


फलटण (साहस Times ) :- भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने मौजे पवारवाडी येथे संस्कार सचिव आयुष्यमान अमोल भोसले सर यांच्या वडिलांचे कालकथित बबन दामू भोसले यांच्या पुण्यानुमोदन विधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी भंते भदंत काश्यप यांनी उपस्थितांसमोर प्रेरणादायी धम्मदेशना दिली. त्यांनी “कालकथित” या शब्दाचा सखोल अर्थ स्पष्ट करताना जीवनाच्या क्षणभंगुरतेविषयी विवेचन केले.मानवी जीवन क्षणिक आहे, म्हणूनच ते सदुपयोगी व्हावे. मृत्यू हा शेवट नसून धम्ममार्गाचा खरा आरंभ आहे. पुण्यानुमोदन म्हणजे केवळ स्मृती नसून, आपल्या प्रिय व्यक्तीच्या पुण्यकर्मांची आठवण ठेवून स्वतःचे जीवनही त्याच धम्ममूल्यांनी सुशोभित करणे होय.बौद्ध धम्माचे मूळ तत्त्व म्हणजे करुणा, प्रज्ञा आणि समता – यांचा अंगीकार केल्यासच खऱ्या अर्थाने मानवी जीवन यशस्वी व परिपूर्ण ठरते. त्यांनी साध्या, सोप्या आणि हृदयस्पर्शी शब्दांत सांगितलेल्या या धम्मदेशनेने सर्व उपस्थित श्रोत्यांना अंतर्मुख केले.
या पुण्यानुमोदन कार्यक्रमाचे बौद्धाचार्य म्हणून फलटण तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष आयुष्यमान महावीर भालेराव यांनी पारंपरिक विधी मोठ्या श्रद्धेने पार पाडले.हा कार्यक्रम केवळ पारंपरिक पुण्यानुमोदन न ठरता, तो बौद्ध धम्मातील जीवनदृष्टी आणि चिंतन यांचा प्रसार करणारा ठरला. भंते काश्यप यांच्या धम्मदेशनेतून उपस्थितांना – जीवनाच्या क्षणभंगुरतेचे भान, सद्विचार व सदाचार अंगीकारण्याची प्रेरणा, धम्ममार्गाने जगण्याचे महत्त्व, पुण्यकर्माची खरी व्याख्या
यांची जाणीव झाली.
मौजे पवारवाडी येथे संपन्न झालेला हा पुण्यानुमोदन कार्यक्रम हे केवळ धार्मिक कृत्य नव्हते, तर तो भंते काश्यप यांच्या प्रभावी धम्मदेशनेतून जीवनाचे सार आणि धम्ममार्गाचे महत्त्व प्रत्येक उपस्थिताच्या अंतःकरणात कोरले गेले.फलटण तालुक्याचे कोषाअध्यक्ष आयुष्यमान विठ्ठल निकाळजे सर, आयुष्यमान सोमीनाथ घोरपडे सर, कार्यालयीन सचिव आयुष्यमान चंद्रकांत मोहिते सर,संघटक आनंद जगताप उपस्थित होते.

फलटण : समाजकारणाचा वसा व विधायक विकासातून राजकारणाचा समर्थ वारसा घेऊन अनेक वंचित, उपेक्षित व दलित बांधवांचे आयुष्य घडवणारे, आपल्या कार्य कर्तृत्वातून मिळालेली अनेक पदे समाजाच्या हितासाठी त्याचा उपयोग करणारे, मग त्यामध्ये जिल्हा एम्प्लॉयमेंट कमिटी असो, नगरसेवक पद असो, जिल्हा खरेदी विक्री संघ, फलटण शेती माल प्रक्रिया संस्था, यशवंत सहकारी बँकेचे संचालक, जिल्हा दक्षता कमिटीचे सदस्यपद इ.असो आपण या सर्व पदांचा वापर तळागाळातील वंचित, शोषित, भटक्या – विमुक्त समाजाच्या प्रगतीसाठी निःस्वार्थी भावनेने केलात. तुम्ही आमचे आदर्श आहेत.
समतोल वाचनाचा व्यासंग, सामाजिक प्रश्नांची व राजकीय प्रश्नांची उत्तम जाण असणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे हरीष काकडे ऊर्फ नाना. नाना यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या विचार व कार्याला भावपूर्ण आदरांजली!
हरिष काकडे ‘नाना’ म्हणूनच त्यांना संबोधले जाते. त्यांचे सुरवातीचे प्राथमिक शिक्षण शाळा नं. २ मध्ये झाले. त्यावेळी जंगम, कोळी गुरुजी व ग.दा. काकडे (गणपत दादू काकडे) यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. प्राथमिक शाळेत त्यांनी कलापथकात ही काम केले. पुढे ते आठवीला मुंबईच्या मराठा मंदिरात दाखल झाले. त्यानंतर इयत्ता ९ वीला ते मुधोजी हायस्कूलमध्ये दाखल झाले. असे करत करत त्यांनी आपले पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. जयंतीच्या कार्यक्रमामध्ये वयाच्या १२ व्या वर्षापासून आपले विचार प्रकट करत आल्यामुळे चळवळीची ओळख त्यांना लवकरच झाली. त्यांचे वडील ही सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रीय असल्याने ते याच मुशीत तयार होत गेले. वडिलांचा त्यांच्यावर कोणताही दबाव नव्हता. त्यांना वडिलांनी मुक्तपणे वाढू दिले. वडील पडेल ते काम करायचे. आई अत्यंत कष्टाळू होती. ती गवत आणून विकायची. वडिलांना कोणतेही व्यसन नव्हते. आपल्या मुलांचे शिक्षण घ्यावे उच्च पदावर काम करून कला क्रीडा गुणांसह सामाजिक क्षेत्रात योगदान द्यावे द्यावे असे त्यांना मनोमन वाटे. विद्यार्थीदशेपासूनच पी आर काकडे सर त्यांना अभ्यास करायला लावायचे. सामाजिक प्रबोधनाची पुस्तके वाचायला द्यायचे. त्यांना पी आर काकडे
वाचायला द्यायचे. त्यांना पी आर काकडे, अरुण काकडे, बबन पवार, संभाजी मोरे यांचे मार्गदर्शन मिळत गेले. पी.आर काकडे सरांच्यामुळे नानांना वाचनाची प्रचंड आवड लागली. आज ही त्यांची आवड त्यांनी जपली आहे. पी.आर काकडे स्वतः त्यांना शिवाजी वाचनालयात घेऊन जायचे. पुढे ऍड. बी.सी. कांबळे, हरिभाऊ निंबाळकर, आर.आर भोळे, ऍड. जी. बी. माने यांना जयंतीच्या कार्यक्रमाना आणण्यात नानांचा पुढाकार होता. १९७० साली वयाच्या विसाव्या वर्षी ते महात्मा फुले कामगार वसाहतीत राहायला आले. पुढे १९७० साली साहर क्रीडा मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या माध्यमातून कला, क्रीडा व समाज प्रबोधनाच्या कामाला सुरुवात केली. साहस क्रीडा मंडळाचा व्हॉलीबॉल संघ प्रसिद्ध होता. त्या संघाने अनेक पुरस्कार मिळवले होते.
त्यात दास काकडे, दत्तात्रय गालीअल, मानसिंग भोसले, प्रकाश सोनू अहिवळे असे खेळाडू होते. साहस क्रीडा मंडळाच्या कामात पुढाकार घेतला. या मंडळाच्या स्थापनेत पी.आर. काकडे सरांचे मोठे योगदान लाभले. त्याच प्रमाणे नामदेव बबन अहिवळे, साहेबराव पांडुरंग अहिवळे यांचाही त्यात समावेश होता.
नानांनी महात्मा फुले वाचनालयाची स्थापना करून वाचन चळवळ बळकट केली वैचारिक पुस्तकांच्या माध्यमातून समाज जागृतीचे काम केले त्यातूनच त्यांच्यातील सामाजिक कार्यकर्ता घडत गेला. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत समाज कार्यात सहभाग घेतला. त्यांच्यातील प्रामाणिकपणा, निस्वार्थीपणा यामुळेच ते नीतिमान जीवन जगले. समाजात चाललेला मतभेद त्यांना प्रचंड त्रास देत होता. त्यांनी तहयात तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. 1972 च्या दुष्काळात परिस्थिती अतिशय बाकी होती. लोकांना काम धंदा मिळणं मुश्किल झाले होते. उपासमारीची वेळ होती. सरकारने ग्रामीण भागातील लोकांना रोजगार हमी योजना सुरू केली. पण शहरी भागासाठी तशी सोय नव्हती. पण फलटणच्या लोकांना जिनिंग कंपनीत मजुरी होती. त्यांना शेतातून कापूस वेचावा लागायचा.पण या मजुरीसाठी मंगळवार पेठेतील बायकांना घेतले जात नव्हते. त्यावेळी नाना युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते.मजुरांना 50 पैशात झुणका भाकर मिळायची. या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत नानांनी व्यवस्थापनाशी व तत्कालीन कार्यकर्त्यांची चर्चा करून सर्व महिलांना मजुरी मिळवून दिली. अशा प्रकारे त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय केली.
1974 च्या दंगलीवेळी ऍड. जी. बी माने यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या जयंतीचे अध्यक्ष होते. यावेळी दोन जयंती निघाल्या. गांधीजींचा हात तुटला. याचा फायदा जातीयवाद्यांनी घेतला. अनावधानाने घडलेल्या घटनेला विकृत रूप देण्यात आले.यातून दंगल घडवली. या कठीण प्रसंगी नाना डगमगले नाहीत. ही जयंती काढण्याचा हेतू तात्विक होता. पण याला गालबोट लागले. म्हणून त्यांनी घर जाळली. दुकान जाळली. मारहाण झाली. पण यातून उध्वस्त झालेली घर पुन्हा उभे राहावीत. ही घरे नव्याने उभी करून लोकांना पुन्हा उभे करण्यासाठी डॉ. कृष्णाचंद्र भोईटे, वसंतराव नाईक यांच्या मदतीने यशवंतराव चव्हाण यांच्याकडून मदत मिळवली. लोकांची झालेली हानी भरून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वतः केंद्रीय मंत्री होते. त्यांनी तत्कालीन नियोजन राज्यमंत्री श्री.मोहन धारीया यांना पाठवले. मोहन धारिया यांनी सर्व बँक अधिकाऱ्यांची बैठक घेतली.त्यांनी या दंगलीची झळ पोचलेल्या बांधवांना अर्थसहाय्य करण्याचे आवाहन केले. यावेळी काँग्रेस कमिटीने घरे बांधून दिली. स्वतः मुख्यमंत्र्यांपासून सर्वांनीच जातीने यात लक्ष घातले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सर्व मदत केली आणि पुन्हा नव्याने लोकांचे संसार उभे राहिले. नानांनी सर्व गोष्टी स्वतः उभे राहून पाठपुरावा करून पूर्ण करून घेतल्या. त्यांनी व्यापाऱ्यांची मदत घेतली. बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र यांचे कर्ज उपलब्ध करून दिले . लोकांच्या पुनर्वसनाचे काम सुरू केले काम पूर्ण झाल्यावर उद्घाटन करण्यासाठी स्वतः यशवंतराव चव्हाण आले होते. यावेळी पहिली सभा मंगळवार पेठेत झाली. यावेळी नानांनी खरी परिस्थिती सर्वांसमोर मांडली. ते आपल्या भाषणात म्हणाले, “आकाराची पूजा करून विचारांचा मुद्दा काढण्यात आला”
या प्रकरणात दलितांना मोठी किंमत मोजावी लागली. ही किंमत आजही शेवटपर्यंत भरून न निघाल्याची खंत त्यांना वाटत होती. याचाच आधार घेऊन यशवंतरावांनी आपल्या गजानन चौकातील आपल्या भाषणात विचार व्यक्त करताना ते म्हणाले,, “गांधीजींच्या विचारांची पायमल्ली झाली. आकाराची पूजा करून खरोखरच आपण विचारांचा मुद्दा पडला आहे.” नानांनी आपल्या भाषणात म्हटले की, दलितांच्या बद्दल करुणास्पद बोलणे ही पुरोगामी पणाची पद्धत बनली आहे. याचाच आधार घेत नानांनी अनेक कामे मार्गी लावली.
तसा त्यांचा पिंड समाजकार्याचा नव्हता. ते भुजरे, भिडस्त होते. पण पी. आर काकडेंच्या सहवासाने, मार्गदर्शनाने ते समाजकार्याकडे वळले. ते काम त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत चालू ठेवले. साखरवाडीत पी. आर काकडे तलाठ्यांच्या हाताखाली काम करत असताना ऍड. जी. बी माने वकिलांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, खाणकामगार झोपडपट्टीतील लोकांसाठी अनेक कामे हाती घेतली त्यांनी वाचनालये सुरू केली.
सातारा जिल्हा महाविद्यालय विद्यार्थी संघटना :
सातारा जिल्हा महाविद्यालय विद्यार्थी संघटनेत नानांनी उपाध्यक्ष पद भूषवले. या संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने होते. त्यांच्यासोबत ही नानांनी काम केले. विभागीय बैठका घेतल्या. सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यासाठी बैठक आयोजित करून त्यांच्या हक्कांसाठी लढा दिला. नामांतरासाठी निघालेल्या लॉंगमार्चमध्ये ही त्यांचा सहभाग होता. यामध्ये जेष्ठ पत्रकार विजय मांडके, रामनाथ चव्हाण, पार्थ पोकळे, ऍड.जी.बी माने यांच्या बरोबर काम करून वस्तीगृह, शिष्यवृत्ती यासारख्या प्रश्नावर लढा दिला.
सातारा जिल्हा खरेदी विक्री संघाचे संचालक
या संघात अनेक वर्षे संचालक, उपाध्यक्ष म्हणून दैदिप्यमान कार्य नानांनी केले. यामध्ये किसनवीर, माजी आमदार लालसिंग शिंदे, माजी आमदार बाबुराव घोरपडे, केशवराव पाटील, लक्ष्मण पाटील हे जिल्हा बँकेचे प्रतिनिधी म्हणून सातारा जिल्हा खरेदी विक्री संघावर होते. तर मदन पिसाळ हे निवडून आले होते. यांच्यासारख्या लोकांसोबत जवळ जवळ १७ वर्षे या संघात काम केले.
सातारा जिल्हा मागासवर्गीय सुधार महासंघ अध्यक्ष
या महासंघाच्या माध्यमातून नानांनी अनेकांना मदत केली. त्यावेळी बॅ. अंतुले यांनी संपूर्ण बॅकलॉक भरण्याचा आदेश दिला होता. यावेळी विदर्भातील कॉंग्रेसचे नेते नाशिकराव तिरपुडे यांनी सेवा योजना कार्यालयाची जबाबदारी स्वयंसेवी संस्थाना दिली होती. यात त्यांनी सातारा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून नानांची निवड केली. या महासंघाचे कार्याध्यक्ष होते साहेबराव काकडे ते काम पाहत होते. या महासंघाचे ऑफिस महालक्ष्मी बेकरी, जनता लॉड्री येथे होते. या महासंघाच्या स्थापनेचा उद्देश चांगला होता. सेवायोजना कार्यालयाचीच जबाबदारी या महासंघाकडे देण्यात आली होती. स्वयंसेवी संस्थानी पात्र उमेदवारांची यादी करून संबंधित विभागाकडे पाठवायची होती. यामुळे मंगळवार पेठेतील ९ उमेदवारांना तलाठी पदासाठी नानांनी शिफारस केल्याने त्यांची तलाठी म्हणून निवड झाली. त्यांनी अनेक खात्यातील वनरक्षक, महसूल, पाठबंधारे या खात्यांसह अनेक खात्यातील पात्र उमेदवारांना नानांनी संधी दिली.
महात्मा फुले विचार प्रसारक मंडळ १९७१ साली कार्यरत.
सामाजिक समतेचा प्रचार होऊन बहुजन समाज समताधिष्टीत बनावा यासाठी ऍड. जी.बी माने, बबनराव अडसूळ, बबनराव क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले विचार प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली. यामध्ये फलटणमधील समतावादी विचाराने कार्य करणारे कार्यकर्ते होते. यात विलासराव बोरावके, पी.आर काकडे, सुभाष निंबाळकर, बनकर, लोणकरसर, इतिराज, एल. एस अहिवळे, कीर्तीकुमार काकडे यांचा समावेश होता. यामध्ये अनेक कार्यक्रम घेण्यात आले. या विचार प्रसारक मंडळाच्या माध्यामतून महात्मा फुल्यांची जयंती कार्यक्रम आयोजित केला. यासाठी प्रसिद्ध विचारवंत ग. बा सरदार व शंकरराव खरात आले होते. कार्यक्रम राजवाड्यातील मुदपाकखाना सध्याची जिल्हा मध्यवर्ती बँकेची इमारत आहे त्या जागेवरील मैदानात झाला. समोर मोठमोठे दिग्गज लोक ऐकण्यासाठी बसले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वतः नानांनी केले. त्यामुळे त्यांची स्रोत्यावर वेगळीच छाप पडली.
पुणे आकाशवाणी केंद्रावर युवा वाणी सदरात विचार मांडण्याची संधी
या वेळी ऍड. जी. बी माने वकिलांचे मित्र आकशवाणी पुणे चे संचालक बी. बी भोसले सहकारी जाधव यांच्यावर तर खूपच प्रभाव पडला. म्हणून त्यांनी आकाशवाणी केंद्रावर प्रसारित होणाऱ्या युवा वाणी या सदराखाली ‘मला काय वाटते’ या शीर्षकाखाली सुरु असणाऱ्या कार्यक्रमात नानांना संधी दिली. यामध्ये पुणे आकाशवाणी केंद्रावर ८ मिनिटे नानांनी आपले विचार व्यक्त केले. पी. आर काकडे सरांनी हे भाषण प्रसारित झाल्याची बातमी सांगितली. या महात्मा फुले विचार प्रसारक मंडळाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात नानांचा सिहांचा वाटा होता. व्याख्यानमालेसह निबंध, वक्तृव, रांगोळी स्पर्धेचे आयोजन ही अनेक वेळा केले गेले.
दैनिक मराठा मध्ये लेखन
तो काळ होता चळवळीचा, शिक्षणाचा प्रसार होत होता. नुकतीच शिकलेली पिढी तयार होत होती. सामाजिक समतेसाठी अनेक चळवळी सुरु होत होत्या. लोक जागृत होऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवू लागले होते. जातीयता अजून ही पूर्वीसारखी जागृत होतीच. ती आपले वेळोवेळी उग्र रूप दाखवतच होती. अशीच घटना घडली. जातीयवाद्यांनी गवई बंधूंचे डोळे काढले. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडले. या घटनेचा निषेध करण्यासाठी पी. आर. काकडे सरांनी नानांना लेख लिहिण्यास सुचवले. दैनिक मराठा मध्ये नानांनी लेख लिहिला. यावर स्वत प्राचार्य विलायत शेख यांनी नानांना भेटून लेख बद्दल कौतुक केले व कामाची स्तुती केली. ते म्हणाले, “माझ्या अगोदर तुमचा लेख छापून आला” अशा प्रकारे लेखनास नानांच्या सुरवात झाली. १९७४ साली नगराध्यक्ष पदाची निवडणूक होती. कॉंग्रेसच्या वतीने बाबासाहेब मोरे निवडणुकीला उभे होते. त्यांना चिमणराव, हरिभाऊ यांची मदत होती. स.रा भोसले निवडून आले. त्यावेळी भोईटे बाबासाहेब मोरे यांचे बरोबर होते. पण अंतर्गत कलहामुळे, गटबाजीमुळे बाबासाहेब मोरेंचा पराभव झाला. नानांनी नेहमी समतावादी विचारांची कास धरली. जिथे समानतेची वागणूक मिळेल त्यांच्या समवेत ते कायम राहिले. माजी आमदार डॉ. कृष्णचंद्र भोईटे यांच्याशी त्यांचे शेवटपर्यंत मैत्रीपूर्ण संबंध राहिले. आज डॉ. कृष्णचंद्र भोईटे नाहीत पण त्यांचा स्नेह मात्र नानांनी आयुष्यभर जपला.
नगरसेवक
२००१ ते २००६ या कालावधीत नानांनी नगरसेवक म्हणून कार्य केले. त्या काळात त्यांनी महात्मा फुले कामगार वसाहतीत २ समाज मंदिरे उभारली. सांडपाण्याची व्यवस्था, अंतर्गत रस्ते अशी विविध कामे केली. आज कामगार वसाहतीत असणारे बुध्द विहार त्यांच्याच प्रेरणेमुळे उभे राहिले.
नानांनी विविध पदावर काम केले. त्यांनी बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांना फलटणमध्ये आणून कॉ. हरिभाऊ निंबाळकरांच्या हस्ते मानपत्र दिले. त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत भव्य रैली काढली. म्युनिसिपल कामगारांच्या न्यायी हक्कांसाठी प्रयत्न केले. यशवंत सहकारी बँकेत ते स्थापनेपासून संचालक आहेत. सातारा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर ही त्यांनी प्रभावी काम केले आहे. आणीबाणीच्या काळात वीस कलमी कार्यक्रमांतर्गत असणाऱ्या जमीन वाटप समितीवरही ते होते अशा प्रकारे मिळालेल्या विविध पदांचा त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी कधीच वापर केला नाही समाजाच्या हिताचा कायम त्यांनी विचार केला. आज त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून डोळ्याच्या पापण्यांच्या कडा ओल्या झाल्या. फुले,शाहू, आंबेडकर चळवळीतील एक एक पान गळून पडू लागले असल्याची जाणीव होऊन मन अस्वस्थ झाले. नव्या पिढीमध्ये असं नेतृत्व उदयाला येताना दिसत नसल्याची खंत माझ्या आजही मनात आहे. येणाऱ्या काळामध्ये असे नेतृत्व तयार झाले तरच शिव, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळ पुढे जाणार आहे.
आदरणीय हरिष काकडे अर्थात आपल्या सर्वांचे नाना यांच्या जाण्याने सामाजिक चळवळीमध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी नानांचे कार्य निश्चित दिशादर्शक ठरेल यात कोणतीही शंका नाही. नानांच्या रूपाने पुरोगामी विचारांचा खंदा योद्धा आज हरपला आहे. आंबेडकरी समाजाची ही खूप मोठी हानी झाली आहे. नानांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेल्या कार्याची आठवण प्रत्येक क्षणाक्षणाला येत राहील. कालकथित हरिष काकडे(नाना) तुमच्या विचार कार्याला भावपूर्ण आदरांजली!!!
आयु. सोमीनाथ पोपट घोरपडे, सामाजिक कार्यकर्ता, सासकल
ता. फलटण जि. सातारा
मोबाईल नंबर : 92 84 65 86 90


Chew Gum Benefits: तुम्ही तुमच्या आजुबाजूला अनेकांना तोंडात च्युइंग गम चघळताना पाहिले असेल. अनेकजण तोंडाच्या दुर्गंधीसाठी याचा वापर करतात. हा केवळ तोंडाला ताजेतवाने ठेवण्याचा किंवा कंटाळा घालवण्याचा मार्ग नाही, तर तोंडाच्या स्वच्छतेसाठीही तो उपयुक्त आहे. पण च्युइंग गम किती वेळ तोंडात चघळत राहायचे? याचेही काही नियम आहेत. याबद्दल जाणून घेऊया.
नेदरलँड्समधील ग्रोनिंगेन विद्यापीठाच्या संशोधनानुसार, योग्य वेळेपर्यंत च्युइंग गम चघळल्यास तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात. अभ्यासात असे दिसून आले की, 10 मिनिटे गम चघळल्याने तब्बल 100 दशलक्ष बॅक्टेरिया तोंडातून बाहेर पडतात, ज्यामुळे दात आणि हिरड्यांची स्वच्छता राखली जाते.
संशोधकांनी पाच वेगवेगळ्या ब्रँडच्या च्युइंग गमची चाचणी 10 आणि 30 मिनिटे चघळून केली. 10 मिनिटे चघळल्याने बॅक्टेरिया प्रभावीपणे कमी होतात, परंतु 30 मिनिटांनंतर गमची बॅक्टेरिया शोषण्याची क्षमता कमी होते. म्हणजेच, जास्त वेळ चघळणे फायदेशीर ठरत नाही आणि उलट नुकसानकारक ठरू शकते.
च्युइंग गम चघळताना लाळेचा प्रवाह वाढतो, ज्यामुळे तोंडातील मृत पेशी आणि बॅक्टेरिया बाहेर टाकले जातात. सुरुवातीच्या 10 मिनिटांत गम स्पंजसारखे काम करतो आणि बॅक्टेरियाला आकर्षित करतो. मात्र, जास्त वेळ चघळल्यास त्याची कार्यक्षमता कमी होते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
अमेरिकन डेंटल असोसिएशनच्या अभ्यासानुसार, साखरमुक्त च्युइंग गम 20 मिनिटे चघळल्याने दात स्वच्छ राहण्यास मदत होते. मात्र, जास्त वेळ चघळणे टाळावे, कारण यामुळे जबड्यावर ताण येऊ शकतो, विशेषतः ज्यांना जबड्याच्या सांध्याच्या (TMJ) समस्या आहेत त्यांना याचा त्रास होऊ शकतो.
दोन्ही अभ्यासांनुसार, च्युइंग गम चघळण्याची आदर्श वेळ 10 ते 20 मिनिटे आहे. यामुळे तोंड स्वच्छ राहते, श्वास ताजा राहतो आणि लाळेचा प्रवाह वाढतो. मात्र, ही वेळ ओलांडल्यास फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते, विशेषतः जबड्याच्या आरोग्यासाठी. त्यामुळे, च्युइंग गमचा आनंद घ्या, पण वेळेचे भान ठेवा!
उत्तर: संशोधनानुसार, च्युइंग गम चघळण्याची आदर्श वेळ १० ते २० मिनिटे आहे. यामुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात, लाळेचा प्रवाह वाढतो आणि श्वास ताजा राहतो. ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ चघळल्यास त्याचा फायदा कमी होतो आणि जबड्यावर ताण येऊ शकतो.
उत्तर: च्युइंग गम चघळल्याने लाळेचा प्रवाह वाढतो, ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया आणि मृत पेशी बाहेर टाकल्या जातात. साखरमुक्त गम १० ते २० मिनिटे चघळल्याने दात स्वच्छ राहतात आणि तोंडाची स्वच्छता राखली जाते. तसेच, श्वास ताजेतवाने राहण्यास मदत होते.
उत्तर: होय, २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ च्युइंग गम चघळल्याने जबड्यावर ताण येऊ शकतो, विशेषतः ज्यांना TMJ (जबड्याच्या सांध्याच्या) समस्या आहेत. तसेच, जास्त वेळ चघळल्याने गमची बॅक्टेरिया शोषण्याची क्षमता कमी होते, त्यामुळे फायदा मर्यादित राहतो.

Doomscrolling disease: भारत हा जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया वापरकर्ता देश बनलाय. डाटा रिपोर्टल (2025) नुसार, भारतात 82 कोटींहून अधिक लोक इंटरनेट वापरतात, त्यापैकी 47 कोटी सक्रिय सोशल मीडिया यूजर्स आहेत. एका सरासरी भारतीय व्यक्ती दररोज 2.7 तास सोशल मीडिया वापरते. यामुळे डूमस्क्रॉलिंग ही भारतात एक नवीन मानसिक आरोग्य आव्हान बनली आहे. डूमस्क्रॉलिंग म्हणजे नेमकं काय? हा आजार कोणाला जडतो? यावर उपाय काय? सविस्तर जाणून घेऊया.
विशेषतः 18 ते 24 वयोगटातील तरुण सर्वाधिक मोबाईलमध्ये इंटरनेटच्या विश्वात गुंतलेले आहेत. 36% भारतीय किशोरवयीन मुलांना सोशल मीडियामुळे तणाव आणि चिंता जाणवते, असे आयआयटी मुंबई आणि एनआयएमएचएएनएसच्या संयुक्त अहवालात म्हटलंय.
डूमस्क्रॉलिंग म्हणजे सोशल मीडिया किंवा न्यूज प्लॅटफॉर्मवर सातत्याने नकारात्मक बातम्या, चित्रे किंवा माहिती पाहण्याची सवय. नॅशनल जिओग्राफिकच्या अहवालानुसार, नकारात्मक बातम्या आणि हिंसक फोटो यामुळे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर खोल परिणाम होतो. यामुळे मेंदूचा ‘अॅमिग्डाला’ हा भाग अति-सक्रिय होतो, जो भीती आणि तणाव नियंत्रित करतो. परिणामी, व्यक्ती सतत धोक्याच्या भावनेत राहते, ज्यामुळे तणाव आणि चिंता वाढते, असे तज्ञ सांगतात.
डूमस्क्रॉलिंगमुळे मेंदूच्या न्यूरल सर्किट्समध्ये बदल होतात. यामुळे मेंदू नकारात्मक माहितीवर अधिक लक्ष केंद्रित करतो आणि सकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ लागते. याचा परिणाम म्हणून चिंता, नैराश्य, झोपेची अनियमितता आणि सामाजिक संबंधांपासून दुरावणे यासारख्या समस्या उद्भवतात. सतत तणावामुळे व्यक्तीच्या निर्णयक्षमतेत आणि एकाग्रतेत घट होते. यामुळे दैनंदिन जीवनावरही विपरीत परिणाम होतो.
मोबाईल फोनमधून निघणारी ब्लू लाइट आणि सतत सोशल मीडिया वापर यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येते. ब्लू लाइटमुळे डोळ्यांचा ताण, झोपेची कमतरता आणि डोकेदुखी वाढते. तसेच, नकारात्मक बातम्यांमुळे तणाव आणि नैराश्याचा धोका वाढतो. विशेषतः तरुणांमध्ये डूमस्क्रॉलिंगमुळे मानसिक अस्थिरता आणि सामाजिक दुराव्याची समस्या वाढत आहे.
डूमस्क्रॉलिंगपासून वाचण्यासाठी डिजिटल डिटॉक्स आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. यामध्ये स्क्रीन टाइम मर्यादित करणे, झोपण्यापूर्वी सोशल मीडियापासून दूर राहणे, वाचन, ध्यान किंवा व्यायाम यावर लक्ष केंद्रित करणे आणि नियमित झोपेच्या सवयी सुधारणे अशा गोष्टी करायला हव्यात. तरच तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल,असे तज्ज्ञ सांगतात.
उत्तर: डूमस्क्रॉलिंग ही सोशल मीडिया किंवा न्यूज प्लॅटफॉर्मवर सातत्याने नकारात्मक बातम्या, हिंसक प्रतिमा किंवा तणावपूर्ण माहिती पाहण्याची सवय आहे. यामध्ये व्यक्ती नकळत घंटों नकारात्मक कंटेंट पाहत राहते, ज्यामुळे तणाव, चिंता किंवा अस्वस्थता वाढते. जर तुम्ही सोशल मीडियावर जास्त वेळ घालवत असाल, विशेषतः नकारात्मक बातम्या पाहण्यात, आणि त्यानंतर अस्वस्थ किंवा उदास वाटत असेल, तर ही डूमस्क्रॉलिंगची लक्षणे असू शकतात.
उत्तर: डूमस्क्रॉलिंगमुळे मेंदूचा अॅमिग्डाला हा भाग अति-सक्रिय होतो, जो भीती आणि तणाव नियंत्रित करतो. यामुळे चिंता, नैराश्य, झोपेची अनियमितता आणि सामाजिक दुरावा यासारख्या समस्या उद्भवतात. मेंदू नकारात्मक माहितीवर जास्त लक्ष केंद्रित करू लागतो, तर सकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ शकते. यामुळे निर्णयक्षमता आणि एकाग्रता कमी होऊन दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होतो.
उत्तर: डूमस्क्रॉलिंग टाळण्यासाठी डिजिटल डिटॉक्स महत्त्वाचे आहे. स्क्रीन टाइम मर्यादित करा, झोपण्यापूर्वी सोशल मीडियापासून दूर राहा, आणि सकारात्मक गतिविधींवर लक्ष केंद्रित करा, जसे की वाचन, ध्यान, व्यायाम किंवा कला. नियमित झोपेच्या सवयी आणि निरोगी जीवनशैली अवलंबल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारू शकते. तसेच, नकारात्मक बातम्यांपासून स्वतःला वेळोवेळी दूर ठेवणे आवश्यक आहे.

फलटण प्रतिनिधी │ फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक तसेच आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते, समाजाचे ज्येष्ठ नेते कालकथितहरिष चंदरराव काकडे उर्फ नाना (वय ७५) यांचे आज रविवार दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता अल्पकालीन आजाराने नारळी बाग, फलटण येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले.
नाना यांनी सामाजिक, सहकार आणि राजकीय क्षेत्रात मोलाचे कार्य केले. दि. यशवंत को-ऑप. बँक लि., सातारा जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघ, फलटण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, फलटण सहकारी शेतमाल प्रक्रिया संस्था, फलटण कॉटन सेल जिनिंग अँड प्रेसिंग को-ऑप. सोसायटी आदी विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी कार्य केले.
फलटणचे नगरसेवक म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली. तत्कालीन आमदार डॉ. कृष्णचंद्र भोईटे यांच्या समवेत सहकार व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य आजही स्मरणीय ठरते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
आज दुपारी अंत्ययात्रा २.३० वाजता कामगार वसाहत महात्मा फुले नगर येथून निघेल . .
साहस Times तर्फे विनम्र अभिवादन
15 तासांपूर्वी
मला माझ्या आजोबांच्या घरी पहिला धक्का आठवतो, जेव्हा मला माझे आवडते सकाळचे पेय हॉर्लिक्स मिळाले नाही. त्या काळात ते केवळ सकाळचे ऊर्जा देणारेच नव्हते, तर झोपण्याच्या वेळी आराम देणारे आणि वृद्ध तसेच आजारी लोकांसाठी एक पेयही होते. त्याची किंमत २० रुपयांपेक्षा कमी असूनही आठ मुलांचे वडील असलेले माझे आजोबा त्यांच्या पहिल्या नातवासाठी ते घेऊ शकत नव्हते. म्हणून मी माझ्या दिवसाची सुरुवात रागीपासून बनवलेल्या “कांजी’ने केली, जी हिवाळ्यात आरोग्यदायी मानली जाते. आणि तीव्र उष्णतेमध्ये मी “पयया सदम’ घेतला, जो रात्री भिजवलेल्या भातापासून बनवलेला एक पदार्थ होता. तो दह्यामध्ये मिसळला जात असे. माझ्या आजोबांच्या घरी एक स्पष्ट नियम होता : कांजी किंवा पायया सदम नंतर पुढचे जेवण फक्त सकाळी ११ वाजताच दिले जायचे. चहा किंवा कॉफी नव्हती. आठवड्यातून एकदा माझी आजी काही नाष्टा तयार करायची, जो लपवून ठेवला जायचा आणि चांगल्या वर्तनाचे बक्षीस म्हणून दिला जायचा. प्रार्थना कक्षात आणि व्हरांड्यात दिवे लावून रात्रीचे जेवण दिले जायचे. सायंकाळी ७:३० नंतर स्वयंपाकघर बंद व्हायचे. सुरुवातीला “चारपाई’ (खाटेवर) झोपणे आणि माझ्या चुलत भावांसोबत उशी शेअर करणे कठीण होते, परंतु कालांतराने मला त्याची सवय झाली. नंतर मला उशी माझ्याकडे ओढणेदेखील मजेदार वाटले.
या निवडक जेवणांमध्ये नेहमीच एक कठीण काम असायचे. ते म्हणजे आजोबांना अंगण स्वच्छ करण्यास मदत करणे. त्यात तुटलेले नारळ स्टोअरेज रूममध्ये नेणे. ते स्वच्छ केल्यानंतर करवंटी परत आणणे याचा समावेश होता. त्या कामानंतर बॉयलर रूममध्ये जावे लागत असे, जिथे अंघोळीसाठी गरम पाणी होते. याशिवाय इतर अनेक कामे करावी लागत, जी मी शहरी जीवनात कधीही केली नाहीत. पण माझ्यावर विश्वास ठेवा या अनुभवांनी मला केवळ मुलांना क्वचितच शिकवली जाणारी अनेक कौशल्ये शिकवली नाहीत, तर मला स्वतःचे काम करण्याचे महत्त्वही शिकवले. माझ्या आजोबांच्या प्रेमाने सुरुवातीची अस्वस्थता हळूहळू नाहीशी झाली. माझ्या आजोबांचे गोष्टी सांगणे आणि माझ्या आजीने मला जवळ घेऊन झोपवण्याचा अनुभव अत्यंत आनंददायी होता, जसा की एखादा मुलगा त्याच्या आईसोबत झोपला आहे.
हे जुने बालपणीचे अनुभव माझ्या लक्षात आले. जेव्हा मी ऐकले की अभिनेत्री श्रीलीलाच्या सर्वात गोड बालपणीच्या आठवणी तिच्या आजी-आजोबांशी जोडल्या आहेत. ती दिग्दर्शक अनुराग बसू यांच्या कार्तिक आर्यन अभिनीत सिनेमातून हिंदी सिनेमासृष्टीत पदार्पण करत आहे. सुरुवातीला या सिनेमाचे नाव ‘आशिकी ३’’’’ असे होते. शिवाय बॉलीवूडमधील गॉसिपनुसार, ती इब्राहिम खान आणि वरुण धवन यांच्यासोबत आणखी एका बॉलीवूड सिनेमात काम करण्याची शक्यता आहे. तिचे आजोबा ८० वर्षीय नागेश्वर राव निदामनुरी यांच्यासोबत घालवलेले तिचे बालपण श्रीलीलासाठी धडे आणि आनंदाने भरलेले होते. ते तिला रेन आणि मार्टिन इंग्रजी व्याकरणाची पुस्तके वाचायला देत असत. ते तिला गावातील एका केंद्रात घेऊन जायचे आणि स्थानिक मुलांना शिकवण्याचे उन्हाळी काम तिच्यावर सोपवायचे. श्रीलीला आणि तिचे चुलत भाऊ एका झाडाखाली जमायचे आणि एक छोटी पंचायत बनवायचे, उन्हाळा घालवण्याचा एक संस्मरणीय मार्ग.
विभक्त कुटुंबांच्या या युगात हिवाळा आणि उन्हाळी सुट्टीत आजी-आजोबांच्या घरी जाणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. खर्च करण्याची क्षमता वाढल्याने पालक त्यांच्या मुलांना त्यांच्या आजी-आजोबांच्या घरी न जाता जगाच्या वेगवेगळ्या भागात घेऊन जात आहेत. अर्थात, मी आजी-आजोबांना त्यांच्या मुलांसोबत राहायला जाण्याबद्दल बोलत नाहीये. मी त्यांच्या आजी-आजोबांसोबत राहणाऱ्या मुलांबद्दल बोलत आहे, जिथे त्यांच्या पालकांपेक्षा कमी सुविधा आहेत अशा जुन्या घरात राहतात. इथेच शिक्षण होते.


इच्छामरण आणि वयस्कर लोकांना सध्या जाणवणारी एकाकी आयुष्याची भीती हे दोन्ही विषय खरंतर खूप महत्त्वाचे आहेत. कोणावरही आर्थिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या अवलंबून न राहता, सन्मानाने आजवर आपण आयुष्य जगलो, पण मृत्यूचं काय? वयोमानामुळे होणारे आजार किंवा अन्य कारणामुळे आयुष्याच्या सांजपर्वात दुर्बलतेने जगावं लागलं तर… हा विचारही सहन न होणाऱ्या एका वयस्कर जोडप्याचा दृष्टिकोन का आणि कसा बदलतो? याची गोष्ट ‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक विशाल गांधी यांनी मांडली आहे. मात्र, इतकी चांगली कथाकल्पना अवाजवी मनोरंजनाच्या पसाऱ्यात पार हरवून गेली आहे.
दिग्दर्शक विशाल गांधी यांचा ‘आतली बातमी फुटली’ हा पहिलाच चित्रपट आहे. याआधी त्यांनी जाहिरात क्षेत्रात काम केलं आहे. मालिका दिग्दर्शन केलं आहे आणि निर्मितीही केली आहे, त्यामुळे दिग्दर्शनाचं तंत्र त्यांना अवगत आहे. मात्र, अनेकदा चांगला विषय हाताशी असला तरी तो मनोरंजनात्मक पद्धतीने म्हणजे विनोदी शैलीत मांडला तरच लोक ते पाहतील, असा एक समज दृढ आहे. आणि याच गैरसमजातून ‘आतली बातमी फुटली’ची मांडणी करण्यात आली आहे. ढोबळमानाने कथेचा विचार केला तर एक सामान्य रिक्षाचालक आणि त्याच्या मुलीची कथा एका बाजूला आहे. तर दुसऱ्या बाजूला वानखेडे नामक वयस्कर दाम्पत्याची कथा आहे. आणि मधल्या मध्ये वानखेडे ज्या चाळीत राहतात, तिथलं धूमशान मनोरंजनाच्या नावाखाली कोंबण्यात आलं आहे. सचिन गावडे या रिक्षाचालकाची मुलगी अचानक आजारी पडते, तिच्यावर तातडीने हृदयरोपणाची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यासाठी दहा लाख रुपये खर्च येणार आहेत. पैसे मिळवायचे सगळे अधिकृत मार्ग चोखाळून हरलेला सचिन शेवटी एका बँकेवर दरोडा टाकायचा निर्णय घेतो. फारच सहजतेने तो दरोडा टाकतो, पण बँकेतून बाहेर पडताना पोलिसांच्या नजरेत येतो. मागे लागलेल्या पोलिसांना गुंगारा देता देता सचिन अचानक वानखेडेंच्या चाळीत शिरतो आणि त्यांच्याच खोलीत घुसतो. मात्र, वानखेडेंच्या घरात काही वेगळंच प्रकरण शिजतं आहे ज्याची कुठलीही कल्पना नसलेला सचिन त्यात पूर्णपणे अडकतो.
थोडक्यात हा कथेचा प्रवास लक्षात घेतला तर कुठेही हा चित्रपट इच्छामरण या विषयाशी जोडलेला असेल, असा विचार तरी मनाला शिवतो का? फार फार तर एखाद्या गुन्ह्याची आणि त्यातल्या सहभागींची विनोदी किंवा रहस्यमय गुंतागुंत असेल असं आपल्याला वाटतं आणि त्याच धाटणीत दिग्दर्शकाने चित्रपटाची मांडणी केली आहे. त्यामुळे चित्रपटाचा पूर्वार्ध हा फक्त गोंधळाने भरलेला आहे. उत्तरार्धात आणि तेही शेवटच्या अर्ध्या तासात चित्रपटाचा मूळ विषय पात्रांच्या तोंडी येतो.
शेवटाकडे येताना चित्रपट क्षणाक्षणाला रंगत जातो आणि त्याचा शेवट हा खऱ्या अर्थाने चित्रपटाच्या विषयाला न्याय देणारा आहे. चित्रपटाचा शेवटचा भाग पाहताना खरोखरच इतक्या चांगल्या कल्पनेची अशी ठोकळेबाज मांडणी करण्य़ाचा अट्टहास कशासाठी? हा प्रश्न पडतो.
इच्छामरण याहीपेक्षा मृत्यू तितक्याच सन्मानाने मिळेल का? दोघांपैकी कोणी एकटा मागे उरला तर त्याचं आयुष्य तो कसा घालवेल? ही वृद्धांच्या मनातली भीती हा खरा विषय आहे. अर्थात, इथे वानखेडे दाम्पत्याला मूलबाळ नाही आणि नातेवाईकही फारसे नाहीत. त्यामुळे त्यांच्या मनातली शेवटाची भीती ही निराधार नाही, पण अर्थातच थोडं का होईना आयुष्य जगायला मिळावं, म्हणून मरणाच्या दारात असलेल्यांचा संघर्ष पाहिला की आपोआपच मरण ओढवून घेण्याची इच्छा पोकळ ठरते आणि हा या चित्रपटाचा खरा विषय आहे. मात्र, नको ती सुमार, अर्थहीन गाणी, नृत्यं आणि विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर यांच्यासारख्या उत्तम कलाकारांचं विनोदाच्या नावाखाली केलेलं हसं पाहवत नाही. त्यातल्या त्यात उत्तरार्धात खऱ्या अर्थाने मोहन आगाशे आणि रोहिणी हट्टंगडी या ताकदीच्या कलाकारांबरोबर सिद्धार्थ जाधवने अगदी सहजशैलीत साकारलेला निरागस सचिन, त्याचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे रसायन जमून आलं आहे. पण, त्याचा फायदा संपूर्ण चित्रपटाला होत नाही. रंजक शैली कुठल्या विषयासाठी आणि काय पद्धतीने वापरायला हवी, याचं थोडं भान असतं तर किमान एक उत्तम विषय तरी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या पदरी पडला असता.
आतली बातमी फुटली
दिग्दर्शक – विशाल गांधी
कलाकार – मोहन आगाशे, रोहिणी हट्टंगडी, सिद्धार्थ जाधव, विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, त्रिशा ठोसर आणि प्रीतम कागणे.