Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 136

रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये फलटणच्या विद्यार्थ्यांचा  चमकदार कामगिरी

0
रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये फलटणच्या विद्यार्थ्यांचा  चमकदार कामगिरी

पुणे – आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि STEM क्षेत्राशी निगडित प्रतिष्ठेच्या **‘रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप’**मध्ये फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (SSC), जाधववाडीच्या विद्यार्थ्यांनी अभिमानास्पद यश संपादन केले आहे.

या स्पर्धेत देवेंद्र महेश सुतार आणि शिवराज शेंडे या विद्यार्थ्यांनी ‘फोक रेस – इंटरमीडिएट’ प्रकारात राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला असून, फलटण तालुक्याचे नाव देशभर उज्ज्वल केले आहे.

२० आणि २१ सप्टेंबर रोजी पुण्यातील एमआयटी, लोणी काळभोर येथे झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील २००० पेक्षा जास्त संघ व ५००० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. अशा कठीण स्पर्धेत फलटणच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवणे ही मोठी अभिमानाची बाब ठरली आहे.

या विजयाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व विधानपरिषद सदस्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि प्रशासकीय अधिकारी अरविंद निकम यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मुख्याध्यापिका अंजुम शेख, रोबोटिक्स शिक्षक आकाश साळुंखे आणि अनिकेत माने यांच्या परिश्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.

ठाण्यात बंगाली दुर्गा पूजेचा भव्य सोहळा… – Marathi News | Thane Bengali Durga Puja Utsav Venues And Events Ocd 94

0
ठाण्यात बंगाली दुर्गा पूजेचा भव्य सोहळा… – Marathi News | Thane Bengali Durga Puja Utsav Venues And Events Ocd 94


Durga Pooja / ठाणे – पश्चिम बंगालमधील दुर्गा पूजेची परंपरा आता ठाण्यातील बंगाली भाषकांसोबतच इतर ठाणेकरांसाठीही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. नवरात्रोत्सवाच्या पंचमीपासून सुरू होणारा हा दुर्गोत्सव यंदा ठाण्यातील वाघबीळ, कोलशेत, हायलँड, भाईंदर अशा विविध ठिकाणी पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यात देवीची भव्य मूर्ती, त्यासह सरस्वती, लक्ष्मी, गणपती, कार्तिक आदी देवतांच्या मूर्ती अशी एकत्रित पूजा करण्यात येते. यामुळे ठाणेकरांना उत्सवातील वेगळेपणा अनुभवता येणार आहे.

शिकोरेर खोजे एमराल्ड हिलसाईड बंगाली असोसिएशन यांच्या वतीने भाईंदर-घोडबंदर रोड येथे २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान दुर्गोत्सव होणार आहे. असोसिएशनचे अर्णव बनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात ग्रामीण बंगालची झलक दाखवणारा मंडप आणि १० फूट उंचीची पारंपारिक मॉं दुर्गेची मूर्ती याचे वैशिष्ट्य ठरणार आहे. पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकला, पारंपरिक सजावट आणि बंगाली खाद्यपदार्थांची मेजवानी ठाणेकरांना मिळणार आहे.

हेही वाचा

नब प्रयासी दुर्गोत्सव यांच्यावतीने २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान कोलशेत रोडवरील हेरिटेज हॉटेल येथे दुर्गा पूजाचे आयोजन केले आहे. पंचमीपासून दशमीपर्यंतचा संपूर्ण सोहळा होणार आहे. बंगीया परिषद, ठाणे यांच्यावतीने दुर्गोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कौशिक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या उत्सवाचे ६३ वर्ष आहे. या उत्सवात विविध खाद्यपदार्थांची दुकाने, नृत्य, दशमी पूजा, सिंदूर महोत्सव असणार आहे. हा उत्सव शनिवार, २७ सप्टेंबर ते गुरूवार, २ ऑक्टोबरपर्यंत हायलँड गार्डन, ठाणे येथे असणार आहे.

प्रेस्टीज रेसिडंसी यांच्यावतीने तसेच तन्मय चक्रवर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच दुर्गोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव शनिवार, २७ सप्टेंबर ते गुरूवार, २ ऑक्टोबर पर्यंत देवदर्शन मैदान, वाघबीळ येथे होणार आहे. या उत्सवात विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले जाणार आहेत.

त्याचप्रमाणे न्यु बंगाल क्लब यांच्यावतीने आणि प्रबीर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गा पूजाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा स्थापनेचे २४ वे वर्ष आहे. उपवन लेक मैदान, पोखरण रोड नं. २ येथे कोचबिहार पॅलेसची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. बंगालच्या अद्वितीय वास्तुकलेचे दर्शन या उत्सवात ठाणेकरांना होणार आहे.





Source link

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: या नवरात्रीत मायामुक्त होण्याचा संकल्प करा‎

0
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:  या नवरात्रीत मायामुक्त होण्याचा संकल्प करा‎


  • Marathi News
  • Opinion
  • Pt. Vijayshankar Mehta’s Column, Resolve To Be Free From Illusion This Navratri

8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

या नवरात्रीत मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुमची सर्व शक्ती वापरा.‎​​गेल्या काही महिन्यांपासून आपल्या जीवनात अशा घटना घडत‎आहेत की मनात फक्त नकारात्मक विचार येतात. शास्त्रात माया हा‎शब्द आहे. शक्तीचा गैरवापर म्हणजे माया; शक्तीचा योग्य वापर‎म्हणजे मायापासून मुक्ती.

माया समजून घेण्यासाठी जादू या शब्दाशी‎जोडले जा. जादू म्हणजे घडते ते दिसत नाही. दिसते ते अस्तित्वात‎नाही. माया‎ही असेच एक जग निर्माण करते. गरुडाने ब्रह्माला त्याची‎समस्या सांगितली तेव्हा ब्रह्माला समजले की गरुड भ्रमात आहे.‎

त्याला आठवले, ‘अग जगमय जग मम उपराजा, नहीं आचरज मोह‎खगराजा।’ ब्रह्मा म्हणतात, “हे जग माझी निर्मिती आहे. मी स्वतः‎मायेच्या प्रभावाखाली नाचू लागतो. तेव्हा गरुड भ्रमित होणे यात‎आश्चर्य नाही.’ म्हणूनच या नवरात्रीत मायामुक्तीचा संकल्प करा.‎



Source link

एस. जयशंकर यांनी घेतली अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट! टॅरिफ आणि H-1B व्हिसा शुल्क वाढीनंतर पहिल्यांदाच चर्चा

0
एस. जयशंकर यांनी घेतली अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट! टॅरिफ आणि H-1B व्हिसा शुल्क वाढीनंतर पहिल्यांदाच चर्चा



S Jaishankar meets US Secretary : एस. जयशंकर यांनी घेतली अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट! टॅरिफ आणि H-1B व्हिसा शुल्क वाढीनंतर पहिल्यांदाच चर्चा





Source link

गजवडी गावातील गावकऱ्यांनी पेटवली क्रांतीची ज्योत, जमीन, घराच्या उताऱ्यावर महिलांची नावं

0



सातारा: सातारा जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. निसर्गाच्या कुशीत आणि सज्जनगड च्या पायथ्याला असलेलं गजवडी गाव.. सातारा तालुक्यातील या गजवडी गावाची लोकसंख्या 1500 हून अधिक आहे. या गावामध्ये 600 हून अधिक महिला राहतात. या गावामध्ये एक अनोखा उपक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात आला आहे.  जमीन, घराच्या उताऱ्यावर पुरुषांच्या सोबत महिलांची नावे जोडण्यात आली आहेत गजवडी गावातील पुरुष आणि महिलांनी क्रांतीची ज्योत पेटवलीय. नवऱ्याच्या संमतीने बायकोला घरासोबत जमिनीवर समान अधिकार मिळाला आहे.

गजवडीच्या गावकऱ्यांनी पेटवली क्रांतीची मशाल, महिलांची नाव घर आणि जमिनीवर नोंदवली

साताऱ्यातील गजवडी गावात पुरुषासोबत महिलेला समान अधिकार देण्यात आला आहे. या गावातील महिलांच्या नावावर पुरुषांच्या संमतीने संपत्तीमध्ये समान अधिकार देण्यात आला आहे. आठ अ चा उतारा, जमिनीचा सातबारा, त्याचबरोबर घरावर देखील महिलांची नावे पुरुषांच्या सोबत लावण्यात आली आहेत. साडेतीनशेहून अधिक महिलांच्या नावावर आता संपत्ती करण्यात आली आहे. 

सातारा हा क्रांतीकारांचा जिल्हा आहे. साताऱ्यातून अनेक प्रबोधनाच्या चळवळींची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. याच साताऱ्यातील गजवडी गावातील पुरुषांनी आणि महिलांनी क्रांतीची ज्योत पेटवली आहे. यामुळे या गावातील महिला स्वयंभू झाल्या आहेत. काही महिलांनी तर स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर काहींनी आपल्या घरातील कर्त्या पुरुषासोबत खांद्याला खांदा लावून आपला संसार सुरळीत केला आहे. कुटुंबाचा गाडा दोघे मिळून चालवत आहेत. या क्रांतीमुळे गावातील महिला स्वावलंबी बनल्या आहेत.. पंचक्रोशी मध्ये यांच्या या उपक्रमाचा वेगळा ठसा उमटला आहे.

 पंधराशेहून अधिक लोकसंख्येच्या गावामध्ये 600 हून अधिक महिला स्वावलंबी बनल्या आहेत. या उपक्रमामुळे स्वतः महिलांनी कर्ज काढून आपला व्यवसाय सुरू केला आहे. या अनोख्या उपक्रमामुळे गजवडी गावाची चर्चा सातारा सह संपूर्ण महाराष्ट्रभर होऊ लागले आहे.

गजवडी गावातील शामल जाधव यांनी त्यांचं नाव घरावर लावल्याची माहिती दिली. कोणती योजना बँकेकडून घ्यायची असेल तर माझं नाव कागदपत्रावर असल्यानं कोणतंही कर्ज सहज उपलब्ध होतं. माझा टेलरिंगचा व्यवसाय आहे, यूट्यूब चॅनेल देखील चालवते, असं शामल जाधव यांनी म्हटलं. गावातील बऱ्याच महिलाना या गोष्टींचा फायदा झालेला आहे. 

शुभांगी बळीप यांनी त्यांच्या पतीनं उताऱ्यावर त्यांचं नाव नोंदवल्यानंतर कर्ज मिळायला लागल्याची माहिती दिली. कर्ज काढून दोन ते तीन म्हशी खरेदी केल्याची माहिती देखील शुभांगी बळीप यांनी दिली.

सिंधू राजेंद्र कदम यांनी त्या त्यांच्या पतीसोबत शेती करत असल्याचं सांगितलं. सातबाऱ्यावर नाव आल्यानं फायदा झाल्याचं त्या सांगतात.  

सीमा बळीप यांनी गजवडी गावात या उपक्रमाची सुरुवात 2010 पासून सुरुवात झाली होती. सुरुवातीला चार चाकी वाहनावर लाऊड स्पीकर लावून जनजागृती करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांच्या पुढाकारानं शेतजमिनीवर महिलांची नावं लावण्यास सुरुवात झाल्याचं सीमा बळीप यांनी सांगितलं.

हेदेखील वाचा

आणखी वाचा



Source link

GST 2.0 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशवासीयांना पत्र, जीएसटी सुधारणांचा उल्लेख करत केलं महत्त्वाचं आवाहन

0
GST 2.0 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशवासीयांना पत्र, जीएसटी सुधारणांचा उल्लेख करत केलं महत्त्वाचं आवाहन



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशवासीयांना पत्र, जीएसटी सुधारणांचा उल्लेख करत केलं महत्त्वाचं आवाहन





Source link

Mardaani 3 : नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ची घोषणा, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित; पोस्टर पाहिलंत का? – Marathi News | Rani Mukerji Mardaani 3 New Poster Actress Returns As Police Officer Shivani Roy Movie Releasing On 27 February 2026 Ssm 00

0
Mardaani 3 : नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ची घोषणा, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित; पोस्टर पाहिलंत का? – Marathi News | Rani Mukerji Mardaani 3 New Poster Actress Returns As Police Officer Shivani Roy Movie Releasing On 27 February 2026 Ssm 00



Mardaani 3 : नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ची घोषणा, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित; पोस्टर पाहिलंत का? – Marathi News | Rani Mukerji Mardaani 3 New Poster Actress Returns As Police Officer Shivani Roy Movie Releasing On 27 February 2026 Ssm 00 – Latest Bollywood News at Loksatta.com





Source link

साताऱ्यातील राजकीय समीकरणात मोठा ट्विस्ट : रामराजे नाईक निंबाळकरांचा गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे?

0
साताऱ्यातील राजकीय समीकरणात मोठा ट्विस्ट : रामराजे नाईक निंबाळकरांचा गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे?

सातारा (साहस Times): देशात आणि राज्यात सत्तेसाठी सुरू झालेली राजकीय मिसळ आता तालुकास्तरावर देखील पोहोचली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण विकासाची दिशा ठरवणाऱ्या जिल्हा परिषदेवर सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय तडजोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर फलटणमधील माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचा गट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे.

गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राजे गट महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहिला होता. पण माळेगाव कारखाना निवडणुकीपासूनच घडामोडी बदलल्या. फलटण मतदारसंघ भाजपने ऐनवेळी अजित पवारांना सोडल्याने भाजपचे सचिन कांबळे पाटील यांना घड्याळ चिन्हावर लढावे लागले. अजित पवार यांच्या प्रचाराच्या जोरावर त्यांना विजय मिळवता आला आणि राजे गटाच्या तीन दशकांच्या सत्तेला धक्का बसला. यानंतर राजे गटातील अनेक नेते भाजप वा राष्ट्रवादीत दाखल झाले.

दरम्यान, साताऱ्याच्या जिल्हा परिषदेवर याआधी काँग्रेस व नंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची सत्ता होती. पण अलीकडील निवडणुकांनंतर भाजपचे वर्चस्व वाढले असून राष्ट्रवादी मागे पडत चालली आहे. भाजपकडे जिल्ह्यात ४ आमदार तर राष्ट्रवादी व शिवसेनेकडे प्रत्येकी २-२ आमदार आहेत. उदयनराजे भोसले लोकसभेतून भाजपकडून, तर नितीन पाटील राज्यसभेतून राष्ट्रवादीकडून खासदार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न सुरू आहेत.

यासाठी त्यांनी माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील (कराड दक्षिण) व माण-खटावमधील जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांचा पक्षप्रवेश करून घेतला आहे. तरीदेखील भाजपला टक्कर देणे कठीण आहे. अशावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचा गट राष्ट्रवादीसोबत गेल्यास साताऱ्याच्या राजकीय समीकरणात मोठा फेरबदल होऊ शकतो.

तथापि, हा निर्णय घेताना अजित पवार यांना फलटण-कोरेगावातील स्थानिक नेते आणि राजे गटाच्या विरोधात भूमिका घेतलेल्या दिग्गजांचा विचार करावा लागणार आहे. पुढील काही दिवसांत होणाऱ्या हालचालींवर साताऱ्याचे संपूर्ण राजकारण अवलंबून राहणार आहे.

उगीच नाही 42 व्या वर्षीही 22 वर्षांची दिसते कतरिना, सकाळच्या खास ड्रिंकमध्ये लपलंय सिक्रेट!

0
उगीच नाही 42 व्या वर्षीही 22 वर्षांची दिसते कतरिना, सकाळच्या खास ड्रिंकमध्ये लपलंय सिक्रेट!


Katrina Kaifs special drink: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही वयाच्या 42 व्या वर्षीही तिच्या नितळ आणि चमकदार त्वचेने चाहत्यांना थक्क करते. तिच्या सौंदर्याचे रहस्य काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो. उजळणाऱ्या त्वचेसाठी ती महागड्या प्रसाधने वापरत असेल असे तुम्हालाही वाटतंय तर जरा थांबा. कारण कतरिनाने आपल्या निरोगी शरीर आणि नितळ त्वचेचं एक सिक्रेट शेअर केलंय. जे प्रत्येकाला माहिती असायला हवं. विशेषतः ती दररोज सकाळी पित असलेले खास पेय तिच्या तरुण आणि तेजस्वी त्वचेचे गमक आहे. तुम्हीदेखील तिला फॉलो करुन त्वचा तजेलदार बनवू शकता. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

सकाळच्या पेयाचे महत्त्व

खरे सौंदर्य बाह्य साधनांपेक्षा शरीराच्या आतून येते यावर कतरिनाला विश्वास आहे. त्यामुळे ती सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम एक विशेष पेय घेते. हे पेय त्वचेला हायड्रेशन पुरवते. याशिवाय तिला दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही ठेवण्यास मदत करते.

त्वचेची काळजी आणि हायड्रेशन

त्वचा सुरकुत्यामुक्त आणि नितळ असणे हे हायड्रेशनवर अवलंबून असते. हे खास पेय कतरिनाच्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढते, ज्यामुळे तिची त्वचा स्वच्छ आणि चमकदार राहते. तिच्या या सवयीमुळे त्वचा घट्ट आणि तरुण दिसते.

उर्जेचा स्रोत असलेलं पेय 

हे सकाळचे पेय केवळ सौंदर्यासाठीच नाही, तर कतरिनाच्या ऊर्जेचा स्रोत आहे. सकाळी लवकर प्यायल्याने ती शूटिंग असो वा व्यायाम नेहमीच उत्साहात दिसते. यामुळे तिची सक्रिय लाईफस्टाइल टिकून राहण्यास मदत होते.

कतरिनाकडून काय शिकण्यासारखं?

कतरिनाचा ठाम विश्वास आहे की सौंदर्य आणि आरोग्यासाठी साधी दिनचर्या पुरेशी आहे. तिचे सकाळचे पेय हा त्याचाच भाग आहे, जे तिला दीर्घकाळ तरुण ठेवण्यास मदत करते.कतरिनाच्या या सौंदर्य रहस्याने हे सिद्ध केले आहे की निरोगी दिनचर्या आणि योग्य हायड्रेशन त्वचेला चमकदार ठेवू शकते. जर तुम्हालाही असाच तेजस्वी चेहरा हवा असेल, तर सकाळी हेल्दी ड्रिंकपासून सुरुवात करा.

हेल्दी ड्रींक म्हणजे नक्की काय?

कतरिना पीत असलेलं हेल्दी ड्रींक म्हणजे नेमकं कोणतं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. ती नेमकं कोणतं हेल्दी ड्रींक घेते याबद्दल माहिती समोर आली नसली तरी अशा प्रकारच्या निरोगी पेयांबद्दल सामान्य माहिती आणि तज्ज्ञ काही पेय सुचवतात. जे पेय दररोज सकाळी प्यायल्यास त्वचा हायड्रेट होते आणि शरीर डिटॉक्स होऊन ऊर्जा वाढते.  या पेयामध्ये लिंबू आणि मध मिसळलेले कोमट पाणी, ग्रीन टी किंवा हर्बल टी, डिटॉक्स वॉटर,नारळ पाणी,स्मूदी किंवा ज्यूस यांचा समावेश होतो.

FAQ 

कतरिना कैफच्या तरुण आणि चमकदार त्वचेचे रहस्य काय आहे?

कतरिना कैफच्या सौंदर्याचे रहस्य तिच्या सकाळच्या खास पेयात आहे. हे पेय तिच्या त्वचेला हायड्रेट करते, शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढते आणि त्वचेला सुरकुत्यामुक्त, चमकदार ठेवते. तिची साधी दिनचर्या आणि निरोगी जीवनशैली यामुळे ती ४२ व्या वर्षीही तरुण दिसते.

कतरिनाचे सकाळचे पेय तिच्या सौंदर्यासाठी कसे फायदेशीर आहे?

कतरिनाचे सकाळचे पेय त्वचेला खोलवर हायड्रेशन पुरवते, ज्यामुळे ती घट्ट आणि तेजस्वी राहते. हे पेय शरीर स्वच्छ ठेवते आणि ऊर्जा वाढवते, ज्यामुळे ती शूटिंग किंवा व्यायामादरम्यान उत्साही दिसते.

कतरिनाच्या दिनचर्येतून आपण काय शिकू शकतो?

कतरिना मानते की सौंदर्य आणि आरोग्यासाठी साधी दिनचर्या पुरेशी आहे. सकाळी निरोगी पेय घेणे हा तिच्या दिनचर्येचा महत्त्वाचा भाग आहे, जो त्वचेला दीर्घकाळ तरुण ठेवण्यास मदत करतो. हायड्रेशन आणि निरोगी सवयींचा अवलंब करून कोणीही चमकदार त्वचा मिळवू शकते.





Source link

स्मृतीदिन हा केवळ दुःख व्यक्त करण्याचा क्षण नसून जीवनमूल्यांचे चिंतन करण्याचा दिवस – पूज्य भंते काश्यप

0
स्मृतीदिन हा केवळ दुःख व्यक्त करण्याचा क्षण नसून जीवनमूल्यांचे चिंतन करण्याचा दिवस – पूज्य भंते काश्यप

फलटण : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे धम्म सेवक संजय प्रल्हाद घोरपडे यांच्या वतीने मौजे सासकल येथे त्यांच्या आई कालकथित बायनाबाई प्रल्हाद घोरपडे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आईच्या स्मृतीला आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे बौद्धाचार्य म्हणून केंद्रीय असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयुष्यमान दादासाहेब भोसले यांनी संपूर्ण विधी बौद्ध पद्धतीने संपन्न केला. प्रसंगी पूज्य भंते काश्यप यांनी धम्मदेशना करताना अष्टांगिक मार्गातील सम्यक दृष्टी व सम्यक वाचा या दोन महत्त्वाच्या घटकांवर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ‘कालकथित’ या संकल्पनेचा अर्थ व त्याचे विश्लेषण करत समाजबांधवांना प्रबोधन दिले.
‘कालकथित’ संकल्पनेचा अर्थ व महत्त्व यावर
धम्मदेशना करताना भंते काश्यप यांनी ‘कालकथित’ या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट केला. ते म्हणाले, बौद्ध धम्मात कालकथित म्हणजे या नश्वर जगातून प्रवास संपवून अनित्यतेची जाणीव करून देणारी अवस्था. मानवी जीवन क्षणभंगुर असून प्रत्येक जीवाला मृत्यू अनिवार्य आहे. या अनित्यत्वाची जाणीव करून देऊन कालकथित व्यक्ती समाजात स्मरणार्ह ठरते. मृत्यू म्हणजे अंत नव्हे तर धम्माच्या अनुसंधानाने केलेल्या कार्यांचे स्मरण करण्याची संधी असते, असे त्यांनी प्रतिपादन केले. त्यामुळे स्मृतीदिन हा केवळ दुःख व्यक्त करण्याचा क्षण नसून जीवनमूल्यांचे चिंतन करण्याचा दिवस असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
आईच्या महतीवर गीतातून प्रबोधन –
फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयुष्यमान महावीर भालेराव यांनी आईच्या महतीवर आधारित गीत सादर केले. या गीतातून आईची नि:स्वार्थ सेवा, त्याग आणि ममत्व यांचे दर्शन घडवून उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले.

या स्मृतीदिन कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्ह्याचे संघटक माजी अध्यक्ष आयु. श्रीमंत घोरपडे, महासचिव फलटण तालुका आयु. बाबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष आयु.विठ्ठल निकाळजे, कार्यालयीन सचिव आयुष्यमान चंद्रकांत मोहिते, फलटण तालुक्याचे अभ्यासू व्यक्तिमत्व आयु. सोमीनाथ घोरपडे, संघटक आयु. आनंद जगताप तसेच सासकल गावातील सर्व बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता आईच्या स्मृतीला आदरांजली वाहून करण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवरांनी बायनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाला व आईच्या आदर्शरूपाला वंदन केले.