Monday, August 31, 2026
Homeसाताराखासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त " भव्य बैलगाडा शर्यती " सागर...

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त ” भव्य बैलगाडा शर्यती ” सागर अभंग

फलटण : विडणी गावचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी दिलेल्या माहितीनुसार माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त ” भव्य बैलगाडा शर्यती जाधववाडी , फलटण येथे भरविण्यात आल्या आहेत या बैलगाडा शर्यतीत भाग घेणाऱ्या बैलगाडा विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसे तसेच गटातील प्रथम येणाऱ्यांना बैलगाडीला चांदीची गदा देण्यात येणार आहे

माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्यदिव्य असे बैलगाडा शर्यतीचे आयोजन सागर अभंग यांनी सोमवार दि .११ मार्च रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वा पर्यंत असेल , बैलगाडा शर्यतीच्या निकाल हा पारदर्शक व अचूक येण्यासाठी रेषा , अत्यंत पारदर्शक व ड्रोनच्या वापर करून तसेच पट्टी व इतर सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे . स्पर्धा ही पारदर्शक व स्वच्छ वातावरणात पार पडणार आहेत . या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना नाममात्र १ हजार ५०० रुपये प्रवेश फी आकारली जाणार असून ती ऑनलाईन किंवा ऑफलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे

या स्पर्धेतील पाहिले बक्षिस पाच लाख रुपये, दुसरे बक्षिस तीन लाख रुपये, तिसरे बक्षिस दोन लाख रुपये, चौथे बक्षिस एक लाख रुपये, पाचवे बक्षिस पंचाहत्तर हजार रुपये, सहावे बक्षिस पन्नास हजार रुपये व सातवे बक्षिस पंचवीस हजार रुपये रोख रक्कम स्वरूपात मिळणार असून या व्यतिरिक्त या स्पर्धेत सहभागी असणाऱ्या पशुंना चारा व पाणी मोफत दिले जाणार असल्याचे अभंग यांनी सांगितले.

दरम्यान ही भव्य बैलगाडा शर्यत स्पर्धा ही अत्यंत पारदर्शक होण्यासाठी  ड्रोन कॅमेऱ्याच्या वापर करण्यात येणार आहे . तसेच पूर्ण स्पर्धेचे यूट्यूब वरती लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे . या स्पर्धेचे कामाकाज पाहण्यासाठी  ,झेंडा पंच म्हणून नामांकित असे धनावडे बापू, सोमनाथ जगदाळे, उपस्थित राहणार आहेत, समालोचन सुनील मोरे, मयूर तळेकर, विकास सर प्रवीण घारे करणार असल्याचे सागर अभंग यांनी शेवटी सांगितले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments