Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 135

पुणे कराराचा फेरविचार : दलित-आदिवासींना स्वतंत्र मतदारसंघाची आजची गरज

0
पुणे कराराचा फेरविचार : दलित-आदिवासींना स्वतंत्र मतदारसंघाची आजची गरज

फलटण :- पुणे करार आणि आजची गरज २४ सप्टेंबर १९३२ साली झालेला पुणे करार हा भारतीय इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि वादग्रस्त टप्पा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीय, विशेषतः अनु. जाती (Scheduled Castes) यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. ब्रिटिश सरकारने ती मान्य करून “कम्युनल अवॉर्ड” जाहीर केला होता. यामध्ये दलितांना स्वतंत्र मतदारसंघात त्यांचे प्रतिनिधी निवडून देण्याचा हक्क देण्यात आला होता.

पण महात्मा गांधी यांनी त्याला विरोध केला. त्यांनी हे देशाच्या ऐक्याला धोका आहे असे सांगून पुण्याच्या येरवडा जेलमध्ये उपोषण सुरू केले. देशात प्रचंड दबावाचे वातावरण तयार झाले. शेवटी बाबासाहेब आंबेडकर यांना अनेक सामाजिक व राजकीय शक्तींनी घेरले आणि समझोता करण्यास भाग पाडले.

या समझोत्यालाच आपण पुणे करार म्हणतो.

पुणे करारानंतर झालेला परिणाम

दलितांना स्वतंत्र मतदारसंघाचा अधिकार नाकारला गेला.

त्याऐवजी सामान्य मतदारसंघातून काही जागा राखीव ठेवण्यात आल्या.

म्हणजेच दलितांचा प्रतिनिधी निवडून येण्यासाठी बहुसंख्य समाजाच्या मतांवर अवलंबून राहावे लागले.

यामुळे खऱ्या अर्थाने दलितांचे स्वतंत्र राजकीय नेतृत्व तयार होऊ शकले नाही, कारण उमेदवार निवडण्यासाठी व जिंकण्यासाठी बहुजन समाजाच्या ऐवजी सवर्ण मतदारांची कृपा महत्त्वाची ठरली.

अन्यायाची बाजू

दलितांना स्वतंत्र राजकीय ताकद निर्माण होण्याची संधी हिरावून घेतली गेली.

केवळ “आरक्षण” देऊन प्रश्न सुटला नाही, कारण निर्णयक्षमता व स्वायत्त राजकीय हक्क मिळाले नाहीत.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या समाजाला त्यांच्या समस्यांवर थेट बोलणारे, स्वतंत्र निर्णय घेणारे प्रतिनिधी कमी मिळाले.

आजची मागणी

आज ९० वर्षांनंतरही दलित व आदिवासी समाजाची स्थिती मोठ्या प्रमाणावर सुधारलेली नाही.

म्हणूनच पुणे कराराचा फेरविचार व्हावा आणि अनु. जाती व अनु. जमाती यांना पुन्हा स्वतंत्र मतदारसंघाचा हक्क द्यावा, ही मागणी पुन्हा  केली पाहिजे.

कारण –
खऱ्या अर्थाने स्वायत्त नेतृत्व उभे राहण्यासाठी.

बहुसंख्याकांच्या दयेवर न राहता स्वतःच्या बळावर प्रतिनिधी निवडण्यासाठी.

राजकारणात खरी समानता मिळवण्यासाठी.

कुणाल किशोर काकडे
संस्थापक अध्यक्ष-लुंबिनी बहुउद्देशीय संस्था, मंगळवार पेठ, फलटण.

सुपरस्टार आजीची फ्लॉप नात! अभिनेत्याबरोबरचा MMS लीक झाल्याने बॉलीवूड अभिनेत्रीचं संपलं करिअर अन्… – Marathi News | Riya Sen Ashmit Patel Mms Leak Actress Career Ruined Later Got Married Out Of Industry Hrc 97

0
सुपरस्टार आजीची फ्लॉप नात! अभिनेत्याबरोबरचा MMS लीक झाल्याने बॉलीवूड अभिनेत्रीचं संपलं करिअर अन्… – Marathi News | Riya Sen Ashmit Patel Mms Leak Actress Career Ruined Later Got Married Out Of Industry Hrc 97



सुपरस्टार आजीची फ्लॉप नात! अभिनेत्याबरोबरचा MMS लीक झाल्याने बॉलीवूड अभिनेत्रीचं संपलं करिअर अन्… – Marathi News | Riya Sen Ashmit Patel Mms Leak Actress Career Ruined Later Got Married Out Of Industry Hrc 97 – Latest Bollywood News at Loksatta.com





Source link

ताडोबातील सफारी शुल्क महागले; सर्वसामान्यांचे स्वप्न धूसर, श्रीमंतांचीच मक्तेदारी – Marathi News | Tadoba Tiger Safari Fee Hike Ocd 94

0
ताडोबातील सफारी शुल्क महागले; सर्वसामान्यांचे स्वप्न धूसर, श्रीमंतांचीच मक्तेदारी – Marathi News | Tadoba Tiger Safari Fee Hike Ocd 94



ताडोबातील सफारी शुल्क महागले; सर्वसामान्यांचे स्वप्न धूसर, श्रीमंतांचीच मक्तेदारी – Marathi News | Tadoba Tiger Safari Fee Hike Ocd 94 – Latest Nagpur News at Loksatta.com





Source link

परिवर्तनाची ज्योत – Marathi News | Loksatta Durga Bhagyashri Lekhami From Madiya Tribal Community Zws 70

0
परिवर्तनाची ज्योत – Marathi News | Loksatta Durga Bhagyashri Lekhami From Madiya Tribal Community Zws 70


स्वातंत्र्यानंतर तब्बल ७६ वर्षांनी एसटी महामंडळाची पहिली बस मारकनार गावात येणं, गावच्या लोकांना वीज, पाणी, पक्की घरकुले मिळणं, स्त्रियांसाठी बचत गट तयार करून त्यातून त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणं, अशा अनेक योजनांतून गावातल्या विकासकामांना गती देणाऱ्या, नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील कोठी ग्रामपंचायतीतील गावांना विकासाच्या वाटेवर नेत परिवर्तनाची ज्योत पेटवणाऱ्या माडिया आदिवासी समाजातल्या भाग्यश्री लेखामी आहेत आजच्या दुर्गा.

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही वीज, रस्ते, पाणी, शिक्षण, बस यांसारख्या शहरवासीयांना सामान्य वाटणाऱ्या सोयीसुविधेसाठी आजही गडचिरोलीतील अनेक दुर्गम गावे प्रतीक्षेत आहेत. मात्र भामरागड तालुक्यातील कोठी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या नऊ गावांचा चेहरामोहरा  एका तरुणीने गेल्या पाच वर्षांत बदलून  टाकला आहे,  त्या आहेत भाग्यश्री मनोहर लेखामी. माडिया आदिवासी जमातीत जन्म घेतलेल्या भाग्यश्री यांना कोठी ग्रामपंचायतीच्या पहिल्या सरपंच होण्याचा मान मिळाला असून अनेक आव्हानांना तोंड देत  त्यांनी येथील गावांचा केलेला विकास अनेकांसाठी अभ्यासाचा विषय ठरला आहे.

गडचिरोली जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकावरील भामरागड तालुका आजही नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यातील कोठी मध्ये  १७ वर्षांनंतर पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक झाली. त्यात मारकनार येथे राहणाऱ्या माडिया समाजातील मुलीला तिथल्या ग्रामस्थांनी सरपंच म्हणून निवडून दिले, भाग्यश्रींनी मिळवलेला विजय हा फक्त निवडणुकीचा निकाल नव्हता, तर तो एका परंपरेविरुद्धचा आवाज होता.

हेही वाचा

अर्थात सरपंच झाल्यामुळे लगेच गावचे प्रश्न सुटणार नव्हते त्यासाठी सुधारणेची कळकळ आणि प्रत्यक्ष अहोरात्र काम करणं गरजेचं होतं. कोठी गावात वीज नव्हती, पावसाळय़ात रस्ते चिखलात गडप होत, आरोग्य केंद्रात डॉक्टर नव्हते, शाळा भग्नावस्थेत होत्या. जन्म-मृत्यू नोंदी ठेवण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. शिवाय बालविवाह आणि ‘कुर्माघर’(मासिक पाळीत स्त्रियांनी गावाबाहेरील झोपडीत राहायला जाणे) सारख्या प्रथा समाजात खोलवर रुजलेल्या होत्या.

