Monday, July 6, 2026
Home Blog Page 116

Colon cleansing remedies : बद्धकोष्ठतेचा जुना त्रास, आतड्यांमधील मल खेचून बाहेर काढेल प्रेमानंद महाराजांचा ‘हा’ उपाय

0
Colon cleansing remedies : बद्धकोष्ठतेचा जुना त्रास, आतड्यांमधील मल खेचून बाहेर काढेल प्रेमानंद महाराजांचा ‘हा’ उपाय


निरोगी शरीर राखण्यासाठी, पोट स्वच्छ ठेवणे आणि शरीर हलके ठेवणे महत्वाचे आहे. बद्धकोष्ठता किंवा पोटदुखी मनाला चिडचिडे बनवू शकते आणि कोणत्याही कामात रस कमी करू शकते. कोणत्याही प्रकारच्या पोटदुखीला हलके घेऊ नये, कारण बहुतेक आजार येथूनच उद्भवतात. जर तुम्ही जड जेवण खाल्ले तर तुम्ही ही सवय ताबडतोब सोडून द्यावी. आध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराज जी म्हणतात की जड अन्न पचवणे कठीण असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि आम्लता सारख्या समस्या उद्भवतात. पोटदुखी शरीर आणि मन दोन्ही कमकुवत करते.

Add Zee News as a Preferred Source

पोट कसे स्वच्छ करावे? पोटात साचलेली घाण शेकडो आजारांना जन्म देते. महाराजांनी गॅस, आम्लता, आतड्यांसंबंधी घाण आणि बद्धकोष्ठता यासारख्या पोटाच्या आजारांवर काही उपाय (संदर्भ) सुचवले आहेत, जे तुम्ही तुमच्या आयुष्यात वापरून पहावेत.

उठल्यावर काय कराल?

महाराज जे यांनी स्पष्ट केले की तुमचा सकाळचा दिनक्रम तुमचे आरोग्य ठरवतो. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी, उठल्यावर प्रथम देवाचे स्मरण करा आणि नंतर कोमट पाणी प्या. तुमच्या क्षमतेनुसार, वज्रासनात बसून अर्धा लिटर, एक लिटर किंवा तुम्हाला शक्य तितके पाणी हळूहळू प्या.

कोमट पाणी पिण्याचे फायदे

महाराजजींनी स्पष्ट केले की अशा प्रकारे पाणी पिल्याने आतड्यांमध्ये साचलेली घाण मऊ होते आणि ती बाहेर काढणे सोपे होते, पचन सुधारते. पाणी पिल्यानंतर थोडे चालल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि हवे असल्यास, तुम्ही थोडा वेळ विश्रांती देखील घेऊ शकता. दररोज ही सोपी सवय राखल्याने बद्धकोष्ठता, वायू आणि जडपणासारख्या समस्या दूर होतात आणि साधकाला भक्ती साधनावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.

हलके आणि सात्विक अन्न खा

महाराजजींनी स्पष्ट केले की अन्नाचा उद्देश केवळ पोट भरणे नाही तर शरीराला चैतन्य प्रदान करणे आहे, म्हणून कमी, हलके आणि सात्विक अन्न खाणे सर्वोत्तम मानले जाते. जड आणि समृद्ध अन्न पचनसंस्थेवर भार टाकते, बद्धकोष्ठता निर्माण करते आणि मनाला आळस आणि तमसाकडे घेऊन जाते.

उपवास आणि पातळ मूग डाळ

महाराजजींनी स्पष्ट केले की जर तुम्हाला सतत बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तुम्ही दोन किंवा तीन दिवस हलके उपवास करू शकता, फळे खाऊ शकता किंवा फक्त पातळ मूग डाळ खाऊ शकता. यामुळे पचनसंस्थेला आराम मिळतो आणि शरीराला अंतर्गत संतुलन राखण्यास मदत होते. तसेच, जड, तळलेले किंवा मसालेदार पदार्थ टाळा.

कोमट दुधात त्रिफळा पावडरसह 1 चमचा सायलियम हस्क मिसळून झोपण्यापूर्वी घेणे खूप फायदेशीर मानले जाते. सायलियम हस्कमधील विरघळणारे फायबर आतड्यांमध्ये पाणी शोषून घेते. ज्यामुळे मल मऊ आणि जड होतो, ज्यामुळे ते सहजपणे बाहेर पडते. त्रिफळा पावडर पचनसंस्थेला मजबूत करते, आतडे स्वच्छ करते आणि नियमित आतड्याची हालचाल राखते.

नियम पाळा

महाराजजींनी स्पष्ट केले की एक नियम नेहमी लक्षात ठेवावा की साधकाने आपले अर्धे पोट अन्नासाठी, एक चतुर्थांश पाणीासाठी आणि उरलेले चतुर्थांश हवेसाठी रिकामे ठेवावे, कारण हे संतुलन शरीरात ऊर्जा राखते आणि भक्तीची शक्ती विकसित करते.





Source link

कुरवली खुर्द येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण च्या वतीने चिवरदान कार्यक्रम संपन्न

0
कुरवली खुर्द येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण च्या वतीने चिवरदान कार्यक्रम संपन्न

कुरवली खुर्द येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण च्या वतीने चिवरदान कार्यक्रम संपन्न

फलटण (ता. फलटण): भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण यांच्या वतीने आयोजित चिवरदान कार्यक्रम आयु. संघराज अशोक निकाळजे व पल्लवी संघराज निकाळजे यांच्या परिवाराच्यावतीने अत्यंत मंगलमय व धम्ममय वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पूज्य भिक्खू महामोगलायन (यशोधरा फाउंडेशन ट्रस्ट संचलित यशोधरा बुद्ध विहार बाल संस्कार केंद्र, भीमभूमी, उल्हासनगर, जिल्हा ठाणे – मुंबई) व भिक्खू धम्मरत्न हे उपस्थित होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत उपासक उपासिकांसाठी धम्मदेसना आयोजित करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु. महावीर भालेराव सर, अध्यक्ष – भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका होते. यावेळी श्री.श्रीमंतराव घोरपडे, संघटक – भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) आणि आयु. रंजना राजकुमार रणवरे, तालुका महिला शाखा अध्यक्षा, हे उपस्थित होते.
धम्मदेसना व चिवरदान
पूज्य भंते महामोगलायन यांनी संघराज निकाळजे परिवारासह उपस्थित सर्व उपासक-उपासिकांना त्रिसरण व पंचशील दिले. त्यानंतर संघराज निकाळजे परिवाराने पूज्य भंते महामोगलायन यांना चिवरदान केले, तसेच त्यांच्या समवेत आलेल्या पूज्य भंते धम्मरत्न यांचाही सन्मान करण्यात आला.
आपल्या मनोगतात श्री. श्रीमंतराव घोरपडे म्हणाले, “संघराज निकाळजे आणि त्यांचा परिवार यांच्या धम्मकार्यातून समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी केवळ कार्यक्रम नव्हे, तर आचरणातून बुद्ध धम्माचा प्रसार केला आहे. प्रत्येक उपासकाने या परिवाराचा आदर्श घ्यावा.”
आयु. रंजना रणवरे म्हणाल्या,“फलटण तालुक्यात नुकतीच महिला शाखा स्थापन झाली आहे. आमचे उद्दिष्ट ‘गाव तिथे महिला शाखा’ हे आहे. महिलांमार्फत कुटुंबात धम्माचा प्रसार व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या कामात आम्हाला भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका शाखेने मदत मदत करावी. निकाळजे परिवाराने उभारलेले चैत्य व चिवरदान कार्य हे प्रेरणादायी आहे.”
अध्यक्ष आयु. महावीर भालेराव म्हणाले,“बुद्ध, धम्म आणि संघ हेच आपले अंतिम शरण आहे. पूज्य भंते महामोगलायन यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व बौद्ध धम्मप्रसारासाठी एकत्र आलो आहोत. संघराज निकाळजे व त्यांच्या कुटुंबीयांनी या कार्यक्रमाद्वारे समाजात नवचैतन्य निर्माण केले आहे. तालुक्यात महिला शाखा स्थापन झाल्याने धम्मप्रचार अधिक वेगाने होईल. तालुका शाखेचा अध्यक्ष या नात्याने संपूर्ण सहकार्य महिला शाखेला करणार आहे.”
सन्मान व गौरव
या प्रसंगी निकाळजे परिवारातील निलाक्षी संदीप निकाळजे हिला विज्ञान शाखेतून पदवी व SET परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल पूज्य भंते महामोगलायन यांच्या हस्ते भारतीय संविधानाची प्रस्तावना व पंचशील ध्वजाची पट्टी देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच विधी शाखेतून पदवी संपादन केल्याबद्दल ऍड. राहुल आबा निकाळजे यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी पार पाडल्याबद्दल संघराज निकाळजे व परिवाराचे भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने संविधान प्रस्ताविका देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
उपस्थित मान्यवर
या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) चे संघटक श्री. श्रीमंतराव घोरपडे, तालुकाध्यक्ष आयु. महावीर भालेराव, महासचिव बाबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, महिला शाखा अध्यक्षा आयुनी. रंजना रणवरे, कोषाध्यक्षा आयुनी.तालुका महिला शाखा संस्कार सचिव आयुनी कल्पना लोंढे, केंद्रीय शिक्षिका आयुनी. करुणा मोहिते, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे, संस्कार सचिव आयु.बजरंग गायकवाड, कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, संघटक विजयकुमार जगताप, संरक्षण सचिव अमोल काकडे, प्रवचनकार सोमीनाथ घोरपडे, लक्ष्मणराव निकाळजे, बी. डी. घोरपडे, माणिकराव घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच तक्षशिला बुद्ध विहार प्राधिकरण, आकुर्डी (पुणे) येथील श्रद्धावान उपासक – उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यात आयु. रमेश दिलपाक, संपत वाघमारे, हरिभाऊ मेश्राम, हिरामण रामटेके, बाळकृष्ण शिंदे, आनंद कदम, करुणा कदम, यशवंत भालेराव, श्रीधर रोकडे, मधुकर गायकवाड, प्रमोद लोखंडे, अजय जगताप, संतोष उणवणे, सचिन शिवशरण, सुरज रणपिसे, कुलदीप काकडे, अमोल कांबळे, एम. एस. कांबळे, सुदेश जगताप, रवी कांबळे आदींचा समावेश होता.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन उपासक संग्राम अशोक निकाळजे व उपासिका पल्लवी संग्राम निकाळजे यांनी केले.
या कार्यक्रमामुळे फलटण तालुक्यातील बौद्ध बांधवांमध्ये नवा उत्साह, एकजूट आणि धम्मप्रेरणा निर्माण झाली असून, बुद्धधम्म प्रचाराच्या कार्याला नवसंजीवनी मिळाली आहे.

फलटणमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विकासकामांचा भव्य ई-भूमिपूजन व लोकार्पण सोहळा

0
फलटणमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विकासकामांचा भव्य ई-भूमिपूजन व लोकार्पण सोहळा

फलटण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज फलटण तालुक्यात विविध विकासकामांचा भव्य ई-भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी निरा-देवघर सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्यासह सुमारे ९६७ कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ केला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ज्या निरा-देवघरच्या पाण्याबद्दल हे अशक्य आहे, असे सांगितले जात होते, ते आम्ही करून दाखवले आहे. माझा जन्मच दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी झाला आहे.” फलटण तालुक्याच्या इतिहासातील सर्व विक्रम मोडीत काढणाऱ्या तब्बल ७० ते ७५ हजार नागरिकांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या पटांगणावर झालेल्या सभेत त्यांनी विकासाची ग्वाही दिली.

कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार राहुल कुल, आमदार महेश शिंदे, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार राम सातपुते यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करून विकासकामांची माहिती दिली. यामध्ये मुख्यत्वे निरा-देवघर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा समावेश असून, फलटण, खंडाळा आणि माळशिरस या तालुक्यांमधील सुमारे १२,९७० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. यासोबतच नूतन प्रशासकीय इमारत, महसूल भवन, फलटण शहर, फलटण ग्रामीण व वाठार येथील सुसज्ज पोलीस ठाण्यांचे लोकार्पण, पालखी मार्गाचे काम आणि पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील रस्त्यांचे भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी फलटण येथील तरुण डॉक्टर संपदा मुंडे यांच्या दुर्दैवी मृत्यूवर शोक व्यक्त करत तात्काळ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती दिली. त्यांनी विरोधकांवर टीका करत म्हटले, “या प्रकरणात काहीही कारण नसताना रणजितदादा आणि सचिनदादांचे नाव गोवण्याचा प्रयत्न झाला. अशा प्रकारे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे राजकारण कोणी करत असेल, तर तेही मी सहन करणार नाही.”

