PM Modi: त्यांना लाज वाटत नाही…; नितीश कुमारच्या ‘त्या’ वक्तव्यावर मोदींची संतापजनक प्रतिक्रिया

0
15
PM Modi: त्यांना लाज वाटत नाही…; नितीश कुमारच्या ‘त्या’ वक्तव्यावर मोदींची संतापजनक प्रतिक्रिया


PM Modi on Nitish Kumar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी (8 नोव्हेंबर) मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यात जाहीर सभा पार पडली. या सभेत नरेंद्र मोदींनी नितीश कुमार यांनी विधानसभेत केलेल्या वक्तव्यावर संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. नितीश कुमार यांनी विधानसभेत महिलांबाबत खळबळजनक वक्तव्य केले. यावर मोदी म्हणाले की, इंडिया आघाडीचे लोक सध्या भारतातले विद्यमान सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार पाडण्याच्या गप्पा मारत आहेत. त्यांच्यातला एक नेता जो इंडिया आघाडीचा झेंडा घेऊन फिरतोय, त्याने काल माता-भगिनींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांना लाट वाटली पाहिजे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.



Source link