Sunday, September 27, 2026
Homeदेश-विदेशPassenger Hits Pilot | इंडिगोच्या पायलटला मारहाण करणाऱ्या प्रवाशाविरुद्ध होणार मोठी कारवाई!...

Passenger Hits Pilot | इंडिगोच्या पायलटला मारहाण करणाऱ्या प्रवाशाविरुद्ध होणार मोठी कारवाई! ‘नो फ्लाय’ यादीत समावेश करण्याची शक्यता | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

इंडिगोच्या पायलटला मारहाण करणाऱ्या प्रवाशाविरुद्ध होणार मोठी कारवाई! ‘नो फ्लाय’ यादीत समावेश करण्याची शक्यता

इंडिगोच्या पायलटला मारहाण करणाऱ्या प्रवाशाविरुद्ध होणार मोठी कारवाई करण्यात येणार आहे. हा राडा करणाऱ्या प्रवाशाला ‘नो-फ्लाय’ (No Fly) यादीत टाकण्यासाठी DGCA कडे शिफारस केली जाण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.

इंडिगो विमानाच्या पायलटला प्रवाशाने मारहाण (Passenger Hits Pilot) केल्याचं प्रकरण सध्य खुप चर्चेत आहे. मात्र, अशा पद्धतीने पायलटला मारहाण करणं प्रवाशांला चांगलच महागात पडलं आहे. या प्रकरणी इंडिगो एअरलाइन कंपनी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. हा राडा करणाऱ्या प्रवाशाला ‘नो-फ्लाय’  (No Fly)  यादीत टाकण्यासाठी DGCA कडे शिफारस केली जाण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. इंडिगोने या घटनेबाबत अंतर्गत समिती स्थापन केली आहे. जर एखाद्या प्रवाशाचे नाव ‘नो फ्लाय लिस्ट’मध्येदिसले तर त्याचा अर्थ असा होतो की त्याला अनुचित वर्तनासाठी दोषी मानून विशिष्ट कालावधीसाठी भारतात उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं प्रकरण काय?

इंडिगो विमानाला उशीर झाल्याची घोषणा करणाऱ्या एका वैमानिकाला प्रवाशाने मारहाण केली. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक तासांच्या विलंबानंतर फ्लाइट ड्युटी टाईम लिमिटेशन (FDTL) नियमांमुळे पूर्वीच्या क्रूची जागा एका जागा वैमानिकाने घेतली. मात्र, काही कारणामुळे फ्लाईट उशीरानं धावत असल्याची माहिती देण्यासाठी तो प्रवाशांसमोर आला. तितक्यात पिवळा हुडी घातलेला एक माणूस अचानक धावत आला  आणि त्याने पायलटवर हल्ला करत त्याल मारहाण केली. वेळीच उपस्थित असलेल्या इतर क्रु मेंबर्सनी त्या प्रवाशाला रोखलं. या भांडणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ही घटना रविवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments