Monday, September 14, 2026
Homeसातारारामराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांची पवार साहेबांसोबत जाण्याची एकमुखी मागणी; पुढील निर्णयावर सर्वांचे...

रामराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांची पवार साहेबांसोबत जाण्याची एकमुखी मागणी; पुढील निर्णयावर सर्वांचे लक्ष

फलटण | विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दोन दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या जाहीर मेळाव्यात त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी पवार साहेबांसोबत जाण्याची मागणी एकमुखी केली.

या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन रामराजे यांनी पक्षातील वरिष्ठांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. तसेच, प्रमुख कार्यकर्त्यांसोबत पुन्हा एकदा मेळावा घेऊन आपली पुढील भूमिका लवकरच जाहीर करू, असे सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे रामराजेंची नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या घडामोडींमुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रामराजेंची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments