
अरुणाचल प्रदेशातील चार आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे 2 तसेच नॅशनल पीपल्स पार्टीच्या 2 आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
इटानगर : अरुणाचल प्रदेशातील चार आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री पेमा खंडू (Pema Khandu) यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे 2 तसेच नॅशनल पीपल्स पार्टीच्या 2 आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे आमदार निनोंग एरिंग व वांगलिंन लाऊनदोंग भाजपमध्ये सहभागी झाले आहे.
नॅशनल पीपल्स पार्टीचे आमदार मुचू मिथी, गोकर बासर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर आता 60 आमदारांच्या विधानसभेत काँग्रेस तसेच नॅशनल पीपल्स पार्टीकडे प्रत्येकी 1-1 आमदार उरलेत.