पालखी सोहळ्याच्या तेजात उजळलं फलटण!श्री चक्रपाणी प्रभूंच्या पालखी महोत्सवात आमदार, पदाधिकारी व नागरिकांची भावनिक उपस्थिती

0
1
पालखी सोहळ्याच्या तेजात उजळलं फलटण!श्री चक्रपाणी प्रभूंच्या पालखी महोत्सवात आमदार, पदाधिकारी व नागरिकांची भावनिक उपस्थिती

फलटण (ता. १८ एप्रिल) – ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलटणमध्ये श्री चक्रपाणी प्रभू पालखी महोत्सव सध्या भक्तीमय वातावरणात पार पडत आहे. १३ एप्रिलपासून सुरू झालेल्या या उत्सवाचा मुख्य दिवस शुक्रवार, १८ एप्रिल २०२५ रोजी साजरा करण्यात येत आहे.

या पवित्र दिवशी श्री चक्रपाणी प्रभूंच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आमदार सचिन पाटील आणि जिल्हा परिषदेच्या सदस्या जीजामाला नाईक निंबाळकर यांनी उपस्थित राहून श्रद्धेने दर्शन घेतले.

यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये मांढरे आप्पा, बाळासाहेब नानावरे, डी. के. अण्णा पवार, अनुप शहा, राहुल शहा, अर्जुन अप्पा नाळे, बंडू शिंदे, रमेश माठपती, प्रितम बेंद्रे, निलेश खानविलकर, नितीन वाघ आणि इतर कार्यकर्ते, पदाधिकारी, भाविक यांचा समावेश होता.

श्री चक्रपाणी प्रभूंचा पालखी सोहळा हे फलटणच्या धार्मिक परंपरेचे एक अत्यंत महत्त्वाचे प्रतीक असून या सोहळ्यात दरवर्षी हजारो भाविक सहभागी होत असतात. यावर्षीही उत्सवाचे आयोजन भक्तीभाव आणि शिस्तबद्धतेने पार पडले.