Sunday, September 13, 2026
Homeसाताराफलटण-कोरेगाव निवडणुकीच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

फलटण-कोरेगाव निवडणुकीच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

फलटण :-फलटण-कोरेगाव विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णतः सज्ज झाली आहे. उद्या, शनिवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी शासकीय धान्य गोदाम येथे सुरू होणार आहे. सुरुवातीला पोस्टल मते मोजली जातील, त्यानंतर १४ टेबलांवर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) द्वारे मतांची मोजणी २६ फेऱ्यांमध्ये पार पडणार आहे.

मतमोजणी यंत्रणा आणि बंदोबस्तः

पोस्टल मते: १० टेबल

इटीपीबीएस मते: ५ टेबल

ईव्हीएम मते: १४ टेबल (२६ फेऱ्या)
एकूण २९ टेबलांवर २५० कर्मचाऱ्यांच्या मदतीने मतमोजणी केली जाणार आहे.

मतदारांचा सहभाग:
फलटण-कोरेगाव मतदार संघात एकूण २,४१,३७६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

पुरुष मतदार: १,२६,३६४

स्त्री मतदार: १,१५,००४

इतर मतदार: ०८

मतमोजणी प्रक्रियेचा तपशील:
ईव्हीएम मतमोजणी दर फेरीत १४ मतदान केंद्रांची मते मोजली जातील. २६ फेऱ्यांत एकूण ३५५ मतदान केंद्रांची मते मोजली जातील. शेवटच्या २६ व्या फेरीत ५ मतदान केंद्रांचा समावेश असेल. प्रत्येक फेरीचा निकाल तत्काळ जाहीर केला जाणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी व प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी मतमोजणीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments