
क्रिकेट आणि बॉलिवूड यांचे जवळचे नाते असल्याचे म्हटले जाते. अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटपटूंशी लग्न केले आहे. विराट कोहली-अनुष्का शर्मा, हार्दिक पांड्या-नताशा स्टेनकोविक, सागरीका घाडगे- जहिर खान, के एल राहूल-अथिया शेट्टी अशा अनेक जोड्या पाहायला मिळतात. आता आणखी एक अभिनेत्री क्रिकेटपटूशी लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. ही अभिनेत्री म्हणजे पूजा हेगडे आहे.







