
सोशल मीडियावर शेयर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, गेल्या १९ ते २० वर्षात आपण सर्वांनी मला भरपूर प्रेम दिलेलं आहे. कारण नसताना अनेकांनी साथ दिल्याबद्दल मी आभारी आहे. भाजपात काम करण्याची संधी मिळाली, त्यासाठी देखील मी पक्षसंघटनेचा आभारी आहे. परंतु आता राजकारणात मन रमत नसल्याने मी त्यातून निवृत्ती घेत असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.





