Monday, July 6, 2026
Home Blog Page 117

फलटण नगरपरिषदेच्या मतदार यादीवरील हरकतीस सुनावणी

0
फलटण नगरपरिषदेच्या मतदार यादीवरील हरकतीस सुनावणी

फलटण प्रतिनिधी : फलटण नगरपरिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रकाशित झालेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर अनेक मतदार आणि हरकतदारांनी आक्षेप नोंदवले आहेत. या हरकतींची शहानिशा करण्यासाठी आणि संबंधितांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यासाठी सुनावणी आयोजित करण्यात आली आहे.

सुनावणी २७ ऑक्टोबर (सोमवार) आणि २८ ऑक्टोबर (मंगळवार) २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, फलटण येथे होईल.

वेळापत्रकानुसार:

  • २७ ऑक्टोबर (सोमवार)
    • सकाळी ९ ते दुपारी १२: प्रभाग क्रमांक १ ते ३
    • दुपारी २ ते ५: प्रभाग क्रमांक ४ ते ६
  • २८ ऑक्टोबर (मंगळवार)
    • सकाळी ९ ते दुपारी १२: प्रभाग क्रमांक ७ ते ९
    • दुपारी २ ते ५: प्रभाग क्रमांक १० ते १३

ज्या मतदारांनी किंवा हरकतदारांनी प्रारूप मतदार यादीवर आक्षेप नोंदवला आहे, त्यांनी नमूद वेळेनुसार आणि ठिकाणी उपस्थित राहावे. आपले म्हणणे मांडताना योग्य कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक आहे.

जर हरकतदार सुनावणीस अनुपस्थित राहतील, तर त्यांचे यावर काहीही म्हणणे नाही असे मानून नियमांनुसार निर्णय घेण्यात येईल, असे फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी जाहीर केले आहे.

सुनावणीचे ठिकाण: उपविभागीय अधिकारी यांचे दालन, उपविभागीय अधिकारी कार्यालय, फलटण.

फलटण नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र. १२ मधून विकास काकडे यांची नगरसेवक पदासाठी उमेदवारी

0
फलटण नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र. १२ मधून विकास काकडे यांची नगरसेवक पदासाठी उमेदवारी

फलटण (प्रतिनिधी):फलटण शहराच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले श्री. विकास वसंतराव काकडे यांनी येणाऱ्या फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२ मधून नगरसेवक पदासाठी इच्छुक असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिक्षणातून समाजनिर्मितीचा आदर्श
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मालोजीराजे शेती विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज येथे उपमुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना काकडे सरांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. शिक्षणाद्वारे समाजातील सकारात्मक बदल घडवणे, मूल्यसंस्कार निर्माण करणे आणि सामाजिक जाण वाढवणे हे त्यांचे ध्येय राहिले आहे.

सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व
काकडे सरांनी समाजकारणाशी घट्ट नातं राखत विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती आणि छत्रपती संभाजी महाराज जयंतीसारख्या प्रसंगी समाजभावना वृद्धिंगत करणारे कार्यक्रम त्यांनी यशस्वीपणे आयोजित केले आहेत. फलटण शहरात बुद्ध जयंती मिरवणुकीची परंपरा सुरू करण्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाची मोलाची भूमिका राहिली आहे.

कामातून विश्वास निर्माण करणारे नेतृत्व
विकास काकडे हे संयमी, विनम्र आणि सर्व घटकांशी स्नेहाने वागणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. “कामातून विश्वास” या तत्त्वावर ते कार्य करतात. शिक्षक, युवक, महिला आणि नागरिकांच्या प्रश्नांबाबत ते नेहमी तत्पर असतात. त्यामुळे त्यांच्या भोवती विश्वासाचं वर्तुळ निर्माण झालं असून नागरिक त्यांच्याकडून प्रभागाच्या प्रगतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत.

प्रभाग क्र. १२ ला प्रामाणिक नेतृत्वाची गरज
फलटण नगरपरिषद प्रभाग क्रमांक १२ मध्ये शिक्षण, रस्ते, आरोग्य, स्वच्छता आणि युवकांसाठी सुविधा यांचा विकास करण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर अनुभव, विचार आणि कार्यनिष्ठा असलेले नेतृत्व आवश्यक असून नागरिकांनी विकास काकडे यांना या भूमिकेसाठी योग्य उमेदवार म्हणून पुढे केले आहे.

नागरिकांचा विश्वास आणि एकमुखी पाठिंबा
प्रभागातील नागरिक म्हणतात की, काकडे सर हे सर्वसामान्यांचा आवाज आहेत. शिक्षण, समाजकार्य आणि प्रामाणिकपणाचा सुंदर संगम त्यांच्या कामात दिसतो. प्रभाग क्रमांक १२ मधून नगरसेवकपदासाठी त्यांना उमेदवारी मिळावी, ही आमची एकमुखी मागणी आहे.

फलटणसाठी नवा अध्याय
प्रभाग क्र. १२ मधून विकास काकडे यांची उमेदवारी ही शिक्षण, संस्कृती आणि समाजकारण यांचा संगम घडवणाऱ्या सक्षम नेतृत्वाची सुरुवात ठरेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या अनुभव आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे फलटणच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल.

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलीस निरीक्षक गोपाळ बदने शरण

0
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलीस निरीक्षक गोपाळ बदने शरण

फलटण प्रतिनिधी : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस निरीक्षक गोपाळ बदने अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. घटनेनंतर तो फरार झाला होता, मात्र २५ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा फलटण पोलीस ठाण्यात त्याने शरणागती पत्करली आहे.

या प्रकरणात महिला डॉक्टरला त्रास दिल्याप्रकरणी घरमालक प्रशांत बनकर याला सकाळी पोलिसांनी अटक केली आहे.

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने पोलीस निरीक्षक गोपाळ बदने आणि घरमालक प्रशांत बनकर यांच्यावर आरोप करत सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत बदने याला निलंबित केले होते.

आत्महत्येनंतर दोघेही आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी बदनेचा शोध सुरू ठेवला असताना त्याचे शेवटचे मोबाईल लोकेशन पंढरपूर परिसरात आढळले होते. अखेर तो रात्री उशिरा पोलीस ठाण्यात शरण आला.

दरम्यान, या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असून आमदार धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

फलटणमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेकडो कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ : खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर

0
फलटणमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेकडो कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ : खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर

फलटण (प्रतिनिधी) – फलटण शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार, दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता शेकडो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण, उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाची माहिती मा. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली.

या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आगामी नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार नाईक-निंबाळकर यांनी सांगितले की मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या भेटीनंतर फलटण तालुक्यातील विरोधी गटाचा सुफडा साफ होईल. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

फलटण तालुक्यातील प्रमुख विकास प्रकल्प
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते फलटण शहर व तालुक्यातील खालील महत्त्वाच्या विकासकामांचा शुभारंभ होणार आहे – निरा–देवघर प्रकल्पातून उतरवलेली खंडाळा–धोम–बलकवडी कालवा जोड योजना अंतर्गत बंद पाईपलाईनद्वारे या योजनेचे उद्घाटन आणि पुढील टप्प्याचे भूमिपूजन, नाईकबोमवाडी एमआयडीसी प्रकल्पांतर्गत औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी भूमिपूजन, दहिवडी–फलटण रस्त्याचे भूमिपूजन, फलटण शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या इमारतींचे उद्घाटन, १०० कोटींच्या महसूल प्रशासकीय इमारती आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन, निरा उजवा कालवा सुशोभीकरण प्रकल्प, ८५ कोटींच्या काँक्रीट रिंग रोडचे उद्घाटन तसेच सेशन कोर्ट आणि महसूल भवनाच्या इमारतींचे भूमिपूजन होणार आहे.

या सर्व प्रकल्पांमुळे फलटण तालुक्याचा विकासाचा वेग वाढणार असून औद्योगिक, प्रशासकीय आणि पायाभूत सुविधांना नवे बळ मिळणार आहे.

राजकीय पार्श्वभूमी आणि निवडणूकपूर्व समीकरणे
या दौऱ्याला राजकीय दृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी भाजपकडून ही सभा शक्तीप्रदर्शनाचे रूप घेणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या विकास प्रकल्पांच्या उद्घाटनामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल आणि निवडणूक प्रचाराचा नारळ या कार्यक्रमातून फोडला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

खासदार नाईक-निंबाळकर यांनी या कार्यक्रमाचा उल्लेख करताना म्हटले आहे की, फलटणचा विकास आता नवे वळण घेणार आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या दौऱ्यानंतर राजे गटाचा सुफडा साफ होईल.

भाजपमध्ये नव्या चेहऱ्यांचा प्रवेश होण्याची शक्यता
या दौऱ्यादरम्यान भाजपमध्ये काही नव्या नेत्यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. काही प्रमुख नेते आणि कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू असून या दौऱ्यामुळे स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची चिन्हे आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विशेष घोषणांकडे सर्वांचे लक्ष
मुख्यमंत्री फडणवीस फलटण तालुक्यासाठी काही विशेष घोषणा करतील का, याकडे नागरिकांचे आणि राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. फलटणच्या विकासासाठी नवीन प्रकल्प किंवा निधी जाहीर होण्याची शक्यता असून या निर्णयांचा थेट परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

सातारा जिल्ह्याचे लक्ष फलटणकडे
या दौऱ्यामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष फलटणकडे लागले आहे. विकासकामांचा उत्सव आणि राजकीय शक्तीप्रदर्शन या दोन्हींचा संगम असलेल्या या दौऱ्यातून भाजपकडून पुढील निवडणुकीच्या रणनीतीचा स्पष्ट संदेश दिला जाण्याची अपेक्षा आहे.

LIC पॉलिसीधारकांचे 33000000000 रुपये अदानी ग्रुपला दिले; अमेरिकेच्या मीडिया रिपोर्टमुळे जगात खळबळ

0
LIC पॉलिसीधारकांचे 33000000000 रुपये अदानी ग्रुपला दिले; अमेरिकेच्या मीडिया रिपोर्टमुळे जगात खळबळ


LIC To Gave Rs 33000 Crore To Adani Group :   एलआयसीने 30 कोटी पॉलिसीधारकांचे पैसे अदानी समूहाला फायदा देण्यासाठी वापरले असा आरोप काँग्रेसने शनिवारी केला. अदानी समूहाबाबत मोदी सरकारवरचे आरोप अधिक तीव्र करत काँग्रेसने दावा केला की एलआयसीने पॉलिसीधारकांचे सुमारे 33,000 कोटी रुपये गुंतवून अदानी समूहाला फायदा करून दिला. अदानी समूहात एलआयसीचा सहभाग असल्याचा आरोप करणाऱ्या वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्ताचे भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) खंडन केले आहे. अहवालात असा आरोप करण्यात आला आहे की सरकारी अधिकाऱ्यांनी मे महिन्यात विमा कंपनीला अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये 33,000 कोटी गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यासाठी एक योजना आखली होती. 

Add Zee News as a Preferred Source

एलआयसीने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांचे गुंतवणूक निर्णय बाह्य घटकांमुळे प्रभावित होतात हा दावा “खोटा, निराधार आणि सत्यापासून दूर आहे.” एलआयसीने म्हटले आहे की विमा कंपनीने कधीही असा कोणताही प्रस्ताव किंवा कागदपत्र तयार केले नाही.  एलआयसीने पुढे म्हटले आहे की गुंतवणूकीचे निर्णय स्वतंत्रपणे घेतले जातात, बोर्डाने मंजूर केल्यानुसार आणि नियमांनुसार. अशा निर्णयांमध्ये अर्थ मंत्रालय किंवा इतर कोणत्याही संस्थेची कोणतीही भूमिका नाही. 

अदानींबाबत एलआयसीवर कोणते आरोप होते? 

वॉशिंग्टन पोस्टने वृत्त दिले आहे की, बंदरांपासून ते ऊर्जेपर्यंत व्यवसाय करणाऱ्या अदानी समूहावर कर्जाचा डोंगर कोसळला होता आणि अमेरिकेत चौकशी सुरू होती, अशा वेळी अर्थ मंत्रालयाने मे महिन्यात एलआयसीच्या अदानी समूहात अंदाजे 3.9 अब्ज गुंतवणूक करण्याच्या प्रस्तावाला त्वरित मान्यता दिली. पोस्टने वृत्त दिले आहे की मे 2025 मध्ये, अदानी पोर्ट्स अँड सेझने 15 वर्षांच्या नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर (एनसीडी) द्वारे 7.75% कूपन दराने 5,000 कोटी रुपये उभारले, ज्याचे पूर्णपणे एलआयसीने सदस्यत्व घेतले होते. एपीएसईझेडने गुंतवणूकदारांच्या विश्वासाचे स्रोत म्हणून त्यांची “मजबूत आर्थिक स्थिती” आणि “एएए/स्थिर देशांतर्गत रेटिंग” उद्धृत करून या समस्येचे समर्थन केले. 

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या अहवालाचा हवाला देत सरकारवर या गटाला प्राधान्य देत असल्याचा आरोप केला. जून 2025 मध्ये एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी व्यवस्थेवर टीका करत म्हटले होते की, “पैसे, पॉलिसी, प्रीमियम तुमचे आहेत. सुरक्षा, सुविधा, नफा हे अदानीचे आहेत!” या घटनेने कॉर्पोरेट-सरकारी संबंधांवर आणि मोठ्या व्यावसायिक घराण्यांबद्दल कथित पक्षपातीपणावर वाद निर्माण झाला.

एलआयसीने  आपल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी योग्य काळजी घेण्याचे सर्वोच्च मानक सुनिश्चित केले आहेत आणि त्यांचे सर्व गुंतवणूक निर्णय विद्यमान धोरणे, कायद्यातील तरतुदी आणि नियामक मार्गदर्शक तत्त्वांनुसार आहेत आणि सर्व भागधारकांच्या हितासाठी घेतले आहेत.  देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीने म्हटले आहे की अहवालात केलेले आरोप एलआयसीच्या सुस्थापित निर्णय प्रक्रियेला हानी पोहोचवण्यासाठी आणि भारतातील आर्थिक क्षेत्राचा मजबूत पाया असलेल्या तिची प्रतिष्ठा आणि प्रतिमा खराब करण्यासाठी आहेत.

 





Source link

पूर्वीच्या भांडणाचा राग मनात, सिनेस्टाईलने पाठलाग करत साताऱ्यात एकाची हत्या, आरोपी फरार 

0



Satara : साताऱ्यातून (Satara ) आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सिनेस्टाईलने पाठलाग करत एकाचा खून करण्यात आला आहे.  कराडला पूर्व वैमनस्यातून एकाचा खून झाल्याची घटन घडली आहे. जखिनवाडी येथील एकाचा खून झाला असून, हल्लेखोर फरार आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन केली हत्या

साताऱ्यातील कराड तालुक्यात नांदलापूर गावच्या हद्दीत पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून  दोन दुचाकीवरून आलेल्या तिघांनी सिनेस्टाईल एकाचा पाठलाग करून कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये जखिणवाडी येथील प्रवीण बोडरे यांचा मृत्यू झाला आहे. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून दोन दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी प्रवीण बोडरे यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर प्रवीण बोडरे हा मुख्य रस्त्यावर दुचाकी सोडून एका बोळात पळाला. मात्र त्या बोळात पुढील बाजूने आणि मागील बाजूने हल्लेखोरांनी त्याला घेरले आणि त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला.

पोलिसांकडून संशयताचा शोध सुरू

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी डीवायएसपी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. दरम्यान, पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन ही हत्या झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून संशयताचा शोध सुरू आहे.

बुलढाणा जिल्ह्यातही एक धक्कादायक घटना, शेगावमध्ये एका भोकसून हत्या 

बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेगाव शहरातील चिंच परिसरात थोड्याच वेळापूर्वी युवकाची भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. नितीन गायकवाड असं या हत्या करण्यात आलेल्या युवकाच नावं आहे. तो मूळचा वाशीम येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र त्याची हत्या कुणी व कशासाठी केली याचा शोध आता शेगाव शहर पोलीस घेत आहेत. शेगाव शहरात धक्कादायक घटना घडली आहे. शहरात एका युवकाची हत्आ करण्यात आली आहे. दिवाळीच्या सुट्यामुळे लाखो भविकांची शेगावमध्ये गर्दी असल्याने भविकांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे. दरम्यान, या युवकाची हत्या नेमकी का झाली? कोणी केली? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. दरम्यान,  पुढील तपास शेगाव शहर पोलीस करत आहेत. 

महत्वाच्या बातम्या : 

धक्कादायक! शेगावमध्ये युवकाची भोकसून हत्या, परिसरामध्ये भीतीचं वातावरण, आरोपीचा शोध सुरु 

आणखी वाचा



Source link

फलटणची बदनामी असह्य ; न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही” — श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर

0
फलटणची बदनामी असह्य ; न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही” — श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर

फलटण :- फलटण तालुक्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली असून, या प्रकाराचा मी तीव्र धिक्कार करतो, अशी भूमिका विधान परिषदेचे माजी सभापती आणि आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मांडली.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या न्यायबुद्धीवर माझा पूर्ण विश्वास आहे. परंतु या घटनेमुळे सातारा जिल्ह्याची आणि फलटण तालुक्याची मोठी बदनामी झाली आहे,” असे ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

रामराजे पुढे म्हणाले, “एक काळ असा होता की अधिकारी फलटणला येण्यासाठी धडपड करीत होते. पण आता परिस्थिती अशी झाली आहे की ‘फलटण नको रे बाबा!’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. सत्ताबदल होताच अशा दुर्दैवी घटनेने फलटणची प्रतिमा डागाळली.”

घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी निराशा व्यक्त केली असल्याचे सांगून त्यांनी म्हटलं, “त्यांनी खचून जाऊ नये. आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.”

“या घटनेमुळे शासनाची प्रतिमा मलिन झाली आहे. मला यात राजकारण करायचे नाही. सर्व तपास पारदर्शक व्हावा. सीडीआरमधून सत्य बाहेर येईल आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी,” असेही श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले.


फलटण हादरले! महिला डॉक्टरच्या आत्महत्याप्रकरणात PSI गोपाल बदने अद्याप फरार; प्रशांत बनकर अटकेत

0
फलटण हादरले! महिला डॉक्टरच्या आत्महत्याप्रकरणात PSI गोपाल बदने अद्याप फरार; प्रशांत बनकर अटकेत

फलटण – उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या डॉक्टरने आपल्या हातावर लिहून PSI गोपाल बदने याने चारवेळा बलात्कार केल्याचे, तसेच प्रशांत बनकर याने शारीरिक व मानसिक अत्याचार केल्याचे नमूद करत आत्महत्या केली होती.

महिला डॉक्टर राहत असलेल्या घराचा मालक प्रशांत बनकर याला पोलिसांनी पहाटे ४ वाजता अटक केली आहे. तो आपल्या मित्राच्या पुण्यातील एका फार्महाऊसवर लपला होता. पोलिसांनी दोन पथके तयार करून शोधमोहीम हाती घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी PSI गोपाल बदने अजूनही फरार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर त्याला निलंबित करण्यात आले असले तरी, पोलिसांना त्याचा मागोवा घेण्यात अद्याप यश आलेले नाही.

या घटनेनंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली असून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका होत आहे. पोलीस विभाग आणि आरोग्य विभागावरही अनेक आरोप होत आहेत.

पोलिसांच्या तीन ते चार पथकांकडून गोपाल बदनेच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत. उद्या, २६ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटण दौऱ्यावर येणार असून त्यांच्या आगमनापूर्वी गोपाल बदने याला अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.

नराधमांना कडक शासन व्हावे; खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा” — माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

0
नराधमांना कडक शासन व्हावे; खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा” — माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटण : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने पोलिसांच्या कथित त्रासामुळे आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण फलटण हादरले आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

नाईक निंबाळकर म्हणाले, “या महिला भगिनीने का आत्महत्या केली याचा तपास सखोलपणे व्हावा. त्या महिला डॉक्टरचा तसेच संबंधित दोन्ही पोलिसांचा मोबाईल चॅटिंग आणि सीडीआर रिपोर्ट तपासला गेला, तर अधिक सत्य बाहेर येईल. फलटणमध्ये घडलेली ही घटना कोणाच्याही मनाला वेदना देणारी आहे. ज्यांच्या पायी आत्महत्या झाली त्या नराधमांना कडक शासन व्हावे.”

तसेच त्यांनी पुढे सांगितले की, या घटनेचा खटला विशेष पथक नेमून फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची गरज आहे, जेणेकरून सर्व आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होईल आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत.

फलटण शहरात या घटनेमुळे संतापाचे वातावरण असून, नागरिक न्याय मिळावा अशी मागणी करत आहेत.

फलटणच्या डॉक्टर तरुणीला पोलिसांनी कसं छळलं, शेवटचा कॉल कोणाचा? स्टार्ट टू एंड स्टोरी

0



Satara Crime: फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आत्महत्येपूर्वी या महिला डॉक्टरने (Phaltan Doctor) आपल्या हातावर काही मजकूर लिहला होता. यामध्ये तिने पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने (Gopal Badne) यांनी आपल्यावर चारवेळा बलात्कार केल्याचे म्हटले होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर हे प्रकरण नेमके काय आहे, याबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते.  (Satara Doctor Suicide News)

पिडीत महिला डॉक्टर आणि फलटण पोलिसांमधे गेल्या काही महिन्यांपासून खटके उडत होते. याच कारणामुळे एकमेकांच्या तक्रारी प्रशासकीय पातळीवर करण्यात आल्या होत्या . फलटण पोलीस अटक केलेल्या आरोपींना त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी फलटणच्या शासकीय रुग्णालयात घेऊन यायचे तेव्हा पोलीसांना हवे तसे आरोपींचे वैद्यकीय अहवाल संबंधित महिला डॉक्टरकडून मिळत नसल्याने हे खटके उडत होते. यामधून संबंधित महिला डॉक्टरची तक्रार फलटणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल महाडिक यांनी सातारच्या जिल्हा आरोग्य विभागाकडे केली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने संबंधित महिला डॉक्टरची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीसमोर या महिला डॉक्टरने स्वतःची बाजू लेखी स्वरुपात मांडली होती ज्यात पोलीस अधिकाऱ्यांवर अनेक गंभीर आरोप करण्यात आलेत आणि त्याचबरोबर खासदारांचा फोन आल्याचा आणि तुम्ही बीडच्या असल्याने पोलीसांना हवे तसे फिटनेस सर्टीफीकेट देत नसल्याचा आरोप खासदारांनी केल्याचा उल्लेख आहे.

Satara News: नेमकं प्रकरण काय?

* 31 जुलै २०२५ ला फलटण पोलीस एका आरोपीला वैद्यकीय चाचणीसाठी फलटण रुग्णालयात घेऊन आले असता स़ंबंधित महिला डॉक्टरने त्या आरोपीचे ब्लड प्रेशर वाढलेले असल्याने त्या आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात भरती करुन घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्या आरोपीला लवकरात लवकर आपल्या ताब्यात देण्यात यावे यासाठी फलटण पोलीस आग्रही होते. 
* त्यानंतर पोलीस निरिक्षक अनिल महाडीक यांनी संबंधित महिला डॉक्टरची तक्रार वैद्यकीय विभागाकडे केली. 
* त्यानंतर फलटण पोलीस मल्हारी चव्हाण आणि स्वप्नील जाधव या दोन आरोपींना वैद्यकिय चाचणीसाठी घेऊन आले असता संबंधित महिला डॉक्टरने मल्हारी चव्हाणला टु डी इको टेस्ट करण्यासाठी सातारला पाठवण्याचा निर्णय  दिला तर स्वप्नील जाधवची वैद्यकीय चाचणी केली.
*खासदारांचे दोन पी एस आले आणि त्यांनी खासदारांशी बोलणे करुन दीले. तुम्ही बीडचे असल्याने फीटनेस सर्टीफीकेट देत नाही असा आरोप खासदारांनी केला.
* इलेक्ट्रीक डीपी चोरीतील आरोपी ऊसतोड मुकादमाला अनफीट सर्टीफीकेट दीले. त्यामुळे पोलीस चीडले.
* 16 जुलै 2024 ला लक्ष्मी खरात या महिला आरोपीला फिटनेस सर्टिफिकेट देण्यावरुन वाद.
* गोपाळ बदने इमर्जन्सी विभागात येऊन खुर्चीवर बसुन धमकी द्यायचा.
* डॉक्टर धुमाळ यांना वारंवार सांगुनही दखल नाही.

Satara Doctor Suicide: फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेवर बीडमध्ये मूळगावी अंत्यसंस्कार

फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरवर शुक्रवार रात्री उशीरा मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या डॉक्टरने भाऊबीजेच्या दिवशी फलटणमधील एका नामांकित हॉटेलच्या बंद खोलीत रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली होती. याप्रकरणात पोलीस निरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या महिला डॉक्टरच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर अखेर आठ तासानंतर डॉक्टर महिलेवर वडवणी तालुक्यातील कवडगाव बुद्रुक गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आणखी वाचा

सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरण; अंबादास दानवेंनी भाजपच्या रणजित निंबाळकरांचं नाव घेतलं, चुकीची कामं करत असल्याचा आरोप

आणखी वाचा



Source link