Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशPM Narendra Modi | अयोध्येसाठी मनसेचे थेट पंतप्रधानांना पत्र; बाळासाहेबांचे नाव घेत...

PM Narendra Modi | अयोध्येसाठी मनसेचे थेट पंतप्रधानांना पत्र; बाळासाहेबांचे नाव घेत केली खास मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

अयोध्येसाठी मनसेचे थेट पंतप्रधानांना पत्र; बाळासाहेबांचे नाव घेत केली खास मागणी

येत्या 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यासाठी तब्बल आठ हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, मनसेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत खास मागणी केली आहे.

मुंबई – देशवासियांना सध्या अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर (Ram Mandir) उद्घाटनाची उत्सुकता लागली आहे. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली असून येत्या 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यासाठी तब्बल आठ हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, मनसेने (MNS)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव घेत खास मागणी केली आहे.

मनसेचे उपाध्यक्ष सतीश नारकर यांनी हे पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी मोदींना अयोध्येतील मुख्य चौकाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावी अशी मागणी केली आहे. राम मंदिर हे अनेक आंदोलनानंतर आणि प्रयत्नांनंतर तयार होत आहे. या प्रयत्नांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची सक्रिय भूमिका असून विशेष सहभाग होता. याची आठवण पंतप्रधानांना करुन देत नारकर यांनी मागणी केली आहे. राम मंदिर निर्माणच्या कार्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान मोलाचे होते. यामुळे अयोध्येतील मुख्य चौकाला बाळासाहेबांचे नाव देऊन त्यांचा उचित सन्मान करावा असे पत्र सतीश नारकर यांनी पंतप्रधानांना लिहिले आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments