Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 134

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’ची नोंदणी फलटण आरटीओत सुरू

0
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’ची नोंदणी फलटण आरटीओत सुरू

फलटण : राज्यभरातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा कवच देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या *‘धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळा’*ची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) सुरू झाली आहे. यासंदर्भात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटनेच्या सदस्यांसाठी नुकतेच विशेष मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.

प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रफुल्ल दिलीप संकुडे यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली. या मंडळाद्वारे रिक्षा व टॅक्सी चालकांना सन्मान निधी (६५ वर्षांवरील चालकांसाठी), जीवन व अपंगत्व विमा, आरोग्य सुविधा, कौशल्यविकास प्रशिक्षण, कर्तव्यावर असताना अपघात झाल्यास अर्थसहाय्य, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तसेच नवीन रिक्षा किंवा घर खरेदीसाठी कर्ज सुविधा असे विविध लाभ मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिबिरात मोटार वाहन निरीक्षक विशाल वसंत पाटील, आरटीओ कार्यालयातील कर्मचारी, तसेच रिक्षा संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरानंतर अनेक चालकांचे ऑनलाइन अर्ज अधिकाऱ्यांनी थेट मोबाईलवर भरून देत नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली.

फलटण तालुक्यातील सर्व रिक्षा व टॅक्सी चालकांनी या योजनेत मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रफुल्ल संकुडे यांनी केले.

विडणी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग : स्वच्छ भारत दिनानिमित्त भव्य श्रमदान उपक्रम

0
विडणी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग : स्वच्छ भारत दिनानिमित्त भव्य श्रमदान उपक्रम

फलटण ( विडणी ) │ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर रोजी ‘स्वच्छ भारत दिन’ साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने “स्वच्छता हीच सेवा” या मोहिमेअंतर्गत विडणी (ता. फलटण) येथे स्वच्छता श्रमदान अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानात ग्रामस्थांचा मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला गेला.

जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-2 मोहिमेचा शुभारंभ विडणीत करण्यात आला. गाव स्वच्छ व सुंदर बनविण्यासोबत ग्रामपंचायतींच्या कामगिरीचे मूल्यमापन करून कार्यक्षमता वाढविणे हा मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

या स्वच्छता अभियानात गावातील रस्ते, शाळा परिसर, मंदिरे, अंगणवाडी, गटारे व सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई करण्यात आली. तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले. या उपक्रमादरम्यान विडणी गावच्या लोकसंख्ये इतकीच देशी झाडे लावण्याचा संकल्प गावचे सरपंच सागर अभंग यांनी व्यक्त केला.

श्रमदान उपक्रमात सरपंच सागर अभंग, उपसरपंच सौ. मनीषा नाळे, पोलीस पाटील सौ. शितल नेरकर, ग्रामविकास अधिकारी अंकुश टेंबरे, ग्रामपंचायत सदस्य, उत्तरेश्वर विद्यालय व प्राथमिक शाळेचे शिक्षकवर्ग, अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, मंडळ पदाधिकारी, विद्यार्थी, महिला व युवक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

वाडा, कुडूस शहरात जिल्ह्याबाहेरील मोकाट श्वानांची दहशत; श्वानदंशाच्या घटनांत वाढ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

0
वाडा, कुडूस शहरात जिल्ह्याबाहेरील मोकाट श्वानांची दहशत; श्वानदंशाच्या घटनांत वाढ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण



  number of dogs has increased rapidly in Wada taluka वाडा, कुडूस शहरात जिल्ह्याबाहेरील मोकाट श्वानांची दहशत; श्वानदंशाच्या घटनांत वाढ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण





Source link

भारतात Weight Loss साठी शस्त्रक्रियांऐवजी औषधांना पसंती; फायदे, तोटे काय? A टू Z माहिती!

0
भारतात Weight Loss साठी शस्त्रक्रियांऐवजी औषधांना पसंती; फायदे, तोटे काय? A टू Z माहिती!


Weight Loss Trend in India: धावपळीचं आयुष्य, बदलेल्या खाण्यापिण्याच्या सवयी, लाईफस्टाइल यामुळे लठ्ठपणाचे प्रमाण वाढल्याचं दिसतंय. त्यामुळे भारतात वेट लॉसचा ट्रेण्ड आलेला दिसून येतो. झिरो फिगरच्या मागे पळणारेही यात सहभागी होतायत. दरम्यान भारतात लठ्ठपणा कमी करण्यासाठी औषधांचा वापर वाढताना दिसतोय. शस्त्रक्रियांऐवजी आता अनेकजण औषधांद्वारे वजन नियंत्रणाचा पर्याय निवडत आहेत. मात्र, या औषधांचा खर्च आणि दुष्परिणाम यामुळे अनेकांना उपचार अर्धवट सोडावे लागत आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

वाढता लठ्ठपणासाठी औषधांचा ट्रेंड

वाढता लठ्ठपणासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने महत्वाची माहिती दिली आहे. भारतात सुमारे 23% नागरिक लठ्ठपणाचा सामना करत आहेत. यात महिलांचे प्रमाण 24%, तर पुरुषांचे 22.9% आहे. गेल्या दोन दशकांत लठ्ठपणावरील शस्त्रक्रिया वाढल्या असल्या, तरी आता औषधांद्वारे वजन कमी करण्याकडे कल वाढला आहे विशेषतः तिशीतील तरुणांमध्ये हा कल अधिक दिसत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय.

औषधांचा खर्च परवडणारा?

वजन कमी करण्याच्या औषधांचा मासिक खर्च 12 हजार ते 15 हजार रुपये इतका येतो.  जो सामान्य नागरिकांना परवडणारा नाही. याउलट बारियाट्रिक शस्त्रक्रियेसाठी 3 ते 5 लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे अनेकजण शस्त्रक्रियेऐवजी औषधांचा पर्याय निवडतात, असंही अहवालातून समोर आलंय.

दुष्परिणाम काय?

या औषधांचा वापर करताना मळमळ, उलटी, जुलाब, पोटदुखी आणि गॅस यांसारखे दुष्परिणाम जाणवतात. काही प्रकरणांत डोळ्यांची तपासणीही आवश्यक ठरते. यामुळे नियमित वैद्यकीय देखरेख गरजेची असल्याचा सल्ला डॉक्टर देतात.

उपचार अर्धवट सोडण्याचे प्रमाण

डेन्मार्क आणि व्हिएन्नाच्या अभ्यासानुसार, या औषधांचा वापर करणाऱ्यांपैकी सुमारे 50% रुग्ण एका वर्षात उपचार सोडतात. यामागे खर्च आणि दुष्परिणाम ही प्रमुख कारणे आहेत. पण याचा रुग्णाच्या शरीरावर परिणाम होत असल्याचेही दिसून आले आहे. 

वजन कमी कसं करायचं?

वजन कमी करण्याचा ट्रेण्ड, त्यासाठी शस्त्रक्रिया, औषधोपचाराचा वाढता वापर याबद्दल आपण माहिती घेतली. पण मग वजन कमी कसं करायचं? असा प्रश्न अनेकांना पडतो. औषधांबरोबरच संतुलित आहार आणि नियमित व्यायाम केल्यास वजन कमी होण्याचा वेग वाढतो. तज्ज्ञांचा सल्ला आणि वैद्यकीय देखरेख यामुळे उपचार यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते, असे डॉक्टर सांगतात. 

FAQ

प्रश्न: भारतात वजन कमी करण्यासाठी औषधांचा वापर का वाढत आहे?

उत्तर: भारतात सुमारे २३% नागरिक लठ्ठपणाचा सामना करत असून, विशेषतः तिशीतील तरुणांमध्ये औषधांद्वारे वजन कमी करण्याचा कल वाढला आहे. बारियाट्रिक शस्त्रक्रियेचा खर्च (३-५ लाख रुपये) जास्त असल्याने अनेकजण तुलनेने स्वस्त असलेल्या औषधांचा पर्याय निवडतात.

प्रश्न: वजन कमी करण्याच्या औषधांचे दुष्परिणाम कोणते आहेत?

उत्तर: या औषधांचा वापर करताना मळमळ, उलटी, जुलाब, पोटदुखी आणि गॅस यांसारखे दुष्परिणाम जाणवू शकतात. क्वचित प्रसंगी डोळ्यांची तपासणी आवश्यक ठरते. त्यामुळे नियमित वैद्यकीय देखरेख घेणे महत्त्वाचे आहे.

प्रश्न: वजन कमी करण्याच्या औषधांचा खर्च आणि उपचार सोडण्याचे कारण काय?

उत्तर: या औषधांचा मासिक खर्च १२,००० ते १५,००० रुपये आहे, जो सामान्य नागरिकांना परवडणे कठीण आहे. अभ्यासानुसार, ५०% रुग्ण खर्च आणि दुष्परिणामांमुळे एका वर्षात उपचार सोडतात. संतुलित आहार आणि व्यायामासह वैद्यकीय सल्ला घेतल्यास उपचार यशस्वी होण्याची शक्यता वाढते.





Source link

ओढ्यात अर्धे बुडून आमरण उपोषण : बारामतीत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

0
ओढ्यात अर्धे बुडून आमरण उपोषण : बारामतीत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

बारामती (प्रतिनिधी) : बारामती शहरातील उत्कर्षनगर परिसरातील प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष राज कुमार व बाळासाहेब चव्हाण यांनी ओढ्याच्या साचलेल्या पाण्यात अर्धे बुडून आमरण उपोषण सुरू केले. या अनोख्या आंदोलनाने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे.

प्रमुख मागण्यांमध्ये उत्कर्षनगर येथील ओढ्यातील पाणी विसर्ग करणे, बारामतीत वाढत्या डेंग्यू सदृश्य रुग्णांवर नियंत्रण आणणे, पी. टी. गांधी यांनी केलेल्या अतिक्रमणांचे हटविणे तसेच उत्कर्षनगरकडे जाणाऱ्या ओढ्यावर कायमस्वरूपी पूल बांधण्याचा समावेश आहे.

या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, महिला आणि शाळकरी मुले मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला.

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: करायचे तुम्हालाच आहे; पण‎कर्ताकरविता वर बसला आहे‎

0
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:  करायचे तुम्हालाच आहे; पण‎कर्ताकरविता वर बसला आहे‎


  • Marathi News
  • Opinion
  • Pt. Vijayshankar Mehta’s Column, It Is Up To You To Do It; But The Doer Is Sitting On The Doer’s Lap

18 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

कुणाचेही संपूर्ण आयुष्य फुलांमध्ये व्यतीत होऊ शकत नाही. तुम्हाला‎काट्यांमध्येही जगता आले पाहिजे. कारण मानवी जीवन हे एक महाभारत‎आहे. एक महाभारत जे कधीही संपत नाही. फक्त अनंतच ते घडवून‎आणते. अनंत म्हणजे ईश्वर. महाभारतातील प्रत्येक पात्र कोणत्या ना‎कोणत्या प्रकारे त्रासलेले होते.

पण पांडवांनी आपल्याला एक गोष्ट‎शिकवली

आपण ईश्वराला धरून राहिले पाहिजे. कारण सर्वत्र काटे‎असले तरी आपणाला फक्त देवाकडूनच वसंत ऋतूच्या बागेची आशा‎करता येऊ शकते. जर आपण जगाकडून काही अपेक्षा करत असू, तर हे‎शक्य आहे की, हे काटे त्यांनीच पेरले असतील किंवा ते त्यांच्या स्वतः‎मार्गाच्या काट्यांमध्ये अडकलेले असू शकतात.

एका विशिष्ट‎मर्यादेपलीकडे कोण कुणाला मदत करेल? म्हणून, महाभारत म्हणजे‎फक्त युद्ध नाही, तर एक जीवनशैली आहे, ज्यामध्ये आपण सर्वकाही‎करतो. परंतु जो ते घडवून आणतो तो वर बसलेला आहे. आपली वृत्तीही‎तीच असली पाहिजे.



Source link

तलावांची जीवनवर्धिनी – Marathi News | Loksatta Durga Shalu Kolhe The Woman Who Revived Over 75 Dead Lakes In Gondia District Empowered Her Community Zws 70

0
तलावांची जीवनवर्धिनी – Marathi News | Loksatta Durga Shalu Kolhe The Woman Who Revived Over 75 Dead Lakes In Gondia District Empowered Her Community Zws 70


आपल्या समाजाला, गावाला विकासाच्या वाटेवर नेण्याचं स्वप्न त्यांना ‘फेलोशिप’ मिळवून देणारं ठरलं. त्या प्रशिक्षणातून ४३ गावांतील ७५ तलावांनी केवळ मोकळा श्वास घेतला नाही तर तेथील समाजाची आर्थिक उन्नतीही केली. जैवविविधतेत भर घालणाऱ्या २१४ पाणवनस्पतींची लागवड, ५९ माशांच्या जातींचे संवर्धन तसेच ‘माशांचं लोणचं’ व माशांना बाजारपेठ मिळवून दिल्याने ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. यासाठी अविश्रांत मेहनत घेणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील ‘जलकन्या’ शालू कोल्हे आहेत आजच्या दुर्गा.

मासेमारी क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत ४३ गावांतील सुमारे ७५च्या वर तलावांचे त्यांनी केलेले पुनरुज्जीवन, ५९ स्थानिक माशांच्या जातींचे केलेले संरक्षण व संवर्धन, तलावातील २१४ वनस्पतींचे पुनरुज्जीवन करून जैवविविधतेत घातलेली भर. नियमित रोजगार उपलब्ध करून दिल्यामुळे स्थानिक स्त्री-पुरुषांचा वाढलेला आत्मविश्वास या गोष्टींमुळे तेथील गावांचा कायापालट झाला आहे. ज्यांच्या अथक परिश्रमामुळे तलावांनी केवळ मोकळा श्वास घेतला नाही, तर आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या तेथील मासेमार समाजाची आर्थिक उन्नती होऊन त्यांचे जीवनमान उंचावलेे. तलाव जिवंत करणारी ‘जलकन्या’ अशी उपाधी मिळवणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातल्या निमगावच्या शालू जगदीश कोल्हे यांचे तलाव पुनरुज्जीवन कार्यातील योगदान मोलाचे ठरत आहे.

गोंदिया जिल्ह्यात मोरगाव अर्जुनी तालुक्यातील निमगाव हे एक गाव. गावात ९५ मासेमार कुटुंबं. मासेमारी हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन. माशांचे उत्पादन घटल्याने समाजाला आर्थिक चणचण जाणवत होती. पण, मार्ग सापडत नव्हता. त्याच वेळी नागपूर जिल्ह्यातील शालू लग्न होऊन निमगावात आल्या. सामाजिक उपेक्षा आणि स्त्रियांप्रती असलेला दुय्यम भाव शालू यांना खटकत होताच, आत्मसन्मानाची आणि सामाजिक उत्थानाची आस काहीतरी करून दाखविण्यास प्रेरित करत होती. त्याच वेळी ‘फाउंडेशन फॉर इकॉनॉमिक अँड एज्युकेशनल डेव्हलपमेंट’ (फीड) संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली.

हेही वाचा

२०१३-१४ मध्ये शालूंना ‘कोरो इंडिया’ची फेलोशिप मिळाली. तेथे घेतलेलं प्रशिक्षण त्यांना गावच्या विकासाचा मार्ग दाखवून गेलं. शालू यांच्या मार्गदर्शनाखाली कविता मौजे, सरिता मेश्राम यांच्यासह १६ स्त्रियांच्या गटाने तलावातील विविध प्रजातींचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला. गावच्या जाणत्या मंडळींची त्यासाठी मदत झाली. एकीकडे अस्ताव्यस्त आणि प्रचंड वाढणाऱ्या ‘बेशरम’ वनस्पतीचे संकट आणि दुसरीकडे बंगाली माशांचा उपद्रव यातून ‘मामा’ (या तलावांना माजी मालगुजारी म्हणतात.) तलावांचा श्वास कोंडला होता. हीच कोंडी फोडण्यासाठी ‘फीड’ संस्थेचे मनीष राजनकर, पतीराम तुमसरे आणि नंदलाल मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली गावातल्या लोकांना एकत्र करत श्रमदानाने गोंदिया जिल्ह्यातील ४५ ‘मामा’ तलावांचे शास्त्रीय पद्धतीने पुनरुज्जीवन करण्यात आले.

हेही वाचा

पावसाळ्याआधी तलावाची नांगरणी करून पाऊस पडल्यानंतर तेथे गाद, चिला, पाज, देवधान, पोवन, कमळ, चौरा, राजोली, खस आदी ११ प्रकारच्या पाणवनस्पतींची लागवड केली. त्यासाठी स्त्री व पुरुष दोघांनाही समान मजुरी दिली. या प्रयोगातून मासेमार समाजातील लोकांचे उत्पन्न वाढले आणि तलावही जैवविविधतेने समृद्ध झाले. बंगाली माशांऐवजी मुलकी (स्थानिक) माशांचे उत्पादन घेणं सुरू झालं त्यासाठी स्त्रियांना मासे पकडण्यापासून ते बाजारात विक्री करण्यापर्यंतचे प्रशिक्षण दिलं गेलं. सहा महिन्यांत मुलकी माशांची नुसती संख्या वाढली नाही तर त्या माशांचे विक्रमी उत्पादन झाले. पूर्वी जे मासे २०० ते ३०० ग्रॅमपेक्षा अधिक वाढत नव्हते, त्यातील एकेक मासा आता एक किलोपेक्षा अधिक वजनाचा मिळू लागला. मुख्य म्हणजे दुर्मीळ पाणभाज्या, कंद यांची चव लोकांना पुन्हा चाखायला मिळाली.

हेही वाचा

शालू यांनी त्यानंतर स्त्रियांना आर्थिक सक्षम करण्याचा चंगच बांधला. हळहळू त्यांनी ग्रामपंचायती गाजविल्या. तेथे स्त्रियांचे प्रश्न मांडले. सरकारी योजना खेचून आणल्या. दोन-तीन वर्षांतच तेथील महिला गटांनी पाणवनस्पतींची बीज बँक सुरू केली. एवढेच नाही तर माशांची नवी बाजारपेठही तयार झाली. नवे, दीर्घकाळ टिकणारे पदार्थ तयार केले जाऊ लागले. त्यातलं ‘माशांचं लोणचं’ सर्वाधिक लोकप्रिय आहे. गावाबाहेरच्या बाजारपेठांचा शोध सुरू झाला. मात्र ही वाट सोपी नव्हती. गाव आणि समाजातून त्यांच्या स्त्री-नेतृत्वाला प्रचंड विरोध झाला, मात्र पती जगदीश कोल्हे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्यामुळे त्या पाऊल पुढेच टाकत राहिल्या.

बारावी शिकलेल्या शालू यांनी जिऱ्या एवढ्या माशांच्या बीजाचं संगोपन करून नंतर ते तलावात टाकून मोठे केले. मात्र, त्यांची कुठे आणि कशी विक्री करायची हे मोठे आव्हानही त्यांनी समर्थपणे पेललं. शालू यांनी ४३ गावांतल्या १६-१६ स्त्रियांच्या २२ गटांना यासाठी प्रशिक्षित केलं. १२ गावांत १२ जैविक मित्र तयार केले. १२ मासेमारी सोसायटीमार्फत ७५ तलावांचं पुनरुज्जीवन केलं. त्यातील मासे आणि पाणवनस्पतींमुळे पहिल्याच वर्षी त्यांच्या ग्रामपंचायतीला दोन लाख ७५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळालं हे विशेष.

तलावांच्या संवर्धनाची धुरा पेलताना स्थानिक स्त्रियांमध्ये आत्मविश्वास, न्याय, हक्क आणि समान अधिकाराचं बीजारोपण शालू यांनी केलं. केवळ तलाव खोलीकरणाचा उपयोग नसून तेथील जैवविविधता, त्याद्वारे रोजगारनिर्मिती महत्त्वाची असते, असाही संदेश दिला. जैविक शेती, शेतीपूरक जोडधंदे निर्माण करून स्त्रियांबरोबरच गावांना विकासाच्या मार्गावर आणून सोडणाऱ्या शालू कोल्हे यांना ‘लोकसत्ता’चा प्रणाम. kavitanagapure@gmail.com





Source link

कोळकीचे ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे यांची राजे गटात घरवापसी

0
कोळकीचे ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे यांची राजे गटात घरवापसी

फलटण तालुका : कोळकी ग्रामपंचायत सदस्य गणेश दिनकर शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, अल्पावधीतच त्यांनी भाजपला रामराम ठोकत पुन्हा राजे गटाची वाट धरली आहे. या प्रवेशामुळे कोळकी ग्रामपंचायतीत भाजपमधून बाहेर पडून राजे गटात येण्यास सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश शिंदे यांनी राजे गटात घरवापसी केली. यावेळी डॉ. बाळासाहेब शेंडे, दत्तोपंत अण्णा शिंदे, राजेंद्र नाळे (चेअरमन, विविध कार्यकारी सोसायटी कोळकी), उपसरपंच डॉ. अशोक नाळे, सरपंच विक्रम भैया पखाले, अनिल कोरडे, दत्तात्रय नाळे, नवनाथ दंडिले तसेच कोळकीतील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

गणेश शिंदे यांच्या या निर्णयामुळे आगामी राजकीय समीकरणांमध्ये राजे गटाची ताकद वाढणार असल्याचे स्थानिक स्तरावर बोलले जात आहे.

विडणी गावात समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत महास्वच्छता व महाश्रमदान उपक्रम सुरू

0
विडणी गावात समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत महास्वच्छता व महाश्रमदान उपक्रम सुरू

विडणी (ता. फलटण) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025-26 अंतर्गत विडणी गावाने उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. या अभियानाचा शुभारंभ गुरुवार, दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते अकरा वाजता गावात “महास्वच्छता अभियान” व “महाश्रमदान” उपक्रमाने करण्यात आला.

या अंतर्गत गावातील ओढे, नाले, गटारे स्वच्छ करण्यासोबतच रस्त्यांची डागडुजी, मुरूम टाकणे, वाड्या-वस्त्या स्वच्छ ठेवणे यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. गाव हरित आणि आकर्षक बनवण्यासाठी “एक व्यक्ती-एक झाड” या उपक्रमाअंतर्गत ग्रामस्थांच्या लोकसंख्येनुसार देशी झाडे लावली जाणार आहेत.

या अभियानात महिला, युवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. शासनाच्या नियोजनानुसार गावाच्या प्रगतीसाठी आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी हा उपक्रम राबवला जात आहे.

राज्य शासनाने 6 ऑगस्ट 2025 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार पंचायत राज विभागाने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. याचा उद्देश जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढवून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देणे हा आहे.

लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी ग्रामस्थांना आवाहन केले की – “आपले विडणी गाव या अभियानात सहभागी झाले असून सर्वांनी एकदिलाने योगदान देऊन गाव स्वच्छ, सुंदर आणि हरित बनवावे.”


चिंताजनक…! पुण्यात हजार मुलांच्या जन्मामागे ९११ मुलींचा जन्म, माहिती अधिकारातून धक्कादायक माहितीसमोर – Marathi News | 911 Girls Are Born For Every 1000 Boys Born In Pune Shocking Information Revealed Through Right To Information Svk 88 Ssb 93

0
चिंताजनक…! पुण्यात हजार मुलांच्या जन्मामागे ९११ मुलींचा जन्म, माहिती अधिकारातून धक्कादायक माहितीसमोर – Marathi News | 911 Girls Are Born For Every 1000 Boys Born In Pune Shocking Information Revealed Through Right To Information Svk 88 Ssb 93



चिंताजनक…! पुण्यात हजार मुलांच्या जन्मामागे ९११ मुलींचा जन्म, माहिती अधिकारातून धक्कादायक माहितीसमोर – Marathi News | 911 Girls Are Born For Every 1000 Boys Born In Pune Shocking Information Revealed Through Right To Information Svk 88 Ssb 93 – Latest Pune News at Loksatta.com





Source link