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे ११ नव्या मागण्यांचे निवेदन दिले, ज्यावर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ निर्णय घेत घोषणांचा पाऊस पाडला. यामध्ये पाडेगाव-शिंगणापूर रस्ता, नाईकबोमवाडी MIDC प्रकल्प, फलटण एअरपोर्टसाठी सर्वेक्षण, उपसा सिंचन योजना, शासकीय रुग्णालयाची श्रेणीवर्धन व नवी इमारत व यंत्रसामुग्री यांचा समावेश होता.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजकीय भाषणात राज्यातील लोकप्रिय योजना ‘लाडकी बहीण’ सुरू राहतील याची खात्री दिली. त्यांनी शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे वीज बिल माफ आणि दिवसा १२ तास मोफत सौर वीज देण्याची घोषणा केली.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्र्यांना ‘आधुनिक भगीरथ’ म्हणत गौरव दिला. माजी खासदार रणजितसिंह नाईक यांनी फलटणच्या ७० वर्षांच्या पाणी संघर्षावर मुख्यमंत्र्यांनी न्याय दिल्याचे सांगितले. आमदार सचिन पाटील यांनी उत्तर कोरेगावमधील २६ गावांना पाणी पुरवठ्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचे लाभार्थ्यांना मानपत्र व लाभाचे प्रतीकात्मक वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार सातारा जिल्हा बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर यांनी मानले.

दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या, चाकरमान्यांचा मुंबई पुण्याकडे परतीचा प्रवास सुरु, सातारा पुणे दरम्यान वाहनांची मोठी गर्दी

0



Traffic Update : दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या, चाकरमान्यांचा मुंबई पुण्याकडे परतीचा प्रवास सुरु, सातारा पुणे दरम्यान वाहनांची मोठी गर्दी



Source link

Heart Attack : नकळत येणारा हॉर्ट अटॅक घात करतो, पण आता त्यापूर्वीच जाणून घ्या त्याची लक्षणे

0
Heart Attack : नकळत येणारा हॉर्ट अटॅक घात करतो, पण आता त्यापूर्वीच जाणून घ्या त्याची लक्षणे



आजकाल हृदयविकाराचा झटका ही एक गंभीर समस्या आहे, विशेषतः तरुणांमध्ये. उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, धूम्रपान आणि ताण ही त्याची मुख्य कारणे आहेत. हे टाळण्यासाठी, नियमित व्यायाम, निरोगी आहार आणि ताण कमी करणे यासह निरोगी जीवनशैली स्वीकारणे महत्वाचे आहे.



Source link

अक्कासाहेब मंगल बाळासाहेब भोसले यांना आदरांजली

0
अक्कासाहेब मंगल बाळासाहेब भोसले यांना आदरांजली

फलटण: माळशिरस तालुक्यातील तांबवे गावातील अक्कासाहेब मंगल बाळासाहेब भोसले यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रम २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता मंगल विहार, तांबवे येथे आयोजित केला जात आहे.

या कार्यक्रमात अक्कासाहेबांच्या कार्य, विचार आणि  योगदानाचे स्मरण करण्यात येईल. सर्व ग्रामस्थ, नातेवाईक आणि अनुयायी यांची उपस्थिती प्रार्थनिय

तुझ्याशिवाय उणे सर्व काही

कशी विसरू तुला, तेच कळत नाही,
अक्का, तुझ्याशिवाय उणे वाटते सर्व काही।

हॉर्न ऐकताच, गाडीचा दारातच उभी असायची,
आम्हा सर्वांचे तू हसूनच स्वागत करायची।

खूप भारी वाटायचे आनंद, खूप व्हायचा,
तुझा चेहरा मात्र समाधानाने फुलून जायचा।

खूप कौतुक नातवांचे, लाड खूप करायची,
जवळ बसवून सर्वांचे लाडाने पापा घ्यायची।

यावेसे परतून माघारी, पुन्हा समोर दिसावी,
घालावे मायेचे पांघरूण, प्रेमाची सावली असावी।

जाता तांबवेला कथी, घरात थांबू वाटत नाही,
शोधते नजर, घरभर तुझाच चेहरा नेत्र पाहि।

घरभर तुझी आठवण, स्पर्श प्रत्येक वस्तूला,
स्मरण कायम जपनेस प्रत्येक नात्याला।

मारावी मिठी तुला, तुझा स्पर्श व्हावा,
सुंदर तुझा चेहरा आम्हास पुन्हा दिसावा।

प्रत्यक्ष पहायची सवय, फोटोत पहावत नाही,
तुझ्या आठवणीशिवाय एक क्षणही जात नाही।

किती जागल्या रात्री, कायम तुझ्या आठवणीत,
अक्का, खूप आनंद होईल प्रत्यक्ष आपल्या भेटीत।

अशिक्षित पण ज्ञानाची धुरी

अक्का, तू अशिक्षित असूनही,
शिक्षणाची भारी आवड, बाबासाहेबांच्या विचारांची आयुष्यभर निवड।

छोटा मोबाईल पण अचूक तू हाताळायची,
विविध चित्रावरून फोन बरोबर लावायची।

सद्विचाराची पेरणी आयुष्यभर केली,
देऊन मुलांना शिक्षण, स्वप्नं पूर्ण झाली।

व्यक्तिमत्व होते अलग, गाव सर्व अक्का म्हणे विचारपूस करी,
सर्वांची आता नव्हते काही उणे।

नातीगोती, मैत्रिणी जीवापाड जपले,
सर्वांच्या मनात मात्र माणुसकी बिंबले।

शरीराने होती अशक्त, खूप खंबीर,
मनाने आधार द्यायची भक्कम, तुझ्या ज्ञानाने चकीत।

ज्ञान, माहिती घ्यायची भारी तुला आवड,
टीव्ही, युट्यूब पाहण्या आवर्जून काढे सवड।

लावला तू खूप लळा पदोपदी होई,
आठवण प्रत्येक प्रसंग स्मरणात, नयनात अश्रूची साणवण।

आक्का तुला शोधू कुठे

अक्का, तुला शोधू कुठे, असह्य वेदना हृदयाला,
सांग का? सोडून गेलीस आम्हा सर्व लेकराला।

किती माया प्रेम दिले तुझ्या,
अशा जाण्याने आम्हाला पोरके केले, काय करावे जीवाने।

अथांग मायेचा सागर होता तुझ्या हृदयात,
काय करावे, कुठे जावे, आठवण क्षणाक्षणात।

सदैव हसरा चेहरा, आयुष्याची तक्रार नाही,
पप्पांना खंबीरपणे साथ, आता उणे नव्हते काही।

सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या मोहनदादाने,
आशिष, आकांक्षा, मैत्रेय, टिम्मीची वाट पहायची आतुरतेने।

अवका, तू हवी होतीस आयुष्यभर साथ देताना,
मुलांचे आणि नातवंडांचे कोडकौतुक पाहताना।

जावई लाभले, मुलासम केली आक्कासाहेबांची सेवा भरभरून दिले,
तू आशिष, तुझा चेहरा सदैव दिसावा।

– सौ. मनिषा बाबासाहेब वाघमारे

साहस टाइम्सकडून अक्कासाहेबांना विनम्र अभिवादन 🙏


(अक्कासाहेब ) मंगल बाळासाहेब भोसले यांच्या स्मृतींना आदरांजली

0
(अक्कासाहेब ) मंगल बाळासाहेब भोसले यांच्या स्मृतींना आदरांजली

फलटण (प्रतिनिधी) : माळशिरस तालुक्यातील तांबवे गावातील कालकथित (अक्कासाहेब )मंगल बाळासाहेब भोसले यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त एक भावपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

मंगल विहार, मु.पो. तांबवे, ता. माळशिरस, जि. सोलापूर’ येथे दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात अक्कासाहेब यांच्या कार्य, विचार आणि  दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यात येणार आहे.

अक्कासाहेब यांचे अनमोल मार्गदर्शन, विचारशीलता आणि प्रेमळ आशीर्वाद यांचे स्मरण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या स्मृतींच्या गंधानी संपूर्ण आसमंत भारून गेला आहे, आणि त्यांच्या विचारांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आजही कुटुंबाला दिशा देत आहे.

“हवी होतीस आम्हाला, आशीर्वाद अक्का देताना,
अनमोल असे मार्गदर्शन जीवनात आमच्या करताना.
अक्का तुझ्या स्मृतीगंधानी आसमंत दखळला साग,
तुझी सम्यक दृष्टी, वाणी, विचारांचा वाहतोय झुळझुळ वारा.

“न थकता, न हारता चंदनासम झिजली,
ऊच्च आचार-विचार दिशा जगण्याची दिली.
खूप उणीव भासते आयुष्य हे जगताना,
यावे परतूनी अक्का — खूप होतात यातना…”

अक्कासाहेब यांनी समाजात आदर्शवत जीवन जगत अनेकांना प्रेरणा दिली. त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी आयोजित या द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ, नातेवाईक, आणि अनुयायी यांची उपस्थित प्रार्थनीय आहे

स्थळ: मंगल विहार, मु.पो. तांबवे, ता. माळशिरस, जि. सोलापूर
दिनांक: २७ ऑक्टोबर २०२५
वेळ: सकाळी १०:३०

साहस टाइम्सतर्फे अक्कासाहेबांना विनम्र अभिवादन

रोस्टर बिंदू नामावली चळवळीचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप फणसे यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

0
रोस्टर बिंदू नामावली चळवळीचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप फणसे यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश


फलटण (सातारा)दि. 25 ऑक्टोबर 2025. :- गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या रोस्टर बिंदू नामावली चळवळीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. संदीप फणसे यांनी आज वंचित बहुजन आघाडी मध्ये अधिकृत पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश युवा नेते आदरणीय सुजात प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सातारा येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाला.

या प्रसंगी राज्य उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे सर, तसेच सातारा जिल्हा पूर्व आणि पश्चिम येथील सर्व विंगचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मा. संदीप फणसे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करताना सांगितले की, “सातारा जिल्ह्यात पक्ष बळकट करण्यासाठी मी माझ्या सर्व ताकदीने काम करीन. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे खाते उघडणारच,” असा ठाम आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्यांच्या या प्रवेशामुळे सातारा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीस नवचैतन्य मिळाले असून पूर्व आणि पश्चिम दोन्ही जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक घोडदौड सुरू झाली आहे.

सातारा जिल्हा पूर्व अध्यक्ष भीमराव घोरपडे यांनी यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन केले की, “मा. संदीप फणसे यांच्या अनुभवाचा आणि कार्यतत्परतेचा लाभ घेत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी एकजुटीने कार्य करावे.”

दुर्दैवी आणि धक्कादायक घटना — डॉक्टरी पेशातील ताणाचा विचार करायला लावणारा प्रसंग

0
दुर्दैवी आणि धक्कादायक घटना — डॉक्टरी पेशातील ताणाचा विचार करायला लावणारा प्रसंग

फलटण :- फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये नुकत्याच एका डॉक्टरांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली असून ती अत्यंत दुर्दैवी, लाजिरवाणी आणि धक्कादायक आहे.
या घटनेनंतर डॉक्टरी पेशातील ताण, तणाव आणि मानसिक दडपण पुन्हा एकदा समोर आले आहे.

डॉक्टर होण्यासाठी एखादा विद्यार्थी आपल्या आयुष्याची १० ते १२ वर्षे झिजवतो. तो जेव्हा प्रॅक्टिस सुरू करतो, तेव्हा त्याचे वय तिशीच्या पुढे गेलेले असते. “डॉक्टर” हा समाजासाठी कार्य करणारा नोबल (पवित्र) व्यवसाय आहे, पण हे विसरून चालणार नाही की डॉक्टर हाही एक माणूसच आहे — त्यालाही भावना, जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक आयुष्य आहे.

प्रत्येक डॉक्टरने स्वतःचे आत्मपरीक्षण करून आत्मबल वाढवणे गरजेचे आहे. आत्महत्या ही कोणत्याही समस्येचे उत्तर नसते; ती एक पळवाट असते. आयुष्य संपवून काही सुटत नाही — प्रत्येकाने स्वतःची काळजी घेत समाजासाठी काम करत राहणे हेच योग्य.

आपले काम आवडते असेल, आणि आपण ते सकारात्मक दृष्टीकोनातून करत असू, तर ताण कमी जाणवतो. प्रत्येक डॉक्टरने स्वतःच्या आरोग्याची, मानसिक स्थितीची आणि मनःशांतीची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे जितके रुग्णसेवा करणे.

आत्मबल वाढवण्यासाठी आध्यात्मिक उन्नती, सकारात्मक विचार आणि चांगल्या सहवासाची गरज आहे. काही ताण, अडचणी किंवा मानसिक दडपण वाटत असेल, तर ते मनात न ठेवता आपल्या मित्र, मैत्रिणी, कुटुंबीय किंवा विश्वासू व्यक्तीशी बोलून शेअर करा.
दुसऱ्या गावात काम करणाऱ्या डॉक्टरांसाठी एक स्थानिक (लोकल) गार्डियन असावा जो त्यांच्या दैनंदिन जीवनाकडे लक्ष देईल.

डॉ. मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात नेमके कारण आणि जबाबदार कोण हे पोलिस तपासत आहेत. पण समाज म्हणून आपल्यावरही जबाबदारी आहे — डॉक्टरांवर होणारा ताण कमी व्हावा, त्यांना मानसिक आधार मिळावा, यासाठी समाजानेही पुढे यायला हवे.

ही घटना फलटणच्या इतिहासात काळिमा फासणारी आहे. सर्व फलटणकर डॉक्टर आणि नागरिक या घटनेचा तीव्र निषेध करतात आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करतात.

डॉक्टरी पेशा अजूनही नोबल आहे,
पण त्यात हतबल न होता सकारात्मकतेने कर्म करा.
पेशंटला बरे करण्याचा घेतलेला वसा निभावताना
स्वतःची काळजी घ्या — हेच खरे यश!

पुन्हा ‘सखाराम बाइंडर’: अभिनेते सयाजी शिंदेची छाप, दिग्दर्शक अभिजित झुंझाररावचे दोन अंकातले सादरीकरण अफलातून!

0
पुन्हा ‘सखाराम बाइंडर’:  अभिनेते सयाजी शिंदेची छाप, दिग्दर्शक अभिजित झुंझाररावचे दोन अंकातले सादरीकरण अफलातून!


  • Marathi News
  • Opinion
  • Sakharam Binder Play Complete Performance; Sayaji Shinde Impresses, Director Abhijit Zhunzarrao Reduces Three Acts To Two

किरण येले18 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील भव्य आणि विस्तृत म्हणता येईल अशा अंबरनाथ येथील धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिर लोकार्पणानिमित्त खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आयोजित आठ नाटकांच्या महोत्सवात दिनांक 22 ऑक्टोबर रोजी विजय तेंडुलकरांचे सखाराम बाइंडर सादर झाले. यावेळी 650 आसनक्षमतेच्या नाट्यगृहात जवळपास 1000 प्रेक्षक खाली बसून उभे राहून नाटकाचा अनुभव घेत होते. विजय तेंडुलकर हे मराठी नाटकातील अजरामर नाव. आपल्या सर्व नाट्यकृतीतून त्यांनी माणसातील विकृती, लालसा, वासना, कृतकता, कृतघ्नपणा यावर प्रकाश टाकला. सखाराम बाइंडर हे मूळ नाटक तीन अंकी आहे. ते दोन अंकी करणे म्हणजे, म्हणजे सह्याद्री एका फोटोत बसवणे. पण हे अवघड काम दिग्दर्शक अभिजित झुंझाररावने चोख बजावले आहे. या नाटकातील अनेक फ्रेम्स लक्षात राहतील अशा बसवल्या आहेत.

लक्ष्मी, चंपा आणि सखाराम यांच्या लकबी आणि देहभाषा अभिजितने बारकाईने ठरवल्यामुळे ही तिन्ही पात्रे उठून दिसतात. त्यात तेंडुलकर यांचे लेखनाचे श्रेय असले, तरी दिग्दर्शक झुंझारराव यांनीही वर दिलेली फोडणी नाकारता येत नाही. सयाजी शिंदे, नेहा जोशी, अनुष्का बोराडे, चरण जाधव आणि स्वत:कडून चांगल्या जागा निर्माण करण्यास दिग्दर्शक मागे राहिला नाही. सयाजी आणि चरण हे दोघे तालवाद्य छान वाजवतात. त्याचाही त्याने चपखल वापर केला आहे. या सगळ्याला परिपूर्ण साथ लाभली आहे ती प्रकाश योजनाकाराची. लक्ष्मी आस्तिक तर चंपा नास्तिक. लक्ष्मी सोज्वळ तर चंपा उठवळ. लक्ष्मी नागरी तर चंपा ग्रामीण. लक्ष्मी दिवसाची स्त्री आणि चंपा ही रार्त्रीची स्त्री, हे सारे फरक लेखकाने आणि पात्रांनी गडद केले आहेत. तसेच प्रकाशयोजनाकार आणि संगीतकार आशुतोष वाघमारे या दोघांनीही केले आहेत. लक्ष्मीचा वावर प्रकाश दिवसा आणि चंपाचा वावर रात्र हा फरक प्रकाशयोजनाकाराने दाखवला आहे.

संगीतकार आशुतोष वाघमारे यांनीही या दोन पात्रांसाठी दोन टोकाच्या संगीतांचे नियोजन केल्याने ही दोन्ही पात्रे आणि त्यांच्या स्वभावांची दोन टोके उठून दिसली. सखाराम गणपतीच्या दिवशी लक्ष्मीला मारतो तेव्हा बाहेर भजन सुरू आहे. त्यामुळे लक्ष्मी मनात देवाला हाक मारते असे वाटते. तर चंपासोबत दसऱ्याच्या दिवशी प्रणय प्रसंगी बाहेर देवळात गोंधळाचे संगीत सुरू होते. लग्नाच्या रात्री अंगणात असलेला जागरण गोंधळ आठवून संगीतातून तो प्रसंग उंचावर जातो. (संगीत, प्रकाश, आणि हालचाली हे लेखकाने न लिहिलेले संवाद असतात. जे आपल्याला लिहावे लागतात हे संगीतकार, प्रकाशयोजनाकार आणि दिग्दर्शकाला कळले आहे याचे हे उदाहरण) अशा अनेक प्रसंगी संगीतभाषा जाणवते. आणि नाटकाला वेगळे परिमाण मिळते.

सखाराम बाइंडर या नाटकाचे नेपथ्य विचार करायला लावणारे आहे. त्याबद्दल नेपथ्यकार सुमीत पाटील या तरुणाचे कौतुक. डाव्या बाजूस पुढे स्वयंपाक घर आणि त्यामागे मोरी आहे. मोरीला लागूनच बाहेर जाण्याचा रस्ता वा आत येण्याचा रस्ता तीन अधिक दोन असा पाच पायऱ्या वर आहे. सखारामच्या खोलीत यायचे, त्याच्यासोबत राहायचे तर या पायऱ्या उतरुन खालच्या पातळीवर यावे लागेल असे सुचवणारे. इथे येणारे प्रत्येक पात्र कधी न कधी ती खालची पातळी गाठतेच. शांततेचाही आवाज असतो आणि तो अधिक भयावह असतो, ही बाब समजून घेत आशुतोष वाघमारे या तरुण संगीतकाराने, ज्या संयतपणे या उग्र नाटकाची प्रकृती समजून घेत कधी त्याची उग्रता अधोरेखित करणारी शांतता राखत, तर कधी त्याची उग्रता सहनीय करणारे संगीत देत, नाटकाचा तोल सांभाळला ते लाजवाब. या नाटकाचे संगीत ही सर्वात धोक्याची बाब होती. जरा अधिकच्या संगीताने हे नाटक बटबटीत झाले असते. हीच बाब कलाकारांबाबत विशेषत; सखाराम साकारणाऱ्या सयाजी शिंदे यांच्याबाबत म्हणता येईल.

सखारामच्या हिंस्त्रपणाला विकृतपणाच्या पातळीवर न नेता, त्याचे माणूसपण गणपती आणल्यावर आरतीच्या प्रसंगात, राग आल्यावर मृदंग वाजवण्याच्या व इतर प्रसंगात त्यांनी केलेला सखाराम आवडतो. शेवटी सखारामची कीव येऊ लागते इथवर त्यांनी हतबल सखाराम साकारला. नेहा जोशी यांनी कमी संवादात साकारलेली थंड खानदानी उच्चवर्णीय स्त्री देहभाषेसह अप्रतिम तर अनुष्का यांनी साकारलेली बोलभांड, बंड करणारी स्त्री, बोलीभाषेच्या हेलासह तंतोतंत रेखाटली. तेंडुलकर या नाटकातून सांगतात, की आपण समाजात अनेक सोज्वळ, साधी, पापभिरू माणसे पाहतो. त्यांचे गुणगान करत आसपास सखाराम चंपासारख्या उठवळ माणसांना विकृत आणि राक्षस वृत्तीची असंवेदनशील म्हणून नावे ठेवतो. पण वेळ आल्यावर कळते की या असंवेदनशील माणसांसारखेच देव देव करणारी, उपासतापास, व्रतवैकल्ये करणारी, पक्षी मुंगळे यांच्याशी बोलणाऱ्या लक्ष्मी सारख्या माणसांतही राक्षस लपून असतो.

चंपाचा खून झाल्यावर धक्का बसून गप्प झालेल्या सखारामला लक्ष्मी म्हणते, ‘बरे झाले तिला मारले. (त्या आधी लक्ष्मीला मारताना चंपा तिला वाचवते) ती वाईट होती. तुम्ही घाबरू नका. आपण हिला पुरू आणि सांगू ती निघून गेली.’ आणि लक्ष्मी स्वत: स्वयंपाकघर खणू लागते. इथे नाटक संपते. नाटकाचा हा संदेश पोहोचवण्याचे काम सयाजी शिंदे, अभिजित झुंझारराव आणि संघाने चोख केले आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक. हे नाटक नव्या दमाचे दिग्दर्शक अभिजित झुंझारराव, संगीतकार आशुतोष वाघमारे, नेपथ्यकार सुमीत पाटील यांची नाट्यक्षेत्रात नवी ओळख करून देईल हे निश्चित.

(लेखक सुप्रसिद्ध कवी आणि कथाकार आहेत.)



Source link