अशा वातावरणात शारीरिक शिक्षणातील पदवी मिळवणाऱ्या, महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी गावाबाहेर पडलेल्या भाग्यश्री यांना आजूबाजूच्या प्रदेशाचा झालेला विकास खुणावत होता. त्यांनी लोकांशी थेट संवाद साधायला सुरुवात केली. तीच त्यांची ताकद ठरली. कारण प्रशासन आणि ग्रामस्थांमध्येही कामांच्या बाबतीत संवादाची मोठी दरी होती. प्रशासकीय अधिकाऱ्यांना विश्वासात घेत, अनेक शासकीय योजना समजून घेऊन त्यांनी विकासकामांना गती देण्याचे काम केले.

शासकीय योजनेच्या अंमलबजावणीच्या बाबतीत आज कोठी ग्रामपंचायत तालुक्यात  सर्वात पुढे आहे. सरकारच्या घरकुल योजनेबाबतीत सर्वात जास्त मंजूर आणि बांधकाम झालेली १७५ पेक्षा जास्त घरकुले कोठी ग्रामपंचायतीमध्ये आहेत. भाग्यश्रींनी केलेलं पहिलं मोठं काम म्हणजे गावात वीज आणणं. २०२१ मध्ये तीन गावांमध्ये वीज आल्यावर लोकांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास बसला. या यशानंतर त्यांनी एकामागून एक कामे हाती घेतली.

आधारकार्ड, रेशनकार्डसारखी कागदपत्रे मिळवून देणं, ग्रामपंचायतीत तरुणांना रोजगार देणं. पण खऱ्या अर्थाने ऐतिहासिक काम म्हणजे गावात बससेवा सुरू होणं. स्वातंत्र्यानंतर तब्बल ७६ वर्षांनी महामंडळाची पहिली बस मारकनार गावात दाखल झाली. त्या वेळी अनेकांच्या डोळय़ांत आनंदाश्रू उभे राहिले. कारण ती बस म्हणजे फक्त प्रवासाची सोय नव्हती, तर ते होतं प्रगतीच्या दिशेनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल.

भाग्यश्रींनी स्त्रियांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य दिलं. ‘कुर्माघर’ सारख्या प्रथेतून स्त्रियांना बाहेर काढलं. तसेच ‘सोनाली महिला बचत गट’ स्थापन क़ेला. तेंदू, बांबू, महुआसारख्या वनौपजांवर आधारित छोटे उद्योग तेथील स्त्रियांनी सुरू केल्यामुळे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं. याशिवाय ‘वनहक्क जनजागृती’मोहिमेमुळे प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या हक्काची शेतीची जमीन मिळाली. कोठीमध्ये आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आश्रमशाळा आधीपासून आहे, परंतु लोकांमध्ये त्याविषयी जनजागृती नव्हती. पक्के रस्ते नव्हते त्यामुळे नदी-नाले पार करून मुलं येऊ शकत नव्हती. मात्र शिक्षणाचं महत्त्व पालकांना पटवून देऊन, पक्क्या रस्त्यांची उभारणी केल्याने विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत दाखल करता आलं.

भाग्यश्रींची दृष्टी केवळ पायाभूत सुविधांपुरती मर्यादित नव्हती. त्यांनी माडिया संस्कृती जपत आधुनिक शिक्षणालाही चालना दिली. ‘उलगुलान फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी मुलांसाठी माडिया भाषेसोबत इंग्रजी व डिजिटल शिक्षणाची केंद्रे सुरू केली. ‘बाईमाणूस मीडिया रिसर्च फाउंडेशन’सोबत माडिया समाजाच्या परंपरा, गोटुल व्यवस्था, खानपान याचे दस्तऐवजीकरण केले. हे कार्य म्हणजे पुढील पिढय़ांसाठी संस्कृतीचा वारसा जपण्याचं महत्त्वाचं पाऊल ठरलं.

भाग्यश्रींच्या कामाची दखल केवळ स्थानिकच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली. निती आयोगाच्या ‘आकांक्षी ब्लॉक’ उपक्रमात त्यांनी गडचिरोलीचं प्रतिनिधित्व केलं. ‘टाटा स्टील फाउंडेशन’ने त्यांना ‘ट्रायबल लीडर फेलोशिप’ दिली तर ‘भारतीय छात्र संसदे’ने त्यांना ‘उच्चशिक्षित युवा सरपंच’ पुरस्कारानं गौरवलं. हे पुरस्कार म्हणजे त्यांच्या कामाची पोचपावती होय.

गडचिरोलीसारख्या मागासलेल्या भागात भाग्यश्री लेखामी यांनी दाखवलेला विकासाचा मार्ग हा फक्त एका गावापुरता मर्यादित नाही. तो संपूर्ण समाजासाठी आशेचा किरण आहे. आदिवासी संस्कृती जपत आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या कोठी ग्रामपंचायतच्या युवा सरपंच भाग्यश्री लेखामी यांना ‘लोकसत्ता’चा प्रणाम.

sspakalwar@gmail.com

संपर्क

bhagyashrilekhami@gmail.com





Source link

Video: “या घराला पेटवून…”, कामिनी करणार ‘ते’ कारस्थान अन् कमळी…; मालिकेत ट्विस्ट – Marathi News | Zee Marathi Kamali Upcoming Twist Kamini Will Do Conspiracy Kamali Will Be In Trouble Nsp 98

0
Video: “या घराला पेटवून…”, कामिनी करणार ‘ते’ कारस्थान अन् कमळी…; मालिकेत ट्विस्ट – Marathi News | Zee Marathi Kamali Upcoming Twist Kamini Will Do Conspiracy Kamali Will Be In Trouble Nsp 98



Video: “या घराला पेटवून…”, कामिनी करणार ‘ते’ कारस्थान अन् कमळी…; मालिकेत ट्विस्ट – Marathi News | Zee Marathi Kamali Upcoming Twist Kamini Will Do Conspiracy Kamali Will Be In Trouble Nsp 98 – Latest Television News at Loksatta.com





Source link

जीवनात सुख,शांती व समाधान प्राप्त करण्यासाठी धम्माच्या मार्गाने श्रोतापन्न होण्याचा प्रयत्न करा – भंते काश्यप

0
जीवनात सुख,शांती व समाधान प्राप्त करण्यासाठी धम्माच्या मार्गाने श्रोतापन्न होण्याचा प्रयत्न करा – भंते काश्यप

जीवनात सुख,शांती व समाधान प्राप्त करण्यासाठी धम्माच्या मार्गाने श्रोतापन्न होण्याचा प्रयत्न करा – भंते काश्यप

फलटण : भगवान बुद्धांनी दिलेला धम्म हा न्याय,नीती व सदाचारावरती आधारित असून त्याचा मूल आधार अनित्य, अनात्म व दुःख या तीन सिद्धांतावर आधारित आहे. तेव्हा समस्त मानव जातीला सुख समाधान व शांती हवी असेल तर धम्माचे विचार आत्मसात करून त्याचे आचरण केले तरच आपण श्रोतापन्न होऊन आपल्याला सुख, शांती व समाधान मिळणार आहे. असे पूज्य भंते काश्यप जी यांनी धम्मदेसना देताना सांगितले. ते भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने मौजे आरडगाव या ठिकाणी वर्षावास प्रवचन मालिकेचे पंधरावे पुष्प गुंफताना बोलत होते.

समता सैनिक दलाचे केंद्रीय असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु. दादासाहेब भोसले यांनी समता सैनिक दल,महार रेजिमेंट ची निर्मिती याविषयी मार्गदर्शन केले. समता सैनिक दलाच्या वतीने बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी भाष्य केले. महार रेजिमेंट ची स्थापना होण्यापूर्वी शिवकाळामध्ये आणि त्याच्याही अगोदर महार या लढवय्या जातीने कशा स्वरूपाचे योगदान दिले आहे याचे विश्लेषण ही त्यांनी केले. आपली चळवळ गतिमान होण्यासाठी समता सैनिक दल सक्षमपणे उभा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. येणाऱ्या काळातही सैनिकांचे शिबिर आयोजित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

तथागत भगवान गौतम बुद्धांनी विहाराची निर्मिती कशासाठी केली? आणि विहारामधून लोकांनी काय ज्ञान घ्यावे? याविषयी थोडसं मार्गदर्शन करणारे भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष महावीर भालेराव यांनी प्रत्येक रविवारी चला बुद्ध विहारी ही संकल्पना गीताच्या माध्यमातून मांडून उपस्थिताचे मन प्रसन्न करून प्रबोधन केले.
त्याचबरोबर ‘वर्षावास’ म्हणजे काय? फलटण तालुक्याचे महासचिव आयु. बाबासाहेब जगताप सर यांनी वर्षावासाचे महत्त्व सांगत असताना भगवान गौतम बुद्धांनी त्याची सुरुवात आषाढ पौर्णिमेला केली आणि अश्विन पौर्णिमेला त्याची समाप्ती झाली. यावर सुंदर प्रवचन दिले. यासोबत भारत सरकारच्या वतीने जून महिन्यामध्ये जनगणनेची माहिती देताना फलटण तालुक्याचे मार्गदर्शक अभ्यासू व्यक्तिमत्व आयु. सोमीनाथ घोरपडे सर यांनी उपस्थित बांधवांना पाली भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला असून आपण सर्वांनी प्रगनकांना अवगत असलेल्या भाषांमध्ये पाली भाषेची नोंद करण्याची सूचना केली. त्याचप्रमाणे धर्माच्या रखान्यात मध्ये बौद्ध व जातीच्या कॉलम मध्ये महार असा उल्लेख करण्याची सूचना दिली.

फलटण तालुक्यातील प्रत्येक घरात बौद्ध धम्म पोहोचला पाहिजे. अशी ज्याची मनोकामना आहे असे फलटण तालुक्याचे भूषण बौद्ध धम्माचे अभ्यासक व प्रचारक तथा नीतिमान जीवन जगणारे नेतृत्व आयु. तुषार मोहिते सर यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा धम्मग्रंथ भेट देण्यात आला. भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने सर्व उपस्थितांना संविधानाची उद्देशिका तसेच सूत्रपटनाची छोटी पुस्तक भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने देण्यात आली.

या कार्यक्रमासाठीआर पी आय (सातारा) चे युवक अध्यक्ष स्वप्नील अशोक गायकवाड , उपाध्यक्ष विजय येवले ,संजय निकाळजे माजी सरपंच अजित भोईटे, पोलिस पाटील अमित भोईटे, माजी सरपंच बाळकृष्ण भोईटे, शैलेश भोईटे, ग्रामसेवक गोरे मॅडम उपस्थित होत्या.संपूर्ण कार्यक्रम भीमगौरव तरुण मंडळ,माता रमाई महिला मंडळ या दोन्ही मंडळाच्या वतीने संपन्न झाला.पंचशील बुद्ध विहार अध्यक्ष प्रमोद काकडे, प्रकाश कदम, गौतम काकडे, बाळासाहेब काकडे, शिवाजी काकडे, सतीश काकडे, संतोष सुरेश काकडे, गणेश प्रकाश कदम, संतोष काकडे, निवृत्ती काकडे, आशा काकडे, रंजना काकडे, उत्तम काकडे व इतर सर्व काकडे परिवार यांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले.

सूत्रसंचालन फलटण तालुक्याचे कोषाध्यक्ष आयुष्यमान विठ्ठल निकाळजे सर यांनी केली.तर कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सातारा जिल्हा पूर्व विभागाचे प्रचार आणि पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु. दत्तात्रय खरात सर हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहून उपस्थित त्यांना शुभेच्छा देऊन श्रामणेर शिबिर या विहारातून घेण्याची सूचना केली. या कार्यक्रमासाठी संस्कार सचिव आयु. बजरंग गायकवाड सर, कार्यालयीन सचिव आयु. चंद्रकांत मोहिते सर, संघटक आयु. आनंद जगताप, प्रचार आणि पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु.रामचंद्र मोरे सर त्याचबरोबर बौद्ध उपासक सागर काकडे या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

बारामतीत कारच्या काचा फोडून ३ लाखांची रोकड लंपास – नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

0
बारामतीत कारच्या काचा फोडून ३ लाखांची रोकड लंपास – नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

बारामती : शहरात दिवसाढवळ्या गुन्हेगारी वाढत असल्याचे धक्कादायक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. भिगवण रस्त्यावर उभी असलेली कार फोडून त्यामधील तब्बल ३ लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. सोमवारी (दि. २२ सप्टेंबर) घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

संपत सोपान शिंगाडे (रा. काटेवाडी, ता. बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी बँक ऑफ इंडिया मधून तीन लाख रुपये काढून कारमध्ये ठेवले होते. त्यानंतर खरेदीसाठी दुकानात गेले असता अज्ञात चोरट्यांनी कारच्या काचा फोडून रोकड लंपास केली. घटनेनंतर त्यांनी तात्काळ बारामती शहर पोलिसांना माहिती दिली.

या संदर्भात पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. प्राथमिक तपासानुसार, हा प्रकार परप्रांतीय चोरट्यांकडून घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांत कारच्या काचा फोडून झालेली ही दुसरी चोरी असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

….तर RBI स्वत: ‘ती’ 10 कोटी बँक अकाऊंट करणार बंद; 30 सप्टेंबरपर्यंत दिलीये मुदत

0
….तर RBI स्वत: ‘ती’ 10 कोटी बँक अकाऊंट करणार बंद; 30 सप्टेंबरपर्यंत दिलीये मुदत


Jan Dhan account KYC: प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) 2014 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत बँकांनी आतापर्यंत 559 करोड लोकांनी खाती उघडली आहेत. दरम्यान, जन धन खातेधारकांसाठी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. जवळजवळ 10 कोटी जन धन खाती 10 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. आता त्यांना नव्यान केवायसी (Re-KYC) अपडेट करण्याची आवश्यकता आहे. बँकेच्या नियमांनुसार 10 वर्षांपेक्षा जुन्या सर्व खात्यांसाठी पुन्हा केवायसी आवश्यक आहे. 30 सप्टेंबर ही अंतिम तारीख आहे.

Add Zee News as a Preferred Source

सरकार 1 जुलै 2025 पासून देशभरात पंचायत स्तरावर एक विशेष केवायसी मोहीम म्हणजेच फायनान्शिअल इनक्लूजन सचुरेशन कॅम्पेन (Nationwide Financial Inclusion Saturation Campaign) राबवत आहे. खातेधारक या मोहिमेद्वारे त्यांचे पुन्हा केवायसी अपडेट करू शकतात. असं न केल्यास बँक तुमचे खाते बंद करू शकतं, ज्यामुळे सरकारी अनुदान मिळण्यास अडचणी येऊ शकतात.

Re-KYC म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे का आहे?

नव्याने केवायसी ही एक सोपी प्रक्रिया आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचे बँक तपशील जसं की तुमचं नाव, पत्ता आणि फोटो अपडेट करता. यामुळे फसवणूक टाळण्यास आणि बँकिंग सेवा सुलभतेने प्रदान करण्यास मदत होते. 2014-2015 मध्ये खातं उघडलेल्या खातेधारकांनी नव्याने केवायसी पूर्ण करणं गरजेचं आहे. कारण या खात्यांसाठी केवायसी वैधता 10 वर्षं आहे. खातं सक्रिय ठेवण्यासाठी हे करणं आवश्यक आहे. एका अहवालानुसार, आतापर्यंत अंदाजे 1 लाथ ग्रामपंचायतींमध्ये शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत आणि लाखो लोकांनी त्यांचे तपशील अपडेट केले आहेत.

काय आहे प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY)?

प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) ही देशातील प्रत्येक नागरिकाला, विशेषतः गरीब आणि ग्रामीण भागातील लोकांना बँकिंग सेवांशी जोडण्यासाठी एक विशेष सरकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत, शून्य बॅलन्ससह बँक खातं उघडता येतं, ज्यामध्ये बचत खाते, पैसे पाठवण्याची सुविधा, विमा आणि पेन्शन सारख्या सेवा उपलब्ध आहेत.

हे खातं कुठे आणि कसं उघडता येतं?

कोणीही कोणत्याही सरकारी किंवा खासगी बँकेच्या शाखेत किंवा बँक मित्राला भेट देऊन खाते उघडू शकतो. खाते उघडण्यासाठी किमान ठेवीची आवश्यकता नाही. याचा अर्थ तुम्ही शून्य बॅलन्ससह देखील खाते उघडू शकता.

जन धन योजनेचे फायदे

1)  ठेवींवर व्याज मिळते

2) 1 लाख रुपयांचा अपघात विमा कव्हर उपलब्ध आहे.

3) सामान्य परिस्थितीत 30 हजारांचा जीवन विमा उपलब्ध

4) खाते उघडताना किमान शिल्लक रक्कम आवश्यक नाही

5) सर्व सरकारी योजनांमधील निधी थेट खात्यात हस्तांतरित केला जातो

6) देशभरात पैसे पाठवण्याची सुविधा उपलब्ध 

7) खाते 6 महिने चालू ठेवल्यास 5 हजारांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध आहे.

8) पेन्शन आणि विमा यासारखे फायदे देखील उपलब्ध 

 

FAQ

1) कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो?
कोणताही भारतीय नागरिक, ज्याच्याकडे यापूर्वी बँक खाते नाही.
ग्रामीण आणि शहरी भागातील असंघटित कुटुंबे.
विशेषतः गरीब, कमी उत्पन्न गट, महिला, आदिवासी आणि दुर्गम भागातील लोक.

2) संयुक्त खाते उघडता येईल का?
नाही, पीएमजेडीवाय अंतर्गत फक्त वैयक्तिक खाती उघडली जातात. संयुक्त खात्यांना परवानगी नाही.

3) चेकबुक मिळते का?
होय, परंतु चेकबुक हवे असल्यास खातेदाराला बँकेच्या किमान शिल्लक नियमांचे पालन करावे लागेल. अन्यथा, मूलभूत खाते चेकबुकशिवाय असते.





Source link

इन्स्टाग्रामवर 50 व्ह्यूज द्या अन् एक ग्रॅम सोनं मोफत मिळवा; साताऱ्यातील दुकानाबाहेर महिलांची तुफान गर्दी अन् पोलिसांची एन्ट्री

0



Satara Gold offer news: इन्स्टाग्रामवर 50 व्ह्यूज द्या अन् एक ग्रॅम सोनं मोफत मिळवा; साताऱ्यातील दुकानाबाहेर महिलांची तुफान गर्दी अन् पोलिसांची एन्ट्री



Source link

अपुरी झोप घेणाऱ्यांची भविष्यात ‘हा’ भयानक आजार पाहतोय वाट; धक्कादायक रिसर्च समोर!

0
अपुरी झोप घेणाऱ्यांची भविष्यात ‘हा’ भयानक आजार पाहतोय वाट; धक्कादायक रिसर्च समोर!


Insufficient sleep: सध्याचं धावपळीचं युग, मोबाईलसह तंत्रज्ञानाचा वाढता वापर, घड्याळाच्या काट्यावर होणारी पळापळ यामुळे माणसांचं आयुष्यही वेगाने पळू लागलंय. याचा परिणाम आपल्या झोपेवर होतो आणि कळत नकळत आपल्या भविष्यावरही होतोय. चुकीची जीवनशैली आणि अपुऱ्या झोपेमुळे आपण गंभीर आजाराकडे स्वत:हून वाटचाल करतोय. एका संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आलीय. याबद्दल जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

अपुऱ्या झोपेचे गंभीर परिणाम 

अमेरिकेतील मेयो क्लिनिकच्या ताज्या संशोधनाने अपुऱ्या झोपेचे गंभीर परिणाम उघड केले आहेत. रात्री उशिरा झोपणे किंवा दीर्घकालीन निद्रानाशामुळे (क्रॉनिक इन्सोम्निया) केवळ दुसऱ्या दिवशी थकवा जाणवत नाही, तर मेंदूत बदल होऊन स्मृतिभ्रंशाचा (डिमेन्शिया) धोका वाढतो. या अभ्यासातून झोप आणि मेंदूच्या आरोग्याचा थेट संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संशोधनातून काय निघाला निष्कर्ष?

मेयो क्लिनिकने 50 वर्षांवरील 2750 व्यक्तींचा साडेपाच वर्षे अभ्यास केला. दरवर्षी त्यांची स्मरणशक्ती तपासली गेली आणि मेंदूचे स्कॅन केले गेले. यात दोन गंभीर बाबी समोर आल्या: मेंदूत साचणारे अमायलॉइड प्लॅक्स आणि व्हाईट मॅटर हायपरइंटेन्सिटीज नावाची सूक्ष्म हानी. या दोन्ही गोष्टी निद्रानाश असलेल्यांमध्ये स्मृतिभ्रंशाचा धोका 40% ने वाढवतात, असं आढळून आलं. 

मध्यमवयातच सावधगिरी आवश्यक

अभ्यासातील स्वयंसेवकांचे सरासरी वय 70 होते, परंतु इतर संशोधनांनुसार, 50च्या दशकात रोज सहा तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांना स्मृतिभ्रंशाचा धोका लक्षणीय वाढतो. यामुळे मध्यमवयातच झोप, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि व्यायामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. निद्रानाशामुळे प्रभावित व्यक्ती वयापेक्षा 4-5 वर्षांनी जास्त वयस्क दिसत असल्याचे आढळून आले आहे.

स्मरणशक्तीवर कसा होतोय परिणाम?

निद्रानाशाने ग्रस्त व्यक्तींची स्मरणशक्ती आणि विचारशक्ती सामान्य झोप घेणाऱ्यांच्या तुलनेत अधिक वेगाने ढासळल्याचे दिसून आले. अमायलॉइड प्लॅक्समुळे न्यूरॉन्सचे कार्य बिघडते, तर व्हाईट मॅटर हानीमुळे मेंदूतील संदेशवहन विस्कळीत होते. या दोन्हींचा एकत्रित परिणाम स्मृतिभ्रंशाचा धोका दुप्पट करतो, असे संशोधन सांगते.

झोपेचे मेंदूच्या आरोग्याशी नाते

मध्यमवय आणि त्यानंतरच्या काळात पुरेशी झोप मेंदूच्या कार्यक्षमतेशी जोडलेली आहे. निद्रानाशामुळे रक्तदाब आणि रक्तातील साखर वाढण्याचा धोका असतो, असे युके, चीन आणि अमेरिकेतील अभ्यासांतून दिसून आले. स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी मध्यमवयातच झोपेच्या सवयी सुधारणे आणि निरोगी जीवनशैली अंगीकारणे आवश्यक आहे.

FAQ 

अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा धोका कसा वाढतो?

उत्तर: मेयो क्लिनिकच्या संशोधनानुसार, दीर्घकालीन निद्रानाशामुळे (क्रॉनिक इन्सोम्निया) मेंदूत अमायलॉइड प्लॅक्स आणि व्हाईट मॅटर हायपरइंटेन्सिटीज नावाची सूक्ष्म हानी होते. यामुळे न्यूरॉन्सचे कार्य बिघडते आणि मेंदूतील संदेशवहन विस्कळीत होते, ज्यामुळे स्मृतिभ्रंशाचा धोका ४०% ने वाढतो. पुरेशी झोप न घेतल्याने स्मरणशक्ती आणि विचारशक्ती वेगाने ढासळते.

कोणत्या वयात झोपेची काळजी घेणे गरजेचे आहे?

उत्तर: संशोधनात असे दिसून आले की, ५०च्या दशकात रोज सहा तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांना स्मृतिभ्रंशाचा धोका लक्षणीय वाढतो. त्यामुळे मध्यमवयातच झोपेच्या सवयी सुधारणे, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणे आणि नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. यामुळे मेंदूचे आरोग्य टिकवता येते आणि स्मृतिभ्रंशाचा धोका कमी होतो.

झोप आणि मेंदूच्या आरोग्याचा संबंध कसा आहे?

उत्तर: झोप आणि मेंदूची कार्यक्षमता थेट जोडलेली आहे. निद्रानाशामुळे रक्तदाब आणि रक्तातील साखर वाढण्याचा धोका असतो, जे मेंदूच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. मध्यमवयात आणि त्यानंतर पुरेशी झोप घेतल्यास मेंदूतील हानी टाळता येते. युके, चीन आणि अमेरिकेतील अभ्यासांनुसार, निरोगी झोपेच्या सवयी स्मृतिभ्रंशाचा धोका कमी करण्यास मदत करतात.





Source link