
अक्रम गाझीची गुरुवारी पाकिस्तानातील बाजौरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पाकिस्तानमध्ये अशा प्रकारे दहशतवादी मारण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही भारतातील अनेक मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात मारले गेले आहेत.
पाकिस्तानमधून (Pakistan) एक मोठी बातमी समोर येत आहे. भारताचा एका शत्रूचा पाकिस्तानात खात्मा करण्यात आला आहे. लष्कर-ए-तैयबाचा माजी कमांडर अक्रम खान उर्फ अक्रम गाझी (akram ghazi ) याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अक्रमचा भारताविरुद्ध कारवाईमध्ये त्याचा सहभाग असायचा. त्याने 2018 ते 2020 या काळात लष्करातील भरतीचे काम पाहिले.
हे सुद्धा वाचा
पाकिस्तानातील बाजौरमध्ये गुरुवारी अक्रम गाझी यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली अक्रम हा लष्कराच्या प्रमुख कमांडरांपैकी एक आहे. तो बराच काळ दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. पाकिस्तानमध्ये अशा प्रकारे दहशतवाद्यांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी मुफ्ती कैसर फारुख, खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाड, एजाज अहमद अहंगर, बशीर अहमद पीर यांसारख्या अनेक दहशतवाद्यांनाही अज्ञात हल्लेखोरांनी ठार केले होते.









