Tuesday, August 11, 2026
Homeमहाराष्ट्रप्रभाग क्रमांक १० मध्ये नवीन एलईडी व मर्क्युरी दिव्यांची बसवणी; नागरिकांकडून समाधान...

प्रभाग क्रमांक १० मध्ये नवीन एलईडी व मर्क्युरी दिव्यांची बसवणी; नागरिकांकडून समाधान व्यक्त

प्रभाग क्रमांक १० मध्ये नवीन एलईडी व मर्क्युरी दिव्यांची बसवणी; नागरिकांकडून समाधान व्यक्त

अकलूज प्रतिनिधी : अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रेश्माताई अडगळे तसेच उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक १० मधील कर्तव्यदक्ष नगरसेविका मनिषाताई मोहन तिकोटे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

प्रभाग क्रमांक १० मध्ये जुन्या व निकामी झालेल्या पथदिव्यांऐवजी नवीन मर्क्युरी व एलईडी दिवे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले. या कामामुळे परिसरातील रस्त्यांवर अधिक प्रकाश पडणार असून नागरिकांना रात्रीच्या वेळी सुरक्षित व सुलभ प्रवास करता येणार आहे. तसेच अंधारामुळे उद्भवणाऱ्या अडचणी व अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

यावेळी नागरिकांनी नगराध्यक्षा रेश्माताई अडगळे, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील आणि नगरसेविका मनिषाताई मोहन तिकोटे यांचे आभार मानत प्रभागातील विकासकामांबाबत समाधान व्यक्त केले. भविष्यातही नागरिकांच्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी अशाच विकासकामांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments