
नवाज ‘सैंधव’ या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शैलेश कोलानुने केले आहे. हा चित्रपट १३ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नवाज खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी नवाज प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याने तेलुगूचे धडे घेतले आहेत. ‘सैंधव’ या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकीसह वेंकटेश, श्रद्धा श्रीनाथ, रुहानी शर्मा, जिशू सेन गुप्ता, मुकेश ऋषी आणि अंड्रिमा जेरेमिया महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत







