Friday, September 4, 2026
Homeसाताराप्रभाग क्र. 12 मधील पाणीपुरवठ्याच्या समस्येकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष; हंडा मोर्चाचा इशारा

प्रभाग क्र. 12 मधील पाणीपुरवठ्याच्या समस्येकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष; हंडा मोर्चाचा इशारा

फलटण शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील संजीवराजेनगर, हाडको गोळीबार मैदान, विद्यानगर, महाराजा मंगल कार्यालय परिसर आणि बारवबाग भागातील जवळपास 1000 ते 1500 कुटुंबांना नियमित व योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नाही. या समस्येवर लक्ष केंद्रित न झाल्यास फलटण नगर परिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढणार असल्याचा इशारा श्रीमंत रामराजे युवामंच संस्थापक अध्यक्ष राहुलभैय्या निंबाळकर यांनी दिला आहे.

प्रसिद्धीपत्रकात राहुलभैय्या निंबाळकर म्हणाले की, “नगरपरिषद प्रशासन गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली आहे, ज्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांचा समन्वय नाही. अनेकदा मुख्याधिकारी व पाणीपुरवठा विभागाशी चर्चा केली, परंतु समस्येवर फक्त तात्पुरती सुधारणा होते. वास्तविक परिस्थिती मुख्याधिकारी यांच्यापासून लपवली जात आहे.”

राहुलभैय्या निंबाळकर यांनी मुख्याधिकारी साहेबांना या विषयात लक्ष घालण्याचे आवाहन केले असून, या परिसरातील नागरिक नियमितपणे कर भरत असताना देखील त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे नमूद केले. पाणीपुरवठा विभागाला योग्य दाबाने व नियमित एक तास पाणीपुरवठा करण्याचे आदेश द्यावेत, अशी त्यांची मागणी आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments