Sunday, September 13, 2026
Homeसाताराफलटण नगरपरिषद निवडणूक : शिवसेना (शिंदे गट)–राजे गटाची संयुक्त प्रचारफेरी उत्साहात; अनिकेतराजेंच्या...

फलटण नगरपरिषद निवडणूक : शिवसेना (शिंदे गट)–राजे गटाची संयुक्त प्रचारफेरी उत्साहात; अनिकेतराजेंच्या नेतृत्वाला दमदार प्रतिसाद


फलटण प्रतिनिधी : फलटण नगरपरिषद निवडणुकीतील वाढत्या चुरशीला आज आणखी वेग आला. शिवसेना (शिंदे गट) आणि राजे गटाच्या संयुक्त प्रचारफेरीची सुरुवात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत बारसकर गल्ली, मरीमाता मंदिर व रंगारी महादेव मंदिर येथे श्रीफळ वाढवून झाली.

नगरसेवक पदाचे उमेदवार विकास वसंत काकडे आणि स्मिता शहा यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला. विकासाभिमुख दृष्टीकोन, समस्यांचे समाधान आणि स्थानिक पातळीवरील सुविधा यावर त्यांनी नागरिकांना आश्वस्त केले. प्रचारफेरीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, तरुणांचा जोश आणि विविध समाजघटकांचा मोठा प्रतिसाद यामुळे परिसरात निवडणुकीची रंगत अधिक वाढली.

या संयुक्त प्रचार मोहिमेत उमेदवारांनी सामाजिक न्याय, सर्वसमावेशक विकास आणि नागरिकांच्या प्रगतीची वचनबद्धता व्यक्त केली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

नागरिकांकडून मांडल्या गेलेल्या सुविधा, पायाभूत गरजा आणि स्थानिक समस्यांवर उमेदवारांनी सकारात्मक तोडग्यांची ग्वाही दिली. वाढत चाललेल्या जनसमर्थनामुळे फलटण नगरपरिषद निवडणुकीची लढत अधिक रंगतदार आणि तीव्र होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments