Ramraje Naik Nimbalkar : आयुष्यभर भाऊबीज साजरी करणार नसल्याची माहिती विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी दिली. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचा पुतळा फलटण (Phaltan) येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उभारणार असल्याचं मोठं वक्तव्य रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलं आहे. माझ्या स्वखर्चातून पुतळा उभारणार असल्याचेही रामराजे म्हणाले.
फलटण तालुक्यात सच्ची माणसे आहेत, वारकरी पंथाची माणसे आहेत
आपल्याला जगाला सांगाव लागेल की, फलटण तालुक्यात सच्ची माणसे आहेत. वारकरी पंथाची माणसे आहेत. मी यापुढे भाऊबीज साजरी करणार नाही. त्या मुलीची आपण सर्व आठवण ठेवा असे रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले. महिला डॉक्टरचा पुतळा फलटण उपजिल्हा रुग्णालय इथं उभा राहणार असल्याचे निंबाळकर म्हणाले.
डॉक्टरची आत्महत्या झालेला दिवस हा फलटणचा काळा दिवस
डॉक्टरची आत्महत्या झालेला दिवस हा फलटणचा काळा दिवस आहे. डॉक्टरचा फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात अर्ध पुतळा उभारणार आहे. फलटण तालुक्यातील डॉक्टरच्या आत्महत्येमुळं तालुक्यातील दहशत संपवली. नाईक निंबाळकर या ब्रँडचे वाटोळं केलं आहे. या ब्रँडला पुन्हा मोठा करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. ही लढत भाऊबीजेला सुरु झाली आहे. त्यामुळे मी देखील भाऊबीज साजरी करणार नाही त्या मुलीचा अर्ध पुतळा सरकारने नाही केला तर मी माझ्या स्वखर्चातून उभा करणार असे वक्तव्य माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
फलटणच्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टर तरूणीने एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टर तरूणीने स्वतःच्या हातावर ‘माझ्या मरण्याचे कारण पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने असून, ज्याने चारवेळा माझ्यावर अत्याचार केला, तसेच प्रशांत बनकर याने चार महिने शारीरिक व मानसिक छळ केला,’ असे लिहून ठेवले आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर मानसिक व शारीरिक त्रास, तसेच लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्याला निलंबित केले आहे, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.संबंधित महिला डॉक्टर फलटणमधील एका हॉटेलमध्ये राहत असलेल्या खोलीचा दरवाजा ठोठावूनही तो उघडला गेला नसल्याने कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी लगेच पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा उघडून पाहिल्यानंतर महिलेने गळफास घेतल्याचे आढळून आले.
फलटण (प्रतिनिधी) : दुःखमुक्तीचे मार्गदाता विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध, या भारत देशामध्ये तथागताचा पवित्र सदधम्म असताना काही कारणास्तव या देशातून झाकला, लपवला, नष्ट केला. काही लोकांनी पळवला पण ज्यांच्या महान कष्टाने, ज्यांच्या महान विद्वत्तेने, ज्यांच्या महान शिलाने, ज्यांच्या महान शिक्षणाने या भारत देशात पुन्हा धम्मक्रांती झाली. ते धम्मक्रांतीचे उद्गाता, तुमचे आमचे उद्धारकर्ता, भाग्यविधाता असे म्हणतात की, आम्हाला देवही नव्हता आणि धर्मही नव्हता.आम्हाला घरी ही नव्हतं आणि दारही नव्हतं, झाडं ही नव्हतं आणि झाडाची फांदी ही नव्हती. पण त्याच भिमरायाच्या पुण्याईने आज आम्ही माणसात आलो. आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, परमपूज्य विश्ववंदनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर! इ. स 528 ला तथागतांना संबोधी प्राप्त झाली. सम्यक ज्ञान प्राप्त झाले.त्यांना असं वाटलं माझा धम्म साधा, सोपा आणि सरळ आहे. माझा धम्म ऐकेल कोण? माझा धम्म समजून घेईल कोण? यावेळी तथागतांना उद्दक रामपुत्त यांची आठवण आली. ते ज्ञानी होते.विद्वान होते. गृहत्यागी होते. ते वयाने मोठे असल्यामुळे ते मरण पावले होते. पुन्हा त्यांना आठवण आली आलारकालाम यांची ते ध्यानात प्रवीण होते. तेही वयाने मोठे असल्यामुळे कालबद्ध झाले होते. मरण पावले होते. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी प्रथम सारनाथ (जि.वाराणसी) येथे जाऊन पहिला धर्मोपदेश (धम्मचक्र प्रवर्तन) केला. हा उपदेश त्यांनी आपल्या पूर्वीच्या पाच सहधर्म्यांना दिला, जे “पंचवर्गीय भिक्खू” म्हणून ओळखले जातात. हे पंचवर्गीय भिक्खू म्हणजे कोंडञ्ञ (कौण्डिन्य),भद्दिय, वप्प, महनाम अस्सजित ते त्यावेळी ऋषीपतन वनामध्ये ज्याला मृगदाय वन म्हणून सुद्धा ओळखले जात होते. ते तेथे होते.आज आपण जिथे तथागतांनी प्रथम धम्मदेसना दिली. त्याला सारनाथ आपण म्हणतो.108 नाथांचा नात म्हणजे सारीनाथ असा ही उल्लेख आढळतो. इथे पंचवर्गीय भिक्खू होते आणि तिथूनच बौद्ध धम्माची सुरुवात झाली. असा हा तो आदरणीय भिक्खू संघ त्या भिक्खू संघाला चिवर असेल, भिक्षा पात्र असेल, पाणी गाळण्याचा कपडा किंवा ब्लेड असेल, जमीन असेल, भोजन असेल त्या काळात भिक्खू संघाला दान दिले जायचे.
नालासोपारा परिसरात बौद्ध धम्माचा प्रभाव प्राचीन काळापासून आहे.हे स्तूप बुद्धांचे अवशेष किंवा पवित्र वस्तू ठेवण्यासाठी उभारले गेले.सुमारे अडीच हजार वर्षांपुर्वी पूर्णा नामक व्यापाऱ्याने याची निर्मिती केली.पूर्वी नालासोपारा हे शूर्पारक नावाने ओळखले जात होते. हा स्तुप चंदनाच्या लाकडापासुन बनविण्यात आला होता असे म्हणतात. नालासोपारा येथे गौतम बुद्धांनी भेट दिली होती, असे मानले जाते, पूर्णा या व्यापाऱ्याने श्रावस्ती येथे भगवान बुद्धांच्या उपदेशाला उपस्थित राहून बौद्ध धर्म स्वीकारला.पूर्णा परत आल्यावर, त्यांनी शिष्यांच्या मदतीने नालासोपारा येथे एक बुद्ध विहार बांधले. आज त्याच ठिकाणच्या एका विटे पासून या ठिकाणी चैत्याची केलेली निर्मिती ही आपल्या सगळ्यांना कायम प्रेरणा देत राहील. मी अनेक गावे फिरलो पण इतके सुंदर चैत्य कुठेही निर्माण केलेले नाही.
लेण्यांच्या संवर्धनाचे काम मी करतो. साडेचारशे च्या वर लेण्या मी पाहिल्या आहेत परंतु अनेक ठिकाणी आमच्या लेण्या असून त्यावर अतिक्रमण करण्यात आली आहेत. बौद्धांचे श्रद्धास्थान असणाऱ्या महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी दिल्लीमध्ये जंतर-मंतर वरती आंदोलने केली. परंतु या ठिकाणी कोट्यावधी रुपये दान येते. त्यामुळे मनुवाद्यांना ते मंदिर सोडायचे नाही. जगातल्या 56 देशातून जवळ जवळ 200 कोटी दान म्हणून जमा होत असल्याने हे मनुवाद्यांना बौद्धांच्या ताब्यात द्यायचे नाही. आजही ते दिले जात नाही. पुणे जिल्ह्यामध्ये 200 पेक्षा जास्त लेण्या आहेत. आज लेण्यांमध्ये नवनवीन देव तयार होऊ लागले आहेत. लेण्यामध्ये मध्ये अवैध गोष्टी राजरोसपणे सुरू आहेत. त्यामुळे रात्रच नाही तर दिवस पण वैऱ्याचा आहे. हा समृद्ध वारसा डोळ्यात तेल घालून आपण जपला पाहिजे त्याचे संरक्षण केले पाहिजे.
मी अनेक गावांमध्ये फिरलो तिथे वेगवेगळे बाबा तयार झाले आहेत. त्यामुळे अज्ञान व अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन लोक कर्मकांडांना जवळ करत आहेत.आपलेही लोक त्यात आहेत.ज्यांनी आपल्याला हजारो वर्ष गुलामगिरीच्या शृंखलांमध्ये मध्ये बंदिस्त केले. त्यातून मुक्त करण्यासाठी वरीलपैकी कोणताही बाबा आला नाही. पण एक बाबा जन्माला आला आणि त्यांनी आम्हाला या गुलामगिरीतून मुक्त केले. ते बाबा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
“जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले; तोचि साधु ओळखावा, देव तेथेंचि जाणावा.” हे समजण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सुरु असणाऱ्या धम्म कार्यात आपण सहभागी झाले पाहिजे.आज भारतीय बौध्द महासभा भारतातील 24 पेक्षा जास्त राज्यात धम्माचे काम करत आहे. आज भारतीय बौद्ध महासभा गावोगावी काम करत आहे.हे पाहून समाधान वाटते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वडील कबीर पंथी असल्याने बाबासाहेबांना कबीराचे दोहे म्हणायला लावायचे. “कर कमाई, बंदे, लेकर यहा तू जायेगा; का रोवे, का हसावे, ये सब साथ लायेगा।” हा दोहा जीवनात कर्म करण्याचे महत्त्व सांगतो आणि हे दर्शवतो की माणूस आपल्या कर्मांच्या फळांसहच या जगात येतो आणि जातो. आपल्या कुटुंबाला धम्म मार्गावर आणण्यासाठी धम्माचा विचार, आचार व संस्कार रुजण्यासाठी घरातील महिलांना, पत्नीला सन्मान देणे, सन्मान करणे हेच धम्माचे व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले सार आहे.ज्या कुटुंबातील स्त्रिया पुढे असतात ते कुटुंब ही पुढे जाते. त्यासाठी कुटुंबातील माता भगिनींचा सन्मान करायला पाहिजे. महिलांच्या सन्मानासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणले. आज निकाळजे परिवाराने या ठिकाणी जो सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल मी त्यांच्या प्रति मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो. त्यांना आशीर्वाद देतो. हेच संस्कार घरोघरी रुजले पाहिजेत. हेच काम भारतीय बौद्ध महासभा अतिशय चांगल्या प्रकारे करत आहे त्यांच्याही वायुगतीने चाललेल्या कार्याला मी शुभेच्छा देतो.सर्वांनाच आशीर्वाद करतो. सर्वांचे मंगल होवो! सर्वांचे कल्याण होवो!
यावेळी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्वचे संघटक श्रीमंतराव घोरपडे सर, फलटण तालुका शाखेचे अध्यक्ष आयुष्यमान महावीर भालेराव सर, महासचिव बाबासाहेब जगताप सर, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर, भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या अध्यक्षा रंजना राजकुमार रणवरे मॅडम, कोषाध्यक्षा आयुनी.वृषालीताई झेंडे मॅडम, केंद्रीय शिक्षिका आयुनी करुणा मोहिते मॅडम, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे सर, संस्कार सचिव आयु.बजीरंग गायकवाड, कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते सर, संघटक विजयकुमार जगताप सर,अमोल काकडे सर, प्रवचनकार सोमीनाथ घोरपडे सर, आयु.राजकुमार रणवरे सर, आयु. लक्ष्मणराव निकाळजे, आयु.बी डी घोरपडे, आयु.माणिकराव घोरपडे उपस्थित होते. यासोबत तक्षशिला बुद्ध विहार प्राधिकरण आकुर्डी पुणे येथून आयुष्यमान रमेश दिलपाक, संपत वाघमारे, हरिभाऊ मेश्राम, हिरामण रामटेके, बाळकृष्ण शिंदे, आनंद कदम व करुणा कदम, यशवंत भालेराव, श्रीधर रोकडे, मधुकर गायकवाड, प्रमोद लोखंडे,अजय जगताप, संतोष उणवणे, सचिन शिवशरण, सुरज रणपिसे, कुलदीप काकडे, अमोल कांबळे, एम एस कांबळे, सुदेश जगताप, रवी कांबळे हे उपस्थित होते.
फलटण : फलटणमध्ये डॉक्टर तरूणीने ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या (Phaltan Doctor Case) केली ‘त्या’ रात्रीचा घटनाक्रम हॉटेलचे संचालक रणजीत भोसले यांनी माध्यमांपुढे काल (बुधवारी ता 29) सांगितला. (Phaltan Doctor Case)
Phaltan Doctor Case: बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या…
२३ तारखेच्या मध्यरात्री १ वाजून २३ मिनिटांनी एका दुचाकीवरून एकटी डॉक्टर तरूणी हॉटेलच्या गेटवर आली. ‘मी बारामतीला चालली आहे; पण रस्ता लांब आहे. मी एकटीच आहे, मला फक्त एक रात्र राहू द्या.’ या तिच्या विनंतीनंतर वॉचमनने हॉटेलचे गेट उघडले. केवळ तीन मिनिटांत ती स्वागत कक्षात पोहोचली. तिने स्वतःचं रजिस्टरमध्ये नाव नोंदवले, आधार कार्ड दिले आणि ‘पेमेंट सकाळी करते’ असे सांगून रात्री १ वाजून ३० मिनिटांनी रूम नंबर ११४ मध्ये गेली.
सतरा तासांची ‘ती’ गूढ शांतता..सकाळी ११ वाजले तरी रूम नंबर ११४चे दार उघडले नव्हते. त्यामुळे मॅनेजरने औपचारिकता म्हणून दार वाजवले होते; मात्र तिथून प्रतिसाद आला नाही. सायंकाळी चार वाजता पुन्हा दार वाजवले; त्यावेळी देखील प्रतिसाद मिळाला नाही. हॉटेलचे संचालक रणजीत भोसले यांना बोलावून सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी डुप्लिकेट चावीने दार उघडले. यावेळी व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू ठेवले होते. आतमध्ये महिला डॉक्टर पंख्याला लटकलेली दिसली.
Phaltan Doctor Case: ही आत्महत्याच, बदनाम करण्यासाठी षडयंत्र
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत माझा व माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर एकत्रित फोटो दाखवला. हा फोटो भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमातील आहे. रणजितसिंह यांना बदनाम करण्यासाठी विरोधकांनी हे सर्व षडयंत्र रचलं आहे. हत्या हा राजकीय शब्द असून, आत्महत्या ही वस्तुस्थिती आहे, असे हॉटेलचे मालक दिलीपसिंह भोसले यांनी परिषदेत केला.
Phaltan Doctor Case: ‘डॉक्टर तरुणी हॉटेलमध्ये आली तेव्हा फ्रस्ट्रेट होती’
हॉटेल मधुदीपचे मालक भोसले यांनी सांगितले की, डॉक्टर तरुणी रात्री हॉटेलमध्ये आली तेव्हा थोडीशी फ्रस्ट्रेशनमध्ये दिसत होती, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. तिचा चेहरा थोडासा पडलेला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्येही दिसेल की, दार उघडताना तरुणी फ्रस्ट्रेट दिसत होती. त्यांच्या देहबोलीतून ही गोष्ट स्पष्टपणे समजून येत होती, असे भोसले यांनी म्हटले. विरोधकांनी केलेल्या आरोपांवर मला काही बोलायचे नाही. आमच्यावर आणि आमच्या नेत्यावर जी काही चिखलफेक करण्याचा प्रयत्न झाला, तो चुकीचा होता. फलटणमध्ये कुठेतही विकास होतोय, फलटणची एका नव्या दिशेने वाटचाल सुरु आहे, हे विरोधकांना खपत नसावे, असा माझा अंदाज आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकारण केले जात आहे, असा आरोप हॉटेल मालक भोसले यांनी केला.
Phaltan Doctor Case: डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांशी राहुल गांधींचा फोनवरून संवाद
फलटणच्या डॉक्टर तरुणीचा आत्महत्येनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तरुणीचा कुटुंबीयांची भेट घेतली .यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबाशी फोनवरून संवाद साधला .राहुल गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती कुटुंबाकडून जाणून घेतली .या घटनेत आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी पीडित कुटुंबाकडून करण्यात आली आहे.
Phaltan Doctor Case: पीडित डॉक्टरच्या वडिलांची प्रतिक्रिया…
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील कुटुंबासमवेत फोनवरून संवाद साधला. यावेळी कुटुंब मराठीत बोलत होते . राहुल गांधी हे सर्व ऐकून घेत होते. ‘तुम्हाला आता काय हवंय ? ‘ असं राहुल गांधीनी विचारताच पीडित कुटुंबांनी या प्रकरणी ‘SIT चौकशी आणि आरोपींना फाशी ‘ या दोन्ही गोष्टीची मागणी केली… यावेळी राहुल गांधींनी होकार देत तुम्ही काळजी करू नका . आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे आश्वासित केले. दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा थेट दबाव पोलीस प्रशासनावर आहे त्यामुळे पोलीस चौकशी करत नाहीत असा गंभीर आरोप केलाय.
Viral News: जीमला जाण्याचा कंटाळा हा जागतिक प्रश्न आहे असं मस्करीत म्हटलं जातं. अनेकजण नवीन वर्षाचा संकल्प म्हणून जीमची मेंबरशीप घेतात. मात्र पहिल्या आठवड्याच्या आतच त्यांचा उत्साह मावळतो आणि जीमची वाटही आठवत नाही असा प्रकार सामान्य बाब आहे. मात्र एका जीमने आपल्या मेंबर्सला प्रोत्साह देण्यासाठी चक्क सुपर कार भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जगभरामध्ये जीमच्या या निर्णयाची चर्चा आहे.
Add Zee News as a Preferred Source
नेमकं हे चॅलेंज काय?
चीनमधील शांडोंग प्रांतात असलेल्या बिन्झोऊ येथील एका जीमने एक अनोखं चॅलेंज आपल्या मेंबर्ससाठी सुरु केलं आहे. या फिटनेस सेंटरने तीन महिन्यामध्ये म्हणजेच 90 दिवसांमध्ये 50 किलो वजन कमी करु शकणाऱ्या व्यक्तीला पोर्शे पॅनामेरा कार भेट देण्याची ऑफर दिली आहे. 23 ऑक्टोबर रोजी ही घोषणा करण्यात आली आहे. मात्र आता सोशल मीडियावर ही ऑफर व्हायरल झाल्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. एकीकडे या बक्षिसाची चर्चा असतानाच दुसरीकडे आरोग्यविषय तज्ञांनी एवढ्या कमी वेळात एवढं वजन कमी करणं धोक्याचं ठरु शकतं असा इशारा दिला आहे.
या कारची किंमत किती?
या जीमच्या प्रमोशनल पोस्टरनुसार, या चॅलेंजमधील विजेत्याला चिनी चलनानुसार 1.1 दशलक्ष युआन ( भारतीय चलनानुसार अंदाजे 1 कोटी 36 लाख रुपये) किमतीची पोर्श पॅनामेरा बक्षीस म्हणून दिली जाणार आहे.
त्यानंतर रजिस्ट्रेशन होणार बंद
वांग नावाच्या एका फिटनेस प्रशिक्षकाने स्थानिक प्रसारमाध्यम असलेल्या ‘शियांग यांग व्हिडिओ’शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “हे चॅलेंज खरं आहे आणि आधीपासूनच सुरू झालं आहे,” असं वांग म्हणाले. त्यांनी असेही सांगितले की 30 जणांनी यासाठी नोंदणी केल्यानंतर नोंदणी बंद केली जाणार आहे. आतापर्यंत हे आव्हान सात ते आठ जणांनी स्वीकारलं आहे.
रजिस्ट्रेशन फी किती?
या चॅलेंजसाठी नोंदणी शुल्क 10 हजार युआन (सुमारे 1.24 लाख रुपये) इतके आहे. ही नोंदणी करणाऱ्यांच्या राहण्याच्या सोयीपासून ते जेवणापर्यंत सर्व गोष्टींची काळजी जीमकडून घेतली जाणार आहे. मात्र कोणत्या पद्धतीचा व्यायम किंवा वर्कआउट्स अथवा डाएट या स्पर्धांना दिला जाणार आहे याची माहिती जीमने उघड केलेली नाही. वांग यांनी स्पष्ट केले की ऑफर करण्यात आलेली ही पोर्श कार नवीन नसून जीम मालकाच्या मालकीची आहे. या कारचं मॉडेल 2020 सालातील आहे.
नव्या वादाला फुटलं तोंड
या चॅलेंजची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे. अनेकांनी या चॅलेंजमध्ये सहभागी होणाऱ्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर काय? असा प्रश्न उफस्थति केला आहे. “मी स्वत: 50 किलो वजन कमी केलं तर अवघा पाच किलोचा राहील. हे चॅलेंज स्वीकारल्यावर मी जिवंत राहील का हाच मला प्रश्न आहे,” असं एकाने म्हटलं आहे.
डॉक्टर म्हणतात हे धोकादायक…
वैद्यकीय तज्ञांनीही या चॅलेंजच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ‘वेइबो’वरील (लोकप्रिय चिनी सोशल मिडिया साईट) लोकप्रिय मेडिकल इन्फ्युएन्सर डॉ. झेंग यांनी इशारा दिला की दररोज अर्था किलो वजन कमी करणे हे फारच धोकादायक आहे. अशा स्थितीमध्ये चरबी कमी होण्याऐवजी स्नायू कमी होण्याचा धोका अधिक असल्याचंही झेंग यांनी सांगितलं.
Beer Expry Date: भारतात बिअर पिणा-यांचा एक वर्ग निर्माण झालाय. बिअर दारुचा एक प्रकार असतानाही बिअर पिण्याला आधुनिक जीवनशैलीशी जोडून पाहिलं जातं. बिअर पिणं आरोग्याला धोकादायक आहेच पण मुदतबाह्य बिअर पिणं घातक असल्याची माहिती समोर आलीय. मुदतबाह्य बिअर प्यायल्यानं एका तरुणाला त्याची मोठी किंमत मोजावी लागलीये.
Add Zee News as a Preferred Source
बिअर पिणा-या तळीरामांची संख्या कमी नाही. बिअर पिण्यासाठी अनेकजण फक्त बहाणे शोधताना दिसतात. कुणी वाढदिवसाचा बहाणा हवा असतो… कुणाला लग्नाच्या पार्टीचा बहाणा हवा असतो. काही जण सहलीचाही बहाणा बिअर पिण्यासाठी शोधतात. तर काहीजण विकेंडलाही बिअर पिण्याची संधी सोडत नाही. काही स्वयंघोषित तज्ज्ञ तर बिअर पुराण सांगण्यासही मागंपुढं पाहत नाही. पण बिअर पिणा-यांसाठी एक धोकादायक गोष्ट समोर आलीय. मुदत संपलेली बिअर प्यायल्यास तुमचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.
कल्याणमध्ये एका बिअर शॉपमध्ये मुदत संपलेली बिअर विकली जात असल्याचा धक्कादायक बाब समोर आलीय. कल्याणमधील एका तरुणानं बिअर विकत घेतली होती. बिअर प्यायल्यानंतर त्याला उलटी जुलाबाचा त्रास होऊ लागला. अस्वस्थ वाटू लागल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. कुटुंबियांनी बिअरच्या बाटलीवरील एक्सपायरी डेट पाहिल्यावर सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. बिअरच्या बाटलीची मुदत सप्टेबर महिन्यातच संपली होती.
एक्सपायरी डेट उलटून गेलेल्या बिअरबाबत तक्रार केल्यानंतर उत्पादन शुल्क विभागानं कारवाईला सुरुवात केली. त्यांनी संबंधित बिअर शॉपीत भेट देऊन तिथल्या मालाची तपासणी केली. तपासणीत अनेक बिअरच्या बाटल्यांची मुदत संपल्याचं स्पष्टपणं दिसत होतं. मुदत संपलेला माल संबधित बिअर शॉपचा मालक चालवत असल्यानं उत्पादन शुल्क विभागानं त्यांच्यावर कारवाई केलीय.
बाटलीबंद बिअर कितीही वर्षानंतर प्या त्यानं कसलीही बाधा होत नाही असा समज सामान्यांमध्ये होता. पण बिअरच्या बाटलीवर फक्त उत्पादित दिवसापासून सहा महिन्यापर्यंतचीच मुदत छापण्यात आलीय. त्यानंतर कोणतीही बिअर कालबाह्य होते असं सांगण्यात आलंय. असा कालबाह्य बिअर प्यायल्यास कोणत्याही माणसाला त्याची बाधा होणारच असं तज्ज्ञ सांगतात. काही बाटलीबंद पेयांची मुदत संपल्यावर त्यातील घटकांमध्ये केमिकल रिऍक्शन होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
बिअरबाबत अनेक गैरसमज जनमानसात आहेत. बिअर पिण्यासाठी बहाणे शोधण्याऐवजी बिअर शरिराला घातक आहे हे लक्षात ठेवा. त्यात एक्पायरी डेट उलटून गेलेल्या बिअरसारख्या पेयास तर हातही लावू नका.मुदतबाह्य बिअर तुम्हाला मृत्यूच्या दारात घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं राहा खबरदार
FAQ
१. मुदतबाह्य बिअर प्यायल्याने कल्याणमधील तरुणाला काय त्रास झाला?
उत्तर: कल्याणमधील एका तरुणाने मुदत संपलेली बिअर प्यायल्याने उलटी आणि जुलाबाचा त्रास होऊन अस्वस्थ वाटू लागले. त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.
२. बिअरची मुदत किती काळ असते आणि मुदत संपल्यावर काय होते?
उत्तर: बाटलीबंद बिअरची मुदत उत्पादन तारखेपासून फक्त सहा महिने असते. मुदत संपल्यावर त्यातील घटकांमध्ये केमिकल रिऍक्शन होऊन आरोग्याला धोका होतो.
३. उत्पादन शुल्क विभागाने मुदतबाह्य बिअर विकणाऱ्या दुकानावर काय कारवाई केली?
उत्तर: तक्रारीनंतर उत्पादन शुल्क विभागाने बिअर शॉपची तपासणी केली. अनेक बाटल्या मुदतबाह्य असल्याचे आढळल्याने दुकान मालकावर कारवाई केली.
Anencephaly Baby : गर्भधारणा झाल्यानंतर बाळाच्या जन्मापर्यंत आईला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आहार, नियमित तपासणी आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधं नियमित घ्यावी लागते. गर्भातील बाळाचा विकासासाठी आईसोबत कुटुंबातील इतर सदस्यांनी अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागतात. आई किंवा कुटुंबाच्या थोड्याही दुर्लक्षाने बाळाच्या जीवावर बेतू शकतं. अशी एक धक्कादायक घटना सोशल मीडियावर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनिया गुप्ता यांनी सांगितलं आहे. कुटुंबाच्या एका चुकीमुळे विना डोक्याचं बाळ जन्माला आलं आहे. नेमकं काय चुकलं आणि काय घटना याबद्दल डॉक्टरांनी व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.
Add Zee News as a Preferred Source
‘ती’ एक चूक पडली महागात
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनिया गुप्ता यांनी व्हिडीओमध्ये सांगितलं की, सहाव्या महिन्यापर्यंत गर्भात बाळाची पूर्ण विकास होत असतो. पण एक महिला सहाव्या महिन्यात डॉक्टरांकडे तपासणीसाठी आली. तेव्हा डॉक्टरांनी तिची सोनोग्राफी केल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टरांनी महिलेला विचारलं, तिने आतापर्यंत चेकअप केलं होतं की नाही? तेव्हा त्या महिलेने सांगितलं, की कुटुंबाला तिने अनेकदा याबाबत सांगितलं होतं. मात्र कुटुंबाने महिलेला डॉक्टरांकडे तपासणी करण्यासाठी मनाई केली. याचा परिणाम म्हणजे त्या गर्भवतीच्या गर्भातील बाळ हे विना डोक्यचं होतं. हा गंभीर जन्मजात विकार असून त्याला वैद्यकीय भाषेत Anencephaly असं म्हणतात.
डॉक्टरांनी सांगितलं की, या स्थितीत बाळाचा मेंदू आणि डोक्यावरील भाग विकसित होत नाही. असं बाळ जिवंत राहू शकत नाही. गरोदरपणाच्या पहिल्या आठवड्यांमध्ये फॉलिक अॅसिडच्या कमतरतेमुळे ही गंभीर समस्या उद्भवू शकते. फोलिक अॅसिड गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात बाळाचं डोकं आणि पाठीच्या कण्याचा विकास करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं.
स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात की, महिलेच्या कुटुंबातील मंडळी निष्काळजीपणा करीत असतील तर अशा वेळी महिलेनेच पुढाकार घ्यायला हवा. या प्रकरणात जर कुटुंबाने दुर्लक्ष केलं नसतं तर योग्य वेळेत फोलिक अॅसिडच्या गोळ्यांमुळे बाळ वाचलं असतं आणि त्याच्या डोक्याचा विकास झाला असता. त्यामुळे प्रेग्नेन्सीची टेस्ट पॉझिटिव्ह येताच डॉक्टरांच्या सल्ल्याने फोलिक अॅसिड टॅबलेट घ्यायला हवं.
FAQ
प्रश्न १: सोशल मीडियावर डॉ. सोनिया गुप्ता यांनी कोणती धक्कादायक घटना सांगितली? उत्तर: डॉ. सोनिया गुप्ता यांनी एका गर्भवती महिलेची घटना सांगितली, ज्यात कुटुंबाच्या दुर्लक्षामुळे सहाव्या महिन्यात सोनोग्राफी केल्यावर गर्भातील बाळ विना डोक्याचे (Anencephaly) आढळले. यामुळे बाळ जिवंत राहू शकत नाही.
प्रश्न २: या घटनेत नेमके काय चुकले? उत्तर: महिलाने कुटुंबाला अनेकदा तपासणीसाठी सांगितले, पण कुटुंबाने मनाई केली. परिणामी, गर्भावस्थेच्या सुरुवातीला नियमित तपासणी आणि फॉलिक अॅसिड न घेतल्याने बाळाचा मेंदू आणि डोक्याचा विकासच झाला नाही.
प्रश्न ३: Anencephaly म्हणजे काय? उत्तर: Anencephaly हा जन्मजात विकार आहे, ज्यात बाळाचा मेंदू आणि डोक्यावरील भाग विकसित होत नाही. हा गंभीर आजार असून, अशा बाळाला जिवंत राहणे शक्य नाही. याची सुरुवात गर्भावस्थेच्या पहिल्या आठवड्यांमध्ये होते.
मुंबई/फलटण : मंगळवार, दिनांक २८ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या महत्त्वपूर्ण बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या आमदारांना जोरदार तंबी दिली. “मतदारसंघात फिरा, पक्षाची ताकद दाखवा, विनाकारण मुंबईत थांबू नका” अशा कडक शब्दांत त्यांनी आमदारांना फटकारले.
स्थानिक संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागा, मतदारसंघात सक्रिय राहा आणि कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच, “संपर्क मंत्री जिल्ह्यात काम करत नाहीत, त्यापैकी ५०% मंत्री निष्क्रिय आहेत” अशी नाराजीही त्यांनी स्पष्ट शब्दांत व्यक्त केली.
दरम्यान, फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे आमदार सचिन पाटील यांनी गेल्या काही काळात पक्षाची स्वतंत्र ताकद उभारण्यात अपयश आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. फलटण तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती व विकास सोसायट्यांवर राजे गटाची सत्ता, तर काही ठिकाणी भाजपचे वर्चस्व दिसून येत आहे.
सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला, तरी सध्या भाजपने स्थानिक निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात भाजपचे चार आमदार असल्याने त्यांची संघटनात्मक ताकद वाढताना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर २६ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण दौऱ्यादरम्यान आमदार सचिन पाटील हे उपस्थित राहिल्याने राजकीय चर्चा रंगल्या. त्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार वाई येथे होते. त्यामुळे — “सचिन पाटील हे भाजपचे की राष्ट्रवादीचे?” — असा सवाल फलटण तालुक्यात उभा राहिला आहे.
गेल्या वर्षभरात फलटण तालुक्यात राष्ट्रवादी (अजित पवार गट) मधील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करताना दिसले; मात्र उलट्या दिशेने फारसे प्रवेश झाले नाहीत, अशी चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात आहे.
आता या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार सचिन पाटील यांच्या भूमिकेबाबत काय निर्णय घेतात, याकडे फलटण तालुक्याचे आणि सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
फलटण : महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणात आज नवे वळण आले आहे. हॉटेल मधुदीप चे प्रमुख दिलीपसिंह भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन घटनेचा सविस्तर खुलासा केला. या वेळी तेजसिंह भोसले आणि रणजितसिंह भोसले उपस्थित होते.
भोसले यांनी सांगितले की, “दि. 23 ऑक्टोबर रोजी रात्री 1:30 वाजता सदर महिला दुचाकीवरून हॉटेलच्या गेटवर आली. बारामतीला जायचे असल्याचे सांगून तिने रूमची मागणी केली. वॉचमनने तिला आत घेतल्यानंतर ती रिसेप्शनला आली, स्वतःच्या हाताने रजिस्टरमध्ये नाव नोंदवले आणि आधारकार्ड दिले. त्यानंतर रूमची चावी घेऊन स्वतःच रूम उघडली.”
भोसले पुढे म्हणाले, “महिला रात्री उशिरा आल्यामुळे सकाळी चहा-पाणी देण्यासाठी दार वाजवले गेले नाही. मात्र दुपारी 12 नंतर प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी 6:30 च्या सुमारास पोलिसांना कळवून दार उघडण्यात आले असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतरचा संपूर्ण तपास पोलिसांनी हाती घेतला आहे.”
भोसले यांनी स्पष्ट केले की, “घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आम्ही पोलिस प्रशासनाला दिला असून, त्या फुटेजनुसार महिला रूममध्ये गेल्यानंतर इतर कोणतीही व्यक्ती आत गेलेली नाही. गेल्या 32 वर्षांत हॉटेलच्या इतिहासात असा प्रसंग कधीच घडलेला नाही. सज्ञान व्यक्तीला रूम देणे हे आमचे कायदेशीर कर्तव्य आहे.”
शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि जयश्री आगवणे यांनी हॉटेलवर केलेल्या आरोपांबाबत भोसले म्हणाले, “आमच्यावर झालेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत. सर्व आवश्यक पुरावे आम्ही पोलिसांना दिले असून, तपासात सत्य निश्चितपणे स्पष्ट होईल.”
Robotic Surgery Viral Video: आरोग्य आणि शिक्षण हे आपल्या समोरचे मोठे प्रश्न आहेत. त्यामुळेच यासाठी खर्च करायला कोण मागेपुढे पाहत नाही. आरोग्याच्या बाबतीत तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय. पण कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारावर प्रभावी उपचार शोधणं हे जगासमोरचं आव्हान बनलंय. आजही मुंबईतील टाटा रुग्णालयाबाहेरची गर्दी पाहून आपल्या लक्षात येईल. भारतात कॅन्सरवर उपचारासाठी काही मोजकेच पर्याय आहेत. असे असताना चीनने आपण जगाच्या किती पुढे आहोत हे दाखवून दिलंय. एका व्हायर व्हिडीओवर विश्वास ठेवला तर चीन किती पुढे गेलंय याची प्रचिती आपल्याला येईल.
Add Zee News as a Preferred Source
सोशल मीडियावर धडकलेल्या व्हिडिओत एका वैद्यकीय विद्यार्थिनीने चीनच्या रुग्णालयातील प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णाची शस्त्रक्रिया दाखवली. ही संपूर्ण प्रक्रिया मानवी हाताऐवजी रोबोटिक यंत्राद्वारे पार पडते. ऑपरेशन थिएटर अतिशय स्वच्छ, आधुनिक आणि भविष्यवादी दिसते, ज्यामुळे भारतीय प्रेक्षक थक्क होतात.
देसी अंदाजात सुरुवात
व्हिडिओची सुरुवात ‘सबको राम राम’ अशा देशी शुभेच्छेने होते. विद्यार्थिनी हसतमुखाने कॅमेर्याकडे पाहून चीनमधील रोबोटिक शस्त्रक्रियेची ओळख करून देते. ती सांगते की, रुग्णाला प्रोस्टेट कॅन्सर असून, रोबोट शांतपणे आणि अचूकतेने काम करतो, जणू काही चित्रपटातील दृश्य दाखवत असल्याचे भासते.
दा विंची यंत्राचे चार हात
रुग्णालयात दोन ‘दा विंची’ रोबोटिक मशीन आहेत. या यंत्राचे चार यांत्रिक हात रुग्णाच्या शरीरात प्रवेश करून शस्त्रक्रिया करतात. डॉक्टर थेट ऑपरेशन टेबलाजवळ नसतात; ते वेगळ्या कंसोलवर बसून हात-पायांच्या हालचालींनी यंत्र नियंत्रित करतात. यामुळे डॉक्टरांना 7-8 तास उभे राहावे लागत नाही, इतके प्रगत तंत्रज्ञान आपल्याला पाहायला मिळते.
‘टेलिरोबोटिक सर्जरी’
या तंत्रज्ञानाची खरी ताकद ‘टेलिरोबोटिक सर्जरी’मध्ये आहे. डॉक्टर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून इंटरनेटद्वारे रोबोट चालवू शकतात. अंतर नष्ट करून उपचार जगभरात उपलब्ध होतात. ही सुविधा वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवणारी दिसत आहे.
नेटकरी काय देतायत प्रतिक्रिया?
व्हिडिओ व्हायरल झाल्यावर लोक त्यावर भराभर कमेंट्स करतायत. कोणी म्हणाले, ‘टर्मिनेटरचा काळ आलाय’, तर कोणी लिहिले, ‘रोबोट रुग्ण शस्त्रक्रिया करतात म्हणजे मानव खरेच पुढे गेला.’ अनेकांनी चीनच्या प्रगतीला ‘2060 चे जग’ असे संबोधलंय. ज्यामुळे भारतासमोर आव्हान उभे असल्याची प्रतिक्रियाही येत आहेत.
FAQ
१. चीनमध्ये कर्करोगाची शस्त्रक्रिया कोण करते?
उत्तर: चीनच्या रुग्णालयात प्रोस्टेट कॅन्सरची शस्त्रक्रिया ‘दा विंची’ नावाच्या रोबोटिक यंत्राद्वारे होते. हे यंत्र चार यांत्रिक हातांनी अचूक आणि शांतपणे काम करते.
२. डॉक्टर शस्त्रक्रियेसाठी कुठे असतात?
उत्तर: डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये नसतात; ते वेगळ्या कंसोल सिस्टमवर बसून हात-पायांच्या हालचालींनी रोबोट नियंत्रित करतात. यामुळे त्यांना तासन्तास उभे राहावे लागत नाही.
३. टेलिरोबोटिक सर्जरी म्हणजे काय?
उत्तर: टेलिरोबोटिक सर्जरी म्हणजे डॉक्टर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून इंटरनेटद्वारे रोबोट चालवून शस्त्रक्रिया करू शकतात. हे तंत्रज्ञान अंतर नष्ट करून उपचार जगभरात उपलब्ध कराते.
Gujarat Tourists Viral Video: पर्यटकांकडून होणारी हुल्लडबाजी हा जगभरात कायमच चर्चेचा विषय ठरतो. कधी ऐतिहासिक ठिकाणांचं महत्त्व न समजून घेता केलेलं कृत्य तर कधी हॉटेलमध्ये घातलेला गोंधळ अशा कोणत्या ना कोणत्या कारणाने उपद्रवी पर्यटक कायमच बातम्यांच्या मथळ्यांमध्ये झळकत असतात. मात्र राजस्थानमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळावर एका गुजराती कुटुंबाने केलेल्या कृत्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या साऱ्या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
Add Zee News as a Preferred Source
नेमकं या पर्यटकांनी केलं काय?
राजस्थानमधील माउंट अबूजवळील सियावा येथील हॅपी डे हॉटेलमध्ये हा विचित्र प्रकार घडला आहे. येथे पर्यटनासाठी आलेल्या एका गुजराती कुटुंबाने हॉटेलच्या बिलाचे पैसे न देता पळून जाण्याचा कट रचला. विशेष म्हणजे या पळून जाण्याच्या प्लॅनमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. हे पर्यटक आधी हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी भरपूर पदार्थ मागवले. नंतर ते मनसोक्त जेवले. मात्र जेव्हा पैसे देण्याची वेळ आली तेव्हा सर्वांनी हळूच तिथून पळून जाण्याचं ठरवलं.
कसा पळ काढला?
या पाच जणांनी एक-एक करून वॉशरूममध्ये जाण्याचे नाटक केले, नंतर बाहेर पडताच कारमध्ये बसून पळून जाऊ लागले. मात्र हॉटेल मालक आणि वेटरला संशय आला आणि त्यांनी लगेच या पाच जणांचा पाठलाग केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार गुजरात-राजस्थान सीमेवरील अंबाजीकडे जाताना स्पष्टपणे दिसत होती.
वाहतूक कोंडीत अडकले अन्…
हॉटेल मालकाने ट्रॅफिकमधून गाडीचा पाठलाग केला आणि गुजरात सीमेवर पोहोचला. पोलिसांच्या मदतीने, त्या पाचही जणांना ट्रॅफिकमध्ये अकलेले असतानाच पकडण्यात आले. त्यानंतर भररस्त्यात तुफान बाचाबाची आणि राडा झाला. घाबरलेल्या पर्यटकांनी एका मित्राला फोन केला आणि बिल भरण्यासाठी ऑनलाइन मनी ट्रान्सफरची मागणी केली. शेवटी, पर्यटकांनी त्यांच्या मित्राकडे पैसे मागितले आणि बिल भरले.
अशा पर्यटकांमुळे इतरही लोक बदनाम होतात
या पर्यटकांना हॉटेल मालकाने रंगेहाथ पकडल्यानंतर रस्त्यातच या पर्यटकांचा आणि हॉटेल मालकाचा वाद झाला. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या पर्यटकांनी स्वत:बरोबरच राज्याचंही नाव खराब केल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी अशा पर्यटकांमुळे सर्वसामान्य पर्यटकही बदनाम होतात असं म्हणत अशा लोकांना कठोर शिक्षा केली पाहिजे असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ तुम्हीही एकदा पाहाच…
गुजरात के 5 पर्यटकों ने राजस्थान के माउंट आबू में रेस्टोरेंट पर 10900 रुपए का खाना खाया और बिल चुकाए बिना भाग निकले। जाम में फंस गए और पकड़े गए। फिर माफी मांगी। दोस्त को कॉल करके उससे खाने का ऑनलाइन पेमेंट कराया। pic.twitter.com/DAqu8KEmrb