
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मन की बात कार्यक्रमातुन 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. तसेच संविधान दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
नवी दिल्ली: आज म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ‘मन की बात’ (Mann Ki Baat) या रेडिओ कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित केले. त्यांच्या मन की बात रेडिओ कार्यक्रमाचा हा १०७ वा भाग होता. आज पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज २६ नोव्हेंबरची तारीख आहे, जी कधीही विसरता येणार नाही. या दिवशी आपल्या देशावर सर्वात भयंकर दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी मुंबईसह संपूर्ण देश हादरवून सोडला होता. त्या हल्ल्यातून आपण सावरलो ही भारताची ताकद आहे आणि आज आपण दहशतवादाला चिरडत आहोत.
हे सुद्धा वाचा
संविधान दिनाच्या दिल्या शुभेच्छा
ते पुढे म्हणाले की, २६ नोव्हेंबर हा दिवस आणखी एका कारणासाठीही खूप महत्त्वाचा आहे. याच दिवशी १९४९ साली संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली होती. मी सर्व देशवासियांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि नागरिकांच्या कर्तव्याला प्राधान्य देऊन आपण सर्व मिळून विकसित भारताचा संकल्प नक्कीच पूर्ण करू.








