
पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या की, “आमचा कारखाना खूप अडचणीत आहे. मी देखील आर्थिकदृष्या प्रचंड तणावात आहे. माझे नऊ किलो वजन कमी झाले आहे. मी दररोज बँकेच्या पाया पडतेय. मात्र, ज्यावेळी इतर कारखान्यावर आर्थिक संकट कोसळले, तेव्हा सरकारकडून त्यांना मदत मिळाली. माझ्याही कारखान्याकडून मदतीसाठी अर्ज केला होता. पण आम्हाला मदत मिळाली नाही. मी तक्रार करत नाही. पण कदाचित मदत मिळाली असती तर, मी या पैशांची परतफेड करू शकली असते”, अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी खंत व्यक्त केली.




