फलटणच्या सामाजिक चळवळीतील लढवय्ये नेतृत्व मा. मोरे साहेब यांचे अकस्मात निधन; शहरभरातून भावपूर्ण श्रद्धांजली

0
28
फलटणच्या सामाजिक चळवळीतील लढवय्ये नेतृत्व मा. मोरे साहेब यांचे अकस्मात निधन; शहरभरातून भावपूर्ण श्रद्धांजली

फलटणच्या सामाजिक चळवळीतील लढवय्ये नेतृत्व मा. मोरे साहेब यांचे अकस्मात निधन; शहरभरातून भावपूर्ण श्रद्धांजली

फलटण | प्रतिनिधी. :-फलटणच्या सामाजिक, राजकीय आणि जनआंदोलनांच्या क्षेत्रात सक्रिय योगदान देणारे, आंबेडकर चळवळीतील लढवय्ये नेतृत्व, शरद पवार यांच्या विचारांचे निष्ठावंत शिलेदार आणि सामाजिक चळवळीचा सखोल अभ्यास असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकुमार मोर साहेब यांचे अकस्मात निधन झाल्याने फलटण शहरावर शोककळा पसरली आहे.

नंदकुमार मोरे साहेब यांनी आपल्या आयुष्यभर सामाजिक न्याय, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि जनहिताच्या विविध प्रश्नांवर सातत्याने काम केले. फलटण शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक व्हावे यासाठी त्यांनी अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला.

त्यांचे व्यक्तिमत्त्व अभ्यासू, संयमी आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे होते. विशेषतः तरुण पिढीला सामाजिक कार्याची दिशा देत त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडविण्याचे काम केले. त्यामुळे ते अनेकांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान बनले होते.

त्यांच्या अकस्मात निधनामुळे फलटण शहराने एक कर्तृत्ववान, संवेदनशील आणि समाजहितासाठी अखंड झटणारा नेता गमावला आहे. त्यांच्या जाण्याने सामाजिक चळवळीत आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या मनात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

नंदकुमार मोरे साहेबांच्या निधनाबद्दल विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि नागरिक संघटनांकडून शोक व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येत आहे.

या दुःखद प्रसंगी सर्व स्तरातून त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत. दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना व्यक्त होत आहे.

त्यांचे विचार, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि जनसेवेचा वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

🕯️ भावपूर्ण श्रद्धांजली!