Saturday, July 4, 2026
Home Blog Page 103

नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका 2025 – ऑनलाइन प्रक्रियेत सोपेपणा; नामनिर्देशनाची मुद्रित प्रत अनिवार्य!

0
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका 2025 – ऑनलाइन प्रक्रियेत सोपेपणा; नामनिर्देशनाची मुद्रित प्रत अनिवार्य!

फलटण :- राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशन दाखल करण्यास सुरुवात झाली असून उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. या संकेतस्थळावर उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरावी लागते. आयोगाने स्पष्ट केले आहे की, ऑनलाइन फक्त माहिती भरणे आवश्यक असून कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही. माहिती भरून पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांनी त्याची मुद्रित प्रत (प्रिंट आउट) काढून त्यावर स्वतःची तसेच सूचकांची स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे.

स्वाक्षरी केलेली ही प्रिंटआउट प्रत प्रत्यक्षात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जमा करताना आवश्यक कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे. या कागदपत्रांमध्ये नगरपरिषद/नगरपंचायतीचे नादेय प्रमाणपत्र, शौचालय वापर प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणापत्र, निवडणूक खर्चासाठी बँक खात्याचा तपशील, राखीव जागांसाठी जातप्रमाणपत्र, तसेच पक्षाकडून उमेदवारी असल्यास जोडपत्र-१ किंवा जोडपत्र-२ यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, संपूर्ण संच विहित मुदतीत दाखल करणे अनिवार्य आहे.

संकेतस्थळ १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत २४ तास सुरू राहणार असून उमेदवार कोणत्याही वेळी नोंदणी करू शकतात. नोंदणी करताना तयार होणारा लॉगिन आयडी आणि पासवर्ड काळजीपूर्वक जतन करणे आवश्यक आहे, कारण पुढील सर्व माहिती भरण्यासाठी त्याची आवश्यकता असते. नामनिर्देशनपत्र आणि आवश्यक कागदपत्रांचा संपूर्ण संच १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करावाच लागेल.

विशेष म्हणजे, आयोगाने १५ नोव्हेंबर २०२५ या शनिवारी सुट्टी असूनही नामनिर्देशन स्वीकारण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, १६ नोव्हेंबर २०२५ रोजी रविवारी नामनिर्देशन स्वीकारले जाणार नाही. उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे सहज उपलब्ध करून देण्यासाठी सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींना योग्य निर्देश देण्यात आल्याचे आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: आपण स्वतःच्या यशाचे कौतुक केले तर अहंकार निर्माण होतो

0
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:  आपण स्वतःच्या यशाचे कौतुक केले तर अहंकार निर्माण होतो


  • Marathi News
  • Opinion
  • Column By Pt. Vijayshankar Mehta, If We Praise Our Own Success, It Creates Arrogance

2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

यशाचा उत्स्फूर्त स्वीकार आनंद आणतो. जेव्हा आपण यशस्वी होतो तेव्हा त्याची घोषणा करू नका. फक्त ते स्वीकारा. ज्याप्रमाणे आपण मंदिरात जातो. देवाचे दान स्वीकारतो आणि त्याचा आदर करतो, त्याचप्रमाणे आपण यशाला देवाची कृपा म्हणून स्वीकारले पाहिजे. परंतु जर आपण आपल्या यशाची घोषणा केली तर अहंकार नक्कीच आत शिरतो. इतरांनी आपल्या यशाच्या कहाण्या सांगितल्या तर ठीक आहे, परंतु आपण स्वतः गोंधळ निर्माण केला तर ते धोकादायक आहे.

रावण स्वतःच्या प्रत्येक लहान-मोठ्या यशाचे कौतुक करायचा. या अहंकारामुळे तो मारला गेला. हनुमानालाही मोठे यश मिळाले. त्याने रावणाच्या समोर त्याची लंका नष्ट केली आणि भगवान रामांनी त्याला ज्या उद्देशासाठी पाठवले होते तो साध्य केला. यानंतरही, जेव्हा हनुमान परतला आणि भगवान राम त्याला विचारू इच्छित होते, तेव्हा तो गप्प राहिला. जांबुवंत आणि सुग्रीवाने हनुमानाच्या कर्तृत्वाचे कौतुक केले. आपणही हनुमानाचे हे तत्त्व स्वीकारूया.



Source link

फलटणमध्ये रंगणार ‘राजे विरुद्ध खासदार’ महासंग्राम! – नगरपरिषदेसाठी दोन्ही गटांचे ‘पॉवर गेम’ सुरू

0
फलटणमध्ये रंगणार ‘राजे विरुद्ध खासदार’ महासंग्राम! – नगरपरिषदेसाठी दोन्ही गटांचे ‘पॉवर गेम’ सुरू

फलटण प्रतिनिधी  : आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी “बदला नाही, बदल घडवायचा आहे” या निर्धाराने मैदानात उतरल्याने फलटणच्या राजकारणात नवे समीकरण आकार घेत आहेत. नगरपालिकेवर आपले नेतृत्व स्थापित करण्यासाठी त्यांनी प्रत्येक प्रभागात सशक्त उमेदवार उभे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

दरम्यान, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या गटातील काही प्रभावी नेते व कार्यकर्त्यांना आपल्या गटात घेतल्याने राजे गटातही हालचालींना वेग आला आहे.

मुंबईत झालेल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे आणि श्रीमंत संजीवराजे यांनी नव्या रणनीतीवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. “दहशतमुक्त फलटण” या टॅगलाईनखाली हे तिन्ही राजे पुन्हा एकदा सत्ताधारी महायुतीच्या नेतृत्वाखाली फलटण नगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.

या घडामोडींमुळे फलटण नगरपरिषद निवडणूक ही राजे गट विरुद्ध खासदार गट अशा थेट लढतीत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरात राजकीय तापमान चढले असून — “फलटणमध्ये पुन्हा ‘रामराज्य’ येणार का? की खासदार गटाकडे सत्ता जाणार?” — या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी केवळ फलटणच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.

सोलापुरात वंचितची नवी ताकद  माजी नगरसेवक रवि (बॉस) गायकवाड वंचित बहुजन आघाडीत

0
सोलापुरात वंचितची नवी ताकद  माजी नगरसेवक रवि (बॉस) गायकवाड वंचित बहुजन आघाडीत

सोलापूर :  सोलापूर शहरात आज राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल झाली आहे. शहरातील नामवंत, जनसंपर्क असलेले आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असलेले माजी नगरसेवक रवि (बॉस) गायकवाड यांनी वंचित बहुजन आघाडीत अधिकृत प्रवेश केला.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष व सोलापूर जिल्हा निरीक्षक सोमनाथ साळुंखे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडी, तसेच यशपाल सोनकांबळे, यशवंत इंगळे, चंद्रकांत शिंगे, बनसोडे, राजकुमार वाघमारे, अशोक कल्लाप्पा शिंगे आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

रवि गायकवाड यांच्या प्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीस सोलापूर शहरात नवी उर्जा आणि संघटनात्मक बळ प्राप्त झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. आगामी स्थानिक आणि राज्यस्तरीय राजकारणात या प्रवेशाचा लक्षणीय परिणाम दिसून येईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

‘या’ सोन्यात सर्वाधिक रिस्क! SEBI चा सर्वसामान्यांना इशारा; तुम्हीसुद्धा अशी गुंतवणूक करत नाही ना?

0
‘या’ सोन्यात सर्वाधिक रिस्क! SEBI चा सर्वसामान्यांना इशारा; तुम्हीसुद्धा अशी गुंतवणूक करत नाही ना?


SEBI Warns Investors On Gold: ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि अॅप्स सोन्यात गुंतवणूक करण्यास ‘डिजिटल गोल्ड’ किंवा ‘ई-गोल्ड’ हा एक सोपा पर्याय म्हणून देत आहेत. पण याबाबत आता सावधगिरीचा इशारा दिला जात आहे. डिजिटल गोल्ड उत्पादनांचे नियमन सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे केले जात नाही. यामुळे संपूर्ण क्षेत्रात धोका अधिक आहे.

Add Zee News as a Preferred Source

…म्हणून सावध राहण्याची गरज

डिजिटल सोन्यातील यूपीआयद्वारे गुंतवणूक 100% पेक्षा जास्त वाढली आहे. अनेक कंपन्या 99.9% शुद्धता असलेले सोने तिजोरीत साठवल्याचे दावे करतात, परंतु या दाव्यांचे ऑडिट केले जात नाही आणि गुंतवणूकदारांना सोने प्रत्यक्षात त्यांच्या नावाने खरेदी केले गेले आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही कागदपत्रं मिळत नाही. जर प्लॅटफॉर्म बंद झाले किंवा दिवाळखोर झाले तर गुंतवणूकदारांचे पैसे बुडू शकतात, असा इशारा सेबीकडून देण्यात आला आहे. 

डिजिटल सोने म्हणजे काय?

डिजिटल सोने (Digital Gold) म्हणजे प्रत्यक्ष सोन्याची मालकी न घेता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सोने खरेदी करण्याचा, साठवण्याचा आणि विक्री करण्याचा एक आधुनिक आणि सोयीस्कर मार्ग आहे, असं सोप्या भाषेत सांगता येईल. या प्रक्रियेमध्ये, ग्राहकांकडून खरेदी केलेल्या सोन्याच्या प्रमाणात (ग्रॅममध्ये) वास्तविक (भौतिक) सोने सुरक्षित व्हॉल्टमध्ये (vault) किंवा तिजोरीत साठवले जाते. 

डिजिटल सोन्याची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे काय सांगितली जातात?

सुरक्षितता: प्रत्यक्ष सोने घरी ठेवल्याने चोरीची किंवा नुकसानीची भीती असते. डिजिटल सोन्यामध्ये, ग्राहकांचे सोने व्यावसायिक तिजोरीत पूर्ण विम्यासह सुरक्षित ठेवले जाते.

लवचिकता: ग्राहकांच्या गरजेनुसार अगदी कमी प्रमाणातही (उदाहरण: 0.5 ग्रॅम किंवा एक हजार रुपये किंमत) सोने खरेदी करू शकता.

पारदर्शकता: खरेदी-विक्रीचे दर बाजारातील सोन्याच्या सध्याच्या किमतीशी जोडलेले असतात, ज्यामुळे व्यवहारात पूर्ण पारदर्शकता राहते.

तरलता: डिजिटल सोने ग्राहक कधीही, कुठेही सहजपणे विकू शकता आणि त्याचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात मिळवू शकता.

भौतिक वितरणाचा पर्याय: काही प्रोव्हायडर ग्राहकांच्या गरजेनुसार जमा झालेले डिजिटल सोने प्रत्यक्ष सोन्याच्या नाण्यांच्या किंवा बारच्या स्वरूपात घरपोच मिळवण्याचा पर्याय देतात.

हे व्यवहार कोणत्या प्लॅटफॉर्मवरुन होतात?

हे व्यवहार सामान्यतः MMTC-PAMP (सरकारी आणि स्विस भागीदारी) किंवा ऑगमॉन्ट गोल्ड फॉर ऑल (SafeGold) सारख्या प्रतिष्ठित प्लॅटफॉर्मद्वारे केले जातात. अनेक वित्तीय ॲप्स, पेमेंट वॉलेट्स (उदा. Google Pay, PhonePe) आणि ब्रोकरेज कंपन्या या सेवा देतात. 

(टीप – ही महिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)





Source link

नगरपरिषद निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची ताकद दाखवणारा इंटरव्यू संपन्न!

0
नगरपरिषद निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची ताकद दाखवणारा इंटरव्यू संपन्न!

सातारा प्रतिनिधी – आगामी फलटण  नगर परिषद निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने पूर्ण ताकदीने झोकून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सातारा येथे आज झालेल्या इंटरव्यू मीटिंगमध्ये पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती लाभली.

वार्ड क्रमांक ३ मधून मा. श्री. गणेश गायकवाड, वार्ड क्रमांक २ मधून उमेश ज्ञानेश्वर कांबळे, तसेच सौ. सपनाताई मिलिंद भोसले (अहिवळे) या उमेदवारांनी पक्षाच्या तिकिटावरून जोरदारपणे निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.

या बैठकीस राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हा समन्वयक डॉ. क्रांतीताई सावंत, जिल्हाध्यक्ष रामदासजी कांबळे, उपाध्यक्ष सुभाषराव गायकवाड, संघटक Adv. तेजस मोरे, फलटण तालुका अध्यक्ष संदीपभाऊ काकडे, फलटण शहराध्यक्ष उमेश कांबळे तसेच जिल्हा महिला उपाध्यक्षा चित्राताई गायकवाड उपस्थित होते.

बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. पक्षाने फलटण  नगर परिषद निवडणुकीत “वंचितांचा आवाज, परिवर्तनाचा संकल्प” या ब्रीदवाक्याने जनतेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

जय भीम! जय शिवराय ! जय जोती! जय क्रांती! जय लहुजी वस्ताद! जय अण्णाभाऊ साठे! जय वंचित! जय संविधान!

साताऱ्यातील रस्ते खराब का? उदयनराजेंनी सांगितलं वृक्ष तोडीचे कारण; जुना व्हिडीओ व्हायरल

0



Udayanraje Viral Video : सातारा म्हटलं तर सर्वात आधी नाव येतं ते खासदार उदयनराजेंचं. पक्ष कोणताही असो, उदयनराजेंचा दरारा आणि दबदबा कायम आहे. त्यामुळेच ते राष्ट्रवादीतून तीन वेळा आणि भाजपमधून दोन वेळा खासदार झालेत. उदनयराजेंनी केलेली अनेक वक्तव्यं व्हायरल होतात, त्यांची स्टाईलही हटके असते. त्यांचा असाच एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये उदयनराजेंनी साताऱ्यातील (Satara) रस्त्यांच्या अवस्थेला सरकार नव्हेत तर थेट वृक्षतोड, ग्लोबल वॉर्मिंग कारणीभूत असल्याचं सांगितलं.

आपण झाडे तोडली, म्हणून कधीही धो धो पाऊस पडतोय, कुठेही पूर येतोय आणि रस्ते वाहून जातात असा अजब युक्तिवाद उदयनराजेंनी केला. पाऊस पडल्यामुळे रस्ते वाहून जातात हे खरं आहे… पण त्याला निकृष्ट दर्जाची कामं, त्यातील भ्रष्टाचार, नेते-अधिकारी-कंत्राटदाराची भ्रष्ट साखळी जबाबदार नसून तुम्ही आम्ही जबाबदार असल्याचं अप्रत्यक्षपणे उदयनराजेंनी म्हटल्याचं दिसतंय.

Satara Election : सरकारचं अपयश नाही

साताऱ्यातील रस्त्यांची झालेली चाळण हे सरकारचे अपयश नाही तर त्याला तुम्ही आम्ही कारणीभूत आहोत. आपण झाडे तोडली, त्यामुळे कधीही पाऊस पडतोय आणि रस्ते धुऊन जातात असं उदयनराजेंनी म्हटलं. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागलं पाहिजे आणि झाडे जगवली पाहिजेत असंही ते म्हणाले.

Udayanraje On Satara Road : तुझं कंबरडं मोडलंय का?

यंदाच्या पहिल्याच पावसात साताऱ्यातील रस्ते वाहून गेले. ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य दिसत होतं. रस्त्यांच्या झालेल्या चाळणीमुळे अनेकांचं कंबरडं मोडलं, अनेकांना दुखण्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे लोकही वैतागले आहेत. त्यावर साताऱ्यातील एका स्थानिक पत्रकाराने उदयनराजेंना प्रश्न विचारला. सातारा शहरातील रस्त्यांची अवस्था पाहिली तर सातारकरांचं कंबरडं मोडलं आहे, त्यावर लोक सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत असं तो म्हणताच उदयनराजेंनी त्यावर ‘तुझं कंबरडं मोडलंय का?’ असा प्रश्न केला.

Udayanraje On Satara : नेमकं काय म्हणाले उदयनराजे?

साताऱ्यातील रस्त्याच्या प्रश्नावर बोलताना उदयनराजे म्हणाले की, साताऱ्यातील रस्ते धुऊन जातात याला कारणीभूत सरकार नाही. याला कारणीभूत तुम्ही-आम्ही आहोत. तुम्ही जो मला प्रश्न विचारला त्यापेक्षा गंभीर प्रश्न मी तुम्हाला विचारतो. पहिला 3 किंवा 4 जूनला पाऊस पडत होता, आता पडतोय का? ज्या वृक्षांमुळे तुम्ही आम्ही जिवंत आहोत, त्या वृक्षांची तुम्ही तोड केली. आज कधीही गारपीट पडते, पूर येतो, नुकसान होतं, एवढा धो-धो पाऊस कधीही पडतो. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागलं पाहिजे, झाडं जपली पाहिजेत. या गोष्टी काही एका दिवसात होत नाहीत.

Udayanraje On BJP : भाजपमध्ये सर्वसामान्यांना संधी

उदयनराजे फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत. साताऱ्यातील रस्त्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी थेट विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून मी बोलत नाही, तर एक व्यक्ती म्हणून बोलतोय. या आधी पश्चिम महाराष्ट्रातील लोकानी ज्यांना संधी दिली त्यांनी किती लक्ष दिलं? निवडणुका आल्या की लोकांपुढे जायचं आणि सांगायचं की आम्ही हे करतो, ते करतो.”

आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळाली. या आगोदर काय व्हायचं? मी शिफारस करायची आणि कुणाला तरी तिकीट मिळायचं अशी पद्धत होती, असंही उदयनराजे म्हणाले.

Satara Udayanraje Video : व्हिडीओ एक महिन्यापूर्वीचा

खासदार उदयनराजेंचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ एक महिन्यापूर्वीचा असल्याची माहिती समोर येत आहे. दिवाळीच्या दरम्यान एका स्थानिक पत्रकाराच्या प्रश्नांना उत्तर देताना उदयनराजेंनी वरील वक्तव्य केलं. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून आता तो व्हिडीओ व्हायरल केला जात असल्याची चर्चा आहे.

Satara Problems : साताऱ्यात शिक्षण, रोजगाराच्या संधीचा अभाव

साताऱ्यामध्ये एमआयडीसी आणि शिक्षणाचा अभाव हे दोन मुद्दे सर्वाधिक गंभीर आहेत. साताऱ्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना शेजारच्या पुण्याला जावं लागतं. त्याचसोबत औद्योगिकीकरण झालं नसल्यानेही युवकांना नोकरीसाठीही पुण्यात जावं लागलं. त्यामुळे खासदार उदयनराजे आणि जिल्ह्यातील मंत्र्यांनी, आमदारांनी या दोन गोष्टींवर काम करावं अशी मागणीही सातत्याने होत आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

फलटणच्या राजकारणात मोठी हालचाल! माजी नगराध्यक्ष सोमशेठ जाधव आणि विक्रम जाधव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश

0
फलटणच्या राजकारणात मोठी हालचाल! माजी नगराध्यक्ष सोमशेठ जाधव आणि विक्रम जाधव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश

फलटण :-  फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठा बदल घडला आहे. फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सोमाशेठ जाधव आणि माजी नगरसेवक विक्रम जाधव यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

हा पक्षप्रवेश सोहळा प्रभाग क्रमांक १ मधील सोमवार पेठेत सोमशेठ जाधव यांच्या निवासस्थानी पार पडला. या वेळी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादीचे फलटण तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर-निंबाळकर प्रमुख उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जाधव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याचे जाहीर करण्यात आले.

यावेळी आमदार सचिन पाटील म्हणाले,
“फलटण शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहोत. विधानसभा निवडणुकीपासूनच ‘बदला घ्यायचा नाही, तर बदल करायचा आहे’ हे आमचे धोरण आहे आणि त्याच दिशेने आम्ही कटिबद्ध आहोत.”

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर-निंबाळकर यांनीही या प्रवेशाचे स्वागत करताना म्हटले,
“उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्याचा विकास अधिक गतीने होईल. माजी नगराध्यक्ष सोमशेठ जाधव यांच्यासारखे अनुभवी नेतृत्व पक्षात आल्याने राष्ट्रवादीची ताकद निश्चितच वाढेल.”

या प्रवेशामुळे फलटण शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद लक्षणीय वाढली असून, विशेषतः प्रभाग क्रमांक १ आणि आसपासच्या परिसरातील राजकीय समीकरणे आता वेगाने बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जाधव यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शरद पवार, अदानी सोफ्यावर, मुख्यमंत्री खुर्चीवर; शाही लग्नात दिग्गज एकत्र, व्हायरल फोटो कुठला?

0



मुंबई : दोन दिवसांपूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांची निवड झाली, तेव्हा नवनिर्वाचित अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आभार मानले. कारण, या दोन्ही नेत्यांनी एमसीए निवडणुकीत त्यांना मदत केली होती. विशेष म्हणजे याच निवडणुकीसंदर्भाने भाष्य करताना शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुकही केले होते. आता, साताऱ्यातील (Satara) एका लग्नसोहळ्यात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्यासमवेत उद्योगपती गौतम अदानी हेही या लग्नसोहळ्याला हजर होते. सोशल मीडियावर या तीन दिग्गजांचे फोटो व्हायरल होत आहेत. तर, स्वत: शरद पवारांनीही सोशल मीडियातून माहिती दिली.

आयपीएस अधिकारी प्रवीण रामराव पवार यांची कन्या प्राजक्ताहिमांशू यांच्या लग्न समारंभास उपस्थित राहिलो; नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार शशिकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते, अशी माहिती शरद पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन दिली आहे. या फोटोमध्ये एका सोफ्यावर शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी बसलेले आहेत. तर, बाजुलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हेही बसल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे शरद पवारांनी शेअर केलेल्या या फोटोवर नेटीझन्स कमेंट करुन मजा घेत आहेत. तुमच्या पोस्टमध्ये गौतम अदानींचा का उल्लेख केला नाही? असा सवाल कमेंट करुन विचारला जात आहे.

दिग्गजांना जोडणारं शरद पवाराचं राजकारण 

दरम्यान, शरद पवार यांचे सर्वपक्षीय नेत्यांसमवेत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मात्र, राजकीय विरोधक म्हणून ते सत्ताधारी व भाजपवर सातत्याने टीकाही करतात. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीक केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वीच क्रिकेटच्या मैदानातील निवडणुकीतवरुन त्यांचं कौतुकही केलं होतं. तर, गौतम अदानी यांच्याशीही शरद पवारांची जवळीक आहे. त्यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकातही गौतम अदानींचा उल्लेख असून अदानींनी बारामतीलाही भेट दिली होती. त्यामुळे, शरद पवारांचं राजकारण नेहमीच दिग्गजांना जोडण्याचं पाहायला मिळालं आहे. लग्नातील या फोटोमुळे पुन्हा एकदा शरद पवारांच्या राजकारणावर चर्चा होत आहे.   

हेही वाचा

Eknath Shinde: फुकटचा ताठा अन् नाव उबाठा, एकनाथ शिंदेंची बोचरी टीका; म्हणाले, एक बिस्किटचा पुडाही दिला नाही

आणखी वाचा



Source link

इंस्टाग्रामवरची ती निघाला तो, धरणाजवळ बोलवून मारहाण; मनसे तालुकाध्यक्षासह तिघांना अटक

0



सातारा : जिल्ह्याच्या फलटण (Satara) तालुक्यातील 35 वर्षीय युवकासोबत बनावट इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवरून महिला असल्याचे भासवून चॅटिंग केल्याचा भांडाफोड झाला आहे. विशेष म्हणजे संबंधित युवकाला खंडणीची मागणी करणाऱ्या तीन जणांना शिरवळ पोलिसांनी (Police) अटक केली आहे. सध्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. तसेच, ऑनलाईन पैशांची मागणी किंवा आधार ओटीपीच्या कारणाने पैसे लाटण्याचा प्रकारही घडत आहे. त्यातच, आता सातारा जिल्ह्यात त्याने ती बनून एका युवकाला फसवल्याचं उघडकीस आला आहे.

बनावट इंस्टाग्राम अकाउंट महिला असल्याचे भासवून फलटण येथील युवकाला चॅटींगद्वारे शहरातील वीर धरण परिसरात बोलावण्यात आले होते. त्यानंतर, येथे तीन जणांकडून संबंधित युवकाला मारहाण करत लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर संबंधित युवकाने शिरवळ पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली असता अवघ्या एक तासात शिरवळ पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत यामधील तिही आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक केलेल्यांमध्ये एक युट्यूबर असून एक मसनेचा तालुकाध्यक्ष आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी युट्युबर किरण मोरे, सातारा जिल्ह्यातून तडीपार असलेला संशयित विशाल जाधव आणि मनसे तालुकाध्यक्ष इरफान शेख यांचा समावेश आहे. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आरोपींकडून याआधीही असे प्रकार घडले असल्यामुळे पोलिसांनी कोणाची तक्रार असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही नागरिकांना केले आहे. मात्र, इंस्टाग्रामवरुन किंवा सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर महिला अकाऊंटशी मैत्री करताना, चॅटिंग करताना किंवा त्या अकाऊंटवरुन गाठी-भेटी घेताना अगोदर संपूर्ण खात्री करायला हवी, हाच धडा या घटनेतून शिकायला मिळतो.

हेही वाचा

शॉकींग! लग्नात विघ्न, स्टेजवरच नवरदेवावर जीवघेणा हल्ला, नवरीला चक्कर; घटनेचा व्हिडिओ ड्रोनमध्ये शूट

आणखी वाचा



Source link