शेतीतून लाखो रुपये मिळवत आहेत. नाचणीच्या माध्यमातून 15 प्रकारचे विविध खाद्य पदार्थांचे प्रॉडक्ट निर्मिती  केली जाते. हे पदार्थ राज्यसह देशभरात विक्रीसाठी कुसुंबीकर पाठवतात. 

नाचणीचे पौष्टिक लाडू, शेवया, चिवडा, भडंग, कुकीज, मिठाई, केक मागणीप्रमाणे बनवून दिले जातात

दरवर्षी दिवाळीला देखील दिवाळी फराळ अमेरिकेला पाठवला जातो. नाचणीचे पौष्टिक लाडू, शेवया, चिवडा, भडंग, कुकीज, मिठाई, केक मागणीप्रमाणे बनवून दिले जात आहेत. नाचणीसारख्या पोषक अन्नधान्याची वाढती मागणीमुळं कुसुंबी गावातील 232 महिला या स्वावलंबी झाल्या आहेत. या महिलांनी थेट गावामध्ये खाद्यपदार्थ तयार करण्याची कंपनी सुरू केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांचा नफा त्या कमवत आहेत. 

मानवी आहारात वापरल्या जाणाऱ्या तृणधान्य पिकामध्ये भात व गहू या प्रमुख धान्याचा समावेश होतो. इतर भरड धान्य पिकांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कोडो, कुटकी, बरटी व वरई या पिकांचा समावेश होतो. राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी आणि वरई या पिकांची लागवड केली जाते. साधारणपणे 20 व्या शतकाच्या पूर्वार्धात आणि पारंपरिक दृष्ट्या या पिकांची लागवड आणि उत्पादन आपल्या देशात घेतले जात होते आणि आपल्या दैनंदिन आहार पद्धतीत या धान्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. 

नाचणी हे गवतवर्गीय कुळातील (Poaceae) महत्वाचे पीक

नाचणी हे गवतवर्गीय कुळातील (Poaceae) महत्वाचे पीक आहे. त्यामुळे या पिकाची वाढ होताना मुख्य खोडासोबत फुटवे येण्याचा गुणधर्म आहे. या धान्याचा आकार लहान असून आकार हे एकदलवर्गीय पीक आहे. या पिकामध्ये स्वपरागीभवन प्रक्रियेदवारे बीज निर्मिती होते. सर्वच भरड धान्य पीके ही बदलत्या हवामानास अनुकूल पिके आहेत. या पिकांमध्ये सी4 पद्धतीने प्रकाश संश्लेषण (मका, ऊस, ज्वारी) होते. त्यामुळे पानाद्वारे अन्ननिर्मिती करताना प्रकाश, पाणी व कार्बन डायऑक्साइडचा सुयोग्य वापर या वनस्पतीमध्ये केला जातो. तसेच प्रतिकूल परिस्थितीत वाढीची उत्कृष्ठ वैशिष्ट्ये जसे की, कमी ऊंची, पानांचा लहान आकार, कणिस व पाने यामध्ये अन्नपदार्थ पुरविण्यासाठी योग्य पद्धत, तंतूमय मुळांची खोल वाढ व प्रतिकूल परिस्थितीत तग धरण्याचा गुणधर्म यामुळे या पिकांचे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे.

महत्वाच्या बातम्या:

Konkan Rain : कोकणात 90 टक्के क्षेत्रावर भात आणि नाचणीची लावणी पूर्ण, यावर्षी लागवडीत वाढ

आणखी वाचा



Source link

Surya Grahan 2025 : गर्भवती महिलांनी काय करावे अन् काय टाळावे?

0
Surya Grahan 2025 : गर्भवती महिलांनी काय करावे अन् काय टाळावे?


Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या ‘झी 24 तास डिजिटल’मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. ‘प्रहार’ आणि ‘लोकमत’ या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि ‘टीव्ही 9’ आणि ‘न्यूज एक्सप्रेस मराठी’ या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. ‘India.com मराठी’ या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर ‘महाराष्ट्र टाईम्स’ च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

…Read More





Source link

Ideal Body Weight: उंचीप्रमाणं किती असावं वजन? तज्ज्ञांकडून जाणून घ्या सर्वात महत्त्वाची बाब

0
Ideal Body Weight: उंचीप्रमाणं किती असावं वजन? तज्ज्ञांकडून जाणून घ्या सर्वात महत्त्वाची बाब


eal Body Weight: निरोगी आयुष्यासाठी शरीर निरोगी आणि सुदृढ असणंही तितकंच महत्त्वाचं असतं. शरीराची उंची आणि वजन या समीकरणात समतोल राखता आला म्हणजे निरोगी जीवनशैलीचा अर्था टप्पा तर इथंच ओलांडला असं म्हणतात. वजन गरजेपेक्षा वाढलं तरीही आणि ते अनपेक्षितरित्या कमी झालं तरीही शरीरावर, मनावरही त्याचे परिणाम दिसून येतात. यासाठी वजनसोबतचं शरीराच्या उंचीचं नातं समजून घेणंही महत्त्वाचं. या परिमाणात समतोल राखण्याला शास्त्रीय भाषेत ‘बॉडी मास इंडेक्स’ (BMI) असं म्हणतात. 

Add Zee News as a Preferred Source

बीएमआय कसं मोजावं?  

बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स. यामाध्यमातून तुमच्या उंचीच्या हिशोबानं तुमचं वय किती आहे याचा अंदाज लावला येतो. बीएमआय मोजण्यासाठीचं एक सूत्र आहे. 

BMI= वजन (किलोग्राम) / उंची (मीटर)²

उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचं वजन 70 किलो आणि त्यांची उंची 6 फूट आहे, तर त्यांचा बीएमआय असेल …

70 / (1.83 × 1.83) = 20.90

तुमचा बीएमआय BMI 18.5 ते 24.9 दरम्यान असल्यास तो आरोग्यदायी समजला जातो. 18.5 हून कमी बीएमआय म्हणजे तुमचं वजन कमी आहे आणि 25 हून अधिक बीएमाय असल्यास तुमचं वजन जास्त आहे हे ठरतं. 

उंचीनुसार किती असावं वजन? 

152 सेमी (5 फूट): महिला 40–50 किलो, पुरुष 43–53 किलो

160 सेमी (5.3 फूट): महिला 47–57 किलो, पुरुष 50–61 किलो

165 सेमी (5.5 फूट): महिला 51–62 किलो, पुरुष 55–68 किलो

170 सेमी (5.7 फूट): महिला 55–67 किलो, पुरुष 60–73 किलो

175 सेमी (5.9 फूट): महिला 59–72 किलो, पुरुष 65–79 किलो

180 सेमी (6 फूट): महिलाएं 63–77 किलो, पुरुष 70–85 किलो

जाणकारांच्या मते BMI हा महत्त्वाचा विषय असला तरीही त्यामध्ये पोटाची चर्बी (belly fat) मोजली जात नाही. जिथं वाढत्या वजनामध्ये या चर्बीमुळंच अर्ध्याहून अधिक व्याधी बळावतात. ICMR च्या माहितीनुसार फक्त बीएमआय नव्हे, तर पोटाची चर्बी आणि कमरेचा घेर मोजणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जर पुरुषांची कंबर 90 सेंटीमीटरहून जास्त आणि महिलांची कंबर 80 सेंटीमीटरहून अधिक असेल तर भविष्यात या मंडळींना स्थूलता, हृदयाचे विकार यांचा धोका अधिक असतो. 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)





Source link

Mumbai police file FIR against four for feeding pigeons Bandra pond

0
Mumbai police file FIR against four for feeding pigeons Bandra pond



Mumbai police file FIR against four for feeding pigeons Bandra pond | Pigeon Feeding Crime : वांद्रे तलावाजवळ कबुतरांना खाद्य टाकले….चौघांविरोधात गुन्हा दाखल





Source link

पायातील चप्पलीने दुकानाची फरशी घाण झाली, दुकानदाराची ग्राहकाशी झटापट, साताऱ्यात तरुणाचा मृत्यू

0


Satara crime news: कराड बस स्थानक परिसरात असलेल्या एका मोबाईल शॉपीच्या दुकानात ग्राहक आणि दुकानातील कर्मचारी यांच्यात झालेल्या वादावादीत अखिलेश नलवडे या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या मोबाईलचा कॅमेरा (Mobile Camera) व्यवस्थित नसल्याने त्याबाबतची विचारणा करण्यासाठी गेलेल्या युवकांचा वादावादीत मृत्यू (Satara news) झाला आहे. यावेळी दुकानात फरशी पुसण्याचे काम सुरु होते. त्यावेळी ग्राहक अखिलेश नलवडे चप्पलची घाण दुकानातील फरशीवर आल्याने वादाला सुरुवात झाली.

यावेळी दुकानातील कर्मचारी आणि  अखिलेश नलावडे यांच्यात झटापट झाली आणि अखिलेश जमिनीवर पडला. जमिनीवर पडल्यानंतर त्याची शुद्ध हरपली. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांनी त्याला कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे अखिलेशला मृत घोषित करण्यात आले.  या प्रकरणात पोलिसांनी  अजीम मुल्ला या तरुणाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणात आता पोलीस पुढे काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 Bhandara Crime: साकोलीत मध्यरात्री चोरट्यांनी फोडली पाच दुकानं

पाच दुकानांची शटर तोडून चोरट्यांनी दुकानाच्या गल्ल्यातील रोख लांबवल्याची घटना मध्यरात्री भंडाऱ्याच्या साकोलीत घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून आता या सीसीटीव्हीच्या आधारावर साकोली पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे. या पाच फोडलेल्या दुकानांमध्ये मेडिकल, पेंट दुकान, किराणा दुकानाचा समावेश आहे.

Nagpur Crime: ओव्हरटेक करताना पिकअपची ट्रकला धडक बसली आणि गो तस्करी आली उघडकीस

नागपूरच्या कत्तलखान्याकडं नेण्यात येणाऱ्या 34 जनावरांची भंडाऱ्याच्या जवाहरनगर इथं सुटका करण्यात आली. छत्तीसगड येथून तीन पिकप वाहनांमध्ये कोंबून ही 34 जनावर नागपूरच्या दिशेनं मध्यरात्री भरधाव नेण्यात येत होते. भंडाऱ्याच्या जवाहरनगर येथील उड्डाण पुलावर एका ट्रकला ओव्हरटेक करताना ही पिकअप ट्रकवर धडकली. त्यानंतर ट्रक चालकासोबत वाद सुरू असताना जवाहरनगर येथील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलचे कार्यकर्ते तिथं पोहोचल्यानंतर ही गो तस्करी उघडकीस आली. याप्रकरणी जवाहर नगर पोलिसांनी घटनास्थळ गाठत तीन पिकअप मधून कत्तलखान्याकडं नेण्यात येणाऱ्या 34 जनावरांची सुटका करत तिन्ही पिकअप वाहन ताब्यात घेतले. वाहन चालकांविरोधात जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा

दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या सोबत भिडला; वादात शरद पवारांच्या पक्षाचा कार्यकर्त्याचा बळी, महिला गंभीर जखमी

आणखी वाचा



Source link

High Paying Jobs: कोट्यावधी कमवून देणाऱ्या 10 नोकऱ्या, भविष्यात खूपच मागणी!

0
High Paying Jobs: कोट्यावधी कमवून देणाऱ्या 10 नोकऱ्या, भविष्यात खूपच मागणी!


High paying jobs: चांगल्या जीवनशैलीसाठी  प्रत्येकाला कठोर परिश्रम करणे आवश्यक असते. चांगल्या पगाराची नोकरी असेल तर करिअर आणि जीवनशैलीच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. यामुळे तुमचे भविष्य सुरक्षित करणे सोपे होते. चांगल्या पगार देणाऱ्या आणि भविष्यातही फायदेशीर राहतील अशा टॉप १० नोकऱ्यांबद्दल जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

सॉफ्टवेअर डेव्हलपर

सॉफ्टवेअर डेव्हलपरचे सरासरी वार्षिक उत्पन्न अंदाजे ₹1.10 कोटी असते. मासिक पगार अंदाजे ₹9.20 लाख असतो. आजच्या डिजिटल युगात ही नोकरी सर्वात लोकप्रिय आणि उच्च पगाराची मानली जाते.

अकाउंटंट आणि ऑडिटर

अकाउंटिंग आणि ऑडिटिंग व्यवसायात सरासरी वार्षिक उत्पन्न 67.79 लाख आहे, ज्याचे मासिक वेतन अंदाजे 5.64 लाख आहे. आर्थिक पारदर्शकतेसाठी हे क्षेत्र महत्त्वाचे आहे.

इन्फोसेक विश्लेषक

माहिती सुरक्षा विश्लेषकांचे सरासरी वार्षिक उत्पन्न सुमारे 1.3 कोटी आहे. मासिक उत्पन्न अंदाजे 8.63 लाख आहे. सायबरसुरक्षेतील हे करिअर वेगाने वाढत आहे.

प्रकल्प व्यवस्थापन तज्ञ

प्रकल्प व्यवस्थापन तज्ञ दरवर्षी सुमारे 83.62 लाख कमवतात. त्यांचा मासिक पगार अंदाजे 6.96 लाख आहे. मोठे प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे.

उच्च माध्यमिक आरोग्य विषयाचे शिक्षक

आरोग्य विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचे सरासरी वार्षिक उत्पन्न दरमहा 87.66 लाख आहे. वैद्यकीय आणि आरोग्य शिक्षण क्षेत्रात या करिअरला खूप आदर आहे.

वकील

वकिलांचे सरासरी वार्षिक उत्पन्न 1.25 कोटी पेक्षा जास्त आहे. मासिक वेतन अंदाजे 10.45 लाख ( पर्यंत पोहोचते. कायदेशीर क्षेत्र नेहमीच उच्च पगार देणारा व्यवसाय राहिला आहे.

CIS व्यवस्थापक

सीआयएस व्यवस्थापकांचे सरासरी वार्षिक उत्पन्न अंदाजे 1.42 कोटी आहे. त्यांचा मासिक पगार अंदाजे 11.84 लाख आहे. आयटी क्षेत्रात त्यांची मागणी सतत वाढत आहे.

डेटा सायंटिस्ट

डेटा सायंटिस्ट्सचे सरासरी वार्षिक उत्पन्न  ₹93.44 लाख  आहे. बिग डेटा आणि एआयच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे हा व्यवसाय अत्यंत आकर्षक बनला आहे.

बांधकाम व्यवस्थापक

बांधकाम व्यवस्थापकांचे सरासरी वार्षिक उत्पन्न 88.79 लाख आहे. त्यांचा मासिक पगार सुमारे 7.39 लाख आहे. पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेट क्षेत्रात त्यांची मागणी वाढत आहे.

आर्थिक व्यवस्थापक

वित्त व्यवस्थापकांचे सरासरी वार्षिक उत्पन्न दरमहा 1.34 पर्यंत पोहोचते. कंपन्यांच्या वित्त आणि बजेटचे व्यवस्थापन करण्यासाठी हे प्रोफाइल महत्त्वाचे आहे.





Source link

IND vs OMAN: भारताने सामना जिंकला, पण २० नंबरचा संघ टीम इंडियावर भारी पडला; सामना नेमका कुठे फिरला? – Marathi News | Asia Cup 2025 Team India Beat Oman By 21 Runs In Close Encounter Hardik Pandya Catch Become Turning Point Of This Match Amd 2000

0
IND vs OMAN: भारताने सामना जिंकला, पण २० नंबरचा संघ टीम इंडियावर भारी पडला; सामना नेमका कुठे फिरला? – Marathi News | Asia Cup 2025 Team India Beat Oman By 21 Runs In Close Encounter Hardik Pandya Catch Become Turning Point Of This Match Amd 2000



IND vs OMAN: भारताने सामना जिंकला, पण २० नंबरचा संघ टीम इंडियावर भारी पडला; सामना नेमका कुठे फिरला? – Marathi News | Asia Cup 2025 Team India Beat Oman By 21 Runs In Close Encounter Hardik Pandya Catch Become Turning Point Of This Match Amd 2000 – Latest Krida News at Loksatta.com





Source link