Thursday, August 20, 2026
Homeसाताराफलटण तालुक्याचा विकास वेगाने करण्यासाठी सचिन पाटील यांना विजयी करा – रणजितसिंह...

फलटण तालुक्याचा विकास वेगाने करण्यासाठी सचिन पाटील यांना विजयी करा – रणजितसिंह नाईक निंबाळकर


फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागात कोपरा सभांद्वारे मतदारांशी संवाद साधला. या दौऱ्यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

“खासदारकीच्या कालावधीत कोरोनामुळे मर्यादित कार्यकाळ मिळाला असतानाही फलटण तालुक्यात अनेक महत्त्वाची विकासकामे केली. रेल्वे, पालखी महामार्ग, बारामती रस्ता, ग्रामीण भागातील रस्ते, आरटीओ ऑफिस, आणि अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय हे कामे पूर्ण करण्यासाठी निधी आणला. आता आपल्याकडे खासदार नाही; मात्र सचिन पाटील आमदार झाल्यास तालुक्याचा विकास अजून वेगाने होईल,” असे आवाहन नाईक निंबाळकर यांनी केले.

सचिन पाटील यांच्या शेतीतून आलेल्या पार्श्वभूमीचा उल्लेख करत त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्याच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला. “सचिन पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठिंब्याने निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे अजित पवारांचे फलटणकडे लक्ष राहील. भाजप-राष्ट्रवादीची दुहेरी ताकद मिळाल्याने बारामतीप्रमाणे फलटणचा विकास होईल,” असे त्यांनी नमूद केले.

विद्यमान आमदारांवर टीका करताना नाईक निंबाळकर म्हणाले, “गेल्या 15 वर्षांत विद्यमान आमदारांनी किती वेळा तुमच्याकडे येऊन समस्या सोडवल्या? रोजगाराच्या कोणत्या संधी उपलब्ध केल्या? तुम्ही विचार करा, उत्तर शून्यच मिळेल. यंदा आमदार बदला आणि सचिन पाटील यांना संधी द्या. पाच वर्षांत जर त्यांनी काम केले नाही, तर मी स्वतः कधीही तुमच्याकडे मते मागायला येणार नाही.”

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विश्वास आहे की महायुतीचा विजय फलटण तालुक्याला विकासाच्या दिशेने नेईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments